Blog

  • चंद्रपुरात मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

    Stray dog management : चंद्रपूर, दि. 15 डिसेंबर २०२५ (News३४) : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल रिट पिटीशनच्या  07 नोव्हेंबर 2025 रोजी पारित आदेशानुसार, मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली विस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

    भारतीय जीवजंतु कल्याण बोर्डाने निर्धारित केलेल्या SOP (Standard Operating Procedure) नुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्था, सार्वजनिक व खाजगी रुग्णालये, क्रीडा संकुल, बस स्थानके व डेपो (आंतरराज्य बस टर्मिनलसह), रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळे, बाल उद्याने, पर्यटन व मनोरंजन स्थळे आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी कुंपण, सीमा भिंत व प्रवेशद्वार उभारण्याच्या सूचना दिल्या. ही संरक्षक तटबंदी किमान 6 फूट उंचीची असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    तसेच संबंधित व्यवस्थापनांनी भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी व स्वच्छतेसाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. परिसरातील कुत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण, लसीकरण व निर्बीजीकरण करून मनपा अथवा नगरपालिकांनी चालविलेल्या आश्रयस्थानी किंवा प्राणी कल्याण संस्था, गोशाळा, पांजरपोळ व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. Stray dog management

    मनपा आयुक्त व नगरपालिकांना दिलेल्या प्रमुख सूचना :

    • सार्वजनिक ठिकाणांवरून पकडलेल्या कुत्र्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निर्जंतुकीकरण व लसीकरण करणे.

    • आश्रयस्थानी ठेवण्यापूर्वी कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे, याची खातरजमा करणे व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर व साहित्य उपलब्ध करून देणे.

    • विशेषतः 6 महिन्यांवरील नर कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण करणे व 5 वर्षांपर्यंत दरवर्षी रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे.

    • भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुत्र्यांसाठी सुसज्ज आश्रयस्थाने उभारणे व त्याठिकाणी पाणी, खाद्य, स्वच्छता व देखरेखीची योग्य व्यवस्था ठेवणे.

    • आक्रमक अथवा रेबीज बाधित कुत्र्यांना ज्या परिसरातून पकडले आहे त्या परिसरात पुन्हा सोडू नये.

    मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  विनय गौडा जी.सी यावेळी केले.

  • Hello world!

    Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

  • चंद्रपुरात आले ९० हजारांच्या नायलॉन मांजाचे पार्सल

    nylon manja sale raid : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर चंद्रपूर जिल्हातील पोलीस प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम करीत आहे. सदर धंदा पोलिसांच्या नजरेत येऊ नये यासाठी विक्रेते नायलॉन मांजा थेट पार्सलद्वारे मागवीत आहे. असाच एक प्रकट १५ डिसेंबर रोजी चंद्रपुरात उघडकीस आला. (नायलॉन मांजा विक्रेते स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर)

    रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली कि एकाने नायलॉन मांजा बाहेरून बोलावला असून आज त्याची डिलिव्हरी होणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी जय महाराष्ट्र कार्गो मूव्हर मधून एका इसमाला नायलॉन मांजाचे पार्सल घेऊन जाताना थांबविले. गुन्हे शोध पथकाने त्या इसमाची झडती घेतली असता सदर पार्सल मधील खोक्यात ६० प्लॅस्टिक चक्री mono ktc fighter किंमत प्रत्येकी १५०० रुपये असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी २३ वर्षीय प्रतीक अरुण नागपुरे राहणार बालवीर वॉर्ड राजनला टॉकीज च्या मागे चंद्रपूर याला ताब्यात घेतले.

    आरोपीवर पर्यावरण संरक्षण अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. nylon manja sale raid

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि देवाजी नरोटे, हिमांशू उगले, पोलीस कर्मचारी जितेंद्र आकरे, रामप्रसाद नैताम, आनंद खरात, शरद कुडे, लालू यादव, मनीषा बावणे, संदीप, पंकज पोंदे, सुरेश कोरवार, रवीकुमार ढेंगळे, प्रफुल, पंकज व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

  • चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक: आरक्षण प्रक्रिया अपूर्ण असताना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

    Municipal reservation controversy : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेसाठी आरक्षणाची सोडत जाहीर करून दिनांक 17 नोव्हेंबर ते दिनांक 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात आले. याबाबत महानगरपालिकेने एक नोटिफिकेशन काढले होते. त्याची वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्यानुसार अनेक नागरिक, राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवार यांनी आक्षेप नोंदवले. मात्र, त्या आक्षेपांवर कोणतीही सुनावणी न घेता आणि अंतिम आरक्षण जाहीर न करता थेट राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. (चंद्रपूर मनपात शिस्तीचा IAS पॅटर्न)

    हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे का?

    आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता निवडणूक जाहीर करणे नियमबाह्य नाही का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षणाबाबत प्रक्रिया पूर्ण करणे, आक्षेपांवर सुनावणी घेणे व अंतिम निर्णय जाहीर करणे अनिवार्य आहे. आक्षेप मागवून त्यावर सुनावणी न घेणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे.
    आरक्षण प्रक्रिया अपूर्ण असताना निवडणूक जाहीर करणे हे लोकशाही आणि कायद्याच्या दृष्टीने चिंताजनक असून राज्य निवडणूक आयोगाने याबाबत तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी जनविकास सेनेची मागणी आहे. Municipal reservation controversy

    अंतिम आरक्षण 50% च्या मर्यादेत आणणे सहज शक्य होते

    मुळात आरक्षणाच्या आक्षेपांवर सुनावणी झाली नव्हती. सुनावणी घेऊन अंतिम आरक्षण जाहीर करण्यापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाला आरक्षणात बदल करण्याची मुभा होती. या संधीचा वापर करून आरक्षण 50 टक्के च्या मर्यादेत आणणे सहज शक्य असताना निवडणूक विभागाने असे का केले नाही ? हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक जिंकलेल्या काही ओबीसी उमेदवारांना भविष्यात याचा मोठा फटका बसू शकतो. त्याची नुकसान भरपाई कशी करणार ? याचे उत्तरही निवडणूक विभागाने द्यायला हवे.

  • चंद्रपूर, घुग्घूस नागरिकांसाठी कायमस्वरूपी घरपट्टे वाटप प्रक्रियेला गती मिळणार

    Permanent house patta : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – कायमस्वरूपी पट्टे वाटप करण्यासंदर्भात आपण अनेक बैठका घेतल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा याबाबत निर्देश दिले आहेत. असे असतानाही सदर प्रक्रिया अतिशय मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे या प्रक्रियेला गती देण्यात यावी. घरपट्ट्यासाठी नागरिकांनीही विहित नमुन्यात अर्ज भरावा, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.

    नागरिकांना कायमस्वरूपी पट्ट्यांचे वाटप प्रक्रियेबाबत नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर निर्देश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त नरेश अनकुरे, उपजिल्हाधिकारी विद्या गायकवाड, उपायुक्त चित्रावार, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते प्रकाश देवतळे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर आदींची उपस्थिती होती.

                चंद्रपूर आणि घुग्घूस येथील नागरिकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावेत, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. परिणामी सदर प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई आणि चंद्रपूर येथे बैठका घेतल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. Permanent house patta

    दरम्यान, आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित सर्व विभागांची जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्रित बैठक बोलावून प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना त्यांच्या हक्काचे पट्टे आपण वाटप करणार आहोत. यासाठी राज्य सरकारही सकारात्मक आहे. आता सर्व यंत्रणांनी समन्वय साधत ही प्रक्रिया गतिशील करणे गरजेचे असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. नागरिकांना सदर अर्ज नमुना उपलब्ध करून देण्यात यावा, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, 2011 पूर्वी नाव असलेली व्यक्ती आजघडीला हयात नसल्यास त्यांच्या वारसांची नावे चढविण्यात यावीत, असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

  • महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू

    Municipal corporation election : मुंबई १५ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. या घोषणेमुळे राज्यातील शहरी राजकारण तापणार असून, आजपासून (१५ डिसेंबर २०२५) तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण २९ महापालिकांमधील २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपात IAS शिस्तीचा पॅटर्न)

    राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले होते. अखेर, निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या तारखांची घोषणा करत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्पष्ट केला आहे.


    📅 निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम:

    निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, महापालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

    टप्पा (Phase)तारीख (Date)
    नामनिर्देशन स्वीकारण्याचा कालावधी२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर
    अर्जांची छाननी३१ डिसेंबर
    माघारीची अंतिम मुदत०२ जानेवारी (२०२६)
    चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी०३ जानेवारी
    मतदान१५ जानेवारी
    मतमोजणी१६ जानेवारी

    🔔 आयोगाच्या महत्त्वाच्या सूचना

    निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या कार्यपद्धतीबाबत काही महत्त्वाचे नियम आणि सूचना स्पष्ट केल्या आहेत:

    • ऑफलाईन अर्ज: उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
    • जात प्रमाणपत्र: उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र (Caste Certificate) सादर करणे बंधनकारक असेल.
    • मतदार यादी: या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
    • ‘मताधिकार’ ॲप: आयोगाने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मताधिकार’ नावाचे एक ॲप तयार केले आहे.
    • दुबार मतदान: ज्या मतदारांचे नाव दुबार असेल, त्यांच्या नावापुढे ‘डबल स्टार’ (Double Star) करण्यात आले आहे. अशा मतदारांना केवळ एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येईल.
    • दुरुस्तीचा अधिकार नाही: मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

    🗳️ आचारसंहिता लागू; राजकीय घडामोडींना वेग

    निवडणुकीची घोषणा होताच राज्यात तातडीने आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दैनंदिन निर्णय प्रक्रियेवर आता मर्यादा येणार आहेत.

    आचारसंहिता लागू झाल्याने सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवड, जागावाटप आणि प्रचार रणनीती यावर त्वरित चर्चा सुरू केली आहे. आगामी काळात महाराष्ट्रातील शहरी राजकारण चांगलेच तापणार असून, सर्व पक्षांकडून जोरदार तयारीला वेग येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

  • खासदार प्रतिभा धानोरकरांच्या पाठपुराव्याला यश; आयुध निर्माणी चांदातील अनुकंपा नियुक्ती मार्गी लागणार

    Compassionate appointment : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) : आयुध निर्माणी चांदा येथील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या प्रलंबित प्रश्नावर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळणार आहे. गेली अनेक वर्षे न्याय मिळण्याची वाट पाहणाऱ्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्याला गमावलेल्या कामगार कुटुंबियांच्या या प्रश्नाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सातत्याने केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर निर्णय घेण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आणि तात्काळ हा प्रश्न मार्गी काढण्याची विनंती केली. त्यांच्या या मागणीची दखल घेत संरक्षण मंत्र्यांनी चांदा येथील कामगार कुटुंबियांना मोठा दिलासा देणारे आश्वासन दिले आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपा आयुक्तांनी दाखविला शिस्तीचा IAS पॅटर्न)

    संरक्षण मंत्र्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी मंजूर करून असे आश्वासन दिले असून, आयुध निर्माणी चांदा येथील अनुकंपा धारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण आश्वासनानुसार, गेल्या तीन वर्षांपासून नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि आवश्यक लिखित परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केलेल्या २३ अनुकंपा धारकांना कोणतीही दिरंगाई न करता त्वरित नियुक्ती देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, निगमीकरण प्रक्रियेमुळे नियुक्तीसाठी पात्र नसलेल्या उर्वरित सर्व अनुकंपा धारकांना देखील दिलासा मिळाला आहे. Compassionate appointment

    या सर्व उर्वरित अनुकंपा धारकांना ‘वन-टाईम रिलॅक्सेशन’ च्या माध्यमातून १००% अनुकंपा तत्वावर समायोजित करण्याची मागणी देखील संरक्षण मंत्र्यांनी स्वीकारली आहे. ती त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून संबंधित यंत्रणेला हा प्रश्न त्वरित मार्गी काढण्याचे निर्देश यावेळी संरक्षण मंत्र्यांनी दिले. 

    या आश्वासनाबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्या म्हणाल्या, “हा निर्णय केवळ २३ किंवा त्याहून अधिक कुटुंबांना नोकरी देणारा नाही, तर अनेक वर्षांपासून न्याय मिळण्याची वाट पाहणाऱ्या शेकडो कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक आधार देणारा आहे. त्यांच्या संघर्षाला अखेर यश येणार असून, त्यांचे शोषण थांबले आहे.” हे आश्वासन चांदा येथील कामगार कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, प्रलंबित असलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर होणार आहेत.

  • चंद्रपूर मनपात शिस्तीचा ‘IAS पॅटर्न’; उशिरा येणाऱ्यांना घडवली अद्दल

    Municipal office late staff : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – वर्ष २०१२ रोजी चंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर प्रथमच १३ वर्षांनी मनपाला IAS दर्जाचा अधिकारी लाभला, मनपा आयुक्त नरेश अकनूरी यांनी पदभार संभाळल्यावर कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा आतंक, एकाच दिवशी दोघांची शिकार)

    १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मनपा आयुक्त अकनूरी कार्यालयात दाखल झाले, मात्र यावेळी अनेक कर्मचारी कार्यालयात आले नव्हते, कर्मचाऱ्यांसह अधिकारी कार्यालयीन वेळेत मनपात येत नसल्याचे निदर्शनास आल्यावर मनपा आयुक्तांनी थेट मनपाचे प्रवेशद्वार बंद केले.

    काही वेळानी कर्मचारी व अधिकारी मनपात दाखल झाले असता, प्रवेशद्वार बाहेरून बंद असल्याचे समजले, मनपात २ वर्षांपासून प्रशासक बसल्यावर अधिकारी व कर्मचारी पूर्णतः बेभान झाले होते, कार्यालयीन वेळेवर न पोहोचता अधिकारी आपल्या सोयीनुसार कार्यालयात येत होते. मात्र आजच्या प्रकारामुळे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली असल्याचे चित्र दिसले. Municipal office late staff

    नेहमी नागरिकांना बाहेर ताटकळत उभे ठेवणारे अधिकारी आज स्वतः बाहेर ताटकळत उभे होते. मनपा आयुक्त अकनूरी यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असे वागणे व त्यांना शिस्त लावण्याचा हा प्रकार दिवसभर जनमानसात चर्चेत होता.

  • आमदार सुधीर मुनगंटीवार यांची गोवंश संरक्षणासाठी तीन महत्त्वपूर्ण मागण्या

    Gau protection Maharashtra : नागपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) : विधिमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात आज आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गोवंश संरक्षण, पोषण व व्यवस्थापनासंदर्भात शासनाकडे तीन महत्वपूर्ण मागण्या मांडत सभागृहाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले. भाकड व वृद्ध गोवंशासाठी शासकीय जमिनींवर स्वतंत्र कुरणे विकसित करण्यासाठी कालबद्ध व ठोस कार्यक्रम राबवावा, सन १९६१ मधील व आजच्या जनावरांच्या संख्येच्या तुलनात्मक आकडेवारीच्या आधारे भविष्यातील चारा उपलब्धता, कुरण विकास व पोषण व्यवस्थेचे नियोजन करावे, तसेच वाढती खर्चिक स्थिती व चारा टंचाईमुळे अडचणीत आलेल्या गरीब शेतकऱ्यांना गोवंश संगोपनासाठी शासकीय सहाय्य किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा तीन ठोस मागण्या त्यांनी शासनाकडे मांडल्या. (हे वाचा – शेतात काम करताना युवा शेतकऱ्याचा मृत्यू)

    राज्य विधिमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात आज गोवंश संरक्षण, पोषण व व्यवस्थापनासंदर्भात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले. गोवंश रक्षणासाठी पुरवणी मागण्यांद्वारे २२२ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल त्यांनी शासनाचे मनापासून अभिनंदन केले. स्वातंत्र्यानंतरची ही गोवंश रक्षणासाठीची सर्वात मोठी आर्थिक तरतूद असून, या निर्णयामुळे मुक्या जनावरांचा आशीर्वाद शासनाला निश्चितच लाभेल, असा विश्वास त्यांनी सभागृहात व्यक्त केला. Gau protection Maharashtra

    तीन महत्त्वाचे प्रश्न

    भाकड गाई व वृद्ध गोवंशासाठी शासकीय जमिनींवर स्वतंत्र कुरणे विकसित करण्यासाठी कालबद्ध व ठोस कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा विचार आहे काय, सन १९६१ मधील व आजच्या जनावरांच्या संख्येच्या तुलनात्मक आकडेवारीच्या आधारे भविष्यातील चारा उपलब्धता व पोषण व्यवस्थेचे नियोजन होणार आहे काय, तसेच वाढती खर्चिक स्थिती व चारा टंचाईमुळे अडचणीत आलेल्या गरीब शेतकऱ्यांसाठी गोवंश संगोपनासाठी शासकीय सहाय्य किंवा पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे काय, असे तीन महत्त्वाचे प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केले.

