Tree plantation drive on Fadnavis birthday । 🌳 “फडणवीसांच्या वाढदिवशी अनोखे आंदोलन – 100 झाडांनी भरले रामबाग मैदान!”

Tree plantation drive on Fadnavis birthday

Tree plantation drive on Fadnavis birthday : चंद्रपूर – शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच बस स्थानक व रेल्वे स्थानकापासून अत्यंत जवळ असलेल्या जि.प.च्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी 2 एकर जागा उपलब्ध असतांना प्रशासनाने रामबाग मैदानावर नविन इमारत बांधण्याचा अट्टाहास करणे, पहिल्यांदा मैदानावर खड्डा व दुसऱ्यांदा 100 वृक्षांची कत्तल केल्यानंतर इमारतीची जागा बदलवणे,प्रशासनाचे हे नियोजन समजण्या पलीकडचे आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वेळेवर जागे झालो असतो तर कदाचित रामबागवर खड्डा व वृक्षतोड झाली नसती. त्यामुळे रामबाग मैदानावर खड्डा व वृक्षतोड होणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींचे सामूहिक अपयश आहे,अशी भूमिका रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी व्यक्त केली.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपची सत्ता, रविंद्र शिंदे नवे अध्यक्ष

रामबाग मैदानावर झालेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज 22 जुलै रोजी सकाळी 8 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ‘शतायुषी व्हा’, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ‘रामबाग मैदान आरक्षित करा, नेहमीसाठी सुरक्षित करा’ अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली.या आंदोलनाच्या वेळी देशमुख यांनी आपली भूमिका व्यक्त केली. जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम स्थलांतरित होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे त्यांनी यावेळी जाहीर केले. Zilla Parishad construction site controversy Chandrapur

ज्याठिकाणी वृक्षतोड त्याठिकाणी वृक्षारोपण

विशेष म्हणजे स्थानिक पर्यावरणाला पूरक अशा देशी वृक्षांची यावेळी लागवड करण्यात आली. कडूनिंब, आंबा,आवळा, अर्जुनी, सागवान,जांभूळ, सिताफळ अशी एकूण 100 वृक्ष आंदोलनात सामील नागरिकांनी लावली. वृक्षतोड झालेल्या ठिकाणाच्या जवळ खड्डे करून सर्व झाडे लावण्यात आली. Citizens plant 100 trees after illegal tree cutting


या आंदोलनामध्ये संघर्ष समितीचे राजेश अडूर, अक्षय येरगुडे,मंतोष देबनाथ, रवींद्र माडावर, कुशाबराव कायरकर, भाविक येरगुडे, विलास माथनकर, महेंद्र राळे, रवी पचारे,राजेश ठाकूर, वनिता साठोणे, विजय बदखल, चंद्रकांत वासाडे, दिलीप होरे, नवनाथ डेरकर, प्रवीण अडूर, नितीन बन्सोड, इमदाद शेख,अशोक दिघीकर,आनंद वनकर, अरुण भेलके, मुकेश वाळके,पवन अधिकारी,सिनु,प्रदिप दास,बलराम शाह, सुभाष पाचभाई, अश्विन माहुर्पवार,अतुल शुक्ला, अमोल घोडमारे,प्रफुल बैरम अजित दखणे,नामदेव पिपरे इत्यादी सदस्य तसेच सराव करणाऱ्या युवक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *