रात्रीची गस्त फायद्याची! २ बॅटरी चोर ताब्यात

police action against battery thieves : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्र्क मधून बॅटरी चोरणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक करून तब्बल ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

२३ नोव्हेम्बर रोजी फिर्यादी करण झामरे यांनी तक्रार दिली कि त्यांच्या वाहनचालकाने नादुरुस्त असलेल्या ट्र्क ला रस्त्याच्या कडेला लावून घरी गेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी कॅबीनच्या खिडक्या उघड्या होत्या, त्याठिकाणी बघितले असता ट्र्क क्रमांक MH ३४ M ८६७४ मधील लाल रंगाची बॅटरी, MH ३४ AB ३८५९ इनोव्हा कंपनीची लाल रंगाची बॅटरी व हायड्रॉलिक जॅक दिसून आला नाही. सदर माल हा अज्ञात चोराने चोरून नेला अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

Read Also : कांग्रेसच्या माजी नगरसेवकाचा प्रताप, सुरु केला देहव्यापाराचा प्रताप

तक्रार दाखल झाल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, नाईट गस्ती दरम्यान २ युवक हे बॅटरी घेऊन जाताना पोलिसांना आढळले, दोघांना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता त्यांनी बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली. police action against battery thieves

आरोपी १९ वर्षीय सप्रेम लेमचंद दुर्गे राहणार MIDC हनुमान नगर चंद्रपूर व २० वर्षीय अखतर गुलाम हुसेन राहणार म्हाडा कॉलोनी दाताला यांच्याकडून दुचाकी, ५ बॅटऱ्या सह ४ हायड्रॉलिक जॅक असा एकूण ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी आनंद खरात, जितेंद्र आकरे, शरद कुडे, लालू यादव, बाबा नैताम, गजानन नागरे, रामप्रसाद नैताम, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, सुरेश कोरवार, पंकज पोंदे व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *