protest against new liquor store opening । ‘दारू दुकान नकोच!’ – कोरपना गावात जनआंदोलन उफाळले

protest against new liquor store opening

protest against new liquor store opening : कोरपना – जिल्ह्यातील बहुचर्चित देशी दारू दुकान ना हरकतीचा खेळ एक हाती सत्ता असलेल्या सत्ताधाऱ्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतीमध्ये राजकीय स्वार्थासाठी स्थानिक देशी दारूची दुकान ग्रामसभेच्या बहुमताने पारित करून आडवी शिशी करण्याचं काम यांनीच केलं मात्र त्यानंतर पुन्हा खोब्रागडे नामक व्यक्तीला एनओसी देण्याचं कट यांनीच रचला त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने सदर दुकान त्या ठिकाणी थाटली नाही. citizens demand liquor store closure

चंद्रपुरात वाळू तस्करीचा नाईट प्लॅन

2015 मध्ये ग्रामपंचायतीचा दर्जा वाढ होऊन या ठिकाणी नगरपंचायत झाली सन 21-22 मध्ये नगरपंचायतीची सत्ता येतात पहिल्या सभेत नंदा पोळ यांना ना हरकत देण्याचा पाप याच सत्ताधाऱ्यांनी केलं, दारूच्या विरोधात असलेला परिवार दारू दुकान गावात सुरू करण्यासाठी उठाठेव करत सत्तेचा वापर केल्याने गावात अनेक महिला पुरुषानी विरोध केला त्यामुळे २०२१ – २२ मध्ये प्रयत्न निरर्थक ठरला. political influence in liquor license approval

मात्र नव्याने आलेले मुख्यधिकारी धुमाळ यांना हाताशी धरूण जनतेच्या भावने विरोधात प्रेम लिकर्स प्रा ली यांना कोरपना येथिल वार्ड क्र २ मध्ये सि एल – ३ देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी आर्थीक लाभेच्या आहारी जाऊन अर्ज ७ /४ / २०२५ ला मुख्याधिकारी यांना दिला तत्परता दाखवित मुख्यधिकारी यांनी सर्वसाधारण सभेच्या सदस्य नगरसेवकाना विश्वासात न घेता नगरध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी संगणमत करुण धुमाळ यांनी तत्परतेने नाहरकत पत्र दिला. याची कुजबुज गावात होताच वातावरण तापले भाजप व मित्र पक्षाच्या नगरसेवकानी जाब विचारताच २६ / ५ / २०२५ ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची नामुष्की मुख्याधिकाऱ्यावर आल्याने याबाबत त्यांनी पत्र काढले. protest against new liquor store opening

अवैध दारूबाबत तक्रार करा टोल फ्री क्रमांकावर

मात्र सत्ताधारी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी शकल लढवित, नगरध्यक्ष नंदा बावने यांनी विषेश सभेचे नोटीस काढून तातडीने दि २८ / ५ / २०२५ ला १२ वाजता नाहरकत प्रमाण पत्र मंजूरीसाठी सभेचे आयोजन केले मात्र विषेश सभा अति महत्वाच्या किवा संकटसमयी घेण्यात येते, सभेचे नोटीस २६ / ५ / २०२५ ला रात्रौ ९ वाजता देण्यात आले नियमाप्रमाणे पूर्ण ३ दिवस वेळ असावा असे असताना नियम बाहय सभा सत्ताधाऱ्यानी घेऊन ठराव पारीत केला मात्र भाजप मित्र पक्षाने सभेत आक्षेप घेत नियमबाह्य बेशिस्त सभा रद्द करा अशी भुमीका गटनेत्या गिता डोहे यानी केली. citizens demand liquor store closure

काहीकाळ तणाव

सभागृहा बाहेर महिला पुरुषांनी आक्रोश करूण घोषणा देत निदर्शने केली, नगर पंचायत पुढे घोषणाबाजी करत मुख्यधिकारी यांच्या कारस्थानाचा तिव्र निषेध व महिलांनी येमाजी धुमाळ यांच्या पुतळ्याला जोडे मारून तिव्र निषेध केला यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला पोलीसानी हस्तक्षेप करून आंदोलन कर्त्यांना शांत केले. भाजप नेते किशोर बावने, राष्ट्रवादी कॉग्रेसचे आबिद अली, शेतकरी संघटनेचे सुनिल बावने, गट नेता गिता बाई डोहे, सविता तुमराम, आशा झाडे, वर्षा लांडगे, सुभाष हरबडे, भाजप शहर अध्यक्ष अमोल आसेकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संभा भुसारी, मोहब्बत खान पठान, अभय डोहे, पवन बुरेवार, सुहेल अली, सुनिल देरकर, अबरार अली, पदमाकर दगडी, शहबाज अली, इंदिरा ताई कोल्हे यांचे सह शेकडो महिला पुरुष सहभागी होऊन निषेध नोंदविला. women protest against local liquor shop

मुख्यधिकारी धुमाळ यांना निलंबित करा, कोरपना येथे दारू दुकान सुरू करू नका, एक हाती सत्ता घरात ठेवून अमुत वर्षात सुद्धा गावाला नळयोजना व पाणी न देता घराघरात दारू ना हरकत देणाऱ्या पदाधिकाऱ्याचा निषेध असो या गावात दारू दुकान सुरू होऊ देणार नाही एकदा आडवी झालेली बाटल ग्राम सभेतून पुन्हा उभी होऊ देणार नाही असे घोषणा देऊन आंदोलन कर्त्यांनी तहसिलदार पल्लवी आकरे, मुख्यधिकारी येमाजी धुमाळ यांना निवेदन देऊन नागरीकाच्या भावना शासनाला कळवा अशी मागणी निवेदनातून केली आहे.

📌 दारू दुकानाविरोधातील आंदोलनावर आधारित FAQ (मराठीत):

प्र. 1: कोरपना गावात दारू दुकानाविरोधात का आंदोलन झाले?

उ. स्थानिक नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, गावात नवीन देशी दारू दुकान उघडण्याच्या निर्णयाला विरोध केला कारण त्यामुळे सामाजिक व कुटुंबिक हानी होण्याची भीती आहे.

प्र. 2: दारू दुकानाला ना-हरकत प्रमाणपत्र कोणी दिलं?

उ. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी नगरसेवकांची पूर्वसंमती न घेता ना-हरकत प्रमाणपत्र दिलं, त्यामुळे वाद निर्माण झाला.

प्र. 3: या आंदोलनात कोणते पक्ष किंवा नेते सहभागी होते?

उ. भाजप, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना व अन्य स्थानिक नेते तसेच शेकडो महिला-पुरुषांनी एकत्र येऊन या निर्णयाचा विरोध केला.

प्र. 4: या प्रकरणात प्रशासनाने कोणती पावले उचलली?

उ. नागरिकांच्या दबावामुळे मुख्याधिकाऱ्यांनी ना-हरकत प्रमाणपत्र रद्द केले, परंतु त्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी विशेष सभा घेऊन मंजुरी दिली, ज्यावरही आक्षेप घेतला गेला.

प्र. 6: दारू दुकान सुरू झाल्यास गावावर काय परिणाम होऊ शकतो?

उ. दारूपासून संबंधित व्यसनाधीनता, घरगुती हिंसाचार, महिलांवरील अत्याचार व सामाजिक अस्थिरता वाढू शकते असा नागरिकांचा दावा आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *