Blog

  • सिंदेवाही येथे दुचाकी वाहनाचा अपघात

    News34

    Accident in sindewahi

    प्रशांत गेडाम

    सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावाजवळ बुधवारी 9 ऑगस्ट सकाळी 9-30 वाजताच्या दरम्यान एका दुचाकी चालकाची स्वतःच्या ताब्यात असलेल्या दुचाकी वाहना वरुन नियंत्रण सुटल्याने रसत्याचा कडेला असलेल्या खांबाला मोटरसायकल ची जोरदार धडक बसली.

    दुचाकी चालक या धडकेत गंभीर जखमी होत जागीच ठार झाला, सदरची माहिती प्राप्त होताच सिंदवाही पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. वृत्तलीहे पर्यंत दुचाकी चालकाचे नाव कळु शकले नाही.

  • 15 August : चंद्रपूर जिल्ह्यात 15 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी

    15 August चंद्रपूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे.

    राजकीय बातमी – शहरात अनियमित पाणी पुरवठा, कांग्रेसने पालिकेवर काढला घागर मोर्चा

    15 august या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

    सदर आदेश 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

  • चंद्रपुरातील इरई नदीच्या काठी संरक्षण भिंतीचे निर्माण होणार

    News34

    चंद्रपूरात वारंवार उद्भवत असलेल्या पूर परिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या इरई नदी काठी पूर सरंक्षण भिंतीच्या बांधकाम प्रस्तावास तात्काळ मंजूरी प्रदान करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेत केली आहे.

    अल्पशा पावसाने चंद्रपूरात वारंवार पुरपरिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या भागात जिवीतहाणी होण्याची शक्यताही बढावली आहे. त्यामुळे आता याचे योग्य नियोजन करुन भविष्यात उद्भवणा-या पूरपरिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. सदर विषय आमदार किशोर जोरगेवार यांनी उचलून धरला असून पावसाळी अधिवेशनातही त्यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधत यावर कायमस्वरुपी उपायोजना करण्याची मागणी केली होती.

    चंद्रपूर शहराच्या पश्चिमेला वाहणाऱ्या इरई नदीकाठा जवळील परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पावसाळयात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी या सखोल नागरी भागात शिरत आहे. सन २००६, २०१३ आणि २०२२ तसेच या वर्षी सुद्धा या भागात पुरपरिस्थीती निर्माण झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील घरांचे नुकसान होवून वित्तहानी झाली आहे. दरवर्षी सखोल भागात पूर परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पुरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
    या विषयाची गंभीरता लक्षात घेत राज्य शासनानेही पुरसंरक्षण भिंत बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्याबाबतचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले असून तसा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.

    पडोली पूल ते चौराळा पुलाचे अंतर ७ किमी असून नदीच्या समांतर डाव्या बाजूस चंद्रपूर शहराची लोक वस्ती आहे. या संपूर्ण लांबी मध्ये पूर संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे,
    सदर पूर संरक्षण भिंत बांधकाम बाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती चंद्रपूर यांच्या सभेत शासनातर्फे निर्देश दिल्यानुसार प्राधिकरणाची मान्यता घेऊन दिनांक 23.12.2022 रोजीच्या 24 कोटी 94 लक्ष 13 हजार 237 रुपये या रक्कमेत आवश्यकतेनुसार बदल करत सुधारित रक्कम 49, कोटी 34 लक्ष 19 हजार, 908 रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन तो शासनास सादर करण्यात आला आहे.

    आता मदत व पूनर्वसन विभागानेही या प्रस्तावास मंजुरी प्रदान करावी यावी अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार त्यांनी मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना केली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची ना. अनिल पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

  • वरोरा पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत

    News34

    चंद्रपूर /वरोरा – 7 ऑगस्ट ला अत्याचारग्रस्त महिलेने वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन करीत खळबळ माजवून टाकली होती, त्या घटनेनंतर 8 ऑगस्ट ला पुन्हा एका महिलेने पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन केल्याची घटना घडली मात्र त्या महिलेने बनाव केल्याचे उघडकीस आले.

    वरोरा तालुक्यातील 48 वर्षीय अर्चना दिवाकर दिवटे ही महिला सायंकाळच्या सुमारास वरोरा पोलीस स्टेशनमध्ये पोहचली, आमच्या शेतात चाफले नामक व्यक्तीने खांब लावले त्यांच्यावर कारवाई करावी याबाबत 4 दिवस आधी तक्रार दिली होती, मात्र त्याच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने ती महिला आज विष सोबत घेत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली, शौचाच्या बहाण्याने त्या महिलेने पिशवीतून बॉटल काढत तिने विष प्राशन केले.
    अचानक झालेली ही घटना बघून पोलीस विभाग सतर्क झाले.

    तात्काळ त्या महिलेला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्या महिलेने तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरला रोखले, पोलिसांना संशय आला असता त्यांनी त्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना विचारणा केली असता आम्ही कालच्या घटनेला प्रेरित होऊन हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.

    सदर माहिती मिळाल्यावर पोलिसही अवाक झाले, याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांनी माहिती दिली की सदर महिलेच्या प्रकरणात पोलिसांची कसलीही भूमिका नव्हती, रुग्णालयात गेल्यावर जेव्हा त्या महिलेने डॉक्टरला तपासणी करू दिली नाही तेव्हा आम्हाला संशय आला होता, विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे.

    पिशवीत जी बॉटल त्या महिलेने आणली होती त्यामध्ये काही नव्हते, सध्या त्या महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
    त्या महिलेने हा बनाव का केला याबाबत तपास करीत रीतसर कायदेशीर प्रक्रियेने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नोपाणी यांनी दिली

    वरोरा पोलीस उपविभागात भापोसे sdpo म्हणून आयुष नोपाणी हे रुजू झाल्यावर त्यांनी अनेकांवर कारवाईचा धडाका लावला होता, सध्या वरोरा येथील सर्व अवैध धंद्यावर नोपाणी यांनी चाप बसविला आहे.

    त्यांच्या प्रामाणिक भूमिकेला काहीजण विरोध करीत पोलीस विभागाला बदनाम तर करीत नाही ना अशी चर्चा सध्या जनमानसांत सुरू आहे.

     

  • देशातील 7 विधानसभा जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा

    News34

    नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 7 विधानसभा जागेवर पोटनिवडणूकी ची घोषणा केली आहे.

    यामध्ये झारखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या जागेचा समावेश आहे.

    मात्र चंद्रपूर व पुणे लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूक बाबत निवडणूक आयोगाने काही एक घोषणा केली नाही, ज्यामुळे राज्यातील 2 लोकसभा जागेची निवडणूक होणार नाही याबाबत सध्यातरी संभ्रम आहे.

    देशातील 7 जागेवर 5 सप्टेंबर ला विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे, सध्या वर्षांपेक्षा कमी कालावधी लोकसभा निवडणुकीला बाकी आहे.

    भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचं 29 मार्च 2023 ला निधन झाले होते, ते पुणे लोकसभा क्षेत्राचे खासदार होते, चंद्रपूर लोकसभा व राज्यातील कांग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं 30 मे 2023 ला निधन झाले होते.

    पोटनिवडणूक होणार की नाही यावर संभ्रम होता मात्र आज निवडणूक आयोगाने 7 विधानसभा पोटनिवडणूकीची घोषणा केल्यावर चंद्रपूर व पुणे लोकसभा पोटनिवडणूक त्यामधून वगळली आहे.

  • त्या 33 कोटीचे काय? – आमदार धानोरकर

    News34

    चंद्रपूर : राज्यातील जि.प. अंतर्गत 2019 व 2021 मध्ये पद भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली. सदर पद भरतीकरीता अनेक बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करुन परीक्षा शुल्क भरले. परंतू, वरील दोन्ही परीक्षा शासनाने रद्द केल्या. त्यामुळे बेरोजगार तरुणांची सरकारकडे तब्बल कोट्यवधींची उधारी झाली. या अनेक बेरोजगारांनी भरलेले परीक्षा शुल्क शासनाने परत करावेत, अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे.

    ३३ कोटी ३९ लाख ४५ हजार २५० रुपये इतकी रक्कम राज्य सरकारकडे थकलेली आहे. जिल्हा परिषदांच्या भरतीमुळे बेरोजगारांची सरकारकडे कोट्यवधी रुपयांची उधारी थकली आहे. भरतीकरीता अनेक बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करुन परीक्षा शुल्क भरले. परंतू वरील दोन्ही परीक्षा शासनाने रद्द केल्या. परंतू अनेक बेरोजगारांनी भरलेले परीक्षा शुल्क शासनाने परत केले नाही. सन 2023 रोजी सर्व जि.प. अतंर्गत पद भरतीचे जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून, सन 2019 व 2021 मध्ये ज्या बेरोजगार तरुणांनी विविध पदासाठी परीक्षा शुल्क भरलेले आहते. तेच परीक्षा शुल्क ग्राह्य धरुन सन 2023 च्या पदभरतीत सदर तरुणांना समाविष्ठ करुन घ्यावे. सोबतच वयोमर्यादा ओलांडलेल्या किंवा परीक्षा न देऊ इच्छीनाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क तात्काळ परत करण्यात यावे,अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

