Tag: News34 chandrapur

  • customer service in electricity department । वीज खात्याची ‘ग्राहक सेवा’ फक्त नावापुरती?, महावितरणच्या आढावा बैठकीत निर्देश काय?

    customer service in electricity department

    customer service in electricity department : नागपूर : महावितरणचे संचालक (संचलन तथा प्रकल्प) सचिन तालेवार यांनी ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यावर आणि तक्रारींचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला आहे. दुरुस्ती कामांना उशीर होत असल्यास ग्राहकांना तात्काळ माहिती द्या, त्यांच्याशी सौजन्याने बोला आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडळांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

    २० रुपयांसाठी १ लक्ष ४० हजार रुपये गमावले, राजुऱ्यातील घटना

    तालेवार म्हणाले, “सुसंवादाने ग्राहकांच्या अनेक समस्या सुटतील आणि तक्रारींचे प्रमाण खूप कमी होईल.” ते पुढे म्हणाले की, दुरुस्ती कामांना विलंब झाल्यास ग्राहकांना लगेच कळवा. शक्य असूनही वीजपुरवठा वेळेत सुरू न झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल आणि हयगय अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मोठ्या आणि गंभीर बिघाडांच्या ठिकाणी वरिष्ठ अभियंत्यांनी स्वतः उपस्थित राहून दुरुस्तीच्या कामांना गती द्यावी. तसेच, देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे नियोजन असल्यास, त्याचीही पूर्वसूचना ग्राहकांना तात्काळ देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. (power outage notification system)

    वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना याबाबत सूचना द्या

    देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करण्याच्या परवानगीवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही तालेवार यांनी दिले. 11 केव्ही वीज वाहिन्यांवरील वीजपुरवठा बंद करण्यासाठी संबंधित अधीक्षक अभियंते आणि 33 केव्ही वाहिनीसाठी मुख्य अभियंत्यांनीच परवानगी द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. औद्योगिक आणि एमआयडीसी भागात केवळ नवीन वीजजोडणी द्यायची आहे म्हणून वीजपुरवठा कधीही बंद करुन इतर औद्योगिक ग्राहकांचे नुकसान करु नका.. अशा जोडण्या आणि देखभाल व दुरुस्तीची कामे निश्चित केलेल्या दिवशीच करा आणि त्याची पूर्वसूचना सर्व ग्राहकांना द्या, असेही त्यांनी सांगितले. तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची महावितरणच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंद करून ग्राहकांना एसएमएसद्वारे त्वरित सूचना पाठवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. SMS alert for power outage

    महावितरणच्या सेवा अधिक ग्राहकोभिमुख करण्यावर तालेवार यांनी भर दिला. वीज ग्राहकांच्या नावात बदल करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असतानाही कर्मचाऱ्यांनी ती क्लिष्ट करून ठेवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ग्राहकांना त्रास न देता ही प्रक्रिया सहज करा, असे आवाहन त्यांनी केले.

    थकबाकी असलेली हक्क वसूल करा

    स्मार्ट मीटर लागल्यानंतर वीजपुरवठा विश्वासार्हता अंकेक्षण थेट ग्राहक स्तरावर होणार असल्याने त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. (smart meters benefits for consumers) यामुळे त्यांना मिळणाऱ्या वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, तसेच रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) आणि ब्रेकर्सच्या किरकोळ दुरुस्त्या आपापल्या पातळीवर करण्याच्या सूचनाही सचिन तालेवार यांनी यावेळी दिल्या. थकबाकीदार ग्राहकांकडून वसुली करणे किंवा त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याने, वीज बिलापोटी असलेली थकबाकी पूर्णपणे वसूल करा किंवा ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करून त्याची नोंद प्रणालीमध्ये करा, असे स्पष्ट निर्देश तालेवार यांनी दिले. यावेळी त्यांनी मागेल त्याला सौर कृषीपंप, सुअभ्रग्राम, मॉडेल सौर व्हिलेज, आरडीएसएस, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आदी योजनांच्या कामांची माहिती घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

    या महत्त्वपूर्ण बैठकीला गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे दिलीप दोडके, चंद्रपूर परिमंडलाचे हरिश गजबे, अमरावती परिमंडलाचे अशोक साळुंके यांच्यासह पाचही परिमंडळातील अधीक्षक अभियंते, नागपूर परिमंडळातील कार्यकारी अभियंते व नागपूर शहर मंडलातील उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

  • Tadoba safari bus service 2025 | पर्यटकांसाठी आनंदाची बातमी – ताडोबा सफारीसाठी बससेवा उपलब्ध!

    Tadoba safari bus service 2025

    Tadoba safari bus service 2025 : चंद्रपूर – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पापैकी एक असून जगभरातील व देशातील निसर्ग पर्यटक या वनाचा आणि वन्यजीवांचा आनंद उपभोगण्याकरिता या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये येतात.
    याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटकांना अल्प दरामध्ये या वनाचा आनंद घेण्याकरिता वर्ष २०२३ मध्ये क्रुझर सेवा सुरु करण्यात आली होती. पर्यटकांचा ओघ बघता मोहर्ली गेट मार्फत ४ व कोलारा गेट मार्फत ३ अशा एकूण ७ क्रुझर मार्फत कोर क्षेत्रात पर्यटन सेवेकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. Chandrapur to Moharli bus service

    अनोळखी इसमाकडून लिफ्ट घेताय? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे


    सदर सेवेमार्फत स्थानिक जिल्ह्यातील निसर्ग पर्यटक, सामान्य नागरिक यांना ताडोबा सफारीचा आनंद मनमुराद मिळत आहे. वर्ष २०२३ ते वर्ष २०२५ पर्यत ५८००० निसर्ग पर्यटकांनी या क्रुझरद्वारे ताडोबा सफारीचा अनुभव घेतला आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून वने व वन्यजीवाविषयी जनजागृती सुद्धा सामान्य नागरीकामध्ये होत आहे हे विशेष.

    ताडोबा साठी 40 सीटर बस


    सदर उपक्रमाची यशस्वीता बघता चंद्रपूर जिल्हातील पर्यटकांना चंद्रपूर ते मोहुर्ली येथे सकाळी व दुपार सफारी जाणे-येणे करण्यासाठी अडचण जात होती. ही बाब लक्ष्यात घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने तसेच मा. आमदार श्री. किशोर जोरगेवार, विधानसभा सदस्य, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रुझर पर्यटकांकरिता चंद्रपूर ते मोहर्ली ४० सीटर बस उपलब्ध करण्यात आली असून दिनांक १ जून २०२५ ला मा. आमदार श्री. किशोर जोरगेवार, विधानसभा सदस्य, चंद्रपूर यांच्या शुभहस्ते बससेवेचे उद्घाटन पार पडले. Tadoba safari from Chandrapur

    How to reach Moharli gate Tadoba


    सदर बसमार्फत सकाळच्या सफारीकरिता ४.३० वाजता व सफारी पूर्ण झाल्यानंतर सकाळी १० वाजता चंद्रपूर परत येणार त्याचप्रमाणे दुपारच्या सफारी करिता २ वाजता तर परत ७.३० वाजता चंद्रपूर ला पर्यटकांन सोडणार आहे. सदर बससेवा उपसंचालक (कोर) कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वनवसाहत, मुल रोड, चंद्रपूर येथून प्रस्थान करणार आहे.


    या महत्वपूर्ण प्रंसगी डॉ. जितेंद्र रामगावकर (भावसे) मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच डॉ. प्रभू नाथ शुक्ल (भावसे) वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. या वेळेस श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक बफर, श्री. विवेक नातू, सहायक वनसंरक्षक, कोर, श्री. अरुण गोंड, वनपरीक्षेत्र अधिकारी, मोहर्ली, श्री. संतोष थीपे, वन परिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली बफर, श्रीमती. स्वाती महिसकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर बफर तसेच सर्व वन कमर्चारी तसेच चंद्रपूर शहारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Run for safety Mahavitaran event । “महावितरणची ‘रन फॉर सेफ्टी’ – अपघातमुक्त भविष्यासाठी एक पाऊल!”

    Run for safety Mahavitaran event

    Run for safety Mahavitaran event : चंद्रपूर – वीज ग्राहकांच्यात वीज अपघातांबाबत जागरूकता निर्माण व्हावी, वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर यावे म्हणून महावितरणने मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’चे आयोजन केले होते. प्रथम चंद्रपूरचे मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे, संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, श्री.कोलते विद्युत निरीक्षक चंद्रपूर,यांच्या हस्ते या मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’ला झेंडा दाखवून सुरुवात झाली.

    कृषी पंपांना वीज जोडणी द्या – आमदार सुधीर मुनगंटीवार


    दि. 01 जून 2025या मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’ला चंद्रपूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे, चंद्रपूर मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे,जिल्हा विद्युत निरीक्षक श्री.कोलते,व सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) श्री.सुशिल विखार, आणि श्री.विशाल पिपरे उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी तसेच कार्यकारी अभियंते सर्वश्री.दारव्हेकर, पेगलपट्टी, वंदिले, शहाडे, निचत(चाचणी विभाग), श्री.गणेश चाचेरकर, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Mahavitaran zero accident campaign

    msedcl run for safety 2025

    ६ जून पर्यंत चालणार सुरक्षा सप्ताह

    “आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रिद घेऊन चंद्रपूर महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात दि.१ ते ६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून चंद्रपूर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर परिमंडळ मुख्यालय बाबूपेठ ते आझाद गार्डन शहरात व परत मुख्यालय बाबूपेठ पर्यंत धावले.

    mahavitaran zero accident campaign


    यावेळी कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात पकडले होते तसेच वीज सुरक्षेबाबत विविध घोषणाही देण्यात आल्या. ‘विद्युत भवन’ या परिमंडल कार्यालयात आल्यानंतर मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे व संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, श्री.कोलते विद्युत निरीक्षक चंद्रपूर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

  • Sunday on cycle rally । क्रीडा विभागाचा अभिनव उपक्रम – सायकलवरून पर्यावरण जागृती!

    Sunday on cycle rally

    Sunday on cycle rally : चंद्रपूर – राज्य शासन व युवक सेवा संचालनालय,  पुणे यांच्या ‘खेलो इंडिया‘ उपक्रमांतर्गत आणि साई, मुंबईच्या निर्देशानुसार ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. या अंतर्गत आज (दि. 1) सकाळी  चंद्रपूर शहरातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

    चंद्रपुरातील मच्छी बाजाराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

    या रॅलीत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, संदीप उईके, वरिष्ठ लिपिक रंजना शेवतकर व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीला हिरवा झेंडा दाखवून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी सुरुवात केली. Khelo India cycling event 2025

    आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश

    सायकल चालविणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार असून यामुळे इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण, आरोग्यवृद्धी आणि साहसवृत्तीचा विकास साधता येतो. ‘फिटनेस का डोज, अर्धा तास रोज’ या घोषवाक्याखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

    सुमारे 10 किलोमीटर अंतराच्या या रॅलीत जनजागृतीपर घोषणांचा समावेश होता. या यशस्वी उपक्रमासाठी क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, संदीप उईके, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड व मानधन कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. खेलो इंडिया चे प्रशिक्षक रोशन भूजाडे यांचे या उपक्रमात मोलाचे सहकार्य लाभले.

  • how to quit tobacco addiction । जागतिक तंबाखू नकार दिन साजरा

    how to quit tobacco addiction

    तंबाखूचा ‘अंधार’ सोडा, आरोग्याचा ‘प्रकाश’ स्वीकारा!

    how to quit tobacco addiction : चंद्रपूर – राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व इंडियन डेंटल असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम लोणकर व्यसनमुक्ती, उपचार व पुनर्वसन केंद्र, आरवट येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

    दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

    यावर्षीचा संदेश होता – “आकर्षणाचा मुखवटा उतरवूया : तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करूया”. कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढवणे व COTPA 2003 (सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा-२००३) याची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देणे असा होता.

