Category: योजना

केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व नवीन सरकारी योजना (New Government Schemes) आणि महत्त्वाच्या घोषणांची माहिती news34.in वर मिळवा. शेतकरी योजना, महिलांसाठी योजना, शिष्यवृत्ती (Scholarship) आणि आरोग्य योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी हे तुमचे विश्वसनीय स्रोत आहे. कोण अर्ज करू शकतो, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबद्दल सविस्तर माहिती येथे उपलब्ध आहे. तुमच्यासाठी फायदेशीर असणाऱ्या कोणत्याही सरकारी योजनेची माहिती (Sarkari Yojana) चुकणार नाही याची खात्री बाळगा.

  • पशुपालकांसाठी सुवर्णसंधी! चंद्रपूरसह विदर्भातील 19 जिल्ह्यांत दुग्धविकास प्रकल्प राबवला जाणार

    Maharashtra dairy scheme : चंद्रपूर, दि. 10 डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सन 2024-25 ते 2028-29 या कालावधीत दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा एकंदरीत दुध उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत. (हे वाचा – लोकसंमती शिवाय दारू दुकाने नकोच – आमदार जोरगेवार)

    यात 1) 50 टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हैस वाटप 2) 75 टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या प्रत्यारोपण केलेली गाभण कालवड वाटप 3) 25 टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य पुरवठा 3) 25 टक्के अनुदानावर फैट व एसएमएस वर्धक खाद्य पुरवठा 5) 50 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी यंत्र वाटप 6) 100 टक्के अनुदानावर बहुवार्षिक चारा पिके व ठोंबेवाटप 7) 3 रुपये प्रती किलो अनुदानावर मुरघास पुरवठा. Maharashtra dairy scheme

    तरी सदर योजनांचा लाभ घेण्याकरिता जास्तीत  जास्त पशुपालकांनी www.vimddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. सदर अर्ज भरण्याचा कालावधी वर्षभर व २४ तास खुले असणार आहे. पशुपालक आपल्या घरून किवा ग्राम पंचायत किंवा दूध संकलन केंद्रावरून ऑनलाइन पध्दतीने अर्ज करू शकतील.

    अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे : 1) अर्जदाराचे आधारकार्ड २) भ्रमणध्वनी क्रमांक, ३) राशन कार्ड, 4) 7/12उत्तारा, 5) बँकपासबुक, 6) कुटुंबातील इतर सदस्यांचे  आधारकार्डचे  क्रमांक,  8) दुधाळ जनावरांचे बिल्ला क्रमांक लागणार आहेत.

    तसेच योजना संबंधी अधिक माहिती करिता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा दुध संकलन केंद्र किंवा डॉ.जिशांत नंदेश्वर जिल्हा प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांना 9158869208 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे डॉ. ह. सो. वरठी, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय चंद्रपूर यांनी कळविले आहे..

  • चंद्रपूरमध्ये मातृत्व व बालआरोग्यासाठी किलकारी मोफत सेवा सुरु

    गर्भवती महिला आणि बालआरोग्यासाठी भारत सरकारची मोफत ऑडिओ कॉल सेवा – किलकारी

    Kilkari audio messages for new mothers : चंद्रपूर 27 नोव्हेंबर (News३४) – मातृत्व व बालआरोग्य सशक्त करण्याच्या दिशेने केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत किलकारी ही मोबाईल-आधारित मोफत स्वास्थ्य सेवा देशभर प्रभावीपणे कार्यरत आहे. या सेवेमधून गरोदर महिला व एक वर्षाखालील बाळ असलेल्या कुटुंबांना त्यांच्या मोबाईलवर स्थानिक भाषेत (मराठीसहित) आठवड्यातून 1 वेळा आरोग्यविषयक मार्गदर्शन ऑडिओ कॉलद्वारे दिले जाते.

    क्राईम – गोवंशीय जनावरांची वाहतूक, २ आरोपीना अटक

    कोण लाभ घेऊ शकतो?

    किमान 4 महिन्यांची नोंदणी झालेली गर्भवती महिला
    तसेच 1 वर्षाखालील बाळ असलेली कुटुंबे
    कॉल कोणत्या क्रमांकावरून येईल?
    या सेवेचे सर्व अधिकृत कॉल 1600403660 या फोन क्रमांकावरून येतात. नागरिकांनी हा क्रमांक आजच आपल्या मोबाईलमध्ये जतन (Save) करून ठेवावा, जेणेकरून कॉल सहज ओळखता येईल आणि महत्त्वाचा संदेश ऐकणे चुकू नये. येणारा कॉल हा ३ ते ५ मिनिटांचा असुन पुर्ण कॉल ऐकणे आवश्यक आहे.  


    गरोदर महिलेला कॉल कधीपासून येतात?
    गर्भधारणेच्या 13 व्या आठवड्यापासून (किंवा अंदाजे 4 थ्या महिन्यापासून) गरोदर महिलेला किलकारीचा फोन आठवड्यातून 1 वेळा येण्यास प्रारंभ होतो.
    तसेच बाळ 1 वर्षाचे होईपर्यंत हे कॉल नियमितपणे प्राप्त होत राहतात.
    कॉल चुकला तर काय?
    एखादा कॉल नागरिकांकडून चुकल्यास, किंवा पुन्हा ऐकायचा असल्यास, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 14423 हा नंबर डायल करून त्याच आठवड्याचा किलकारी संदेश अगदी मोफत पुन्हा ऐकता येतो.


    किलकारी संदेशात काय असते?
    गरोदर महिलेच्या गर्भावस्थेच्या महिन्यानुसार आवश्यक आरोग्य सूचना
    उदा. जर एखादी महिला 5 व्या महिन्यात असेल, तर तिला 5 व्या महिन्यात अपेक्षित मार्गदर्शनच दिले जाते.
    त्याचप्रमाणे, बाळाच्या वयानुसार दर आठवड्याला बाळाच्या आरोग्य व देखभालीबाबत मार्गदर्शन दिले जाते.
    संदेशामध्ये आहार, औषधोपचार, नियमित तपासणी, लसीकरण, आजार प्रतिबंध, आरोग्यसवयी, आणि काळजी घेण्याच्या आवश्यक टिप्सचा समावेश असतो.


    सेवा सुरू करण्यासाठी नोंदणी कशी करावी?
    आपल्या भागातील आशा सेविका, ए.एन.एम. आरोग्य कर्मचारी किंवा जवळील शासकीय आरोग्य केंद्रात जा.
    गर्भधारणा किंवा बाळाच्या जन्माची अधिकृत नोंदणी करून घ्या.
    नोंदणी करताना तोच मोबाईल क्रमांक द्या ज्यावर तुम्हाला किलकारीचे कॉल प्राप्त करायचे आहेत.
    ही माहिती ऑनलाइन आर.सी.एच. प्रणाली मध्ये नोंदवली जाईल आणि त्यानंतर कॉल्स आपोआप सुरू होतील.


    सेवेचा मुख्य उद्देश –
    किलकारी सेवेमुळे गरोदर महिला, नवमाता, बाळ, आणि त्यांचे कुटुंब आरोग्यदृष्ट्या जागरूक होऊन निरोगी व आनंदी जीवन जगण्यास सक्षम बनतात. ही सेवा संपूर्णपणे मोफत असून, नागरिकांनी तिचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    अधिक माहितीसाठी –
    नागरिकांनी जवळील शासकीय आरोग्य केंद्र किंवा आशा व एएनएम आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Maharashtra SMART solar scheme 1 kW rooftop । 🔋 छतावर सौर प्रकल्प बसवा आणि उत्पन्नही मिळवा; महाराष्ट्र स्मार्ट सोलर स्कीममुळे २५ वर्षे वीजबिल शून्य!

    Maharashtra SMART solar scheme 1 kW rooftop

    Maharashtra SMART solar scheme 1 kW rooftop : चंद्रपूर १३ नोव्हेंबर २०२५ (News३४): दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे.

    Read Also : चंद्रपूर महानगरपालिकेचा जाहिर धुत्कार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे. दारिद्र्य रेषेखालील १.५४ लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३.४५ लाख अशा महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापणाऱ्या पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी ६५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर राबविण्यात येणार आहे. Maharashtra SMART solar scheme 1 kW rooftop

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यामध्ये ग्राहकांना एक किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. स्मार्ट योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळणार असल्याने वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसविता येईल. अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. पीएम आवास योजनेसाठीही लागू
    अनेक नागरिक शासनाच्या पीएम आवास योजनेचा लाभ घेऊन घरे बांधतात. अशा वीज ग्राहकांना देखील या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.

    पीएम आवास योजनेसाठीही लागू

    अनेक नागरिक शासनाच्या पीएम आवास योजनेचा लाभ घेऊन घरे बांधतात. अशा वीज ग्राहकांना देखील या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.

    केंद्र सरकारकडून ३० हजारांचे अनुदान

    स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅटचा सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून १७,५०० रुपये अनुदान मिळेल.
    सौर ऊर्जा प्रकल्पाची ऊर्वरित रक्कम भरून ग्राहक २५ वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकतो. Maharashtra SMART solar scheme 1 kW rooftop

    राज्य सरकारचाही लागणार हातभार

    शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या ३० हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार १५ हजार रुपये अनुदान देणार आहे.

    वीज विकून पैसेही कमवा

    एक किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. त्यामुळे शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते. या प्रकल्पातून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ लाभ होतो.

  • Ladki Bahin e-KYC Maharashtra । लाडकी बहीण योजनाः e-KYC अनिवार्य, २ महिन्यात केवायसी पूर्ण करा

    Ladki Bahin e-KYC Maharashtra

    Ladki Bahin e-KYC Maharashtra : चंद्रपूर २२ सप्टेंबर २०२५ – ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. तसेच पुढील दोन महिन्यात लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    बचत गटाच्या मासिक सभेत सिमेंट रेलिंग कोसळली, ३ महिला जखमी

    राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बाल विकास विभागाकडून ई-केवायसी माध्यमातून लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील, अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. लाभार्थीनी गोंधळून न जाता तसेच कोणीही आर्थिक मागणी करीत असेल त्यास बळी पडू नये असे आवाहनही मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

    अशी आहे प्रक्रिया

     : https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर KYC फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे. यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधीच पूर्ण झाली असेल, तर ‘e-KYC आधीच पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल. Official Ladki Bahin e-KYC portal

    जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल. जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल. यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटनावर क्लिक करावा. त्यानंतर लाभार्थ्याला आपला प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील.

    1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

    2. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे. शेवटी, ‘Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

  • Annasaheb Patil arthik magas vikas mahamandal । वेळ वाचवा, खर्च वाचवा – अण्णासाहेब पाटील महामंडळाची नवी सुविधा

    Annasaheb Patil arthik magas vikas mahamandal

    Annasaheb Patil arthik magas vikas mahamandal :  चंद्रपूर, दि.12 सप्टेंबर २०२५ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सीएससी केंद्रामधून (Common Service Centre) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा  सामजंस्य करार महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये महामंडळाचे व्ययस्थापकीय संचालक, विजयसिंह देशमुख व सीएससी केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.

    मुस्लिम बांधवानी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात

      या करारानुसार, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील, यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. Anna Patil Mandal schemes

    जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही

     सीएससी केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. महामंडळाने सीएससी केंद्रासमवेत केलेल्या करारामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल.

    राज्यामध्ये सीएससी चे 72 हजारपेक्षा जास्त केंद्र कार्यरत असल्याने त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातूनच पात्रता प्रमाणपत्र, कागदपत्र, बँकेचे कर्ज मंजुरी, बैंकचा हप्ता , अपलोड करण्यासाठी प्रत्येकी 70 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही. तसेच महामंडळाच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैसे उकलणाऱ्या अनधिकृत एजंट लोकांना आळा घालणे शक्य होईल. भविष्यात लाभार्थ्यांसाठी महामंडळाचे मोबाईल अॅप व  चॅट बॉट सारख्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

        या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी व्यक्त केले.

  • how to apply for disability scholarships । दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज कसा कराल? संपूर्ण माहिती येथे 📚

    how to apply for disability scholarships

    how to apply for disability scholarships : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ – सन 2025-26 या वर्षात दिव्यांग कल्याण योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, जि.प. मार्फत राबविण्यात येत असून सदर योजना खालीलप्रमाणे आहे. 1. शालांत पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 2. मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती 3. दिव्यांग व्यक्तिंना लघु उद्योगासाठी वित्तीय सहाय्य करणे आणि 4. दिव्यांग व्यक्तिच्या विवाहास आर्थिक सहाय्य करणे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.

    अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक प्राप्त करतील

    1. शालांत पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरीता शिष्यवृत्ती अदा करण्यात येते. इयत्ता 1 ली ते 4 थी (कर्णबधिर पायरी वर्गापासून)  वार्षिक शिष्यवृत्ती 1 हजार रुपये,  इयत्ता 5 वी ते 7 वी दीड हजार रुपये, इयत्ता 8 वी ते 10 वी करीता 2 हजार रुपये, मतिमंद मानसिक विकलांग (नोंदणी प्रमाणपत्र विशेष शाळेतील) करीता दीड हजार रुपये आणि दिव्यांग कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी यांना वार्षिक 3 हजार रुपये.

    पात्रता 

    : इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण घेणारे अंध, कर्णबधिर व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थी तसेच विशेष नोंदणी प्रमाणपत्र शाळेतील मतिमंद विद्यार्थी. विद्यार्थ्याकडे किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्क्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे. विद्यार्थी एकाच इयत्तेत दोन वेळा नापास झालेला नसावा. how to apply for disability scholarships

    आवश्यक कागदपत्र

     : दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र 40 टक्के, वार्षिक परिक्षेच्या निकालाची प्रत व गुणपत्रीका,  बोनाफाईट दाखला.

    2. शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती :  मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना www.mahadbtmahiti.gov.in या संकेतस्थळावर Online अर्ज करायचा असतो. सदर संकेतस्थळावर सर्व अटी, शर्ती व लाभाबाबत माहिती उपलब्ध आहे. divyang welfare scheme

    आवश्यक कागदपत्रे : दिव्यांगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र 40 टक्के, वार्षिक परिक्षेच्या निकालाची प्रत,  शाळेत शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र, विद्यापीठात भरणारे सक्तीचे शुल्क, प्रवेश फी, ट्यूशन फी, नोंदणी फी लायब्ररी, मॅगेजिन फी, वैद्यकिय तपासणी बाबतचे पावती देय

    3. स्वयंरोजगारासाठी दिव्यांग व्यक्तीना वित्तीय सहाय्य (बिज भांडवल योजना) : दिव्यांग व्यक्तीना लघुउद्योगासाठी वित्तीय सहाय्य करणे.

    पात्रता : वार्षिक उत्पन्न रुपये 1 लक्षपेक्षा कमी असावे, दिव्यांग व्यक्तीचे किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे, वय 18 ते 50 वर्ष यामधील असावे, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

    लाभाचे स्वरुप

     : रुपये 1.50 लक्ष मर्यादेपर्यंतच्या राष्ट्रीयकृत बँकेने मंजुर केलेल्या रक्कमेच्या 20 टक्के सबसिडी स्वरुपात अर्थसहाय्य देण्यात येते.

    4. दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास आर्थिक सहाय्य देणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभाग अंतर्गत  दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास आर्थिक सहाय्य देणे योजना राबविल्या जाते.

    पात्रता : दिव्यांग व्यक्तीचे किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे, विवाहित जोडप्यापैकी एक व्यक्ती दिव्यांग व एक व्यक्ती अव्यंग असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

    लाभाचे स्वरुप : विवाहित जोडप्यांना संयुक्तरित्या एकुण 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते. disabled marriage subsidy Maharashtra

    वरीलप्रमाणे योजनांचे प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जि.प. येथे सादर करावे, असे आवाहन धनंजय साळवे यांनी दिले आहे.

