Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • road repair after sewage pipeline work । 🚧 सांडपाणी पाइपलाइन नंतर रस्त्यांची झपाट्याने दुरुस्ती – चंद्रपूर मनपाने 7 कि.मी. काम पूर्ण केले!

    road repair after sewage pipeline work

    road repair after sewage pipeline work : चंद्रपूर 14 जुलै – चंद्रपूर शहरात मलनिःसारण योजना राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध भागांमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले आहे. या कामासाठी एकूण 13 किलोमीटर लांबीचे सिमेंट व डांबरी रस्ते खोदण्यात आले होते. सदर कामांमुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता, महानगरपालिकेने तात्काळ रस्ते दुरुस्तीला प्राधान्य दिले असून आतापर्यंत 7 किलोमीटर रस्त्यांचे दुरुस्तीकरण पूर्ण करण्यात आले आहे. government sewage pipeline construction under AMRUT 2.0

    बंद घर बघून घरात शिरले कोब्रा व बादशाह आणि…घडलं असं

      यासंबंधी नुकतीच मा. आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर कामाला भेट दिली होती. तसेच इतरही लोकप्रतिनिधींनी रस्ते खोदण्यासंबंधी तक्रारी दिल्या होत्या त्यानुषंगाने आयुक्त विपीन पालीवाल यांनी उर्वरीत कामे त्वरीत पूर्ण करण्याचे तसेच पावसाळा संपेपर्यंत कुठलेही नवीन काम हाती न घेण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले आहे. नागरिकांना त्रास होईल अश्या स्वरूपाचे काम निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.    

       नागरिकांना पुन्हा एकदा पूर्ववत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. स्वच्छता व पर्यावरणपूरक उपाययोजनांना चालना.शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) योजनेअंतर्गत महत्त्वाचे प्रकल्प मनपातर्फे हाती घेण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा यंत्रणा तसेच मलनिःस्सारण योजनेच्या कामासाठी शहरातील विविध भागांमध्ये अनेक रस्त्यांवर खोदकाम करावे लागले होते. या रस्त्यांचे पुनर्बांधकाम, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.

    दीर्घकालीन नियोजनाचे पाऊल

        मलनिःस्सारण योजनेअंतर्गत 32 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली असुन बालाजी वॉर्ड,ठक्कर कॉलनी, समाधी वॉर्ड,लालपेठ,बाबुपेठ येथील रस्त्यांचे काम पुर्ण करण्यात आले आहे. शहराची वाढती लोकसंख्या बघता मलनिःस्सारणाची योग्य व्यवस्था हे दीर्घकालीन नियोजनाचे पाऊल आहे.

    शहरात दुर्गंधी आणि घाणीचे प्रमाण कमी होणार

       यामुळे मोकळ्या नाल्यांमध्ये सांडपाणी जाण्याऐवजी ते प्रक्रिया केंद्रात गेल्याने शहरात दुर्गंधी आणि घाणीचे प्रमाण कमी होणार आहे. पुनर्वापर केलेले सांडपाणी बागायती,सिमेंट उद्योग,औद्योगिक वापर,वाटर स्प्रे बांधकामासाठी वापरता येईल. खुल्या नाल्यांमुळे रोगकारक जंतु व जी दुर्गंधी पसरते त्यावर मलनिःस्सारण प्रकल्पामुळे आळा घालता येऊ शकतो. तसेच यामुळे सुदृढ आरोग्य पातळीत वाढ होऊन मच्छरांचा त्रासही कमी होतो. benefits of closed sewage system    

            सदर कामांमुळे काही भागांतील नागरिकांना तात्पुरती गैरसोय झाली असली, तरी या दीर्घकालीन प्रकल्पांमुळे शहराला भक्कम व टिकाऊ पायाभूत सुविधा प्राप्त होणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

  • Govt School Achievements । 🌟 चंद्रपूर मनपा शाळांची वाटचाल यशाकडे – शिष्यवृत्ती व ॲबॅकस स्पर्धेत चमकदार कामगिरी!

    Govt School Achievements

    Govt School Achievements : चंद्रपूर 14 जुलै – पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक मनपा शाळेने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे यश मिळवले असुन शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शिष्यवृत्तीस पात्रता मिळवली आहे.

    चंद्रपूर मनपाची डेंग्यू बाबत जनजागृती

       राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेच्या उत्तीर्ण 12 पैकी इयत्ता पाचवीतील अक्षित सुहास त्रिपतीवार तर इयत्ता आठवीतील भूमिका पवन निखाडे, कल्याणी संतोष आंबटकर, करण वामन पंधरे, केसीकौर केवलसिंग भोयर,कुमकुम नितेश शास्त्रकार, रिंपा विश्वजीत मुजुमदार,रोझीना रियाझुल सिद्दिकी, सोहम राजू सोरते असे एकुण 9 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत यश प्राप्त केले आहे. तर राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत शाळेच्या आवेश हसन शेख याने प्रथम तर गणेश अनिल ठाकरे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. government school scholarship success stories

       महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी या परीक्षेत महानगरपालिकेचे हजारो विद्यार्थी सहभागी होतात. (Exam Strategy) ही परीक्षा यंदा 9 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा तसेच निकालात वृद्धी व्हावी, यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवित असतो. how teachers help students prepare for scholarship exams

    मनपा शाळातील विद्यार्थ्यांचा यशाचा आलेख

       गेल्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांचा यशाचा आलेख उंचावत आहे. शाळांमध्ये मागील काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी वर्गातच करून घेतली जाते. शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाते. तज्ज्ञ शिक्षकांमार्फत ऑनलाइन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. या नियोजनबद्ध तयारीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या यशात स्पष्टपणे दिसून येत असल्याचा विश्वास आयुक्त विपिन पालीवाल यांनी व्यक्त केला.


       आयुक्त विपिन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नागेश नित यांच्या प्रयत्नाने शाळेला यश प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविण्यात पाचवीचे वर्ग शिक्षक अजय माडोत, प्रणिता देशमुख तसेच आठवीचे वर्ग शिक्षक जोगेश्वर मोहारे, विषय शिक्षक सचिन रामटेके आणि मंगेश अंबादे यांचा मोलाचा वाटा आहे.

  • dengue prevention awareness in schools । 📚 शाळांमध्ये डेंग्यूविषयी थेट जनजागृती – डॉक्टर, शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र!

    dengue prevention awareness in schools

    dengue prevention awareness in schools : चंद्रपूर 14 जुलै –  चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू प्रतिरोधक मोहीम पुर्ण क्षमतेने राबविली जात असुन शासकीय तसेच खाजगी शाळांमध्ये मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत डेंग्यू विषयी जनजागृती केली जात आहे.  

    घरफोडी प्रकरणी बादशाह व कोब्रा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

       या जनजागृतीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, शालेय विद्यार्थी व पर्यायाने सर्व घरी कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती करण्यात येत असुन गप्पी मासे हे डेंग्यूवर कसे प्रभावी ठरतात याचे प्रात्यक्षिक आरोग्य बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांमार्फत दाखविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना डेंग्यू कसा पसरतो, त्याची लक्षणे कोणती, आणि त्यापासून बचाव कसा करायचा याबद्दल माहिती दिली जाते. तसेच, शाळांमध्ये डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, याबाबत मार्गदर्शन केले जाते.आठवड्यातुन एक दिवस पालकांच्या मदतीने पाणी साठवलेली भांडी तपासणे, कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी तपासणे, डासअळी आढळल्यास पालकांच्या मदतीने भांडे कोरडे करणे व कापडाने पुसुन घेणे इत्यादी कार्यांद्वारे डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे ही सर्व कार्ये पालकांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन केले जात आहे. weekly dry day mosquito control initiative

       28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु व 170 आशा वर्कर तसेच स्वच्छता निरीक्षक यांच्याद्वारे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे,घरातील कूलर,टायर,कुंड्या खालील प्लेट,फ्रीज खालील ट्रे,पाण्याचे ड्रम, फिश टँक, एसीचे पाणी पडणारे कंटेनर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी डासांच्या उगमस्थानांची तपासणी केली जात आहे. स्वच्छता विभागामार्फत आठवड्यातुन एकदा शहरात प्रत्येक जागी धुरळणी व फवारणी करण्यात येत आहे. गप्पी मासे प्रजनन केंद्रांची निर्मिती करण्यात येऊन पाणी साचलेल्या जागी गप्पी मासे सोडणे अथवा प्रतिबंधात्मक द्रावण सोडण्यात येत आहे. guppy fish to control mosquito larvae डासांमुळे निर्माण होणारे रोग हे धोकादायक ठरू शकत असल्याने आवश्यक ती काळजी घेण्याचे तसेच मनपास सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

    डासांची उगमस्थाने –

    पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, फ्रिज, फिश पॉट,भंगारातील वस्तु,डबे,स्वच्छ परंतु अनेक दिवसांपासुन जमा असलेले पाणी इत्यादी ठिकाणे डासांची उगमस्थाने आहेत.

    डेंग्युची लक्षणे –

    डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

    डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –

    डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी . पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा. dengue mosquito control measures

  • road construction issues । आधी काम मग खोदकाम, आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

    road construction issues

    road construction issues : चंद्रपूर – शहरातील सिवरेज लाईन आणि अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह पाहणी केली. शहरातील बहुतांश रस्ते खोदण्यात आले असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. खोदलेले रस्ते दुरुस्ती झाल्याशिवाय नवीण खोदकाम न करण्याचे सक्त निर्देश यावेळी त्यांनी अधिका-यांना दिले आहे.

    चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु

              यावेळी चंद्रपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता रविंद्र हजारे, एमजीपीचे कापसे, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदिप किरणे, दिवाकर पूटड्डवार यांच्यासह कंत्राटदारांची व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
    पाहणी दरम्यान आमदार जोरगेवार यांनी खोदलेले रस्ते व्यवस्थित दुरुस्त केल्याशिवाय पुढील कोणतेही खोदकाम सुरू करू नये. नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, आधी खोदलेले आणि निकृष्ट अवस्थेत असलेले रस्ते तातडीने डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही निर्देश दिले. amrut scheme urban

    नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

     रस्त्यांची दुरवस्था, धुळीचे लोट, वाहतुकीतील अडथळे आणि पावसाळ्यात होणारे चिखलाचे साम्राज्य यामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. कामे करताना जनतेचा त्रास कमी करण्याचे कर्तव्य प्रशासनाचे आहे. नागरिकांनीही जर डागडुजी न झाल्यास अशा नवीन खोदकामाला विरोध करावा असे आवाहनही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    शहरातील पायाभूत सुविधांशी संबंधित ही कामे महत्त्वाची असली तरी त्याच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. कामांची गुणवत्ता, वेळेत होणारी दुरुस्ती आणि योग्य व्यवस्थापन या सर्व बाबींवर लक्ष ठेवले जाईल, असे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रयतवरी कॉलरी, महाकाली कॉलरी परिसरासह शहरातील इतर भागांची पाहणी केली

  • BJP meeting former councillor for civic polls । चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपची ताकद एकत्र, जोरदार तयारी सुरू!

    BJP meeting former councillor for civic polls

    BJP meeting former councillor for civic polls : चंद्रपूर – आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी नगरसेवकांची महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना जनसंपर्क वाढविण्याच्या तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना केल्या. Kishor Jorgewar election strategy Chandrapur

    मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीम माहिती

    या बैठकीला महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजप नेते अशोक जिवतोडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, दशरथ सिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, रवी जोगी, अॅड. सारिका संदुरकर, स्वप्नील डुकरे, भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य तुषार सोम, वनिता कानडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते.

    या बैठकीत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रभागातील स्थानिक समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि नागरिकांच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली. पक्ष कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत समस्या समजून घेण्याचा आणि त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. civic issue resolution in municipal elections

    संघटितपणे काम करा

    यावेळी बोलताना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, आपण केलेले काम आता प्रभावीपणे प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवा. पक्षाचे विचार प्रत्येक घरी पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. व्यक्तिकेंद्रित काम न करता पक्ष म्हणून संघटितपणे काम करा. पक्ष, जनसंपर्क आणि परिश्रम हा निवडणूक जिंकण्याचा मंत्र आहे, असे आवाहन त्यांनी सर्व माजी नगरसेवकांना केले.

    समस्या व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घ्या

    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, आजची ही बैठक केवळ निवडणूक तयारीची नाही, तर आपल्या एकत्रित ताकदीचा आणि पक्ष संघटनेच्या दृढतेचा संकल्प करण्यासाठी आहे. आपल्या प्रत्येक प्रभागातील समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी, नागरिकांच्या अपेक्षा या सगळ्या आपण प्रत्यक्ष जाणून घेतल्या पाहिजेत. लोकांशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी सोडवणे हीच आपल्या कामाची खरी ओळख आहे. आपण एकसंघ राहून काम केले पाहिजे असे ते म्हणाले. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल तुषार सोम यांचा सत्कार करण्यात आला.

  • use of AI in municipal administration । “सरकारी कामकाजात ChatGPT, Canva, Myca AI चा वापर! काय आहे चंद्रपूर पॅटर्न?”

    use of AI in municipal administration

    use of AI in municipal administration : चंद्रपूर १२ जुलै – राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या “150 दिवस कार्यक्रम” अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने प्रशासनात नावीन्यपूर्ण बदल घडवून आणत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर विविध विभागांमध्ये सुरू केला आहे. यामुळे नागरिक सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी होण्यास मदत मिळत आहे. AI initiatives under 150 day governance program

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालात धक्कातंत्र

       मागील काही दिवसात एआयची मदत घेऊन कोण-कोणत्या विभागात कशापद्धतीने बदल घडवून कामाची गती वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत. मनपाच्या प्रत्येक विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्या विभागाचे काम कसे सुलभ करता येईल तसेच काय नावीन्यपूर्ण बदल करता येईल याचे पीपीटीद्वारे सादरीकरण आयुक्तांपुढे केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कल्पक वापर करणाऱ्या विभागांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.

            बांधकाम विभाग,पाणी पुरवठा विभाग,यांत्रिकी,कोर्ट विभाग,जनसंपर्क विभाग,आस्थापना,निवडणूक,स्टोर विभाग, अतिक्रमण ,नगर रचना,आरोग्य,स्वच्छता,ग्रंथालय ,संगणक , शिक्षण विभाग,विद्युत विभाग,समाज कल्याण ,अग्निशमन विभाग इत्यादी सर्व विभागाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

    जलद गतीने माहिती उपलब्ध होणार

       Chat-GPT,Claude ने शासकीय कामकाजाच्या टिपणी, पत्र, नोंद, संशोधन याबाबत मार्गदर्शन घेऊन काम जलद गतीने करण्यास मदत होते.‌ Notebook LM वापर शासकीय पुस्तक, जीआर किंवा माहिती असलेले कागदपत्र अपलोड करुन संक्षिप्त प्रश्नांची उत्तरे जलद गतीने शोधुन मिळण्यास मदत होते.‌ Canva व Gama चे वापर करून शासकीय कामकाजाचे पीपीटी करण्यास मदत होते आहे‌. Myca AI वापर मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी निगडीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तसेच उपचार घेण्यासाठी फायदा होतो.

       150 दिवस कार्यक्रम हे केवळ एक उद्दिष्ट नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बदल घडवण्याची दिशा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे  – आयुक्त विपीन पालीवाल

  • National Diarrhea Control Programme । 0 ते 5 वर्षाच्या मुलांकरिता चंद्रपूर महापालिकेचा आरोग्याचा महाउपक्रम!

    National Diarrhea Control Programme

    National Diarrhea Control Programme : चंद्रपूर 10 जुलै – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ‘राष्ट्रीय अतिसार नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत दिनांक 2 जुन ते 31 जुलै 2025 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असुन या कालावधीत 0 ते 5 वर्षाच्या बालकांना ओ.आर.एस.(ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन) व झिंक (Zinc) गोळ्यांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी दिली.  

    चंद्रपुरात १७५ किलो प्लास्टिक जप्त

      चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात 5 वर्षाखालील बालकांची एकुण संख्या (मुले – मुली) 19053 आहे. या सर्व बालकांना ओ. आर. एस. (ORS) व झिंक (Zinc) ची गोळी देऊन अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू शुन्य करणे, हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.अतिसारामुळे मुलांमध्ये निर्जलीकरण (dehydration) होऊन गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे या मोहिमेद्वारे योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी गृहभेटीदरम्यान प्रत्येक बालकासाठी 1 ओ.आर.एस. (ORS) पाकीट हे बाळाला भविष्यात जुलाब, शौच झाल्यास वापरण्याकरीता पालकांना वापरण्याच्या माहितीसह देण्यात येत आहे. ORS Zinc distribution program Chandrapur municipal


      या मोहिमेत मनपाच्या 7 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणात 170 आशा स्वयंसेविकांद्वारे सदर मोहीम राबविण्यात येत असुन 0 ते 5 वर्षाखालील बालकांच्या मातांना अतिसाराचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन या विषयीची माहिती गृहभेटीदरम्यान देण्यात येत आहे.  


    प्रत्येक आरोग्य केंद्रात ओ.आर.एसचे महत्व सांगणारे ओआरटी कॉर्नर स्थापित करण्यात आलेले आहे तसेच आरोग्य सेविका मार्फत आरोग्य पोषण सत्रात व शाळेत हात धुण्याच्या योग्य पद्धतीची प्रात्यक्षिके दाखवुन महत्व समजाऊन सांगण्यात येत आहे.


      या अनुषंगाने बालकांचा आजार कमी न झाल्यास अथवा अतिसाराचे प्रमाण आढळल्यास पालकांनी त्वरित जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्र / दवाखाना / रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी केले आहे.  Asha worker ORS zinc distribution Chandrapur Monsoon campaign

    अतिसाराची लक्षणे :

    बालक अधिक आजारी होत असेल.
    अस्वस्थपणा, चिडचिडेपण
    डोळे खोल जाणे
    घटाघट पाणी पिणे,सतत तहानलेले असणे
    शौचद्वारे रक्त येत असल्यास
    ताप येत असल्यास.

    अतिसाराची कारणे :

    रासायनिक आणि उघडे पदार्थ
    शिळे अन्न सेवन
    दूषित पाणी पिणे
    अन्नाचे अपचन

    आपण काय करू शकता:

    आपल्या मुलांमध्ये अतिसाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
    ORS आणि झिंकचा वापर करा.
    आपल्या मुलाला पुरेसे द्रव द्या.
    आपल्या परिसरातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा आणि त्यांना सहकार्य करा

  • chandrapur plastic crackdown action update । दुकानदाराला ₹10,000 दंड, पुढच्यावेळी थेट जेल! चंद्रपूर मनपाची इशारा मोहीम

    chandrapur plastic crackdown action update

    chandrapur plastic crackdown action update :  चंद्रपूर 10 जुलै  – भानापेठ येथील हाजी दादा हासम चिनी अँड सन्स या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 175 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.सदर व्यावसायिकावर ही तिसरी कारवाई असुन यापुढे साठा मिळाल्यास 25 हजार रुपये दंड व गुन्हा दाखल केला जाणार आहे.  

