Tag: News34 chandrapur

  • msedcl celebrated 20th anniversary । चंद्रपूर महावितरण मंडळात सामूहिक सहभागातून 20 वर्षांचा प्रवास साजरा

    msedcl celebrated 20th anniversary

    msedcl celebrated 20th anniversary – चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित 20 व्या वर्धापन दिनानिमित्त सांघिक कार्यालय मुंबई यांचेकडून दिलेल्या कार्यक्रमानुसार 1 जून ते 6 जून 2025 विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने दिनांक 6 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित चंद्रपूर मंडळ यांचे वतीने वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    चंद्रपुरात सामाजिक जबाबदारीचा अनोखा विवाह सोहळा

    कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10.10 वाजता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सुरक्षेची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. त्यानंतर शकुंतला सेलिब्रेशन हॉल चंद्रपूर येथे कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा माननीय अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे चंद्रपूर मंडळ यांचे अध्यक्षतेखाली व श्री रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.) चंद्रपूर परिमंडळ, श्री सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) सुशिल विखार, श्री. विशाल पिपरे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, चंद्रपुर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारव्हेकर, तसेच यावेळी चंद्रपूर परिमंडळातील सर्व सन्माननीय अभियंते,यंत्रचालक, वाहिनी कामगार व इतर तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. msedcl 20th foundation day celebration in chandrapur

    चंद्रपूर मंडल वर्धापन दिन आयोजन समितीतर्फे मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे करिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्व अभियंता, तांत्रिक अतांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे कुटुंबीय व पाल्य यांचे सह उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

    20th foundation day celebration in chandrapur

    बक्षीस वितरण सोहळा

    सायंकाळी बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. श्रीमती संध्या चिवंडे चंद्रपूर मंडळ यांनी इतर तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी यांचे सह केक कापून महावितरण कंपनीचा 20 वा वाढदिवस साजरा केला व सर्व अधिकारी कर्मचारी यांना विद्युत सुरक्षा सप्ताह व वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

    त्यानंतर चंद्रपूर मंडलातील सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचे कुटुंबीय व पाल्य यांच्याकरिता गीतांचा संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला व सोबतच सर्वांकरिता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. रात्री 10 वाजेपर्यंत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगीत रजनी व स्नेहभोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

  • socially responsible weddings |दिव्यांगांसाठी खास: सामाजिक जबाबदारीचा अनोखा विवाह सोहळा

    socially responsible weddings

    socially responsible weddings : चंद्रपूर: विवाह सोहळा म्हटले की प्रचंड खर्च, झगमगाठ, देखावा, जल्लोष परंतु जीवनातील महत्त्वपूर्ण अशा विवाह सोहळ्याला सुद्धा सामाजिक संवेदनशील तेची जोड देऊन एक अनुकरणीय असा मोलाचा संदेश काहीजण देतात. असाच एक आगळावेगळा विवाह सोहळा स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात पार पडला. unique wedding with community support

    इरई नदी खोलीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून

    ज्यामध्ये दिव्यांग कल्याण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणारे निलेश पाझारे यांचा विवाह पुष्पा सावसागडे यांचेशी नोंदणी पद्धतीने संपन्न झाल्यावर विवाहाच्या सर्वच पारंपारिक पद्धतीना फाटा देत दिव्यांगांना स्वयंचलित वाहन, अंध स्मार्ट काठी, श्रवण यंत्र आणि कुबडीचे वाटप करण्यात आले तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील दिव्यांग विभागाला व्हीलचेअर सुद्धा भेट देण्यात आले.

    unique wedding with community support

    शासकीय योजनांची माहिती

    सोबतच विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना दिव्यांग, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्याचा उल्लेखनीय उपक्रम सुद्धा घेण्यात आला ज्यामध्ये समाजसेवा अधीक्षक भास्कर झळके आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेची सविस्तर माहिती दिली.

    वर निलेश स्वतः दिव्यांग असून ते मागील अनेक वर्षांपासून दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच विविध सामाजिक चळवळीत सुद्धा ते सक्रिय आहेत. सदर विवाह सोहळ्याने एक सकारात्मक असा अनुकरणीय सामाजिक संदेश समाजाला दिला असून सर्वत्र पाझारे व सावसाकडे कुटुंबाचे कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्याला चंद्रपुरातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

  • district collector river review meeting updates । इरई नदी खोलीकरणाचा दुसरा टप्पा होणार सुरु

    district collector river review meeting updates

    district collector river review meeting updates : चंद्रपूर ७ जून (News३४) : चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 7) संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन सूचना दिल्या.

    जेष्ठ नागरिकाला अधिकाऱ्याने म्हटले गेट आउट

    व्हीसीद्वारे घेण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार,  तहसीलदार विजय पवार,  कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम) अक्षय पगारे, जलेश सिंग (जलसंपदा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते. 

    इरई नदीचे खोलीकरण तीन टप्प्यात करण्यात येणार असून यातील पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत काम पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा माना खदान (लालपेठ कॉलरी) ते नांदगाव पोडे,असा असून सदर कामाला सोमवारपासून सुरवात होईल. तर तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.

    यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त काम करून खोलीकरणातून निघालेला गाळ त्वरित वाटप करावा. माना खदान ते नांदगाव पोडे  टप्प्यासाठी गाळ संचयित करण्याचे ठिकाण उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी निश्चित करण्यासाठी रोज पाहणी करावी.  त्याचबरोबर भूमी अभिलेख आणि जलसंपदा विभागाने दुसऱ्या टप्प्यातील आखणी करून त्वरित कामाला सुरवात करावी. 

    असे झाले पहिल्या टप्प्यातील काम :

    रामसेतू ते चौराळा पूल दरम्यान 2400 मीटरचे काम पूर्ण झाले आहे.  यात 70 टीसीएम  गाळ उपसा करण्यात आला असून 118 शेतकर्‍यांना 17 हजार ब्रास गाळ वाटप करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 10 पोकलेन, 25 ट्रॅक्टर, 22 टिप्पर कार्यरत आहेत. दुसऱ्या टप्प्यात या यंत्र सामुग्रीसह अतिरिक्त यंत्र सामुग्री वाढविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. silt distribution to farmers

  • ganja smuggling caught by police । NDPS अंतर्गत कारवाई; चंद्रपूरात २ शेतकरी गांजासह अटकेत

    ganja smuggling caught by police

    ganja smuggling caught by police : चंद्रपूर शहरात गांजा विक्री करण्याकरिता थेट गडचिरोली जिल्ह्यातून आलेले शेतकरी रामनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले, आरोपीकडून १ लक्ष ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    गडचिरोली मधून निसटला आणि चंद्रपुरात अडकला

    ६ जून रोजी दोघेजण गांजा विक्री साठी चंद्रपुरात येणार अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी डॉ. वरगंटीवार हॉस्पिटल समोरील मोकळ्या मैदानात सापळा रचला. farmers caught selling cannabis

    सायंकाळी ७ वाजेदरम्यान दोघेजण गांजा विक्री साठी आले असता रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत विचारपूस केली. दोघांची अंगझडती घेतली असता एका प्लास्टिक पन्नी मध्ये गांजा झाडाचे पाने, फुले, बोन्डे व बिया वजन १ किलो ७८१ ग्राम किंमत ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल एमएच ३३ एएफ ९५८६ किंमत ९५ हजार रुपये असा एकूण १ लक्ष ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    गडचिरोली मध्ये शेती, चंद्रपुरात गांजा विक्री

    आरोपी ३८ वर्षीय अजित रतन रॉय, २९ वर्षीय सत्यजित गौरन्ग मंडल काम शेती, दोघे राहणार उदयनगर, मुलचेरा जिल्हा गडचिरोली यांच्यावर एनडीपीएस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. inter district ganja smuggling case

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, पोलीस कर्मचारी जितेंद्र आकरे, आनंद खरात, सचिन गुरनुले, पेतरस सिडाम, प्रशांत शेंद्रे, लालू यादव, शरद कुडे, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, शक्ती कोरेवार व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

  • criminal caught with stolen vehicle । गडचिरोली मध्ये चैन स्नॅचिंग पण दुचाकी चोरीत चंद्रपुरात अडकला

    criminal caught with stolen vehicle

    criminal caught with stolen vehicle : चंद्रपूर – जिल्ह्यात वाहनांच्या चोरी प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्ह्यांचा छडा लावावा असे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहीम राबवित खबरीद्वारे गोपनीय माहिती मिळवली असता रेकॉर्डवरील आरोपी एसटी वर्कशॉप जवळ दुचाकी वाहन विक्री करण्यासाठी येत असल्याचे कळताच पथकाने सापळा रचत एकाला अटक केली. vehicle theft cases solved by police

    तुकूम अपघात प्रकरणी युवती सेनेने केली लक्षवेधी मागणी

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपी ४५ वर्षीय जनरलसिंग उर्फ मन्नूसिंग टाक राहणार समतानगर नेरी चौक ऊर्जानगर याला अटक केली. जनरलसिंग ने महिनाभरापूर्वी नायडू हॉस्पिटल तुकूम जवळून स्प्लेंडर प्रो क्रमांक MH ३४ AX ३८४८ छोटी केली होती.

    गडचिरोली मध्ये चैन स्नॅचिंग

    आरोपीने जनरलसिंग ने गडचिरोली मध्ये महिलेकडून सोन्याची चैन हिसकावत जबरी चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत गडचिरोली पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकीसहित ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, नितीन साळवे, नितीन कुरेकार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, गोपाल आतकुलवार, किशोर वाकाटे, शशांक बदामवार व प्रसाद धुळगंडे यांनी केली.

  • municipal officer misconduct । मनपा कार्यालयातच लोकशाहीची गळचेपी? ज्येष्ठ नागरिकाला म्हटले ‘गेट आउट”

    municipal officer misconduct

    पालकमंत्री उईके यांच्याकडे तक्रार, पालकमंत्र्यांनी दिले ‘हे आदेश”

    municipal officer misconduct : चंद्रपूर – महानगरपालिका चंद्रपूर येथील वाघोबा चौक तुकूम, नोकरकर ले आउट येथील 76 वर्षीय जेष्ठ नागरिकांस उप आयुक्तांनी मनपा कार्यालयातून गेट आउट केल्यामुळे अपमानित झालेल्या व्ही. वाय. लिचडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचेकडे तक्रार नोंदवून मनपा उपआयुक्त खवले यांचेवर कारवाईची मागणी केलेली आहे.

    तुकूम अपघात प्रकरणातील दोषी वाहन चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

    मनपा अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्याने अतिक्रमणाचे कारण पुढे करून नाहरकत ठिकाणी असलेली संरक्षण भिंत कां पाडली याची शहानिशा करण्यासाठी दिनांक 07/04/2025 रोजी मनपा कार्यालयात “लोकशाही” दिनी आपली तक्रार घेवून गेलेल्या जेष्ठ नागरिक व्ही. वाय. लिचडे यांना मनपा उपायुक्तानी कार्यालयातून गेट आउट केले.

    लोकशाही दिनी आपली कैफियत प्रभाविपणे मांडण्याचा संवैधानिक अधिकार असतांना तक्रारकर्ते लिचडे यांना गेट आउट करने म्हणजेच त्यांच्या अधिकारावर घाला घालणे होय. constitutional rights of senior citizens

    पालकमंत्र्यांचे आदेश काय?

    जेष्ठ नागरिक व्ही. वाय. लिचडे यांच्या म्हणण्यानुसार मनपा अतिक्रमन विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्यांची नाहरकत संरक्षण भिंत नकळत पाडली असेल तर त्याची नुकसान भरपाई त्यांना मिळणे स्वाभाविक आहे आणि ते लिचडे यांना अविलंब मिळाले पाहिजे. मनपा उपायुक्त खवले यांनी जेष्ठ नागरिकांस लोकशाही दिनी कार्यालयातून गेट आउट म्हणून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संबंधित बाबींची तपासणी करून कार्यवाही करावी.असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी मनपा आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर यांना दिले आहे.

  • local security guards losing jobs । स्थानिकांना डावलले! सुरक्षा रक्षकांसाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

    local security guards losing jobs

    local security guards losing jobs : चंद्रपूर – टाकळी जेनाच्या अरविंदो रियल्टी एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने (Aurobindo Realty and Infrastructure Private Limited Company) माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांच्या मेपल 365 सुरक्षा सेवा प्रा. लि. मधील सर्व सुरक्षा रक्षकांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 74 स्थानिक सुरक्षा रक्षकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात, मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेत संकेत दिले आहेत की जर संबंधित सुरक्षा रक्षकाची नोकरी कायम केली नाही तर 20 जून रोजी कंपनीसमोर उपोषण केले जाईल. Fast unto death

    विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना राबवा – आमदार जोरगेवार


    पत्रकार परिषदेत मनोज ठेंगणे यांनी सांगितले की, टाकळी जेनाच्या अरविंदो रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कोळसा खाण कंपनी आहे. या कंपनीने ऑगस्ट 2023 मध्ये मॅपल 365 सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आणि (ex-serviceman) माजी सैनिक मनोज ठेंगणे यांच्याशी सुरक्षेसाठी करार केला होता. या सुरक्षा कंपनीअंतर्गत टाकळी आणि जेना गावातील स्थानिक नागरिकांमधून एकूण 74 रक्षक कंपनीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

    करार रद्द केला

    सर्व स्थानिक लोक सुरक्षा एजन्सीमध्ये कार्यरत आहेत. परंतु अलीकडेच कंपनीने या सुरक्षा कंपनीसोबत केलेला करार रद्द केला आहे. या संदर्भात एक मेल देखील पाठवण्यात आला आहे. सुरक्षा सेवा कंपनीचे संचालक मनोज ठेंगणे यांनी आरोप केला आहे की अरविंदो कंपनीच्या अशा प्रकारच्या धोरणामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेले 74 स्थानिक सुरक्षा रक्षक बेरोजगार होतील. त्यांनी सांगितले की अरविंदो कंपनी आता बिहारच्या एसआयएस सिक्युरिटी एजन्सीसोबत करार करणार आहे.

    74 स्थानिक सुरक्षा रक्षकांवर अन्याय

    संबंधित कंपनीने नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा येथील 60 सुरक्षा रक्षकांना कंपनीच्या आवारात आणले आहे. कोणत्याही कंपनीत स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या सरकारने दिलेल्या सूचना असूनही, अरविंदो कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अरविंदो कंपनी आता विस्तार वाढत आहे. अशावेळी इतर राज्यांतील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून आम्हा 74 स्थानिक सुरक्षा रक्षकांवर अन्याय केला जात आहे. स्थानिक सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी 20 जूनपासून कंपनीसमोर अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.

  • how to reduce acidity in morning naturally । सकाळच्या आम्लतेमुळे त्रस्त आहात? हे उपाय तुमचं जीवन बदलू शकतात!

    how to reduce acidity in morning naturally

    how to reduce acidity in morning naturally : आरोग्यवार्ता – सकाळी पोटात अ‍ॅसिडिटीची समस्या केवळ शारीरिक अस्वस्थता निर्माण करत नाही तर आपल्या कार्यक्षमतेवर आणि मूडवरही वाईट परिणाम करते. या लेखात आपण ती त्वरित बरी करण्यासाठी काही उपायांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

    आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित दिनचर्येमुळे आपल्या आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम झाले आहेत, त्यापैकी एक सामान्य समस्या म्हणजे सकाळी उठताच पोटात जळजळ किंवा आम्लता येणे. ही केवळ एक छोटी समस्या नाही तर दिवसाची सुरुवात पूर्णपणे खराब करू शकते आणि आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर जेव्हा तुम्हाला तीव्र जळजळ, आंबट ढेकर किंवा पोटात जडपणा जाणवतो, तेव्हा तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की हे अनियमित खाण्याच्या सवयी, वाढता ताण आणि चुकीच्या जीवनशैलीचा थेट परिणाम आहे. ayurvedic remedies for acid reflux in morning

