Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • Chandrapur municipal warning water disruption । ⚠️ मोठी बातमी! ईरई धरण दुरुस्तीमुळे चंद्रपूरच्या या भागात पाणीपुरवठा खंडित

    Chandrapur municipal warning water disruption

    Chandrapur municipal warning water disruption : चंद्रपूर, 19 ऑगस्ट – ईरई धरणावर अचानक उद्भवलेल्या विद्युत कामकाजामुळे उद्या दिनांक 20 ऑगस्ट 2025 (बुधवार) रोजी चंद्रपूर शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत किंवा पूर्णपणे बंद राहणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना याची पूर्वसूचना देण्यात येत असून, पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

    मोकाट जनावराचा हल्ला, महिलेचा मृत्यू

    बाधित भाग पुढीलप्रमाणे –

    • 1) बाबूपेठ परिसर :
      लालपेठ, संविधान नगर, किरमे प्लॉट, बाबा नगर, नेताजी चौक, मराठा चौक, गुरुदेव चौक, बुरड मोहल्ला, मोटघरे प्लॉट, आंबेडकर चौक, पंचशील चौक, महादेव मंदिर, राधाकृष्ण चौक, विकास नगर.
      2) हिंगलाज भवानी टाकी परिसर :
      मा.सर, हिंगलाज भवानी टाकीतून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत किंवा बंद राहील.


    3) रयतवारी टाकी परिसर :
    रयतवारी टाकीवरून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत राहील.
    श्याम नगर, इंदिरा नगर, राजीव गांधी नगर आदी परिसर बाधित होतील.


  • 105 year old building demolition । धोका टळला! मनपाने 105 वर्षे जुनी धोकादायक इमारत केली जमीनदोस्त

    105 year old building demolition

    105 year old building demolition : चंद्रपूर 19 ऑगस्ट  – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात येत असुन बाजार वॉर्ड,जैन मंदिर जवळील 105 वर्षे जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.

    वाळूमाफियांना कांग्रेसचा इशारा

    भरत अल्लेवार यांच्या मालकीची ही इमारत असुन त्यांना सदर इमारत पाडण्याची नोटीस मनपातर्फे देण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वतः काही हालचाल न केल्याने मनपाने कारवाई करून त्यांच्या इमारतीचा जीर्ण झालेला भाग निष्कासित केला आहे. पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारती खाली करण्याची सूचना प्रशासनाकडून नोटीसद्वारे दिली जाते.

    जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश

    मात्र मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. जीर्ण इमारतींचे पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. demolition of dangerous old building

    सर्व्हे पूर्ण झालेल्या सर्व जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली असुन नोटीस प्राप्त होऊनही जे धारक अश्या जीर्ण घरात राहत आहे त्यांच्यावर मनपाद्वारे कारवाई केली जात आहे. उपायुक्त संदीप चिद्रावार यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त अनिलकुमार घुले,नगर रचनाकार प्रतीक देवतळे,अतिक्रमण निर्मूलन पथक व नगर रचना विभागाने ही कारवाई पार पाडली.

     
     


       

  • Ganesh idol exhibition Chandrapur । 🌟 यंदाचा उत्सव खास! चांदा क्लबमध्ये मिळणार मातीच्या गणेश मूर्तींचे अनोखे कलेक्शन 🌿

    Ganesh idol exhibition Chandrapur

    Ganesh idol exhibition Chandrapur : चंद्रपूर – आगामी श्रीगणेशोत्सव काळात यंदाही चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले असुन श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.  

    चंद्रपूर मनपा आयुक्त जाणार जपान दौऱ्यावर

        लवकरच गणेशोत्वास सुरवात होणार असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो.यावर उपाय म्हणुन यावर्षी मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा मनपाने उपलब्ध करून दिली होती व त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. यावेळॆस मागणी असल्याने सिटी हायस्कूल जवळील जुन्या विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्याशिवाय इतर फुटपाथ अथवा रस्त्यावर विक्रेत्यांना पूर्णपणे मनाई आहे.  

    रस्त्यावर मूर्ती विक्री केल्यास कारवाई

         चांदा क्लब येथे येथे व्यवस्था  करण्यात येणार येणार असुन स्टॉल्स, पेंडॉल व्यवस्था मूर्ती विक्रेत्यांना स्वतः करावयाची आहे. विद्यूत व्यवस्थेसाठी पॉईंट, फिरते शौचालय,स्वच्छतेची व्यवस्था,पाणी टँकर मनपा प्रशासनातर्फे करून दिली जाणार आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री व साहित्य विक्री करणाऱ्यावर तसेच मनपाने निश्चित करून दिलेल्या जागेशिवाय इतरत्र विशेषतः फुटपाथवर अथवा रस्त्यावर मुर्ती विक्री करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. Chandrapur Clay Ganesh idol exhibition 2025    


         मूर्ती खरेदीस नागरिकांची गर्दी, वाहनांची गर्दी, खरेदीस पुरेसा वेळ न मिळणे, दुचाकी वाहन सोबत असेल तर वाहन उभे करायला जागेचा प्रश्न,चारचाकी वाहन असेल तर सुरक्षित जागी वाहन उभे करून खरेदीस दूर पायी चालत जावे लागते.सोबत परिवाराचे सदस्य असतील तर खरेदी करतांना होणारा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार असुन नागरिकांना इतरत्र कुठेही गर्दीच्या जागी न जाता मोकळ्या जागेत आपल्या परिवारासहित खरेदीचा आनंद घेता येणार आहे. Chanda Club Ganesh idol exhibition 

         चांदा क्लब येथील मूर्तिकांरांकडून मूर्ती विकत घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असुन यातील 8 भाग्यवान विजेत्यांना घरगुती उपयोगी वस्तु इस्त्री, मिक्सर स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत. गर्दीमुक्त मोकळ्या वातावरणात श्री गणेशाचे आगमन होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी चांदा क्लब येथुन मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.   

  • APGDUM Japan study tour । जपान दौर्‍यातून चंद्रपूर मनपाला मिळणार शहरी विकासाची नवी क्रांती!

    APGDUM Japan study tour

    APGDUM Japan study tour : चंद्रपूर 17 ऑगस्ट – महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत Advanced Post Graduate Diploma in Urban Management (APGDUM) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत 19 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत जपान येथे परदेशी अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासदौऱ्यास 14 ऑगस्ट 2025 रोजी शासनमान्यता देण्यात आली चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल व उपायुक्त मंगेश खवले यात सहभागी होणार आहेत.  

    चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ५० हजार बोगस मतदार

       या अभ्यासदौऱ्यात राज्यातील विविध नगररचना विभाग, महानगरपालिका व शहरी विकास क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होत असुन जपानमधील शहरी विकास, स्थानिक स्वराज्य व्यवस्था व आधुनिक नागरी सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत.या दौऱ्याचे आयोजन पुण्यातील Association of Friends of Japan (AFJ) या संस्थेमार्फत करण्यात आले असून यशदा, पुणे यांचे शैक्षणिक मार्गदर्शन लाभले आहे. Chandrapur urban management training Japan

    दौऱ्याचा उद्देश –

    या परदेशी अभ्यासदौऱ्याचा प्रमुख उद्देश म्हणजे जपानसारख्या प्रगत देशातील शहरी प्रशासन व व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रातील शहरी विकास कार्य अधिक सक्षम, शाश्वत व नागरिकाभिमुख बनवणे हा आहे. जपानमधील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, वाहतूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, हरित विकास, सांस्कृतिक वारसा जतन या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अनुभव आत्मसात करून त्यांचा महाराष्ट्रातील शहरी प्रशासनात उपयोग करण्याची संधी या दौऱ्यातून मिळणार आहे. तसेच, शहरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत विकासाचे मॉडेल, नागरिकांच्या सहभागावर आधारित शासनव्यवस्था, व पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्याच्या पद्धतींचा अभ्यास या अभ्यासदौऱ्याचा भाग असेल.

    दौऱ्याची ठळक वैशिष्ट्ये –

    टोकियोतील आसाकुसा व सेन्सो-जी मंदिर भेट, शहरी नियोजन व पर्यटन विकासाचा अभ्यास.
    नारा पार्क व क्योटो (किंकाकुजी) येथे सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा संवर्धनाची पाहणी.
    ओसाका किल्ला व शिंबाशी येथे शहरी प्रशासनाशी संबंधित चर्चासत्रे.
    शिराहामा येथील कचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प भेट.
    स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी व जपानमधील तज्ञांशी चर्चा.

    चंद्रपूर शहराला होणारा फायदा –

    या परदेशी अभ्यासदौऱ्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त व उपआयुक्तांना जपानमधील अत्याधुनिक शहरी विकास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तेथील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून चंद्रपूर शहरात स्वच्छता व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि नागरिकाभिमुख सेवांच्या उन्नतीसाठी त्याचा थेट उपयोग होईल.

    या अभ्यासदौऱ्यामुळे चंद्रपूर शहराचा शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांच्या जीवनमान उन्नतीसाठी सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

  • Controversial Amma Chowk monument removed । वादग्रस्त अम्मा चौक स्मारक हटविले, चंद्रपूर मनपाची कारवाई

    Controversial Amma Chowk monument removed

    Controversial Amma Chowk monument removed : चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक गांधी चौक परिसरातील वादग्रस्त अम्मा चौक स्मारक अखेर हटविण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

    खड्ड्याविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन

    पुरातत्व स्थळांच्या नियमांचे उल्लंघन

    गांधी चौक ते महानगर पालिकेच्या नेताजी भवनच्या मागील भागात महादेव मंदिर आहे. ते भारत सरकारद्वारे ११ एप्रिल १९२५ रोजी केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्राचीन स्मारके व पुरातत्त्व स्थळे अधिनियम १९५८ नुसार या परिसरातील १०० मीटरच्या आत कोणतेही नवीन बांधकाम किंवा अतिक्रमण करण्यास सक्त मनाई आहे. तरीदेखील चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून परवानगी न घेता पोलिस ठाणे आणि नेताजी भवनच्या मधोमध अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.


    या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर पुरातत्त्व विभागाने महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसे न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. अखेर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवून परिसर मुक्त केला. Amma Chowk controversy Chandrapur heritage violation

    या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस कमिटीने सांगितले की, गांधी चौक परिसराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. नियम मोडून उभारलेले स्मारक हा कायद्याचा अवमान होता. भविष्यात असा प्रकार घडू नये, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे.

  • Chandrapur dengue container survey । चंद्रपूर डेंग्यू सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष – ५% घरे दुषित!

    Chandrapur dengue container survey

    Chandrapur dengue container survey : चंद्रपूर 12 ऑगस्ट – कंटेनर सर्वे मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व घरांच्या तपासणीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असुन यात 5 टक्के घरे दुषित आढळली आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा 250 घरांची दररोज तपासणी केली जात असुन दुसऱ्या तपासणीत जर पुन्हा तीच घरे दुषित आढळली तर त्यांना नोटीस देऊन दंडीत केले जाणार आहे.  

    चंद्रपुरात भव्य दही हंडी उत्सव

    १७० आशा वर्कर चा सहभाग

    डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. 2 वर्षांपुर्वी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत डेंग्युचे 265 रुग्ण मनपा हद्दीत आढळुन आले होते. मागील वर्षी ही संख्या अत्यंत कमी होती, मात्र ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते त्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. नयना उत्तरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात या मोहिमेत मनपाने नेमलेले 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु व 170 आशा वर्कर प्रत्यक्ष सहभागी आहे तसेच स्वच्छता निरीक्षक यांचाही सहभाग आहे. Chandrapur dengue breeding


       संततधार पावसाने मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

  • Chandrapur fire safety compliance guidelines । फायर ऑडिट न केल्यास मोठी कारवाई – चंद्रपूर पालिकेचा इशारा!, 1200 आस्थापनांना नोटीस

    Chandrapur fire safety compliance guidelines

    Chandrapur fire safety compliance guidelines : चंद्रपूर 12 ऑगस्ट – शहरातील मोठ्या इमारती, मॉल, दवाखाने, हॉटेल यांना शासनाच्या अन्य परवानगीसह अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. अग्निशमन यंत्रणेद्वारे मालमत्ता व जीवित हानी टाळता येते,मात्र शहरातील अनेक आस्थापना अश्या गंभीर बाबीकडे कानाडोळा करत असल्याने मनपाद्वारे नोटीस देण्याची कारवाई सुरु असुन आतापर्यंत 1200 आस्थापनांना अग्निशमन विभागातर्फे नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.    

    अम्मा चौक चे बांधकाम पाडणार

       महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंधक कायदा 2006 व 2009 तरतुदीनुसार आग लागू नये, यासाठीची उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनेच्या  मालकाची आहे. दर 6 महिन्यांनी त्याने ‘फायर ऑडिट’ करणे सुद्धा आवश्यक आहे. फायर सेफ्टी ॲक्ट नुसार ज्या इमारतींची उंची 15 मीटर अथवा त्याच्यापेक्षा जास्त उंच आहे तसेच ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम 150 चौ. मी. पेक्षा अधिक आहे अशा सर्व इमारतींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. यात मोठ्या संख्येने नागरिक जमा होण्याची शक्यता असलेले तारांकित हॉटेल्स, लॉजिंग व बोर्डिंग, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, नाट्यगृह, प्रदर्शन सभागृह, एलपीजी गोडावून, फटाका शॉप, बहुमजली इमारती, रुग्णालये इत्यादींचा समावेश आहे.

    चंद्रपुरात आतापर्यंत आगीच्या २५ घटना

       शहरात एप्रिल 2024 पासुन ते आतापर्यंत व्यावसायिक आस्थापनांना आग लागण्याच्या 25 घटना घडलेल्या आहेत. यात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र यापुढेही होवू नये यासाठी अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. मागील वर्षी एकुण 33 आस्थापनांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते यापैकी 26 ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले. तर 2025-26 या आर्थिक वर्षात 458 आस्थापनांना अग्निशमन यंत्रणा बसवुन पालिकेकडून प्रमाणपत्र घेण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तपासणीत अग्निशमन यंत्रणा आढळून न आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.सदर प्रमाणपत्र हे ऑनलाईन घेता येणार असुन यासाठी rts.cmcchandrapur.com या वेबसाईट नोंदणी करून अर्ज करता येतो. how to apply fire noc in Chandrapur municipal corporation


    ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध – नियमानुसार, ना हरकत प्रमाणपत्र अग्निशमन विभागातून त्याच अधिकृत एजन्सीद्वारे मिळते.  

     “शहरातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा अद्याप बसविण्यात आलेली नाही, त्या ठिकाणी तातडीने उपकरणांची स्थापना होण्यासाठी आम्ही संबंधित मालक व संस्थांशी सातत्याने संपर्क साधत आहोत.” – आयुक्त विपीन पालीवाल. Chandrapur fire audit certificate requirements

  • Amma Chowk memorial violation | अनधिकृत अम्मा चौक स्मारक बांधकामांवर कारवाईचे निर्देश

    Amma Chowk memorial violation

    Amma Chowk memorial violation : चंद्रपूर : चंद्रपूर येथील महादेव मंदिर (मुळशीगोदाम) हे भारत सरकारद्वारे 11 एप्रिल 1925 रोजीच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, या मंदिराच्या परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून अम्मा चौक स्मारकासाठी अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली होती. या अनुषंगाने, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

    चंद्रपुरात 18 वर्षीय मुलाची मफेड्रोन पावडर ची वाहतूक

    नोटीसनुसार, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम 1958 नुसार (Act 24 of 1958) या संरक्षित स्मारकाच्या 100 मीटरच्या परिसरात अनधिकृत बांधकाम, उत्खनन किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम (निर्माण) किंवा नूतनीकरण करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि/किंवा 1,00,000/- (एक लाख) रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

    7 दिवसाच्या आत अतिक्रमण हटवा


    या प्रकरणी, भारत सरकारने, पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, चंद्रपूर यांना, अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना, बांधकामाची प्रक्रिया थांबवून ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, जर ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवले नाही, तर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते हटवण्यात येईल आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. Amma Chowk controversy


    या नोटीसमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जर संरक्षित स्मारकाच्या परिसरात कोणत्याही बांधकामाची दुरुस्ती (Repairs) करायची असेल, तर त्यासाठी सक्षम प्राधिकारी (Competent Authority) यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.


    या नोटीसमुळे, स्थानिक प्रशासनाने महादेव मंदिराच्या संरक्षित परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • ramala lake floating cleaning machine । चंद्रपूरच्या हृदयात जलक्रांती, रामाळा तलाव स्वच्छता मोहिमेला गती, तलाव संवर्धनासाठी आ. किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न

    ramala lake floating cleaning machine

    ramala lake floating cleaning machine : चंद्रपूर – रामाळा तलाव सौदर्यीकण आणि संरक्षण यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधीतून घेण्यात आलेल्या तरंगत्या यंत्राच्या माध्यमातून रामाळा तलाव स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. सदर कामाची आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत अधिका-यांना सुचना केल्या आहे. सदर मशीनरी रामाळा तलाव स्वच्छतेत उपयुक्त ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    यावेळी उपायुक्त चिद्रावार, यांत्रिकी सहायक अभियंता चोरे, पाण्यापूरवठा कनिष्ठ अभियंता चोरे, महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, विधानसभा प्रमुख दशरथ ठाकूर, महामंत्री रवी गुरुनूले, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, संजीव सिंग, राकेश बोमनवार, तेजा सिंग, सुबोध चिकटे, नितेश गवळी, आदींची उपस्थिती होती.

    चंद्रपूर जिल्हाधिकारी व सीईओ यांनी केला अवयवदानाचा निर्णय

    आ. किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक व निसर्गरम्य रामाळा तलावाची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. अनेक वर्षांपासून तलावाच्या पृष्ठभागावर पसरलेल्या इकोर्निया या जलवनस्पतींमुळे तलावातील पाण्याचा प्रवाह, जलजीवन व सौंदर्य या तिन्ही गोष्टींवर प्रतिकूल परिणाम होत होता. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून आता विशेष यांत्रिक साधनांची मदत घेतली जात आहे. automatic lake cleaning machine

    स्वच्छतेचे प्रमाण व गती दोन्ही वाढणार

    आमदार किशोर जोरगेवार यांनी मंजूर केलेल्या निधीतून महानगरपालिकेच्या वतीने आणण्यात आलेल्या या अत्याधुनिक यांत्राद्र्वारे  ईकोर्निया वनस्पतींचे मोठ्या प्रमाणावर उच्चाटन सुरू आहे. मशीन पाण्यात तरंगत राहून थेट पृष्ठभागावरील व मुळांसकट वनस्पती गोळा करून बाहेर काढते. यामुळे स्वच्छतेचे प्रमाण व गती दोन्ही वाढले असून, अल्पावधीतच तलाव वनस्पतीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

    आज आमदार किशोर जोरगेवार यांनी रामाळा तलावावर भेट देऊन सुरू असलेल्या कामाची सखोल पाहणी केली. मशीनरीची कार्यपद्धती, कामाचा वेग आणि स्वच्छतेचा परिणाम याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.

    यावेळी ते म्हणाले, रामाळा तलाव हे फक्त जलस्रोत नसून चंद्रपूर शहराची ओळख आहे. या तलावाचे संरक्षण, संवर्धन आणि सौंदर्यवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छतेनंतरही सातत्याने देखभाल केली तरच हे कार्य दीर्घकाळ टिकेल असे ते म्हणाले. आ. जोरगेवार यांनी काम अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी तसेच साफ केलेल्या वनस्पतींचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या मोहिमेमुळे तलावातील पाणी प्रवाह सुधारेल, ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल, पाण्यातील जैवविविधतेला चालना मिळेल आणि तलाव परिसर पुन्हा एकदा नागरिकांसाठी स्वच्छ, निसर्गरम्य ठिकाण म्हणून उजळून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. Ramala Lake beauty conservation project

  • paver block theft FIR Chandrapur । कोहिनूर तलावात पेव्हर्स चोरी प्रकरणी दंडात्मक कारवाई सह गुन्हा दाखल होणार

    paver block theft FIR Chandrapur

    paver block theft FIR Chandrapur : चंद्रपूर : कोहिनूर ग्राउंडवर नागरिकांच्या सुविधेसाठी बसविण्यात आलेल्या ट्रेकिंग व वॉकिंग ट्रॅकवरील पेव्हर्स अर्बन एनवायरो कंपनीने चोरून स्वतःच्या कामात वापरले, तसेच माता महाकाली महोत्सवासाठी वापरण्यात आलेली गिट्टी सुद्धा बेकायदेशीररीत्या तिथून चोरून नेली, असा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. kohinoor lake pavers theft case Chandrapur

    चंद्रपूर शासकीय आयटीआय मध्ये शिकाऊ उमेदवार रोजगार मेळावा

    या संदर्भात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी सर्व पुराव्यासकट तक्रार चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल केली होती. तक्रारीनंतर महानगरपालिकेने विशेष चौकशी समिती नेमून तपास केला असता कंपनी दोषी आढळली.

    जवळपास ९ लाखांचा दंड

    त्यानुसार, अर्बन एनवायरो कंपनीवर रु. ८,८९,०००/- पेक्षा अधिक दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीने सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून तिच्यावर तात्काळ एफ.आय.आर. दाखल करण्याची मागणी केली आहे.

    राजू कुडे यांनी स्पष्ट केले की, “जनतेच्या पैशांचा अपव्यय व सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणाऱ्या कंपन्यांना केवळ दंड नव्हे तर कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी आम आदमी पार्टी शेवटपर्यंत लढणार आहे.”

    आम आदमी पार्टीने शहरातील अशा प्रकारच्या भ्रष्टाचार व बेकायदेशीर कृत्यांवर कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.