Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025 । चंद्रपूरमध्ये गरजूंना मिळणार पक्कं घर!, रमाई आवास योजना’साठी अर्ज सुरू!

    Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025

    Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025 : चंद्रपूर 1 ऑगस्ट –  चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील गरजू नागरी लाभार्थ्यांसाठी “रमाई आवास घरकुल योजना (शहरी)” राबविली आत असून या अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी 2 लक्ष 50 हजार (बीपीएल)  तसेच 2 लक्ष 25 हजार (बीपीएल) इतके आर्थिक अनुदान दिले जाणार आहे.

    चंद्रपुरात गुंतवणुकीच्या नावावर फसवणूक

      सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या या  घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या  ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात येते. Urban Gharkul Yojana eligibility and documents

    लाभार्थी पात्रता –

    • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
    • अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे.
    • अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा.
    • घरकुल बांधकाम महानगरपालिका क्षेत्रात 2 लक्ष 50 हजार रुपयेच्या मर्यादेत करणे आवश्यक आहे.
    • वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखांपेक्षा जास्त नसावी.
    • घराचे बांधकाम चटई क्षेत्र 269 चौ. फूट राहील.
    • घराच्या बांधकामाच्या खर्चामध्ये मनपा हिस्सा १० टक्के राहील. दारिद्रयरेषेखालिल कुटुंबासाठी लाभार्थी हिस्सा भरण्याची आवश्यकता नाही.
    • अर्जदाराने यापूर्वी घरकुलासंबंधी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

    आवश्यक कागदपत्रे:

    • जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट)
    • उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा चालू वर्षाचा) –सत्य प्रत
    • रेशनकार्ड
    • घरटॅक्स पावती (चालू वर्षाची)
    • मतदान ओळखपत्र (व्होटर कार्ड)
    • दारिद्र्य रेषेखालील दाखला (असल्यास)
    • रहिवासी दाखला १५ वर्षांचा (तहसीलदार यांचा )
    • अर्जदारासोबतचा कच्चे घर/झोपडी/खुल्या भूखंडाचा फोटो (सद्यस्थितीतील)
    • अर्जदार पती/पत्नी यांचे पासपोर्ट फोटो
    • इलेक्ट्रिक बिल
    • दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रातील नमुद कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तीने घरकुलाचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र (रु. 100/- चा स्टॅम्प पेपरवरील नोटरी करणे)


    अर्ज प्रक्रिया:
    सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या घरकुल विभागाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा.
    अधिक माहितीसाठी संपर्क:
    घरकुल विभाग,सात मजली इमारत,प्रथम माळा,चंद्रपूर शहर महानगरपालिका.

  • Amma Chowk controversy । चंद्रपुरात “अम्मा’ वरून नवा वाद, कांग्रेसचे मनपाला निवेदन

    Amma Chowk controversy

    Amma Chowk controversy : चंद्रपूर | शहर पोलीस स्टेशन आणि सात मजली इमारत यांच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अचानक एका पुतळ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ही जागा सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असतानाही कोणतीही पूर्वसूचना अथवा परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

    चंद्रपुरात गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधींची फसवणूक

    या अनधिकृत कामाचा तीव्र निषेध करत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी हे बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणी केली. त्यांनी या संदर्भात महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांना निवेदन सादर करून सदर बांधकामास त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली आहे. Congress complaint to municipal commissioner

    congress complaint to municipal commissioner

    ओळख पुसण्याचा डाव

    चंद्रपूर शहरातील सात मजलीसमोरील फुटपाथ वर स्व. गंगुबाई जोरगेवार (अम्मा) टोपल्या विकायला बसायच्या. त्या सदर जागेला परिसराला “अम्मा चौक” असे नांव देण्याबाबत मनपा प्रशासकाने मान्यता प्रदान केली. चंद्रपूर शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक, समाजसेवक, माजी लोकप्रतिनिधी यांच्या कार्याची आठवण ठेवून मनपाने कधीच स्मारक बनण्याचा विचार केला नाही. मात्र एखादी महिला त्या ठिकाणी टोपल्या विकत होती म्हणून त्या परिसराला त्यांचे नाव देणे कितपत योग्य आहे. हा संपूर्ण परिसर गांधी चौक म्हणून ओळखला जातो मात्र ही ओळख पुसण्याचा डाव आखण्यात देत आहे, असा आरोप तिवारी यांनी केला. 


    तिवारी यांनी सांगितले की, हा परिसर पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली येतो. त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणे कायद्याच्या विरोधात आहे. अशा प्रकारची कारवाई केल्यास शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला धोका पोहोचू शकतो. महानगरपालिकेने या प्रकरणी तातडीने खुलासा करावा आणि संबंधित काम थांबविण्याची कारवाई करावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.

  • Vasundhara campaign tree planting । 💚 चंद्रपूर मनपाच्या वसुंधरा अभियानातून हरित क्रांतीची नांदी सुरू!

    Vasundhara campaign tree planting

    Vasundhara campaign tree planting : चंद्रपूर २३ जुलै – चंद्रपूर महानगरपालिके मार्फत पठाणपुरा गेट बाहेरील जमनजट्टी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता आयुक्त विपीन पालीवाल यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. याप्रसंगी रोपट्यांची लागवड करण्यात आली.

    केंद्र सरकारने केली जनतेची दिशाभूल, खासदार धानोरकर यांचा आरोप

      शासनातर्फे “एक पेड माँ के नाम 2.0” तसेच “माझी वसुंधरा” अभियान राबविले जात आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि हरित आवरणात वाढ करून भावी पिढ्यांसाठी सुदृढ पर्यावरणाची जपणूक करणे आहे.उपरोक्त उपक्रमाअंतर्गत महापालिका प्रशासन, अधिकारी, नागरिक, स्वयंसेवी संस्था व विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभागाने वृक्षारोपण केले जाणार आहे. राष्ट्रीय मोहिमांच्या अनुषंगाने मनपातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जात असून जनजागृतीसह प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात येत आहे.

      एक विद्यार्थी एक वृक्ष अभियान

    याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी उपस्थितांना झाडे जगवण्याची जबाबदार ही परिसरातील नागरिकांची असल्याचे सांगितले.यापूर्वी बल्लारपूर रोडवर लावलेली झाडे नागरिकांच्या सहकार्याने जगली आहेत. शहराला जवळपास २ लक्ष वृक्षांची आवश्यकता आहे,यातील ५० हजार वृक्ष लावण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे. एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांकरिता मनपा राबवित असुन या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे. Ek Ped Maa Ke Naam 2.0 plantation drive

             
      कार्यक्रमात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,उपअभियंता रवींद्र कळंबे,चैतन्य चोरे,हुज्जाज ए इकरा मल्टिपर्पज सोसायटी,इको प्रो संस्था तसेच मनपा अधिकारी कर्मचारी व इतर सामाजिक संस्थेची प्रतिनिधी उपस्थीत होते.

  • Nomadic Pardhi tribal children vaccination । लसीकरणाच्या विरोधात उभा समाज… पण आरोग्य यंत्रणेनं जिंकला विश्वास!

    Nomadic Pardhi tribal children vaccination

    Nomadic Pardhi tribal children vaccination : चंद्रपूर 22 जुलै – शिवमंदिर परिसर, अष्टभुजा वार्ड येथे झोपडी उभारून अगदी काही काळ वास्तव्यास असणाऱ्या, भटकी पारधी जमातीतील लसीकरणापासुन वंचित असलेल्या बालकांचे चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत लसीकरण करण्यात आले. लसीकरणाबाबत असलेला त्यांचा विरोध व गैरसमज दूर करतांना आलेल्या अडचणींचा सामना करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपची सत्ता, शिंदेने कांग्रेसला केले गारद

      या समाजामध्ये लसीकरणाबाबत भीती होती की, “बाळ लसीकरण केल्यावर आजारी पडते,” म्हणून अनेक कुटुंबे लसीकरण टाळत होती. आरोग्य विभागामार्फत याआधी दोनदा प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या, मात्र संबंधित कुटुंबे घरी न सापडल्यामुळे प्रयत्न अपूर्ण राहिले. Chandrapur temporary shelter vaccination

      त्यामुळे मंगळवार 22 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता, आरोग्य विभागाच्या टीमने तात्काळ भेट देत, त्या ठिकाणी वसलेल्या 40-42 तात्पुरत्या झोपड्यांमध्ये जाऊन जनजागृती केली. प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधून, लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांच्या भीतीचे निरसन करण्यात आले. त्यानंतर लगेचच सुटलेली बालके ओळखून त्यांचे लसीकरण करण्यात आले.


       प्रतिकूल परिस्थितीत, समज-गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर योग्य समुपदेशनाद्वारे सकारात्मक बदल घडविणे हे आरोग्य यंत्रणेच्या तातडीच्या, सहानुभूतीपूर्ण आणि चिकाटीच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले.आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, लसीकरण क्षेत्र निरीक्षक सारिका गेडाम व बगडखिडकी येथील शहरी प्राथमीक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांद्वारे सदर मोहीम राबविण्यात आली.  

    आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र

    “हे काम म्हणजे आरोग्य यंत्रणेसाठी तारेवरच्या कसरतीसारखे होते. समाजाच्या विश्वासास पात्र ठरत, योग्य समुपदेशनाने लसीकरणासारखा संवेदनशील मुद्दा  सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्येही स्वीकारला गेला त्याबद्दल आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत ” – आयुक्त विपीन पालीवाल

  • Illegal construction action in Chandrapur city । 🏛️ अवैध बांधकामांवर ‘ऑनलाइन तक्रार’ करा, चंद्रपूर मनपाची थेट कारवाई सुरू!

    Illegal construction action in Chandrapur city

    Illegal construction action in Chandrapur city : चंद्रपूर 22 जुलै (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी झोन निहाय टीम नियुक्त करण्यात आली असुन प्रत्येक वॉर्डमध्ये सुरु असलेल्या अथवा सुरु होणाऱ्या सर्व अवैध बांधकाम तपासणी सदर टीमद्वारे केली जाणार आहे.

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवशी अनोखे आंदोलन

      चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात परवानगीविना वाढणाऱ्या अवैध बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने झोन निहाय स्वतंत्र तपासणी पथकांची स्थापना केली आहे. ही पथके त्यांच्या झोनमधील प्रत्येक वॉर्डामध्ये नियमितपणे दौरे करत असून सुरु असलेल्या किंवा नव्याने सुरु होणाऱ्या बांधकामांची तपासणी करीत आहेत. Flood zone construction regulations

    अतिक्रमण धारकांनी अडथळा आणल्यास गुन्हा दाखल होणार

       अवैध बांधकाम हटविण्यासाठी कारवाई दरम्यान अवैध बांधकाम करणाऱ्यांना प्रथम नोटीस बजावण्यात येऊन अतिक्रमण काढण्यास ठराविक कालावधी दिला जातो. यानंतरही अतिक्रमण वा अवैध बांधकाम स्वतः हुन न हटविल्यास मनपातर्फे कारवाई केली जाते.कारवाई दरम्यान दबाव आणण्याचा प्रकार अतिक्रमण धारकांकडुन झाल्यास शासकीय सेवकाला कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याप्रकरणी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच कारवाईचा प्रत्यक्ष खर्च, दंड व प्रशासकीय शुल्क संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

    अतिक्रमण काढा, न्यायालयाचे निर्देश

       पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम व्हायला नको, नदी किनारी असलेली बांधकामे, अतिक्रमणे, नदीपात्रातील काँक्रीटीकरण यामुळेे पुराची पातळी वाढत जाण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मा.हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने पूररेषेतील अतिक्रमणे काढण्यात यावी असे निर्देश मा.न्यायालयाने दिलेले आहेत. Action against unauthorized buildings near rivers


       शहरातील एखादे अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित अधिकारी सरसावले की, विविध मार्गातुन त्याला विरोध केला जातो यामुळे शहरातील अवैध बांधकाम व अतिक्रमणात मोठय़ा प्रमाणात वाढ होते. अतिक्रमण तसेच अवैध बांधकामाविरुद्ध आलेल्या तक्रारी मग त्या ऑनलाईन आलेल्या व प्रत्यक्ष कार्यालयात प्राप्त झालेल्या असो त्याच शहनिशा करून त्या तात्काळ मार्गी लावण्याचे तसेच कुठल्याही स्वरूपाच्या दबावाला झुगारून कार्य करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.    


         कुठलेही बांधकाम हे परवानगी घेऊनच करावे,बांधकाम परवानगी घेतली नसल्यास त्वरीत ऑनलाईन mahavastu.maharashtra.gov.in” या संकेत स्थळावर सादर करावी. तसेच किल्यालगत 100 मीटर परिसरात, नझूल परिसर,ब्लू लाईन परिसरात कुठलेही बांधकाम न करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. 

  • student safety through cctv in municipal schools । 🎥 चंद्रपूर मनपा शाळांमध्ये कॅमेऱ्यांचं नेटवर्क! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

    student safety through cctv in municipal schools

    student safety through cctv in municipal schools : चंद्रपूर 21 जुलै : चंद्रपूर महानगरपालिका शाळांमधील बालसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने आता शाळांना सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच दिले असुन 24 शाळांमध्ये एकुण 256 सीसीटीव्ही कॅमेरे विद्युत विभागामार्फत बसविण्यात आले आहेत.

    शिका व कमवा, चंद्रपूर जिल्हा परिषदेची भन्नाट योजना

       चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकुण 26 शाळा आहेत. या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आयुक्त व प्रशासक विपीन पालीवाल यांनी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता महापालिकांच्या 26 पैकी 24 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने बसविले गेले असुन उर्वरीत 2 शाळांमध्ये लवकरच बसविले जाणार आहेत. chandrapur municipal school cctv


       बदलापूर येथील शाळेत घडलेल्या प्रकारानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच शाळेत सीसीटीव्हींचे जाळे नसल्याचा मुद्दा देखील चर्चेला आला होता. महापालिकेच्या 21 इमारतींमध्ये 24 प्राथमिक आणि 2 माध्यमिक अशा एकूण 26 शाळा असून त्याठिकाणी 4333 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानुसार आता या विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवला जाणार आहे.


        शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत चुकीच्या घटना घडु नये याकरीता राज्य सरकारने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार महापालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत व या कॅमेऱ्यांचे नियंत्रण हे शाळेतील मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवले आहे.

    याठिकाणी बसविले गेले आहेत कॅमेरे –

    शाळांच्या येण्या जाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच, वर्गखोलीत तसेच शौचालयाच्या परिसरात बाहेरील ठिकाणी, मैदान, वंराडा, पॅसेज, जिन्यावर याशिवाय इतर महत्वांच्या ठिकाणी कॅमेरे बसविले गेले असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.    

  • chandrapur swachh survekshan 2024 ranking । 🌟 “३ स्टारचा मान, २१ वा क्रमांक! चंद्रपूरनं देशात स्वच्छतेचा इतिहास रचला!”

    chandrapur swachh survekshan 2024 ranking

    chandrapur swachh survekshan 2024 ranking : चंद्रपूर १९ जुलै – स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये चंद्रपूर शहराने देशात २१ वा क्रमांक प्राप्त केला आहे. यासोबतच चंद्रपूर शहराला स्वच्छतेसाठी ३ स्टार सिटी म्हणून गौरविण्यात आले आहे.

    rto चेकपोस्टवर काय घडलं? मयूर राईकवार ने सांगितला किस्सा

       स्वच्छतेविषयक अहवालानुसार, चंद्रपूर महानगरपालिकेने डोअर टू डोअर (घरपोच) कचरा संकलन ९३% प्रमाणात यशस्वीरीत्या राबवले जात आहे. तसेच ७६% नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा करतात, हे ही एक महत्त्वाचे पाऊल आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते आणि शहराने ओपन डिफेकेशन फ्री (ODF++) दर्जा कायम राखलेला आहे.

    चंद्रपूर देशातील टॉप १० शहरांमध्ये स्थान मिळणार

    मागील वर्षी चंद्रपूर शहराला देशात ४८ वा क्रमांक प्राप्त झाला होता. यंदा घनकचरा संकलन, प्रक्रिया केंद्रांची गुणवत्ता व नागरिकांचा स्वच्छतेतील सहभाग वाढल्यामुळेच आपण २१व्या क्रमांकावर पोहोचलो. आगामी काळात सीवरेज प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर देशातील टॉप १० शहरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास आहे – आयुक्त विपीन पालीवाल 

  • illegal use of tullu pump for water supply । 🔥 “नळजोडणी, टिल्लू पंप आणि काळी यादी! चंद्रपूर महापालिकेचा कडक इशारा!”

    illegal use of tullu pump for water supply

    illegal use of tullu pump for water supply : चंद्रपूर 17 जुलै – नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या 28 नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे. दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे.

    चंद्रपूर मनपाच्या इमारतीवर सोलर, वीज बिल शून्य, वाचा ग्रीन गोष्ट

       चंद्रपूर मनपा पाणीपुरवठा विभागाने अभियंत्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात प्रत्येकी 7 कर्मचाऱ्यांच्या 3 टीम बनविल्या असुन या टीमद्वारे सलग 4 दिवस कारवाई करून सिस्टर कॉलनी परिसरातील ज्ञानेश्वर चिमुरकर,विजय कांबळे,जमुनादास मुन,भाऊराव बेंदले यांच्या घरून 4,तुकूम मातोश्री शाळा परिसरातील रविन्द्र हजारे,जमीर खान,तिवारी,झाडे,वांढरे यांच्या इथे 5,सिस्टर कॉलनीतील सोनकुसरे,पाटील,देविदास उपरे,सिध्दीकी,चिवंडे यांच्या घरून 5, समाधी वार्ड येथील वसंत झाडे, राजु हिवरे,राजेन्द्र टिपले,राजु वानखेडे येथील 6,उत्तम नगर येथील चंदन पाल,हेमराज धात्रक,बबन नवघरे,नाग बिश्वास यांच्या घरून 8 असे एकुण 28 टिल्लू पंप जप्त केले आहेत.

    जलमापक काढत पाण्याचा उपसा

       मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. कारवाई दरम्यान सदर नळधारकांद्वारे नळ जोडणीवर लावलेले जलमापक (मीटर) काढुन टाकणे तसेच टिल्लू पंप लावुन पाण्याचा अनावश्यक उपसा केला जात असल्याचे मनपा पथकास पाहणी दरम्यान आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.  municipal crackdown on illegal water connections

    नळाचे देयके कमी करण्यासाठी जलमापकाचा पाईप काढणे सुरु

         सर्व नळ जोडणींवर मनपाद्वारे मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.  tampering water meter


          त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असुन नळावरील मीटर काढल्यास अथवा विद्युत पंप/ टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास मनपाच्या जप्ती पथकांद्वारे कारवाई केली जात आहे.

  • rooftop solar projects in municipal buildings । 💡 “वीजबिल शून्यावर? चंद्रपूर महापालिकेच्या सोलर प्लॅनची ग्रीन गोष्ट!”

    rooftop solar projects in municipal buildings

    rooftop solar projects in municipal buildings : चंद्रपूर,16 जुलै: चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळा आणि विविध कार्यालयीन इमारतींसह एकूण 45 इमारतींवर रूफटॉप सोलर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहेत. विद्युत विभागाच्या पुढाकाराने ही प्रणाली सुरू करण्यात आली असून, 399 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांद्वारे महापालिकेला वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. यामुळे पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर सुनिश्चित होत असून, शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

    महसूल विभागात असंख्य पदे रिक्त, शासनाचे दुर्लक्ष, खासदार धानोरकरांचा संतप्त सवाल

       महापालिकेची मुख्य इमारत, झोन कार्यालये, करसंकलन केंद्रे, संगणक कक्ष तसेच नागरिकांना सेवा पुरवणारी यंत्रणा – जसे की सीसीटीव्ही, वायफाय झोन, डिजिटल साईनबोर्ड, स्मार्ट मीटरिंग इत्यादीसाठी आवश्यक वीज आता स्वच्छ सौर ऊर्जेतून मिळत आहे. अमृत 2.0 योजनेअंतर्गत, तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर 600 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या केंद्रामार्फत शहरासाठी पिण्याचे पाणी शुद्ध करून घरोघरी पोहोचवले जाते. वीजेच्या प्रचंड गरजेमुळे हे केंद्र अखंड सुरू असते, आणि यामुळे सौर ऊर्जेचा वापर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. savings from solar energy in urban governance


       भविष्यात मनपाच्या इतर इमारतींवरही अशाच सौर ऊर्जा प्रणाली उभारण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे. सौर ऊर्जा ही स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक ऊर्जा असून, ती कार्बन उत्सर्जन कमी करते आणि ऊर्जा सुरक्षेत भर घालते. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका हरित ऊर्जा उपक्रमांची कास धरून इतरही उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे.

    वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी

       “सौर प्रणालीमुळे कार्यालयीन यंत्रणा अखंड कार्यरत राहतात आणि महापालिकेचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो आहे. सध्या 399  किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प सुरू असून, त्यातून नेमकी किती बचत होते हे लवकरच विश्लेषण करून जाहीर करण्यात येईल” – प्रगती भुरे,उपअभियंता,विद्युत विभाग,चंद्रपूर महानगरपालिका

  • cmc chandrapur fire noc procedure । चंद्रपूर मनपाकडून 458 आस्थापनांना नोटीस! फायर सेफ्टी सर्टिफिकेट अनिवार्य

    cmc chandrapur fire noc procedure

    cmc chandrapur fire noc procedure : चंद्रपूर 15 जुलै –  शहरातील मोठ्या इमारती, मॉल, दवाखाने, हॉटेल यांना शासनाच्या अन्य परवानगीसह अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. अग्निशमन यंत्रणेद्वारे मालमत्ता व जीवित हानी टाळता येते,मात्र शहरातील अनेक आस्थापना अश्या गंभीर बाबीकडे कानाडोळा करत असल्याने मनपाद्वारे अश्या आस्थापनांवर कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. building fire audit requirements

    चंद्रपूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भाजपमध्ये

        महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंधक कायदा 2006 व 2009 तरतुदीनुसार आग लागू नये, यासाठीची उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनेच्या  मालकाची आहे. दर 6 महिन्यांनी त्याने ‘फायर ऑडिट’ करणे सुद्धा आवश्यक आहे. फापर सेफ्टी अॅक्टनुसार ज्या इमारतींची उंची 15 मीटर अथवा त्याच्यापेक्षा जास्त उंच आहे तसेच ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम 150 चौ. मी. पेक्षा अधिक आहे अशा सर्व इमारतींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. यात मोठ्या संख्येने नागरिक जमा होण्याची शक्यता असलेले तारांकित हॉटेल्स, लॉजिंग व बोर्डिंग, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, नाट्यगृह, प्रदर्शन सभागृह, एलपीजी गोडावून, फटाका शॉप, बहुमजली इमारती, रुग्णालये इत्यादींचा समावेश आहे. fire safety for high rise buildings


       शहरात एप्रिल 2024 पासुन ते आतापर्यंत व्यावसायिक आस्थापनांना आग लागण्याच्या 25 घटना घडलेल्या आहेत. यात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र यापुढेही होवू नये यासाठी अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. मागील वर्षी एकुण 33 आस्थापनांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते यापैकी 26 ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले. तर 2025-26 या आर्थिक वर्षात 458 आस्थापनांना अग्निशमन यंत्रणा बसवुन पालिकेकडून प्रमाणपत्र घेण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तपासणीत अग्निशमन यंत्रणा आढळून न आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.    

    ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध –

    सदर प्रमाणपत्र हे ऑनलाईन घेता येणार असुन यासाठी rts.cmcchandrapur.com या वेबसाईट नोंदणी करून अर्ज करता येतो. नियमानुसार, ना हरकत प्रमाणपत्र अग्निशमन विभागातून त्याच अधिकृत एजन्सीद्वारे मिळते. online fire noc registration portal chandrapur

    आवश्यक कागदपत्रे –
    अर्ज ‘अ’ करीता

    1) अर्ज
    2) मालकी हक्काचे पुरावे
    3) बांधकाम नकाशा
    4) अग्नि सुरक्षा यंत्रणेचे तपशील
    5) बांधकाम परवानगी
    6) स्ट्रक्चर सेफ्टी सर्टिफिकेट
    7) एजन्सी धारकाचे समती पत्र
    8) घर टॅक्स पावती चालू वर्षाची
    9) नळ  टॅक्स पावती चालू वर्षाची


    अर्ज ‘ब’ करीता
    1) अर्ज
    2) मालकी हक्काचे पुरावे
    3) अग्नि सुरक्षा यंत्रणेचे तपशील
    4) स्ट्रक्चर सेफ्टी सर्टिफिकेट
    5) एजन्सी धारकाचे समती पत्र
    6) घर टॅक्स पावती चालू वर्षाची
    7) नळ  टॅक्स पावती चालू वर्षाची

    रुग्णालये, मॉल, चित्रपटगृहे, बहुमजली इमारत आदी ठिकाणी अग्निशामक यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राथमिक स्वरुपातील आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. लहान दवाखाने, दुकाने, कार्यालये यांनीही फायर सिलिंडर वापरणे गरजेचे आहे.प्रमाणपत्र घेण्यास मनपाकडून अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे – राहुल पंचबुद्धे ,प्रभारी अग्निशमन विभाग प्रमुख, चंद्रपूर महानगरपालिका