Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • Chandrapur Manpa prabhag rachana objections । चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक : अंतिम प्रभाग रचना 13 ऑक्टोबरपर्यंत निश्चित

    Chandrapur Manpa prabhag rachana objections

    Chandrapur Manpa prabhag rachana objections : चंद्रपूर 16 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर निर्धारित वेळेत 8 हरकती अर्ज चंद्रपूर मनपा प्रशासनास  प्राप्त झाले आहेत.  

    नगरपंचायत मध्ये ८३ लाख रुपयांचा घनकचरा घोटाळा

    महापालिकेच्या प्रभाग रचनेचे प्रारूप 3 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यावर हरकती.सूचना मागविण्यास सोमवार 15 सप्टेंबर दुपारी 3.00 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. या कालावधीत 12 सप्टेंबर पर्यंत 6 तर अखेरच्या दिवशी 2 असे एकुण 8 अर्ज मनपा प्रशासनास प्राप्त झाले.

    १८ सप्टेंबर रोजी सुनावणी

    18 सप्टेंबर रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व हरकतींवर सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार आहे. सुनावणीदरम्यान अर्जदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार असुन त्यानंतरच अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे.

    आक्षेपांवर सुनावणी होणे, त्यानंतर प्रभागरचना अंतिम करून शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविणे, नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविणे, निवडणूक आयोगाच्या अंतिम मंजुरीनंतर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे, अशी संपूर्ण प्रक्रिया 13 ऑक्टोबरपर्यंत नियोजित आहे. 


       

  • Bagless school program Maharashtra | 🎨 चित्रकला, कोडी आणि मजेदार खेळांनी उजळल्या चंद्रपूर मनपा शाळा – दप्तरविना दिवसाची धमाल

    Bagless school program Maharashtra

    Bagless school program Maharashtra : चंद्रपूर 15 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे “दप्तरविना शाळा” हा उपक्रम शहरातील शाळांमध्ये उत्साहात राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दप्तरा विना शनिवार हा उपक्रम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी घेण्यात येऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासून थोडी विश्रांती देऊन आनंदाने व खेळकर पद्धतीने शिक्षण घडवणे हा आहे.

    चंद्रपुरात अज्ञातांनी फोडलं बँक ऑफ महाराष्ट्र चे ATM


       शनिवार 13 सप्टेंबर रोजी मनपाच्या विविध शाळांत शब्द शोध कोडे ,समान वस्तू शोधणे,समान चित्रांमधील फरक शोधणे,शब्दकोडे सोडवणे,चित्र रंगवणे इत्यादी विविध रोचक उपक्रम विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना अधिक उत्साहवर्धक व सृजनशील अनुभव देण्यासाठी काही अनोखे उपक्रम देखील घेण्यात आले. त्यामध्ये डोळे बंद करून डोक्यावरील बाटली न पडता चालण्याचा खेळ,कृतीयुक्त गीत सादरीकरण,टोपी बनवणे,”माझ्या जीवनातील मजेशीर प्रसंग” या विषयावर लेखन करणे असे उपक्रम विविध शाळांत घेण्यात आले.  Daptarvina Shala Chandrapur

    विद्यार्थ्यांचा उत्साहात सहभाग

     या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. खेळता-खेळता त्यांनी विचारशक्ती, निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांचा उत्तम वापर करून आनंद लुटला.


      या प्रसंगी शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, “दप्तरविना शाळेमुळे मुलांची शिकण्याची पद्धत बदलते. पुस्तकांच्या पलिकडे जाऊन विचार करणे, नवीन गोष्टी शोधणे आणि आनंदी वातावरणात शिकणे हेच आमचे ध्येय आहे.”


      “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे आहेत. मुलांना दप्तराच्या ओझ्यापासून मुक्त करून खेळता-खेळता शिकविणे हीच खरी नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने व आनंदाने शिकतील, हे निश्चित.” – उपायुक्त श्री. मंगेश खवले 

  • Chandrapur municipal school relocation । पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा नूतनीकरण सुरू, विद्यार्थ्यांसाठी बसची सोय

    Chandrapur municipal school relocation

    Chandrapur municipal school relocation : चंद्रपूर 14 सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर महानगरपालिकेच्या पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे बांधकाम जीर्ण झाल्यामुळे नवीन शाळा इमारत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. या अनुषंगाने जुन्या इमारतीला पाडण्याचे काम सुरू असून नूतनीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

    नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवशी शिवसेना महिला आघाडीचे विविध उपक्रम

    दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून ही शाळा तात्पुरती किरायाने घेतलेल्या इमारतीत सुरू करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी अध्यापनात अडथळा निर्माण झाल्याने शाळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवार 15 सप्टेंबर पासून पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे अध्यापन वर्ग रय्यतवारी तेलगु उच्च प्राथमिक शाळा, इंडस्ट्रियल वार्ड, बंगाली कॅम्प येथे नियमित सुरू होणार आहे.

    विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था

    विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिकेमार्फत बस व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्या शाळेच्या ठिकाणी सकाळी 10 ते 11 या वेळेत विद्यार्थ्यांना बसने नव्या शाळेच्या ठिकाणी नेण्यात येईल व शाळा सुटल्यानंतर सायंकाळी 5.15 वाजता त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या सोडण्यात येईल. पालकांना याबाबत सूचना शाळास्तरावर दिल्या गेल्या आहेत. Jawaharlal Nehru primary school Chandrapur

    चंद्रपूर महानगरपालिकेच्या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित राहणार असून नूतनीकरणानंतर आधुनिक सुविधांनी युक्त नवी शाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कोणताही खंड पडू नये हीच महानगरपालिकेची प्राथमिकता असल्याचे उपायुक्त मंगेश खवले यांनी सांगितले.

     

  • Part of a dilapidated building collapsed | 🏚️ चंद्रपूर हादरलं! जटपुरा गेटसमोरील जीर्ण इमारतीचा भाग कोसळला – महिला गंभीर जखमी

    Part of a dilapidated building collapsed

    Part of a dilapidated building collapsed : चंद्रपूर 11 सप्टेंबर 2025 – चंद्रपुरातील जटपुरा गेट समोरील इमारतीचा एक भाग कोसळला, या घटनेत दूध विक्रेता महिला गंभीर जखमी झाली. सदर घटना पहाटे 5 वाजता घडली.

    जन सुरक्षा विधेयकविरोधात महाविकास आघाडीचे निदर्शने

    ऐतिहासिक जटपूरा गेट समोरील विनोद मेहता यांच्या मालकीच्या इमारतीचा वरचा भाग जीर्ण अवस्थेत आला होता, आज झालेल्या घटनेत 50 वर्षीय मनीषा लोखंडे या महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. सदर इमारत ही 50 ते 60 वर्षे जुनी आहे.

    माजी नगरसेविकेचा पाठपुरावा


    याबाबत माजी नगरसेविका छबु वैरागडे यांनी सदर इमारतीच्या झालेल्या जीर्ण इमारतीची अवस्था बघता भविष्यात दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेद्वारे 4 नोटीस पाठविल्या होत्या मात्र मेहता यांनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. घर मालकाच्या दुर्लक्षामुळे व पालिकेच्या उदासीनतेमुळे कामामुळे महिला जखमी झाली.

    सदर इमारतिच्या तळमजल्यावर छोटं हॉटेल सुद्धा आहे, या घटनेमुळे त्या हॉटेलला धोका निर्माण झाला असून पालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी सदर इमारतीची पाहणी केली असून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात अश्या अनेक जीर्ण इमारती असून भविष्यात त्यामुळे मोठी दुर्घटना घडणार ही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पालिकेने अश्या जीर्ण इमारती लवकरात लवकर जमीनदोस्त कराव्या अशी मागणी नागरिक करीत आहे.

