Category: गुन्हेगारी

गुन्हेगारी (Crime) क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाची बातमी वाचा news34.in वर. चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील खून, चोरी, फसवणूक, सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळ्यांच्या ताज्या बातम्या येथे उपलब्ध आहेत. पोलीस दलाची कारवाई, न्यायप्रक्रियेतील घडामोडी आणि तपास कार्याचे सविस्तर अपडेट्स आम्ही देतो. गुन्हेगारी जगतातील सत्य आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

  • lcb chandrapur arrests illegal scrap gang । चंद्रपूर LCB ची धडक कारवाई! लोखंडी भंगार चोरी प्रकरणात पाच जण अटक; 7.82 लाखांचा मुद्देमाल जप्त

    lcb chandrapur arrests illegal scrap gang

    lcb chandrapur arrests illegal scrap gang : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) – दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत अवैधरित्या लोखंडी भंगाराची चोरी आणि वाहतूक करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये पिकअप वाहनासह सुमारे ७ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    Read Also : चोरीच्या भीतीने दागिने ठेवले वाहनात, १७ लाखांचे दागिने लंपास

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावरून अवैधरित्या लोखंडी भंगार चोरीची वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून पिकअप वाहन क्रमांक MH 34 BZ 8653 ला ताब्यात घेतले.

    या कारवाईत एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपी चंद्रपूर येथील रहिवासी आहेत: दुर्गेश तुळशीराम भागडे (वय २१), रोशन उमेश भोयर (वय २१), कृष्णा संजय गदईकर (वय १९), अशोक बनेश झाडे (वय ४१), दिवाकर तुळशीराम भागडे. याशिवाय, साबिर शेख नामक एक आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. lcb chandrapur arrests illegal scrap gang

    जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

    पोलिसांनी आरोपींकडून खालीलप्रमाणे एकूण ₹ ७,८२,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे: पिकअप वाहन (क्र. MH 34 BZ 8653) ५,००,०००/-, लोखंडी भंगार (२५०० किलो) २,५०,०००/-, गॅस कटर सिलेंडर (०३ नग) ३०,०००/-, घरगुती सिलेंडर २,०००/-.

    याप्रकरणी आरोपींवर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर च्या पथकाने केली. कारवाई पथकात PSI संतोष निंभोरकर, PSI सुनील गौरकर, ASI धनराज करकाडे, HC गणेश भोयर, संतोष येलपुलवार, PC सुमित बरडे, आणि प्रफुल गारघाटे यांचा समावेश होता.

  • gold and silver jewellery theft from car । चोरीच्या भीतीने वाहनात ठेवले दागिने…त्याने साधला डाव, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

    gold and silver jewellery theft from car

    gold and silver jewellery theft from car : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News ३४) – चारचाकी वाहनात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने ओळखीमधील एका तरुणाने चोरी केल्याची घटना चंद्रपुरातील पडली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. चोरी प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून चोरी गेलेला १७ लक्ष ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    १६ नोव्हेम्बर रोजी विदर्भ टाऊनशिप देवाळा मध्ये राहणाऱ्या ४३ वर्षीय विना वीरेंद्र कुंभरे या मुलीसोबत पांढरकवडा मध्ये जाण्यासाठी निघाले होते, चोरीच्या भीतीने विना ने सोन्या-चांदीचे दागिने घरातील गेटच्या आतमध्ये असलेल्या चारचाकी वाहनात ठेवत गावी गेल्या.

    Read Also : जनता कॅरिअर लॉन्चर वसतिगृह आत्महत्या प्रकरणी वॉर्डनला अटक, ३ फरार

    २० नोव्हेम्बर रोजी विना आपल्या मुलीसह घरी परतल्या असत्या त्यांनी वाहनात ठेवलेले दागिने बघितले मात्र त्यांना ते कुठेही आढळून आले नाही, वाहनातील दागिने चोरी झाले असे समजताच विना कुंभरे यांनी पडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रार दाखल होताच सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले. gold and silver jewellery theft from car

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, गोपनीय माहिती मिळवली, पोलिसांनी फिर्यादी तर्फे माहिती घेतली कि वाहनात दागिने ठेवण्याची बाब इतर कुणाला माहिती आहे का किंवा कुणाच्या समोर वाच्यता केली का? मग काय पोलिसांना यावर फिर्यादी यांनी माहिती दिली आणि पोलिसांनी थेट आरोपीला अटक केली.

    गुन्हे शाखेच्या पथकाने स्वावलंबीनगर, नगिनाबाग मध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय समीर अशोकराव सातपुते ला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा कबूल केला. विना कुंभरे या वाहनात दागिने ठेवत होता, हि बाब आरोपी समीर ला माहिती होती. आरोपी समीर हा फिर्यादी यांच्या ओळखीचा होता अशी माहिती आहे. gold and silver jewellery theft from car

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी समीर सातपुते कडून सोन १४५ ग्राम-चांदी ८० ग्राम एकूण किंमत १७ लक्ष ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात, पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.

  • district collector action illegal mining । चिचपल्ली-जुनोना रोडवर मोठी कारवाई: परवाना नसलेला रेतीचा हायवा जप्त!

    district collector action illegal mining

    district collector action illegal mining : चंद्रपूर, दि. 21 नोव्हेम्बर (News३४) :  जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या निर्देशानुसार जिल्हा भरारी पथक हे  20 नोव्हेंबर रोजी रात्री  10 च्या सुमारास गस्तीवर असतांना मौजा चिचपल्ली ते जुनोना मार्गावर अवैध रेतीची वाहतूक करीत असतांना एक ट्रक हायवा वाहन क्र. MH-२७ DT ८६७६ ची तपासणी करण्यात आली.

    Read Also : चंद्रपूरकरांच्या पोटात बनावट दारूचा घोट?

    वाहन चालक  अरशद मोहम्मद रा. अमरावती यांना वाहतूक परवानाबाबत विचारणा केली असता त्यांच्या जवळ वाहन परवाना आढळून आला नाही. त्यांनी वाहन परवाना दाखविला नाही. सदर वाहन हे अहेफाज भाई रा. अमरावती यांचे असल्याचे वाहन चालकाने सांगितले.

     वाहतूक परवाना नसल्यामुळे अवैध वाहतूक असल्याचे समजून सदर वाहन जप्त करुन पोलीस उपनिरीक्षक कवडू गेडाम यांच्या सुपूर्द नाम्यावर पोलीस चौकी चिचपल्ली येथे लावण्यात आले. पुढील कार्यवाही करण्याकरीता सदर वाहन तहसिलदार चंद्रपूर यांचेकडे सुपूर्द करुन पुढील कार्यवाही तहसिलदार चंद्रपूर यांचेकडून करण्यात येईल, असे प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी  रोहन ठवरे यांनी कळविले आहे.

  • Illegal liquor transport raid updates । चंद्रपूरकरांच्या पोटात बनावट दारू?

    Illegal liquor transport raid updates

    Illegal liquor transport raid updates : चंद्रपूर, दि. 21 नोव्हेम्बर (News३४) :  राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोरा निरीक्षक पथकाने येनसा ते सोसायटी (मजरा) जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करून चारचाकी वाहनातून अवैधरित्या वाहतूक होत असलेला परराज्यातील व बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला. जप्त मद्य आणि वाहनाची एकूण किंमत अंदाजे 6 लक्ष 40 हजार इतकी असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    Read Also : नगराध्यक्षपदासाठी शिवसैनिकांचा आमना-सामना

    मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,  बुधवारी सायं. 5 वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर हायवेवर वरोरा तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. शॉवरलेट कंपनीच्या ग्रे रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक MH49-AS-0647 ची तपासणी करण्यात आली असता वाहनाच्या डिक्कीत रॉयल स्टॅग ब्रँडच्या 180 मिलीच्या 480 बॉटली, रॉयल चॅलेंज ब्रँडच्या मध्यप्रदेश निर्मित 750 मिलीच्या 24 बॉटली (प्रथमदर्शनी बनावट) असा परराज्यातील व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित विदेशी मद्यसाठा आढळून आला.

    या प्रकरणी मनीष नंदकीशोर जयस्वाल (वय 48, नागपूर),  विशाल शंभू मंडळ (वय 28, सावनेर, जि. नागपूर),  सतीश नामदेव देवकर (वय 31, वरोरा, जि. चंद्रपूर) यांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Illegal liquor transport raid updates

    ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त गणेश पाटील आणि अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत निरीक्षक प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, प्रमोद रजोते, हर्षराज इंगळे, सागर दिडसे, जवान विलास महाकुलकर (वाहनचालक), तसेच जवान जगदीश मस्के, जितेंद्र आनंद, मंगेश कुयटे आणि अमोल भोयर यांचा सहभाग होता.

    सदर प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा हे करीत आहेत.

  • Warora Latest Crime News । बँकेतून पैसे काढले अन्… वरोरा चिकन मार्केटजवळील चोरीचा थरार

    Warora Latest Crime News

    Warora Latest Crime News : वरोरा १९ नोव्हेम्बर (News३४) – वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १७ नोव्हेम्बर रोजी बँकेतून काढलेले १ लक्ष ४० हजार रुपये दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून अज्ञाताने लांबवीले, मात्र पोलिसांच्या तपासचक्राने अवघ्या ३ तासात आरोपीला अटक करण्यात आली.

    Also Read : रक्तरंजित प्रेमकहाणी, विवाहित महिलेच्या पतीची प्रियकराने केली हत्या

    १७ नोव्हेम्बरला फिर्यादी ४५ वर्षीय सुनील वासुदेवराव घाटे राहणार हनुमान वार्ड यांनी चिकन मार्केट जवळील बँकेतून १ लक्ष ४० हजार रुपये काढत ते मोपेड वाहनाच्या डिक्कीत ठेवले, त्यानंतर यात्रा वार्डातील हॉटेल मध्ये घाटे गेले, काही वेळाने ते परत आले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने डिक्कीत ठेवलेली रक्कम लांबवली.

    याबाबत घाटे यांनी वरोरा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली, तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले, परिसरातील सीसीटीव्ही तपासत इतर तांत्रिक पद्धतीने अवघ्या ३ तासाच्या आता आरोपी राजू लिंगन्ना इंद्रपवार राहणार यात्रा वार्ड याचा शोध घेत त्याला अटक केली, चोरी गेलेली रोख रक्कम आरोपी कडून जप्त करण्यात आली. Warora Latest Crime News

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात सपोनि शरद भस्मे, पोलीस कर्मचारी संदीप मुळे, महेश गावतुरे, विशाल राजूरकर व व्यापारी संजय शेंडे, अनिकेत पुरी, प्रमोद लोंडे व जयंत ठमके यांच्या मदतीने केली.

  • husband murdered by wife lover । पत्नीच्या प्रियकराचा भयावह बदला; पतीची हत्या, ९ वर्षांची मुलगी पोरकी

    husband murdered by wife lover

    husband murdered by wife lover : कोरपना १८ नोव्हेम्बर (News३४) – प्रेम संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची पत्नीच्या प्रियकरानी हत्या केल्याची घटना रविवार दिनांक १६ रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा येथिल एका नाल्याजवळ सायंकाळच्या सुमारास घडली. नितेश रामदास वाटेकर रा. नारडा असे मृतकाचे आहे. नितेशचे वनसडी येथे हेअर सलून चे दुकान चालवीत होता. तो आपल्या दुचाकीने आपल्या स्वगावी नारंडा येथे अपडाऊन करायचा. रात्रीचे नऊ वाजून ही तो परतला नव्हता.

    Read Also : मुनगंटीवार यांची मागणी पूर्ण, लाडक्या बहिणींना दिलासा

    याच दरम्यान गावातील काहींनी व्यक्तींनी नारंडा येथील खडकया नाल्याजवळ दुचाकीसह नितेश पडून असल्याचे सांगितले. यावरून त्याचा भाऊ सतीश यांनी जाऊन पाहिले असता. त्याच्या डोक्याला गंभीर मारहाण झाल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे नेले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचं सांगितले. सन २०२२ पासून नितेश हा गडचांदूर येथे आपल्या पत्नी व मुलीसह किरायाणे राहत होता.याच दरम्यान बादल सोनी नामक व्यक्तीशी नितेशच्या पत्नीचे प्रेम संबंध जुळले होते. husband murdered by wife lover

    गणपती उत्सव दरम्यान यामुळेच नितेश आणि बादल यांच्यात वाद सुद्धा झाला होता. त्यावेळी बादल ने नितेश ला जीवे मारण्याची धमकी दिली होती. नितेशची पत्नी साधना ही गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली होती. त्यावेळी बादल नी माफी मागितल्याने व पुढे त्रास देऊ नको असे साधनाच्या भावाने समजवल्यानंतर वादावर पडदा पडला होता. कुटुंब उध्वस्त होऊ नये म्हणून साधनाने तक्रार मागे घेतली होती.

    १६ नोव्हेम्बर रोजी काय घडलं?

    १० वर्षांपूर्वी नितेशचे लग्न झाले होते, साधना व नितेश यांना ९ वर्षाची मुलगी आहे, या सुखी संसाराला ३ वर्षांपूर्वी बादल सोनी ची वक्रदृष्टी लागली, बादल व साधना चे प्रेमसंबंध जुळले, याची चाहूल नितेश ला लागली तो दोघांपासून वैतागला होता, त्याने गडचांदूर सोडत नारंडा मध्ये रहायला आला, वनसडी जवळ त्याने लहान सलून चे दुकान लावत कूटुंबाचा गाडा चालवू लागला. मात्र बादल हा साधना च्या प्रेमात वेडसर झाला होता. तो साधना ला भेटायला यायचा. तुझ्या पतीचा काटा काढावा लागेल कारण त्याच्यामुळे आपण भेटू शकत नाही, असे बादल साधना जवळ नेहमी म्हणत होता. husband murdered by wife lover

    १६ नोव्हेम्बर रोजी बादल व त्याचा मित्र दुचाकीने चौकात येऊन नितेश ची वाट बघत होते, नितेश घरून निघतो कधी व घरी परत कधी येतो याची पूर्ण माहिती बादल ला होती. चौकात दुचाकी लावून दोघे खडक्या नाल्याजवळील मार्गावर नितेश ची वाट बघत होते, नितेश त्यांना दुचाकीने येताना दिसला, धावत्या दुचाकीवर अंधारात बादल ने नितेशच्या डोक्यावर लहान हातोडी ने वार केला, अचानक झालेल्या वाराने नितेश दुचाकीसह कोसळला. नितेश ला बादल ने साधना व त्याचे फोटो दाखवीत आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, तुझ्यामुळे आम्ही एक होऊ शकत नाही.

    नितेश जखमी अवस्थेत बादल ला म्हणाला कि उद्या कुटुंबासह चर्चा करीत मी साधना ला सोडचिठ्ठी देतो, त्यानंतर तुम्ही काय ते करा, मात्र नितेश हा जखमी असल्याने बादल ला वाटलं कि हा पोलिसात तक्रार देणार, त्यामुळे बादल ने नितेश चा गळा आवळला, गळ्यातील हड्डी मोडल्याने नितेश गतप्राण झाला. मात्र आरोपी इतक्यावर थांबले नाही त्यांनी नितेश ला खांद्यावर घेत नाल्याजवळ येऊन टाकले. सदर घटना अपघात वाटावी यासाठी आरोपींनी पूर्ण प्रयत्न केला. husband murdered by wife lover

    रात्री हि घटना गावात पसरली, सर्वाना हि घटना अपघात आहे असं वाटलं, कोरपना पोलीस निरीक्षक लता वाडीवे व त्यांच्या पोलीस चमूने घटनास्थळाची सखोल पाहणी केली, मोबाईल जवळ व मार्गावर काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात मृतकाचा गळा आवळला असल्याची माहिती प्राप्त होताच कोरपना पोलिसांनी बादल सोनी व त्याचा मित्र तुषार येनगंटीवार ला अटक केली असून पोलिसांनी मृतकाचे पत्नी साधना वाटेकर ला सुद्धा ताब्यात घेतले आहे, साधना चा सुद्धा या प्रकरणी सहभाग असल्याचे आढळून आले आहे. साधना व बादल च्या प्रेम प्रकरणात पती नितेश चा बळी गेला मात्र यामध्ये ९ वर्षाची मुलगी पोरकी झाली. husband murdered by wife lover

    आरोपीवर भारतीय न्याय संहिता ( बी एन एस ) २०२३ कलम १०३(१),३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक देवानंद केकन व कोरपना पोलीस करीत आहे.

  • chimur taluka crime news today । जुगार व अवैध हातभट्टीवर दुहेरी कारवाई! चिमूर पोलिसांची मोहीम

    chimur taluka crime news today

    chimur taluka crime news today : चिमूर १६ नोव्हेम्बर (News३४): स्थानिक पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील मालेवाडा आणि पिपर्डा या दोन गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टी मोहादारू निर्मितीवर चिमूर पोलिसांनी मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत सुमारे रु. २,१२,५००/- किमतीचा दारूसाठा आणि रसायनं जप्त करून घटनास्थळी नष्ट करण्यात आली.

    🎯 गोपनीय माहितीच्या आधारावर छापा

    दिनांक १३ नोव्हेम्बर रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर चिमूर पोलिसांनी तत्काळ प्रोहिबिशन (दारूबंदी) रेडच केली. मौजा मालेवाडा आणि पिपर्डा येथील दोन ठिकाणी अवैध दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

    Read Also : राजुरा पोलिसांनी शोधले हरविलेले १९ मोबाईल

    💰 जप्त केलेला मुद्देमाल

    या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा सडवा (मोहफुले भिजवलेले मिश्रण) जप्त केला, ज्यात खालील साहित्याचा समावेश आहे: chimur taluka crime news today

    • मोहा सडवा (Moha Sadvva): 15 मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे 750 किलो मोहासडवा.
      • किंमत: } 1,87,500/- एक लक्ष ८७ हजार ५०० रुपये.
    • हातभट्टी मोहादारू (Handmade Moha Liquor): 6 प्लास्टिक कॅनमध्ये 60 लिटर तयार मोहादारू.
      • किंमत: 18 हजार रुपये
    • इतर साहित्य: हातभट्टीसाठी वापरले जाणारे ७ हजार रुपये किमतीचे साहित्य.

    जप्त केलेल्या संपूर्ण साहित्याची एकूण किंमत २ लक्ष १२ हजार ५०० रुपये इतकी आहे. सर्व अवैध सडवा आणि दारू घटनास्थळीच नष्ट करण्यात आली.

    ⚖️ दारूबंदीसह जुगार प्रकरणी गुन्हे दाखल

    या कारवाईदरम्यान अवैध दारू निर्मितीसोबतच अवैधरित्या चालणाऱ्या सट्टा-पट्टी जुगारवरही पोलिसांनी कारवाई केली. संबंधित आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन चिमूर येथे दारूबंदी कायदा आणि जुगार कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक (Crime Detection Squad) करत आहे. chimur taluka crime news today

    👮‍♂️ यशस्वी कारवाईत सहभागी पथक

    जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली.

    पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांच्या नेतृत्वाखालील पथकात खालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता:

    • पोहवा. सचिन साठे
    • पोअं. सचिन खामनकर
    • पो.अं. रुपेश शामकुळे
    • सौरभ महाजन

    चिमूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू निर्मिती आणि जुगार अड्ड्यांना मोठा धक्का बसला असून, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन अधिक मजबूत झाले आहे.

  • lost android phone recovery by rajura police । मोबाईल चोरी किंवा हरवला? राजुरा पोलिसांनी दाखवली कार्यतत्परता, 19 फोन मालकांना सुपूर्द

    lost android phone recovery by rajura police

    lost android phone recovery by rajura police : राजुरा १५ नोव्हेम्बर (News३४) – राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत हरवलेले १९ अँड्रॉइड मोबाईल फोन परत मिळवून नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात राजुरा पोलीस पथकाला मोठे यश मिळाले आहे. सन २०२४ आणि २०२५ मध्ये गहाळ झालेल्या या मोबाईल फोन्सचा पोलीस पथकाने अत्यंत कौशल्याने शोध घेतला आणि ते मूळ तक्रारदारांना परत केले.

    🌟 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते फोन परत

    मिळून आलेले हे सर्व १९ मोबाईल फोन एका विशेष कार्यक्रमात तक्रारदार नागरिकांना परत करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार यांच्या हस्ते हे मोलाचे फोन त्यांच्या मालकांना सुपूर्द करण्यात आले. यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

    Read Also : गडचांदूर पोलिसांनी पकडला २ किलो गांजा

    👮‍♂️ कौतुकास्पद कामगिरी

    संपूर्ण कार्यवाही श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक सुमित परतेकी आणि त्यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार शरद राठोड/९२ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक कौशल्यामुळे नागरिकांचे हरवलेले फोन सुरक्षित परत मिळू शकले.

    👍 नागरिकांसाठी दिलासा

    मोबाईल फोन गहाळ झाल्यावर होणारी गैरसोय आणि त्यातील महत्त्वाचा डेटा गमावण्याची भीती यामुळे नागरिक त्रस्त होतात. राजुरा पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे केवळ १९ नागरिकांचे लाखो रुपयांचे फोनच परत मिळाले नाहीत, तर त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा ठरला आहे.

    या ‘मिशन स्माईल’च्या यशामुळे राजुरा पोलिसांची कार्यतत्परता आणि नागरिकांप्रति असलेली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

  • Gadchandur crime news updates । गडचांदूरात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह दोघांना अटक

    Gadchandur crime news updates

    Gadchandur crime news updates : चंद्रपूर १४ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील शेतशिवारात गांजा विक्री सुरु होती, पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर २ आरोपीना अटक करीत २ किलो ११ ग्राम गांजा जप्त करण्यात आला.

    गडचांदूरातील बैलमपूर मार्गावरील वरझडी शेतशिवारात गांजा विक्री सिरी आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी पथकासह त्याठिकाणी धाड मारली, त्याठिकाणी २ इसम पोलिसांना आढळले, त्यांची चौकशी केली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पोलिसांनी शेतशिवारात शोधमोहीम राबवली असता एक गाठोडं पोलिसांच्या हाती लागले, त्यामध्ये हिरवट रंगाची पाने, फुले व बोन्डे असलेल्या गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळले.

    Read Also : रामाला तलावाचे संवर्धन तात्काळ करा – इको प्रो

    ताब्यात घेतलेल्या इरफान सय्यद इस्माईल राहणार गडचांदूर व अनिल जगेराव आडे राहणार बैलमपूर यांनी सदर वनस्पती हि गांजा असल्याचे सांगत ती विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली दिली. आरोपींवर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सण १९८५ चे कलम ८ (क), २० (ब)(ii)(ब) अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गडचांदूर पोलिसांनी २० हजार ११० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला. Gadchandur crime news updates

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोउपनि पंकज हेडाऊ, पोलीस कर्मचारी शीतल बोरकर, बळवंत शर्मा, प्रकाश बाजगीर, सूरज ढोले, मनोहर जाधव व साईनाथ उपरे यांनी केली.

  • ceir portal usage by chandrapur police । 🔹 CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करून चंद्रपूर पोलिसांनी शोधले हरवलेले ३१ मोबाईल!

    ceir portal usage by chandrapur police

    ceir portal usage by chandrapur police : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी (Bramhapuri Police Station) आणि घुग्गुस (Ghugus Police Station) पोलिसांनी सायबर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत, गहाण (Missing) किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलचा यशस्वी शोध लावून ते मूळ मालकांना परत केले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांनी CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा उपयोग करण्यात मोठे यश मिळवले आहे.

    ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई

    पोलीस स्टेशन ब्रह्मपुरीच्या हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. सायबर सेलच्या माध्यमातून CEIR पोर्टलवर तक्रारींचा आधार घेत पोलिसांनी तांत्रिक तपासणी केली. या तपासणीत एकूण २४ मोबाईल हँडसेटचा शोध लागला.

    Read Also : चंद्रपूर मनपाचा जाहीर धुत्कार, माजी नगरसेवकाने दिले अपमान पत्र

    पोलीस निरीक्षक प्रमोद बानवले साहेब यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले. यामुळे अनेक तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

    या शोध मोहिमेत डीबी (DB) पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार निलेश तुमसरे, स्वप्नील पळसपगार, चंदू कुरसंगे, इरशाद खान आणि वशिष्ठ रंगारी यांनी मोलाची कामगिरी बजावली. ceir portal usage by chandrapur police

    घुग्गुस पोलिसांचेही यश

    दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत, घुग्गुस पोलिसांनी देखील गहाण गेलेल्या ७ मोबाईलचा शोध लावला. पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी ११ नोव्हेंबर रोजी सदर मोबाईल त्यांच्या तक्रारदार मालकांना कायदेशीर प्रक्रियेनंतर परत केले.

    CEIR पोर्टलचे महत्त्व

    CEIR पोर्टल हे दूरसंचार विभागाने (DoT) सुरू केलेले एक तंत्रज्ञान आहे, जे मोबाईल गहाण किंवा चोरी झाल्यास त्याला ब्लॉक (Block) करण्यास मदत करते. या ब्लॉकमुळे मोबाईलचा गैरवापर थांबतो आणि तो ट्रॅक (Track) करणे पोलिसांना सोपे होते. चंद्रपूर पोलिसांनी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यामुळे हरवलेले मोबाईल परत मिळवण्याचे प्रमाण वाढले आहे. ceir portal usage by chandrapur police

    एकंदरीत, ब्रह्मपुरी आणि घुग्गुस पोलिसांनी मिळून एकूण ३१ मोबाईल शोधून काढले आणि ते त्यांच्या मालकांना परत केले आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.