Category: गुन्हेगारी

गुन्हेगारी (Crime) क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाची बातमी वाचा news34.in वर. चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील खून, चोरी, फसवणूक, सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळ्यांच्या ताज्या बातम्या येथे उपलब्ध आहेत. पोलीस दलाची कारवाई, न्यायप्रक्रियेतील घडामोडी आणि तपास कार्याचे सविस्तर अपडेट्स आम्ही देतो. गुन्हेगारी जगतातील सत्य आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

  • foreign liquor illegal stock raid Chandrapur । निवडणूक काळात मोठी कारवाई! ब्रह्मपुरी येथे अवैध दारूसाठा जप्त

    foreign liquor illegal stock raid Chandrapur : चंद्रपूर २९ नोव्हेम्बर (News३४) : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदीच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्रह्मपुरी तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. दिनांक १ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी दारूबंदी लागू असताना, मौजा उदापूर येथे ५ लाख १६ हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

    आदेश : चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

    विभागीय उपायुक्त गणेश पाटील (नागपूर विभाग) आणि अधीक्षक नितीन धार्मिक (चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजा उदापूर, तालुका ब्रह्मपुरी येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण नाकतोडे या व्यक्तीने अवैधरित्या दारूचा मोठा साठा घरात ठेवला असल्याची माहिती मिळाली होती.

    शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भरारी पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला असता, तिथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला. या छाप्यात विदेशी दारूच्या विविध क्षमतेच्या एकूण २२६३ बाटल्या आणि देशी दारूच्या २०० बाटल्या, असा एकूण ५ लाख १६ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. foreign liquor illegal stock raid Chandrapur

    दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे यांच्या नेतृत्वाखाली जवान सुजित चिकाटे, संजय कुमार हरिणखेडे आणि सुकेशनी कारेकार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे करीत आहेत.

  • गोवंशीय जनावरांची क्रूर वाहतूक पोलिसांनी थांबवली, २ आरोपी अटकेत

    Chandrapur Illegal Cattle Transport Case : चंद्रपूर २७ नोव्हेम्बर (News३४) – गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीवर बंदी असताना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात याप्रकारची वाहतूक बेभामपणे सुरु आहे. २६ नोव्हेम्बर रोजी विरूर पोलिसांनी गोवंशीय जनावरांची क्रूरपणे होत असलेल्या वाहतुकीवर कारवाई करीत तब्बल ७ गोवंशीय जनावरांची सुटका करीत २ आरोपीना अटक केली आहे.

    हे वाचा – निवडणुकीच्या रणधुमाळीत युवकाने काढली तलवार आणि….

    २६ नोव्हेम्बर रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर मौजा अंतरंगाव वनतपासणी नाक्यावर नाकाबंदी करीत महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH३४ BZ ७६९१ ला थांबविण्यात आले. वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये ७ गोवंशीय जनावर आढळले, त्या जनावरांना अत्यंत निर्दयीपणे कोंडून तेलंगणा राज्यात नेल्या जात होते.

    पोलिसांनी ७ गोवंशीय जनावरांची सुटका करीत आरोपी ३१ वर्षीय शेख शाहरुख शेख मेहबूब व २९ वर्षीय सोहेल अहमद शेख हुसेन दोन्ही राहणार मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर यांना अटक करण्यात आली. गोवंशीय जनावरे व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ९ लक्ष २५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीवर विरूर पोलीस ठाण्यात कलम ५(ब), ९,११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ११ (१)(सी) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष वाकडे, पोलीस कर्मचारी अफसर पठाण, विभीषण खटके, भूषण इटनकर , राहुल वैद्य व अविनाश बोरूले यांनी केली.

  • निवडणुकीच्या रणधुमाळीत तरुणाचा तलवारीने उपद्रव; पोलिसांनी पकडले!

    Bhadrawati crime news : चंद्रपूर/भद्रावती २७ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा सुरु आहे, अनेक ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चुरस वाढली आहे. या चुरशीदरम्यान भद्रावती शहरात २२ वर्षीय तरुणाने हातात तलवार बाळगत परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करीत होता, भद्रावती पोलिसांच्या सतर्कतेने त्या तरुणाला हिसका दाखवीत अटक केली.

    हे हि वाचा – चंद्रपूर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकाचं नराधमी कृत्य

    निवडणुकीच्या रणधुमाळीत भद्रावती शहरात २२ वर्षीय प्रज्वल अशोक कोडापे राहणार शिवाजी नगर हा तरुण सुमठाणा चौकात हातात तलवार बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच शहानिशा करण्यात आली. पोलिसांनी प्रज्वल कोडापे ला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक तलवार जप्त करण्यात आली.

    जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) अनव्ये शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल असे शस्त्र बाळगण्यास मनाई असताना आरोपी प्रज्वल कोडापे यांनी अआदेशाचे उल्लंघन केले असून त्याच्यावर कारवाई करीत ताब्यात घेण्यात आले. आरोपी प्रज्वल कडून लोखंडी तलवार किंमत १ हजार जप्त करण्यात आली. Bhadrawati crime news

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, जगदीश झाडे, अनुप आष्टुन्कर, विशवनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, रोहित चिटगिरे व संतोष राठोड यांनी केली.

  • Chandrapur habitual thief arrested । पोलिसांना पाच वर्षे चकवणारा चोर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला सापडला

    Chandrapur habitual thief arrested

    Chandrapur habitual thief arrested : चंद्रपूर, २५ नोव्हेंबर (News34) – तो तब्बल पाच वर्षांपासून चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांतून पोलिसांना हवा होता. मात्र तो सतत हातातून निसटत होता. दरम्यान, या काळात त्याने मंदिर, चर्च आणि दीक्षाभूमीतील बौद्ध विहारातील दानपेट्या फोडल्या. परंतु मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हा अट्टल चोर अखेर गवसला.

    स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी मोहीम सुरू केली. यादरम्यान, पोलिसांनी महाकाली कॉलरी, चंद्रपूर येथील रहिवासी ३५ वर्षीय प्रतीक उर्फ राहुल वनराज झाडे (हल्ली मुक्काम – छोटा नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने नागपूर आणि रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

    हे ही वाचा : चंद्रपुरातील शिक्षकाचं नराधमी कृत्य

    तपासात पुढे आले की, आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असून तो पाच वर्षांपासून फरार होता. या दरम्यान, त्याने दादमहलमधील हनुमान मंदिर, जयंत टॉकीजजवळील चर्च, दीक्षाभूमीतील बौद्ध विहार आणि लक्ष्मीनारायण मंदिर येथील नगदी चोरी केली.

    यासोबतच, नागपूर जिल्ह्यातील इमामवाडा आणि चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चार मोटारसायकली—होंडा ऍक्टिव्हा (MH34 AS 8353), होंडा शाईन (MH27 CK 7050), MH31 AS EX 2471, MH49 B 0358—आणि तीन मोबाईल असा एकूण ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांनी ही यशस्वी कारवाई केली.

  • चंद्रपुरातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकाचं नराधमी कृत्य

    Minor girl abuse by teacher in Chandrapur : चंद्रपूर २५ नोव्हेम्बर (News३४) : नाशिकमधील मालेगाव येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना गाजत असतानाच चंद्रपुरातही एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. जिल्हा परिषद शाळेत कार्यरत दिलीप दादाजी मडावी (५३) असे अटकेतील नराधम शिक्षकाचे नाव आहे.

    Read Also : चंद्रपुरातील या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्याला दिला मानसिक त्रास, विद्यार्थ्यांची आत्महत्या, संस्थाचालक यांच्यावर गुन्हा दाखल करा

    पीडित मुलगी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत मागील पाच वर्षांपूर्वी इयत्ता सहावीत शिकत होती. शिक्षकसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवण्याचा सल्ला मडावीने तिच्या आई-वडिलांना दिला. त्यामुळे मागील वर्षी ती मुलगी चंद्रपूर येथे शिक्षणासाठी आली. दरम्यान, त्या मुलीचे आई-वडील काही आवश्यक साहित्य त्या शिक्षकाकडे पाठवायचे.

    तेव्हा शिक्षक तिच्या रुमखाली जाऊन त्या मुलीला घरगुती सामान देण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवून तिचे शोषण करायचा. मात्र, बदनामीच्या भीतीने त्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. २० तारखेला ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय तृप्ती खंडाईत यांनी पीडित मुलीचे बयान घेत शिक्षक दिलीप मडावी याच्यावर बीएनएस (७५ (१), ६४ (२), आयएमएफ ६५ १, ३५२, ४, ६, १२ पॉक्सो ६६ (ई) ६७ (ए) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके करत आहेत. Minor girl abuse by teacher in chandrapur

    …असे आले प्रकरण उघडकीस

    नराधम शिक्षक पीडित मुलीला रात्री बाथरुममध्ये जाऊन विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करायला सांगायचा. या कॉलचे त्याने स्क्रिनशॉटसुद्धा काढले होते. २० नोव्हेंबर २०२५ रोजी चुकीने हा स्क्रिनशॉट व चॅटिंग पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाइलवर जाताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी मुलीला याबाबत विचारणा केली, तिने आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. Minor girl abuse by teacher in chandrapur

    घुग्घुस केंद्रातही तक्रार

    दिलीप मडावी याची मागील काही दिवसांपूर्वी घुग्घुस केंद्रातील एका शाळेत बदली झाली. येथेही त्याने मुलींना बॅडटच केल्याच्या तक्रारी पालकांकडे गेल्या. त्यांनी शाळा गाठून त्या शिक्षकाला चांगलेच धारेवर धरले. पोलिस ठाण्यापर्यंतही विषय गेला होता. मात्र, तक्रार झाली नसल्याची माहिती आहे. शेवटी पालकांनी त्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी केली.

  • कांपा जंगलात मोठी कारवाई! पोलिसांनी मोहा हातभट्टी नष्ट करून २.१७ लाखांचा मुद्देमाल उद्ध्वस्त

    Action against illegal Moha Hat Bhatti liquor : नागभीड २४ नोव्हेम्बर (News३४) – नागभीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत जंगल परिसरात सुरु असलेल्या अवैध मोहा हातभट्टी दारू अड्ड्याबाबत पोलिसांनी मोहीम राबवित मोहा नष्ट करण्यात आला, या मोहिमेत पोलिसांनी तब्बल २ लक्ष १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.

    नागभीड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तालुक्यातील कांपा जंगलात विविध ठिकाणी सुरु असलेल्या मोहा हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पहिल्या कारवाईत २५० लिटर मोहादारू व १ हजार ८०० लिटर मोहफूल सडवा व साहित्य जप्त करण्यात आले, या कारवाई दरम्यान २६ वर्षीय आदित्य प्रदीप उके हा पसार झाला.

    Read Also : रात्र गस्तीदरम्यान रामनगर पोलिसांनी पकडले बॅटरी चोर

    दुसऱ्या कारवाईत २०५ लिटर मोहदारू, मोहाफूल सडवा १ हजार ५०० किलो सह साहित्य जप्त केले, या कारवाई दरम्यान आरोपी २७ वर्षीय रोहित प्रकाश अलोणे हा सुद्धा पसार झाला. पोलिसांनी दोन्ही कारवाई मध्ये जप्त मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात पोउपनि अजिंक्य गोविंदलवार, पोलीस कर्मचारी किशोर देशमुख, भरत घोळवे, ज्ञानेश्वर गिरडकर, विशाल पेंदाम, संदीप मडावी व दामोदर करंबे यांनी केली.

  • रात्रीची गस्त फायद्याची! २ बॅटरी चोर ताब्यात

    police action against battery thieves : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्र्क मधून बॅटरी चोरणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक करून तब्बल ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    २३ नोव्हेम्बर रोजी फिर्यादी करण झामरे यांनी तक्रार दिली कि त्यांच्या वाहनचालकाने नादुरुस्त असलेल्या ट्र्क ला रस्त्याच्या कडेला लावून घरी गेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी कॅबीनच्या खिडक्या उघड्या होत्या, त्याठिकाणी बघितले असता ट्र्क क्रमांक MH ३४ M ८६७४ मधील लाल रंगाची बॅटरी, MH ३४ AB ३८५९ इनोव्हा कंपनीची लाल रंगाची बॅटरी व हायड्रॉलिक जॅक दिसून आला नाही. सदर माल हा अज्ञात चोराने चोरून नेला अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

    Read Also : कांग्रेसच्या माजी नगरसेवकाचा प्रताप, सुरु केला देहव्यापाराचा प्रताप

    तक्रार दाखल झाल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, नाईट गस्ती दरम्यान २ युवक हे बॅटरी घेऊन जाताना पोलिसांना आढळले, दोघांना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता त्यांनी बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली. police action against battery thieves

    आरोपी १९ वर्षीय सप्रेम लेमचंद दुर्गे राहणार MIDC हनुमान नगर चंद्रपूर व २० वर्षीय अखतर गुलाम हुसेन राहणार म्हाडा कॉलोनी दाताला यांच्याकडून दुचाकी, ५ बॅटऱ्या सह ४ हायड्रॉलिक जॅक असा एकूण ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी आनंद खरात, जितेंद्र आकरे, शरद कुडे, लालू यादव, बाबा नैताम, गजानन नागरे, रामप्रसाद नैताम, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, सुरेश कोरवार, पंकज पोंदे व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

  • नागभीड पोलिसांची कोंबडा बाजारावर धाड, ५ आरोपींविरुद्ध कारवाई

    cock fight gambling in Nagbhid taluka : नागभीड २३ नोव्हेम्बर (News३४) – २३ नोव्हेम्बर रोजी नागभीड पोलिसांनी पेंढरी शेतशिवारात सुरु असलेल्या कोंबडा बाजार अड्ड्यावर धाड मारीत कारवाई केली, यामध्ये ५ आरोपीविरुद्ध कारवाई करीत एकूण २ लक्ष ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    Read Also : स्पा सेंटरच्या नावाखाली ब्रह्मपुरीमध्ये सुरु होता देहव्यापार

    दोन कोंबड्याना आपसात भांडवीत त्यांच्यावर पैशाची बाजी लावण्याचे काम नागभीड तालुक्यातील पेंढरी शेतशिवारात सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी शेतशिवरातील नाल्याजवळ सुरु असलेल्या कोंबडा बाजार अड्ड्यावर धाड टाकली.

    यावेळी जुगार बहाद्दूर ३३ वर्षीय जाबीर हयादखान पठाण, ३६ वर्षीय रोशन यादव देव्हारे, ३० वर्षीय खुशाल उर्फ सचिन गणेश नान्हे, ४४ वर्षीय संजय रामदास माथनकर व २५ वर्षीय निखिल रवींद्र समर्थ यांना ताब्यात घेत तीन जखमी कोंबडे, दोन लोखंडी धारदार कात्या, दोरी व रोख रक्कम सह ७ दुचाकी वाहन असा एकूण २ लक्ष ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. cock fight gambling in Nagbhid taluka

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अजिंक्य गोविंदलवार, पोलीस कर्मचारी नरेश वाढाई, दिलीप चौधरी, भरत घोळवे व प्रफुल रोहणकर यांनी केली.

  • Chandrapur police bust spa prostitution । कांग्रेसच्या माजी नगरसेवकाचा प्रताप, ब्रह्मपुरीत सुरु केला देहव्यापार

    Chandrapur police bust spa prostitution

    Chandrapur police bust spa prostitution : चंद्रपूर २३ नोव्हेम्बर २५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना कांग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या देहव्यापार चालविणाऱ्या स्पा सेंटर वर स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारीत ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे.

    Read Also : चोरीच्या भीतीने महिलेने तब्बल १४५ ग्राम सोन ठेवलं वाहनात आणि झाली चोरी

    ब्रह्मपुरी शहरात मागील अनेक दिवसापासून शेषनगर मध्ये माय हेल्थ प्रो स्पा अँड वेलनेस सेंटर कांग्रेसचे माजी नगरसेवक प्रितीश बुर्ले यांनी सुरु केले होते, मात्र या स्पा सेंटर मध्ये मसाज च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. व्यवसायाला उभारी यावी याकरिता बुर्ले यांनी थेट मिझोरम व नागालँड मधून ३ महिला आणल्या होत्या. Chandrapur police bust spa prostitution

    या अवैध व्यवसायाची चाहूल स्थानिक गुन्हे शाखेला लागली, २२ नोव्हेम्बरला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी पथकासह धाड मारली, तत्पूर्वी पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये बनावट गिर्हाईक पाठविले होते. इशारा मिळताच पोलिसांनी तात्काळ धाड मारली. यावेळी पोलीस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी, समाजसेविका व पंच उपस्थित होते.

    ३ महिलांची सुटका, मालक फरार

    या कारवाईत पोलिसांनी ३ महिलांची सुटका करीत स्पा सेंटरचा मॅनेजर २४ वर्षीय करण गंगाधर मोहजनकर राहणार पांजरेपार नागभीड याला ताब्यात घेत रोख रक्कम, मोबाईल, रजिस्टर, पावती बुक स्कॅनर व कंडोम पॉकेट असा एकूण १८ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्पा सेंटरचा मालक कांग्रेसचे माजी नगरसेवक प्रितीश बुर्ले फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपीविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,७ अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Chandrapur police bust spa prostitution

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी प्रमोद बानबले, सपोनि शीतल खोब्रागडे, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्व्हेश बेलसरे, पोलीस कर्मचारी जयंत चुनारकर, नितेश महात्मे, छाया निकोडे, निराशा तितरे, अपर्णा मानकर, प्रफुल पारघाटे, प्रदीप मडावी, अजित शेंडे, सुमित बर्डे, दिनेश आराडे, समाजसेविका सरिता मालू, माया सुनील मेश्राम, हर्षा बानोडे सह ब्रह्मपुरी पोलीस यांनी केली.

  • sand smuggling arrest Gondpipri । गोंडपिंपरी पोलिसांची धडक कारवाई! अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

    sand smuggling arrest Gondpipri

    sand smuggling arrest Gondpipri : गोंडपिंपरी २२ नोव्हेम्बर (News 34) – गोंडपिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा राळापेठ येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर आणि रेतीसह एकूण ₹ ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

    Read Also : भंगार चोरणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    नाकाबंदीत ट्रॅक्टर पकडला

    पोलीस स्टेशन गोंडपिंपरी येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौजा राळापेठ परिसरातून ट्रॅक्टरद्वारे अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने राळापेठ येथे नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान, MH 34 CR 3382 क्रमांकाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर अवैधरित्या, कोणत्याही प्रकारच्या आवश्यक परवान्याशिवाय रेतीची वाहतूक करताना आढळून आला.

    चालक-मालकावर गुन्हा दाखल

    पोलिसांनी तात्काळ ट्रॅक्टर चालक तथा मालक सुनील भैयाजी ताजने (वय ५०, रा. राळापेठ, तालुका गोंडपिंपरी) यास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹ ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात खालील वस्तूंचा समावेश आहे.

    • महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली: अंदाजे किंमत ₹ ५,००,०००/-
    • १ ब्रास रेती: अंदाजे किंमत ₹ १०,०००/-
    • एकूण जप्त किंमत: ₹ ५,१०,०००/-

    अवैध रेती वाहतुकीप्रकरणी आरोपीविरुद्ध गोंडपिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.