Category: योजना

केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व नवीन सरकारी योजना (New Government Schemes) आणि महत्त्वाच्या घोषणांची माहिती news34.in वर मिळवा. शेतकरी योजना, महिलांसाठी योजना, शिष्यवृत्ती (Scholarship) आणि आरोग्य योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी हे तुमचे विश्वसनीय स्रोत आहे. कोण अर्ज करू शकतो, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबद्दल सविस्तर माहिती येथे उपलब्ध आहे. तुमच्यासाठी फायदेशीर असणाऱ्या कोणत्याही सरकारी योजनेची माहिती (Sarkari Yojana) चुकणार नाही याची खात्री बाळगा.

  • Pradhan Mantri Awas Yojana Urban 2.0 । महिलांच्या नावावर घर मिळवायचंय? आता ही योजना तुमच्यासाठी!

    Pradhan Mantri Awas Yojana Urban 2.0

    Pradhan Mantri Awas Yojana Urban 2.0 : चंद्रपूर 1 ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0” योजना राबविली जात असुन या अंतर्गत दोन प्रकारांत अर्ज मागविण्यात येत आहेत. यातील वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम हा पहिला व तर भागीदारी तत्वावर परवडणारी घरे हा दुसरा घटक आहे.  

    रमाई आवास घरकुल योजनेसाठी अर्ज करा

       यातील वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम घटकांतर्गत चंद्रपूर शहरातील ज्या नागरिकांकडे स्थायी पट्टे (स्वतः मालकीची जागा) आहे  (बांधकाम प्रतिबंधित क्षेत्र वगळता) त्यांना घरकुलाचा लाभ घेण्यास (रु. 2.50  लक्ष अनुदान) अर्ज करता येतो. तसेच भागीदारी तत्वावर परवडणारी घरे या घटकांतर्गत ज्या नागरीकांकडे स्वमालकीची जागा अथवा जमीन उपलब्ध नाही व चंद्रपूर शहरात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत अशा नागरिकांना अर्ज सादर करता येणार आहे.


        माननीय पंतप्रधान महोदयाच्या “सर्वांसाठी घरे” या संकल्पनेच्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत “प्रधानमंत्री आवास योजना” आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व गरजू नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा दुसरा टप्पा 1 सप्टेंबर 2024 पासुन राबविण्यात येत आहे.ही योजना महिला सदस्याच्या नावावर किंवा संयुक्त नावावर घर/जमिनीची मालकी देऊन महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते. या योजनेअंतर्गत, शहरी भागातील झोपडपट्टीवासीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) श्रेणीतील इतर लोकांना प्राधान्य दिले जाते.  how to apply PMAY Urban scheme in Chandrapur

    लाभार्थी पात्रता –

    • अर्जदार व त्याचे कुटुंबीय यांच्यापैकी कुणाचेही भारतात पक्के घर नसावे तसेच घरातील सदस्य शासनासोबत किंवा सरकारी गृहनिर्माण संस्थेसोबत घरधारक नसावेत.
    • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 4 लक्ष 50 हजार रुपयांच्या आत असावे.
    • लाभार्थी म्हणून गेल्या 20 वर्षात शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. PMAY Urban 2.0 eligibility and documents 