  • MLWB general scholarship scheme Maharashtra । 🚀 कामगारांच्या लेकरांसाठी सुवर्णसंधी! MLWB शिष्यवृत्ती योजना, जाणून घ्या

    MLWB general scholarship scheme Maharashtra

    MLWB general scholarship scheme Maharashtra : वृत्तसेवा (२७ ऑगस्ट २०२५) – कामगार वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हेच भविष्य बदलण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (Maharashtra Labour Welfare Board – MLWB) कामगारांच्या मुलांना शैक्षणिक पाठबळ देण्यासाठी दरवर्षी सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना (General Scholarship Scheme) राबवते. चला तर पाहूया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

    शासनाच्या शिष्यवृत्ती योजना काय?


    योजना कोणासाठी आहे?

    • ही योजना फक्त कामगारांच्या मुलांसाठी व पत्नींसाठी आहे.
    • पालक किंवा विद्यार्थी MLWB चे सभासद असणे आणि LIN नंबर (Labour Identification Number) असणे बंधनकारक आहे.

    पात्रता निकष

    शैक्षणिक अट – मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण मिळालेले असणे आवश्यक.
    शैक्षणिक स्तर – 10वी पासून पीएचडी व परदेशातील शिक्षणापर्यंत सर्व स्तरावरील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
    दिव्यांग विद्यार्थी – केवळ उत्तीर्ण झालेले असले तरीही पात्र, मात्र प्रमाणपत्र आवश्यक.
    Gap Year – एका वर्षाचा ब्रेक असल्यास तहसीलदाराचे प्रमाणपत्र द्यावे लागते.
    अपात्रता – मुक्त विद्यापीठ, दूरस्थ/बाह्य अभ्यासक्रम, अप्रेंटिसशिप व स्टायपंड घेणारे विद्यार्थी पात्र नाहीत. Labour welfare board scholarship eligibility and benefits

    kamgar kalyan board

    शिष्यवृत्तीची रक्कम

    मंडळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरानुसार वार्षिक आर्थिक सहाय्य करते.

    शैक्षणिक स्तरशिष्यवृत्ती रक्कम
    10वी – 12वी₹2,000
    पदवी अभ्यासक्रम₹2,500
    पदव्युत्तर (नॉन–प्रोफेशनल)₹3,000
    डिप्लोमा (व्यावसायिक)₹2,500
    व्यावसायिक पदवी (Degree)₹5,000
    पीएचडी नोंदणी₹5,000
    MPSC Prelims उत्तीर्ण₹5,000
    UPSC Prelims उत्तीर्ण₹8,000
    परदेशात शिक्षण₹50,000

    अर्ज कसा करावा?

    👉 संकेतस्थळ: public.mlwb.in

    1. Membership लॉगिन करा –
      • User ID = LIN नंबर
      • Password = मोबाईल OTP
    2. Application for Schemes मध्ये “General Scholarship” निवडा.
    3. अर्जात सर्व माहिती भरा.
    4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा –
      • मागील वर्षाची मार्कशीट
      • चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
      • आधार कार्ड (विद्यार्थी + पालक)
      • बँक पासबुक / कॅन्सल चेक
      • वेतनपावती (MLWF कपात असलेली)
      • दिव्यांगत्व / Gap year पुरावे (लागल्यास)
    5. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या. How to apply MLWB scholarship online step by step

    अर्जाची अंतिम तारीख

    • दरवर्षी निश्चित अंतिम मुदत असते.
    • उदा. 2023 साठी शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती.
    • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत.

    निधी हस्तांतरण कसे होते?

    • अर्ज तपासल्यानंतर मंडळाकडून मंजुरी दिली जाते.
    • मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाते.

    महत्त्वाची टीप

    ✔ अर्ज करताना LIN नंबर व मोबाईल OTP यांची शहानिशा करा.
    ✔ सर्व कागदपत्रे स्पष्ट व वैध असणे आवश्यक.
    ✔ अंतिम मुदतीपूर्वीच अर्ज पूर्ण करा, अन्यथा संधी गमावली जाऊ शकते.


    निष्कर्ष

    महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना ही कामगारांच्या मुलांसाठी मोठं शैक्षणिक बळ आहे. केवळ शाळा–कॉलेजच्या पातळीवरच नाही, तर UPSC–MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्यांनाही आर्थिक मदत मिळते. परदेशात उच्चशिक्षण घेणाऱ्यांसाठी तर ₹50,000 पर्यंतचं सहाय्य दिलं जातं.

    शिक्षणाला आर्थिक आधार मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नक्कीच गती मिळते. त्यामुळे कामगार कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांनी ही योजना नक्कीच अर्ज करून घ्यावी.

  • Maharashtra Government Scholarship 2025 । “विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती 2025 ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी!”

    Maharashtra Government Scholarship 2025

    Maharashtra Government Scholarship 2025 : (२४ ऑगस्ट २०२५) महाराष्ट्र शासनाच्या समाज न्याय व विशेष सहाय्य विभागा तर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होते. या लेखात आपण पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व शिष्यवृत्तीचे फायदे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

    ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज व अनुदान, जाणून घ्या माहिती


    विभाग १ – शिष्यवृत्ती योजनांचे प्रकार

    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
    • पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती (एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, व्ही.जे.एन.टी. विद्यार्थ्यांसाठी)
    • इतर विशेष सहाय्य योजना

    👉 या योजना महाडिबी (MahaDBT) Portal वर उपलब्ध आहेत.


    विभाग २ – पात्रता (Eligibility)

    • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
    • निर्धारित जात, उपजाती किंवा आर्थिक घटकांतर्गत असावा
    • विद्यार्थी शासन मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठात शिक्षण घेत असावा
    • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावा

    विभाग ३ – आवश्यक कागदपत्रे (Documents Required)

    • जात प्रमाणपत्र / जात पडताळणी प्रमाणपत्र
    • उत्पन्न प्रमाणपत्र (ताजे)
    • रहिवासी प्रमाणपत्र
    • महाविद्यालय प्रवेशपत्र / बोनाफाईड सर्टिफिकेट
    • बँक पासबुक प्रती
    • मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक

    अर्ज प्रक्रिया (How to Apply)

    1. महाडिबीटी पोर्टल वर लॉगिन करा
    2. नवीन वापरकर्ता असल्यास नोंदणी (Registration) करा
    3. “Apply Online” विभागात योग्य शिष्यवृत्ती योजना निवडा
    4. सर्व तपशील भरा व कागदपत्रे अपलोड करा
    5. अर्ज सबमिट करून acknowledgment slip घ्या MahaDBT Scholarship

    लाभ (Benefits)

    • शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शासनामार्फत भरले जाते
    • होस्टेल भत्ता (असल्यास)
    • इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक सहाय्य
    • आर्थिक ताण कमी झाल्यामुळे विद्यार्थी उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकतो

    निष्कर्ष (Conclusion)

    समाज न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावे लागू नये म्हणून या योजना उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांनी वेळेवर ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.


    १. महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

    👉 सर्व अर्ज महाडिबीटी पोर्टल (MahaDBT) वरून ऑनलाइन करायचे असतात.

    २. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती असते?

    👉 दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान अर्ज प्रक्रिया सुरू राहते. (तारीख बदलू शकते, म्हणून अधिकृत वेबसाइट तपासा.)

    ३. उत्पन्न प्रमाणपत्र किती जुनं चालतं?

    👉 साधारणपणे मागील आर्थिक वर्षातील (१ वर्ष जुने) उत्पन्न प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते.

    ४. मी नापास झाल्यास शिष्यवृत्ती मिळेल का?

    👉 बहुतेक योजनांमध्ये विद्यार्थी नापास झाल्यास पुढील वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर होत नाही.

    ५. बँक खाते कोणत्या प्रकारचे असावे?

    👉 विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत/शेड्यूल बँकेतील सेव्हिंग अकाउंट असणे आवश्यक आहे.

    ६. मी महाराष्ट्राबाहेर शिकत असेन तरी अर्ज करू शकतो का?

    👉 हो, पण संबंधित महाविद्यालय शासनमान्यताप्राप्त असावे.

    ७. शिष्यवृत्ती रक्कम थेट कुठे जमा होते?

    👉 शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात (Direct Benefit Transfer – DBT) जमा केली जाते.

    ८. शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाल्याचे कसे कळेल?

    👉 MahaDBT पोर्टलवर लॉगिन करून “Application Status” मध्ये अर्जाची स्थिती पाहू शकता.
  • Mahatma Phule backward class loan schemes । 🚀 50 हजार ते 5 लाखापर्यंत कर्ज व अनुदान – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची मोठी घोषणा

    Mahatma Phule backward class loan schemes

    Mahatma Phule backward class loan schemes : चंद्रपूर, दि. 21 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. चंद्रपूर मार्फत अनुसूचित जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. चालू आर्थिक वर्ष 2025-26 करिता मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेअंतर्गत 80, बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 80, थेट कर्ज योजनेअंतर्गत 38 असे एकूण 198 लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    आधार योजना, मोफत वसतिगृहाची संधी

    अनुदान योजना : 

    प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपये पर्यंत, सदर योजनेत 25 हजार रुपयांपर्यंत कर्ज बँकेतर्फे दिले जाते व 25 हजार रुपये अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे. seed capital loan scheme MPBCDC

    बीज भांडवल योजना :

     प्रकल्प मर्यादा 5 लक्ष रुपयापर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्क्यांनी व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचा समावेश आहे. 75 टक्के पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षात करावी लागते व 5 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो

    थेट कर्ज योजना :

     प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये पर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 85 हजार रुपये कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये 10 हजार रुपये महामंडळाच्या अनुदानाचा समावेश आहे. कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावी लागते व 5 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.

    वरील दिलेल्या योजनांच्या अर्ज भरण्याकरिता महामंडळाच्या mahadisha.mpbcdc.in या पोर्टल वर जाऊन अर्ज भरावे= अधिक माहिती करिता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे तसेच 07172-253549 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

  • dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana । 🏠 मोफत वसतीगृहाची संधी! ‘सावित्रीबाई फुले आधार योजना’ मध्ये अर्ज सुरू

    dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana

    dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana : चंद्रपूर, दि. 7 :  इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुले / मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, तसेच वाढत्या स्पर्धेत टिकुन राहता यावे, यासाठी वसतीगृह सुरू करण्या्त आले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी पदवी प्रथम वर्षात व पदवी नंतरचे पदव्यूत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून वसतीगृहासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. Pandit Dindayal Swayam Yojana

    महिलांच्या नावे मिळणार घर, आजच करा अर्ज

    विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज सादर करावा. सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे. वसतीगृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना आधार व स्वयंम योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने अर्ज गृहपाल आम्रपाली टेंभुर्णे व मुलांचे गृहपाल धीरज डोंगरे यांच्याकडे वसतिगृहात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.

    प्रवेशाचे निकष व नियमावली खालीलप्रमाणे : 

    विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा.  फक्त पदवी प्रथम वर्षातच (Bacherlor Degree) शिक्षण घेणारा असावा. पदवी नंतरचे पदव्यूत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यांना प्रवेश देण्यात येणार आहे. वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांच्या आत असावे. विद्यार्थ्याचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त  नसावे. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नॉन – क्रिमीलेअर तसेच कास्ट व्हॅलिडीटी जोडणे बंधनकारक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पान्ना्चा दाखला, बोनाफाईड व वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे. अर्ज भरल्यानंतर संपूर्ण कागदपत्रे जोडून सदर अर्ज इतर मागासवर्गीय मुलां / मुलींचे शासकीय वसतीगृहात जमा करावा.