one window scheme CMC Chandrapur
one window scheme CMC Chandrapur : चंद्रपूर 16 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सवासाठी एक खिडकी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडुन परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.
चंद्रपूर मनपाची अंतिम प्रभाग प्रारूप रचना १३ ऑक्टोबर ला
येत्या 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना असुन 1 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियमावली बाबत हमीपत्र घेऊन परवानगी दिली जाणार आहे. ऐनवेळी परवानगीसाठी अर्ज न देता लवकरात लवकर परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. Navratri pandal permission Chandrapur
महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील. सार्वजनिक मंडळाकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
एक खिडकी योजना –
सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या cmcchandrapur.com या संकेतस्थळावर quick link सदरात pandal permission 2025 येथे ही लिंक उपलब्ध आहे. अथवा https://pandal.cmcchandrapur.com/ येथे भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. यामध्ये पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विविध विभागांचे प्रतिनिधी संबंधित सादर केलेल्या अर्जांची छाननी करतील व महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.
Leave a Reply