land conflict murder case
land conflict murder case : कोरपना – कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणात शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. violence due to land dispute in villages
चंद्रपूर जिल्हा होणार हनी हब, मुनगंटीवार यांचा पुढाकार
ही घटना बुधवार, ११ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास कन्हाळगाव येथे घडली. शेतकरी पुंडलिक कारेकर (रा. कोरपना) यांच्यावर स्थानिक वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवार १२ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात पुंडलिक कारेकर यांचा मुलगा जगदीश आणि किशोर हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
शेतकऱ्याचा मृत्यू अनं गंभीर गुन्हा दाखल
घटनेची तक्रार कोरपना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, भारतीय न्याय सहिता २०२३ अंतर्गत कलम ३५२, ३५१(२), ११८(२), १९१(२), १९०, १८९(२), १८९(१) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, कारेकर यांच्या मृत्यूनंतर सर्व आरोपींवर कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले, बबन गारघाटे, विजय मसे, अरविंद मसे व राजेश नवले यांना कोरपना पोलिसांनी अटक केली असून, शुक्रवारी १३ जून रोजी त्यांना कोरपना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींना चंद्रपूर तुरुंगात हलवण्यात आले आहे.
Leave a Reply