Category: गुन्हेगारी

गुन्हेगारी (Crime) क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाची बातमी वाचा news34.in वर. चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील खून, चोरी, फसवणूक, सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळ्यांच्या ताज्या बातम्या येथे उपलब्ध आहेत. पोलीस दलाची कारवाई, न्यायप्रक्रियेतील घडामोडी आणि तपास कार्याचे सविस्तर अपडेट्स आम्ही देतो. गुन्हेगारी जगतातील सत्य आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

  • चंद्रपुरात आले ९० हजारांच्या नायलॉन मांजाचे पार्सल

    nylon manja sale raid : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर चंद्रपूर जिल्हातील पोलीस प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम करीत आहे. सदर धंदा पोलिसांच्या नजरेत येऊ नये यासाठी विक्रेते नायलॉन मांजा थेट पार्सलद्वारे मागवीत आहे. असाच एक प्रकट १५ डिसेंबर रोजी चंद्रपुरात उघडकीस आला. (नायलॉन मांजा विक्रेते स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर)

    रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली कि एकाने नायलॉन मांजा बाहेरून बोलावला असून आज त्याची डिलिव्हरी होणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी जय महाराष्ट्र कार्गो मूव्हर मधून एका इसमाला नायलॉन मांजाचे पार्सल घेऊन जाताना थांबविले. गुन्हे शोध पथकाने त्या इसमाची झडती घेतली असता सदर पार्सल मधील खोक्यात ६० प्लॅस्टिक चक्री mono ktc fighter किंमत प्रत्येकी १५०० रुपये असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी २३ वर्षीय प्रतीक अरुण नागपुरे राहणार बालवीर वॉर्ड राजनला टॉकीज च्या मागे चंद्रपूर याला ताब्यात घेतले.

    आरोपीवर पर्यावरण संरक्षण अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. nylon manja sale raid

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि देवाजी नरोटे, हिमांशू उगले, पोलीस कर्मचारी जितेंद्र आकरे, रामप्रसाद नैताम, आनंद खरात, शरद कुडे, लालू यादव, मनीषा बावणे, संदीप, पंकज पोंदे, सुरेश कोरवार, रवीकुमार ढेंगळे, प्रफुल, पंकज व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

  • स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांच्या छापेमारीत ७७ हजारांचा प्रतिबंधित मांजा जप्त

    Banned Nylon manja :चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – मानवी जीवितास धोकादायक असणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर चंद्रपूर पोलिसांचे कारवाई सत्र सुरु आहे. १२ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ७७ हजारांचा नायलॉन मांजा जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे वाचा – स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर नायलॉन मांजा, ५० हजारांचा मांजा जप्त)

    स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत वरोरा शहरातील आझाद वॉर्ड मध्ये नायलॉन मांजाची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने मानवी जीवितास व पर्यावरणास धोकादायक असलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा ४५ मग चक्री किंमत ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदर नायलॉन मांजा विक्री करीता साठवून ठेवला होता, पोलिसांनी ४० वर्षीय गीता तुळशीराम पानघाटे यांच्यावर कलम २२३, २९२, ४९ व पर्यावरण संरक्षण अधिनियम ५, १५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

    दुसऱ्या कारवाईत चंद्रपूर शहरातील रामनगर मध्ये गुन्हे शोध पथकाने छापेमारी करीत एका जनरल स्टोर्स मध्ये विक्री करिता साठवून ठेवलेला मोनोकाईट फायटर, मोनोफिल गोल्ड व हिरो प्लस प्रतिबंधित नायलॉन मांजा किंमत २३ हजार ४०० जप्त करण्यात आला. Banned Nylon manja

    या कारवाईत जनरल स्टोर्स चालक २५ वर्षीय गौरव हेमराज गोटेफोडे यांच्यावर विविध कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या दोन्ही कारवाईत एकूण ७७ हजारांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख, सपोनि नरोटे, वाघमारे, उगले, पोउपनि सर्वेश बेलसरे यांनी केली.

  • भिसी पोलिसांची कारवाई: ६.५ लक्षांचा गौण खनिज मुद्देमाल जप्त

    Bhişi Police Action : चंद्रपूर/भिसी – १३ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करीत २ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून या कारवाईत ६ लक्ष ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (हे हि वाचा – चंद्रपुरात नायलॉन मांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर)

    ११ डिसेंबर रोजी भिसी पोलिसांना गौण खनिजाची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी भिसी ते जांभुळघाट जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी केली. यावेळी विना क्रमांकाची एक ट्रॅक्टर ट्रॉली येताना पोलिसांना दिसली, वाहनाला थांबत झडती घेतली असता १ ब्रास गौण खनिज रेती आढळून आली.

    भिसी पोलिसांनी यावेळी २९ वर्षीय वैभव प्रकाश कुंभरे राहणार बोळधा व ५२ वर्षीय लक्ष्मण मारोती शिवरकर राहणार पारडपार यांच्या विरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत एकूण ६ लक्ष ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Bhişi Police Action

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल बारापात्रे यांच्या नेतृत्वात पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोलीस कर्मचारी अजय बगडे, बाळकृष्ण जिभकाटे, सतीश झिलपे व वैभव गोहणे यांनी केली.

  • नायलॉन मांजा विक्रेते रडारवर! LCB ची चंद्रपुरात छापेमारी; ५० हजारांचा मांजा जप्त

    Nylon Manja Raid Chandrapur : चंद्रपूर १२ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा प्रतिबंधित नायलॉन मांजा विरोधात कारवाई मोहीम राबवित आहे, १२ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरातील बॉम्बे प्लॉट राजीव गांधीनगर व इंदिरानगर भागात छापेमारी करीत प्रतिबंधित नायलॉन मांजाचा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (हे हि वाचा – मूल शहरात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची कारवाई)

    अवैध धंदे, जुगार व नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात गस्तीवर असताना पोलिसांना नायलॉन मांजा बाबत गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बॉम्बे प्लॉट, राजीव गांधी नगर मध्ये मनीष सुरेश राऊत यांच्या कडे धाड मारली असता विविध रंगाच्या एकूण २४ नग किंमत २४ हजार रुपये विविध रंगाच्या प्लास्टिक चक्रीत गुंडाळलेला प्रतिबंधित मांजा जप्त करण्यात आला.

    ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

    दुसऱ्या कारवाईत बॉम्बे प्लॉट इंदिरानगर मधील ५२ वर्षीय एकनाथ केशव चवरे यांच्याकडून २६ नग प्लास्टिक चक्रीवर गुंडाळलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा किंमत २६ हजार रुपये जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाईत एकूण ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपनवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता व छाया निकोडे यांनी केली.

  • नायलॉन मांजामुळे धोका वाढतोय; चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम सुरू

    police crackdown manjha : चंद्रपूर ११ डिसेंबर (News३४) – मकरसंक्रांती पूर्व पतंगप्रेमी आतापासून पतंगोत्सव सुरु करतात मात्र यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नायलॉन मांजाची विक्रीवर आळा यावा याकरिता चंद्रपूर पोलीस विभागाने मूल व दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई केली.

    १० डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर पथकाने केली, मुल पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना नायलॉन मांजा बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. (हे हि वाचा – बल्लारपूर मध्ये देशी कट्ट्याचा सुळसुळाट)

    नागोसे मोहल्ला मूल या भागात राहणाऱ्या २० वर्षीय साहिल नागोसे यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता पतंग उडविण्याकरिता वापरण्यात येणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा ३४ मग प्लास्टिक चक्री किंमत १७ हजार रुपये जप्त करण्यात आला. आरोपी साहिल नागोसे वर पोलीस स्टेशन मूल मध्ये कलम २२३, २९२, ३३६ व ५६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. police crackdown manjha

    दुसऱ्या कारवाईत दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विधी संघर्ष बालकाकडून मानवी जीवितास व पर्यावरणास धोकादायक असलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजा mono kite fighter ३० मग प्लास्टीकी चक्री किंमत ३० हजार रुपये जप्त करण्यात आला. विधी संघर्ष बालकाने प्रतिबंधित नायलॉन मांजाचा अवैध साठा करून ठेवला होता. या प्रकरणी एकूण ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि दुर्गापूर पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोउपनि संतोष निंभोरकर, धनराज करकाडे, अजित शेंडे, प्रफुल गारघाटे, पोउपनि प्रवीण बिंकलवार, शार्दूल, मोरेश्वर गोरे, मंगेश शेंडे व सोनल खोब्रागडे यांनी केली.

    जिल्ह्यात कुठेही व्यापारी नायलॉन मांजा विक्री करीत असले किंवा साठवणूक केला असेल त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्ष ११२ वर तात्काळ संपर्क करावा असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

  • चंद्रपूर शहरात घरफोडीची मालिका! कायद्याचे तीनतेरा

    Chandrapur burglary incident : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरातील विविध भागात घरफोडीच्या घटनेत वाढ होत असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले दिसत आहे. शहरातील जटपुरा भागात एकाचवेळी दोन ठिकाणी घरफोडी झाल्या, यानंतर रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नगिनाबाग मध्ये ९ डिसेंबर रोजी घरफोडीची घटना उघडकीस आली यामध्ये लाखोंच्या मुद्देमालावर अज्ञाताने हात साफ केला आहे.

    ३३ वर्षीय मयूर खोब्रागडे यांच्या सिस्टर कॉलोनी, नगिनाबाग येथील घरी घरफोडी झाली, ज्यावेळी हि घटना घडली तेव्हा घरी कुणी नव्हते. मयूर खोब्रागडे हे नागपुरात नोकरी करीत असून सध्या ते नागपुरात राहतात, त्यांच्या चंद्रपुरातील घरी आई व भाऊ सह वहिनी राहते. (हे वाचा – जटपुरा गेट भागात एकाच दिवशी दोन घरफोड्या)

    ७ डिसेंबर ला मयूर यांचा भाऊ अश्रूत हा घराला कुलूप लावून नागपूरला गेला होता, तेव्हापासून तो नागपुरात होता, ९ डिसेंबर रोजी शेजारी यांचा कॉल आला कि मुख्य दारावरील कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आहे अशी माहिती दिली. Chandrapur burglary incident

    आपल्या घरी चोरी झाली असा अंदाज व्यक्त करीत मयूर चंद्रपूरला कुटुंबासह आले असता, घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते, बेडरूम मधील कपाट बघितले असता त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लक्ष १३ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

    ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान अज्ञाताने घरी कुणी नसल्याचा फायदा घेत दरवाजाचा कोयंडा तोडून घरी प्रवेश करीत चोरी केली. याबाबत मयूर यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम ३०५, ३३१ (२) व ३३१ (४) अनव्ये गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे.

  • अंधाराचा फायदा घेत तो घरात शिरला आणि…

    crime against women : भद्रावती १० डिसेंबर २०२५ (News३४) – २९ वर्षीय विवाहित महिलेच्या घरी प्रवेश करून मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत त्या महिलेचा हात पकडत महिलेच्या अंगाला स्पर्श करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा भद्रावती पोलिसांनी दाखल केला आहे. (हे वाचा – जटपुरा गेट परिसरात एकाच दिवशी दोन घरफोड्या)

    ९ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता महिला घरी एकटी होती महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेल्याने संधीचा फायदा घेत भाऊराव उरकांडे ने सदर महिलेच्या घरी प्रवेश करीत दाराची कडी आतून लावली. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत त्या महिलेचा भाऊराव ने हात पकडला. त्याने तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न सुद्धा केला. crime against women

    इतक्यात पीडित महिलेचा पती घरी आला, पटीने दार ठोठावले असता भाऊराव ने घाबरत पळ काढला. या सर्व प्रकाराबाबत महिलेने भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली. पोलिसांनी भाऊराव उरकांडे यांच्यावर कलम ३२९ (४) व ७५ (१) (i) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

  • चंद्रपूरमध्ये जटपुरा वॉर्डात दुहेरी घरफोडी! ६२ हजारांचा मुद्देमाल चोरी

    Chandrapur double burglary : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरातील जटपुरा वार्डात दोन ठिकाणी घरफोडीची घटना घडली असून यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व लॅपटॉप असा एकूण ६७ हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला, शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. (हे वाचा – ब्रह्मपुरीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल, ३ आरोपींवर गुन्हा दाखल)

    एकाच दिवशी २ घरफोड्या

    पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी २९ वर्षीय निलेश खाडिलकर राहणार जटपुरा वॉर्ड हे ६ डिसेंबर रोजी सकाळी कुटुंबासह घराला कुलूप लावत गडचिरोली मध्ये कार्यक्रमानिमित्त गेले होते, ८ डिसेंबर रोजी सकाळी निलेशच्या काकांनी माहिती दिली कि घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आहे, माहिती मिळाल्यावर निलेश कुटुंबासह घरी आला असता घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत होते. लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल चोरी झाला. अशी माहिती निलेश ने पोलिसांना दिली. Chandrapur double burglary

    ६२ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ

    दुसरी घटना निलेश खाडिलकर यांचे शेजारी नयन दिवाकर मोहुर्ले यांच्या घरी चोरी झाली, ७ डिसेंबरला नयन मोहुर्ले हे ड्युटीवर गेले होते, ८ डिसेंबर ला सकाळी नयन घरी पोहोचले असता तर त्यांच्या घराचेही दारावरील कुलूप तुटलेल्या अवस्थेत होते. घरातील बेडवरील ठेवलेला लॅपटॉप व रोख रक्कम असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला होता.

    दोन्ही घरफोडीच्या घटना एकाच दिवशी घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले कि काय? असे प्रश्न उपस्थित झाले आहे. घरफोडीच्या दोन्ही घटनेत एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असल्याची तक्रार शहर पोलीस ठाणे चंद्रपूर मध्ये देण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञातांवर कलम ३०५, ३३१ (४) व ३३१ (३) अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे.

  • कत्तलीसाठी नेणारी २० जनावरे वाचली; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

    animal cruelty Transport : ब्रह्मपुरी ९ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने ८ डिसेंबर रोजी कत्तलीसाठी नेणारे व बांधून ठेवलेल्या २० जनावरांची सुटका करीत तब्बल २४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली, माहितीच्या आधारे दोन पिकअप वाहने थांबवित झडती घेतली असता वाहनात ६ गोवंशीय जनावरे मिळून आले. (हे हि वाचा – तंबाखू माफियांवर होणार मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री फडणवीस)

    कत्तलीसाठी नेत होते जनावरे

    सदर गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे चालकांनी सांगितले, व अजून काही जनावरे असल्याची त्यांनी माहिती दिली, चालकांनी सांगितलेल्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पथक पोहचले असता तिथे १४ गोवंशीय जनावरे बांधलेल्या अवस्थेत होते. animal cruelty Transport

    ३ आरोपींवर गुन्हा दाखल

    आरोपीच्या ताब्यातून २० गोवंशीय जनावरे सहित दोन पिकअप वाहने असा एकूण २४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी २० वर्षीय मिलिंद जितेंद्र कोवे राहणार उदापूर ब्रह्मपुरी, ३३ वर्षीय अफसर अली सय्यद ब्रह्मपुरी व पाहिजे असलेला आरोपी पहेलवार राहणार ब्रह्मपुरी यांच्या विरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० व कलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम ४९ अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी जयंत चुनारकर, अजित शेंडे व नितेश महात्मे यांनी केली. घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.

  • बल्लारपूरमध्ये ‘देशी कट्ट्यांचा’ सुळसुळाट! आठवड्यात ३ शस्त्र जप्त

    illegal weapons crackdown : बल्लारपूर ८ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात एकाच आठवड्यात ३ देशी कट्टे पोलिसांच्या कारवाई दरम्यान मिळाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे सदर कट्टे हे एकट्या बल्लारपूर शहरात पोलीस कारवाईत जप्त करण्यात आले आहे.

    ७ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना एक युवक स्वतःजवळ अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी बल्लारपूर ते सास्ती जाणाऱ्या रोडवरी कब्रस्तान जवळ एक संशयास्पद असलेला इसम आढळला, पोलीस पथकाने त्या इसमाला ताब्यात घेतले. (हे वाचा – बल्लारपुरात दोन बंदुकी जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांची कारवाई)

    ३२ वर्षीय सलमान उर्फ राज सलीम खान राहणार भगतसिंग वॉर्ड बल्लारपूर असे त्या युवकाचे नाव, पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता एक लोखंडी अग्निशस्त्र ज्याची लांबी १९.५ सेमी व बॅरेलची लांबी हि १५ सेमी होती. किंमत एकूण ८ हजार रुपये. गुन्हे शाखेच्या पथकाने सलमान वर पुढील कारवाईसाठी बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. बल्लारपूर पोलिसांनी आरोपीवर भारतीय हत्यार कायदा अन्व्ये गुन्हा दाखल करीत अटक केली. illegal weapons crackdown

    बल्लारपुरात स्थानिक युवक देशी कट्टे, पिस्टल हे आता फॅशन म्हणून वापरायला लागले आहे, नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी तरुण एक नवा उच्छाद या माध्यमातून मांडत असल्याचे चित्र आहे, अजूनही अनेकांकडे विनापरवाना शस्त्र असल्याची माहिती आहे. एकाच आठवड्यात गुन्हे शाखेने २ तर बल्लारपूर पोलिसांनी १ अग्निशस्त्र जप्त केले आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी सचिन गुरनुले, जय सिंग, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, शेखर माथनकर, दिनेश अराडे यांनी केली.