Chichdoh barrage water release schedule । चिचडोह बॅरेज उघडण्याची तयारी – सावली तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Chichdoh barrage water release schedule

Chichdoh barrage water release schedule :  चंद्रपूर : वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यात चिचडोह बरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झाले आहे. सदर बॅरेजची एकूण लांबी 691 मी. असून 15 मीटर लांब आणि 9 मी. उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आले आहेत. 15 ऑक्टोबर 2024 पासून सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. पावसाळ्यातील पूर नियंत्रणाच्या दृष्टीने बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जुन 2025ला उघडण्याचे नियोजित आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात तोतया पोलिसांचा धोका वाढला

सद्यस्थितीत पाणी पातळी 183 मी. व जिवंत साठा 53.52 द.ल.घ.मी. इतका आहे. त्या अनुषंगाने 1 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे उभ्या उचल द्वारातून / River Sluice मधून 472.84 क्यूमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असून टप्याटप्याने सदर विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. 

वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदी लगतचे सर्व गावांना / ग्रामपंचायतीना सूचना देण्यात येते की, सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्क राहावे. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरू नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणा-या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रा.ल. मोरघडे यांनी केले आहे.

चिचडोह बॅरेजचे बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधीत होणा-या व नदी काठावरील गावांची यादी

सावली तालुक्यातील हरांबा कढोली,उमरी काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली  गाडंली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगांव, कापसी, उपरी. impact of Chichdoh barrage on local villages

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *