Tag: रामबाग मैदान

  • Tree plantation drive on Fadnavis birthday । 🌳 “फडणवीसांच्या वाढदिवशी अनोखे आंदोलन – 100 झाडांनी भरले रामबाग मैदान!”

    Tree plantation drive on Fadnavis birthday

    Tree plantation drive on Fadnavis birthday : चंद्रपूर – शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच बस स्थानक व रेल्वे स्थानकापासून अत्यंत जवळ असलेल्या जि.प.च्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी 2 एकर जागा उपलब्ध असतांना प्रशासनाने रामबाग मैदानावर नविन इमारत बांधण्याचा अट्टाहास करणे, पहिल्यांदा मैदानावर खड्डा व दुसऱ्यांदा 100 वृक्षांची कत्तल केल्यानंतर इमारतीची जागा बदलवणे,प्रशासनाचे हे नियोजन समजण्या पलीकडचे आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वेळेवर जागे झालो असतो तर कदाचित रामबागवर खड्डा व वृक्षतोड झाली नसती. त्यामुळे रामबाग मैदानावर खड्डा व वृक्षतोड होणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींचे सामूहिक अपयश आहे,अशी भूमिका रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी व्यक्त केली.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपची सत्ता, रविंद्र शिंदे नवे अध्यक्ष

    रामबाग मैदानावर झालेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज 22 जुलै रोजी सकाळी 8 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ‘शतायुषी व्हा’, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ‘रामबाग मैदान आरक्षित करा, नेहमीसाठी सुरक्षित करा’ अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली.या आंदोलनाच्या वेळी देशमुख यांनी आपली भूमिका व्यक्त केली. जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम स्थलांतरित होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे त्यांनी यावेळी जाहीर केले. Zilla Parishad construction site controversy Chandrapur

    ज्याठिकाणी वृक्षतोड त्याठिकाणी वृक्षारोपण

    विशेष म्हणजे स्थानिक पर्यावरणाला पूरक अशा देशी वृक्षांची यावेळी लागवड करण्यात आली. कडूनिंब, आंबा,आवळा, अर्जुनी, सागवान,जांभूळ, सिताफळ अशी एकूण 100 वृक्ष आंदोलनात सामील नागरिकांनी लावली. वृक्षतोड झालेल्या ठिकाणाच्या जवळ खड्डे करून सर्व झाडे लावण्यात आली. Citizens plant 100 trees after illegal tree cutting


    या आंदोलनामध्ये संघर्ष समितीचे राजेश अडूर, अक्षय येरगुडे,मंतोष देबनाथ, रवींद्र माडावर, कुशाबराव कायरकर, भाविक येरगुडे, विलास माथनकर, महेंद्र राळे, रवी पचारे,राजेश ठाकूर, वनिता साठोणे, विजय बदखल, चंद्रकांत वासाडे, दिलीप होरे, नवनाथ डेरकर, प्रवीण अडूर, नितीन बन्सोड, इमदाद शेख,अशोक दिघीकर,आनंद वनकर, अरुण भेलके, मुकेश वाळके,पवन अधिकारी,सिनु,प्रदिप दास,बलराम शाह, सुभाष पाचभाई, अश्विन माहुर्पवार,अतुल शुक्ला, अमोल घोडमारे,प्रफुल बैरम अजित दखणे,नामदेव पिपरे इत्यादी सदस्य तसेच सराव करणाऱ्या युवक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

  • MLA Kishor Jorgewar stops ZP building work । 🔥 “‘सात इंचही जागा देणार नाही’ – MLA जोरगेवारांनी अधिकाऱ्यांना फटकारले!”

    MLA Kishor Jorgewar stops ZP building work

    MLA Kishor Jorgewar stops ZP building work : चंद्रपूर – लोकशाहीत लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. रामबाग येथील सात एकर जागेवर जिल्हा परिषदेच्या ईमारतीला स्थानिकांचा विरोध असतांनाही येथे वृक्षतोड करुन कामाला सुरवात करणे ही योग्य बाब नाही. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सात एकर तर दूर येथील सात इंच जागेलाही आम्ही हात लावू देणार नाही असा ईशारा देत येथे सुरु असलेले काम आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी प्रत्यक्ष पाहणी करत बंद पाडले आहे.

    चंद्रपूर जिल्हा परिषद देणार दरमहा दहा हजार, काय आहे शिका व कमवा योजना?

                 या पाहणीदरम्यान महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, उपविभागीय वन अधिकारी नायगावकर, जिल्हा परिषदेच्या उप अभियंता जोशी, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, प्रकाश देवतडे, मंडळ अध्यक्ष अॅड, सरिता संदुरकर, मनोरंजन रॉय, राशिद हूसेन, राकेश बोमनवार, सज्जद अली, करणसिंह बैस, नितिन शाहा, रजनी पॉल आदिंची उपस्थिती होती. political leader halts construction due to protest

      रामबाग येथे होणाऱ्या जिल्हा परिषद इमारतीला स्थानिक नागरिकांचा होत असलेला विरोध लक्षात घेता, आमदार किशोर जोरगेवार यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेला हे काम थांबविण्यास भाग पाडले होते. त्यानंतर त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांची भेट घेऊन रामबाग मैदानावर इमारत बांधण्याचा प्रस्तावच रद्द करण्याची मागणी केली होती. याबाबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. mla kishor jorgewar stops zp building work

    अधिकाऱ्यांना फटकारले

                मात्र सदर बैठक होण्याआधीच जिल्हा परिषदेच्या ईमारतीसाठी रामबाग मैदाना लगतची जागा निश्चित करुन येथील जवळपास 60 मोठी झाडे तोडण्यात आली आहे. कंत्राटदाराने ईमारत बांधकामाचे सर्व साहित्य येथे टाकले असून कामास सुरवात केली आहे. याबाबत आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर जागेवर जात अधिका-यांसह कामाची पाहणी करत काम बंद पाडले आहे. झाडे तोडल्याबदलही आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना चांगलेच फटकारले आहे. ram bagh chandrapur tree cutting issue

    लोकशाहीमध्ये लोकांच्या भावना सर्वोच्च असतात. या ठिकाणी नागरिकांचा स्पष्ट विरोध असतानाही वृक्षतोड करून कामास सुरुवात करणे ही बाब दुर्दैवी आहे, असे सांगत  ही जागा जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी नाहीच. अनेक वर्षांपासून या जागेवर स्थानिक नागरिक आपला विरंगुळा शोधतात. झाडांमुळे निसर्गसंपन्न झालेला हा परिसर नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनाचा भाग आहे. अनेक खेळाडुंसाठी हे उत्तम मैदान आहे. यावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही. असे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट शब्दात खडसावले आहे. संबधित कंत्राटदाराने 48 तासाच्या आत येथील ईमारत बांधकाम साहित्य दुसरीकडे हलविण्याचे निर्देशही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना दिले आहे. यावेळी स्थानिक नागरिकांचीही उपस्थिती होती. 

  • rambagh ground tree felling । 😡 “विकास” की विनाश?” रामबाग मैदानाच्या शेजारी 100 झाडांची निर्घृण कत्तल!

    rambagh ground tree felling

    मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनी संघर्ष समितीचे ‘वृक्षारोपण आंदोलन’

    rambagh ground tree felling : चंद्रपूर : जि.प.च्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी 2 एकर जागा उपलब्ध असतांना नविन जागेवर जिल्हा परिषद इमारत बांधण्याचा हट्ट प्रशासनाने सोडला नाही. नागरिकांच्या दबावामुळे रामबाग मैदान सोडले.परंतु मैदानावरील 100 झाडांची कत्तल करून बांधकामाला सुरुवात केली.अत्यंत प्रदूषित अशा चंद्रपूर शहरात हिरवळीने नटलेल्या रामबाग मैदानाच्या शेजारील सुमारे 100 वृक्षांची युद्ध पातळीवर कटाई करून सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले. cutting 100 trees for government building

    ताड, सिंधी व सागवानचे चाळीस-पन्नास वर्षापेक्षा जुने वृक्ष कापण्यात आली आहे. या प्रकारामुळे चंद्रपूर शहरातील नागरिक पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त येत्या 22 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या प्रस्तावित जागेवर 100 वृक्षांची लागवड करून वृक्षतोडीचा निषेध करण्यात येईल अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

    कंत्राटदाराच्या हितासाठी प्रशासनाचा अट्टाहास
    …..पप्पू देशमुख यांचा आरोप

    जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती करिता रामबाग मैदानावर खड्डा खोदण्यात आला. इमारतीचे बांधकाम थांबले परंतु खड्ड्यामुळे मैदानाला मोठे नुकसान झाले. यानंतर शहरातील जागरूक नागरिक, संघटना- संस्था, क्रीडा प्रेमी, खेळाडू, योगा ग्रुप्स सर्वांनी महापंचायत घेऊन या ठिकाणी बांधकामाला नागरिकांचा विरोध असल्याचा ठराव सर्वानुमते घेतला. स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी विनायक गौडा यांना महापंचायतच्या ठरावाची प्रत देण्यात आली. आता जिल्हा प्रशासनाने मैदान सोडले परंतु मैदाना शेजारची 100 जुनी वृक्षे अक्षरशः कापून काढली. ‘हा विकास नसुन ही विकृती आहे’,अशी संतप्त भावना देशमुख यांनी व्यक्त केली. green belt cutting for district council building

    ऑनलाईन गेमिंगमुळे आत्महत्या वाढल्या, केंद्राकडे पाठपुरावा करणार – आमदार जोरगेवार

    चंद्रपूर सारख्या अत्यंत प्रदूषित शहरात हिरवळ असलेले एकमेव मैदान असल्यामुळे रामबाग मैदान व त्यावरील नैसर्गिक सौंदर्याला सिमेंट काँक्रीटच्या विकासाचे नख लागू नये अशी जनभावना आहे. प्रस्तावित इमारतीची जागा बदलल्यास काम करण्यास विलंब होऊ शकतो. कंत्राटदारांचे काम लवकरात लवकर व्हावे, त्यातून चार पैसे आपल्या पदरी पडावे या एकमेव हेतूने प्रशासन आडमुठेपणाची भूमिका घेत आहे असा आरोप सुध्दा देशमुख यांनी केला. नवीन इमारतीचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या जुन्या परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या दोन एकर जागेमध्ये स्थलांतरित करण्यात यावे या करिता रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचा लढा सुरू राहील अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली.

  • Sudhir Mungantiwar on sports ground decision । खेळाडूंना दिलासा; क्रीडांगण कायम राहणार – मुनगंटीवार

    Sudhir Mungantiwar on sports ground decision

    Sudhir Mungantiwar on sports ground decision : चंद्रपूर जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली असून, सध्याची इमारत कामाच्या विस्तारामुळे अपुरी ठरत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जमिनीसाठी क्रीडांगणाच्या काही भागाचा उपयोग करण्याचा प्रस्ताव मांडला होता. Chandrapur sports ground controversy

    मानव वन्यजीव संघर्षात चंद्रपूर जिल्ह्यात १७ नागरिकांचा मृत्यू, दोन दिवसात ४ महिलांचा बळी

    मात्र या निर्णयाला खेळाडूंनी विरोध दर्शविल्याने, जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत क्रीडांगण जसेच्या तसे कायम राखून ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे खेळाडूंच्या क्रीडांगणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

    chandrapur sports ground controversy

    बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर आदींची उपस्थिती होती.

    या पार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी क्रिकेट व फुटबॉल खेळणारे विद्यार्थी आणि खेळाडूंनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी 10 अथवा 11 मे रोजी बैठक घेऊन क्रीडांगणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आमदार मुनगंटीवार यांनी होते. त्याअनुषंगाने, झालेल्या आजच्या बैठकीत, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम दुसऱ्या इमारतीसाठी राखीव जागेवर हलवण्यात येणार असून, खेळाडू वापरत असलेले क्रीडांगण कायम ठेवले जाणार आहे. Chandrapur public protest sports ground

    भविष्यामध्ये अशा अडचणी टाळण्यासाठी सदर जागा राज्य सरकारच्यावतीने ‘ग्राउंड’ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

    याशिवाय पोलीस ग्राउंडसुद्धा म्हाडा परिसरातील 50 एकर जागेत स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चांदा क्लब ग्राउंडवर होणारे कृषी प्रदर्शन, महोत्सव आणि इतर उपक्रमांसाठी तारखा निश्चित करून उर्वरित दिवशी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.