    जिल्हा परिषदमार्फत 2019 आणि 2021 भरती जाहिरातीनुसार विविध पदांसाठी अर्ज केले होते. या पदांसाठीच्या परीक्षा अचानक रद्द झाल्याने इच्छुक उमेदवार आर्थिक संकटात सापडले आहेत. हजारो बेरोजगार तरुणांनी या भरतीच्या जाहिरातींवर आशा ठेवल्या होत्या. भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक उमेदवारांनी परिश्रमपूर्वक अर्ज केला आणि आवश्यक परीक्षा शुल्क देखील भरले, ज्याची रक्कम एकत्रितपणे बऱ्यापैकी होती. मात्र, सरकारने अनपेक्षितपणे दोन्ही परीक्षा प्रक्रिया रद्द केल्याची घोषणा केल्याने त्यांच्या आशा-आकांक्षांना तडा गेला. भरती रद्द केल्याने गंभीर परिणाम झाले आहेत, अनेक उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरण्यासाठी विविध स्त्रोतांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले असल्याचे उघड झाले आहे. या अनपेक्षित आर्थिक भारामुळे त्यांना कर्जाच्या खाईत लोटले आहेत.

    आमदार प्रतिभा धानोरकर यांनी त्रस्त उमेदवारांच्या हक्कासाठी कठोर भूमिका घेतली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून बेरोजगार उमेदवारांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी केली आहे. धानोरकर यांनी बेरोजगारांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला असून, रद्द झालेल्या परीक्षांमुळे आर्थिक चणचणच असलेल्या तरुणांना परतावा देण्याची मागणी केली आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील मूल उपजिल्हा रुग्णालयाचा होणार कायापालट

    News34

    चंद्रपूर : जिल्ह्यात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याचीच फलश्रुती म्हणून मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले असून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आता विशेष बाब म्हणून 100 खाटांचे करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

    मुलमध्ये 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे.या रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी 100 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती.

    ना.मुनगंटीवार यांनी  मुलच्या व आसपासच्या नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी सातत्याने पाठपूरावा केला होता.आता या पाठपुराव्याला यश आले असून मुल उपजिल्हा रुग्णालय विशेष बाब म्हणून 100 खाटांचे करण्यासाठी शासनाने 3 ऑगस्ट 2023 रोजी मान्यता दिली आहे.

    उपजिल्हा रुग्णालयात या सुविधा होणार उपलब्ध: सद्यस्थितीत मूल येथील उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे आहे. श्रेणीवर्धनामुळे अतिरिक्त  50 बेड निर्माण होतील. त्यामुळे 100 खाटा करिता लागणारी नवीन पदनिर्मिती होईल. यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी, परिचारिका, तांत्रीक पदे यांच्यासोबतच विशेषतज्ञांची सुद्धा पदे निर्माण होतील.

    श्रेणीवर्धनामुळे नेत्रतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, भूलतज्ञ यासारख्या सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नवीन पदे निर्माण होतील. तसेच शंभर खाटांची नवीन इमारत तयार झाल्यानंतर या ठिकाणी नवीन विशेष उपचार कक्ष स्थापित करण्यात येतील व सर्व प्रकारच्या विशेषज्ञ सेवा पुरविता येणे शक्य होणार आहे.

    या ठिकाणी डोळ्यांच्या व अस्थिरोग शस्त्रक्रियासाठी नवीन शस्त्रक्रियागृह निर्माण होईल. नव्याने कार्यान्वित होणाऱ्या विशेषउपचार कक्षाकरिता आधुनिक  वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्री उपलब्ध होतील. तसेच आरोग्य सेवा व सुविधांमध्ये वाढ होईल. या ठिकाणी डिजिटल सोनोग्राफी तसेच एक्स-रे आणि सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या होतील.

    100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक तसेच बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्रतज्ञ, सर्जन, भूलतज्ञ  आणि इतर वैद्यकीय अधिकारी अशी मिळून 14 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे निर्माण होतील. त्यामुळे सर्व आरोग्य सुविधा मिळणार असल्याने नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही.

