Blog

  • चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झाले एकनाथ शिंदे बस स्थानक

    News34

    चंद्रपूर – गडचांदूर बसस्थानकाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रस्तावित असतांना आज भारत राष्ट्र समिती Brs च्या वतीने मंजुरी न मिळालेल्या गडचांदूर बसस्थानकाला प्रतिकात्मक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसस्थानक नाव देत भूषण फुसे यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले.

     

    औद्योगिक शहर असलेल्या व चार चार सिमेंट उद्योग सभोवती असलेल्या शहरात तसेच जिवती व कोरपना तालुक्याची मूख्य बाजारपेठ असलेल्या शहरात बसस्थानक नाही.

    मागील कित्येक वर्षांपासून गडचांदूर येथे बसस्थानक निर्माण करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी असतांना शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

    याकरिता आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी गडचांदूर बस स्थानक परिसरात भारत राष्ट्र समिती च्या वतीने गडचांदूर बस स्थानक तात्काळ निर्माण करावे या मागणीसाठी प्रतिकात्मक गडचांदूर बसस्थानकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव मा. एकनाथ शिंदे गडचांदूर बसस्थानक असे नाव देत अनोखे आंदोलन करण्यात आले आणि या एकनाथ शिंदे गडचांदूर बसस्थानकाचे उद्घाटन जिवती ते गडचांदूर नेहमी प्रवास करणारे जिवती तालुक्यातील नागरिक रामराव शेळके व नंद आप्पा यांच्या हस्ते गडचांदूर बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाने गडचांदूर करांचे लक्ष वेधले.

    आता तरी राज्यसरकाने या गंभीर विषयाची दखल घेऊन गडचांदूर बस स्थानक उभारणीला परवानगी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

    गडचांदूर बस स्थानक आंदोलन भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते राकेश चिल्कुलवार अजय साकीनाला, सनी रेड्डी, धनंजय बोर्डे, महेंद्र ठाकूर, संघर्ष गडपिल्ली, प्रदीप इरकला. अश्विन वाघमारे व्यंकटेश जंजरला. सामाजिक कार्यकर्ते सुरज उपरे, कैलास चीतलवार. दिलीप कांबळे आदींची मोठया संख्येने उपस्थिती होती.

    महत्वाचे म्हणजे राज्यात नव्यानेच उदयास आलेल्या भारत राष्ट्र समिती पक्षा चे हे जिल्ह्यातील पहिलेच आंदोलन असून, हे आंदोलन भारत राष्ट्र समिती या पक्षकरिता लक्षवेधी ठरले.

  • दालमिया सिमेंट कंपनीमधील कन्व्हेअर बेल्ट ला भीषण आग

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नारंडा येथील डालमीया सिमेंट उद्योगात कनवेयर बेल्टला आग लागली. आग वेगाने पसरत असल्यामुळे कंपनीत गोंधळाचे वातावरण पसरले. या कन्व्हेअर बेल्टने सिमेंटसाठी लागणाऱ्या दगडाची आवक केली जाते. मात्र तो बेल्ट अधिक गरम झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच लागलीच अग्निशमन दलाच्या वाहनाने पाचारण केल्याने आग आटोक्यात आली. यात मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

    [web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]

    11 ऑगस्ट ला सकाळी पहाटे 5 वाजताच्या सुमारास दालमिया सिमेंट कंपनीमधील कनव्हेर बेल्ट जळायला लागल्याने कंपनी मध्ये येणारे सर्व वाहन थांबविण्यात आले होते.

     

    कंपनीचे मानव संसाधन विभाग प्रमुख अभिषेक मिश्रा यांनी सांगितले की आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यास आम्हाला यश आले, कंपनी व्यवस्थापनाने समय सुचकता दाखवीत कर्मचाऱ्यांना आधीच कन्व्हेर बेल्ट पासून दूर करण्यात आले होते.
    या आगीत मोठे नुकसान झाले नाही.

  • झपाट्याने वाढत असलेल्या डोळ्यांच्या साथीवर उपाययोजना करा

    News34

     

    चंद्रपूर:- जिल्ह्यांमध्ये डोळ्यांचा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत असून डोळे येवून डोळे सूजने या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व प्रशासनमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गांवस्तरावर प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यासंदर्भात शिवसेनेचे वैद्यकीय जिल्हा प्रमुख, अरविंद धिमान व शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सोनारकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

    महाराष्ट्रासह विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये डोळ्याचा संसर्गजन्य रोग म्हणजेच डोळे येणे याचा खूप प्रादुर्भाव झालेला दिसत असून आपल्या जिल्ह्यात सुद्धा अनेक व्यक्तींना हा रोग झालेला मोठ्या प्रमाणात आढळत आहे. यावर आळा बसवण्यासाठी व त्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व प्रशासनमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गांवस्तरावर युद्ध पातळीवर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करुन जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या आजारापासून दूर ठेवण्यास प्रयत्न करावे.

    आजच्या स्थितीत खेडोपाडी या आजारावर इलाज होत नसून शासनामार्फत गोरगरिबांना याचा लाभ मिळावा या हेतूने आपण प्रयत्नशील आहात तसेच आपण संबंधितांना यासंदर्भात तात्काळ आदेश देवून ह्या आजारापासून नागरिकांना बाहेर काढण्यास मदत करावी.

    यावेळी शिवसेनेचे वैदकीय जिल्हा प्रमुख, अरविंद धिमान, शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी, कोरपना तालुका प्रमुख, राकेश राठोड, उपतालुका प्रमुख, अविनाश उके, राजू रायपुरे, आशिष खरोले व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

  • ग्रामपंचायत चे दुर्लक्ष नागरिक अंधारात

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – ग्रामपंचायत चिखली बेलगाटा चा भोंगळ कारभाराणे आणि दुर्लक्षित पणाने बेलगाटावासी अंधारात असल्याने पावसाळ्यात दिवसात अनेक समस्यांना तोंडाने लागत आहे.

    बेलगाटा गावात एक इलेक्ट्रिक सप्लाय डीपी आहे डीपी च्या सभोवताल कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. आणी त्याच्या मागील भागात नागोबाच मंदीर आहे. त्या डीपीच्या आजूबाजूला खुप कचरा वापलेला आहे आणी पावसामुळे वेळोवेळी लाईट जात असते त्यामुळे वारंवार डीपी जवळ जावे लागते परंतु कचऱ्यामुळे रात्री च्या वेळेला लाईनमनला तिथे जाण्यास शक्य नाही.

    त्यामुळे गावातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चिखली ग्रामपंचायतीची गट ग्राम पंचायत बेलगाटा असल्यामुळे सरपंच हे त्याचं गावातील रहिवाशी असताना सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत.

    त्यामुळे तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. करीता ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच, सदस्य आणि प्रशासन म्हणून ग्रामसेवक यांनी त्वरित लक्ष देऊन डी.पी.चे सभोवताल असलेला कचरा त्वरित साप करावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

  • चंद्रपूर मनसे पक्षात फेरबदल

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मनसे मध्ये फेरबदल करण्यात आले असून वाहतूक सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी महेश वासलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    सध्या चंद्रपूर जिल्हा मनसे मध्ये सर्व काही आलबेल सुरू असून संघटन वाढीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती, त्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढीसाठी भरीव प्रयत्न केले व करीत आहे.

    ज्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न न केल्याने त्यांना जबाबदारी मधून मुक्त करण्यात आले आहे, चंद्रपूर जिल्हा मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष पदावर मनसैनिक महेश वासलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    वाहतूक सेना संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या आदेशाने सरचिटणीस आरिफ शेख यांच्यासह मनसे वाहतुक राज्य उपाध्यक्ष सुधीर खापने व मनसे जिल्हा अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या हस्ते वासलवार यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

    नियुक्ती झाल्यावर वासलवार यांनी वाहतूक सेना संघटन वाढीचे जिल्ह्यात प्रयत्न करू व वाहतुकदारांना सध्या नेतृत्वाची गरज आहे, त्यांच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होते, आम्ही मनसे वाहतूक सेनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हाध्यक्ष वासलवार यांनी दिली.

     

  • गोंदिया ते चांदा फोर्ट रेल्वे रुळावर चालणाऱ्या पॅसेंजर गाड्या रद्द

    News34

    चंद्रपूर – गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरक्षेसंबंधी कार्य सुरू असल्याने गोंदिया ते चांदाफोर्ट या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे.

    अमृत महोत्सव अंतर्गत राज्यातील अनेक रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण होत आहे, मात्र त्यामध्ये गोंदिया रेल्वे रुळावर सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे काम सुरू असल्याने पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. Chanda fort

    ज्यामध्ये गाडी संख्या नंबर ०८८०६ गोंदिया – वडसा मेमु पैसेजर दिनांक ९/८/२०२३ ते दिनांक २२/८/२०२३ पर्यंत बंद राहील.
    गाडी संख्या नंबर ०८८०८ वडसा – नागभीड- चांदाफोर्ट मेमु पैसेजर दिनांक १०/८/२०२३ ते दिनांक २३/८/२०२३ पर्यंत बंद राहील.
    गाडी संख्या नंबर ०८८०५ चांदाफोर्ट – नागभीड – गोंदिया मेमु पैसेजर दिनांक १०/८/२०२३ ते २३/८/२०२३ पर्यंत बंद राहील.

    अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

  • बातमी का प्रकाशित केली म्हणून पत्रकाराला भर चौकात मारहाण

    News34

    जळगाव – जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती.

    त्यांनतर सदर प्रकरण राज्यभर गाजले, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत व्हिडीओ कॉल द्वारे मुख्यमंत्री शिंदे सोबत कुटुंबांचा संवाद घडवून आणला, त्यावेळी सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली होती, मात्र त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी काही न म्हणता मी पोलिसांसोबत बोलतो असे म्हणत फोन ठेवला.

    सदर बाब पत्रकार संदीप महाजन यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी या आशयाची बातमी चालविली.

    त्या बातमीने शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील संतप्त झाले, त्यांनी संदीप महाजन यांना कॉल करीत कुठे राहतो, तुझे हात-पाय तोडतो असे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळ केली.

    पत्रकाराला शिवीगाळ करणारी क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असता तो आवाज माझाच असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले, त्यानंतर पत्रकार संदीप महाजन यांना भर चौकात मारहाण करण्यात आली.

    क्या चौकात संदीप महाजन यांना मारहाण करण्यात आली त्या चौकाचे नाव पत्रकार महाजन यांचे वडील स्वातंत्र्य सैनिकांच्या नावावर आहे.

    बातमीमधील सत्यता प्रकाशित केली म्हणून गुंडांनी पत्रकाराला भर चौकात मारहाण केली, आमदार पाटील यांच्या गुंडांनी मला मारहाण केली असा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे.

  • वरोरा पोलिसांची गंभीर गुन्ह्यात दमदार कामगिरी

    News34

    चंद्रपूर/ वरोरा – बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना वरोरा पोलिसांना अल्पवयीन मुलगी आढळली आणि शहरातील मोठं देहव्यापाराचे नेटवर्क उघडे पडले.

    अल्पवयीन मुलीला देह व्यापारात महिला व पुरुष एजंटने ढकलत तिला विविध ग्राहकांकडे पाठविण्यात आले होते, मात्र हे सर्व नेटवर्क पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांनी उघडकीस आणले.

    या प्रकरणात 13 आरोपीना अटक करण्यात आली होती, बुधवारी न्यायालयाने आरोपीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    या प्रकरणात आरोपीच्या आई वडिलांनी पत्रकार परिषद घेत पोलीस विभागावर गंभीर आरोप केले, निव्वळ फोन कॉल व ऑनलाइन पैसे दिल्याने आमची मुलं आरोपी कसे असा प्रश्न पत्रकार परिषदेत करण्यात आला, आम्हाला आमच्या मुलांना पोलीस विभाग भेटू देत नसल्याचे पत्रकार परिषदेत आरोपी युवकांच्या आई वडिलांनी सांगितले.

    चंद्रपूर जिल्ह्यात पत्रकाराची आत्महत्या

    याबाबत पोलिसांनी आमच्याकडे अटक करण्यात आलेल्या आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याची माहिती दिली आहे, विशेष म्हणजे काही आरोपींवर गंभीर गुन्हे सुद्धा दाखल असल्याची माहिती आहे.

    अन्य आरोपींनी अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला.
    पोलिसांकडे विविध ठिकाणी आणि वाहनात केलेल्या जघन्य गुन्ह्याशी संबंधित आरोपींविरुद्ध व्हिडिओ फुटेज आणि भरपूर पुरावे आहेत. पडताळणीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

    पीडित मुलीचा व्हिडीओ व्हायरल

    या प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीसोबत एका तथाकथित नेत्याने आक्षेपार्ह संभाषण करीत व्हिडीओ व्हायरल केला आणि त्या मुलीची ओळख जनमानसात प्रसिद्ध केली या प्रकरणी रमेश मेश्राम व इतर दोघांविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    देहव्यापारासारख्या गंभीर गुन्ह्यात वरोरा पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी बजावीत प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळले, गुन्ह्यात सहभागी आरोपीना अटक तत्परता दाखवली.

    या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास भद्रावती पोलीस निरीक्षक विपीन इंगळे करीत आहे.

  • बल्लारपुर में डॉक्टर की घोर लापरवाही का मामला उजागर

    News34

    बल्लारपुर (रमेश निषाद)

    👉 बल्लारपुर के सरकारी अस्पताल से बड़ी घटना सामने अा रही है जिसमें ट्रक चालक युवक के कमर में इंजेक्शन लगाने के दौरान सुई भी दवाई के प्रेशर के साथ शरीर में धसने से डॉक्टर की घोर लापरवाही देखने को मिली है ।

    बताया जाता है कि इलाज के लिए सरकारी दवाखाने में 1अगस्त को बारह बजे आए ट्रक चालक संदीप आत्राम को डॉक्टर ने स्वास्थ परिक्षण के पश्चात इंजेक्शन लगाने व दवाई लेने को कहने पर संदीप आत्राम को इमरान नामक (ब्रदर) कंपाउंडर द्वारा कमर में इंजेक्शन लगाते समय कमर में सुई दवाई के प्रेशर से सिरिन से निकलकर भीतर चली गई जिससे डॉक्टर विजय कडस्कर जो की वैधकिय अधिकारी होते हुए लापरवाही बरतने जैसी घटना सामने आई है भगवान का दूसरा रूप लोग डॉक्टर को मानते है जो की लोगों की जान बचाने का कार्य करता है जान से खिलवाड़ नहीं करता ।

    👉बल्लारपुर के शिवाजी वार्ड बीटीएस प्लॉट परिसर में रहनेवाले ट्रक चालक संदीप आत्राम (36) के हांथ पैर में मामूली सा दर्द व बुखार के इलाज के लिए बल्लारपुर के सरकारी दवाखाने में आनेपर सुई बीमार संदीप की कमर के भीतर रह जाती है।

    डॉक्टर ने भयभीत अवस्था में बिना हैंड ग्लोब्स के तुरंत आपरेशन कर सुई ढूंढनी चाही किंतु सुई नहीं मिली, सुई कमर से नीचे सरक गई डॉक्टर विजय कडस्कर द्वारा दूसरे दिन 2 अगस्त को डॉ. अल्लुरवार के दवाखाने में सीटी स्कैन करने पर सुई अंदर होने की जानकारी सामने आयी।

    जिला सामान्य अस्पताल में पहुंचकर शल्य चिकित्सक से आपरेशन करने पर युवक की कमर से सुई निकाली गई है ट्रक चालक संदीप ने बताया कि डॉक्टर की लापरवाही से यह हुआ है मुझे कुछ कम ज्यादा होने पर संबधित डॉक्टर जिम्मेदार रहेगा। मेरे दवाखाने में रहने से मेरे परिवार के समक्ष उपजीविका चलाना मुश्किल हो रहा है इस मामले कि शिकायत पुलिस में दर्ज की जाएगी ।

    👉 चंद्रपुर के सी एस डॉ महादेव चिंचोडे ने इस घटना के विषय में बताया है कि युवक संदीप आत्राम अब खतरे से बाहर इस घटना की जांच कमेटी बनाई गई है मामले की जांच शुरू है दोषी पाए जाने पर उचित कार्यवाही होंगी ।

     

  • चंद्रपूर युवासेनेच्या रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

    News34

    चंद्रपूर – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे समाज हित धोरण स्विकारून शिवसैनिक अमनभाऊ अंधेवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगष्ट २०२३ रोज मंगळवारला
    इंदिरा नगर येथे युवासेना शाखा उद्घाटन व भव्य रक्तदान शिबिर चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे यांच्या द्वारा आयोजित करण्यात आले होते.

    आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले, तब्बल 68 युवकांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. रक्तदान शिबिरांनातर इंदिरा नगर येथे युवासेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.

    यावेळी युवतीसेना महाराष्ट्र राज्य सहसचिव रोहिणीताई पाटील, महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेशभाऊ बेलखेडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शालिकभाऊ फाले, शिवसेना माजी महानगरप्रमुख प्रमोदभाऊ पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख रिझवान पठाण,सुमित अग्रवाल, सुजित पेंदोर, महिला आघाडी जिल्हासंघटीका उज्वलाताई नलगे, माजी जिल्हासंघटीका कुसुमताई उदार, इंदिरा नगर शाखाप्रमुख पराग कुत्तरमारे,उपशाखाप्रमुख श्रीकांत दडमल, शाखा सचिव अमित वाघमारे, शाखा उपसचिव तुषार वारफडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.