    या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांना ‘मागणी’ नव्हे तर ‘उपयुक्त व सकारात्मक सूचना’ असे संबोधले. गोवंश वाचवायचा असेल तर भाकड व वृद्ध जनावरांचे संगोपन आवश्यक असल्याचे मान्य करत, शासकीय जमिनींवर कुरण विकास, पावसाच्या अंदाजानुसार चारा व्यवस्थापन तसेच या विषयावर निश्चित सहकार्य करण्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.भविष्यात या योजना अधिक सक्षम करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले. शेवटी, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या तिन्ही मुद्द्यांवर शासन शंभर टक्के अंमलबजावणी करेल, अशी ठाम ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.

  • घुग्गुस लोखंडी पूल: लवकरच रहदारीसाठी खुला होणार

    WCL CMD meeting Nagpur : चंद्रपूर/नागपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – घुघुस शहरातील अत्यंत महत्त्वाचा लोखंडी पूल मागील दोन वर्षांपासून रहदारीसाठी बंद असल्याने सामान्य नागरिकांसह व्यापारी बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पुलामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज नागपूर येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) चे CMD जय प्रकाश द्विवेदी यांची तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली.

    या बैठकीदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी घुघुस शहरातील नागरिक, व्यापारी व कामगार वर्गाला भेडसावणाऱ्या अडचणी मांडत पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. यावर सकारात्मक भूमिका घेत CMD शजय प्रकाश द्विवेदी यांनी लोखंडी पुलाच्या कामासाठी अतिरिक्त १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच हा निधी उद्याच संबंधित यंत्रणेकडे वर्ग केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    यापूर्वी या पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी ३ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून पुलावरून वाहतूक बंद ठेवावी लागली होती. आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे अतिरिक्त निधी मंजूर झाल्याने पुलाच्या कामाला पुन्हा गती मिळणार असून लवकरच पूल रहदारीसाठी खुला होण्याची आशा निर्माण झाली आहे. WCL CMD meeting Nagpur

    १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर

    या भेटीमुळे घुघुस शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त होत आहे. नागपूर येथे WCL च्या CMD यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट; घुघुस लोखंडी पुलासाठी अतिरिक्त १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर.

    घुघुस शहरातील अत्यंत महत्त्वाचा लोखंडी पूल मागील दोन वर्षांपासून रहदारीसाठी बंद असल्याने सामान्य नागरिकांसह व्यापारी बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पुलामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज नागपूर येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) चे CMD श्री. जय प्रकाश द्विवेदी यांची तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली.

    या बैठकीदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी घुघुस शहरातील नागरिक, व्यापारी व कामगार वर्गाला भेडसावणाऱ्या अडचणी मांडत पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. यावर सकारात्मक भूमिका घेत CMD श्री. जय प्रकाश द्विवेदी यांनी लोखंडी पुलाच्या कामासाठी अतिरिक्त १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच हा निधी उद्याच संबंधित यंत्रणेकडे वर्ग केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    यापूर्वी या पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी ३ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र तो निधी अपुरा ठरल्याने पुलाचे काम अर्धवट राहिले होते आणि त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून पुलावरून वाहतूक बंद ठेवावी लागली होती. आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे अतिरिक्त निधी मंजूर झाल्याने पुलाच्या कामाला पुन्हा गती मिळणार असून लवकरच पूल रहदारीसाठी खुला होण्याची आशा निर्माण झाली आहे.

    या यशस्वी भेटीमुळे घुघुस शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त होत आहे.
    या भेटीदरम्यान WCL चे डायरेक्टर (HR) डॉ. हेमंत पांडे, तसेच WCL HMC चे प्रेसिडेंट शिवकुमार यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.