Category: गुन्हेगारी

गुन्हेगारी (Crime) क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाची बातमी वाचा news34.in वर. चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील खून, चोरी, फसवणूक, सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळ्यांच्या ताज्या बातम्या येथे उपलब्ध आहेत. पोलीस दलाची कारवाई, न्यायप्रक्रियेतील घडामोडी आणि तपास कार्याचे सविस्तर अपडेट्स आम्ही देतो. गुन्हेगारी जगतातील सत्य आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

  • Growing marijuana in the backyard | चंद्रपूर जिल्ह्यातील या तरुणाने घराच्या अंगणात लावला गांजा

    Growing marijuana in the backyard

    Growing marijuana in the backyard : चंद्रपूर 10 नोव्हेंबर (News34) गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी तरुण नव्या युक्त्या वापरत आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाने अंमली पदार्थाचा धंदा करायचा असल्याने त्याने थेट घराच्या अंगणात गांजा ची झाडे लावली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने युवकाला अटक करीत 2 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कानपा गावातील 23 वर्षीय रक्षद प्रभाकर आत्राम ने आपल्या घराच्या अंगणात अंमली वनस्पतींचे लहान मोठे असे एकूण 47 झाडे लावली होती. पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे नागभीड पोलिसांनी तपास सुरू केला असता आत्राम यांच्या घरी धाड मारली असता घराच्या अंगणात गांजा ची झाडे आढळून आली.

    Also Read : चंद्रपुरात पुन्हा वाघाचा हल्ला, आतापर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 39 बळी


    पोलिसांनी 23 किलो 910 ग्राम असा एकूण 2 लाख 39 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी रक्षद आत्राम वर NDPS ACT अनव्ये गुन्हा दाखल करीत अटक केली.


    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात सपोनि दिलीप पोटभरे, पोउपनी अजिंक्य गोविंदलवार, भोजराम लांजेवार, पोलीस कर्मचारी दीपक कोडापे, भरत घोळवे, दिलीप चौधरी, प्रफुल रोहनकर, विक्रम आत्राम, ज्ञानेश्वर कुंभारे, आकाश चोपकर, किरण कोकोडे व अरुणा धुर्वे यांनी केली.

  • Chandrapur juvenile criminals rise city crime । चंद्रपूर शहरात गुन्हेगारीचा नवा चेहरा; अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता ट्रेंड!

    Chandrapur juvenile criminals rise city crime

    Chandrapur juvenile criminals rise city crime : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News34) – चंद्रपूर शहरात गुन्हेगारी धुमाकूळ घालत असून आता या गैरकायदेशीर कृत्यात अल्पवयीन गुन्हेगारांची एंट्री झाली आहे. जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठया प्रमाणात वाढत असून पोलीस व नागरिकांसाठी हि एक चिंतेची बाब आहे.

    चंद्रपूर शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यात एका आरोपीसह २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ११ जुलै रोजी फिर्यादी आपल्या पत्नीसोबत मोबाईलवर बोलत असताना पांढऱ्या रंगाच्या मोपेड वाहनावर आलेल्या एका आरोपीने गाडी आडवी थांबविता फिर्यादीच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावीत पळ काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरु केला होता. जबरी मोबाईल हिसकावणाऱ्या २० वर्षीय शेख राजा मन कुरेशी राहणार बगडखिडकी चंद्रपूर या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीजवळून ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. crime wave Chandrapur

    Also Read : गुन्हेगारांची पत्रकारिता, देहविक्री करणाऱ्या महिलेला मागितली खंडणी

    चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यातील सहभागी बाबुपेठ मधील अल्पवयीन मुलाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाकडून ३ दुचाकी वाहनसह एकूण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    घुटकाला वार्डात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला मोबाईल चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या मुलाकडून २ मोबाईल सह एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.

