fatal pickup truck accident near Ganpur : चंद्रपूर- अहेरी मार्गावरील गणपूरजवळ पिकअप-ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (दि. १३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
संदीप कुळमेथे, रमेश वाढई रा. कोठारी अशी मृतकांची नावे आहेत. गणेश मडावी हा जखमी आहे. किराणा सामान घेऊन पिकअप एमएच ३४ बीजी ८८९९ गोंडपिपरीकडे निघाले होते. कोठारी येथील संदीप कुळमेथे,रमेश वाढई, कवडजई येथील गणेश मडावी हे तिघे होते.
गोंडपिपरी येथून बल्लारपूरकडे जाणाऱ्या ट्रकला पिकअपने धडक दिली. समोरासमोर झालेली हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये पिकअपमधील संदीप कुळमेथे, रमेश वाढई यांचा मृत्यू झाला. गणेश मडावी हा जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
emergency preparedness training for rural areas : चंद्रपूर : आपत्तीच्या काळात तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने तसेच मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने चिमूर व नागभीड तालुक्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने विशेष आपत्ती प्रतिसाद दल प्रशिक्षण घेण्यात आले. flood rescue and CPR training for volunteers
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यात प्राथमिक बचाव व शोध मोहीम, प्राथमिक उपचार व सीपीआर, पूर्वसूचना प्रणाली व समुदाय जनजागृती, आपत्ती काळातील समन्वय व बचाव कार्य, आपत्कालीन उपकरणांचा वापर व सुरक्षाविधी यांचा समावेश होता.
या प्रशिक्षणामध्ये महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण, कृषी, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. चिमूर व नागभीड तालुक्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल ,नागपुरचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ भंडारे यांच्या नेतृत्वात 9 रेस्क्यूवर प्रशिक्षण देण्यात आले. चिमूर तहसील कार्यालयामध्ये इम्प्रोवाईज डिवाइस, स्टॅंडर्ड डिवाइस, एम. एफ. आर. मध्ये सीपीआर व विविध प्रकारचे बँडेज कशा प्रकारे बांधतात, अशा बाबींवर आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली. तसेच चिमूर आणि नागभीड तहसील मधील उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी करण्यात आली.
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणातील माहिती आपापल्या तालुक्यातील इतरांना देण्यासाठी अतिशय गांभीर्याने प्रशिक्षण शिकून घ्या. पूर परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करणे गरजेचे असल्याचे नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी सांगितले. taluka level disaster preparedness training
चिमूर येथे पार पडलेल्या प्रशिक्षणावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्रीधर राजमाने, नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील, तसेच नागभीड येथे तहसीलदार प्रताप वाघमारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, तालुका कृषी अधिकारी श्री. पुजारी, नायब तहसीलदार उमेश कावळे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अधिक प्रशिक्षण सत्रे व मॉकड्रील घेण्याचे नियोजन
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील यंत्रणांना आपत्ती काळात योग्य ती तयारी ठेवता येणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल. आगामी काळात अधिक प्रशिक्षण सत्रे व प्रत्यक्ष मॉकड्रिल्स घेण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी दिली.
Ayushman Bharat private hospital panel : चंद्रपूर : नागरिकांच्या आरोग्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. केंद्र शासनातर्फे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यात एकत्रितपणे 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत आहे. या योजनांची आणखी प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीव गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय पॅनलवर खाजगी रुग्णालयांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सुचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिल्या. Maharashtra expand private hospitals Ayushman Bharat scheme
जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मा.सां. कन्नमवार शास. वैद्य. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, महानगर पालिकेच्या वैद्य. अधिकारी डॉ. नयना उत्तरवार आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 1356 आजारांवर उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे, असे सांगून डॉ. शेटे म्हणाले, यात आणखी आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. रुग्णांना स्थानिक स्तरावरच तात्काळ चांगली आरोग्य सेवा मिळावी, असा शासनाचा मानस आहे. त्यासाठीच जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांना शासकीय पॅनलवर समाविष्ठ करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. पॅनलवर येणा-या खाजगी रुग्णालयांसाठी चांगले पॅकेज तयार करण्यात येत असून सदर निधी 30 दिवसांत संबंधित रुग्णालयाला वळता करण्यात येईल. आरोग्यासाठी शासन स्तरावरून निधीची कमतरता होणार नाही. Maharashtra Ayushman hospital expansion rural health initiative
पुढे ते म्हणाले, चंद्रपूर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा पुरविणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय पॅनलवर खाजगी रुग्णालयांचा समावेश होण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णालयांकडून अर्ज मागवा. तसेच अर्ज आलेल्या रुग्णालयांना संवेदनशीपणे समाविष्ठ करून घ्या. पुरवठा विभागाच्या समन्वयाने जास्तीत जास्त नागरिकांच्या शिधापत्रिकांचे केवायसी केल्यास आयुष्मान कार्ड काढणे सोयीचे होईल. आरोग्याचा आपला डेटा संग्रहीत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. येत्या काही दिवसांत ‘मिशन संजीवनी’ हा प्रकल्प लाँच होणार असून यात विविध प्रकारचे ट्रॉन्सप्लाँट करणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पॅनलवर असलेल्या रुग्णालयांबाबत जनजागृती करावी : आमदार देवराव भोंगळे
प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्याला मिळणे आवश्यक आहे. या योजना प्रभावीपणे राबवायच्या असेल तर खाजगी रुग्णालयांची संख्या वाढविण्या शिवाय पर्याय नाही. जे खाजगी रुग्णालय स्वत:हून पुढे येत असतील, त्यांना यंत्रणेने त्रास देऊ नये, योग्य तपासणी करून संदर्भसेवेसाठी त्यांना परवानगी द्यावी. तसेच जिल्ह्यातील कोणते रुग्णालय शासकीय पॅनलवर आहे, त्याबाबत जनजागृती करावी, असे आमदार देवराव भोंगळे म्हणाले. अनेक दुर्धर आजारांचाही एकत्रित आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करावा. जिल्ह्यात मिशन मोडवर आयुष्मान गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम राबवावी आणि रुग्णवाहिकेची संख्या वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. Chandrapur health panel private hospitals Ayushman benefit
ही आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील पॅनलवरील रुग्णालये
चंद्रपूर जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण 23 रुग्णालय अंगीकृत असून यात 15 शासकीय रुग्णालय तर 8 खाजगी रुग्णालय आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय, चिमूर, मूल, राजुरा आणि वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच बल्लारपूर, भद्रावती, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना, नागभीड, पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयांमध्ये चंद्रपूर येथील कोल सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रीस्ट हॉस्पीटल, गाडेगोणे आर्थोपेडीक हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पीटल, मुसळे हॉस्पीटल, वासाडे हॉस्पीटल, चिमूर येथील श्रीहरी नेत्रालय आणि ब्रम्हपुरी येथील यशलोक हास्पीटल यांचा समावेश आहे. Chandrapur health panel private hospitals Ayushman benefit
BJP condolence for Ahmedabad plane crash victims : अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विमान दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला असून चंद्रपूर जिल्ह्यातही शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला भाजपा चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, , प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम, माजी नगरसेवक संजय कचर्लावार, रवि आस्वाणी, अॅड. सुरेश तालेवार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, रवी लोणकर, संदीप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, सचिन कोतपल्लीवार, अरुण तिखे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, बंटी चौधरी,
माजी नगरसेविका पुष्पा उराडे, शितल कुळमेथे, शितल गुरनूले, संगीता खांडेकर, कल्पना बबुलकर, पुरुषोत्तम राऊत, प्रलय सरकार, विनोद शेरकी, प्रमोद शास्त्रकार, राकेश बोमनवार, शितल ईटनकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, शालू कंनोजवार, धनराज कोवे, अमीन शेख, युवा मोर्चाचे यश बांगळे, अॅड. हरिष मंचलावार, सुभाष अदमाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दुर्घटनेतील मृतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मिनिट मौन पाळून करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भाजपा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार म्हणाले की, ही दुर्घटना केवळ संबंधित कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत वेदनादायक आहे. मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला.
police slow to act on missing person case : चंद्रपूर – चिमूर शहरातील नेहरू वॉर्ड येथील रहिवासी 64 वर्षीय अंजना केशवराव कामडी 8 मे 2025 पासून घरा बाहेरून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही आई कुठेही सापडली नाही तेव्हा चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु 1 महिना उलटूनही चिमूर पोलिस प्रशासनाला आईचा शोध घेण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. राजकीय किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या नातेवाईकांना शोधण्यात पोलिस प्रशासन तत्परता दाखवते, परंतु सामान्य जनतेला मदत करण्यात पुलिस प्रशासनाकडून निष्काळजीपणा किंवा उशीर केला जाता असा आरोप बेपत्ता महिलेची मुलगी वंदना गिरडकर ने पत्रकार परिषदेत केला आहे.
बेपत्ता अंजना केशवराव कामडी(64) ही चिमूरमधील नेहरू वॉर्ड येथील रहिवासी आहे. मोठी बहीण आणि मुलगा आईसोबत राहतात. बहीण आणि तिचा मुलगा नोकरी करतात. 8 मे रोजी दुपारी 2 वाजता बेपत्ता अंजना कामडी घराबाहेर पडली. मोठी बहीण संध्याकाळी कामावरून घरी परतली तेव्हा आई घरी नव्हती. तिने अन्य बहिणींशी संपर्क साधला आणि नातेवाईकां कडे ही विचारणा केली पण आईचा कुठेच पता लागला नाही. त्यावेळी तिचा मोबाईल आणि चष्मा घरी होता. police slow to act on missing person case
१ महिना उलटला, पोलिसांचा विलंब
आईला चष्म्याशिवाय दिसत नाही, मग ती घराबाहेर कशी जाऊ शकते असा प्रश्न यावेळी वंदना यांनी उपस्थित केला. दुपारची वेळ असल्याने सर्व लोग घरात होते त्यामुळे आसपास च्या लोकांनी आईची काहीच कल्पना नही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर 9 मे रोजी चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु 1 महिना उलटूनही पोलिसांना आई सापडत नाही. पोलिसांना वारंवार विचारणा केल्यानंतरही प्रयत्न सुरू असल्याचे सांगून ते शोध लावण्यास विलंब करत आहेत. daughter criticizes police handling missing mother
तक्रार दाखल केल्यानंतर घराजवळील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा चे फुटेज तपासले असते तर आई नक्कीच सापडली असती असा आरोप वंदना यांनी केला. परंतु पोलिसांनी 7 दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामुळे आई अंजना सापडत नाहीये. या संदर्भात जिल्हाधिकारी, एसपी, पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात उपस्थित असलेल्या तिन्ही बहिणींनी सांगितले की त्यांना आईच्या मालमत्ते साठी किंवा जादूटोण्यासाठी तिचे अपहरण केल्या जाऊ शकते असा संशय तीन्ही बहीनीं नी केला आहे. family accuses police of inaction missing mother
पोलिसांचे प्रयत्न कमी
पालिकेच्या दुर्लक्षे मुळे चिमूरमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, अन्यथा एक तरी कैमेरा मध्ये आईचे फुटेज टिपले असते. चिमूर पोलिसां चे प्रयत्न त्यांच्या आईला शोधण्यात कमी पडत असल्याचा आरोप वंदना यांनी केला. राजकीय किंवा प्रतिष्ठित व्यक्तीचा नातेवाईक बेपत्ता झाल्यावर पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते, मग सामान्य माणसाच्या नातेवाईकांना शोधण्यात विलंब का होतो? असा प्रश्न वंदना गिरडकर यांनी विचारला. आई अंजना कामडी यांच्या बेपत्ता होण्याचा तपास गुप्तचर विभाग किंवा गुन्हे अन्वेषण कडे सोपवून न्याय देण्याची मागणी वंदना गिरडकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. पत्रकार परिषदेत वंदना गिरडकर, ज्योत्स्ना इटनकर, अर्चना तडस उपस्थित होते.
चंद्रपुरात ओबीसी महिलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन, डॉ. अशोक जिवतोडे यांचा पुढाकार
obc women empowerment programs : चंद्रपूर – ओबीसी महिलांचे प्रथमच विदर्भस्तरीय अधिवेशन माता महाकाली नगरीत चंद्रपूर येथे होऊ घातले आहे. सदर अधिवेशन स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर बुधवार दिनांक ११ जूनला दुपारी १२ वाजेपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाकरिता विदर्भातील सर्व जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात सामाजिक चळवळीतील महिला उपस्थित राहणार आहेत. Model code of conduct for OBC community
या ओबीसी महिला अधिवेशनात महिलांशी निगडित विविध विषयांवर चर्चा करुन ठराव पारित करण्यात येणार आहे. ओबीसी समाजाकरीता केंद्र तथा राज्य शासनाकडून निघालेल्या शासन निर्णयाची माहिती देण्यात येणार आहे. हुंडाबळी ठरलेल्या स्व. वैष्णवीताई हगवणे व आजवर हुंडाबळी ठरलेल्या सर्व महिलांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल.
ओबीसी समाजाकरीता आदर्श आचारसंहिता
हुंडाबळी तथा महिलांवरील अत्याचाराच्या न्यायालयीन केसेस फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी करण्यात येणार आहे. ओबीसी समाजातील अनिष्ठ परंपरा व महिलांवरील अन्यायकारक रूढींना बंद करण्याबाबत चर्चा करुन ओबीसी समाजाकरीता आदर्श आचारसंहिता तयार करण्यात येईल. सर्व क्षेत्रातील महिलांना समान संधी मिळावी यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी ठराव घेण्यात येईल. social awareness programs for obc women
महिलांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात येईल, ओबीसी समाजाच्या राज्य व केंद्र शासनाशी निगडीत मागण्यांवर चर्चा करुन त्यासंदर्भातही ठराव घेण्यात येणार आहे. तथा पुढील ओबीसी महिला अधिवेशन महाराष्ट्र स्तरावर घेण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
महिला अत्याचारांवर चर्चा
विदर्भस्तरावर ओबीसी महिलांचे अधिवेशन घेऊन सद्यस्थितीत महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महिलांमध्ये जागृती निर्माण करणे, त्यांच्यात आत्मविश्वास जागवून, स्त्री सुरक्षितता व स्त्री-पुरुष समानतेला सर्व स्तरावर प्राधान्य देणे, स्त्री शक्तीचा सन्मान करणे, विशेषत: ओबीसी समाजात सामाजिक विषयांवर आदर्श आचारसंहिता घालून देणे, या उद्देशाला घेऊन सदर ओबीसी महिला अधिवेशन घेण्यात येत असल्याचे अधिवेशनाचे मुख्य संयोजक डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले आहे.
या विदर्भ स्तरीय ओबीसी महिलांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच एक ऐतिहासिक सामाजिक प्रयोग करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
district planning committee fund allocation : चंद्रपूर : जिल्हा नियोजन समितीचा निधी हा विकासाच्या कामासाठी उपयोगात आणला जातो. या निधीचे वितरण करताना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच वाटप करण्यात येईल. तसेच जिल्ह्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, जेणेकरून जिल्ह्यातील सर्व प्रश्न तातडीने मार्गी लागावे, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. district fund distribution transparency meeting
नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार सर्वश्री प्रतिभा धानोरकर, डॉ. नामदेव किरसान, आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सर्वश्री सुधाकर अडवाले, अभिजीत वंजारी, किशोर जोरगेवार, कीर्तीकुमार भांगडीया, करण देवतळे, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा नियोजनअधिकारी संजय कडू तसेच इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय
सन 2024 – 25 मध्ये सर्वसाधारण योजनेचे 456 कोटी, आदिवासी उपयोजनेचे 103 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेचे 75 कोटी असे एकूण 634 कोटी 42 लक्ष निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, आरोग्य हा अतिशय महत्त्वाचा विषय असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्र व उपकेंद्रासाठी निधी दिला जाईल. तसेच अद्यावत सोयी सुविधा या केंद्रामधून देण्यात येईल. त्यासाठी विशेष प्रस्ताव पाठवावा. जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम आवर्जून पूर्ण करावे. नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांना सुद्धा निधी देण्यात येईल.
ग्रामीण भागातील नागरिक योजनांपासून वंचित राहू नये, त्यासाठी जिल्ह्याचा एक चांगला प्रस्ताव तयार करावा. सर्व तालुका स्तरावर क्रीडा विकासासाठी आणि व्यायामशाळांसाठी वाढीव निधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह ग्रामीण भागात औषधींसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. planning committee meeting inscriptions 2025
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मृतदेह मोफत घरी नेण्यासाठी शववाहिकांची संख्या वाढवावी. जिल्ह्यातील ‘ब’ आणि ‘क’ दर्जाच्या तीर्थक्षेत्रांना सुध्दा निधी देण्यात येईल. सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच या निधीचे वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. तसेच आजच्या बैठकीला जे अधिकारी गैरहजर असतील, त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी खासदार आणि आमदारांनीसुद्धा आपापल्या सूचना मांडल्या.
राजशिष्टाचारानुसारच विकासकामांचे लोकार्पण व्हावे
शासनाच्या निधीतून विकासकामांचे लोकार्पण होत असतांना ते राजशिष्टाचारानुसारच व्हावे. लोकप्रतिनिधींची नावे कोनशिलेवर टाकावी. असे निर्देश पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी दिले. district planning committee fund allocation
या विषयांवर झाली चर्चा : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कृषी, आरोग्य, वने, पर्यटन, शिक्षण, अवकाळी पावसाने नुकसान झालेले पंचनामे, कृषी पंप जोडणी, जिल्हा परिषद, पोलीस विभाग व इतर सर्व विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. तसेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे व इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2024 -25 अंतर्गत खर्चास मान्यता देणे, सन 2025 -26 अंतर्गत खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
mother and daughter killed in road accident : बल्लारपूर – राजूराहून चंद्रपूरकडे दुचाकीने जात असताना ट्रक खाली येऊन आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा नदीच्या राजुरा पुलाजवळ बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बामणी गावाच्या हद्दीतील जलाराम मंदिराच्या समोर सोमवारचे दुपारी दीड वाजताचे दरम्यान घडला आहे.
मृतकाचे नाव ज्योती बंडू रागीट (३८ वर्षे) आणि त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट (८ वर्षे) राहणार पेठ वार्ड राजुरा, असे आहे . ज्योती या स्कुटी क्रमांक एम एच ३४ बी एस५५३८ ने चंद्रपूरला आपल्याकडे आईकडे जात होत्या. धडक दिलेल्या ट्रकचा क्रमांक एम एच ३४बीझेड ७६९९ असा आहे.सेजल ही सहाव्या वर्गाची विद्यार्थिनी होती.
बामणी – राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रिय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सूरू आहे. रस्त्याची उंची वाढविण्याकरीता मातीचे ढिगारे टाकण्यात आले. कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्याने या धिगाऱ्यावरील माती रस्त्यावर येत आहे. पावसात घसरून तर पाऊस नसताना प्रचंड धुळीचे साम्राज्य या ठिकाणी बघायला मिळत आहे. national highway construction accident
जीव मुठीत घेऊन प्रवास
नुकत्याच झालेल्या पावसात तर भर रस्त्यात चिखल होऊन अनेकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागला. या मार्गावरून नेहमीच प्रवश्याना तारेवरची कसरत करावी लागत असुन वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा अनेकांना प्राणाला मुकावे लागणार असल्याची भिती प्रवाशी व्यक्त करीत आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोअं. नरेंद्र वाकडे करीत आहे
hit and run case at toll plaza : बल्लारपूर (चंद्रपूर) – बल्लारपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या विसापूर टोलनाक्याजवळ ८ जूनच्या मध्यरात्री १ वाजता एका वाहनचालकाने टोल चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐनवेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ते वाहन त्या कर्मचाऱ्याला चिरडत पुढे गेले. या घटनेत कर्मचारी जखमी झाला असून त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर टोल नाक्यावर मध्यरात्री १ वाजता चारचाकी टाटा एस वाहनाने टोल चुकविण्याचा प्रयत्न केला, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला, यावेळी कम्प्युटर ऑपरेटर २७ वर्षीय संजय अरुण वांढरे याने वाहनासमोर जात त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन चालकाने संजय च्या अंगावर वाहन नेत त्याला चिरडत पुढे गेला. हि सर्व घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेत संजय वांढरे जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून त्या वाहनचालकांचा पोलिसांनी शोध घेणे सुरु केले.
animal cruelty prevention act : भद्रावती (चंद्रपूर): भद्रावती पोलिसांनी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १७ गोवंशांची सुटका केली आहे. ही कारवाई ६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता भद्रावती तालुक्यातील नवरगाव शिवारात एका विटाभट्टीजवळच्या शेतात करण्यात आली. पोलिसांनी या गोवंशांना भद्रावती येथील जैन मंदिर गोशाळेत सुपूर्द केले आहे. police rescue cows from illegal slaughterhouse
भद्रावती पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, तालुका मुख्यालयापासून १२ किमी दूर असलेल्या नवरगाव शिवारात, जिथे एक विटाभट्टी देखील आहे, तेथील कृषी साहित्य ठेवण्याच्या खोलीत गायी, बैल आणि वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आली आहेत.
सायंकाळी ६.३० वाजता पीएसआय संजय मिश्रा आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांना तिथे एका खोलीत सर्व गुरे बांधलेली दिसली. या गुरांसाठी चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. पोलिसांनी तपासणी केली असता, सुमारे ४.२५ लाख रुपये किमतीचे एकूण १७ गोवंश आढळून आले. पोलिसांनी या सर्व गोवंशांना सुखरूप बाहेर काढून भद्रावती येथील जैन मंदिर गोशाळेत पाठवले.
पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता, त्यांना कळाले की ही खोली डोलारा गावातील शेख अबु नावाच्या व्यक्तीची आहे. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी फरार आरोपी शेख अबु शेख अहमद (वय ६०) याच्या विरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पीएसआय प्रियांका गेडाम करत आहेत