Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • Mahapalika corruption against public funds । चंद्रपूर मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची फाईल तयार; देशमुखांची तक्रार

    Mahapalika corruption against public funds

    Mahapalika corruption against public funds : चंद्रपूर ४ नोव्हेम्बर (News३४) : मनपा आयुक्त विद्या गायकवाड व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे पुरावे व लेखी पत्र देऊनही वादग्रस्त रस्ता दुभाजकाचे काम मनपा प्रशासनाने बंद केले नाही. घामाच्या पैशातून कर देणाऱ्या नागरिकांना विकास कामाच्या नावाखाली खुलेआम लुटल्या जात आहे.परंतु मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या मुजोरीला सडेतोड उत्तर देण्यात येईल. या मुजोर अधिकाऱ्यांना योग्य वेळी हिशेब द्यावा लागेल.प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याची फाईल आपल्याकडे तयार आहे. कोणीही सुटणार नाही असा इशारा जनविकास सेनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिला.

    Also Read : कॅन्सर हॉस्पिटलला रतन टाटा यांचे नाव द्या – खासदार धानोरकर


    मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, प्रधान सचिव यांना पुराव्यासह तक्रार देऊनही भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही. शासन-प्रशासनाचे भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण मिळत आहे. सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार मनपातील भ्रष्टाचाराविरुद्ध एक शब्दही काढत नाही. त्यांचे या सर्व भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष समर्थन मिळत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. Demand for action on municipal corruption Chandrapur

    निविदा प्रक्रियेत १ कोटीचे नुकसान

    दरम्यान वादग्रस्त रस्ता दुभाजकातील भ्रष्टाचाराच्या विरोधात देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली. कारण नसतांना जुने मजबूत रस्ता दुभाजक तोडण्यात आले. निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार मनपाचे एक कोटी रुपयांचे नुकसान केले.

    तोडण्याच्या खर्चासह जुन्या दुभाजकाच्या कामाचा तसेच नविन दुभाजक तयार करण्याचा खर्च या प्रकरणातील संबंधित अधिकारी तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल व तत्कालीन शहर अभियंता विजय बोरीकर, भ्रष्टाचाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,विद्यमान शहर अभियंता रवी हजारे,उपअभियंता आशिष भारती, सहाय्यक अभियंता प्रतीक्षा जनबंधू व कंत्राटदार मे. सूर्यवंशी एंटरप्राईजेस यांच्याकडून वसूल करण्यात यावा व त्यांचे विरुद्ध चौकशी करून शासकीय निधीचा अपव्यय केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

  • Chandrapur mosquito control and prevention tips । चंद्रपूरमध्ये पावसाने वाढवला डासांचा उन्माद! घर सुरक्षित ठेवण्यासाठी हे करा!

    Chandrapur mosquito control and prevention tips

    Chandrapur mosquito control and prevention tips : चंद्रपूर 30 ऑक्टोबर – मागील काही दिवसात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेतर्फे आरोग्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

    Also Read : दुभाजकावरून चंद्रपुरात माजी नगरसेवकांचा राडा

    अवकाळी पावसात कीटकजन्य,साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता असते,कारण पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते, जे डासांच्या प्रजननासाठी आदर्श वातावरण तयार करते. साचलेल्या पाण्यात डासांची अंडी उबतात आणि त्यांची वाढ होते, ज्यामुळे डेंग्यूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.  महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक योजना सुरु असल्यातरी नागरिकांना स्वतःच्या संरक्षणासाठी पुढील उपाय योजना करणे आवश्यक आहे.

    पाणी साचू देऊ नका

    घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी साचू देऊ नये, ज्या भांड्यात तुम्ही पाळीव प्राण्यांना पाणी देता ते भांडे स्वच्छ ठेवने, पाण्याची टाकी चांगल्या प्रकारे झाकून ठेवने, रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला पाण्याचा ट्रे दररोज रिकामे करणे आवश्यक आहे. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात.

    हवामान बदलामुळे विविध आजारांची शक्यता वाढली आहे. ताप, अंगदुखी, डोळे दुखणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. नागरिकांनी स्वच्छतेची सवय जोपासून डासांची उत्पत्ती थांबवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. 

  • Maharashtra municipal corporation reservation । ११ नोव्हेम्बरला चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत

    Maharashtra municipal corporation reservation

    Maharashtra municipal corporation reservation : चंद्रपूर २८ ऑक्टोबर  –राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २८ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पार पाडण्यात येणार आहे. Maharashtra Municipal Reservation

    Also Read : गुन्हेगारीमुक्त चंद्रपूर साठी पोलिसांची कारवाई

    यानंतर आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रांमधून ८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी काढण्यात येणार असून, त्याचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.

    हरकती व सूचना १७ नोव्हेम्बरपासून

    त्यानंतर प्रारुप आरक्षण प्रसिद्ध करून, नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होईल. हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महानगरपालिका आयुक्त निर्णय घेतील. आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात २ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

       राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार वेळेत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता व काटेकोरता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • Chandrapur road divider controversy । दुभाजक नव्हे, सुरक्षित रस्ता मिळावा – जनविकास सेनेची आक्रमक भूमिका

    Chandrapur road divider controversy

    Chandrapur road divider controversy : चंद्रपूर २८ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान बांधण्यात येणाऱ्या वादग्रस्त रस्ता दुभाजकाविरोधात जनविकास सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जीवघेणे खड्डे असलेल्या या रस्त्यावर दुभाजक नव्हे तर तात्काळ रस्त्याचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी आहे.

    Also Read : चिमूर तालुक्यात वाघाने केली शेतकऱ्याची शिकार

    केवळ कंत्राटदाराच्या हितासाठी 3.56 कोटी रूपयांचे दुभाजक करण्याचा घाट मनपा प्रशासनाने घातला. त्यामुळे नागरिकांची मागणी व गरजेनुसार या ठिकाणी सुरू असलेले रस्ता दुभाजकाचे काम तातडीने रद्द करावे, या कामाची चौकशी करून निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करणारे तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल,मनपाचे इतर अधिकारी तसेच कंत्राटदार मे. सुर्यवंशी इंटरप्राईजेस व मे. काहाळे इन्फ्राॅकाॅन प्रा.लि. यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनपाचे आयुक्त यांना दिले. Dangerous potholes road accident Chandrapur

    यावेळी जनविकास सेनेचे इमदाद शेख,महिला आघाडीच्या मनिषा बोबडे तसेच अक्षय येरगुडे,प्रफुल बैरम व नकुल मुसळे उपस्थित होते.

    दुभाजकाचे काम रद्द करा

    रस्ता दुभाजकाचे काम रद्द करून 3.56 कोटी रुपये निधीतून या ठिकाणी नागरिकांची मागणी व गरजेनुसार नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी जनविकास सेनेने केली आहे.या मागणीसाठी जनविकास सेनेतर्फे बुधवार दि.29 ऑक्टोबर रोजी दुभाजकाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. तसेच पुढील काळात या ठिकाणी जीवघेणा अपघात झाल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येईल असा इशारा जनविकास सेनेने दिला आहे.

  • Congress candidate process Chandrapur elections | चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी; इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

    Congress candidate process Chandrapur elections

    Congress candidate process Chandrapur elections : चंद्रपूर 22 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) : आगामी होऊ घातलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या (स्थानिक स्वराज्य संस्था) पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून, 1 ते 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

    Also Read : कर्जमाफीचे आश्वासन फोल, चंद्रपुरात शेतकऱ्यांची काळी दिवाळी


    काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची लवकरच मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. २४ ऑक्टोबरपासून शहर (जिल्हा) काँग्रेस कार्यालय, तिवारी भवन कस्तुरबा चौक चंद्रपूर येथे अर्ज उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे अर्ज करणाऱ्या इच्छुकांनी अर्जासोबत आपली संपूर्ण आणि अचूक माहिती देणे अनिवार्य आहे. या माहितीमध्ये खालील बाबींचा समावेश असावा.  local election preparations Chandrapur

    उमेदवारांची संपूर्ण माहिती

    उमेदवाराचे संपूर्ण नाव, प्रभागाचा पत्ता, मागील निवडणूक अनुभव,  यापूर्वी कोणती निवडणूक लढवली आहे? यापूर्वी महानगरपालिका किंवा पूर्वीच्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले आहे काय? आरक्षण प्रवर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग) याची माहिती द्यावी. सद्यस्थिती आणि सामाजिक कार्य कोणते,  आतापर्यंत केलेली सामाजिक कामे तसेच प्रभागातील प्रमुख स्थानिक मुद्द्यांची माहिती देणे आवश्यक आहे.