  • Eco-friendly Ganesh Visarjan । कृत्रिम कुंडात 2917 गणेश मूर्तीचे विसर्जन

    Eco-friendly Ganesh Visarjan

    Eco-friendly Ganesh Visarjan : चंद्रपूर 1 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या 25 कृत्रिम कुंड व 3 फिरत्या विसर्जन कुंडात एकुण 2917 मूर्तींचे विसर्जन सोमवार 1 सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे.

    बोगस मतदार व ६१ लाख रुपयांचा वाली कोण?

    शहरात दीड दिवस,दोन दिवस,पाच दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने त्या त्या दिवशी विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्याची गरज भासते. उत्‍सवादरम्‍यान होणारी गर्दी टाळण्‍याकरिता महापालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. सदर विसर्जन कुंड हे मनपा स्वच्छता विभागामार्फत नियमित स्वच्छ करण्यात येत असुन 25 निर्माल्य कलशांचीही स्वच्छता करण्यात येत आहे.  POP free ganesh idols immersion

    भक्तिमय वातावरणात बाप्पा ला निरोप

    या फिरत्या विसर्जन कुंडांसाठी झोननिहाय संपर्क क्रमांक महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.उभारण्यात आलेल्या 25 कृत्रिम कुंडात 2835 तर फिरत्या विसर्जन कुंडात झोन क्रमांक 1 मध्ये 42, झोन क्रमांक 2 मध्ये 20, झोन क्रमांक 3 मध्ये 20 अश्या एकुण 82 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यात एकही पीओपी मुर्ती आढळुन आली नाही.

    visarjan

     मागील वर्षी पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे तसेच सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. 


           


       

  • scrub typhus prevention tips during monsoon । स्क्रब टायफसचा प्रादुर्भाव, पावसाळ्यातील धोका!

    scrub typhus prevention tips during monsoon

    scrub typhus prevention tips during monsoon : चंद्रपूर 1 सप्टेंबर – किटकजन्य आजारांतील स्क्रब टायफस हा जीवाणूमुळे होणारा व माईट्सद्वारे प्रसारित होणारा आजार आहे. याला बुश टायफस असेही म्हणतात. ओरिएंटल सुत्सुगामुशी जीवाणू संक्रमित चिगर (माईट्सच्या अळ्या) द्वारे प्रसारित होतो.पावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून येतात. स्क्रब टायफस या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी अधिक सतर्क राहून सर्व प्रकारच्या उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांनी सांगितले.

    आमदार सुधाकर अडबाले अधिकाऱ्यांवर संतापले

    स्क्रब टायफसचा प्रसार कसा होतो?

    संक्रमित चिगर्स (माइट्सची अळी) जेव्हा मानवी त्वचेवर चावतात, तेव्हा जीवाणू रक्ताभिसरण प्रणालीमध्ये प्रवेश करतात आणि पुनरुत्पादन करतात, ज्यामुळे आजाराची लक्षणे दिसू लागतात.पावसाळ्याच्या काळात या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. early signs of scrub typhus eschar

    प्रतिबंधात्मक उपाययोजना –

    स्क्रब टायफसची लक्षणे आढळल्यास किंवा ताप आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
    पूर्ण बाह्यांचे व शरीर पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत.
    घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये.
    आजुबाजूची स्वच्छता राखावी.
    शेतात व जंगलात काम करणाऱ्या मजुरांनी कपडे धुऊन, उन्हात वाळवून वापरावेत.
    गरज भासल्यास परिसरात तणनाशक, किटकनाशकाची फवारणी करावी.
    उंदीर नियंत्रणाची उपाययोजना करावी.

    स्क्रब टायफसची लक्षणे –

    ताप येणे (६ ते २१ दिवसांच्या आत)
    डोकेदुखी
    स्नायू दुखणे
    शरीरात कंप सुटणे
    मळमळ, उलटी
    थंडी वाजून ताप येणे
    घशात दुखणे
    कोरडा खोकला
    श्वसनास त्रास होणे
    जुलाब, गॅस्ट्रिक, सूज
    लसिकाग्रंथी सुजणे
    साखर, मूत्रामध्ये प्रथिने आढळणे
    गंभीर अवस्थेत: गोंधळ, संभ्रम, फिट्स, रक्तदाब कमी होणे, शुद्ध हरपणे

    स्क्रब टायफसचे निदान 

    स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी रक्त जल तपासणी करण्यात येते. प्रभावी उपचारांसाठी अचूक आणि वेळेवर निदान महत्त्वाचे आहे. रुग्णांचे चिन्ह, बाहय लक्षणांवरून आणि रुग्णाच्या वास्तव्य इतिहासाची तपासणी केली जाते. चिगर चाव्याच्या ठिकाणी व्रण असणे एक महत्वपूर्ण लक्षण आहे. scrub typhus recovery

    उपचार – 

    स्क्रब टायफसचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीने वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहे. प्रतिजैविके (Antibiotics) थेरेपी हा उपचाराचा आधारस्तंभ आहे. याकरिता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. रुग्णास येणारा अचानक ताप, शरीरातील कमी होणारी पाण्याची मात्रा यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. उपचार न केल्यास किंवा उपचारास उशीर झाल्यास स्क्रब टायफसमुळे गंभीर गुतागुंत होऊ शकते, ज्यापैकी काही जीवघेणी असू शकतात. नागरिकांनी सतर्क राहून लवकर निदान, वेळीच उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार पूर्णपणे टाळता व नियंत्रणात ठेवता येणे शक्य असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांनी सांगितले.

  • Shadu clay Ganapati workshop । 🌿 POP मूर्तींना पर्याय!, शाडू मातीपासून गणपती

    Shadu clay Ganapati workshop

    Shadu clay Ganapati workshop : चंद्रपूर 22 ऑगस्ट – चंद्रपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 26 शाळांमधील सुमारे 2000 विद्यार्थी या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणपती बनविण्याच्या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, पारंपरिक कला जोपासणे आणि सण हरित पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

    गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनपाने तयार केले २५ कृत्रिम तलाव

    शाडू मातीच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक फायदे

    विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून आकर्षक व कलात्मक गणेशमूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेतून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम’ तसेच ‘शाडू मातीच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक फायदे’ याबाबत माहिती देण्यात आली.

    हा उपक्रम महानगरपालिकेचे आयुक्त  विपिन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी श्री. नागेश नीट यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात पार पडला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकवर्गाचा सहभाग आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

    महानगरपालिकेतर्फे भविष्यातही अशा प्रकारच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यशाळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती घडवून आणली जाणार आहे.

  • where to immerse Ganesh idols in Chandrapur । 🌊 विसर्जन कुठे कराल? चंद्रपूर मनपा घेऊन आली २५ कृत्रिम तलावांची सुविधा

    where to immerse Ganesh idols in Chandrapur

    where to immerse Ganesh idols in Chandrapur : चंद्रपूर 22 ऑगस्ट – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने 25 कृत्रिम तलाव व 25 निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली असुन सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

    डीजे लावताय तर हा आदेश वाचा, अन्यथा गुन्हा दाखल होणार

       शहरात मुख्यतः दीड दिवस,5 दिवस तसेच 10 दिवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी विसर्जनाच्या व्यवस्थेची गरज भासते. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे.

    नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती या कमी उंचीच्या ठेवण्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन मनपामार्फत आधीच करण्यात आले होते. मागील वर्षी   पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Chandrapur municipality artificial immersion tanks locations

    3 फिरते विसर्जन कुंड –

     गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय 3 ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांक देखील महापालिकेद्वारे देण्यात आलेले आहेत.

    एक खिडकी योजना – मनपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुद्धा सुरु करण्यात आली होती. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाद्वारे संयुक्तरीत्या सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. eco-friendly Ganesh visarjan in Chandrapur 

    कृत्रिम तलाव स्थळ – एकूण – २५

    • १) झोन क्र. १ (कार्यालय) संजय गांधी मार्केट – २
      २) साईबाबा मंदीर वडगाव – १
      ३)वडगाव पोलीस चौकी – १
      ४) दाताळा रोड,इरई नदी – २
      ५) तुकुम प्रा.शाळा(मनपा,चंद्रपूर) – २
      ६) तुकुम एस टी वर्कशॉप – २
      ७) रामाळा तलाव – ४
      ८) छत्रपती शिवाजी चौक – २
      ९) गांधी चौक – १
      १०) लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड – १  
      ११) विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड – १
      १२) महाकाली प्रा.शाळा – १
      १३) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ – २
      १४) झोन क्र. ३ (कार्यालय)  – २
      १५) लालपेठ ( हनुमान मंदिर ) जुनी बस्ती
  • Jhopa Kadha Andolan । मजुरांची रोजी हजार तर शिक्षकांची २६०? आप चे झोपा काढा आंदोलन

    Jhopa Kadha Andolan

    Jhopa Kadha Andolan : चंद्रपूर – २१ ऑगस्ट रोजी आम आदमी पक्षातर्फे संपूर्ण राज्यात शासकीय शाळांची दयनीय अवस्था व शिक्षण क्षेत्राबाबत उदासीन असलेल्या सरकार विरोधात झोपा काढा आंदोलन करण्यात आले. चंद्रपुरात महानगरपालिका समोर आप ने हे अभिनव आंदोलन करीत मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा शिक्षण क्षेत्राकडे असलेल्या दुर्लक्षाबाबत निषेध केला.

    चंद्रपुरात डीजे च्या लेझर लाईटवर बंदी, पोलीस अधीक्षकांचा आदेश

    या अभिनव आंदोलनात आप चे पदाधिकारी स्थानिक आमदार जोरगेवार यांचे मुखवटे घालून सामील झाले होते, चंद्रपूर शहरात मनपाच्या शासकीय शाळांची दुरावस्था होत आहे मात्र याकडे मनपा लक्ष देत नसून इतर कामांकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप केला आहे.

    २६० रु रोजीचे शिक्षक?

    शहरातील ६० ते ७० वर्षे जुन्या शाळा बंद करण्याचा फर्मान मनपा काढत आहे तर दुसरीकडे आयुक्तांनी अजब ठराव पास केला कि २६० रुपये रोजी ने चंद्रपुरातील मनपा शाळेत शिक्षकांची नियुक्ती केल्या जाणार आहे, यावर आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले कि मजुरी करणाऱ्यांची रोजी हि ८०० रुपये ते हजार रुपये आहे मग शिक्षक इतक्या कमी पैश्यात मुलांचे भविष्य कसे घडविणार. AAP Jhopa protest against municipal neglect of schools

    इतर इव्हेन्ट मध्ये मनपा हजार रुपये रोजीने कामगारांना काम करायला लावतात मात्र मुलांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना इतक्या कमी पैश्यात ठेवणे म्हणजे हा मुलांच्या भवितव्याशी चाललेला खेळ आहे. पालिकेने आपल्या वार्षिक बजेटमधून २५ टक्के शिक्षणावर खर्च करायला हवा, त्यानंतर शिक्षण प्रणाली चांगलीच सुधारेल, मात्र सरकार व मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, म्हणून आम्ही या झोपलेल्या प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन करीत आहो.

    आयोजित आंदोलनात आप चे प्रदेश सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महिला अध्यक्ष तबस्सुम शेख व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

  • Chandrapur municipal corporation plastic raid । 🚨 चंद्रपूर महानगरपालिकेची धडक कारवाई! 280 किलो प्लास्टिक जप्त – 5 हजार दंड वसूल

    Chandrapur municipal corporation plastic raid

    Chandrapur municipal corporation plastic raid : चंद्रपूर 20 ऑगस्ट  – रयतवारी कॉलरी येथील अमरजित गुप्ता यांच्या मालकीच्या गुप्ता ट्रेडींग या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 280 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीची थेट लोकसभेत चर्चा

    चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

    तर नागरिकांना मिळणार ५ हजाराचे बक्षीस

    मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. Chandrapur plastic seizure reward informer 

       एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

    सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त अनिलकुमार घुले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,मनीष शुक्ला,राज हजारे, शुभम खोटे,शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लिवर,पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली.