Tag: News34 chandrapur

  • extra teacher staffing irregularities । अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत नविन पदांना मान्यता नको – आमदार सुधाकर अडबाले

    extra teacher staffing irregularities Maharashtra

    extra teacher staffing irregularities Maharashtra : चंद्रपूर : राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित विजाभज आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक व कर्मचारी यांची संख्या प्रचंड वाढली आहे. असे असतांना शिक्षकांचे कायम समायोजन न करता सर्रास पदभरत्या करणे सुरू आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय होत आहे. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कायम समायोजन पूर्ण होईपर्यंत नविन पदांना मान्यता प्रदान करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे व प्रधान सचिव विनिता सिंघल यांच्‍याकडे केली.

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा आतंक, एकाच दिवशी दोघांची शिकार

    रिक्त पदांना मान्यता देण्याचे कारस्थान

    राज्यात अनुदानित तत्वावर ९७७ खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा असुन दिवसेंदिवस अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढतच आहे. सन २०१२ पासून शिक्षकांचे कायम समायोजन न करता पडद्यामागून मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांना मान्यता देण्याचे कारस्थान सुरू आहे. अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पूर्ण समायोजन होईपर्यंत नवीन पदांना मान्यता प्रदान करण्यात येऊ नये, याबाबत दिनांक १६ ऑक्टोबर २०१२, दिनांक ८ मार्च २०१८ व दिनांक २८ मार्च २०१८ असे अनेक शासननिर्णय या विभागाने निर्गमित केले असून या शासन निर्णयांना केराची टोपली दाखवत ह्या नियुक्त्या प्रदान करण्यात आलेल्या आहेत. teacher recruitment policy violations Maharashtra

    सन २०१२ पूर्वी मान्यतेचे अधिकार हे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे होते. मात्र, शासनाने घालून दिलेल्या दिशादर्शक सूचना व नियमांचे पालन न करता संस्थाचालकांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर शिक्षक व कर्मचारी यांच्या नियुक्तीस मान्यता दिल्या. यामध्ये अनियमितता झाल्याचे लक्षात आल्यामुळे विभागाने दिनांक १६ ऑक्टोबर २०१२ ला शासननिर्णय निर्गमित करून नियुक्तीचे अधिकार प्रादेशिक उपायुक्तांना देत अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पूर्ण समायोजन होईपर्यंत नवीन पदांना देऊ नये, अशी अट टाकली. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

    अतिरिक्त कर्मचारी वाढले

    परिणामी राज्यात अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. एका सोलापूर जिल्ह्यात २४५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त आहेत. तरीही अर्धन्यायिक अपीलाच्या आयुधाचा वापर करून पडद्यामागून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरूच आहे. हे करत असतांना मात्र याच विभागाकडून निर्गमित शासननिर्णय दिनांक १५ मे २०१९ नुसार पवित्र पोर्टलचा अवलंब करण्यात आला नाही तसेच TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांनाही मान्यता दिली. तसेच ही प्रक्रिया करतांना संचालकांना डावलून संस्थाचालकांनी मान्यतेचे प्रस्ताव थेट मंत्रालयात दाखल करून ह्या मान्यता घेतलेल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून याबाबत सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. extra teacher staffing irregularities Maharashtra

    त्यामुळे मागील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अशाप्रकारे झालेल्या सर्व नियमबाह्य पदभरत्या रद्द करून अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कायम समायोजन प्राधान्याने करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विभागाचे मंत्री अतुल सावे व प्रधान सचिव विनिता सिंघल यांच्‍याकडे केली आहे. 

  • Frequency of tiger attacks in Chandrapur region । चंद्रपूर जिल्ह्यात माणूस आणि वन्यजीव संघर्ष शिगेला, एकाच दिवशी दोघांची शिकार

    Frequency of tiger attacks in Chandrapur region

    Frequency of tiger attacks in Chandrapur region : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून २७ मे रोजी वाघाने मूल तालुक्यात दोघांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील १७ दिवसात वाघाने ११ नागरिकांची शिकार केली असून ५ महिन्यात २३ नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

    पतीसमोर वाघाने पत्नीला नेले फरफटत

    पहिल्या घटनेत मूल तालुक्यातील कांतापेठ गावातील ५२ वर्षीय सुरेश मुंगरु सोपानकार हा मंगळवारी चिरोली मार्गावरील जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेला होता, दुपारच्या सुमारास बकऱ्याचा कळप गावात परतला मात्र सुरेश हा न परतल्याने गावातील नागरिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. गावकरी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिरोली मार्गावरील जंगलात शोधमोहीम राबवली असता सुरेश चा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला, सुरेशचा पूर्ण पाय वाघाने खाऊन टाकला होता. Wildlife conservation and human conflict in Chandrapur

    पतीसमोर पत्नीला नेले फरफटत

    दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील भगवानपूर मधील जंगल परिसरात बांबूच्या बारीक काड्या, सरपण आणि कुड्याची फुले आणण्याकरिता चिरोली गावातील ४५ वर्षीय संजीवनी मैकलवार हि महिला पती संजय मैकलवार, नातेवाईक कवडू बोमनवार, शांताबाई कवडू बोमनवार हे चौघे वनविकास महामंडळाच्या कंपार्टमेंट क्रमांक ५२४ मध्ये सकाळी ९ वाजताच्या सुमारास गेले होते. अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजीवनी वर हल्ला केला, संजीवनी ला पती व नातेवाइकांसमोर वाघाने फरफटत नेले, पती व त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करीत वाघाला हुसकावून लावले मात्र तोपर्यंत संजीवनीचा मृत्यू झाला होता. Tiger attacks in villages near Chandrapur forests

    या घटनेनंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे,अशोक सिंघण, टोलेवाही येथिल पोलिस पाटिल संगिता चल्लावार,चिरोली येथील पोलिस पाटिल गोकूळ मोहूर्ले,चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम,प्राणीमित्र उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले.

    हल्ल्याचे सत्र

    मे महिन्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्यापासून वाघाने आपला आतंक सुरु केला आहे, १० मे पासून वाघाने सतत हल्ले करीत आतापर्यंत ११ नागरिकांची शिकार केली आहे, वाघाचे हल्ले नियंत्रणात यावे यासाठी वनविभागाने ठोस पाऊले उचलली नसल्याने नागरिकांचे बळी जात आहे. मागील ५ महिन्यात २३ नागरिक वाघाच्या हल्ल्यात बळी पडले आहे.

  • side effects of drinking water after meals । जेवणानंतर पाणी पिताय? ही सवय आरोग्यावर घालू शकते घाला!

    side effects of drinking water after meals

    side effects of drinking water after meals in marathi : खाण्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी घातक का असते? जाणून घ्या कारणं आणि योग्य वेळ

    आपल्या घरातील आजी-आजोबा नेहमी सांगतात की खाण्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की असं का म्हणतात? जेवणानंतर पाणी पिण्यामुळे काही गंभीर आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊया की त्यामागील नेमकं कारण काय आहे आणि खाण्यानंतर पाणी पिण्याचा योग्य वेळ कोणता असावा? Why you should not drink water after eating

    पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल?


    ✅ जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे तोटे (Side Effects of Drinking Water After Meals):

    1. पचनक्रिया मंदावते:
      जेव्हा आपण जेवतो, तेव्हा पचनासाठी आवश्यक असलेले डाइजेस्टिव एंजाइम्स (Digestive Enzymes) पोटात स्रवित होतात. हे एंजाइम्स अन्न पचवण्यासाठी आणि त्यातील पोषण घटक शोषून घेण्यासाठी महत्त्वाचे असतात.
    2. एंजाइम्स डायल्यूट होतात:
      जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास हे एंजाइम्स पातळ होतात आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे अन्न पचवण्यासाठी जास्त वेळ लागतो.
    3. पोषण शोषणात अडथळा:
      पचन प्रक्रिया कमजोर झाल्यास अन्नातून आवश्यक पोषण घटक शोषले जात नाहीत आणि शरीरास अपेक्षित पोषण मिळत नाही.
    4. अॅसिडिटी व गॅसचा त्रास:
      पचन नीट न झाल्यास एसिड रिफ्लक्स, गॅस, छातीत जळजळ व खट्टी ढेकरा येऊ शकतात.

