Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • Swachhata Hi Seva 2025 Gandhi Jayanti । चंद्रपूर: स्वच्छता ही सेवा 2025 अभियानाचा गांधी जयंतीनिमित्त समारोप

    Swachhata Hi Seva 2025 Gandhi Jayanti

    Swachhata Hi Seva 2025 Gandhi Jayanti : चंद्रपूर, 2 ऑक्टोबर – शासन निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा 2025’ या अभियानाचा समारोप चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 2 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांनी करण्यात आला.

    6 शस्त्रक्रिया आणि ती म्हणते धन्यवाद सुधीरभाऊ

    देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबर रोजी सुरुवात होऊन, महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी 2 ऑक्टोबर रोजी पूर्ण झालेल्या या अभियानात नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम घेण्यात आले. “स्वच्छोत्सव” या थीमनुसार सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा झेंडींचे रूपांतरण, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, स्वच्छ-हरित उत्सव तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. Chandrapur municipal corporation Swachhata campaign

    स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार

    कार्यक्रमाची सुरुवात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. त्यानंतर जटपुरा गेट भागात मनपा शाळेतील विद्यार्थी तसेच चंद्रपूर बचाओ संघर्ष समितीच्या सदस्यांनी स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले. यावेळी जटपुरा गेट ते गांधी चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर मनपा कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

    chandrapur cmc

    सदर कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रवार, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहायक आयुक्त अनिलकुमार घुले, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी, नगरसचिव नरेंद्र बोबाटे, समाज विकास अधिकारी सचिन माकोडे, डॉ. अमोल शेळके, मनीषा नैताम तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Dengue mosquito breeding checkers । चंद्रपूरमध्ये डेंग्यूचा धोका! मनपाची डासोत्पत्तीविरोधी मोहीम सुरु

    Dengue mosquito breeding checkers

    Dengue mosquito breeding checkers : चंद्रपूर : २७ सप्टेंबर – काही दिवसापासून शहरात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डेंग्यूच्या उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महानगरपालिकेतर्फे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

    गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

    महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक योजना सुरु असल्यातरी नागरिकांना स्वतःचा संरक्षणासाठी पुढील उपाय योजना करणे आवश्यक आहे.
    घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी साचू देऊ नये, ज्या भांड्यात तुम्ही पाळीव प्राण्यांना पाणी देता ते भांडे स्वच्छ ठेवने, पाण्याची टाकी चांगल्या प्रकारे झाकून ठेवने, कुलर आणि पाण्याच्या टाकीत आठवड्यातून एकदा थोडे पेट्रोल टाकने, तसेच रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला पाण्याचा ट्रे दररोज रिकामे करणे आवश्यक आहे. Chandrapur dengue prevention campaign

    कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु,170 आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन प्रत्येक घरामध्ये सतर्कता बाळगण्याचे इशारा दिला जात आहे.

     पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.  Mosquito breeding control rainy season

    डेंग्युची लक्षणे –

    डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

    डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –

    डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी . पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.


     



  • Chandrapur Devi Visarjan 2025 । देवी विसर्जनासाठी ईरई नदीवर खास व्यवस्था – नागरिकांनो जाणून घ्या मनपाचे प्लॅनिंग

    Chandrapur Devi Visarjan 2025

    Chandrapur Devi Visarjan 2025 : चंद्रपूर 25 सप्टेंबर –  शहरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या देवी विसर्जन सोहळ्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे तयारी केली जात असुन इरई नदी हेच विसर्जनाचे अधिकृत स्थळ असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

    चंद्रपुरात पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक

       विसर्जन सुरळीत पार पडावे यादृष्टीने मनपाची शहर नियंत्रण समिती कार्यरत असुन मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन स्थळावर सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. विद्युत विभागामार्फत मार्गावर तसेच विसर्जन स्थळावर पुरेशी लाईट व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाची चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन अँब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात येत आहे.

    मनपाची तयारी

      यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय कार्यरत ठेवण्यात येणार आहे.अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन विसर्जनप्रसंगी आवश्यक त्या साधने उपलब्ध केली गेली आहेत. स्वच्छता विभागाद्वारे रस्त्यांची नियमित सफाई करण्यात येत असुन रस्त्यावर व विसर्जन स्थळी कचरा जमा राहु नये यादृष्टीने घनकचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. ईरई नदी या मुख्य विसर्जन स्थळाची स्वच्छता केली गेली आह. विसर्जनानंतर त्याच रात्री सर्व रस्ते स्वच्छ करून सकाळी सर्वांना स्वच्छ रस्त्याचा वापर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी मिळतो. Irrai River immersion Chandrapur

    नवरात्रात लागणाऱ्या विविध परवानग्या या मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेद्वारे देण्यात आल्या आहेत. यंदा 229 मंडळांनी परवानगीसाठी अर्ज ऑनलाईन अर्ज सादर केला होता. महानगरपालिकेद्वारे ही सर्व कार्ये दरवर्षी पार पाडली जातात. यावर्षीसुद्धा देवी विसर्जन सोहळा हा शांततेत व आनंदात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Chanda plastic shop penalty । चांदा प्लास्टिकमध्ये १५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त, मनपा प्रशासनाची कारवाई

    Chanda plastic shop penalty

    Chanda plastic shop penalty : चंद्रपूर 22 सप्टेंबर – गोल बाजारातील चांदा प्लास्टिक या दुकानामध्ये 150 किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाद्वारे सदर प्रतिष्ठानावर 5 हजार रुपये दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली आहे.  

    तो नरभक्षक बिबट्या जेरबंद, सिंदेवाहीत ८ वर्षीय मुलाचा घेतला बळी

       सोमवार 22 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे बाजारातील दुकानांची पाहणी सुरु असता गोल बाजारातील चांदा प्लास्टिक या दुकानामध्ये 5 पोते प्लास्टिक पिशव्या असल्याची माहिती उपद्रव शोध पथकास माहिती मिळाली. पाहणी केली असता एकुण 150 किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने सदर साहित्य जप्त करण्यात आले असुन 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

    गुप्त माहीती द्या ५ हजार बक्षीस मिळवा

     चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. Chandrapur Municipal Corporation action

       एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,शुभम खोटे, शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लीवार, पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली.   


  • Chandrapur Swachhata Sankalp Din Activities | चंद्रपूर मनपा स्वच्छता जनजागृती अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

    Chandrapur Swachhata Sankalp Din Activities

    Chandrapur Swachhata Sankalp Din Activities : चंद्रपूर, दि. 22 सप्टेंबर – शासन निर्देशानुसार “स्वच्छता ही सेवा 2025” अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभर राबविण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सहभागातून तीनही झोनमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाची यावर्षीची थीम “स्वच्छोत्सव” असून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, प्लास्टिक बंदी जनजागृती, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण व कचरा व्यवस्थापन जनजागृती अशा उपक्रमांवर भर देण्यात आला आहे.
    झोन 1, 2 व 3 चे सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,संतोष गर्गेलवार व अनिलकुमार घुले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात हे उपक्रम हाती घेण्यात आले. Municipal Corporation Swachh Bharat Awareness

    अश्विन नवरात्रीला आजपासून प्रारंभ, महाकाली मंदिरात घटस्थापना

    झोन क्र. 1 अंतर्गत 

    तुकुम, विवेकनगर, जटपूरा, वडगांव व नगीनाबाग या प्रभागांत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा देणे, कचरा कुंडीचा वापर व परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हातठेले व फळ विक्रेत्यांना प्लास्टिक बंदी व कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली. रामनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मनपा कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीरीत्या राबविण्यात आले. मिनगाव व बाबूपेठ परिसरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