    तंबाखूच्या सेवनाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

    कार्यक्रमात डॉ. राजेश टोंगे (इंडियन डेंटल असोसिएशन) यांनी व्यसनांमुळे जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांवर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. श्वेता सावलीकर (जिल्हा सल्लागार, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम) यांनी तंबाखूच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे परिणाम व तंबाखू उद्योगांच्या फसव्या प्रचाराची माहिती दिली. तसेच मौखिक कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आकाश कासटवार यांनी मुख कर्करोगाची लक्षणे, सुरुवात व उपचार पद्धती स्पष्ट केली. impact of tobacco on lifestyle and health

    समुपदेशक मित्रांजय निरंजने यांनी व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध उपचार व पुनर्वसन सेवांविषयी माहिती दिली.  तुषार रायपूरे यांनी उपस्थित नागरिकांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. सर्व उपस्थितांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात डॉ. राजेश डोंगरे (प्रेसिडेंट, IDA), डॉ. पियुष लोधे (सेक्रेटरी), डॉ. भार्गव भांडे, डॉ. अमर दुर्योधन, डॉ. आकाश कासटवार, डॉ. श्वेता सावलीकर, मित्रांजय निरंजने व तुषार रायपूरे यांचा मोलाचा सहभाग होता. आयोजकांनी तंबाखूमुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

    १. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम म्हणजे काय?

    तंबाखू नियंत्रण कार्यक्रम म्हणजे तंबाखूच्या दुष्परिणामांविरोधात जागरूकता वाढवणे, व्यसनमुक्तीची मदत करणे आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेले उपाययोजना.

    २. तंबाखू सेवनामुळे काय धोके असतात?

    तंबाखू सेवनामुळे मुखाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, हृदयविकार, श्वसन विकार आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.

    ३. तंबाखूमुक्त होण्यासाठी मी काय करू शकतो?

    व्यसन सोडण्याचा निर्धार करणे, व्यसनमुक्ती केंद्राचा संपर्क करणे, आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

    ४. तंबाखूजन्य पदार्थांच्या उद्योगांमागील फसव्या प्रचाराचा धोका काय आहे?

    ते लोकांना चुकीची माहिती देऊन तंबाखू वापरण्यास प्रवृत्त करतात, ज्यामुळे आरोग्यावर मोठा नकारात्मक परिणाम होतो.
  • SNDT Ballarpur Campus Progress । बल्लारपूरमध्ये महिलांसाठी शिक्षणाचा नवा अध्याय – SNDT विद्यापीठाची वाटचाल वेगात!

    SNDT Ballarpur Campus Progress

    SNDT Ballarpur Campus Progress : मुंबई – चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे उभारण्यात येत असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बांधकाम प्रगतीचा आढावा राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. यासाठी मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मुख्य परिसरात कुलगुरू मा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

    १ जून रोजी चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडणार

    या बैठकीत विद्यापीठासाठी आवश्यक निधी, मूलभूत सुविधा, अध्यापन व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता तसेच शैक्षणिक विस्ताराच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. यावेळी विद्यार्थिनींनी स्वहस्ते तयार केलेल्या कलात्मक चित्रफ्रेमद्वारे आमदार सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांचे स्वागत केले.

    एसएनडीटी विद्यापीठाला ११० वर्षे पूर्ण

    भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी 1905 साली महिला आश्रमाच्या स्वरूपात लावलेल्या महिला सक्षमीकरणाच्या रोपटे 1916 साली एसएनडीटी नावाने उदयास आले आणि आज एसएनडीटी विद्यापीठाच्या रूपात एक मोठे वटवृक्ष तयार झाले आहे. येत्या 5 जुलै 2025 रोजी एसएनडीटी विद्यापीठाला 110 वर्ष पूर्ण होत असल्याने त्या संदर्भात आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल देखील यावेळी चर्चा झाली.

    sndt university

    बैठकीत आमदार मुनगंटीवार म्हणाले,महिला शिक्षण, आत्मनिर्भरता आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने बल्लारपूर येथे उभारण्यात आलेले ‘महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल’ हे महिलांना केवळ नोकरी शोधणाऱ्या नव्हे, तर नोकरी निर्माण करणाऱ्या म्हणून घडवण्याचे कार्य करत आहे. या ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण घडवून आणले जात असून, एसएनडीटी विद्यापीठ या प्रक्रियेला अधिक व्यापक व प्रेरणादायी दिशा देईल.

  • Balubhau Dhanorkar Memorial Event Chandrapur । चंद्रपूरने पुन्हा आठवला आपला लोकनेता – बाळुभाऊ पुण्यस्मरण सोहळा

    Balubhau Dhanorkar Memorial Event Chandrapur

    बाळुभाऊ यांच्या जाण्याने निर्भीड युवा नेतृत्व हरपल्याचे दुःख – आ. किशोर जोरगेवार

    Balubhau Dhanorkar Memorial Event Chandrapur : वरोरा – आठवणीतले बाळुभाऊ… द्वितीय पुण्यस्मरण सोहळा हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी आहे. बाळु धानोरकर हे एक निस्वार्थ, प्रामाणिक आणि धडाडीचे नेते होते. त्यांच्या जाण्याने चंद्रपूर जिल्ह्याने एक सक्षम युवा नेतृत्व गमावले असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

    ताडोबा टायगर सफारीचा आराखडा तयार


    बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवाराच्या वतीने वरोरा येथे “आठवणीतले बाळुभाऊ” द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, विनोद दत्तात्रय यांची उपस्थिती होती. Tribute to a Visionary Leader

    प्रेरणादायी शैली


    शिवसेनेत सोबत काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या जिद्दीने, काम करण्याच्या पद्धतीने नेहमीच ते कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श नेता राहिले. त्यांचे स्पष्ट विचार, कुठल्याही गोष्टीत सडेतोड भूमिका घेण्याची त्यांची शैली कायमच प्रेरणादायी राहिली. त्यांच्या स्वप्नांचा सन्मान करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवे. त्यांनी कधीही कुठल्याही संकटापुढे हार मानली नाही. बाळु धानोरकर यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

  • Chichdoh barrage water release schedule । चिचडोह बॅरेज उघडण्याची तयारी – सावली तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

    Chichdoh barrage water release schedule

    Chichdoh barrage water release schedule :  चंद्रपूर : वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यात चिचडोह बरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झाले आहे. सदर बॅरेजची एकूण लांबी 691 मी. असून 15 मीटर लांब आणि 9 मी. उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आले आहेत. 15 ऑक्टोबर 2024 पासून सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. पावसाळ्यातील पूर नियंत्रणाच्या दृष्टीने बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जुन 2025ला उघडण्याचे नियोजित आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात तोतया पोलिसांचा धोका वाढला

    सद्यस्थितीत पाणी पातळी 183 मी. व जिवंत साठा 53.52 द.ल.घ.मी. इतका आहे. त्या अनुषंगाने 1 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे उभ्या उचल द्वारातून / River Sluice मधून 472.84 क्यूमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असून टप्याटप्याने सदर विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. 

    वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदी लगतचे सर्व गावांना / ग्रामपंचायतीना सूचना देण्यात येते की, सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्क राहावे. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरू नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणा-या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रा.ल. मोरघडे यांनी केले आहे.

    चिचडोह बॅरेजचे बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधीत होणा-या व नदी काठावरील गावांची यादी

    सावली तालुक्यातील हरांबा कढोली,उमरी काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली  गाडंली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगांव, कापसी, उपरी. impact of Chichdoh barrage on local villages

  • Illegal Cockfighting Gambling Raid । तिरवंजा जंगलात कोंबड्यांची झुंज आणि जुगार, पोलिसांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त

    Illegal Cockfighting Gambling Raid

    Illegal Cockfighting Gambling Raid : भद्रावती – चंद्रपूर जिल्हा हा वाघाच्या सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे हादरून गेला आहे, असं असले तरी गुन्हेगार वृत्ती आजही झुडपी जंगलात अवैध काम करीत आहे, विशेष म्हणजे वाघाच्या दहशतीला झुगारून अवैध धंदे सरार्सपणे होत आहे.

    दारू दुकानाविरोधात जनता रस्त्यावर

    २८ मे रोजी पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत मौजा तिरवंजा येथे गावातील शेतालगत असलेल्या झुडपी जंगलात काही इसम कोंबड्याची झुंज लावीत जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या झुडपी जंगलात धाड मारली असता त्याठिकाणी ७ आरोपी सहित १ मृत व २ जखमी कोंबडे, दोन कात्या, ७ मोटारसायकल असा एकूण ४ लक्ष ५९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. police raid on illegal gambling

    सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, अशोक मंजुळकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुधरी, गजानन नागरे, खुशाल कावळे, शैलेश दुर्गेमवार व रोहित चिटगिरे यांनी केली.

    कोण आहे आरोपी?

    • ६३ वर्षीय महादेव गोपाळा गौरकार, खैरगाव, चंद्रपूर
    • ६६ वर्षीय विजय बाबुराव काटकर, तुकूम एसटी वर्कशॉप जवळ चंद्रपूर
    • ३८ वर्षीय विनोद मारोती मुनघाटे, सिनाळा, चंद्रपूर
    • ४० वर्षीय अनिल किसन सोनटक्के, घुटकाला तलाव, चंद्रपूर
    • ३४ वर्षीय हर्षल सुधाकर बैरम, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर
    • ४३ वर्षीय सुरेंद्र पांडुरंग निनावे, भानापेठ, चंद्रपूर
    • ३५ वर्षीय शेख राजू शेख मुमताज, घुटकाला वार्ड, चंद्रपूर
    • २९ वर्षीय सौरभ मनोज वानखेडे, गोकुळ गल्ली, बाजार वॉर्ड, चंद्रपूर
    • पाहिजे आरोपी प्रशांत ढवस, तिरवंजा, भद्रावती
  • sand smuggling at night । रेती माफियांचं ‘नाईट प्लॅन’: चंद्रपूरात काय चाललंय?

    sand smuggling at night

    sand smuggling at night : चंद्रपूर – राज्यात वाळू घाटाचे लिलाव प्रक्रिया सुरु आहे मात्र हि प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी वाळू माफियांनी नदी-नाले पोखरून काढत आहे. वाळू घाट सध्या वाळू माफियांकरिता सुरु आहे, मोठे असो कि लहान बांधकाम यासाठी चोरीच्या रेतीचा वापर होताना दिसत आहे.

    वाळूमाफियांचा गोरखधंदा

    चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे, राजकीय वेशातील वाळू माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. प्रशासनासोबत हातमिळवणी करून राजकीय वेशातील वाळू माफियांचा गोरखधंदा मागील कित्येक महिन्यापासून सतत सुरु आहे. प्रशासन कारवाईच्या नावावर केवळ ट्रॅक्टर चालकांना निशाणा बनवीत आहे मात्र राजकीय वाळू माफियांचे हायवा प्रशासनाच्या नजरेतून वाचत कसे आहे? हा प्रश्न आता काही नागरिक विचारू लागले आहे. political sand mafia

    चंद्रपुरात मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, अम्मा कि पढाई

    जिल्ह्यात घरकुल धारकांसाठी काही वाळू घाट राखीव करण्यात आले आहे, तरी सुद्धा रात्रीच्या अंधारात वाळू माफिया तस्करी करीतच आहे, २८ मे रोजी चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील CDCC बॅंकेजवळ रात्री १२ वाजेदरम्यान वाळू ची अनलोडींग सुरु होती.

    विशेष बाब म्हणजे या भागात प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारीवर्ग या ठिकाणी राहतात, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू माफिया आपलं काम करीत आहे. चंद्रपूर शहरात राजकीय वेशातील अनेक वाल्मिक या वाळू तस्करीमध्ये गुंतलेले आहे, पण प्रशासन यापर्यंत आजही पोहचू शकले नाही.

    🟦 H2: FAQs About Sand Smuggling at Night

    ❓ Why is sand smuggling mostly done at night?

    👉 To avoid detection by authorities and public.

    ❓ Who is behind the sand smuggling in Chandrapur?

    👉 Reports suggest involvement of local political-backed mafias.

    ❓ How can the public report sand smuggling?

    👉 Citizens can report through district administration portals or helplines.