    पुरेशी झोप झाली तरीही शरीर थकलेलं? हे उपाय करा

    या समस्येमुळे केवळ शारीरिक अस्वस्थताच येत नाही, तर आपल्या कार्यक्षमतेवर आणि मनःस्थितीवरही वाईट परिणाम होतो. पोटात आम्ल उत्पादन सामान्यपेक्षा जास्त झाल्यावर आम्लपित्त येते, ज्यामुळे घशात जळजळ होते. ही स्थिती टाळण्यासाठी, आपल्या सवयींकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. योग्य वेळी योग्य अन्न, पुरेशी झोप आणि ताण व्यवस्थापन या समस्येपासून मुक्तता मिळवू शकते. परंतु जर तुम्हाला त्वरित उपाय हवा असेल, तर या लेखातील काही सोप्या उपायांबद्दल आम्हाला माहिती द्या जेणेकरून तुम्ही या समस्येपासून कमी वेळात मुक्त होऊ शकाल. best foods to eat in morning for acidity

    थंड दुधाचे सेवन करा

    थंड दूध हे आम्लपित्त त्वरित कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. दुधात असलेले कॅल्शियम आणि प्रथिने पोटातील अतिरिक्त आम्ल निष्क्रिय करतात, ज्यामुळे छातीत जळजळ आणि आंबट ढेकर कमी होतात. सकाळी रिकाम्या पोटी किंवा आम्लपित्त झाल्यावर हळूहळू एक ग्लास थंड दूध प्या. लक्षात ठेवा की दूध कमी चरबीयुक्त असावे, कारण जास्त चरबीयुक्त दूध पचनक्रिया मंदावू शकते. morning acidity home treatment without medicine

    आल्याचा चहा

    आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि पाचक गुणधर्म असतात, जे आम्लता कमी करतात. आल्याचा चहा पोटात आम्ल उत्पादन नियंत्रित करतो आणि पचनसंस्थेला शांत करतो.

    बडीशेप

    बडीशेप पाणी हे पचनसंस्थेसाठी रामबाण औषध आहे. बडीशेपमध्ये अॅनेथोल आणि इतर संयुगे असतात, जे पोटाची जळजळ कमी करतात आणि गॅस आणि अपचन कमी करतात.

    कोमट पाणी

    सकाळी होणाऱ्या अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोमट पाणी पिणे. ते पोटात साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढते आणि पचनसंस्थेला आराम देते.

    NEWS ३४ लेखात दिलेल्या माहितीसाठी कोणताही दावा करत नाही किंवा कोणतीही जबाबदारी घेत नाही. वरील लेखात नमूद केलेल्या संबंधित आजाराबद्दल अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • 10th and 12th topper SC student scholarship । 10वी-12वीमध्ये पहिला क्रमांक? मिळवा ₹5,000 ते ₹50,000 स्कॉलरशिप!

    10th and 12th topper SC student scholarship

    10th and 12th topper SC student scholarship : चंद्रपूर – इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शाळा / तालुका / जिल्हा / विभागातून प्रथम येणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांस राजश्री छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेद्वारे अनुक्रमे 5 हजार, 10 हजार, 25 हजार, 50 हजार रुपये गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. 

    शासकीय वसतिगृहात प्रवेश हवा? तर आजच करा अर्ज

    योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, बैंक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड व टी.सी. सादर करावे.

              प्रस्ताव सादर न केल्यामुळे पात्र विद्यार्थी जर पुरस्कारापासुन वंचित राहिल्यास त्याची संपूण जबाबदारी ही सबंधित संस्थेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची राहील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी व तात्काळ प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

    1. What is the 10th and 12th Topper SC Student Scholarship?

    It is a merit-based award scheme for Scheduled Caste (SC) students in Maharashtra who top in their school/taluka/district/division in class 10 or 12. Scholarships range from ₹5,000 to ₹50,000.

    2. Who is eligible for this scholarship?

    SC students who have ranked first in their respective school, taluka, district, or division in 10th or 12th standard are eligible.

    3. What is the amount of scholarship awarded?

    ₹5,000 – School-level
    ₹10,000 – Taluka-level
    ₹25,000 – District-level
    ₹50,000 – Division-level

    4. How to apply for the SC topper scholarship?

    The student cannot apply directly. The respective school or junior college must submit a proposal to the Assistant Commissioner, Social Welfare Office, Chandrapur.

    5. What documents are required with the proposal?

    Caste Certificate (SC)
    Marksheet
    Aadhaar Card
    Bank Passbook (Xerox)
    Transfer Certificate (TC)

    6. What happens if the proposal is not submitted?

    If the school/college fails to submit the proposal, the eligible student may miss the award. The responsibility will lie with the headmaster or principal.
  • why do I feel tired after 8 hours of sleep । “८ तास झोपलात तरीही थकलेले का वाटते? शरीर काहीतरी सांगतंय!”

    why do I feel tired after 8 hours of sleep

    why do I feel tired after 8 hours of sleep : प्रौढांना दररोज रात्री किमान ७-९ तास चांगली झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. पण दररोज रात्री ८ तास झोपूनही, तुम्हाला सतत थकवा, आळस आणि जडपणा जाणवतो का?

    जेवणांनंतर पाणी पिताय? तर हि बातमी तुमच्यासाठी

    चांगल्या आरोग्यासाठी, योग्य आहार आणि दिनचर्या राखणे सर्वात महत्वाचे मानले जाते. तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही काय खाता आणि पिता, या सर्वांचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. पण हे पुरेसे नाही. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की योग्य आहार आणि जीवनशैली राखण्यासोबतच, दररोज रात्री चांगली आणि पुरेशी झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे.

    Why Do You Feel Tired Even After 8 Hours of Sleep?

    प्रौढांना दररोज रात्री किमान ७-९ तास चांगली झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. परंतु दररोज रात्री ८ तास झोपूनही, तुम्ही दिवसभर थकलेले, आळशी आणि जड वाटत राहता का?

    जर तुम्हालाही या प्रकारच्या समस्येचा त्रास होत असेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये, हे गंभीर आजारांचे आणि काही प्रकारच्या असंतुलनाचे लक्षण असू शकते, ज्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

    रात्रीची चांगली झोप देखील तुम्हाला विश्रांती का देत नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बरं, या समस्येने त्रस्त असलेले तुम्ही एकटे नाही आहात, जगभरातील लाखो लोक याचा सामना करत आहेत. चला यामागील कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

    Hormonal Imbalance: The Hidden Culprit

    हार्मोन्स शरीराच्या सर्व कार्यांचे व्यवस्थापन करतात. जर त्यांच्यात काही असंतुलन असेल तर तुम्ही थकलेले आणि आळशी बनताच, पण काही प्रकरणांमध्ये ते गंभीर समस्यांचे कारण देखील बनू शकते. सहसा ही समस्या तणाव संप्रेरकांमधील असंतुलनामुळे उद्भवते. कमी-अधिक प्रमाणात तणाव संप्रेरक शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करू शकतात. hormones that affect sleep and energy

    जर तुम्ही दिवसा थकलेले असाल, तर ते तुमच्या शरीरातील कोर्टिसोल पातळी (how cortisol affects sleep quality) बिघडल्याचे लक्षण आहे. कोर्टिसोल जास्त असल्याने, मेलाटोनिन (झोपेचे संप्रेरक) च्या पातळीवर परिणाम होतो. याचा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, ज्यामुळे शरीरासाठी समस्या वाढू लागतात.

    Electrolyte Deficiency and Sleep Disturbance

    मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स आपल्या शरीरात विशेष भूमिका बजावतात. हे सर्व खनिजे शरीराला गाढ झोप येण्यासाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी खूप महत्वाचे आहेत. त्यांच्या कमतरतेमुळे तुमची झोप विस्कळीत होते, तुम्ही वारंवार जागे व्हाल आणि पूर्ण झोप मिळत नाही. यामुळे, तुम्हाला दिवसभर थकवा आणि आळसाची समस्या उद्भवू शकते.

    Disrupted Circadian Rhythm

    स्क्रीन (मोबाइल/लॅपटॉप) मधून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिन हार्मोनच्या कार्यात व्यत्यय आणतो, ज्यामुळे झोपेची नैसर्गिक लय बिघडते. रात्रीच्या वेळी मोबाईल फोनचा जास्त वापर करणाऱ्या लोकांमध्ये या प्रकारची समस्या जास्त प्रमाणात आढळते. does screen time affect melatonin levels

    झोपेच्या १ तास आधी स्क्रीन बंद करणे, दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे, कॅफिनचे सेवन कमीत कमी करणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे यासारखे काही उपाय तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारतातच, शिवाय दिवसभर तुम्हाला ऊर्जावान ठेवतात.