Category: गुन्हेगारी

गुन्हेगारी (Crime) क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाची बातमी वाचा news34.in वर. चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील खून, चोरी, फसवणूक, सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळ्यांच्या ताज्या बातम्या येथे उपलब्ध आहेत. पोलीस दलाची कारवाई, न्यायप्रक्रियेतील घडामोडी आणि तपास कार्याचे सविस्तर अपडेट्स आम्ही देतो. गुन्हेगारी जगतातील सत्य आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

  • चंद्रपूर शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात सध्या अवैध धंदे वाढत आहे, जुगार असो की सट्टा आता चक्क शहराच्या मध्यभागात देहव्यवसायाचे जाळे पसरत आहे, अश्यातच रामनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत सुरू असलेल्या देह व्यापाराचे घबाड उघडकीस आणले.

     

    मुखबिर मार्फत मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले निशा अपार्टमेंट मध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांना सुद्धा पैश्याचे प्रलोभन देत त्यांच्याकडून देहविक्री करून घेत होती.

     

    सोबतच या कामात आरोपी महिलेने आपल्या फ्लॅट मधील रूम चा वापर देह व्यवसाय साठी करीत होती, रामनगर पोलिसांनी मारलेल्या धाडीत हे सर्व घबाड उघडकीस आले.

     

    रामनगर पोलिसांनी या देहव्यापर चालविणाऱ्या महिलेवर कलम 3, 4, 5, व 7 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

     

    देहविक्री करणाऱ्या 3 महिलांना स्त्री आधार केंद्र मूल रोड चंद्रपूर मध्ये ताब्यात देत 2 महिलांना अटक करण्यात आली.

     

    सदर गुन्ह्याची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे व गुन्हे शोध पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व पोउपनी मधुकर सामलवार सह पोलीस कर्मचारी यांनी केली.

  • पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने त्या अवैध बार वर कारवाई

    News34 Impact

    चंद्रपूर – दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे या मथळ्याखाली News34 ने 20 सप्टेंबरला बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची दखल पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घेतल्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.

     

    विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर 2 विना परवाना अवैध बार सुरू आहे.

     

    मागील अनेक वर्षांपासून हा अवैध दारूचा गोरखधंदा नित्याने सुरू आहे, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो, कामगार वर्गाची संख्या याठिकाणी असंख्य आहे.

     

    त्याचा फायदा घेत काही 2 नंबरी चालकांनी थेट दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या अवघ्या 500 मीटर अंतरावर हे विना परवाना अवैध बार सुरू आहे, पोलिसांना हे माहिती नसेल असे मुळीच नाही.

    या मथळ्याखाली बातमी प्रकाशी होताच पोलीस अधीक्षकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ दुर्गापूर पोहचताचं त्या अवैध बार वर धाड मारली, या धाडीत तब्बल 25 बॉटल सहित 3 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत मेश्राम नामक बार चालकांवर कारवाई करीत मेश्राम ला दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

     

  • चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

    News34 chandrapur

    प्रशांत गेडाम

    सिंदेवाही – सिंदेवाही तालुक्यातील वासेरा जवळील मौजा सिरकाडा येथील काही महिला प्रदीप यादव बोरकर रा. सिरकाडा यांच्या शेतात निंदन काढण्यासाठी गेले. मात्र निसर्गात अचानक बदल होऊन वीज कडकडाटा सहित पावसाने रौद्र रूप धारण केल्याने महिला घराकडे जाण्यासाठी निघाली असता वीज पडून 64 वर्षीय सौ. महानंदा मोतीराम अलोणे रा. सिरकाडा या जागीच ठार झाल्या.

     

    तर सौ. रोषणा प्रफुल गेडाम (जख्मी ) रा. सिरकाडा वय अंदाजे 35 वर्ष या गंभीर जख्मी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलवले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

     

    20 सप्टेंबर बुधवारी दुपारी 1 वाजता शेतात निंदन झाल्यावर महिला घराकडे निघाल्या असत्या अचानक विजेचा गडगडाट होऊन पाऊस सुरू झाला, अचानक महानंदा यांच्यावर वीज कोसळली.

     

    घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला.

  • रामनगर पोलिसांची व्हिडीओ गेम पार्लरवर मोठी कारवाई

    News34 Impact

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने वृत्त प्रकाशित केल्यावर पोलीस व जिल्हा प्रशासनाने बातमीची दखल घेतली व व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

     

    स्थानिक गुन्हे शाखेने पडोली येथील रॉबिन व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई केल्यानंतर रामनगर पोलिसांनी सुद्धा मोठी कारवाई करीत या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

     

    पेट्रोलिंग करीत असताना रामनगर पोलिसांना सराय मार्केट येथील मनपाच्या गाळ्यात सुरू असलेले राजविर व्हिडीओ गेम पार्लरवर जाऊन चौकशी केली असता त्या पार्लर च्या परवान्यात अनेक त्रुट्या आढळल्या, परवाना व्यतिरिक्त राजविर व्हिडीओ गेम पार्लरमध्ये अतिरिक्त 4 मशीन आढळल्या, पोलिसांनी त्या 4 अतिरिक्त मशीन जप्त केल्या.

     

    रामनगर पोलिसांनी दुकान चालक व कांग्रेस पक्षाचे असंघटित कामगार सेल चे शहराध्यक्ष विनोद संकत व दुकानात काम करणारे राहुल झाडे यांना अटक करण्यात आली.

    कारवाई झाली आता पुढे काय?

    चंद्रपूर शहर सहित जिल्ह्यात पोलीस विभागाच्या या मोहिमेमुळे नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर चालकाचे धाबे दणाणून गेले आहे.

    याबाबत पोलीस अधीक्षक परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जिल्ह्यात सुरू असलेली ही मोहीमेत नियमबाह्य पार्लर धारकांच्या कागदपत्रे व परवान्याची पडताळणी केल्यावर त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार असून परवाना बाबत पुढील कारवाई आता जिल्हाधिकारी महोदय करतील.

     

    जुगार कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करीत विनोद संकत व राहुल झाडे यांना जामिनावर सोडण्यात आले, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे व रामनगर गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

     

  • भाग 2 चंद्रपुरातील या भागात सुरू आहे विना परवाना अवैध बार

    News34 chandrapur भाग 2

    चंद्रपूर – दुर्गापुरात चालतो अवैध सट्टा या पहिल्या सत्रानंतर आता आपण या बातमीत बघणार आहो की दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे.

     

    विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर 2 विना परवाना अवैध बार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 कोटी 11 लाखांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त

     

    मागील अनेक वर्षांपासून हा अवैध दारूचा गोरखधंदा नित्याने सुरू आहे, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो, कामगार वर्गाची संख्या याठिकाणी असंख्य आहे.

     

    त्याचा फायदा घेत काही 2 नंबरी चालकांनी थेट दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या अवघ्या 500 मीटर अंतरावर हे विना परवाना अवैध बार सुरू आहे, पोलिसांना हे माहिती नसेल असे मुळीच नाही.

     

    या विना परवाना बार मध्ये आपल्याला हॉटेल सारखी व्यवस्था केली जाते, विशेष करून चकना सुद्धा मोफत मिळतो.

     

    पण हे सगळं अवैध व छुप्या पद्धतिने सुरू आहे, विना परवाना अवैध बार धारक काही अंतरावर दारूच्या बॉटल्स लपवून ठेवतात, उर्जानगर येथील कोयना गेट च्या बाजूला तर शक्तीनगर गेट च्या आधी हे दारूचे दुकान थाटण्यात आले आहे.

     

    दुर्गापुरात अनेक ठिकाणी असंख्य घरी दारू मिळते, याबाबत दुर्गापूर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला पुरेपूर माहिती असून सुद्धा यावर कारवाई करण्यास हे दोन्ही विभाग टाळाटाळ करतात.

     

    या अवैध बार मुळे शासनाचा महसूल तर बुडतंच आहे सोबत परवाना धारक बार धारकांकडे आता या कमी किमतीच्या दारूमुळे आता व्यसनाधीन नागरिकांनी पाठ फिरविणे सुरू केले आहे.

     

    नकली दारूमुळे असंख्य नागरिकांचा जीव जातो मात्र तश्या घटनेचा उद्रेक जेव्हा होणार त्यावेळी उत्पादन शुल्क विभाग व दुर्गापूर पोलीस नक्की जागे होतील हे निश्चित….क्रमशः… पुढील भागात नक्की भेटूया…नव्या माहितीसह

  • चंद्रपुरात व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर वर News34 च्या बातमी नंतर चंद्रपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

     

    चंद्रपूर शहरात मागील अनेक वर्षांपासून व्हिडीओ गेम पार्लर च्या नावाखाली जुगार सुरू असल्याची बातमी 18 सप्टेंबर ला News34 ने प्रकाशित केली होती.

    Local crime branch
    स्थानिक गुन्हे शाखा व पडोली पोलिसांची संयुक्त कारवाई

    बातमी प्रकाशित झाल्यावर पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी पोलीस दल व स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

     

    19 सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पडोली येथील हैदर कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेले रॉबिन व्हिडीओ पार्लर च्या परवान्याची पडताळणी करण्यात आली असता त्या परवान्यात त्रुट्या आढळून आल्या असत्या स्थानिक गुन्हे शाखेने व्हिडीओ गेम पार्लर मधील एक मशीन जप्त केली आहे.

     

    परवान्यात असलेल्या त्रुट्या जोपर्यंत नियमात बसत नाही तो पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात व्हिडीओ गेम पार्लर ला पोलीस प्रशासनाने सिल ठोकले असून याबाबतचा पुढील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार आहे.

     

    सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम यांनी संयुक्तपणे केली.

     

  • News34 च्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांनी दिले हे निर्देश

    News34 impact

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात नियमबाह्य पध्दतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर News34 च्या बातमीची जिल्हा पोलीस अधिक्षकाने दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

     

    चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात नियमबाह्य पध्दतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लवर अखेर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा पुकारला आहे.

    विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात मनपा च्या गाळ्यात ही दुकाने सुरू आहे, नियमानुसार अश्या दुकानांना परवानगी देता येत नाही, व्हिडीओ गेम पार्लर संचालकांनी मनपा गाळे घेताना कशाचा आधार घेत व्हिडीओ गेम पार्लर सुरू केले याची चौकशी मनपा प्रशासनाने केल्यास त्यामध्ये प्रचंड तफावत आढळणार.

    मनपाच्या गाळ्यात आज व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, उद्या कुणी जुगार क्लब, बिअर बार साठी परवानगी मागितली तर त्यांना ती परवानगी मिळणार काय? हा मोठा प्रश्न आहे.

     

    एक व्हिडिओ गेम पार्लर पासून दुसरे व्हिडीओ गेम पार्लर सुरू करायचे असल्यास त्यामध्ये तब्बल 75 मीटर अंतर असावे लागते, मात्र शहरात राजकला टॉकीज क्षेत्रात असे कोणतेही नियम पाळण्यात आले नाही.

    व्हिडीओ गेम पार्लर पासून तब्बल 75 मीटर अंतरावर शाळा, धार्मिक स्थळ हे दूर असावे, या संदर्भात वर्ष 2015 मध्ये सामाजिक कार्यकर्ता हिमायू अली यांनी 4 दिवस आमरण उपोषण करीत व्हिडीओ गेम पार्लर च्या मनमानी कारभार विरोधात लढा दिला होता.

     

    व्हिडीओ गेम पार्लर परवान्यात किती मशीन ची परवानगी व सध्या किती मशीन लावण्यात आल्या? त्या मशीनमध्ये अशी काय सेटिंग केली की तिथे कुणीही पैसे जिंकत नाही, हा खेळ म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे.

    News34 ची बातमी झळकताच जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी कारवाईचे निर्देश दिले.

    जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर व्हिडीओ गेम पार्लर मध्ये काही अवैधपणे व नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास त्यावर कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहे.

    विशेष म्हणजे शहर पोलिसांनी राजकला टॉकीज परिसरातील काही पार्लर बंद केल्याची माहिती मिळाली आहे, पोलीस सध्या नियम तपासून त्यांच्यावर पुढील कारवाई करणार आहे.

    विशेष म्हणजे सदर व्हिडीओ गेम पार्लर वर राजकीय आशीर्वाद असल्याने हे धंदे सर्रासपणे सुरू आहे.

  • चंद्रपुरातील दुर्गापुरात सुरू असलेला हा सट्टा बाजार कुणाचा?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दुर्गापूर हा भाग वन व सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील मतदार संघ, मात्र या मतदार संघात अवैध धंद्याचा सध्या बोलबाला सुरू आहे.

    जुगार असो की सट्टा हे कार्य या भागात खुलेआम सुरू आहे, मात्र पोलीस यावर कारवाई करणे टाळत आहे, पण का? हे उत्तर तर खुद्द पोलीस विभाग देऊ शकतो.

     

    2 वर्षांपूर्वी दुर्गापूर भागात जाकीर नावाच्या इसमाने सट्टा व जुगार खुलेआम सुरू केला होता, ते सुद्धा पोलीस स्टेशनच्या अवघ्या 200 मीटर अंतरावर, पण त्यावेळी News34 ने जाकीर च्या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला.

     

    तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तात्काळ जाकीर व कैलास चा जुगार व सट्टा बंद पाडला, मात्र 2 वर्षे गेल्यावर आज जाकीर पुन्हा या धंद्यात सज्ज झाला.

    त्याने त्याच ठिकाणी सट्टा बाजार सुरू केला आहे, ते सुद्धा दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या 200 मीटर अंतरावर, ही बाब पोलिसांना माहीत नसेल काय?

    जाकीर हा सट्टा धंद्यातील मास्टर आहे, त्याने यापूर्वी असे अनेक उद्योग केले आहे, त्याने पुन्हा सुरू केलेला हा सट्टा कुणाच्या संमतीने सुरू आहे.

    ही बाब काही दिवसात समोर येईलच, News34 ने याआधी दुर्गापुरातील सट्टा व्यवसायी महाराज च्या धंद्याचं बिंग फोडलं होते.

    सध्या दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये नवे पोलीस निरीक्षक जीत्तावार रुजू झाले आहे, त्यांनी नागपुरातील स्थानिक गुन्हे शाखेत कामगिरी बजावली आहे, पण त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या अवैध धंद्याचं काय?

    मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा सट्टा बाजार पोलिसांच्या नजरेस पडला नाही काय? कुणाच्या संमतीने हे अवैध धंदे दुर्गापुरात सुरू आहे.

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या या अवैध धंद्याना जबाबदार कोण आहे? हा थेट प्रश्न पालकमंत्री मुनगंटीवार यांना लवकरचं विचारण्यात येईल.

    या बातमीमध्ये दुर्गापुरातील जाकीर च्या सट्टा बाजाराची कहाणी आहे, दुसऱ्या भागात दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा अवैध धंद्याची पोलखोल आम्ही करणार आहोत, ते बघून तुम्ही सुद्धा कपाळावर हात ठेवणार…पुढील दिवसात दुसरा भाग…क्रमशः

  • मूल शहरात 4 युवकांनी केली लूटमार

    News34 गुरू गुरनुले

    मूल : कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसुल करून मोजत बसलेल्या वसुली प्रतिनिधींना दमदाटी देवून त्यांचे कडून रक्कम हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करणा-या चार युवकांना मूल पोलीसांनी ताब्यात घेतल्याची घटना 10 सप्टेंबरला रात्रो शहरात घडली. Chandrapur crime update

     

    स्थानिक नवभारत विद्यालय समोर असलेल्या स्पंदनास्फुर्ती फायनान्स मायक्रो कंपनी मध्ये समीर बंडु बरडे आणि अतुल पांडूरंग सिंगारे हे वसुली प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. हे दोघेही कंपनी कडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसुल करून परत आल्यानंतर जुन्या सोमनाथ मंदिरा समोरील ओटयावर बसून मोबाईलवर हप्ता वसुलीची एन्ट्री करत असतांना चार युवकांनी त्यांना घेरले.

     

    समीर बरडे आणि अतूल सिंगारे यांना धाक दाखवत त्यांचेजवळ असलेल्या बॅग मधून बळजबरीने २७ हजार रूपये हिसकावून घेतले. रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न करतांना झालेल्या झटापटीत अतुल सिंगारे यांनी त्यांचेपासून सुटका करून घेत रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पानठेल्यावरील युवकांना घटना सांगीतली. घटनेची माहित होताच काही युवकांनी घटनास्थळी धाव घेत झटापट करीत असलेल्या चार युवकांपैकी एकाला पकडून ठेवत पोलीस स्टेशन येथे सुचना केली.

     

    घटनेची माहिती होताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचुन युवकाला ताब्यात घेत त्याचे कडून घेतलेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी काल रात्रो ११ वाजता नंतर मूल येथील कुणाल भिमानंद चिकाटे (२५) प्रथम प्रमोद गेडाम (२०) साहील पन्नालाल डोहणे (१९) आणि पंकज रविंद्र मोहुर्ले (२७) यांना ताब्यात घेवून त्यांचेविरूध्द कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला.

     

    तपासाअंती ताब्यात घेतलेल्या युवकांकडून हिसकावलेली पुर्ण रक्कम न मिळाल्याने पोलीस न्यायालयाला युवकांच्या पोलीस कोठडीची विनंती करणार असल्याचे समजते. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतिश बंसोड सहकारी शफी शेख आणि देवकाते यांचे सहकार्याने करीत आहेत.

  • चंद्रपूर शहरातील या भागात पेट्रोल-डीझल चोरांचा धुमाकूळ

    News34 petrol thief crime

    चंद्रपूर – गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: तुळशीनगर परिसरात दुचाकी आणि चारचाकी दोन्ही वाहने या बेशिस्त चोरट्यांच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या घटनांच्या वारंवारतेमुळे नागरिक हताश आणि संतप्त झाले आहेत. आपला जुना फोन द्या आणि नवा घ्या, काय आहे अमेझॉन ची ऑफर क्लिक करा

     

    इंधन चोरीच्या घटना वाढत आहेत, ज्यामुळे परिसरातील व्यक्ती आणि व्यवसायांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. चोरीचे इंधन अनेकदा काळ्या बाजारात कमी किमतीत विकले जाते, ज्यामुळे अयोग्य स्पर्धा आणि संभाव्य सुरक्षा धोके निर्माण होतात.

     

    पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढणे ही तुळशीनगर वासीयांसाठी चिंतेची बाब आहे. यामुळे बाधित व्यक्तींवर आर्थिक भार तर पडतोच पण त्यांच्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण होतात. अशा घटना नागरिकांच्या मनावर कायमस्वरूपी प्रभाव टाकू शकतात, स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांवरचा त्यांचा विश्वास कमी करू शकतात.

     

    दुर्गापूर पोलीस ठाण्याने या भयावह प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. तुळशीनगर परिसरात पाळत ठेवणे आणि असुरक्षित वेळेत गस्त वाढवणे संभाव्य चोरांना प्रतिबंधक म्हणून काम करू शकते. याव्यतिरिक्त, वाहन मालकांमध्ये विश्वासार्ह अँटी-थेफ्ट उपकरणांमध्ये गुंतवणुकीच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण केल्याने महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो.

     

    तुळशीनगरच्या नागरिकांनी एकत्र येऊन या पेट्रोल चोरांवर कठोर कारवाईची मागणी करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही संशयास्पद हालचालींची पोलिसांकडे त्वरीत तक्रार करून आणि तपासादरम्यान अधिकाऱ्यांना सहकार्य करून,  सर्व रहिवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करू शकतात.