    chandrapur mahanagarpalika

    झोन क्र. 2 अंतर्गत – 

    झोन कार्यालय इमारत व झोन क्र 2 अ व ब स्वच्छता विभाग कार्यालय,हनुमान खिडकी, दादमहल,गोलबाजार मार्केट व गंजवार्ड सब्जी मार्केट,पठाणपूरा गेट,अंचलेश्वर गेट,बिनबा गेट,मनपा प्राथमिक शाळा येथे स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला असुन पुढे झोन क्र 2 परिसरात प्लास्टीक बंदी बाबत जनजागृती अभियान राबविणे एक दिन एक घंटा या अंतर्गत रामाळा तलाव परिसरात स्वच्छता कार्यक्रम,- वेलफेअर पोग्रामबाबत कर्मचा-यांना माहीती देणे व जनजागृती करणे,राजीव गांधी उद्यान पठाणपूरा रोड येथे स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम,परिसरातील झेंड्याची स्वच्छता करुन परिसरातील नागरीकांमध्ये जनजागृती करणे, लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा येथे चित्रकला, निबंध व रांगोळी स्पर्धा,रस्ते/नाली सफाई अभियान, डिप क्लिनींग व शौचालय स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  Urban Sanitation Awareness Programs Maharashtra

    झोन क्र. 3 अंतर्गत –

     देशबंधू चित्तरंजन दास व मराठी प्राथ. शाळा दुर्गा कॉलनी रय्यतवारी येथे स्वच्छता अभियान घेण्यात आले. नेताजी चौक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बायपास रोड-डंपिंग यार्ड ते आंबेडकर चौक व तेलगु शाळा समोरील मैदान परिसर येथे सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांद्वारे स्वच्छता राखण्याची शपथ घेण्यात आली आहे.  पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा येथे निबंध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असुन विविध धार्मिक ठिकाणी स्वच्छता कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे.

    तसेच सर्व झोन कार्यालयांद्वारे 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त “स्वच्छता संकल्प दिन” व भव्य साफसफाई मोहीमेचे आयोजन केले जाणार आहे. झालेल्या या सर्व उपक्रमांत मनपा अधिकारी, कर्मचारी, शाळा, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. “स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी असून, स्वच्छतेतूनच सुंदर समाजाची निर्मिती होते,” असा संदेश या अभियानातून देण्यात आला.

  • Chandrapur disability welfare scheme । चंद्रपूर मनपाचा उपक्रम: दिव्यांगांना व्यवसायासाठी 23.82 लाखांचे अनुदान!

    Chandrapur disability welfare scheme

    Chandrapur disability welfare scheme : चंद्रपूर 19 सप्टेंबर –  दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळावा व त्यामाध्यमातुन त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग कल्याण धोरणाची अंमलबजावणी केल्या जात असुन याअंतर्गत 34 दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास एकुण 23.82  लक्ष रुपयांचे अनुदान आतापर्यंत देण्यात आले आहे.

    चंद्रपुरात द बर्निंग कार

    अनेक दिव्यांग व्यक्तींना स्वतः चा व्यवसाय किंवा लघुउदयोग सुरु करायचा असतो परंतु अपुऱ्या भांडवलामुळे व्यवसाय सुरु करु शकत नाही अश्या दिव्यांग व्यक्तीकरीता चंद्रपूर महानगरपालिकेतील दिव्यांग कल्याण धोरण या योजनेतुन 2 लक्ष रुपयांचे कर्ज विविध बँकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाते. मनपा दिव्यांग कल्याण धोरण अंतर्गत बँकेने मंजुर केलेल्या कर्जावर 50 टक्के अनुदान देण्यात येते.

    34 दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा लाभ

    चंद्रपूर मनपाच्या माध्यमातुन आतापर्यंत 34 दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असुन त्यांना एकुण 23.82 लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.  ज्यास्तीत ज्यास्त दिव्यांग व्यक्तींनी व्यवसायाला सुरवात करून आत्मनिर्भर व्हावे व आपल्या कुटुंबाला हातभार लावुन आर्थिक प्रगती व्हावी हा या मागचा उद्देश आहे. divyang self employment assistance Chandrapur

    ज्या दिव्यांग व्यक्तींना नविन व्यवसाय सुरु करावयाचा असेल अथवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ करावयाची असेल त्यांनी कर्ज घेण्याकरीता व अधिक माहितीकरीता मनपा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ( बीपीएल ऑफीस ),सरकारी दवाखान्यामागे,कस्तुरबा रोड ज्युबली शाळेसमोर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे तसेच अधिकाधिक दिव्यांगांनी योजेनचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

  • Sewage treatment plant gas leak Chandrapur | चंद्रपुरात सांडपाणी प्रकल्पातून क्लोरीन गळती; नागरिकांचे स्थलांतर, मोठी दुर्घटना टळली

    Sewage treatment plant gas leak Chandrapur

    Sewage treatment plant gas leak Chandrapur : चंद्रपूर १७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर महानगरपालिकेच्या सिव्हरेज सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट) मधून सायंकाळी ६ वाजेदरम्यान क्लोरीन गॅस ची गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून क्लोरीन गळती मुळे प्रशासनाने परिसर खाली करीत नागरिकांना महानगरपालिका शाळेत हलविले. वेळेच्या आत परिस्थितीवर नियंत्रण मिळाल्याने मोठी घटना टळली.

    चंद्रपुरातील ह्या पोलीस निरीक्षकाच्या त्रासाने कंटाळले पोलीस कर्मचारी

    सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पाला पाणी पुरवठा केला जातो. सांडपाणी प्रकल्प हा चंद्रपूर मनपा चा आहे मात्र सध्या यावर संपूर्ण नियंत्रण औष्णिक वीज केंद्राचे आहे, क्लोरीन गळती मुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता, अचानक उदभवलेल्या या परिस्थितीमुळे अनेक महिला बेशुद्ध पडल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. Chandrapur chlorine gas leak news

    चंद्रपूर मनपाच्या नवनियुक्त प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांनी अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाचारण केले व परिस्थितीवर नियंत्रण आणले. 60 ते 70 घरातील लोकांना किदवाई शाळेत तसेच इतर महानगरपालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आलेले आहे परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती आयुक्त गायकवाड यांनी दिली. सोबतच अशी घटना पुन्हा होऊ नये याकरिता महाजेनको सोबत बैठक घेणार असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले. Emergency response chlorine leak Chandrapur

    चंद्रपूर शहराबाहेरील असलेल्या या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची एकूण क्षमता हि दररोज २५ दशलक्ष लिटर इतकी आहे.

    खासदार यांनी केली चौकशीची मागणी

    चंद्रपुरातील जल शुद्धीकरण केंद्रातून आज क्लोरीन गॅस गळती झालेल्या घटनेची चंद्रपूर मनपा व जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेत यामागील चौकशी करावी असे निर्देश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले आहे. या घटनेमुळे मोठी दुर्घटना टळली पण पुन्हा अशी चूक होता कामा नये याकरिता यामागील पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.

    आमदाराची तत्परता

    रहमत नगर येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने नागरिकांना उलटीचा आणि श्वसनाचा त्रास झाला होता. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह प्लांटची पाहणी केली. आमदार जोरगेवार यांच्या सूचनेनंतर सदर लिकेज बंद करण्यात आले असून सावधगिरी म्हणून येथील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपाच्या प्रभारी आयुक्त आयुक्त वर्षा गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रामटेके उपस्थित होते. Sewage treatment plant gas leak Chandrapur
    mla jorgewar on spot
               रहमत नगर येथे चंद्रपूर महानगरपालिकेचा सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आहे. सदर प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याची घटना आज (बुधवार) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. गॅस गळतीमुळे परिसरातील अनेक नागरिकांना उलटी व श्वसनाचा त्रास सुरू झाला. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी तातडीने गळती बंद करण्यात आली असून जवळपासच्या नागरिकांना किदवई हायस्कूल येथे हलविण्यात आले आहे.सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे.
  • Vidya Gaikwad Chandrapur Municipal Commissioner । चंद्रपूर महानगरपालिकेत विद्या गायकवाड आयुक्त म्हणून रुजू

    Vidya Gaikwad Chandrapur Municipal Commissioner

    Vidya Gaikwad Chandrapur Municipal Commissioner : चंद्रपूर 17 सप्टेंबर (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणुन श्रीमती विद्या गायकवाड रुजू झाल्या असुन बुधवार 17 सप्टेंबर रोजी त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला.

    दुर्गापुर पोलीस निरीक्षकांचा वादग्रस्त कारभार

    मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिद्रवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विपीन पालीवाल हे वैद्यकीय कारणाने रजेवर असल्याने नगर परिषद प्रशासन विभागाच्या जिल्हा सहआयुक्त म्हणुन कार्यरत असणाऱ्या श्रीमती विद्या गायकवाड यांना चंद्रपूर मनपा प्रशासनाचे आयुक्त म्हणुन अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे.

    गतिमान प्रशासन होणार

    मनपाच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मनपाच्या सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. कामे ही निश्चित वेळेतच व्हायला हवी याबाबत आपण आग्रही असुन गतिमान प्रशासनाच्या दृष्टीने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मनपाचे सर्व विभागप्रमुख,अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.  

  • MP Dhanorkar demands IAS posting cmc chandrapur | खासदार प्रतिभा धानोरकरांची मागणी – चंद्रपूर महापालिकेसाठी IAS अधिकारी आवश्यक

    Mp Dhanorkar demands IAS posting cmc chandrapur

    Mp Dhanorkar demands IAS posting cmc chandrapur : चंद्रपूर 17 सप्टेंबर 2025 – भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आणि ड दर्जाची महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेची अवस्था सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लोकहिताच्या दृष्टीने या महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर एका कर्तव्यदक्ष भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी आग्रही विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. Pratibha Dhanorkar IAS officer request

    अभियंता ओली पार्टी प्रकरण, जिल्हा परिषदेने दिले चौकशीचे आदेश

    चंद्रपूर महानगरपालिका ही सध्या शिस्त आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत खूपच मागे पडली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत, आणि अनेक विकासकामे कागदोपत्रीच दिसत आहेत. कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता, प्रशासकीय दिरंगाई आणि गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

    तर पारदर्शकता येणार

    या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “चंद्रपूर महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एका सक्षम IAS अधिकाऱ्याची नेमणूक करणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या प्रशासनात दिसून येणारी शिस्तीची कमतरता आणि भ्रष्टाचाराचा विळखा यामुळे शहराचा विकास खुंटला आहे,” असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

    आता या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे चंद्रपूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. एका IAS अधिकाऱ्याच्या नेमणुकीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • one window scheme CMC Chandrapur । CMC Chandrapur कडून एक खिडकी योजना सुरू – नवरात्र 2025 साठी सोपी परवानगी प्रक्रिया

    one window scheme CMC Chandrapur

    one window scheme CMC Chandrapur : चंद्रपूर 16 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सवासाठी एक खिडकी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडुन परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.

    चंद्रपूर मनपाची अंतिम प्रभाग प्रारूप रचना १३ ऑक्टोबर ला

    येत्या 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना असुन 1 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियमावली बाबत हमीपत्र घेऊन परवानगी दिली जाणार आहे. ऐनवेळी परवानगीसाठी अर्ज न देता लवकरात लवकर परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.  Navratri pandal permission Chandrapur

       महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्‍या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील.  सार्वजनिक मंडळाकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

    एक खिडकी योजना –

     सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या cmcchandrapur.com या संकेतस्थळावर quick link सदरात pandal permission 2025 येथे ही लिंक उपलब्ध आहे. अथवा https://pandal.cmcchandrapur.com/ येथे भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.  यामध्ये पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विविध विभागांचे प्रतिनिधी संबंधित सादर केलेल्या अर्जांची छाननी करतील व महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.