Tag: कोरपना तालुका

  • Isapur Dam water release flood threat । यवतमाळ–चंद्रपूर धोक्यात? इसापुर धरणातून पाण्याचा विसर्ग!

    Isapur Dam water release flood threat

    Isapur Dam water release flood threat : कोरपना – यवतमाळ व तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुसद तालुक्यातील इसापूर चे १३ पैकी नऊ व जैनत मंडल तील सातनाला धरणाचे चार पैकी तीन दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. परिणामी यवतमाळ, आदिलाबाद जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना , चंद्रपूर तालुक्यातील पैनगंगा व वर्धा नदीच्या काठावरील गावाच्या शिवेवर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

    चंद्रपुरात दीड किलो गांजा जप्त

    पाणी पातळीत अधिक वाढ होत असल्याने नदी काठच्या गावात पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्र दोन्ही थडीच्या काठोकाठ भरून गावाच्या वेशीवर शिरण्यास सुरुवात झाली आहे. यातच शेत शिवार, पूल रस्ते पाण्याखाली आले आहे. यावर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. Korpana flooding due to dam discharge

    चंद्रपूर – कोरपना तालुक्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील धानोरा – भोयगाव मार्गावरील शनिवारी सायंकाळी नऊ वाजता च्या सुमारास पूलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प पडली आहे. यामुळे दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील कोडशी बूज – कोरपना , कोडशी बूज – कोडशी खु मार्ग तर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारे गांधीनगर – तेजापूर, जेवरा – गाडेघाट, पिपरी – मूर्ती , परसोडा – पीपरड , कोडशी बूज – देऊरवाडा आदी मार्ग मध्य रात्रीपासून पूर्णतः बंद पडले आहे. flood situation Korapna

    महसूल व पोलीस प्रशासनाकडून सदर मार्ग खबरदारी म्हणून बॅरिकेट लावून वाहतुकीसाठी बंद केले आहे. पैनगंगा नदीतील जल स्तर वाढत असल्याने नदी काठावरील गावात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातच वनसडी – भोयगाव सह अनेक मार्ग नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे बंद होण्याची शक्यता आहे.

    flood situation korpana

    नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

    कोरपना तालुक्यातील परसोडा, रायपूर, कोठोडा बूज , मेहंदी , पारडी , अकोला , भोईगुडा , जेवरा , तुळशी , गांधीनगर , कोडशी बूज , कोडशी खू, पिपरी, वनोजा , अंतरगाव, सांगोडा, कारवाई , विरुर , इरई , भारोसा , भोयगाव आदी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    पुराच्या पाण्याने बुडाले शेत शिवार

    पाण्याची पातळी वाढून बाहेर फेकली जात असल्याने पुराचे पाणी शेतशिवारात आले आहे. यातच कापूस, सोयाबीन, तूर आदी लागवडीखालील पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

  • rescue operation for missing person in river । 💥 दुचाकी पुलावर, व्यक्ती बेपत्ता! पैनगंगेत पोलिसांचं रेस्क्यू ऑपरेशन

    rescue operation for missing person in river

    rescue operation for missing person in river : कोरपना – कोरपना तालुक्यातील कोडशी खू येथील पैनगंगा नदी पात्रात एका बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बुधवारी (दि. २३ जुलै) मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, वृत्त लिहीपर्यंत संबंधित व्यक्तीचा थांगपत्ता लागलेला नव्हता.

    केंद्र सरकारने केली जनतेची दिशाभूल, खासदार धानोरकरांचा आरोप

    प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कोडशी खू येथील पैनगंगा नदीवरील पुलाजवळ एक दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी कोरपना पोलीस दाखल झाले असून प्राथमिक चौकशीनंतर दुचाकी ही वनसडी येथील सतीश मारोती चिकराम यांची असल्याचे निष्पन्न झाले. search operation in river by local police

    दुचाकी पुलावर, सतीश बेपत्ता

    सदर दुचाकी पुलावरच उभी असून तिच्याजवळ अन्य कोणतेही सामान आढळले नाही.
    या घटनेची गंभीर दखल घेत चंद्रपूर येथून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून, बुधवारी दिवसभर नदीपात्रात शोधकार्य राबविण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी व गोताखोरांच्या मदतीने पैनगंगा नदीच्या विस्तृत परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, उशीरापर्यंत कुठलाही ठोस पुरावा किंवा व्यक्ती मिळू शकलेली नाही.


    सतीश मारोती चिकराम हे वनसडी गावातील रहिवासी असून, मंगळवारी दुपारी घरातून बाहेर पडल्यापासून त्यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

  • land conflict murder case । कोरपना तालुक्यात खूनी संघर्ष!, या पक्षाच्या जिल्हाध्यक्षासह पाच जण तुरुंगात!

    land conflict murder case

    land conflict murder case : कोरपना – कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणात शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. violence due to land dispute in villages

    चंद्रपूर जिल्हा होणार हनी हब, मुनगंटीवार यांचा पुढाकार

    ही घटना बुधवार, ११ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास कन्हाळगाव येथे घडली. शेतकरी पुंडलिक कारेकर (रा. कोरपना) यांच्यावर स्थानिक वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवार १२ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात पुंडलिक कारेकर यांचा मुलगा जगदीश आणि किशोर हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

    शेतकऱ्याचा मृत्यू अनं गंभीर गुन्हा दाखल

    घटनेची तक्रार कोरपना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, भारतीय न्याय सहिता २०२३ अंतर्गत कलम ३५२, ३५१(२), ११८(२), १९१(२), १९०, १८९(२), १८९(१) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, कारेकर यांच्या मृत्यूनंतर सर्व आरोपींवर कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले, बबन गारघाटे, विजय मसे, अरविंद मसे व राजेश नवले यांना कोरपना पोलिसांनी अटक केली असून, शुक्रवारी १३ जून रोजी त्यांना कोरपना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींना चंद्रपूर तुरुंगात हलवण्यात आले आहे.