    ✅ आयुर्वेदाचा दृष्टिकोन:

    आयुर्वेदातही सांगितले आहे की जेवणानंतर पाणी पिऊ नये, कारण यामुळे जठराग्नी मंदावतो. जठराग्नी म्हणजे पचनशक्ती, जी अन्न पचवण्यास मदत करते. पाणी पिण्यामुळे ती कमी होते आणि अन्न नीटपणे पचत नाही.


    ✅ पाणी पिण्याचा योग्य वेळ (Best Time to Drink Water):

    • जेवणापूर्वी 30 मिनिटे आधी पाणी प्यावे.
    • जेवणानंतर किमान 45 मिनिटांनी पाणी प्यावे.
    • जर गिळताना अन्न अडकले, तर थोडं पाणी पिणे चालू शकते.

    खाण्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, कारण यामुळे पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो आणि शरीराला अपेक्षित पोषण मिळत नाही. योग्य वेळी पाणी पिल्यास अन्न नीट पचते आणि आरोग्य चांगले राहते.


  • how to boost immunity during monsoon । मान्सूनमध्ये रोगांपासून बचावासाठी आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपाय

    how to boost immunity during monsoon

    how to boost immunity during monsoon : 🌧️ मान्सूनपूर्वीच बरसात! आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे उपाय जरूर करा

    भारताच्या अनेक राज्यांमध्ये मान्सूनने वेळेपुर्वीच हजेरी लावली आहे. काही शहरांमध्ये हवामान आल्हाददायक असले तरी अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महत्वाचं म्हणजे, हवामान विभाग (IMD) ने 2025 मध्ये सरासरीच्या 105% पावसाची शक्यता वर्तवली आहे.

    मधुमेहींनी मध खायचं का?


    ☔ पावसात राहत नाही केवळ गारवा, तर येतात अनेक आजार

    पावसाळ्यात गारवा आणि थंडावा मिळतो, पण त्याचबरोबर हवा व नमीमुळे सर्दी-खोकला, डेंग्यू, मलेरिया, फंगल इंफेक्शन यासारख्या आजारांचा धोका वाढतो.


    🚱 पाण्यामुळे होणारे आजार टाळा

    • टायफॉईड, हैजा आणि गॅस्ट्रोएन्टेरायटिस यांसारखे आजार दूषित पाण्यामुळे होतात.
    • नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच प्या.
    • बाहेरचे स्ट्रीट फूड आणि पाण्यापासून शक्यतो दूर राहा.
    • पाण्याच्या बाटल्या किंवा कंटेनर नियमितपणे स्वच्छ ठेवा.
    • नींबू, आलं आणि काळं मीठ घालून पाणी पिण्याने इम्युनिटी वाढते.

    🛡️ इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात या गोष्टी ठेवा

    2024 मध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार, व्हिटॅमिन C, D आणि झिंकयुक्त अन्न रोगप्रतिकारशक्ती वाढवते:

    • आहारात संतरा, लिंबू, आवळा आणि हिरव्या भाज्या असाव्यात.
    • आलं, लसूण आणि हळद हे नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-वायरल घटक आहेत.
    • तुळस, आलं आणि काळी मिरीचा काढा नियमित प्या.

    🦟 डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियापासून बचाव

    WHO नुसार, भारतात दरवर्षी मान्सूनमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढतात.(how to prevent dengue during monsoon)

    • मच्छरदाणी आणि मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करा.
    • घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. मच्छर याठिकाणी वाढतात.

    🌧️ फंगल इन्फेक्शन आणि त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी

    • नमीमुळे त्वचेवर बॅक्टेरिया आणि फंगस पटकन वाढतो.
    • पावसात भिजल्यावर लगेच अंघोळ करा आणि त्वचा कोरडी ठेवा.
    • इम्पेटिगो, खाजखुजलीसारख्या त्वचारोगांपासून बचाव करता येतो.

    ❤️ हृदय रुग्णांनी घ्या विशेष काळजी

    • मान्सूनमध्ये वाढलेली उमस हृदयावर अतिरिक्त ताण आणते.
    • मेडिटेशन, डीप ब्रीदिंग आणि स्ट्रेस मॅनेजमेंट उपयुक्त ठरते.
    • रेग्युलर हेल्थ चेकअप करून हृदयाचं आरोग्य सांभाळा. monsoon health tips for adults

    मान्सूनमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. स्वच्छ पाणी, संतुलित आहार, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ, आणि मच्छरांपासून संरक्षण हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हायला हवेत. पावसाचा आनंद घ्या, पण सावधगिरी बाळगूनच!


  • student dies in sand mining site । वाळू घाटावर नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू – ट्रॉलीवरून उडी घेताना जीव गमावला!

    student dies in sand mining site

    student dies in sand mining site : ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यात गोसीखुर्द कालव्याच्या कामासाठी नुकतेच वाळू घाट देण्यात आले आहेत. मात्र, यानंतरही काही वाळू तस्कर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील चिखलधोकडा येथे ही बाब अधिक गंभीर ठरली, कारण घाट सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता चिखलधोकडा वाळू घाटावर ही हृदयद्रावक घटना घडली. श्रीकांत रामलाल बठे (वय १७), जो अर्हेर नवरगावचा रहिवासी असून नवव्या वर्गात शिकत होता, त्याचा अपघाती मृत्यू झाला.

    बल्लारपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

    मिळालेल्या माहितीनुसार, काही तस्कर वाळू घाटाचा लिलाव झाल्याचे सांगून अवैधपणे वाळू उपसा करत होते. याच दरम्यान, ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. श्रीकांत त्याच्या कामावर असलेल्या नातेवाईकाला जेवणाचा डबा देण्यासाठी वाळू घाटावर गेला होता. तो भरलेल्या ट्रॉलीवर चढला आणि खाली उतरण्याच्या प्रयत्नात त्याने उडी मारली. दुर्दैवाने, खाली उतरताना ट्रॉलीचा लोखंडी रॉड त्याच्या गुप्तांगाला लागला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. याच कारणामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. sand mining accidents

    मृत्यू प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न

    घटनेनंतर काही वेळ या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु समाज माध्यमांवर या घटनेची माहिती पोहोचल्याने अखेर पोलिसांना याची सूचना देण्यात आली. ब्रम्हपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. unauthorized sand excavation news

    सध्या ब्रम्हपुरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. एका निष्पाप विद्यार्थ्याचा अशा प्रकारे जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, वाळू तस्करांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे हा अपघात घडला, याबद्दल नागरिकांमध्ये संताप आहे.

    याप्रकरणी चालक नितेश राऊत (२४) याच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम २८१,१०६(१) आणि मोटार वाहन कायद्याच्या १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • MLA health initiative । “मायेची सावली” ठरले आमदार – गरजूंसाठी आरोग्याचा प्रकाश

    MLA health initiative

    MLA health initiative : जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून मोठा दिलासा देणारी मोहीम राबवण्यात आली आहे. ज्युपिटर हॉस्पिटल, मुंबई आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तपासण्यात आलेल्या बालकांपैकी ११ बालकांना पहिल्या टप्प्यात पुढील उपचारासाठी आज मुंबईला रेल्वेने रवाना करण्यात आले. तेथे त्यांच्यावर हृदयविकारावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. Free heart surgery aid

    आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सायबर घोटाळ्याची होणार चौकशी

    या शस्त्रक्रियांसाठी एका रुग्णावर अंदाजे २ ते ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या ११ रुग्णांवर साधारणतः ४० लाख रुपयांच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. हा संपूर्ण खर्च आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून करण्यात आला आहे. याशिवाय, रुग्ण बालकासह त्यांच्या दोन नातलगांच्या मुंबईतील राहण्याची व प्रवासाची संपूर्ण व्यवस्था आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदारांच्या सामाजिक भानाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.विनोद बुरांडे, प्रविण वाभितकर, रिया सराटे, प्रांजली जिवतोडे, रोहिनी मोहुर्ले, यश वय्यातकर, प्रविन वासेकर, प्रज्ञा नागोसे, नीलिमा शेंडे, रिद्धी बत्तुलवार अशी पाठविण्यात आलेल्या रुग्णांची नावे आहेत.

    medical help for poor children

    आज सकाळी ९.३० वाजता या बालकांना त्यांच्या पालकांसह मुंबईकडे रेल्वेने रवाना करण्यात आले. आमदारांच्या पुढाकारामुळे कोणतीही आर्थिक अडचण न येता मोफत उपचार मिळणार असल्याने रुग्णांचे नातेवाईक भारावून गेले आहेत. आमच्या घरात अशा महागड्या उपचारांची सोय शक्यच नव्हती. आमदार किशोर जोरगेवार यांनी आमच्यावर मायेची सावली धरली, असे भावुक उद्गार बालकांच्या आई-वडिलांनी व्यक्त केले आहेत. medical help for poor children

    उपचारासाठी सर्वतोपरी मदत करणार

    समाजातील गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. आरोग्य शिबिरात पात्र झालेले रुग्ण गंभीर आजारांशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठीच आमच्या पुढाकारातून या शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च उचलण्यात आला आहे. या बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आपण यशस्वी होत आहोत. त्यांच्या उत्तम उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना केवळ उपचारच मिळत नाहीत, तर त्यांच्या जीवनात नव्या आशा निर्माण होत आहेत. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यातून मुंबईसारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेची संधी मिळणे ही निशुल्क आरोग्यसेवा उपक्रमाची मोठी देणगी ठरली आहे. तर पुढील टप्यात आणखी रुग्णांना उपचाराकरीता मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. 

  • benefits of summer sports training camps । ‘समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार

    benefits of summer sports training camps

    benefits of summer sports training camps : चंद्रपूर – जिल्ह्यातील युवक-युवतींना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. बल्लारपूर येथे १ मेपासून सुरू झालेल्या उन्हाळी शिबिरात एकूण १५ खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले असून, समाजभान आणि मूल्यसंस्कारांची जोड देणाऱ्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत.हा ‘समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवणारा प्रभावी उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शिबिराच्या समारोप समारंभात केले. youth development through sports India

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सायबर घोटाळ्याची होणार चौकशी

    हे शिबिर स्वर्गीय डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत आंबेकर अध्यक्ष, सुधीरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर, समीर केने, काशी सिंग, मुन्ना ठाकूर, राजू दारी, संदीप पुणे, सुनील यादव, प्रशांत झांबरे, रोहित तुक्कर आदिंची उपस्थिती होती.

    youth development sports

    ‘मिशन ऑलिंपिक २०३६’च्या दिशेने भक्कम पाऊल

    आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथे युवकांसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमधील वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट, बल्लारपूरमधील कॉलरी गेट मैदान, वन अकादमी आणि सैनिकी शाळेतील सुविधा हे प्रेरणादायी ठरत आहेत.स्वातंत्र्यसैनिक वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने म्हाडामध्ये उभारले जात असलेले २५ खेळप्रकारांचे अत्याधुनिक स्टेडियम ‘मिशन ऑलिंपिक २०३६’च्या दिशेने भक्कम पाऊल ठरेल, असा विश्वासही आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    sudhir mungantiwar

    विसापूर क्रीडा संकुलात झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला देशभरातील २८ राज्यांमधून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे सर्वत्र कौतुक झाले आहे.समर कॅम्पच्या उत्कृष्ट आयोजनासाठी आ. मुनगंटीवार यावेळी अभिनंदन केले.

    महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास उपक्रम


    गरजू मुलींसाठी एस.एन.डी.टी. विद्यापीठ व स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमधून अनेक मुलींना स्वबळावर उभं राहण्याची संधी मिळत आहे.विसापूर येथे ‘आर्चरी सेंटर’ सुरू करण्याचे नियोजन असून, युवक-युवतींनी या क्रीडा व प्रशिक्षण सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

  • Ballarshah gondia railway wildlife deaths । 110 किमी वेगाची रेल्वे, आणि मृत्यूपथावर वन्यजीव!, अस्वलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

    Ballarshah gondia railway wildlife deaths

    Ballarshah gondia railway wildlife deaths : बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग हा वन्यजीवांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरत आहे. पोल नंबर 1203 जवळील कक्ष क्रमांक 535 मध्ये अस्वलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना घडली, ज्यात अनेक वन्यजीवांना रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला. वारंवार अशा घटना घडत असूनही, रेल्वे प्रशासन उपशमन योजना (Mitigation Measures) राबविण्यास गंभीर दिसत नाही, हे अत्यंत चिंताजनक आहे.

    आता तर आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या मार्गावर दुसरी रेल्वे लाईन प्रस्तावित आहे. जर हे घडले, तर बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल. हा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग आधीच बाधित झाला आहे आणि दुसऱ्या लाईनमुळे तो पूर्णपणे संपुष्टात येईल. सध्या या मार्गावर एक्सप्रेस गाड्या जवळपास 110 किमी प्रतितास वेगाने धावतात. दुसरी लाईन झाल्यास, रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ होईल आणि वन्यप्राण्यांना रेल्वे लाईन ओलांडणे अधिक कठीण जाईल. त्यामुळे वन्यजीवांना वाचवण्यासाठी तातडीने उपशमन योजना राबवणे अत्यंत आवश्यक आहे. chandrapur railway

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची चौकशी होणार

    महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रशासन कधी जागे होणार? । wildlife deaths

    हा रेल्वे मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळून जातो आणि हा वाघांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग आहे. याशिवाय, नव्याने घोषित झालेले कन्हाळगाव अभयारण्य, कावल अभयारण्य आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या भ्रमणमार्गातही हा रेल्वे मार्ग येतो. विशेष म्हणजे, याच मार्गाचा पुढील भाग मध्य प्रदेशातील बालाघाट-नैनपूरमधून जातो. तेथील रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांसाठी उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी अंडरपासेस (Underpasses) आणि ओव्हरपासेस (Overpasses) बांधले आहेत. मग महाराष्ट्रातील रेल्वे प्रशासन वन्यजीवांसाठी अशा उपाययोजना का करत नाही, हा मोठा प्रश्न आहे. wildlife deaths

    हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटी लँडस्केप रिसर्च अँड कंझर्वेक्षण फाऊंडेशन (Habitat Conservation Society Landscape Research & Conservation Foundation) ही संस्था वन्यजीवांच्या अपघातांची नियमितपणे नोंद ठेवते आणि वनविभाग, रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाशी पत्रव्यवहार करून वन्यजीवांसाठी आवश्यक उपाययोजना सुचवत असते, जेणेकरून या निष्पाप जीवांचे प्राण वाचवता येतील. Ballarshah Gondia Railway Line

    या दुर्दैवी घटनेच्या ठिकाणी संजीवणी पर्यावरणचे तन्मय झिरे, पशुवैद्यकीय अधिकारी छोणकर साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी वेलमे, क्षेत्र सहाय्यक खनके आणि वनरक्षक ठाकूर यांनी भेट दिली. आता गरज आहे ती रेल्वे प्रशासनाने तातडीने जागे होण्याची आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची. आणखी किती वन्यजीवांना या रेल्वे लाईनवर आपला जीव गमवावा लागणार आहे?

  • Raghoji Bhangare Gunagaurav Yojana । गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राघोजी भांगरे गुणगौरव योजना

    Raghoji Bhangare Gunagaurav Yojana

    Raghoji Bhangare Gunagaurav Yojana : चंद्रपूर २५ मे (News३४) – इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 10 वी, 12 वीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे. संबधित विद्यार्थ्यांना ५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

    चंद्रपुरातील महाकाली मंदिरात शिरले दहशतवादी

    राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल चालविल्या जातात. यातील काही शाळा राज्य शिक्षण मंडळ तर काही शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. या दोन्ही मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दहावीसह 12 वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी 5 गुणवंत मुला-मुलींना पारितोषिक (Tribal Students with Merit Rewards) दिले जाणार आहे.

    राज्य शिक्षण मंडळाच्या गुणवंतांचा होणार सत्कार

    गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्यासह गुण मिळवून राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्पात प्रथम येणाऱ्या 5 मुला-मुलींना गौरविण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाचे विभागीय मंडळ नसल्याने ते वगळून राज्य शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळातील प्रत्येकी 24 गुणवंतांना 10 महिन्यांसाठी प्रतिमाह 1 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. अपर आयुक्त आणि प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रथम येणाऱ्या 3 मुला-मुलींना सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, 100 टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळांचा सत्कार केला जाणार आहे.  

    असे मिळणार रोख पारितोषिक: Raghoji Bhangare Gunagaurav Yojana

    राज्यस्तरावर प्रथम क्रमांक 30 हजार, द्वितीय 25 हजार,  तृतीय 20 हजार, चतुर्थ 15 हजार आणि पाचवा क्रमांकासाठी 10 हजार रुपये.

    अपर आयुक्त स्तरावर प्रथम क्रमांक 15 हजार, द्वितीय 10 हजार,  तृतीय 7 हजार रुपये. तर प्रकल्प कार्यालय स्तरावर प्रथम 10 हजार,  द्वितीय 7 हजार आणि तृतीय 5 हजार रुपये देण्यात येणार आहे.

    अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना गुणवत्तेबाबत आवड निर्माण करण्यासाठी ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ सुरु करण्यात आली आहे. इयत्ता 10 व 12 वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर रोख पारितोषिक देऊन सत्कार केला जाणार आहे. 100 टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळेचे मुख्यध्यापक आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

  • Outdoor Skating in Natural Parks । ‘नेचर स्केटिंग सफारी’चा भन्नाट उपक्रम – स्केटिंग आणि निसर्गप्रेमाची अनोखी सांगड!

    Outdoor Skating in Natural Parks

    Outdoor Skating in Natural Parks : चंद्रपूर : व्याघ्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरातील  शंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने नुकतेच ‘नेचर स्केटिंग सफारी’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी 10 स्केटिंग खेळाडूंनी दुर्गापूर – पद्मापूर – आगरझरी ते मोहरली या ताडोबा अभयारण्याच्या क्षेत्रातील  एकूण १० किलोमीटरचा निसर्गरम्य आणि जंगल रस्ता स्केटिंग करत पार केला.

    चंद्रपुरातील दीक्षाभूमी होणार जागतिक दर्जाची

    या स्केटिंग सफारीचा मुख्य उद्देश निसर्ग संवर्धन, व्यायाम, खेळ व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणे आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती करणे हा होता. सफारीमध्ये सहभागी स्केटर्सनी साहसी व खेळाडू वृत्तीने परिसरात सामाजिक प्रबोधन केले. या साहसी सफारी उपक्रमात यज्ञेश प्रवीण भोंगळे (10), देवांशी गोजे (9), अंश मल्लेलवार (6), कृष्णा कलोडे (15), अनिश निखाडे (13), पार्थ रामटेके (9), युवराज चौधरी, अक्षित करडभुजे (12), माहांश राखुंडे (6). या बालखेळाडू स्केटर्सनी सहभाग घेतला. Adventure Skating Tours for Children

    नामवंत खेळाडूंची उपस्थिती

    या सफारीचे मार्गदर्शन राष्ट्रीय स्तरावरील नामवंत स्केटिंग प्रशिक्षक तथा तांत्रिक अधिकारी विनोद निखाडे व राष्ट्रीय रोलर हॉकी खेळाडू ईशा विनोद निखाडे यांनी केले.खेलो इंडिया या संकल्पनेतून खेळाडूंची साहसी वृत्ती प्रदर्शित करणारा हा उपक्रम निसर्ग संवर्धनासाठी समाजाला प्रेरणा देणारा ठरला.