जनता कॅरिअर लॉन्चर आत्महत्या प्रकरण; संस्थाचालकावर गुन्हा दाखल करा – युवासेना

Education institute student suicide updates : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या जनता करिअर लॉन्चर च्या वसतिगृहात २० नोव्हेम्बर रोजी प्रथमेश गुलाब सुदरी या १७ वर्षीय मुलाने वसतिगृह व जनता करिअर लॉन्चर मधील प्राचार्य द्वारा होणाऱ्या मानसिक छळापायी गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटकही झाली आहे. सदर आत्महत्या प्रकरणी जचांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष व सचिवावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.

Read Also : जनता कॅरिअर लॉन्चर च्या वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या

चंद्रपूर तालुक्यातील लहान गावातून मोठी स्वप्ने बाळगत शेतकऱ्याने आपल्या मुलाला जनता करिअर लॉन्चर मध्ये शिकवणी साठी पाठवलं, मुलाने गावाच्या वातावरणापासून शहरात जनता करिअर लॉन्चर च्या वसतिगृहात राहत पुढील शिक्षण घ्यावं अशी कुटुंबाची इच्छा होती. मात्र शिक्षण क्षेत्रातील गुरु ने प्रथमेश चे स्वप्न धुळीस मिळवीत त्याला टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडलं. Education institute student suicide updates

प्रथमेश ने याबाबत वडिलांना तक्रार केली होती, यासह त्याला होणाऱ्या त्रासावर व्यवस्थापनाला सुद्धा तक्रार केली अशी माहिती सहारे यांनी दिली, मात्र प्रथमेश च्या तक्रारींवर संस्थाचालक व व्यवस्थापनाने कानाडोळा करीत कारवाई केली नाही, जर आधीच प्रथमेश च्या तक्रारींवर कारवाई झाली असती तर तो आज हयात असता.

निवेदनामार्फत विक्रांत सहारे यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि पोलीस अधीक्षक विद्यर्थ्यांच्या तक्रारींवर मानसिक छळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकाद्वारे कसलीही कारवाई न करता त्यांना अभय देण्याचं काम अध्यक्ष व सचिव यांनी केल्याने सदर प्रकरणात दोघांवर चौकशी करून गुन्हा दाखल करीत मृतक प्रथमेश च्या पालकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *