livestock killed by power lines : सावली – मानसूनपूर्व पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे प्रवाहीत तारे तुटून शेतात पडल्याने 8 जनावरांचा विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज 24 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता सावली तालुक्यातील उसेगाव येथे घडली आहे.
अचानक वादळ आले आणि…
नेहमीप्रमाणे आजही उसेगाव येथील जनावरे शेतात चरत होते. त्यामध्ये 6 बैल आणि 2 गाईंचा समावेश होता. शेतात चरत असताना अचानक आलेल्या वादळामुळे विजेचा खांब कोसळला आणि त्यावरून तारे तुटून खाली पडल्या. या तारांना स्पर्श झाल्याने जनावरारे विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाले. ही घटना उद्धव रोहणकर यांच्या शेतात घडली.
घटनेची माहिती मिळताच गावकरी शेतात दाखल झाले. महावितरण कंपनीला याची माहिती देण्यात आली. कंपनीने त्वरित सूचना दिली की कोणत्याही जनावरांना हात लावू नका, कारण तारा अजूनही प्रवाहित होत्या. काही वेळातच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ विजेचा प्रवाह खंडित केला.
या अपघातात कालीदास पाल, देवाजी भोयर, मानिक गोहणे, बालूजी ठुसे, भोजराज गोहणे आणि अरुण भोयर यांचे प्रत्येकी एक बैल तसेच संतोष भोयर आणि हिराजी गोहणे यांची प्रत्येकी एक गाय असा एकूण 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
या गंभीर घटनेनंतर पशुपालकांनी महावितरण कंपनीने जबाबदारी स्वीकारून नुकसान भरपाई द्यावी तसेच सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे. Mahavitaran responsibility in livestock deaths
Bhadravati lake development news : चंद्रपूर : भद्रावती शहरातील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत अखेर मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १७ कोटी रुपयांचा निधी (Lendala lake funding approved)नुकताच शासन निर्णयाद्वारे मंजूर झाल्याने भद्रावतीच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे.
फुकटचे श्रेय घेऊ नका
विशेष म्हणजे, या प्रकल्पाला राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीच्या ३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीतच तांत्रिक मंजुरी मिळाली होती. त्यावेळी विद्यमान खासदार बाळूभाऊ धानोरकर व प्रतिभाताई धानोरकर या विद्यमान आमदार होत्या. त्यामुळे, या निर्णयात काही महिन्यांपूर्वी झालेल्या आमदारांनी कोणताही फुकटचे श्रेय घेऊ नये, असा स्पष्ट टोला खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी लगावला आहे.
या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्यामागे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नगर परिषद भद्रावतीमार्फत वेळोवेळी शासन दरबारी सादर केलेले प्रस्ताव यांचा मोलाचा वाटा आहे. आमदार असतानाच, २०१९-२० मध्ये त्यांनी हा विषय विधानसभेत मांडून त्याची आवश्यकता अधोरेखित केली होती. लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी नगर परिषदेच्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दिला आणि मंत्रालयीन पातळीवर विविध बैठकांमध्ये हा मुद्दा सातत्याने मांडत प्रकल्पाच्या मंजुरीसाठी अथक प्रयत्न केले.
लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवनाचे स्वप्न भद्रावतीच्या जनतेने पाहिले होते आणि आता त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. या प्रकल्पाचे यश हे केवळ कोणत्याही एका राजकीय व्यक्तीच्या श्रेयवाद पुरते मर्यादित नसून, ते भद्रावतीच्या जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे, यामध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या योगदानाला नाकारून केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी श्रेय घेण्याचे प्रयत्न अत्यंत खेदजनक आहेत.
Chandrapur Deekshabhoomi development plan : चंद्रपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभूमीचा जागतिक पातळीवर विकास करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. त्यांच्या प्रयत्नातून या पवित्र स्थळाच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील जवळपास १४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.
दिक्षाभूमीच्या विकास कामाचा आढावा (Chandrapur Deekshabhoomi development plan) घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात बैठक बोलावली होती. सदर बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, समाजकल्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद माहुतुरे, समाज कल्यान विभागाच्या स्मिता बैहीरमवार, सार्वजनिक विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, दिक्षाभुमी ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, कुणाल घोटेकर, राहुल घोटेकर, प्राचार्य दहेगावकर, निवृत्त प्रा संजय बेले, भारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, मनोज पाल, रवी गुरुनुले, रंजन ठाकूर, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिक्षाभूमीच्या विकासकामाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि सर्व प्रक्रिया जलद पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पवित्र स्थळाचा विकास नेटका व भव्य व्हावा, यासाठी सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा. निधीचा योग्य वापर होईल याची काळजी घ्या, असे ते यावेळी म्हणाले. दिक्षाभूमीच्या विकासासाठी मागील अनेक वर्षांपासून आपण प्रयत्नशील होतो. आता निधी मंजूर झाल्यामुळे जागतिक पातळीवर या पवित्र स्थळाचा विकास होईल. दिक्षाभूमी हे जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणाचा विकास अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून आपण या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. Kishor Jorgewar Deekshabhoomi funding
दीक्षाभूमीचा विकास भव्य स्वरूपात होणार
या निधीतून सभागृह, पथदिवे, उद्यान, पाणीपुरवठा, शौचालय सुविधा, सुरक्षा यंत्रणा, स्थापत्यशास्त्रीय सौंदर्यवृद्धी आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे दिक्षाभूमीचा विकास भव्य स्वरूपात होणार आहे. सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा.निधीचा प्रत्येक रुपया योग्य कामासाठीच वापरला गेला पाहिजे. कोणत्याही अडथळ्यामुळे विकासकामांना विलंब होऊ देऊ नका, काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. या पवित्र भूमीचा जागतिक दर्जाचा विकास व्हावा, हा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आणि एकजुटीने काम करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. Deekshabhoomi global heritage site development
या बैठकीत विकासकामांची रूपरेषा, निधी वितरण प्रक्रिया, निविदा प्रक्रिया आणि वेळापत्रक याबद्दल सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाने कामांना गती देण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे दिक्षाभूमीच्या विकासकामांना नवा वेग मिळणार आहे. लवकरच हे पवित्र स्थान जागतिक स्तरावर नव्या स्वरूपात ओळखले जाईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.
Sudhir Mungantiwar mobile office campaign : चंद्रपूर – जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा जनसंपर्क व्यापक आहे. मतदारसंघातीलच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्याकडून विकासकामांची आणि अडचणीत असलेल्यांना मदतीची अपेक्षा असते. अशात आपण स्वतः लोकांपर्यंत पोहोचायला हवे, या उद्देशाने दि.१९ मे पासून सुरू करण्यात आलेले आ. श्री. मुनगंटीवार यांचे फिरते जनसंपर्क कार्यालय आता नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. राज्यातील या एकमेव अभिनव उपक्रमावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे.
आ. श्री. मुनगंटीवार यांचे फिरते जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या अडचणी, समस्या व तक्रारी थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकून घेण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे, हे विशेष. या उपक्रमांतर्गत जनतेला त्यांच्या गावात किंवा प्रभागातच आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिनिधी, कार्यालयीन कर्मचारी पोहोचत आहेत. संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून लोकांना सेवा दिली जात आहे. mobile MLA office concept
पहिले फिरते जनसंपर्क कार्यालय
प्रलंबित कामे, शासकीय योजनांच्या लाभातील अडथळे, पायाभूत सुविधांबाबतची मागणी, रस्ते, नळजोडणी, वृद्धापकाळ, निवृत्ती, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज यांसारख्या विषयांवर जागेवरच निर्णय घेण्याचा प्रयत्न यामधून केला जात आहे. विशेष म्हणजे राज्यात फिरते जनसंपर्क कार्यालय ही संकल्पनाच आ. श्री. मुनगंटीवार यांनी पहिल्यांदा राबविल्यामुळे त्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
“सत्ता ही खुर्चीसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहे” या मूल्यांची जाणीव बाळगून सुरू केलेला हा उपक्रम लोकशाही अधिक बळकट करणारा आहे. शासकीय कार्यालयांच्या वारंवार चकरा मारण्याची गरज सर्वसामान्यांना पडू नये. उलट त्यांच्याच दारात जाऊन मदत पोहोचविली जावी. या उद्देशांची पूर्ती करणारा हा उपक्रम राज्यासाठी एक आदर्श ठरत आहे.
राज्यभरातून या अभिनव उपक्रमाचे जोरदार स्वागत होत असून, इतर लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारा प्रयोग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. अनेक ठिकाणी नागरिक आपले प्रश्न मोकळेपणाने मांडत आहेत. त्यावर प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या लोकाभिमुख दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. door to door government service Maharashtra
यापुर्वीही,आ.मुनगंटीवार यांचे कार्य विक्रमांचे नवे शिखर गाठणारे ठरले आहे. देशातील पहिले ISO प्रमाणित मंत्री कार्यालय उभारण्याचा मान त्यांच्या कार्यालयाला मिळाला, तर त्यांच्या पुढाकारातून दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि चार लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् नोंदविले गेले. इंडिया टुडे आणि आज तक या मंचावर केंद्रीय अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या हस्ते त्यांना ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया’ हा बहुमान मिळाला. याशिवाय ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला. विधानभवनात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या हस्ते ‘आदर्श संसदपटू’ म्हणून गौरवण्यात आले. भव्य दिव्य चंद्रपूर येथील सैनिक शाळा आ.मुनगंटीवार यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देते.
फिरत्या जनसंपर्क कार्यालयातून तातडीने कार्यवाही
प्रत्येक घरकूल लाभार्थ्याला ५ ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर, पोंभूर्णा, मुल आणि बल्लारपूर येथील लाभार्थ्यांना वाळू वितरणाचे नियोजन करण्यात येत आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधत हे काम अधिक प्रभावीपणे पार पडत आहे. Sudhir Mungantiwar mobile office campaign
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांना भरपाई मिळावी यासाठी मदतीचा पुढाकार घेण्यात आला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
गोसीखुर्द प्रकल्पातील पाइपलाइनमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. गावकऱ्यांच्या शेतांमध्ये पाइपलाइनसाठी खोदण्यात आलेले खड्डे तातडीने भरून शेती पूर्ववत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
भादुर्णी येथे वाघाच्या हल्ल्यात झालेल्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाला मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भादुर्णी येथे वाघाला त्वरित जेरबंद करण्यासाठी वनविभागाला आवश्यक ती सर्व उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Sudhir Mungantiwar mobile office campaign
फिरते जनसंपर्क कार्यालय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे कार्यरत आहे. या उपक्रमाद्वारे शेकडो नागरिकांच्या अडचणींवर तात्काळ उपाय करण्यात आले आहे . लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवण्यात हे कार्यालय यशस्वी ठरले आहे, हेच या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य आहे.
woman attacked for mangalsutra in Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मोरवाही मध्ये वृद्ध महिलेला मारहाण करीत ४० हजारांचा माल अज्ञातांनी चोरून नेला होता, याबाबत पोलिसात तक्रार झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने तपास करीत दोन आरोपीना अटक केली आहे.
२० मे रोजी ६५ वर्षीय वृद्ध महिला धृपताबाई प्रल्हाद रायपुरे या घरी झोपेत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजता दोघांनी घरात प्रवेश करीत महिलेच्या तोंडावर हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करीत जखमी केले व त्या महिलेच्या गळ्यातील ४ ग्राम सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. youth arrested for gold chain robbery
सदर प्रकरणी धृपताबाई यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करीत २२ वर्षीय प्रनिकेत दिलीप शेंडे व १९ वर्षीय तनिष्क ओम मंडलेकर दोघे राहणार ताडाळा रोड वॉर्ड क्रमांक ११ यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता दोघांनी सदर गुन्हयाची कबुली दिली.
मध्यप्रदेशात केली मंगळसूत्राची विक्री
या गुन्ह्यात दोघांचा साथीदार नयन रामटेके यांच्यासह मिळून हा गुन्हा केला असे दोघांनी सांगितले, चोरीचे मंगळसूत्र मध्यप्रदेश राज्यातील नयनपूर येथे विकल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपीना अटक करीत मूल पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. नयन रामटेके याचा पोलीस शोध घेत आहे. Chandrapur local crime update
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, चेतन गज्जलवार, प्रशांत नागोसे, प्रफुल गारघाटे, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.
tiger attack compensation policy Maharashtra : चंद्रपूर – मागील एक महिन्याच्या कालावधीत सिंदेवाही तालुक्यातील तेंदुपत्ता हंगामा दरम्यान वाघ हल्यात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनांमुळे सदर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. अशा भयावह परिस्थितीत विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना शासनाच्या वतीने मिळणारी मदत तातडीने देण्याचे आदेश दिले होते. तर आज वनविभागाच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण करण्यात आले. (MLA Vijay Wadettiwar tiger attack relief) सोबतच मानव – वन्यजीव संघर्षावर उपाययोजना यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
वनपरिक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत तालुक्यातील जाटलापूर येथील शामराव अर्जुन मंगाम यांचा दि.25 एप्रिल रोजी वाघ हल्यात मृत्यू झाला होता. तर दि.10 मे रोजी मेंढामlल येथील सारिका शालिक शेंडे, कांता बुधाजी चौधरी, शुभांगी मनोज चौधरी, या तीनही महिलांचा तेंदुपत्ता संकलन करण्याकरिता गेल्या असता वाघिणीने चढविलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यात सलग सुरू असलेल्या मानव – वन्यजीव संघर्षावर (human wildlife conflict compensation Maharashtra) विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करून, परिसरात नियमित गस्त व अन्य उपाय योजना करण्याचे तातडीने निर्देश दिले. यावर वनविभागाने तात्काळ अंमलबजावणी करीत गेल्या 10 दिवसाच्या आत नरभक्षक वाघीण ,व तिच्या बछड्याला तसेच नरभक्षक वाघाला जेरबंद केले.
४५ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण
आज सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघ हल्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना ध्येय असलेले एकूण 45 लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. (Chandrapur tiger attack relief fund) सोबतच भविष्यात मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटना घडू नये याकरिता वनविभागाने ठोस पावले उचलून विशेष उपाययोजना करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी गेल्या दहा दिवसात वनविभागाच्या वतीने जेरबंद करण्यात आलेल्या एक मादी वाघ, बछडा व एक नरभक्षक वाघ , तसेच नियमित गस्त , व इतर उपाययोजनांबाबत समाधानकारक माहिती दिली.
याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, ब्रम्हपुरी दक्षिण वनवृत्तचे वनपरिक्षेत्र अधिकारी राम शेंडे , तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमाकांत लोधे, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, तालुका काँग्रेस सहकार क्षेत्राचे मधुकर बोरकर, माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, मेंढामाल ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष वामनराव कोकोडे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा सहारे, नंदा नरसाळे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार , महेश मंडलवार ,सचिन नाडमवार, नगरसेवक पंकज नन्नेवार,श्याम छत्रवाणी, युनुस शेख, पंकज मूलकलवार व वाघ हल्ल्यातील मृतकांच्या कुटुंबीयांचे वारसदार लाभार्थी, वनविभागाची अतिशीघ्र मदत चमू, व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
toll-free number to report illegal alcohol sales : चंद्रपूर – जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
राजुरा विधानसभेचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी नागरिकांच्या तक्रारीवर अवैध दारू पकडल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन आता खळबळून जागे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेकठिकाणी अवैध व नकली दारूचा पुरवठा होतो मात्र यावर उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत नाही, यावर आमदार भोंगळे यांनी तत्परता दाखविल्याने प्रशासन तोंडघशी पडले आहे.
या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक रीना जैनबंधू, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा प्रमुख नितीन धार्मिक, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) योगेश पारधी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई करा
बैठकीत पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूविरोधात राबवलेल्या विविध कारवायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर दोन्ही विभागांनी संयुक्तपणे तात्काळ कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी दिले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांचा यंत्रणांवरील विश्वास वाढेल आणि अवैध दारूमुळे उद्भवणाऱ्या सामाजिक व आरोग्यविषयक समस्यांपासून त्यांना प्रभावी संरक्षण मिळेल, असेही ते म्हणाले. how to report illegal liquor in Maharashtra
पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक कारवाई करणार
अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक नियमितपणे कारवाईचा आढावा घेईल. तसेच तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करून प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यावे. अवैध दारूच्या विरोधात जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याने दिलेल्या क्रमांकांवर नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात. जिल्हा प्रशासन अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी कटीबद्ध असून, सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
तक्रारी करिता क्रमांक
जिल्हा प्रशासनाचे “वंदे मातरम चांदा” टोल फ्री क्रमांक : 1800-233-8691. राज्य उत्पादन शुल्क विभाग टोल फ्री क्रमांक : 1800-233-9999- व्हाट्सअप क्रमांक : 8422001133).
man eater tiger captured : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात ५ महिन्यात वाघाने अक्षरक्षा धुमाकूळ घातला असून आतापर्यन्त तब्बल २२ नागरिकांचा बळी वाघाने घेतला आहे. मे महिन्यात ९ नागरिकांना वाघाने ठार केले असून यामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा समावेश आहे. forest conflict
नागभीड तालुक्यात २ नागरिकांची शिकार करणारा TATR 224 या नर वाघाला २३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता गंगासागर हेठी बिट, सावर्ला रिट, शासकीय जमीन सर्वे क्र.२ तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्र येथे वनविभागाने डार्ट मारीत जेरबंद केले.
नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात १५ एप्रिल रोजी गंगासागर हेठी येथील मारोती सखाराम बोरकर (वय ४५) व १८ मे रोजी वाढोणा येथील मारोती नकटू शेंडे (वय ६४)या दोघांवर आलेवाही बीट परिसरात हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता . या घटनेनंतर वनविभागाने वरिष्ठांची परवानगी घेत वाघाला पकडण्यासाठी मोहीम राबवली. आज वनविभागाच्या मोहिमेला यश मिळाले सदर नरभक्षक नर वाघ हा अंदाजे ८ वर्षाचा आहे.
सदर नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी या मोहिमेत उपवन संरक्षक राकेश हेपट, सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा, डॉ, रविकांत खोब्रागडे, पोलीस दलातील शुटर अजय मराठे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कन्नमवार,अरविंद माने, राजेंद्र भरणे, घनश्याम लोनबले यांनी अथक परिश्रम केले.
Ghugus Loha pul : घुग्घुस रेल्वे सायडिंग वरील मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या लोखंडी पुलाच्या कामास येत्या १० दिवसांत सुरुवात करावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सदर विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, वेकोलि वणी एरियाचे अभियंता जमगाडे, रेल्वे अभियंता राजूरकर, घुग्गुस नगरपरिषदचे दिनेश बावणे, आशिष मासिरकर, सोनल भरडकर, सन्नी खारकर, संजय भोंगळे, अनिल यादव, किरण पूरेली, राजूभाऊ जगताप, सक्कील राईन, दिनेश बोरपे, , संतोष नुन्ने, संजय तिवारी, मयूर कलवल आदींची उपस्थिती होती.
या पुलाच्या बंदमुळे सायडिंग कॉलनीतील नागरिकांना घुग्घुस शहरातील बाजारपेठेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे वणी रोडवरील पुलाचे कामही अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. problems faced by locals due to incomplete bridges
यावेळी बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, हा पूल घुग्घुसच्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत, कामगारांपासून वृद्धांपर्यंत सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाची अधिक विलंब सहन केला जाणार नाही. १० दिवसात प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले पाहिजे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रशासनाच्या वतीने तातडीने हालचाली करण्याचे आश्वासन दिले. लवकरच रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयातून काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
vocational training for female prisoners : चंद्रपूर – कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण राहिलेले नसून, आता ते महिला कैद्यांच्या पुनर्वसनाचे केंद्र बनले आहे. श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था, बल्लारपूर यांनी चंद्रपूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी मेहंदी, ब्युटी पार्लर, शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या उपक्रमामुळे महिला कैद्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, त्यांचे जीवन उजळण्यास मदत मिळत आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन तुरुंग अधीक्षक अनुप कुमार कुमारे यांच्या हस्ते झाले. या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, कारागृह शिक्षक संजीव हातवडे, तसेच प्रशिक्षिका कविता डेरकर आणि रीना पोर्टेट उपस्थित होत्या.
श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था हे केवळ चंद्रपूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे महिला कैद्यांना सुटकेनंतर नवजीवन सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळते. beauty parlour courses in jail
आमच्या जीवनात आशेचा किरण
महिला कैद्यांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “या प्रशिक्षणामुळे आमच्या अंधाऱ्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. सुटकेनंतर आम्ही हे कौशल्य वापरून आमच्या कुटुंबाचा आधार बनू, तसेच समाजातील इतर महिलांनाही स्वावलंबी बनवण्यासाठी प्रेरणा देऊ.”
या कार्यक्रमाला महिला कैदी, तुरुंग कर्मचारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.