    एका आरोपीसह २ अल्पवयीन मुलांकडून चंद्रपूर शहर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मोपेड, ३ दुचाकी व मोबाईल असा एकूण १ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलते, पोउपनि विलास निकोडे, यांच्यासह पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • Animal cruelty and illegal transport । गोंडपिपरीत अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

    Animal cruelty and illegal transport

    Animal cruelty and illegal transport : गोंडपिपरी ८ नोव्हेम्बर (चंद्रपूर News३४): चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा करंजी येथे नाकाबंदी दरम्यान गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईत एकुण १२ गोवंश जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरलेले पिकअप वाहन जप्त केले असून, ५,८५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र, वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

    🔎 नेमके काय घडले?

    गोंडपिपरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की मौजा करंजी परिसरातून एका पिकअप वाहनातून अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीकरिता वाहतूक केली जाणार आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने करंजी येथे नाकाबंदी केली.

    Also Read : कुख्यात दुचाकी चोरणाऱ्यांना रामनगर पोलिसांनी केली अटक

    नाकाबंदी दरम्यान एक संशयित पिकअप वाहन (क्र. MH34-BZ-6550) येताना दिसले. पोलिसांनी ते थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने न थांबता वाहन पुढे नेले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पाठलाग होत असल्याचे पाहून वाहनचालकाने दुबागुडाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर आपले वाहन सोडून दिले आणि अंधाराचा फायदा घेत पळून गेला. police seizure illegal cattle transport

    💰 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

    पोलिसांनी सोडून दिलेल्या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवंशीय जातीचे एकूण १२ जनावरे दाटीवाटीने बांधून ठेवलेले आढळले. ही जनावरे कत्तलीकरिता घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. जनावरांची पाहणी केली असता, त्यापैकी ४ जनावरे मरण पावलेली दिसून आली.

    या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

    • १२ गोवंश जनावरे: किंमत रु. १,८५,०००/-
    • पिकअप वाहन (MH 34 BZ 6550): अंदाजे किंमत रु. ४,००,०००/-
    • एकुण जप्त मुद्देमाल: रु. ५,८५,०००/-

    याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गोंडपिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. Animal cruelty and illegal transport

    👨‍✈️ यशस्वी कारवाई करणारे पथक

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (मूल) श्री सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक खुशाल टेकाम, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांनी ही कामगिरी पार पाडली.

  • Chandrapur motorcycle theft police arrest । रामनगर पोलिसांनी पकडले दुचाकी चोर, ५ मोटारसायकली जप्त

    Chandrapur motorcycle theft police arrest

    Chandrapur motorcycle theft police arrest : चंद्रपूर ७ नोव्हेम्बर (News३४) – २६ ऑक्टोबर रोजी बंगाली कॅम्प डीआरसी हेल्थ क्लब जवळ असलेल्या पानठेल्याला लागून खाजगी नोकरी करणारे ४७ वर्षीय चंद्रहास अर्जुन मुन यांनी आपली दुचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ डब्ल्यू ६७२४ हॅन्डल लॉक करून ठेवली होती. काही वेळातच सदर दुचाकी चोरीला गेल्याने मुन यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता पोलिसांनी २ आरोपीना अटक करीत त्यांच्या ताब्यातील ५ दुचाकी वाहने जप्त केले.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा हल्ला कॅमेऱ्यात कैद पण?

    चंद्रपुरातील डीआरसी हेल्थ क्लब जवळ हॅन्डल लॉक करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने २६ ऑक्टोबर रोजी चोरीला गेली होती, याबाबत दुचाकी मालक मुन यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीची तक्रार दिली. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला.

    रामनगर गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले, नागपूर जिल्ह्यातून दोघांनी दुचाकी चोरत चंद्रपुरात विकण्यासाठी आणली आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी ३० वर्षीय गोपाल जीवन मालाकार राहणार शामनगर, चंद्रपूर व २२ वर्षीय आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख राहणार फुकट नगर एकता नगर चंद्रपूर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे कबूल केले. Chandrapur stolen bike recovery

    ५ दुचाकीसह १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

    रामनगर पोलिसांनी आरोपीकडून ५ मोटारसायकल ज्यामध्ये हिरो होंडा कंपनीची सीडी डिलक्स MH३४ डब्ल्यू ६७२४, होंडा ऍक्टिव्हा नंबर प्लेट नसलेली, सुझुकी access MH४९ AY८५९२ , हिरो स्प्लेंडर MH ४९ CN २३२०, हिरो स्प्लेंडर MH३४ BL ६२४२ जप्त करण्यात आली. सदर प्रकरणात पोलिसांनी एकूण १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी आनंद खरात, जितेंद्र आकरे, शरद कुडे, लालू यादव, बाबा नैताम, गजानन नागरे, मनीषा मोरे, रविकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, सुरेश कोरवार, रुपेश घोरपडे व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

