Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025
Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025 : चंद्रपूर 1 ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील गरजू नागरी लाभार्थ्यांसाठी “रमाई आवास घरकुल योजना (शहरी)” राबविली आत असून या अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी 2 लक्ष 50 हजार (बीपीएल) तसेच 2 लक्ष 25 हजार (बीपीएल) इतके आर्थिक अनुदान दिले जाणार आहे.
चंद्रपुरात गुंतवणुकीच्या नावावर फसवणूक
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या या घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात येते. Urban Gharkul Yojana eligibility and documents
लाभार्थी पात्रता –
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
- अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे.
- अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा.
- घरकुल बांधकाम महानगरपालिका क्षेत्रात 2 लक्ष 50 हजार रुपयेच्या मर्यादेत करणे आवश्यक आहे.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखांपेक्षा जास्त नसावी.
- घराचे बांधकाम चटई क्षेत्र 269 चौ. फूट राहील.
- घराच्या बांधकामाच्या खर्चामध्ये मनपा हिस्सा १० टक्के राहील. दारिद्रयरेषेखालिल कुटुंबासाठी लाभार्थी हिस्सा भरण्याची आवश्यकता नाही.
- अर्जदाराने यापूर्वी घरकुलासंबंधी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे:
- जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट)
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा चालू वर्षाचा) –सत्य प्रत
- रेशनकार्ड
- घरटॅक्स पावती (चालू वर्षाची)
- मतदान ओळखपत्र (व्होटर कार्ड)
- दारिद्र्य रेषेखालील दाखला (असल्यास)
- रहिवासी दाखला १५ वर्षांचा (तहसीलदार यांचा )
- अर्जदारासोबतचा कच्चे घर/झोपडी/खुल्या भूखंडाचा फोटो (सद्यस्थितीतील)
- अर्जदार पती/पत्नी यांचे पासपोर्ट फोटो
- इलेक्ट्रिक बिल
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रातील नमुद कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तीने घरकुलाचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र (रु. 100/- चा स्टॅम्प पेपरवरील नोटरी करणे)

अर्ज प्रक्रिया:
सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या घरकुल विभागाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क:
घरकुल विभाग,सात मजली इमारत,प्रथम माळा,चंद्रपूर शहर महानगरपालिका.
Leave a Reply