    काँग्रेस विचारधारेच्या आणि परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या नवतरुण-तरुणींनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे विशेष आवाहन चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी केले आहे. पक्षनिष्ठ, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि प्रतिष्ठित नागरिकांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 1 ते 10 नोव्हेंबरपर्यंत चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी कार्यालय, कस्तुरबा (गिरनार) चौक येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Diwali bonus sanitation workers | आंदोलनाचा तिढा सुटला; आमदार किशोर जोरगेवारांच्या मध्यस्थीने सफाई कामगारांच्या मागण्या मान्य

    Diwali bonus sanitation workers

    Diwali bonus sanitation workers : चंद्रपूर 17 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत नाली सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे.

    Also Read : घुग्गुस वेकोली मधून चक्क ओव्हरबर्डन ची चोरी

    वेतनवाढ, प्रलंबित वेतन तातडीने देणे, कायमस्वरूपी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करणे, दिवाळी बोनस तसेच कामाच्या अटी सुधाराव्यात या प्रमुख मागण्या घेऊन कामगारांनी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे दोन दिवस नाले सफाईचे काम बंद पडले होते. municipal workers protest resolution

    आमदार जोरगेवार मुळे सुटला तिढा

    सदर प्रकरणात आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्या सफाई कामगारांच्या प्रतिनिधींशी आणि महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा केली. चर्चेदरम्यान सर्व मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. आजच कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे मनपा प्रशासनाने मान्य केले आहे.

    या चर्चेनंतर कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन सफाई कामगारांशी संवाद साधला. त्यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी आनंदाने आंदोलन मागे घेतले.

    या प्रसंगी मनपा अधिकारी, भारतीय कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी, कामगार नेते आणि कामगार उपस्थित होते. यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, “सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांना न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे.” प्रशासनाने त्यांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे आदेशही आमदार जोरगेवार यांनी दिले.

  • Maharashtra local body election voter list download | महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

    Maharashtra local body election voter list download

    Maharashtra local body election voter list download : चंद्रपूर 16 ऑक्टोबर  : राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम २०२५ जाहीर केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाचा संभाव्य दिनांक लक्षात घेऊन मतदार यादी तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ (१८८८ चा मुंबई ३) च्या कलम १९ (१) (ब) आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ (१९४९ चा मुंबई अधिनियम क्र. ५९) मधील कलम ७ अ अन्वये एक विशिष्ट दिनांक अधिसूचित केली जाते.

    Also Read : ब्रह्मपुरीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 6 आरोपी अटकेत

    कार्यक्रम जाहीर


    मतदार यादी ग्राह्य धरण्याचा कार्यक्रम (१ जुलै २०२५), राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना दिलेल्या युजर आयडी व पासवर्डचा वापर करून १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करणे (१४ ऑक्टोबर २०२५), राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तयार केलेली प्रारूप मतदार यादी, municipal elections voter list

    हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्याचा दिनांक (६ नोव्हेंबर २०२५), प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक (१४ नोव्हेंबर २०२५), प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाननिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे (२८ नोव्हेंबर २०२५), मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे ४ डिसेंबर २०२५, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे १० डिसेंबर २०२५ असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

  • Chlorine Gas Leak | रहमत नगरमध्ये क्लोरीन वायू गळती: महिन्यानंतरही प्रशासन झोपेत!

    Chlorine Gas Leak

    Chlorine Gas Leak : चंद्रपूर 16 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा): येथील रहमत नगर परिसरातील रहिवाशांसाठी एक मोठी आणि गंभीर समस्या समोर आली आहे. CSTPS च्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (Sewage Treatment Plant – STP) झालेल्या क्लोरीन वायू गळतीमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घटनेला महिना उलटूनही दोषींवर कारवाई झाली नसल्याने, स्थानिकांनी आणि AIMIM पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Rahmat Nagar Accident

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    काय आहे नेमके प्रकरण?

    • गंभीर घटना: दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी रहमत नगर परिसरात एसटीपीमधून क्लोरीन वायूची गळती सुरू झाली.
    • परिणाम: या विषारी वायूमुळे एका लहान मुलासह अनेक रहिवासी गंभीररित्या आजारी पडले. आजही काही लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.
    • आश्वासन फोल: घटनेनंतर १८ सप्टेंबर २०२५ रोजी AIMIM चे जिल्हाध्यक्ष अमान अहमद यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

    प्रशासन ‘गाढ झोपेत’ असल्याचा आरोप

    आश्वासन देऊनही महिना उलटून गेला तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी AIMIM पक्षाचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले. Government Negligence

    • जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे त्यांना निवासी उप-जिल्हाधिकारी (RDC) यांच्याकडे पाठवण्यात आले.
    • RDC यांनीही या संवेदनशील विषयावर चर्चा करणे टाळले आणि “आम्ही पाहू” असे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली, असा आरोप AIMIM ने केला आहे.

    AIMIM चा इशारा:

    या संपूर्ण प्रकरणावरून ‘रहमत नगरच्या रहिवाशांवर कुणी दयामाया दाखवत नाही’ आणि ‘शासन-प्रशासन गाढ झोपेत आहे’ असे स्पष्टपणे दिसून येते.

    AIMIM चे जिल्हाध्यक्ष अमान अहमद यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, “ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला गेला आहे आणि अधिकाऱ्यांनी जो मजाक उडवला आहे, तो आम्ही सहन करणार नाही. दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील. तसेच, हा एसटीपी प्रकल्प रहमत नगरमधून कायमस्वरूपी हटवला जावा, यासाठी आम्ही मोठे आंदोलन उभारू.”

    या घटनेमुळे रहमत नगरमधील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, ते न्याय आणि सुरक्षिततेच्या प्रतीक्षेत आहेत.

  • Chandrapur Road Project Corruption । साडेतीन कोटीच्या कामात ५० लाखांचे कमिशन?

    Chandrapur Road Project Corruption

    Chandrapur Road Project Corruption : चंद्रपूर: बागला चौक ते राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज पर्यंत जीवघेणे खड्डे असलेला रस्ता सोडून साडेतीन कोटी रुपयांच्या रस्ता दुभाजकाचे काम करण्याचा प्रस्ताव चंद्रपूर महानगरपालिकेने केला. हा सर्व अट्टाहास मेसर्स सूर्यवंशी एंटरप्राइजेस साठी करण्यात आल्याचा तसेच ह्या कारणामुळे मनपाला एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.
    खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कामांमध्ये तत्कालीन आयुक्त पालीवाल यांना कमिशन म्हणून 50 लक्ष रुपयाचे टोकन मिळाले असाही आरोप देशमुख यांनी केला. Chandrapur Paliwal road project commission allegations

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

    टोकाच्या स्पर्धेमुळे मनपात काम करणारे कंत्राटदार अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा 25 ते 30 टक्के कमी दराने काम घेतात. इरई नदीच्या बाजूला तयार करण्यात आलेले विसर्जन कुंड,या ठिकाणी नूकताच नुकताच तयार करण्यात आलेला सिमेंट काँक्रीट प्लॅटफॉर्म, शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीचे काम या कामांच्या अंदाजपत्रकीय किंमती अनुक्रमे 5 कोटी,1.5 कोटी व 1 कोटी रूपये आहे.ही कामे कंत्राटदारांनी अंदाजपत्रकीय किंमतीपेक्षा अनुक्रमे 22% कमी म्हणजे 3 कोटी 90 लक्ष रुपये,34% कमी म्हणजे जवळपास 1 कोटी रूपये व 25 % कमी म्हणजे 75 लक्ष रुपयांमध्ये घेतले. Chandrapur Municipal Corporation Surya Enterprises contract

    इतकी गळेकापू स्पर्धा असताना 3.5 कोटी रुपयांचे रस्ता दुभाजकाचे काम मेसर्स सूर्यवंशी इंटरप्राईजेसला अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा फक्त 0.01 टक्के कमी दराने म्हणजेच अंदाजपत्रकीय किमतीमध्ये कसे मिळाले ? हा प्रश्न आहे. कोणतेही ठोस कारण न देता या निविदा प्रक्रियेत पाच पैकी तीन एजन्सीला अपात्र करण्यात आले. मर्जीतल्या कंत्राटदारासाठी स्पर्धा संकुचित केल्याने मनपाचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले व कंत्राटदाराला तेवढाच आर्थिक लाभ झाला. रस्ता दुभाजकाचे काम रद्द करण्यात यावे व विपिन पालीवाल यांची एसआयटी मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी लवकरच जनविकास सेनेतर्फे मोठे जन आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती देशमुख यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली.

    मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्याचा ‘पालीवाल पॅटर्न’

    कामाची गरज असो की नसो करायला सोपे व जास्त नफा मिळवून देणारे काम कंत्राटदारासाठी काढायचे. कामाच्या ई-निविदेमध्ये हेतूपुरस्पर अपुरी माहिती टाकायची जेनेकरून कंत्राटदाराला माहितीसाठी मनपाच्या दारात यावे लागेल. कार्यालयात आलेल्या कंत्राटदारांना दलाली करणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत धमकावयचे.काम टाकू नका, ई-निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ नका असे थेट सांगायचे. यानंतरही एखाद्या कंत्राटदाराने काम घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला नियम धाब्यावर बसवून निविदा प्रक्रियेत अपात्र करायचे. त्यासाठी आधीच निविदेत मर्जीतल्या कंत्राटदाराच्या हिताच्या अटी-शर्ट टाकून ठेवायच्या. या बेकायदेशीर अटी-शर्तींच्या आधारावर स्पर्धा संकुचित करायची. अशा प्रकार मर्जीतल्या कंत्राटदाराला काम द्यायचे व सुरुवातीलाच लाभ मिळवून द्यायचा. त्याच्या मोबदल्यात रोख स्वरूपात कमिशन घ्यायचे. हा चंद्रपूर मनपाचे आयुक्त असताना विपिन पालीवाल यांचा काम वाटण्याचा पॅटर्न होता.

  • Chandrapur Municipal Commissioner Transfer | चंद्रपूर मनपा आयुक्तांवर आरोप, वाद आणि आता बदली – लोकप्रतिनिधींचे मौन कायम!

    Chandrapur Municipal Commissioner Transfer

    Chandrapur Municipal Commissioner Transfer : चंद्रपूर (9 ऑक्टोबर 2025) (News34 वृत्तसेवा – अनेक वादात आरोपांच्या फैरीत अडकलेले मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांची अखेर बदली करण्यात आली आहे.

    Also Read : दुचाकींचा भीषण अपघात, बापलेकासह तिघांचा मृत्यू


    मागील अनेक दिवसांपासून मेडिकल लिव्ह वर असलेले चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांची मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्प मध्ये सचिव या पदावर बदली करण्यात आली असा शासनाचा आदेश 7 ऑक्टोबर रोजी धडकला.
    विपीन पालिवाल यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पोम्भूर्णा, बल्लारपूर व चंद्रपूर मध्ये वादाच्या भोवऱ्यात आपला कार्यकाळ गाजवला.

    जनविकास सेना आणि आप चे गंभीर आरोप


    पालिवाल यांच्यावर जनविकास सेना सह आम आदमी पार्टी चंद्रपूरने अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले.
    विशेष बाब म्हणजे त्यांच्या विरुद्ध आमदार, खासदार व पालकमंत्री यांनी आगपाखड केली नाही, त्यांच्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त व भ्रष्टाचाराचे अनेक प्रकल्पाचे कामे झाली, चंद्रपूर शहराची सध्या पूर्णतः वाट लागली आहे, मनपा हद्दीतील रस्ते पूर्णतः खराब, 2 महिन्यांपूर्वी नव्याने तयार झालेल्या रस्त्याची पहिल्या पावसात दयनीय अवस्था झाली आहे.

    इतकं असूनही चंद्रपुरातील लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या विरुद्ध एक शब्दही काढलेला नाही. जनविकास सेना व आप ने पालिवाल विरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाची फैरी सतत सुरू ठेवली. मात्र राजकीय वरदहस्त असल्याने आयुक्त व प्रशासकाचा कार्यकाळ त्यांनी निवांतपणे काढला.