Blog

  • वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात हाय व्होल्टेज ड्रामा

    News34 breaking

    वरोरा/ छेडछाडी प्रकरणी सातत्याने चार आरोपींना अटक करण्याची मागणी करणाऱ्या महिलेने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केल्याने वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारात खळबळ उडाली.

    वरोरा तालुक्यातील गावात राहणाऱ्या पीडित महिलेने 5 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत आरोप केला की, वरोरा तालुक्यातील इरफान शेख याने तिच्यावर अत्याचार केला, मारहाण केली आणि संबंध प्रस्थापित केले. आता त्याचे नातेवाईक मला आणखी एका प्रकरणात धमकावतात. पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर कलमांतर्गत तक्रार नोंदवली मात्र त्यांना अटक करण्यात अपयश आले. सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा सोमवार 7 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या कार्यालयात विष प्राशन करू, असा इशारा पीडितेने दिला.

    पत्रकार परिषदेला संबोधित करताना पीडितेने पुढे सांगितले की, इरफान शेखने गेल्या ऑक्टोबर महिन्यात लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आयपीसी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    आता इरफानचे नातेवाईक आपला पाठलाग करत असून पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून आपली बदनामी करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. 22 जून 2023 रोजी खांबाडा गावातील एका हॉटेलमध्ये आरोपीच्या नातेवाईकांनी मला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक होत नसल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप महिलेने केला आहे. आरोपी शेख रिजवान, शेख मोहसीन, शेख दानिश आणि शेख मोहम्मद यांना तात्काळ अटक करण्याची मागणी महिलेने केली आहे. तपास अधिकारी पीएसआय नीलेश चवरे यांची बदली करावी, अशी मागणीही तिने केली.

    वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी व प्रभारी पोलीस निरीक्षक रांजणकर यांनीही त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना नोपानी म्हणाले की, या प्रकरणात आरोपी इरफान शेख याच्यावर आयपीसी कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही झाली असून खटला न्यायप्रविष्ट आहे. आणखी चार आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोस पुरावे असल्याशिवाय पोलीस त्यांना अटक करू शकत नाहीत. इरफान आणि त्याच्या नातेवाइकांनीही महिलेविरुद्ध वारंवार तक्रार केली आणि तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

    सोमवारी पोलिसांनी महिलेला वरोरा पोलिस ठाण्यात आणले. एसडीपीओ आयुष नोपानी आणि इतर अधिकार्‍यांनी तिला प्रकरणातील तथ्यांबद्दल माहिती दिली. मात्र त्या महिलेने पोलिसांचे काही ही न ऐकून घेता संधी साधून लगेचच पाण्याच्या बाटलीत भरलेले विष प्राशन केले.

    प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ महिलेला उपजिल्हा रुग्णालयाचे पत्र देऊन पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर केले. एसडीपीओ नोपानी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की आम्ही महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. वरोरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांनी सांगितले की, महिलेची प्रकृती स्थिर आहे. तथापि, हे सांगणे कठीण आहे की तिने जे विष प्राशन केले ते अज्ञात आहे.

  • पुरग्रस्तांसोबत संवाद साधण्यासाठी पालकमंत्री उशीरा पोहचले

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील वर्षीपासून पावसाळ्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण व्हायला लागली आहे, मात्र या पूर परिस्थिती वर अद्याप तोडगा निघाला नाही, आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन भवनात पूरग्रस्तांसोबत संवाद व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोलाविले होते मात्र पालकमंत्री मुनगंटीवार हे स्वतः त्या बैठकीला उशिरा पोहचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

    शहरात येणाऱ्या पुरावर जनप्रतिनिधी व प्रशासन कायमचा तोडगा काढण्यास अपयशी ठरले आहे, दरवर्षी पाऊस पडला की शहरातील अनेक भागातील घरे पाण्याखाली जातात.

    आजही काही पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळत नसल्याची माहिती आहे, पुरग्रस्तांच्या समस्या काय आहे? हे जाणून घेण्यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पूरग्रस्तांची बैठक आयोजित केली होती.

    सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत ही बैठक होणार होती, मात्र पालकमंत्री स्वतः 7 वाजताच्या दरम्यान पोहचले, नागरिक कामावर न जाता पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या समक्ष आपल्या समस्या विस्तृत मांडणार होते मात्र मंत्री महोदय उशिरा आले.

    त्यानंतर पालकमंत्री यांनी सर्वांच्या समस्या ऐकुन घेतल्या मात्र बैठकीला उशीर झाल्याने नागरिक संतापले, कारण पुरग्रस्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे सविस्तर समस्या कुणी सांगू शकले नाही.

    दरवर्षी पुर येतं आहे, त्यावर प्रशासन व जनप्रतिनिधीं यांनी कायमचा तोडगा काढावा, अन्यथा दरवर्षी फक्त प्रशासन पंचनामे करणार आणि मदत देणार असे किती दिवस चालणार असा प्रश्न पूरग्रस्त नागरिकांनी उपस्थित केला.

     

  • चंद्रपूर शहरात पास्टर्स असोसिएशनचा निषेध मोर्चा

    News34

    चंद्रपूर – मे महिन्यापासून देशातील मणिपूर येथे सुरू झालेला हिंसाचार आजही सुरूच आहे.
    या हिंसाचार दरम्यान मणिपूर येथे भयावह घटना घडली, 2 महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

     

    ही घटना देशाला लाजविणारी होती, या घटनेचे पडसाद देशात मोठ्या प्रमाणात पडले, अनेक ठिकाणी या घटनेचा नागरिकांनी निषेध दर्शविला.

    7 ऑगस्ट ला चंद्रपूर शहरात डिस्ट्रिक्ट पास्टर्स असोसिएशनच्या वतीने मणिपूर हिंसेविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील गांधी चौकातून शहरातील मुख्य मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय पोहचला.

    आयोजित निषेध मोर्च्यात पास्टर्स प्रभाकर कंडे, मोहित सक्सेना यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी विविध मागण्यांचे यांना निवेदन देण्यात आले.

    डिस्ट्रिक्ट पास्टर्स असोसिएशनच्या मागण्यांबाबत माहिती देताना सांगितले की देशात सध्या विविध धर्मात तेढ लावण्याचे काम सुरू आहे, अल्पसंख्याक समाजाला यामध्ये टार्गेट करण्यात येत आहे, मणिपूर मध्ये जी घटना घडली ती अख्ख्या जगाला लाजवून सोडणारी आहे या घटनेचा आम्ही पास्टर्स असोसिएशन निषेध करतो.

  • राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिरुपती अधिवेशनामध्ये ४२ मागण्यांचे ठराव पारीत

    News34

     

    चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन आंध्रप्रदेश येथील तिरुपती येथे ७ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. दिवसभर चाललेल्या या महाअधिवेशनात ओबीसी समाजाशी संबंधित ४२ मागण्यांचे ठराव पारीत करण्यात आले.

    तिरुपती येथील या महाअधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले.

    या अधिवेशनाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर, एआयएमआयएम चे अध्यक्ष खासदार असुद्दिन औवेसी, जस्टिस व्ही. ईश्वरय्या, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकार, आमदार परिनय फूके, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांची आयोजनात महत्त्वाची भूमिका होती.

    ‘जो ओबीसी की बात करेगा, वही ‘देश पे राज करेगा’, ‘जय ओबीसी’, ‘जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे’, आदी घोषणांनी महाअधिवेशन गाजले.

    ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे अध्यक्षस्थानावरून म्हणाले की, दर वर्षी देशाच्या विविध भागात आम्ही ओबीसी महाअधिवेशन आयोजित करतो. अधिवेशन हे केवळ निमित्त मात्र आहे, या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यातील ओबीसी बांधावांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असतो. ओबीसी समाजात ऊर्जा व जागरूकता निर्माण करण्याचा हेतू असतो. शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसी समाजासाठी लढत राहू.

    राज्याच्या सर्व शाखांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना लोकसंख्येच्या योग्य प्रमाणात आरक्षण व प्रतिनिधीत्व देण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी, ४ मार्च २०२१च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी घटनेच्या कलमात सुधारणा करावी किंवा २७ टक्के लागू करावे, ओबीसींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करावी आणि स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाने घातलेली ५०% आरक्षणाची मर्यादा दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, क्रिमिलेअरची मर्यादा १३ सप्टेंबर २०१७ पासून वाढलेली नाही, याबाबतची अट मागे घेईपर्यंत मर्यादा २० लाख रुपये करावी, महात्मा फुले दांपत्यांना भारतरत्न द्यावे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आदी अशा ४२ मागण्यांचे बाबतीत महाअधिवेशनात सर्वसंमतीने ठराव घेतले. आता ते केंद्र तथा राज्य सरकारला पाठवून ओबीसी संघटनांद्वारे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

    प्रस्तावना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी समोचीत मार्गदर्शन केले.

    राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर म्हणाले की, आता पर्यंत मोदी सरकारने ओबीसी समाजाकरीता सकारात्मक योगदान दिले आहे. मी त्यांची स्तुती करत नाही आहे तर मी एका संवैधानिक पदावर आहों, व जवाबदारी ने बोलत आहों, मात्र त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. आम्ही त्यांचे कडून ओबीसी समाजाकरीता अधिक महत्त्वपूर्ण निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता पर्यंत ओबीसी समाजाला जे मिळाले आहे त्याचाही विचार आपण करुया.

    यावेळी बोलताना एआयएमआयएम चे अध्यक्ष खासदार असुद्दिन औवेसी म्हणाले की देशात ओबीसी समाज ५२% पेक्षा अधिक आहे. मात्र आज केवळ ५% सवर्ण समाज बहुसंख्यांक समाजावर अन्याय करीत आहे.

    न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या म्हणाले की एक दिवस देशाचा पंतप्रधान हा ओबीसी समाजाचा होईल व ओबीसींचे वर्चस्व देशाच्या राजकारणावर असेल.

    या देशव्यापी ओबीसी अधिवेशनात देशभरातून हजारो ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

    शरद वानखेडे, शकील पटेल, प्रा. शेषराव येलेकर, प्रा. सुधाकर जाधवर, जाजुला श्रीनिवास गौड, केसना शंकरराव, मुकेश नंदन, गुनेश्वर आरीकर, सुषमा भड, एड. रेखा बारहाते, सुभाष घाटे, प्रकाश भागरथ, दिनेश चोखारे, चेतन शिंदे, कल्पना मानकर, आदींनी यशस्वीतेकरीता प्रयत्न केले.

  • वरोरा तालुक्यातील नऊ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    News34

     

    चंद्रपूर : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करतो, हे अत्यंत खेदाची बाब आहे. कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्यानंतर त्यांच्या वारसांचे वाताहात रोखण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांची गरज ओळखून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व समजून पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. त्या वरोरा येथे लोकाभिमुख कामांचा करूया निपटारा चला करू महसूल सप्ताह साजरा या कार्यक्रमात बोलत होत्या.

    यावेळी अमोल जांभुळकर, धनराज कुत्तरमारे, मंगेश घोडमारे, तानबा कुंभारे, शंकर देठे, नत्थू उईके, शरद चौधरी, बंडू कळस्कर, आशिष डेहने या वरोरा तालुक्यातील नऊ शेतकरी आत्महत्या प्रकरण आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले. आज त्यांच्या कुटुंबियांना अनुदान वितरित करण्याबाबत.

    याप्रसंगी शिवनंदा लंगडापुरे उपविभागीय अधिकारी वरोरा, कौटकर तहसीलदार वरोरा, लोखंडे नायब तहसीलदार वरोरा, राजेंद्र चिकटे माजी सभापती कृ. उ. बाजार समिती वरोरा, सर्व कर्मचारी तहसील कार्यालय वरोरा, बाधित शेतकरी,काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

  • OBC समाजाला भाजपने न्याय देण्याचं काम केलं – हंसराज अहिर

    News34

     

    चंद्रपूर- ओबीसींच्या हिताचे कुणी कितीही दावे, प्रतिदावे केले तरी ओबीसींना खऱ्या अर्थाने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व विविध क्षेत्रातील उन्नतीला भाजपानेच न्याय दिला आहे. जेव्हा मंडल शिफारसी स्विकारल्या गेल्या तेव्हा व्हीपींच्या सरकारसोबत भाजप होती.

    देशात ओबीसी आयोगाची स्थापना झाली तेव्हापासून या आयोगाला अधिकारच नव्हते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ओबीसींच्या हितासाठी या आयोगाला संविधानिक अधिकार बहाल केले तेव्हापासून या घटकांची प्रगती वेगाने होवू लागली आहे. त्यामुळे भाजप हाच ओबीसींचा रक्षणकर्ता व विश्वास व्यक्त करता येईल असा एकमेव राजकीय पक्ष असल्याने ओबीसी वर्गातील तमाम बांधवांनी बांधीलकीतून आपल्या न्याय हक्काकरीता भाजपासोबत यावे असे आवाहन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भाजपा ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करतांना केले.

    भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतीने स्थानिक जैन भवन येथे दि. 5 ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमास भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा सत्कारमुर्ती संजय गाते, प्रदेश ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी डी.डी. सोनटक्के, तामेश्वर गहाणे, प्रदेश सदस्य विजय राउत भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपा जिल्हामहामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, प्रकाश बगमारे, अनिल फुलझेले, रवि गुरनूले, रघूवीर अहीर, ओबीसी मोर्चा महानगराध्यक्ष विनोद शेरकी, राजू घरोटे, जुम्मन रिजवी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, विशाल निंबाळकर, अरुण तिखे, वंदना संतोषवार, रत्नमाला भोयर, आदी पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित होते.

    आपल्या भाषणात अहीर म्हणाले की, ओबीसी आयोगाच्या माध्यमातून संविधानिक अधिकारामुळे ओबीसींना न्याय मिळत आहे. नोकरी, शिक्षण व अन्य क्षेत्रातील अन्यायाची दखल आयोगाद्वारे घेतली जात आहे. आदेशाद्वारे न्याय मिळवून देण्यात येत आहे. मोदीजींनी ओबीसींना सन्मान दिल्यानेच हे शक्य झाले आहे. आज जे ओबीसीबद्दल कळवळा दाखवित आहेत त्यांना काही करता आले नाही त्यासाठी मोदीजींचे सरकार यावे लागले. म. फुले, शाहू महाराज आरक्षणाचे पुरस्कर्ते होते. आज मुस्लिम समाजातील ओबीसी मध्ये असलेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. देशात समानतेचे वारे वाहू लागले आहेत.

    त्यांनी पुढे सांगितले की नरेंद्र मोदीजींनी ओबीसींच्या सन्मानात भर घातली आहे. केंद्रात 35 टक्के ओबीसी मंत्री आहेत. जर 2007 पासून वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आरक्षण लागू असते तर अखिल भारतीय कोट्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील डॉक्टरांची संख्या वाढली असती केले, आज वैद्यकीय शिक्षणातच नव्हे तर अन्यत्र सुध्दा ओबीसींचा टक्का वाढला आहे. केंद्र सरकारने सबका साथ सबका विकास या न्यायाने राज्यकारभार चालविल्यामुळे समाजातील प्रत्येक लोकांना त्यांचे डावलले गेलेले हक्क मिळू लागले आहेत.

    अनेक योजनांचा लाभ जात, धर्म, पंथाच्या पलिकडे जाऊन सर्वांना मिळत आहे हे मोदींजींच्या सर्व समावेशक धोरणांची उपलब्धी असल्याचे अहीर यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी अनेक विषयांना स्पर्श करीत ओबीसींच्या उत्थानाकरिता सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली.

    ओबीसींच्या सामाजिक हक्क व उन्नतीकरीता समर्पितपणे कार्य करु- संजय गाते
    ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले ओबीसींचा उत्कर्ष केवळ भाजपाच करु शकतो त्यामुळे अनेक जाती-पोटजातीमध्ये विखुरलेल्या ओबीसी बांधवांनी संघठीत होवून आपल्या न्यायाच्या लढ्यासाठी पुढे आले पाहिजे. मा. मोदीजींनी ओबीसींचा स्वाभीमान जागृत केला त्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. भाजपा महायुती सरकारने ओबीसींना अनेक बाबतीत न्याय देणारे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत त्यामुळे भाजपा नेतृत्वात केंद्र व राज्यात सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी ओबीसी घटकांनी भाजपासोबत भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले. हंसराज अहीर संवैधानिक दर्जा लाभलेल्या ओबीसी आयोगाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या कारकिर्दीत ओबीसी बांधवांना न्याय मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भाजप श्रेष्ठींनी सोपविलेल्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी आपण ओबीसीचे संघठन मजबूत करु समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याकरिता पदाचा वापर करण्याची ग्वाहीसुध्दा संजय गाते यांनी उपस्थित ओबीसी बांधवांना दिली.
    प्रारंभी ओबीसी मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचा हंसराज अहीर व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त भाजप पदाधिकारी मान्यवर अतिथी व ओबीसी प्रवर्गातील अनेक समाज बांधवांचा उपस्थितांनी सन्मान केला.
    या प्रसंगी अन्य मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शशिकांत मस्के यांनी तर पाहूण्यांचे आभार विनोद शेरकी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप किरमे, शैलेश इंगोल, सुभाष आदमने, पराग मलोडे, मुग्धा खांडे, सचिन संदूरकर, सुभाष ढवस, सुधाकर बोंडे, दिपक झोरे, मधुकर राऊत, राम हरणे, शाम बोबडे, शालू कनोजवार, संगिता सुर्यवंशी, मोनीका महातव, मयुर भोकरे, अरुणा चौधरी यांचे सह अनेकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास चंद्रपूरसह जिल्हातील बहूसंख्य ओबीसी बंधू भगिनी व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
  • चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी तब्बल 333 कोटी रुपयांचा केला भरणा

    News34

     

    चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षभरामध्ये १६ लाख ७६ हजार ९३८ वीजग्राहकांनी तब्बल ४२४ कोटी ६६ लाख ४० हजार रुपयांचा रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १२ लाख ३१ हजार ग्राहकांनी ३३३ कोटी रुपयांचा तर गडचिरोली जिल्ह्यातील ४ लाख ४५ हजार ८७० ग्राहकांनी ६६ कोटी १८ लाख रुपयांचा घरबसल्या ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केला आहे.

     

    गेल्या जुलै २०२२ ते जुलै २०२३ च्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत चंद्रपूर परिमंडलामध्ये वीजबिलांपोटी दरमहा १ लाख ३९ हजार वीजग्राहक ३५ कोटी ५५ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’ भरणा करीत आहे. चंद्रपूर परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात ग्राहकांची पसंती वाढत आहे. ‘ऑनलाइन’ भरणा केलेली पावती मोबाईल किंवा संगणकात जतन करून ठेवता येते व कधीही प्रिंट काढता येते. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेला व ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद द्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांनी केले आहे.

     

    महावितरणकडून बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे. ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केल्यानंतर संबंधीत ग्राहकांना लगेचच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच देण्यात येत आहे.

     

    लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच वीजबिलांचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास एक टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. सोबतच लघुदाब ग्राहकांचे वीजबिल ५ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास ते आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय आहे. तसेच मा. विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार दि. १ ऑगस्टपासून महावितरणचे वीजबिल रोखीन भरण्यासाठी ५ हजार रुपयांची कमाल मर्यादा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल सुरक्षित व घरबसल्या भरण्यासाठी महावितरणची ‘ऑनलाइन’ सुविधा उपलब्ध आहे.

    महावितरणचे महापॉवर वालेट
    आता किराणा दुकान, मेडिकल मध्येही वीजबिल भरता येईल

    याव्यतिरिक्त वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने स्वतःचे पेमेंट वॉलेट सुरू केले असून आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या पतसंस्था तसेच किराणा, मेडीकल व जनरल स्टोअर्स चालकांना वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात वीजबिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रतीबिल पावतीमागे ५ रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळणार आहे.

     

    वॉलेटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्या पतसंस्थांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र (शॉप ॲक्ट), पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. वॉलेटधारक महावितरणच्या ॲपमध्ये नोंदणी करून महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेऊ शकतील. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर बिल भरणा झाल्याचा एसएमएस पाठविण्यात येईल. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा आहे. त्याचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जाईल.

  • प्रशासकीय इमारतीला लागलेली आग घातपात तर नाही ना? शोध घ्या – पालकमंत्री मुनगंटीवार

    News34

     

    चंद्रपूर – रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर लागलेल्या आगीच्या चौकशीचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

     

    चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर रविवारी पहाटे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचे कार्यालयाला आग लागली. आगीत कार्यालयातील फाईल्स, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले. ही आग कशामुळे लागली त्याचे नेमके कारण शोधावे तसेच यामागे कोणत्या घातपातीचा तर हात नाही, याचाही शोध यंत्रणेने घ्यावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

     

    पहाटेच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच तातडीने फायर ब्रिगेडला प्रचारण करण्यात आले. यात फायर ब्रिगेडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे आगीचे लोन इमारतीतील इतर कार्यालयांत पसरले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

     

  • आई – वडीलांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणारा पुत्र महान होतो : प्रा. नितेश कराळे

    News34 chandrapur

     

    वरोरा / भद्रावती – सर्वसामान्य युवक -युवतींनी  राजकारण, स्पर्धा परीक्षा आणि न्यायव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी. त्या त्या क्षेत्रातील उच्च कोटीची पात्रता अंगीकारली पाहिजे.  जीतना बडा संघर्ष होगा ! जीत उतनी ही बडी होगी ! आपण प्रत्येकाने आई-वडिलांना आपआपले आदर्श मानले पाहीजे.आईवडीलांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणारा पुत्र महान होतो. असे प्रतिपादन वर्धा येथील वऱ्हाडी भाषेतील राज्यस्तरीय प्रसिद्ध वक्ते प्रा. नितेश कराळे यांनी केले.

    स्थानिक राधा मिलन सभागृह बोर्डा चौक वरोरा येथे आज  दि. ६ ऑगस्ट रोज रविवारला सकाळी अकरा वाजता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून  प्रा. कराळे उपस्थित विद्यार्थांना मागदर्शन करीत होते.

    याप्रसंगी प्रा. नितेश कराळे यांनी उपस्थित युवक -युवतींना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता १० वी आणि १२ वी च्या  गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.नागपूरच्या जेष्ठ कवियत्री शोभा वेले लिखीत  उन्माद विषमतेचा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

    या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी म. रा. ग्रा.पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण , विशेष अतिथी जेष्ठ अधिवक्ता अँड. पुरुषोत्तम सातपुते,स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना ( उ. बा. ठा. ) चे वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे, आनंदवन वरोरा महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, आचार्य ना.गो.थुटे, नागपूरच्या जेष्ठ कवियत्री शोभा वेले, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले आणि ट्रस्टच्या विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे उपस्थित होत्या.

