Category: गुन्हेगारी

गुन्हेगारी (Crime) क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाची बातमी वाचा news34.in वर. चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील खून, चोरी, फसवणूक, सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळ्यांच्या ताज्या बातम्या येथे उपलब्ध आहेत. पोलीस दलाची कारवाई, न्यायप्रक्रियेतील घडामोडी आणि तपास कार्याचे सविस्तर अपडेट्स आम्ही देतो. गुन्हेगारी जगतातील सत्य आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

  • गोलबाजार हत्या प्रकरणातील आरोपीला अवघ्या 3 तासात अटक

    News34

    चंद्रपूर – 3 सप्टेंबर ला सकाळी 7 वाजताच्या सुमारास शहरातील गोलबाजार परिसरात 65 वर्षीय मधुकर मंदेवार यांचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली.

    विठ्ठल मंदिर भागात राहणारा मृतक मधुकर हा भिख मागायचा, गोल बाजार परिसरात त्याची ओळख नामदेव म्हणून होती.

    शनिवारी रात्री तो गोलबाजार येथील भाजी मार्केट परिसरात झोपी गेला मध्यरात्री नंतर अज्ञात इसमाने त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करीत हत्या केली.

    सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मधुकर चा मृतदेह नागरिकांना आढळल्यावर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत हे ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते.

    त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार आपल्या चमुसहित गोलबाजार परिसरात दाखल झाले.

    एका भिखाऱ्याची हत्या कोण कशाला करणार? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने आरोपी 43 वर्षीय अजय शालीकराम याला अवघ्या 3 तासात अंचलेश्वर गेट परिसरातून अटक केली.

    आरोपी आपल्याचं धुंदीत…

    स्थानिक गुन्हे शाखेने चौकशी केल्यावर आरोपीला शहर पोलीस ठाण्यात आणले, त्यानंतर अधिक चौकशी केली असता आरोपी अजय ने पोलिसांसमोर गुन्हा कबूल करीत पैसे जवळ नसल्याने लुटमारी करण्याच्या उद्देशाने तो गोल बाजारातील भाजी मार्केट परिसरात गेला, तिथे कुणी न आढळल्याने मधुकर त्याठिकाणी झोपलेल्या अवस्थेत होता, अजय ने मधुकर ची झडती घेत पैसे लुटण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांची यावेळी चांगलीच झटापट झाली, अखेर आरोपीने तीक्ष्ण हत्याराने मधुकर च्या गळ्यावर वार करत तिथून पळ काढला.

    विशेष बाब म्हणजे आरोपीला ताब्यात घेतल्यावर तो पोलिसांसमोर रक्षाबंधनाच गाणं म्हणत होता.

    आरोपी अजय शालीकराम कोण?

    आरोपी अजय शालीकराम यांच्यावर दुचाकी वाहन चोरीचे तब्बल 5 गुन्हे दाखल आहे, 2 दिवसांपूर्वी तो कारागृहातून सुटून आला होता, सुटून आल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याने हत्येसारखा गंभीर गुन्हा केला, त्यावेळी तो नशेत होता अशी माहिती आहे.

    या संपूर्ण गुन्ह्याचा अतिशय जिकरीने तपास करीत गुन्हा उघडकीस आल्यानंतर अवघ्या 3 तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली.

    सदर हत्येच्या तपासात अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपुत यांनी महत्वाची भूमिका बजावली.

  • चंद्रपूर शहरातील गोलबाजारात हत्या

    News34

    चंद्रपूर – 3 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरातील गोल बाजार परिसरात भिख मांगणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली.

    65 वर्षीय मधुकर मंदेवार रा. विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे, गोल बाजार परिसरात मधुकर हा भिक मांगत होता.

     

    सदर घटना ही सकाळी 7 ते 7.30 च्या दरम्यान उघडकीस आली, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे, मृतक मधुकर वर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची माहिती आहे.

    गोल बाजार परिसरातील दुकानदार मधुकर ला नामदेव म्हणून हाक मारीत होते, मात्र आता या घटनेनंतर बाजार परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    शहर पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजपूत आदि दाखल झाले होते.

  • चंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर तिघांनी केला अत्याचार

    News34 crime

    चंद्रपूर – शहरातील दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे,

    19 ऑगस्टला दुपारी 2 वाजताच्या सुमारास पीडित मुलीची आई कामावरून घरी परतली असता पीडित मुलगी घरी आढळून आली नाही, मुलीचा घराशेजारी व वार्डात शोध घेण्यात आला मात्र ती कुठेही आढळून आली नसल्याने कुणीतरी तिला फुस लावून पळविले असा संशय आईला आला त्यांनी याबाबत दुर्गापुर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. चंद्रपुरात गोमांस विक्री, तिघांवर गुन्हा दाखल

    पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली असता दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी आढळून आली, सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांनी मुलीचे बयान नोंदविले असता मुलीने धक्कादायक माहिती दिली.

    19 ऑगस्टला सकाळी 10 वाजताच्या सुमारास सर्वेश हिवराळे व गौरव शंखावार यांनी पीडित मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानलेल्या ताईच्या रूम वर नेले, त्यावेळी सर्वेश हिवराळे रूम चे दार आतून बंद करीत पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

    त्यानंतर आशिक उराडे व गौरव शंखावार ने किरायाच्या रूमवर नेत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला, पीडित मुलीच्या बयानावरून आरोपी इंदिरा नगर चंद्रपूर निवासी 21 वर्षीय गौरव रमेश शंखावार, रामकृष्ण चौक वानखेडे वाडी तुकुम येथे राहणारा 19 वर्षीय आशिक संदीप उराडे व पोलीस वसाहत तुकुम येथे राहणारा 22 वर्षीय सर्वेश सुरेश हिवराळे यांच्यावर 376, 363 व पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.

    पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

  • त्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा – सुनीता पाटील

    News34

    चंद्रपूर – वरोरा शहरात पोलिसांनी अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलत तिच्याकडून देहविक्री चा व्यापाराचे मोठे नेटवर्क उघडकीस आणत त्या प्रकरणात अनेकांना अटक केली. Viral videos

    मात्र वरोरा तालुक्यातील काही तथाकथित नेत्यांनी त्या पीडित अल्पवयीन मुलींची भेट घेत तिच्यासोबत आक्षेपार्ह विचारणा करीत व्हिडीओ बनविला ते तितक्यावरचं थांबले नाही तर त्यांनी तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला, त्यामुळे पीडित मुलीची ओळख त्यांनीं पटवून दिली. Sex racket

    अत्याचार पीडित कोणत्याही प्रकरणात पीडितेची ओळख बाहेर आणणे हा मोठा गुन्हा आहे असे असताना सुद्धा मेश्राम व जीवतोडे यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना कठोर शिक्षा व्हावी अश्या मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर महिला अध्यक्ष एड. सुनीता पाटील यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना केली आहे.

    त्या व्हायरल व्हिडीओ मध्ये मेश्राम हे तिला आक्षेपार्ह विचारणा करीत जणू त्या अल्पवयीन मुलीची खिल्ली उडवीत आहे असे दिसत होते, अश्या विकृत मानसिकतेच्या तथाकथित नेत्यांवर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून पुन्हा कुणी असे कृत्य करणार नाही अशी मागणी चंद्रपूर महिला अध्यक्ष सुनीता पाटील, महिला उपाध्यक्ष जासमिन शेख, महिला पदाधिकारी राणी जैन, लक्ष्मण पाटील व अजय आंबेकर यांनी केली आहे.

    वरोरा प्रमाणे चंद्रपूर शहरात सुद्धा असे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती सुनीता पाटील यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना दिली आहे.

     

  • वरोरा पोलिसांची गंभीर गुन्ह्यात दमदार कामगिरी

    News34

    चंद्रपूर/ वरोरा – बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना वरोरा पोलिसांना अल्पवयीन मुलगी आढळली आणि शहरातील मोठं देहव्यापाराचे नेटवर्क उघडे पडले.

    अल्पवयीन मुलीला देह व्यापारात महिला व पुरुष एजंटने ढकलत तिला विविध ग्राहकांकडे पाठविण्यात आले होते, मात्र हे सर्व नेटवर्क पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांनी उघडकीस आणले.

    या प्रकरणात 13 आरोपीना अटक करण्यात आली होती, बुधवारी न्यायालयाने आरोपीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    या प्रकरणात आरोपीच्या आई वडिलांनी पत्रकार परिषद घेत पोलीस विभागावर गंभीर आरोप केले, निव्वळ फोन कॉल व ऑनलाइन पैसे दिल्याने आमची मुलं आरोपी कसे असा प्रश्न पत्रकार परिषदेत करण्यात आला, आम्हाला आमच्या मुलांना पोलीस विभाग भेटू देत नसल्याचे पत्रकार परिषदेत आरोपी युवकांच्या आई वडिलांनी सांगितले.

    चंद्रपूर जिल्ह्यात पत्रकाराची आत्महत्या

    याबाबत पोलिसांनी आमच्याकडे अटक करण्यात आलेल्या आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याची माहिती दिली आहे, विशेष म्हणजे काही आरोपींवर गंभीर गुन्हे सुद्धा दाखल असल्याची माहिती आहे.

    अन्य आरोपींनी अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला.
    पोलिसांकडे विविध ठिकाणी आणि वाहनात केलेल्या जघन्य गुन्ह्याशी संबंधित आरोपींविरुद्ध व्हिडिओ फुटेज आणि भरपूर पुरावे आहेत. पडताळणीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

    पीडित मुलीचा व्हिडीओ व्हायरल

    या प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीसोबत एका तथाकथित नेत्याने आक्षेपार्ह संभाषण करीत व्हिडीओ व्हायरल केला आणि त्या मुलीची ओळख जनमानसात प्रसिद्ध केली या प्रकरणी रमेश मेश्राम व इतर दोघांविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    देहव्यापारासारख्या गंभीर गुन्ह्यात वरोरा पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी बजावीत प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळले, गुन्ह्यात सहभागी आरोपीना अटक तत्परता दाखवली.

    या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास भद्रावती पोलीस निरीक्षक विपीन इंगळे करीत आहे.

  • वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात हाय व्होल्टेज ड्रामा

    News34 breaking

    वरोरा/ छेडछाडी प्रकरणी सातत्याने चार आरोपींना अटक करण्याची मागणी करणाऱ्या महिलेने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केल्याने वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारात खळबळ उडाली.

    वरोरा तालुक्यातील गावात राहणाऱ्या पीडित महिलेने 5 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत आरोप केला की, वरोरा तालुक्यातील इरफान शेख याने तिच्यावर अत्याचार केला, मारहाण केली आणि संबंध प्रस्थापित केले. आता त्याचे नातेवाईक मला आणखी एका प्रकरणात धमकावतात. पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर कलमांतर्गत तक्रार नोंदवली मात्र त्यांना अटक करण्यात अपयश आले. सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा सोमवार 7 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या कार्यालयात विष प्राशन करू, असा इशारा पीडितेने दिला.

    पत्रकार परिषदेला संबोधित करताना पीडितेने पुढे सांगितले की, इरफान शेखने गेल्या ऑक्टोबर महिन्यात लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आयपीसी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    आता इरफानचे नातेवाईक आपला पाठलाग करत असून पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून आपली बदनामी करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. 22 जून 2023 रोजी खांबाडा गावातील एका हॉटेलमध्ये आरोपीच्या नातेवाईकांनी मला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक होत नसल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप महिलेने केला आहे. आरोपी शेख रिजवान, शेख मोहसीन, शेख दानिश आणि शेख मोहम्मद यांना तात्काळ अटक करण्याची मागणी महिलेने केली आहे. तपास अधिकारी पीएसआय नीलेश चवरे यांची बदली करावी, अशी मागणीही तिने केली.

    वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी व प्रभारी पोलीस निरीक्षक रांजणकर यांनीही त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना नोपानी म्हणाले की, या प्रकरणात आरोपी इरफान शेख याच्यावर आयपीसी कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही झाली असून खटला न्यायप्रविष्ट आहे. आणखी चार आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोस पुरावे असल्याशिवाय पोलीस त्यांना अटक करू शकत नाहीत. इरफान आणि त्याच्या नातेवाइकांनीही महिलेविरुद्ध वारंवार तक्रार केली आणि तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

    सोमवारी पोलिसांनी महिलेला वरोरा पोलिस ठाण्यात आणले. एसडीपीओ आयुष नोपानी आणि इतर अधिकार्‍यांनी तिला प्रकरणातील तथ्यांबद्दल माहिती दिली. मात्र त्या महिलेने पोलिसांचे काही ही न ऐकून घेता संधी साधून लगेचच पाण्याच्या बाटलीत भरलेले विष प्राशन केले.

    प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ महिलेला उपजिल्हा रुग्णालयाचे पत्र देऊन पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर केले. एसडीपीओ नोपानी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की आम्ही महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. वरोरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांनी सांगितले की, महिलेची प्रकृती स्थिर आहे. तथापि, हे सांगणे कठीण आहे की तिने जे विष प्राशन केले ते अज्ञात आहे.