  • Police arrest news reporters extortion gang । गुन्हेगारांची पत्रकारिता: देहविक्री करणाऱ्या महिलेकडून लाखोंची खंडणी वसूल

    Police arrest news reporters extortion gang

    Police arrest news reporters extortion gang : चंद्रपूर ६ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट वाढला असून ज्यांना लिहता वाचता येत नाही असे गुन्हगेरे प्रवृत्ती या क्षेत्रात अवतरली आहे. अश्याच काही भामट्या पत्रकारांना रामनगर पोलिसांनी हिसका दाखवीत अटक केली आहे. त्यांनी देहविक्री करण्याऱ्या महिलेकडून १ लाख रुपयांची खंडणी मागितली. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजात चांगलं व वाईट दाखविण्याचा त्याचा प्रयत्न असतो मात्र भामटे पत्रकार समाजाच्या आरश्याला बट्टा लावण्याचे काम करीत आहे.

    Also Read : चंद्रपूर पोलिसांनी बल्लारपुरातील गुन्हेगारी टोळीवर लावला मकोका

    ३ नोव्हेम्बर रोजी चंद्रपूर शहरात देहविक्री करणाऱ्या महिलेच्या घरात ६ भामट्या पत्रकारांनी धडक देत छापा मारला, तू देहविक्री चा व्यवसाय करते जर हि बाब बाहेर आली तर तुझी बदनामी होणार, आम्हाला १ लाख रुपये दे अन्यथा आम्ही याची बातमी प्रकाशित करणार अशी धमकी त्या महिलेला देण्यात आली. फिर्यादी महिलेने भामट्या पत्रकारांना १ लाख रुपये दिले.

    मात्र फिर्यादी महिलेने याबाबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगत तक्रार दिली, रामनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करीत पत्रकारांच्या या टोळक्याचा शोध सुरु केला, या प्रकरणी पोलिसांनी (सत्यशोधक न्यूज मुख्य संपादक) ५७ वर्षीय राजू नामदेवराव शंभरकर राहणार लालपेठ चंद्रपूर, (इंडिया २४ न्यूज, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी) ३७ वर्षीय कुणाल यशवंत गर्गेलवार राहणार विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर, (दैनिक विदर्भ कल्याण, तालुका प्रतिनिधी) ३३ वर्षीय अविनाश मनोहर मडावी राहणार इंदिरानगर चंद्रपूर व (भारत टीव्ही न्यूज चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी) ५६ वर्षीय राजेश नारायण निकम राहणार जमणजेट्टी पाटील वाडी चंद्रपूर यांना अटक केली. या प्रकरणी सचिन ढगे व योगिता पाटेकर हे पसार झाले आहे. female sex worker blackmail by journalists

    यामध्ये कुणाल गर्गेलवार यांच्यावर घरफोडी व चोरीचे गुन्हे असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीवर कलम ३०८ (५), ३३३, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि जिल्ह्यात कुणीही पत्रकार किंवा पोलीस असल्याची बतावणी करून लूटमार किंवा खंडणी मागत असेल तर तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा डायल ११२ वर संपर्क करावा.

    सदरची यश्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि निलेश वाघमारे, देवाजी नरोटे, हनुमान उगले, पोलीस कर्मचारी जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालू यादव, बाबा नैताम, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, सुरेश कोरवार, रुपेश घोरपडे व ब्ल्यूटी साखरे यांनी केली. blackmail threat to expose personal information extortion

    पत्रकारिता क्षेत्रात गुन्हेगारांची एंट्री

    चंद्रपूर जिल्ह्यात प्रामाणिक पत्रकार हे नियमित आपले काम करतात मात्र काही वर्षांपासून या क्षेत्रात गुन्हेगार शिरले असल्याने ते पत्रकारिता क्षेत्राला कलंकित करण्याचे काम करीत आहे, यामध्ये काहीजण खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात गेले आहे, काहींवर एट्रोसिटी, खुनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, वाळू तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहे, ज्यांना बातमी काय असते याचा अर्थच माहित नसतो ते या क्षेत्रात येत अवैध वसुली करीत आहे. Police arrest news reporters extortion gang

    यापूर्वी सुद्धा अश्या घटना

    वर्षभरात मूल तालुक्यात स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करून काही पत्रकारांनी पत्नीसमवेत एकाला खंडणी मागितली होती. त्या पत्रकाराच्या टोळक्याने स्वतःला गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगितले होते.

  • MCOCA charges filed against organized crime gang । चंद्रपूर पोलिसांनी या गुंडांच्या टोळीवर लावला MCOCA

    MCOCA charges filed against organized crime gang

    MCOCA charges filed against organized crime gang : चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीने धुमाकूळ घातला आहे, भाईगिरी, मर्डर, चोरी व दरोडा अश्या अनेक गुन्हेगारीने जिल्हा ढवळून निघाला असून यावर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करणाऱ्या बल्लारपुरातील संयुक्त गुन्हेगारीमध्ये लिप्त असणाऱ्या गुंडांच्या टोळीवर थेट मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

    सर्व सामान्य जनतेत दहशत निर्माण करणाऱ्या अनेक गुन्हयांची नोंद असलेल्या बल्लारपूर येथील कुख्यात गुंडाची टोळीतील टोळी प्रमुख नामे चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी, येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक व त्याचे इतर साथीदारांनी संयुक्तरित्या केलेल्या गुन्हयातील सदस्यांविरुध्द पोस्टे चंद्रपूर शहर येथील दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MCOCA) ची कलम लावण्यात आलेली आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा जंगलराज; वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    काही दिवसांपूर्वी हत्या सारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील काहींना अवैध शस्त्रसह पोलिसांनी अटक केली होती ज्यामध्ये ०२ माऊझर गन (पिस्टल), ०२ देशी कटट्टे, ३५ नग जिवंत काडतुस, तसेच ०४ लोखंडी धारदार खंजर असे घातक हत्यारासह दरोडा टाकण्याचे बेतात असल्याचे मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अप.क्र.७५८/२०२५ कलम ३, ४/२५ भारतीय हत्यार कायदा आणि कलम ३१० (४) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात, सदर टोळी ही दरोडा टाकुन प्राप्त पैशातून खुना सारखा गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत असल्याचे निष्पन्न झाले असुन पोलीसांच्या सतर्कतेने खुनाच्या गुन्हयास प्रतिबंध करण्यास यश आले आहे. MCOCA sections applied to gang leaders 2025

    अनेक वर्षांपासून या टोळीचा धुमाकूळ

    सदर गुन्हयातील कुख्यात टोळी ही चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी व येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक याचे नेतृत्वात स्वतःच्या टोळीचा वर्चस्व निर्माण करण्यासाठी मागील काही वर्षापासुन चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने बेकायदेशीर जमाव तयार करुन दहशत निर्माण करणे, जिवानिशी ठार करण्याचे उददेशाने खून करण्याचा प्रयत्न करणे, आपखुशीने गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, अश्लिल शिवीगाळ करणे, दंगा करणे,

    जिवे ठार मारण्याची धमकी देणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक रस्त्यामधील मार्गात अटकाव करणे, प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे, मनाई आदेशाने उल्लंघन करणे इत्यादी शिर्षकाखाली गंभीर गुन्हे केले असुन टोळीचे वर्चस्व व दहशत राहावी म्हणुन त्याद्वारे मिळणारे पैश्यावर ऐशआरामाचे, चैनीचे जीवन जगत आहेत. police foil robbery attempt by armed criminals

    हे गुन्हे या टोळीने स्वतः चे आर्थीक फायदा करण्याकरीता, वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरिता केलेले असून अद्यापही ते संघटीत पध्दतीने गुन्हेगारी कारवाया व कृत्ये सातत्याने करीत असल्याने सदर टोळीवर कायद्याची वचक व परिणामकारक प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्याविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ चे कलम समाविष्ट होणेबाबतचा आवश्यक प्रस्ताव पाठवून सदर टोळीतील

    (१) चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी वय २३ वर्ष, (२) येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक वय २७ वर्ष, (३) मुकेश राजु वर्मा वय २० वर्ष, (४) अमीत बालकृष्ण सोनकर वय २६ वर्ष, (५) गौरिश श्रीनिवास कुसमा वय १९ वर्ष, (६) अनवर अब्बास शेख वय २३ वर्ष च इतर साथीदार गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (MCOCA) ची कलम लावण्यात आली आहे. MCOCA charges filed against organized crime gang

    सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे चंद्रपूर शहर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, सफौ अरुण खारकर व पोअं गजानन नन्नावरे व मोक्का पथकाने केलेली आहे. chandrapur police

    याद्वारे सर्व जनतेला तसेच औद्योगिक क्षेत्रातील व्यवसायिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारच्या कोणत्याही गुंडांच्या टोळीच्या अवैध मागणी/खंडणीला प्रतिसाद देवु नये. किंवा त्यांच्या कृत्यांना घाबरु नये. त्यांच्या कृत्यांबाबत तात्काळ नजीकचे पोलीस स्टेशनला रिपोर्ट करुन माहिती दयावी जेणे करुन अशा स्वरुपाच्या गुन्हेगारीला वेळीच प्रतिबंध घालण्यास पोलीसांना मदत होईल.

  • Juvenile crime Chandrapur । चंद्रपुरात अल्पवयीन मुलाचा कारनामा; १७ मोबाईल, सोने व दुचाकी जप्त

    Juvenile crime Chandrapur

    Juvenile crime Chandrapur : चंद्रपूर ५ नोव्हेम्बर (News३४) – २२ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची घटना घडली होती ज्यामध्ये तब्बल २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला होता, शहर पोलिसांना या प्रकरणात दीड महिन्यांनी यश मिळाले असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

    २२ सप्टेंबर ला नांदगाव पोडे मध्ये राहणाऱ्या ३४ वर्षीय नीता आकाश आत्राम या आपल्या बिनबा गेट मध्ये राहणाऱ्या आईकडे गेली होती, रात्री घराचा दरवाजा टेकवून नीता आत्राम ह्या झोपी गेल्या असत्या त्यावेळी अज्ञाताने घरी प्रवेश करीत सोनीचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या जिवत्या व रोख रक्कम असा एकूण २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमालावर हात साफ केला.

    Also Read : चंद्रपुरात मनसे पक्षात असंख्य नागरिकांचा प्रवेश

    याबाबत नीता आत्राम यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर चोरीचा गुन्हा विधिसंघर्ष बालकाने केला असल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी विधिसंघर्ष बालकाकडून १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Chandrapur minor theft arrest

    अनेक गुन्हे उघड

    विशेष बाब म्हणजे त्या विधिसंघर्ष बालकाने चंद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरी व इतर गुन्हे केले असल्याची कबुली दिली, आरोपी बालकाकडून दुचाकी क्रमांक MH ३४ BS २४५२ सह तब्बल १७ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अँपल कंपनीचा लॅपटॉप असा एकूण ३ लाख २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटें, विलास निकोडे, संजय धोटे, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कप्र्रचंड खरवार, रुपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदूरकर, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, दीपिका झिंगरे व सारिका गौरकार यांनी केली.

  • Chandrapur police raid animal trafficking । गोवंशाची अवैध वाहतूक; गोंडपिपरी पोलिसांनी केली कारवाई, ४ आरोपीना अटक

    Chandrapur police raid animal trafficking

    Chandrapur police raid animal trafficking : गोंडपिपरी २ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी जनावरांची अवैध आणि क्रूरपणे वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन पिकअप वाहनांमधून क्रूरतेने दाटीवाटीने कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असलेली एकूण १० गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे.

    Also Read : डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, कांग्रेसचे निषेध आंदोलन

    मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता मौजा विठ्ठलवाडा ते भंगाराम तळोथी रोडवरील चेकविठ्ठलवाडा बसस्टॉपजवळ ही कारवाई करण्यात आली.

    नेमका प्रकार काय घडला?

    पोलीस कर्मचाऱ्यांनी MH-34 BZ 2383 क्रमांकाची पिकअप आणि MH-34 AB 8938 क्रमांकाची अशोक लेल्यॉड छोटी पिकअप ही दोन वाहने थांबवली. तपासणी केली असता, या दोन्ही वाहनांमध्ये क्रूरपणे आणि निदर्यतेने दाटीवाटीने, दोरखंडाने बांधून, तसेच चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, १० गोवंशीय जनावरे कोंबलेली आढळली. Gondpipri police animal cruelty arrest

    जप्त केलेल्या जनावरांची किंमत ८,६४,००० रुपये इतकी आहे. आरोपी हे जनावरे अवैध मार्गाने कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याचे उघड झाले.

    चार आरोपींना अटक

    या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

    1. सुधाकर पांडुरंग निकोडे (वय ५०, रा. भंगाराम तळोधी, चालक, पिकअप क्र. MH-34 BZ 2383)
    2. सुधाकर वारलु झाडे (वय ५२, रा. चेकविठ्ठलवाडा, ता. गोंडपिपरी)
    3. अमर सुदर्शन मडावी (वय ३०, रा. वेळगाव, ता. गोंडपिपरी, चालक, पिकअप क्र. MH-34 AB 8938)
    4. प्रभाकर हनुमंतु कन्नाके (वय ६०, रा. बामनपेठ, ता. चार्मोर्शि, जि. गडचिरोली)

    या चारही आरोपींविरुद्ध गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    सदरची यशस्वी कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक, आणि श्री. सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    या कारवाईत सपोनि रमेश हत्तीगोटे, सा. सफौ माणिक वाग्दरकर, पोहवा विलास कोवे (ब.नं. २४१९), पो. अं. सचिन गायकवाड (ब.नं. ११७४), आणि चालक मपोशि. मनिषा ठाकरे (ब.नं. ६०२७) या गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.

  • Chandrapur police raid on illegal brothel । चंद्रपुरातील ‘लकी” चा कारनामा; ताडोबा च्या नावाने ठरला अनलकी

    Chandrapur police raid on illegal brothel

    Chandrapur police raid on illegal brothel : चंद्रपूर, महाराष्ट्र: स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch – LCB) चंद्रपूरने शहरात अवैध मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री उशिरा रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल ताडोबा अतिथी इन, लोहारा येथे छापा टाकून कुंटणखाना चालवणाऱ्या एका हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

    मॅनेजर स्वतःच्या फायद्यासाठी चालवत होता अवैध धंदा

    स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी रामनगर पोलीस स्टेशन परिसरात नियमित पेट्रोलिंग करत असताना, त्यांना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे ‘लकी’ नावाचा व्यक्ती पीडित महिलांना हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता अवैध वेश्याव्यवसाय चालवत आहे.

    Also Read : चंद्रपुरात १४० रुपयांची लाच घेताना दोघांना अटक

    या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने हॉटेलवर छापा टाकला. छाप्यादरम्यान, आरोपी नामे लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय २६, रा. अलवर, राजस्थान) हा हॉटेलचा मॅनेजर असून, तो पीडित महिलेकडून वेश्याव्यवसाय करून उपजीविका करत असल्याचे निष्पन्न झाले. Brothel trafficking case Chandrapur 

    ‘PITA’ ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

    आरोपी लकी उर्फ लक्ष्मण शर्मा याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA Act), कलम ३, ४, ५ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्याव्यवसाय चालवणाऱ्यांविरुद्ध हे कठोर कायदे लागू होतात. Maharashtra law enforcement prostitution

    सदरची महत्त्वपूर्ण आणि यशस्वी कारवाई श्री मुम्मका सुदर्शन (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) आणि श्री ईश्वर कातकडे (अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    या पथकामध्ये विशेष पोलीस अधिकारी अमोल काचोरे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), पोउपनी संतोष निंभोरकर, पोउपनी सुनील गौरकर, स.फो. धनराज कारकाडे, पो.हवा. सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, पोअ प्रफुल गारघटे, सुमित बरडे, शशांक बादमवार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम, महिला पोलिस छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तीतरे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर/AHTU) यांचा समावेश होता.

    या कारवाईमध्ये समाजसेविका सरिता मालू, रेखा भारसकडे आणि एनजीओ चंद्रपूर यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

    हॉटेल व्यावसायिकांना पोलिसांचे आवाहन

    “सर्व लॉजिंग हॉटेल व्यावसायिकांनी अशाप्रकारे अवैध कुंटणखाणी चालवू नयेत. जर कोणत्याही हॉटेलमध्ये अशा प्रकारचा अवैध धंदा चालवताना आढळून आला, तर संबंधित व्यक्ती आणि आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

  • Chandrapur stamp paper vendor bribery case । चंद्रपुरात १४० रुपयांची लाच घेताना मुद्रांक पेपर्स विक्रेत्याला अटक

    Chandrapur stamp paper vendor bribery case

    Chandrapur stamp paper vendor bribery case : चंद्रपूर १ नोव्हेम्बर (News३४ वृत्तसेवा) – चंद्रपूर शहरातील मुद्रांक विक्रेता व मदतनीस यांना १४० रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी जलनगर वॉर्डातील मुद्रांक विक्रेता मनीष अरुण देशमुख व मदतनीस रुपाली भरतलाल चौधरी यांनी वीज टेंडर कामाकरिता तक्रारकर्त्याला १४० रुपये अतिरिक्त मागितले होते.

    Also Read : चंद्रपुरात जड वाहतूक बंद होणार, खासदार धानोरकर यांचा प्रशासनाला इशारा

    तक्रारदार हे चंद्रपुरातील रहिवासी असून त्यांना वीज टेंडरच्या कामासाठी ५०० रुपयांचे ३ स्टॅम्प पेपर व १०० रुपयांचे ५ स्टॅम्प (मुद्रांक पेपर) हवे होते, मुद्रांक विक्रेत्याने ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अतिरिक्त ३० रुपये असे एकूण ९० रुपये तर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर अतिरिक्त १० रुपये असे ५० रुपये एकूण १४० रुपये मागितले, तक्रारदाराने मागितलेल्या स्टॅम्प पेपर ची शासकीय किंमत २ हजार रुपये होती त्यावर अतिरिक्त १४० असे एकूण २ हजार १४० रुपयांची मागणी केली, अतिरिक्त पैसे न दिल्यास स्टॅम्प पेपर मिळणार नाही अशी भूमिका मुद्रांक विक्रेता देशमुख यांनी घेतली होती. Chandrapur Bribery Case

    रंगेहात अटक

    तक्रारदाराला अतिरिक्त पैसे म्हणजेच लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत तक्रार दिली, लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करीत सापळा रचला असता ३१ ऑक्टोबर ला शासकीय शुल्क व्यतिरिक्त १४० रुपयांची लाच मुद्रांक विक्रेता मनीष देशमुख यांनी स्वीकारत ती मदतनीस रुपाली भरतलाल चौधरी यांच्याकडे देत असताना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. यावेळी मुद्रांक विक्रेता देशमुख व मदतनीस चौधरी यांना पुढील तपासकामी अटक करण्यात आली. Stamp Vendor Corruption

    महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१५ मध्ये ५०० रुपयांच्या जास्त मूल्याचे छापील मुद्रांकचा वापर बंद केला होता, आता मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी ई चालान सुरु करण्यात आले आहे. पूर्वी जास्त मूल्याच्या मुद्रांक पेपर्स विकल्याने विक्रेत्यांना चांगला फायदा व्हायचा मात्र शासनाच्या निर्णयामुळे त्यांच्या उत्पन्नात तोटा व्हायला लागला त्यामुळे चंद्रपुरात बहुतांश मुद्रांक विक्रेते १० रुपये अतिरिक्त शुल्क घेतात. आता या कारवाईमुळे सध्यातरी मुद्रांक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष बाब म्हणजे मुद्रांक विक्रेत्याला ५०० ते १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर्स ची विक्री केली तर त्यांना ३ टक्के कमिशन शासनाद्वारे मिळते.

    सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे, पोलीस कर्मचारी अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, राजेंद्र चौधरी, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केली.