Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • बेघरांच्या मदतीसाठी मनपा पुढे सरसावली; 17 बेघरांना सुरक्षित निवार्‍यात आश्रय

    Chandrapur homeless shelter update: चंद्रपूर 24 नोव्हेंबर (News३४) – उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास 17 महिला पुरुष बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली.

    Read Also : चंद्रपुरात पुन्हा वाघाचा हल्ला, ४० वा मृत्यू

    अनेकदा परिस्थितीने गांजलेल्या व्यक्तीला कुणाचाही आधार न मिळाल्याने भटकत, उघड्यावर जगावं लागते. उड्डाण पूलाखाली, रस्त्याकडेला, मोकळया जागेवर बेघर आपणास दृष्टीस पडतात. त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेने निराधार-बेघरांना मदतीचा हात दिला आहे. मनपाच्या निवारा चमूने शुक्रवारी रविवार 23 नोव्हेंबरच्या रात्री विशेष मोहीम राबवित 17 बेघरांना जवळच्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे.

    Read Also : जिजाऊ ब्रिगेडच्या महाअधिवेशनाची सांगता

     चंद्रपूर शहरातील फुटपाथ, रस्त्याच्या शेजारी पूलाखाली व अन्य ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या बेघरांसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी बेघर निवारा केंद्र सुरू केलेले आहेत. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. Chandrapur homeless shelter update

       वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या बेघर निवारा चमूद्वारे विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागातून रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शोधून त्यांना मनपाच्या बेघर निवारा केंद्रांमध्ये नेण्यात येत आहे. त्यानुसार एकूण 17 व्यक्तींना मनपाच्या वाहन व्यवस्थेच्या मदतीने निवारा केंद्रात नेवून आश्रय दिला. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त संदीप चिद्रवार यांच्या नेतृत्वात  NULM विभाग प्रमुख रफिक शेख,शहर अभियान व्यवस्थापक रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम, समुदाय संघटक सुषमा करमनकर ,खडसे, मून, लोणारे, पाटील व समाज कल्याण विभागाचे कर्मचारी काम करीत आहे.

  • municipal corporation BJP planning meeting । ६६ जागेसाठी चंद्रपूर भाजपकडे तब्बल ४४० अर्ज; आमदार जोरगेवार म्हणाले पक्ष ज्याचे नाव पुढे करेल..

    municipal corporation BJP planning meeting

    municipal corporation BJP planning meeting : चंद्रपूर २१ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आणि या अर्ज प्रक्रियेमध्ये 440 इच्छुकांनी आपली नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणे हे आपल्या पक्षाची ताकद, जनतेतील वाढता विश्वास आणि आपल्यातील प्रत्येकाच्या मनात असलेली सेवा भावनेची जाणीव दर्शवते. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. तिकीट वाटपातही कार्यकर्त्यांना प्राधान्य असेल. कार्यकर्तेच भाजपचे शक्तिस्थान असल्याचे प्रतिपादन निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Read Also : चंद्रपुरात अल्पवयीन मुलाची आत्महत्या, वसतिगृहातील कर्मचाऱ्याने केला मानसिक छळ

    चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. यात 440 इच्छुक उमेदवारांनी आवेदनपत्र सादर केले. आज (शुक्रवार) जैन भवन येथे सदर सर्व इच्छुकांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. municipal corporation BJP planning meeting

     या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, नेते प्रकाश देवतळे, महिला आघाडी अध्यक्षा छबु वैरागडे, माजी महापौर राखी कंचार्लवार, अंजली घोटेकर, माजी उपमहापौर संदीप आवारी, बलराम डोडाणी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, वंदना हातगावकर, तुषार सोम, महामंत्री रविंद्र गुरनुले, मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष रवी जोगी, प्रदीप किरमे, सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, माजी नगरसेवक संजय कंचार्लवार, अॅड. कुणाल घोटेकर, रवी आसवानी, बंटी चौधरी, अरुण तिखे, माजी नगरसेविका कल्पना बबूलकर, पुष्पा उराडे, वंदना तिखे, प्रवीण गिलबिले आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. municipal corporation BJP planning meeting

    chandrapur bjp election meeting

    यावेळी पुढे बोलताना निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजची नियोजन बैठक उमेदवारीसाठीची चर्चा नाही, तर आपली एकता, संघटन आणि पक्षनिष्ठा दृढ करण्याचा क्षण आहे. भाजपा ही केवळ एक राजकीय संस्था नाही तर विचारांची, संस्कारांची आणि लोकसेवेची शाळा आहे. येथे येणारा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील लोकांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या विकासाची स्वप्ने मनात ठेवून काम करतो. निवडणूक ही फक्त पदाची लढाई नसते, ती नागरिकांच्या विश्वासाची आणि भविष्यातील विकासाची जबाबदारी आहे. चंद्रपूर महापालिकेची निवडणूक ही शहराच्या भविष्याची निवडणूक आहे. नागरिकांना पारदर्शक प्रशासन, विकासाभिमुख धोरण, आणि लोकांसाठी सतत उपलब्ध राहणारी व्यवस्था हवी आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे ते यावेळी म्हणाले. municipal corporation BJP planning meeting

    उमेदवारी मिळणे हा निश्चितच सन्मान आहे, पण उमेदवारी न मिळाल्यानंतरदेखील पक्षासाठी मनापासून, निष्ठेने आणि त्याच जोमाने काम करणे हा त्याहून मोठा सन्मान आहे. उमेदवार एक असतो, पण त्यामागे उभे राहणारे शेकडो कार्यकर्तेच विजयाची खरी ताकद असतात. पक्ष ज्याचे नाव पुढे करेल, त्याच्यामागे सर्वांनी एकदिलाने, मतभेद दूर ठेवून, फक्त विजयाचे स्वप्न घेऊन उभे राहणे ही खरी संघटना आहे. भाजपा कधीही एखाद्याच्या व्यक्तीपूजनावर चालत नाही, भाजपा विचारांवर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    आपली एकजूट टिकवा, निष्ठेने काम करा, मतभेद विसरा आणि पक्षाचा विजय हेच सर्वोच्च ध्येय समजून पुढे चलण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी इच्छुक उमेदवारांसह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Sunday market shutdown due to mahatet exam । MAHATET 2025 मुळे चंद्रपुरातील संडे मार्केटला ‘ब्रेक’; हजारो विद्यार्थ्यांची गर्दी अपेक्षित

    Sunday market shutdown due to mahatet exam

    Sunday market shutdown due to mahatet exam : चंद्रपूर १८ नोव्हेंबर (News३४) – येत्या २३ नोव्हेंबर रोजी संडे मार्केट भरणाऱ्या परिसरातील विविध शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ होणार असल्याने दर रविवारला भरणारे संडे मार्केट या दिवशी बंद ठेवण्यात येणार असुन सदर निर्देशाची सर्व व्यावसायिकांनी नोंद घेण्याचे आवाहन चंद्रपूर मनपा प्रशासनाने केले आहे.  

    Read Also : चंद्रपुरातील रयतवारी मध्ये आमदार जोरगेवार व माजी नगरसेवक अडूर यांची शाब्दिक चकमक

    मनपा हद्दीतील जयंत टॉकीज चौक ते खिश्चन कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दर रविवार ला संडे मार्केट या नांवाने बाजार भरत असून, त्यांत विविध तात्पुरत्या स्वरुपाची दुकाने, हातठेले, फेरीवाल्यांची दुकाने लावण्यांत येत असतात. येत्या रविवारी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ (MAHATET) होणार आहे.

      सदर परीक्षेची केंद्रे या परिसरातील न्यु इंग्लीश हायस्कुल, ज्युबली हायस्कुल व मराठी सिटी/हिंदी सिटी हायस्कुल येथे देण्यात आली असल्याने येथे मोठया प्रमाणात विद्यार्थी येणार आहे. तसेच सदरील परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी असण्याची शक्यता असतांना संडे मार्केट मधील गर्दीमुळे काही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी दर रविवारला भरणारे संडे मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. 

  • chandrapur municipal corporation apman patra । हा तर जाहीर धुत्कार; चंद्रपूर मनपाला मिळाले अपमान-पत्र

    chandrapur municipal corporation apman patra

    chandrapur municipal corporation apman patra : चंद्रपूर, दि. 12 नोव्हेंबर (News३४) — बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्ता दुभाजकाच्या कामातील प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज जनविकास सेनेने चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना “अप-मानपत्र” देऊन मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा “जाहीर धुत्कार” केला.

    जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने दुपारी 4 वाजता आयुक्त विद्या गायकवाड यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना ‘अप-मानपत्र’ दिले. मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा जाहीर धुत्कार करत असल्याचे यावेळी त्यांनी आयुक्तांसमोर नमूद केले. देशमुख यांनी मनपाचे सहायक अभियंता आशिष भारती यांच्यासोबत केलेल्या संयुक्त पाहणीचा अहवाल आयुक्त गायकवाड यांना दिला. आयुक्तांना अपमानपत्र देत, दुभाजकाच्या कामात त्वरित चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी अक्षय येरगुडे, मनीषा बोबडे देवरा हटवार इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. chandrapur municipal corporation apman patra

    Read Also : वीजबिलातील नावात बदल करणे झाले सोप्पे

    माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी काल, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मनपाचे सहाय्यक अभियंता आशिष भारती यांच्या उपस्थितीत बागला चौकातील दुभाजकाच्या कामाचे प्रत्यक्ष मोजमाप केले. तांत्रिक उपकरण, वजन काटा,टेप इत्यादी साहित्य घेऊन कामाच्या अंदाजपत्रकांनुसार स्पॉट पंचनामा केला. यावेळी साहित्याच्या प्रमाणात मोठ्या तफावती आढळल्या. अंदाजपत्रकात दाखवलेले स्टील, सिमेंट, व वृक्षलागवडीचे प्रमाण वास्तवापेक्षा तीनपट वाढवून दाखवले असल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुभाजकाची लांबी आणि खर्च कृत्रिमरीत्या वाढवून 3.56 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे पुरावे सादर करण्यात आले. या सर्व घोटाळ्याचा सारांश ‘अप-मानपत्रा’मध्ये दिला आहे. chandrapur municipal corporation apman patra

    Read Also : चंद्रपूर मनपाचे प्रभाग आरक्षण ठरली डोकेदुखी

    देशमुख यांनी या गैरव्यवहाराचे पुरावे मनपाच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करून देखील कारवाई न झाल्याचा आरोप केला. उलट मनपा प्रशासन तकलादू कारणे देऊन भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदाराचे संरक्षण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांचा ‘अपमानपत्र देऊन जाहीर धुत्कार’ करत निषेध नोंदवला.

    या आंदोलनामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील वाढत्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून शहरभर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

    असे कसे अंदाजपत्रक ?

    बागला चौक व सावरकर चौक व सावरकर चौकातील दुभाजक तोडून एकूण 1800 मीटरचे अंदाजपत्रक मनपाचे अधिकाऱ्यांनी नवीन दुभाजकासाठी तयार केले. त्यामध्ये बागला चौकातील दुभाजकाची लांबी 1000 मीटर दाखवण्यात आली. मनपा अभियंत्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष मोजल्यानंतर नंतर ही लांबी 510 मीटर निघाली. अंदाजपत्रकामध्ये काही प्रमाणात अधिकची क्वांटिटी घेतल्या जाते. त्यामुळे 600 मीटर पेक्षा जास्त ही लांबी असायला नको. अंदाजपत्रक बनवताना 400 मीटरची तफावत दिसते.

    या ठिकाणी वापरलेल्या लोखंडी सळाखींचे देशमुख यांनी वजन काटा व टेप घेऊन मोजमाप केले. सर्व हिशेब काढल्यानंतर संपूर्ण दुभाजकासाठी 100 ते 125 क्विंटल पेक्षा जास्त स्टील लागायला नको. अंदाजपत्रकामध्ये 390 क्विंटल स्टीलची देण्यात आली. सावरकर चौकातील दुभाजकाची लांबी विचारात घेतल्यास एकूण कामाची 1300-1400 मीटर लांबी होते. या दुभाजकावर दोन फूटच्या रुंदीचे(बॅग साईज) चे 660 पामच्या झाडांचा तसेच एक फूट बॅग साइज असलेल्या 7500 चाफ्याच्या झाडाचा समावेश आहे. दोन्ही मिळून या साईजचे 2000 पेक्षा जास्त झाडे लावणे शक्य नाही.असे अव्वाच्या सव्वा प्रमाण वाढवून अंदाजपत्रका तयार करण्यात आले. chandrapur municipal corporation apman patra

    दुभाजकाच्या देखभालीसाठी 57 लक्ष रुपये वार्षिक खर्च

    या दुभाजकाच्या देखभालीसाठी वर्षाला 57 लक्ष रूपये खर्च अंदाजपत्रकामध्ये नमूद आहे. एकीकडे शहरातील 88 बगीचे,8 डिवाइडर व 13 सौंदर्यकरणाचे स्थळ यांची देखभाल करण्यासाठी मनपा एका कंत्राटदाराला वर्षाला केवळ एक कोटी म्हणजे महिन्याला आठ लाख रुपये देते. तर बागला चौकातील एका दुभाजकाच्या देखभालीसाठी मनपा वर्षाला 57 लाख रुपये म्हणजे महिन्याला जवळपास पाच लाख रुपये मे. सूर्यवंशी एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देणार आहे.

  • mangesh khawale farewell chandrapur । चंद्रपूर मनपाचे उपायुक्त मंगेश खवले यांना सहकाऱ्यांचा सन्मान

    mangesh khawale farewell chandrapur

    mangesh khawale farewell chandrapur : चंद्रपूर १२ नोव्हेंबर (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेतील उपायुक्त मंगेश खवले यांची बदली होऊन ते नागपूर महानगरपालिका उपायुक्तपदी रुजू झाले आहेत. त्यांच्या बदलीनिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.

    मंगेश खवले यांनी जुलै २०२३ मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात त्यांना देण्यात आलेल्या एकूण १४ विभागांची जबाबदारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. प्रशासकीय कामकाजात कार्यकुशलता, वेळेचे भान आणि निर्णयक्षमता यामुळे त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास व प्रेरणा निर्माण केली. त्यांच्या कार्यकाळात स्वच्छता अभियान, नागरी सुविधा, कर वसुली, पायाभूत सुविधा सुधारणा, तसेच जनसंपर्क विभागातील सुधारणा अशा विविध उपक्रमांना गती मिळाली.

    Read Also : चंद्रपूर मनपा आरक्षणाची भावी नगरसेवकांना डोकेदुखी

    निरोप समारंभात आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, नगर सचिव नरेंद्र बोबाटे, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,  सहायक आयुक्त अनिलकुमार घुले यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
      अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतातून खवले यांच्या नेतृत्वशैलीचे आणि सौजन्यपूर्ण वर्तनाचे विशेष कौतुक केले. सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आणि नेहमी प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख कायम राहील, असे मनोगत अनेकांनी व्यक्त केले. mangesh khawale farewell chandrapur

    उपायुक्त मंगेश खवले यांनी आपल्या भाषणात चंद्रपूर महानगरपालिकेत काम करताना आले अनुभव हा उत्तम होता व येथे मिळालेलं सहकार्य, टीमवर्क आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन नागपूर मनपातही घेऊन जाणार असल्याचे सांगितले तसेच सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि आयुक्तांचे आभार मानले.

  • mahanagarpalika reservation reshuffle effects । चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरक्षण बदलामुळे नेत्यांमध्ये नाराजी, काहींना लॉटरी!

    mahanagarpalika reservation reshuffle effects

    mahanagarpalika reservation reshuffle effects : चंद्रपूर १२ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत ११ नोव्हेम्बर रोजी काढण्यात आली. शहरातील १७ प्रभागातून ६६ नगरसेवक नागरिकांना निवडून द्यायचे आहे. चंद्रपूर मनपाची शेवटची निवडणूक हि वर्ष २०१७ मध्ये झाली होती. कार्यकाळ संपल्यावर मनपामध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. mahanagarpalika reservation reshuffle effects

    कार्यकाळ संपल्यावर ३ वर्षांनी मनपाची निवडणूक लागत असली तर घोषित झालेल्या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना फटका बसलेला आहे, चंद्रपूर मनपा निवडणूक लढण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या भावी नेत्यांची संधी आरक्षणामुळे हुकली. पण काहींना आरक्षणामुळे लॉटरी लागल्याचे चित्र आहे.

    Also Read : चंद्रपूर महानगरपालिका प्रभाग आरक्षण घोषित

    मागील निवडणुकीतील भाजपचे ३६ उमेदवार निवडून आल्याने एकहाती सत्ता भाजपने उपभोगली मात्र त्यांच्या कार्यकाळात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे आली होती, यंदा भाजपने चंद्रपूर मनपा निवडणुकीची जबाबदारी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे सोपविली आहे. जोरगेवार यांच्या नेतृत्वातील मनपाची हि पहिली निवडणूक आहे. मात्र त्यांच्या पूर्वीची संघटना यंग चांदा ब्रिगेड चे कार्यकर्ते किंवा भाजपचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे मुनगंटीवार समर्थकांना तिकीट वाटप करताना नाकीनऊ येणार हे निश्चित. mahanagarpalika reservation reshuffle effects

    • प्रभाग क्रमांक १ दे.गो. तुकूम (ST – महिला, OBC- पुरुष, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर (SC – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ३ एम.ई.एल (SC – पुरुष, ST – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण महिला)
    • प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर (SC पुरुष, OBC महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ६ इंड्रस्टीयल इस्टेट (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ८ वडगाव (OBC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १० एकोरी (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ११ भानापेठ (ST महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १२ महाकाली (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १४ पठाणपुरा (भिवापूर) (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर (Obc महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ कॉलरी (Sc महिला, ST महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १७ डॉ . बाबासाहेब आंबेडकर (Sc पुरुष, St पुरुष, सर्वसाधारण महिला)

    आरक्षण सोडत काढताना काही प्रभागाचे आरक्षण तसेच ठेवण्यात आले असून उर्वरित प्रभाग आरक्षणात बदल करण्यात आला आहे. मात्र या बदलाचा अनेकांना फटका बसला आहे. प्रभाग क्रमांक १७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मधून मागील ५ वर्षांपासून तयारी करीत असलेले आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांना आरक्षणामुळे मोठा फटका बसला आहे.

    कुठे आनंद तर कुठे दुःख

    प्रभाग क्रमांक ३ एमईएल चे माजी नगरसेवक सचिन भोयर यांना आरक्षणामुळे फटका बसला असून ते आता निवडणूक दुसऱ्या प्रभागातून लढणार कि नाही? यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर सर्वसाधारण गटातून यावेळी पुरुष उमेदवारांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगणार आहे. chandrapur mahanagarpalika leaders reaction to reservation

    प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प मधून महिला उमेदवारांसाठी संधी चालून आली आहे मात्र मागच्या आरक्षण प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक यंदा दुसऱ्या सर्वसाधारण गटातून लढणार काय? कारण मागील आरक्षण ओबीसी महिला मात्र यंदा त्याठिकाणी ओबीसी पुरुष आल्याने ओबीसी प्रवर्गातील महिला उमेदवारांमध्ये आरक्षणामुळे नाराजी पसरली आहे. mahanagarpalika reservation reshuffle effects

    प्रभाग क्रमांक ५ विवेकनगर मधून आरक्षणात बदल झाल्याने सर्वसाधारण गटातून चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे, मागील आरक्षणात विवेकनगर ओबीसी प्रवर्गातून दिग्गज नेते संदीप आवारी हे ओबीसी पुरुष प्रवर्गातून निवडून आले होते मात्र यंदा ओबीसी महिला आरक्षण निघाले यासह सर्वसाधारण प्रवर्गात चुरस होत असली तरी आवारी यांना फटका बसेल असे म्हणता येणार नाही कारण संदीप आवारी हे सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात असल्याने हि निवडणूक त्यांना जड जाणार नाही तसेच प्रभाग क्रमांक ६ मधून मागील निवडणुकीत ४ जागेवर बहुजन समाज पक्षाने निवडणुकीत विजय मिळविला होता, यंदा आरक्षण मुळे या प्रभागात नवीन चेहरे पुढे येणार असल्याची माहिती आहे. बसपा पुन्हा या प्रभागात परत येईलच असे चित्र सध्या नाही. मात्र उमेदवार चांगले असतील तर चमत्कार घडू शकतो. mahanagarpalika reservation reshuffle effects

    प्रभाग क्रमांक ११ मध्ये मागील निवडणुकीत पराभवाची चव चाखलेले हर्षद कानमपल्लीवार यंदा भाजपतर्फे निवडणूक लढणार असून मागच्या निवडणुकीत शिवसेना पक्षातून निवडणूक लढले आणि थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले कानमपल्लीवार आता भाजप पक्षातून पहिल्या क्रमांकावर येण्याची तयारी करीत आहे. याच प्रभागातून युवा नेते सूरज पेद्दुलवार भाजप पक्षातर्फे इच्छुक आहे मात्र आरक्षणात सर्वसाधारण प्रवर्ग निघाल्याने संजय कंचर्लावार भाजपतर्फे निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. mahanagarpalika reservation reshuffle effects

    चंद्रपूर महानगरपालिका प्रभाग आरक्षणात अनेक भावी उमेद्वारांना फटका बसला आहे, अनेकांनी ५ वर्षे तयारी केली मात्र ऐनवेळी त्यांच्या हाती निराशा आली आहे.

  • Chandrapur municipal ward reservation list । 🏛️ चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीची घोषणा — जाणून घ्या कोणत्या प्रभागात कोणासाठी राखीव जागा!

    Chandrapur municipal ward reservation list

    Chandrapur municipal ward reservation list : चंद्रपूर ११ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत आज प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात घोषित करण्यात आली. १७ प्रभागातील ६६ जागेपैकी ३३ जागा महिलासाठी राखीव आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १३ जागा, अनुसूचित जनजातीसाठी ५ जागा, ओबीसी साठी १७ जागा तर सर्वसाधारण गटातून ३१ जागा राखीव असून यामध्ये महिलांना १४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.

    Also Readतिघांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाला वनविभागाने केले जेरबंद

    प्रभागनिहाय आरक्षणाची माहिती

    • प्रभाग क्रमांक १ दे.गो. तुकूम (ST – महिला, OBC- पुरुष, सर्वसाधारण -महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर (SC – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ३ एम.ई.एल (SC – पुरुष, ST – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण महिला)
    • प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर (SC पुरुष, OBC महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ६ इंड्रस्टीयल इस्टेट (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ८ वडगाव (OBC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १० एकोरी (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ११ भानापेठ (ST महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १२ महाकाली (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १४ पठाणपुरा (भिवापूर) (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर (Obc महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ कॉलरी (Sc महिला, ST महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १७ डॉ . बाबासाहेब आंबेडकर (Sc पुरुष, St पुरुष, सर्वसाधारण महिला)

    निवडणुकीपूर्वी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात अनेक भावी नगरसेवकांनी मीच जनतेचा सेवक असा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता मात्र आज घोषित झालेल्या आरक्षणामुळे नगरसेवक होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. Chandrapur local body election ward reservation

  • Chandrapur Journalist Family Assaulted । चंद्रपुरात जंगलराज?; पत्रकार कुटुंबावर पोलिसांसमोर हल्ला

    Chandrapur Journalist Family Assaulted

    Chandrapur Journalist Family Assaulted : चंद्रपूर ९ नोव्हेम्बर (News34) – चंद्रपूर शहरात पहिल्यांदा महानगरपालिकेने इतिहास घडविला आहे, ४ फुटाच्या गल्ली मधील अतिक्रमण काढण्यासाठी थेट बुलडोझर चालविण्यात आला, या कारवाईचा विरोध करणाऱ्या परिवाराला पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली. असे प्रसंग बिहार किंवा उत्तरप्रदेश राज्यात सतत घडत असतात मात्र आता हे जंगलराज महाराष्ट्रातील चंद्रपुरात बघायला मिळाले आहे. एका दलित कुटुंबाला पोलिसांसमोर १० ते १२ जणांच्या घोळक्याडून मारहाण करण्यात आली.

    Also Read : वनविभागाने हल्लेखोर वाघाला केले जेरबंद

    चंद्रपुरातील पत्रकार विनोद दुर्गे व त्यांच्या कुटुंबाला चक्क पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली असून या संदर्भातील मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. बाबुपेठ प्रभागातील हिंग्लज भवानी वार्डात विनोद दुर्गे हे मागील १५ वर्षांपासून राहत आहे. त्याकाळी अतिक्रमण काढा असा कसलाही वाद झाला नाही, दुर्गे यांना घरकुल आवास मंजूर झालं आणि अतिक्रमणाच्या वादाला तोंड फुटले.

    नेमकं काय घडलं?

    पत्रकार विनोद दुर्गे हे मागील १५ वर्षांपासून हिंग्लज भवानी वार्डात राहतात, या भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो, मात्र दुर्गे यांनी आपल्या शेजाऱ्यांसोबत बोलून बोरवेल चे काम केले होते, विशेष म्हणजे शेजाऱ्यांनी या बोरवेल साठी सामूहिक रक्कम जमा केली होती, आपलं घर अजून सुंदर व्हावं यासाठी शासनाच्या घरकुल आवास योजनेत अर्ज केला, दुर्गे यांना घरकुल मंजूर झाला, जानेवारी २०२५ मध्ये त्यांनी घराचे काम सुरु केले. Political Pressure Behind Chandrapur Bulldozer Action

    encroachment chandrapur

    दुर्गे यांचं घराचं काम चौधरी नामक शेजारी यांना खुपलं व त्यांनी दुर्गे यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केले. घर निर्माण कार्यात वाद होऊ नये यासाठी दुर्गे गप्प राहिले मात्र शेजारी यांनी त्रास देणे सुरूच ठेवले, अखेर काही दिवसांनी सामूहिक निर्माण करण्यात आलेल्या बोरवेल चे पाणी दुर्गे यांना देणे बंद केले. शेजाऱ्यांनी केलेले अतिक्रमण बाबत चंद्रपूर मनपा मध्ये तक्रार देण्यात आली. मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेत दुर्गे यांना धमकविण्याचा प्रयत्न शेजाऱ्यांनी सुरु केला. रामनगर पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र काही राजकीय गुंडांच्या वरदहस्ताने उलट पोलीस दुर्गे यांना धाकदपट करू लागले. दुर्गे यांची बाजू कुणीही ऐकायला तयार नव्हते.

    त्यानंतर शेजाऱ्यांनी दुर्गे यांनी आमचा येण्याजाण्याचा रस्ता अडविला आहे, आम्हाला जायला रस्ता नाही अशी तक्रार काही शेजारी नागरिकांनी चंद्रपूर मनपामध्ये केली. विशेष बाब म्हणजे राजकीय शक्तीचा वापर करीत आमदारांना दुर्गे विरोधात पत्रही द्यायला लावले. political pressure municipal action

    ६ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्रपूर मनपाचे कर्मचारी व रामनगर पोलीस दुर्गे यांच्या घरी दाखल झाले, विशेष म्हणजे ४ फुटाच्या गल्ली मधील दुर्गे यांच्या घराच्या बांधकामाचे सामान काढण्यासाठी मनपाने थेट बुलडोझर आणला, विनोद दुर्गे व त्याच्या कुटुंबाने या कारवाईचा विरोध केला असता काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी विनोद दुर्गे, त्यांची पत्नी दिक्षा व मुलाला थेट पोलिसांसमोर अमानुषपणे मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार व्हिडीओ मध्ये कैद झाला आहे.

    encroachment complaint

    मारहाणीबाबत दुर्गे यांनी रामनगर पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी शोभा चौधरी, अमोल चौधरी, दयाराम अंबादे व प्रीतम गेडाम यांच्यावर विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला. याबाबत पुरोगामी संघटनेने दुर्गे कुटुंबाला मारहाण प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली असून शेजाऱ्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेत मारहाण केल्याचा प्रकार निंदनीय आहे व यामध्ये चंद्रपूर मनपाच्या शुभम वरघट सह शेजाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेमार्फत केली आहे. social injustice Maharashtra

    अतिक्रमणाच्या नावावर १५ वर्षांपासून शेजारी गप्प का?

    चंद्रपूर शहर हा अतिक्रमणाने वेढला आहे, याठिकाणी राजकीय दृढ संबंध व श्रीमंत नागरिकांनी मोठे अतिक्रमण केले आहे मात्र ते अतिक्रमण काढावे, त्याच्यावर कारवाई व्हावी याबाबत मनपा डोळेझाक करीत आहे. दुर्गे हे १५ वर्षांपासून हिंग्लज भवानी वॉर्डात राहत आहे, इतक्या काळात शेजाऱ्यांना अतिक्रमण का दिसले नाही? दुर्गे यांच्या घराचे बांधकाम सुरु असताना शेजाऱ्यांना जायला रस्ता नव्हता का? हे सर्व कट कारस्थान शेजाऱ्यांनी केले हे स्पष्ट आहे, मात्र राजकीय दबावाने दुर्गे यांच्यावर कारवाई झाली हे यातून स्पष्टपणे दिसत आहे. Chandrapur Journalist Family Assaulted

  • Congress party sit-in protest Chandrapur । चंद्रपुरात कांग्रेसच्या माजी नगरसेवकांचे ठिय्या सत्याग्रह आंदोलन

    Congress party sit-in protest Chandrapur

    Congress party sit-in protest Chandrapur : चंद्रपूर ६ नोव्हेम्बर (News३४) – आज दि ६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता महानगरपालिके समोर गांधी चौक चंद्रपुर येथे महाकाली प्रभाग 12 व भिवापुर प्रभाग 14 चे काँग्रेसच्या माजी नगरसेवक नंदू नागरकर व वसंत देशमुख, प्रवीण पडवेकर काँग्रेस विधानसभा उमेदवार, सुनीता लोढीया, माजी नगराध्यक्ष, यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ठिय्या सत्याग्रह आंदोलन ला सुरवात केली. 

    आंदोलनाचे मुख्य पार्श्वभूमी अशी की महाकाली प्रभाग 12 व भिवापुर प्रभाग 14 या दोन्ही प्रभागाला व शहराला जोडनारा महत्वाचा पुल अतिवृष्टीमुळे 3 महिन्या आधी वाहून गेला, चंद्रपूर च्या आराध्य दैवत माता महाकाली च्या यात्रे करिता दर वर्षी अनेक भाविक मार्च व एप्रिल महिन्या मध्ये लाखोच्या संख्येत दर्शनास येतात त्या वेळी बागला चौक ते अंचलेश्वर गेट हा मुख्य मार्ग बंद असतो त्या वेळी शहरातील नागरिक या पुलावरून मोठ्या संखेत प्रवास करतात. Congress party sit-in protest Chandrapur

    Also Read : चंद्रपुरात खंडणीखोर पत्रकारांच्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    चंद्रपुर बेनार रेल्वे स्टेशन साठी जाणारे प्रवासी नागरिक मुख्यता या पुला चा वापर करतात, दैनंदिन या मार्गाने जाणारे महाकाली प्रभाग १२ व भिवापूर प्रभाग 14 नागरिक नदीतुन जाने येणे करीत आहे धोधो पावसाने नदीच्या वाढलेल्या  प्रवाहात एखादा व्यक्ति वाहुन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीं तसेच शासकीय रुग्णालय, शासकीय इंजिनीरिंग कॉलेज, राजीव गांधी इंजिनीरिंग कॉलेज, बाबुपेठ, भिवापूर, WCL लालपेठ व बल्लारपूर करीत हा जोड रास्ता असून विद्याथी, व्यापारी व  कामगार या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. (congress protest)

    दोनवेळा वाहून गेला पुलाचा भाग

                तात्पूरता  बनविन्यात येत असलेला रस्ता हा 2 दा वहुन गेला आहे त्याला रिपेअर करून मजबूत काम होणे शक्य नाहीं कारण त्याची निव (BASE) कमजोर झालेली आहे. तरी भविष्याचा विचार करत इथे मोठ्या  व मजबूत पुलाची निर्मिति करणे आवश्यक आहे. हनुमान खिडकी महाकाली प्रभाग क्र. १२ व भिवापूर प्रभाग क्र. १४ मधील झरपट नदीवरील पुलिया बांधकामा करीता खनिज निधीतुन ४ कोटी ५० लक्ष रुपये जिल्हा खनिज निधितुन उपलब्ध करुण देण्या करीता मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना राजुरा विधानसभेचे माजी आमदार व ग्रामीण काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, प्रवीण पडवेकर, नंदु नागरकर , सुनीता लोढ़िया व वसंत देशमुख  यानि 3 महिन्या अगोदर भेट घेतली असता त्यांनी सूचना केली की महानगर्पालिकेने इस्टिमेट चा प्रस्ताव मंजूर करूण पाठवावे.

    Also Read : बल्लारपुरातील संयुक्त गुन्हेगारीवर लगाम, पोलिसांनी लावला मकोका

    आम्ही तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल साहेब याना भेटून विनंती केली त्यनि इस्टिमेट बनवून प्रस्ताव तयार केला परंतु मा. आयुक्त साहेब लांब रजेवर गेले व त्यांची बदली झाल्या मुळे हा प्रस्ताव मॅडम विद्या गायकवाड आयुक्त मनपा चंद्रपुर  यानि दि 29/09/2025 ला जिल्हाधिकारी कार्यालय कड़े प्रस्ताव प्रशासकीय मान्यता करीता पठविला तरी हा प्रस्ताव मंजूर करुण ४ कोटी ५० लक्ष रुपये जिल्हा खनिज निधितुन उपलब्ध करुण द्यावा ही विनती केली तसेच शहर व जिल्हा प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता व सामान्य नागरिकांसोबत मिळून तीव्र आंदोलन करण्याचे संकेत देत चंदन पाटिल अतिरिक्त आयुक्त मनपा चंद्रपुर व संदीप चिद्दरवार उपायुक्त मनपा चंद्रपुर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. mahakali bridge collapse

    आंदोलकांनी हा विषय मा आमदार किशोर जोर्गेवर चंद्रपुर विधानसभा क्षेत्र यांनी जातीने लक्ष न घातल्यास महाकाली प्रभाग 12 व भिवापुर प्रभाग 14 चे नागरिक निषेध करतील. या प्रसंगी आंदोलनात  विनायक बांगडे, माजी अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी,  डॉ सुरेश महाकुलकर विरोधी पक्ष नेते मनपा चंद्रपुर, प्रशांत दानव, अजय वैरागडे, ज्ञानेश्वर जुनघरे, संगीत भोयर, अमजद आली इराणी, सकीना अन्सारी, विना खनके,  निलेश खोब्रागडे, केशव रामटेके, फारुख सिद्धीकी, शालिनी भगत, रमीज शेख, सतीश मालेकर, राजू बनकर, परब गिरडकर, विनोद संकत, कुणाल रामटेके, मंगला मडावी, प्रकाश चंदनखेडे, रेहमत शेख, local congress leaders protest bridge issue

    सर्जील भाई, राजा काझी, राजू दास, निखिल देव, प्रमोद विश्वकर्मा, कुमार स्वामी पोत्तलवार, अशोक उईके, जावेद भाई, बंडू जांगडे, राजू गर्गेलवार, डॉ जेणेकर मेहबूब भाई, शकीला दीदी, दीपक काटकोजवार, राजेश रंगारी, बंडोपंथ तातावार,  सचिन गावंडे, राकेश चहारे, सचिन क्षीरसागर, सचिन चहारे, जफर बेग  विजय ठोंबरे, मोहन डोंगरे, सचिन गोरे सुरेश आत्राम, विजय पराते, निखिल पाटिल, हरी गावंडे, भाणेश जंगम, सुरेश आत्राम, पांडुरंग गावतुरे, मोरेश्वर शेंडे, घनशाम वासेकर, श्याम राजूरकर, प्रकाश अधिकारी, सौ शोभा ज्ञानेश्वर जुनघरे, अनिल तपासे, जय झाडे, प्रकाश चहारे, गुडू बेग आदि प्रभागचे नागरिक मोठ्या संखेत उपस्थित होते.  Congress party sit-in protest Chandrapur

  • school children radio performance । आकाशवाणीवर झळकले विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि मूल्यवर्धक संदेश

    school children radio performance

    school children radio performance : चंद्रपूर ०६ नोव्हेंबर (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या पी. एम. श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय (मनपा शाळा) येथील नर्सरी ते चौथीपर्यंतच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी ‘आकाशवाणी’वर झेप घेत, आपली कला आणि सर्जनशीलता संपूर्ण जिल्ह्यासमोर सादर केली आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

      प्रत्येक रविवारी आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या ‘बालसभा’ या लोकप्रिय कार्यक्रमात या विद्यार्थ्यांनी गाणी, गोष्टी, बोधकथा, नाटिका तसेच स्वच्छतेचा संदेश यांचे मनमोहक सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे एकूण चार भागांमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले असून, पहिला भाग आधीच प्रसारित झाला आहे. तर दुसरा भाग रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.४० वाजता प्रसारित होणार आहे. उर्वरित दोन भाग १६ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी ऐकता येणार आहेत.

    सादरीकरणाचे कौतुक

      आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनःपूर्वक कौतुक केले असून, पालकवर्ग आणि नागरिकांकडूनही शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून स्वागत होत आहे. या उपक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चीद्रवार,मुख्याध्यापक शिवलाल इरपाते, उमा सुधीर कुकडपवार, अस्मिता खोब्रागडे, स्नेहा गुरपुडे, दर्शना येरणे व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी मनापासून परिश्रम घेतले.

    महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की,
    “विद्यार्थ्यांच्या मनातील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी आकाशवाणीसारखे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरते. या माध्यमातून मनपा शाळांचे विद्यार्थी नव्या उंचीवर झेप घेत आहेत.”

    डॉ. गायकवाड यांनी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील काळातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल, असे सांगितले. हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा नसून, मनपा शिक्षणाच्या दर्जेदारतेचे आणि नवकल्पनांच्या दिशेने घेतलेल्या पावलांचे प्रतिक आहे.