    आवश्यक कागदपत्रे

    • आधार कार्ड
    • ओळख पत्र (PAN/मतदार ओळखपत्र)
    • उत्पन्न प्रमाणपत्र (अस्सल प्रत)
    • बँक पासबुक (IFSC कोड असलेले)
    • मालमत्ता मालकीचे प्रमाणपत्र (7/12 उतारा, मालमत्ता दाखला)
    • घर बांधकाम परवानगी/मंजूरी पत्र
    • विवाह प्रमाणपत्र (विवाहित असल्यास)
    • जातीचा दाखला (SC/ST/OBC साठी)
    • विकलांग प्रमाणपत्र (अर्जदार अपंग असल्यास)
    • पासपोर्ट साईझ फोटो (२ नग)
    • आधार लिंक असलेले मोबाईल नंबर
    • शपथपत्र तसेच घटक क्र. 2 मध्ये अर्ज करतांना शहरात कुठेही स्थावर मालमत्ता नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील  
    • येथे करावा अर्ज –
    • उमेदवारांनी https://pmay-urban.gov.in या संकेतस्थळावर किंवा जवळच्या सेतू केंद्रावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
    • अधिक माहितीकरिता संपर्क:
    • घरकुल विभाग,सात मजली इमारत,प्रथम माळा,चंद्रपूर शहर महानगरपालिका.  
  • Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025 । चंद्रपूरमध्ये गरजूंना मिळणार पक्कं घर!, रमाई आवास योजना’साठी अर्ज सुरू!

    Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025

    Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025 : चंद्रपूर 1 ऑगस्ट –  चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील गरजू नागरी लाभार्थ्यांसाठी “रमाई आवास घरकुल योजना (शहरी)” राबविली आत असून या अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी 2 लक्ष 50 हजार (बीपीएल)  तसेच 2 लक्ष 25 हजार (बीपीएल) इतके आर्थिक अनुदान दिले जाणार आहे.

    चंद्रपुरात गुंतवणुकीच्या नावावर फसवणूक

      सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या या  घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या  ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात येते. Urban Gharkul Yojana eligibility and documents

    लाभार्थी पात्रता –

    • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
    • अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे.
    • अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा.
    • घरकुल बांधकाम महानगरपालिका क्षेत्रात 2 लक्ष 50 हजार रुपयेच्या मर्यादेत करणे आवश्यक आहे.
    • वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखांपेक्षा जास्त नसावी.
    • घराचे बांधकाम चटई क्षेत्र 269 चौ. फूट राहील.
    • घराच्या बांधकामाच्या खर्चामध्ये मनपा हिस्सा १० टक्के राहील. दारिद्रयरेषेखालिल कुटुंबासाठी लाभार्थी हिस्सा भरण्याची आवश्यकता नाही.
    • अर्जदाराने यापूर्वी घरकुलासंबंधी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

    आवश्यक कागदपत्रे:

    • जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट)
    • उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा चालू वर्षाचा) –सत्य प्रत
    • रेशनकार्ड
    • घरटॅक्स पावती (चालू वर्षाची)
    • मतदान ओळखपत्र (व्होटर कार्ड)
    • दारिद्र्य रेषेखालील दाखला (असल्यास)
    • रहिवासी दाखला १५ वर्षांचा (तहसीलदार यांचा )
    • अर्जदारासोबतचा कच्चे घर/झोपडी/खुल्या भूखंडाचा फोटो (सद्यस्थितीतील)
    • अर्जदार पती/पत्नी यांचे पासपोर्ट फोटो
    • इलेक्ट्रिक बिल
    • दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रातील नमुद कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तीने घरकुलाचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र (रु. 100/- चा स्टॅम्प पेपरवरील नोटरी करणे)


    अर्ज प्रक्रिया:
    सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या घरकुल विभागाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा.
    अधिक माहितीसाठी संपर्क:
    घरकुल विभाग,सात मजली इमारत,प्रथम माळा,चंद्रपूर शहर महानगरपालिका.

  • roadside cobbler stall subsidy scheme । 100% अनुदानात गटई स्टॉल! रस्त्याच्या कडेला बसणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

    roadside cobbler stall subsidy scheme

    roadside cobbler stall subsidy scheme : चंद्रपूर –  चामड्याच्या वस्तू वा पादत्राणे दुरुस्ती व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हा-पावसात बसून आपली सेवा देत असतात. या व्यावसायिकांना ऊन-वारा-पाऊस यापासून सरंक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के शासकीय अनुदानातून पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती अ वर्ग व  ब वर्ग नगरपालिका आणि छावणीक्षेत्र (कॅन्टोंमेंटबोर्ड) व महानगरपालिका क्षेत्रात सुध्दा वाढविण्यात आली आहे. free tin stall grant for Scheduled Caste cobblers Maharashtra

    त्यानुषंगाने अनुसूचित जातीच्या गटई कामगारांचे आर्थिक उन्नती होण्यासाठी गटई स्टॉल योजनेचे अर्ज सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण चंद्रपुर या कार्यालयाकडे उपलब्ध आहे. तरी या योजनेचा अनुसूचित जातीच्या गटई कामगारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

    महाराष्ट्रातील आयटीआय मध्ये क्रांतिकारी बदल

    पात्रतेचे निकष : 

    • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनु. जाती संवर्गातील असावा
    • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी 40 हजार व शहरी भागासाठी 50 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे.
    • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
    • अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड यांनी त्यास भाड्याने, कराराने खरेदी अगर मोफत परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी. Gatai stall scheme Maharashtra cobbler artisans

    आवश्यक कागदपत्रे :

    • अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला 
    • मागील संपलेल्या आर्थिक वर्षातील प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला 
    • शाळा सोडल्याचा दाखला 
    • रेशन कार्डाची झेरॉक्स (साक्षांकित प्रत)
    • आधार कार्डाची झेरॉक्स प्रत 
    • अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे. ती जागा ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका यांनी भाड्याने/कराराने/खरेदीने/स्व:मालकीची असल्याबाबतची भाडेचिठ्ठी, कराराची प्रत किंवा खरदी खताची साक्षांकित प्रत
    • ग्रामसेवक/ सचिव यांचे गटई काम करीत असल्याचे प्रमाणपत्र 
    • अर्जदार रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करीत असल्याबाबतचे ग्रामपंचायत/नगरपालिकेचे व्यवसाय प्रमाणपत्र व या जागेवर बसून काम करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र,  व्यवसाय करतानाचा पोस्टकार्ड साईज फोटो जोडणे आवश्यक आहे
    • अधिवास प्रमाणपत्र.

     

    अर्जदारांनी योजनेच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज शासन निर्णयात नमूद अटीनुसार सहाय्यकआयुक्त, समाज कल्याण कार्यालय चंद्रपुर येथे सादर करावा. अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर येथे तसेच 07172 – 253198 वर संपर्क करावा.

  • samuhik vivah sohala anudan । 👰 सामूहिक विवाह करा आणि मिळवा ₹25,000 अनुदान

    samuhik vivah sohala anudan

    samuhik vivah sohala anudan : चंद्रपूर, दि.24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) व आर्थिक दृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय कुटुंबांमधील तरुण-तरुणींना अनाठायी खर्च व कर्जबाजारीपणामुळे येणाऱ्या आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.

    मोरवा विमानतळास स्वाती पांडे यांची भेट

    या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्यास  25 हजार रुपये इतके कन्यादान अनुदान देण्यात येणार असून, विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक जोडप्यामागे  4 हजार इतके अनुदान देण्यात येणार आहे. mass marriage grant scheme

    स्वयंसेवी संस्थांनी करा अर्ज

    उपरोक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी दाम्पत्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा यातील कोणत्याही कलमाचे उल्लंघन केलेले नसावे, ही अट बंधनकारक आहे. सदर योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी ऑगस्ट अखेरपर्यंत विवाह सोहळ्यासाठी प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांचे कार्यालयात सादर करावेत.

    Somayya institute of technology

    या अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक संस्थांनी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

  • minority scholarship 2025-26 for abroad study । 💥 QS टॉप युनिव्हर्सिटीत शिकायचंय? सरकार देतंय लाखो रुपयांची मदत – अर्ज करण्यास विसरू नका!

    minority scholarship 2025-26 for abroad study

    minority scholarship 2025-26 for abroad study : चंद्रपूर, दि. 19 : अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने, अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी सन 2025-26 करिता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

    सदर अर्ज https://fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने 1 ऑगस्ट 2025 च्या सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अर्जाची छायाप्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा टपालाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे – 411001 येथे पाठवावी. overseas education scholarship

    चंद्रपुरात झाडांची कत्तल

    पात्रता व निकष : 

    अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा व अल्पसंख्यांक समुदायात येणारा असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे, तर पीएचडीसाठी 40 वर्षे ही वयोमर्यादा राहील. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे, शैक्षणिक पात्रतेत किमान 55 टक्के गुण आवश्यक आहेत. शिष्यवृत्ती QS World University Ranking मध्ये 200 च्या आतील विद्यापीठांमध्ये प्रवेश असलेल्या अभ्यासक्रमांसाठीच देण्यात येईल. (UNSW, ऑस्ट्रेलिया वगळलेले आहे.) विद्यार्थ्यांस शिक्षण शुल्क, प्रवास खर्च, निवास भत्ता, आरोग्य विमा, आकस्मिक खर्च इत्यादी प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येईल.

    USD 15,400 (USA व इतर देशांसाठी) व GBP 9,900 (UK साठी) या मर्यादेत निर्वाह भत्ता देण्यात येईल. आकस्मिक खर्चासाठी अनुक्रमे USD 1,500 (USA) व GBP 1,100 (UK) इतकी रक्कम मंजूर असेल. प्रत्येक सत्रात नियमित प्रगती, गुणपत्रिका आणि शैक्षणिक अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.

    या शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘ताज्या घडामोडी’ या लिंकला भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

  • farmer training visit abroad scheme maharashtra । महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी – आता शिका युरोपात शेती तंत्रज्ञान!

    farmer training visit abroad scheme maharashtra

    farmer training visit abroad scheme maharashtra : चंद्रपूर, दि. 15 : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील अद्ययावत शेती तंत्रज्ञान, कृषीमाल प्रक्रिया, निर्यात संधी व बाजारपेठेतील मागणी यांची थेट माहिती करून देण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर शाश्वत व आधुनिक शेती पद्धती अवगत करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही योजना राबविण्यात येत आहे.

    तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

    या योजनेअंतर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलीपाईन्स या देशांमध्ये शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्यात येणार आहेत. या दौऱ्यांमधून शेतकऱ्यांना संबंधित देशांतील कृषी संस्था, प्रक्रिया उद्योग, निर्यात केंद्रे, शेतकरी गट तसेच प्रात्यक्षिक शेतभेटीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात वाढ होऊन त्यांच्या उत्पादन व उत्पन्नात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल.

    निविदा GeM पोर्टलवर प्रसिध्द

    या अभ्यास दौ-यांचे आयोजन योग्य व नियोजनबद्ध पध्दतीने करण्यासाठी प्रवासी कंपनीची निवड करण्यासाठी GeM (Government e-Marketplace) पोर्टलवर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर निविदा 14 जुलै 2025 रोजी GeM पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे.

    निविदापूर्व बैठक 18 जुलै  रोजी दुपारी 12 वाजता राजमाता जिजाऊ समिती सभागृह, कृषी आयुक्तालय, दुसरा मजला, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये इच्छुक प्रवासी कंपन्यांना निविदा प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व स्पष्टता मिळवता येणार आहे. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 25 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे.

    सर्व पात्र व अनुभवी प्रवासी कंपन्यांनी GeM पोर्टलवर निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागमार्फत करण्यात येत आहे.

  • oilseed processing unit subsidy scheme । तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – केंद्र सरकारकडून ३३% अनुदान

    oilseed processing unit subsidy scheme

    oilseed processing unit subsidy scheme : चंद्रपूर, दि. 15 : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान 2025-26 अंतर्गत तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) तसेच तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व उपकरणे, प्रमुख आणि दुय्यम तेलबिया प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी जिल्ह्यास 1 लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर तेल प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देणे, उत्पादन मूल्यवर्धन करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा आहे.

    गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचे काय आहे फायदे?

    सदर योजनेत प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9 लक्ष 90 हजार (जे कमी असेल त्यानुसार) अनुदान अनुज्ञेय आहे. ज्या भागांमध्ये गळीतधान्य (तेलबिया) पिकांचे उत्पादन होत असले तरी प्रक्रिया युनिट उपलब्ध नाही, अशा ठिकाणी प्राधान्याने तेल काढणी युनिट स्थापन करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सीपेट, लुधियाना किंवा तत्सम केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या मिनी ऑईल मील / ऑईल एक्सपेल्लर  उत्पादकनिहाय मॉडेलला सदर अनुदान मिळू शकते. शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी व इच्छुक संस्था अर्ज करू शकतो. central government mini oil mill scheme 2025

    प्रकल्प प्रस्ताव बँकेकडे सादर करा

    सदर घटक बँक कर्जाशी निगडीत असून अर्जदार संस्थांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपला प्रकल्प प्रस्ताव बँकेकडे सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच अर्जदार संस्थेला योजनेचा लाभ मिळण्यास पात्रता प्राप्त होईल. तालुका कृषी अधिकारी यांनी अशा पात्र अर्जदारांचे अर्ज पूर्वसंमतीसाठी 30 जुले 2025 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

    तेलबिया उत्पादन करणाऱ्या भागांतील शेतकरी उत्पादक संस्थांनी किंवा इतर पात्र संस्थांनी आपला प्रकल्प प्रस्ताव बँकेकडे सादर करून, आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यांनी केले आहे.

  • gopinath munde farmer accident insurance scheme । गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना – पात्रता, प्रक्रिया आणि फायदे एका क्लिकवर!

    gopinath munde farmer accident insurance scheme

    gopinath munde farmer accident insurance scheme : चंद्रपूर, दि. 15 : शेती करतांना होणारे अपघात तसेच अपघातामुळे उद्भवणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

    दिव्यांग व मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना

    राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील 10 ते 75 वयोगटातील एका सदस्याला अपघात विमा संरक्षण प्रदान करते. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत असून अपघाताच्या घटनेनंतर 30 दिवसांच्या आत विहित कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. gopinath munde yojana accident claim

    शेतकऱ्यांचा मृत्यु झाल्यास त्याचे वारसदारांना रुपये दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच वरील अपघातात संबंधित शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये आर्थिक मदत अनुज्ञेय आहे. apply online for farmer accident insurance scheme

    नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्या/ प्रयत्न, कायद्याचे उल्लंघन करताना झालेल्या घटना, अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली अपघात, उष्माघात, भ्रमिष्टपणा, शरिरातील रक्तस्त्राव, युद्ध, सैन्यातील सेवा, इत्यादी प्रकरणी तसेच अन्य कोणत्याही शासकीय विभागाच्या अपघात अनुदान योजनेचा लाभ घेतल्यास सदर योजना अंतर्गत लाभ मिळणार नाही. 

    या अपघातांचा समावेश :

    योजनेंतर्गत रस्ता / रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू,  विषबाधा (जंतुनाशक किंवा अन्य कारणे), विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडणे, सर्पदंश / विंचूदंश, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू, जनावरांमुळे झालेला अपघात, बाळंतपणातील मृत्यू, दंगल व इतर कोणताही अपघात प्रकारांसाठी लाभ मिळू शकतो. अनुदान मिळण्याकरीता पती/पत्नी, अविवाहित मुलगी, आई, मुलगा, वडील, सुन इतर कायदेशीर वारस या प्राधान्य क्रमानुसार असतील.

    आवश्यक कागदपत्रे :

     प्रस्ताव सादर करतांना 7/12 उतारा, मृत्यूचा दाखला, गावकामगार तलाठी द्वारा मंजूर वारसांची यादी (गाव नमुना 6 क), ओळखपत्र (आधार/पॅन/बँक पासबुक/मतदार कार्ड), वयाचा दाखला, अपघाताचा अहवाल (एफआयआर, पंचनामा, पोलिस पाटील अहवाल) इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत आवश्यक असून  प्रस्ताव 30 दिवसांत सादर न झाल्यास एका साध्या कागदावर अपघाताची सविस्तर माहिती देऊन तात्पुरता अर्ज सादर करता येतो.

  • Zilla Parishad Social Welfare Scheme । दिव्यांग व मागासवर्गीयांसाठी सोन्याची संधी!, झेरॉक्स मशीन ते ई-रिक्शा पर्यंत सर्व काही..

    Zilla Parishad Social Welfare Scheme

    Zilla Parishad Social Welfare Scheme : चंद्रपूर, दि. ०८ जुलै  : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता दिव्यांग व मागासवर्गीय नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी १५ जुलै २०२५ पर्यंत संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, आता आलं शी बॉक्स पोर्टल

    दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी अंतर्गत तीन चाकी सायकल, पांढरी काठी, श्रवणयंत्र, स्वयंचलित सायकल, कमोड चेअर, ई-रिक्शा व विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान या योजनांचा समावेश आहे. तर मागासवर्गीयांसाठी २० टक्के निधी अंतर्गत ९० टक्के अनुदानावर सबमर्सिबल पंप व ऑईल इंजिन, महिलांसाठी सोलर दिवे आणि लघुउद्योगासाठी ७५ टक्के अनुदानावर ई-रिक्शा, झेरॉक्स मशिन इत्यादींचा लाभ देता येणार आहे.

    डीबीटी प्रणाली राबवली जाणार

    या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच सर्व प्रकल्प डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे राबविले जाणार असल्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.

    अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

  • pmfby notification for Chandrapur district । चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी, विमा भरून मिळवा 60,000 रुपयांपर्यंतचे संरक्षण

    pmfby notification for Chandrapur district

    pmfby notification for Chandrapur district : चंद्रपूर, दि. 0८ जुलै : खरीप हंगाम 2025 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. सदर योजना शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, कीड प्रादुर्भाव, वाऱ्यामुळे नुकसान इत्यादींपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते.

    चंद्रपुरात महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र

    या योजनेत भात, कापूस, सोयाबीन, तुर, ज्वारी इ. पिकांसाठी विमा संरक्षण दिले जाणार आहे. भात (तांदुळ) करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 61,000 रुपये असून शेतकऱ्यांनी भरायचा हप्ता प्रती हेक्टर 1220 रुपये आहे. तसेच खरीप ज्वारी करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 33,000 रुपये असून विमा हप्ता 82 रुपये 50 पैसे व सोयाबीन करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 58,000 रुपये व विमा हप्ता 580 रुपये. तुर करीता 47,000 रुपये विमा हप्ता  117 रुपये 50 पैसे तसेच कापूस करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 60,000 रुपये व शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता 1200 रुपये प्रती हेक्टर.

    योजनेत सहभागी होण्यासाठी महत्वाचे निकष व अटी:

    योजना अंतरभूत (Notified) पिके आणि क्षेत्रांवरच लागू असेल, कृषीदार व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी दोघेही पात्र, मात्र भाडेपट्टीचे नोंदणीकृत करार अपलोड करणे बंधनकारक, ई-पीक पाहणी प्रणालीवर पिकांची नोंदणी करणे आवश्यक, शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) असणे बंधनकारक (भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई) (ईमेल: pikvima@aicofindia.com). how to apply for pmfby scheme online 2025

    योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखा किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्रा’ मार्फत आवश्यक कागदपत्रांसह हप्ता भरावा. सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी किमान 7 दिवस आधी नकारपत्र संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. pmfby registration last date 2025

    शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन पीक संरक्षणासाठी आर्थिक सुरक्षेची हमी घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी / मंडळ कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी / उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर कार्यालय या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.