    स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना ( उ. बा. ठा. ) चे वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी या प्रसंगी कार्यक्रम आयोजनासंबंधी भुमिका स्पष्ट करतांना सांगितले की,शिवसेना ( उ. बा. ठा. ) च्या माध्यमातून वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात स्पर्धा परीक्षेच्या चार टेस्ट सिरीज घेण्यात आल्या. त्या सर्व विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेविषयी अधीक ज्ञान संपादित करता यावे.यासाठी प्रा. नितेश कराळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

    ट्रस्टच्या माध्यमातून श्रध्देय बाबा आमटे आरोग्य आभियान ,विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, अनाथांची आई सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना,कै. म.ना. पावडे क्रीडा स्पर्धा योजना, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना यातून विविध सामाजिक घटकांकरीता ट्रस्टच्या वतीने केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच कोरोना संक्रमण कालावधीत ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती दिली. ट्रस्ट सदैव आपल्या पाठीशी मदती करीता तत्पर राहील. गरजवंतांनी नि :संकोचपणे ट्रस्टशी संपर्क साधावा. असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी केले.

    याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी विद्यार्थांना लक्ष निर्धारित करून  कठीण परीश्रम करण्याचे आवाहन केले. अँड. पुरुषोत्तम सातपुते यांनी प्रा. नितेश कराळे आणि रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्यांची प्रशंसा करीत , या उपक्रमातून विद्यार्थांच्या ज्ञानात निश्चित भर पडेल अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म. रा. ग्रा.पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण यांनी अध्यक्षशीय मार्गदर्शन केले.

    याप्रसंगी प्रा. नितेश कराळे,  रविंद्र शिंदे, कवियत्री शोभा वेले आणि प्रा. धनराज आस्वले  यांचा सत्कार करण्यात आला. प्रांजली परमानंद तिराणीक हिने स्वतः रेखाटलेले चित्र प्रा. कराळे यांना भेट दिले.

  • बच्चू कडू यांचा तालुकाध्यक्ष कांग्रेस पक्षात सामील

    News34

     

    चंद्रपूर ः आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर डुकरे यांच्यासह टेमुर्डा सर्कल येथील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाशी ध्येयधोरणे, पक्षसंघटन मजबूत करण्याचे आश्वासन या युवकांनी दिले. पक्षात प्रवेश करणाऱ्या या युवकांचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी काँग्रेसचा दुप्पटा देऊन स्वागत केले.

    वरोरा-भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडका सुरू केला आहे. गावागावात जाऊन तेथील गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाऊन घेत आहे. तातडीने समस्यांचा निपटारा करीत आहे. त्यांच्या या कार्याने प्रभावीत होऊन प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर डुकरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

    नुकताच पार पडलेल्या एका छोट्याखानी कार्यक्रमात किशोर डुकरे यांच्यासह टेमुर्डा सर्कलमधील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये कोसरसारचे उपसरपंच गणेश मडावी, बोरगावचे ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण देवतळे, गुंजाळ्याचे सरपंच भाऊराव चौधरी, बोरगाव तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष आकाश धवने, संदीप वासेकर, निखिल तिखट, अनिकेत झिले, संदीप वासेकर, ओमकार कांबळे, पवन बावणे, मुनेश्वर राऊत, विशाल कापरे, विनोद दडमल, आकाश डाखरे, आकाश डावणे, यशश्री आस्वले, प्रसाद मिलमिले, राहुल देठे, सतीश कनोजवार, अमोल डांबोली, प्रणय तिवारे, अमने, हर्षल चोपणे, देवाजी घोसरे, अजय ताजने, रितेश देवतळे, गिरीश वनकुटे यांच्यासह अन्य युवकांचा समावेश होता. या युवकांनी काँग्रेसचे पक्षसंघटन वाढविण्याचे आश्वासन दिले.