    चंद्रपूर नागपूर महामार्गावरील टोलवसुली थांबवा – खासदार धानोरकर

         चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

    मनपाची सातत्याने कारवाई

    मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. chandrapur anti plastic drive news update

    ३ महिन्याच्या कारावासाची शिक्षा

        एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,मनीष शुक्ला,राज हजारे, शुभम खोटे,शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लिवर,पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली.  

  • Dangerous old building demolished । नाहीतर मोठा अनर्थ झाला असता! जुनी इमारत अखेर पाडली

    Dangerous old building demolished

    Dangerous old building demolished : चंद्रपूर 10 जुलै – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात येत असुन कोहिनूर स्टेडियम जवळील 65 वर्षे जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.

    आमदार सुधीर मुनगंटीवार करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

         कोळसुजी पेकूजी मेश्राम यांच्या मालकीची ही इमारत असुन त्यांना सदर इमारत पाडण्याची नोटीस मनपातर्फे देण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वतः काही हालचाल न केल्याने मनपाने कारवाई करून इमारत निष्कासीत केली आहे. पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारती खाली करण्याची सूचना प्रशासनाकडून नोटीसद्वारे दिली जाते; मात्र मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात.

    रहिवाश्यांच्या जीवाला धोका

    यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. जीर्ण इमारतींचे पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. high risk building demolition by municipal corporation


        सर्व्हे पूर्ण झालेल्या सर्व जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली असुन नोटीस प्राप्त होऊनही जे धारक अश्या जीर्ण घरात राहत आहे त्यांच्यावर मनपाद्वारे कारवाई केली जात आहे. उपायुक्त संदीप चिद्रावार यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,नगर रचनाकार प्रतीक देवतळे,अतिक्रमण निर्मूलन पथक व नगर रचना विभागाने ही कारवाई पार पाडली.

  • sanitation workers rights violation Chandrapur । कामगार रडतायत… व्यवस्था मौन!, घंटागाडी कामगारांचा आक्रोश, आप’ उतरली मैदानात!

    sanitation workers rights violation Chandrapur

    sanitation workers rights violation Chandrapur : १० जुलै चंद्रपूर – चंद्रपूर : शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनाचे काम अर्बन एन्व्हायरो मॅनेजमेंट या खाजगी संस्थेला सोपविण्यात आले आहे. या अंतर्गत अनेक वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या घंटागाडी कामगारांना अलीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता आणि कोणतेही स्पष्ट कारण न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. ही बाब केवळ अन्यायकारकच नव्हे, तर मानवी हक्कांच्या विरोधात आहे.

    पाणी कराची वसुली करण्यासाठी चंद्रपुरात येणार वॉर्ड सखी

    असे असताना कंपनी व्यवस्थापकांकडून कामगारांशी सातत्याने गैरवर्तन, मेडिकल सुट्टी नाकारणे, कामाच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी न देणे यासारख्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता, असुरक्षितता आणि असंतोष वाढत चालला आहे. Chandrapur municipal contract worker dispute

    या अन्यायाविरोधात आज आम आदमी पार्टी चंद्रपूरच्या वतीने मा. महानगरपालिका आयुक्त व कामगार सहायक आयुक्त चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.

    या निवेदनात खालील ठाम मागण्या करण्यात आल्या:

    🔹 अन्यायाने कामावरून कमी केलेल्या कामगारांची तात्काळ चौकशी करण्यात यावी.

    🔹 पीडित कामगारांना १५ दिवसांच्या आत पुन्हा सेवेत बहाल करण्यात यावे.

    🔹 कंपनीच्या मनमानी कारभारावर महानगरपालिकेने लक्ष घालावे.

    🔹 कामगारांना त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळावे.

    जर वरील मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम आदमी पार्टीच्या वतीने घंटागाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.