  • मॉक ड्रिल करणे पोलीस विभागाच्या अंगलट

    News34

    Mock drill news

    धुळे – विविध घटना व गोष्टीवर पोलीस दल पूर्व तयारी म्हणून मॉक ड्रिल करीत चाचपणी करतो, राज्यातील धुळे शहरात देवपूर भागातील श्री स्वामी नारायण मंदिरात केलेल्या दहशतवादी मॉक ड्रिल चाचपणी पोलीस विभागाच्या अंगलट आली.

    पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा फोन वाजला शहरातील श्री स्वामींनारायन मंदिरात दहशतवादी शिरले, पोलीस दल पोहचले, त्यावेळी खोटा दहशतवादी बंदुकीच्या धाकावर नागरिकाला ओलीस ठेवले.

    हा प्रकार बघून मंदिर परिसरात असलेल्या एका नागरिकाने दहशतवाद्यांची भूमिका साकारणाऱ्याला पोलिसांसमोर चोप दिला.

    ज्यावेळी दहशतवादी मंदिर परिसरात शिरले तेव्हा फायरिंग च्या आवाजाने महिला घाबरल्या, लहान मुले रडू लागले, हा प्रकार बघून एक नागरिक संतापला व त्याने दहशतवादी यांच्याकडे असलेल्या बंदुकीला न घाबरता त्याला चोप दिला.

    पोलिसांनी लगेच त्या इसमाला ताब्यात घेत हा ट्रेनिंग चा एक भाग असल्याचे सांगितले, नागरिकांना मॉक ड्रिल असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

  • मिशन इंद्रधनुष्य 5.0 लसीकरण मोहिमेला सुरुवात

    News34 गुरू गुरनुले

    मुल – सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम मिशन इंद्रधनुष्य ५.० या कार्यक्रमाचे उद्घघाटन विधानसभा आमदार प्रतिनिधी ( आरोग्य विभाग) माजी नगरसेवक चंद्रकांत आष्टनकर यांचे शुभहस्ते करुन करण्यात आले.

    उदघाटन झाल्यावर या मिशन इंद्रधनुष्य मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मिशन इंद्रधनुष्य मधे लसीकरण सुटलेले बालके ६६ व १७ गरोदर माता यांचे लसीकरण करण्याकरिता वॉर्ड नंबर १४ येथे लसीकरण सत्र आयोजित करून गरोदर माता व बालकांना लस देण्यात आली. व त्याची नोंद संगणक परीचालकाच्या मदतीने U-win portal वर करण्यात आली.

    मिशन इंद्रधनुष्य लसीकरण सत्र उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी जी. लाडे ,श्रीमती प्रीती तलोधिकर परिसेविका, श्रीमती वंदना कीलनाके, एएनएम व कू.वैशाली रामटेके स्टाफ नर्स ,श्री गौरव मुपडवार संगणक परिचालक, यांचेसह रुग्णालयातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. या मिशन इंद्रधनुष्य लसीकरणाचा लाभ अनेक बालकांनी गरोदर मातानी घेतला.

  • चाऱ्याची पौष्टीकता वाढवण्यासाठी युरियाची प्रक्रिया फायदेशीर

    News34 गुरू गुरनुले

    मुल – चामोर्शी तालुक्यातील कुरूड येथे केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शीच्या विदयार्थीनींनी रविवार ६ ऑगस्ट ला जनावराच्या चाऱ्यावर यूरिया ची प्रक्रिया गावातील शेतकऱ्यांना करून दाखवली आणि त्याचे महत्त्व कळवून दिले.

    काही भागात पावसाच्या कमतरतेमुळे जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड असते अशा वेळी जनावरांना वाळलेल्या चाऱ्या वरती रहावे लागते. सध्या चाऱ्याची किंमत सुद्धा जास्ती आहे त्यामुळे आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरीया प्रक्रिया महत्त्वाची आहे.

    युरीया प्रक्रियेच्या वेळी कुरुड येथील विनोद मडावी, राकेश मुरकुटे, दिपक भांडेकर, विलास सातपुते, देवराव सातपुते हे शेतकरी उपस्थित होते. हा उपक्रम माननीय प्राचार्य डॉ. आदित्य कदम, सहा. प्रा. छबील दुधबळे -सहा. प्रा. तुळशीदास बारसकर, सहा प्रा. श्रीकांत सरदारे, सहा प्रा. पवन बुधबावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.

    यावेळी विद्यार्थीनी वैष्णवी बुध्देवार, वैभवी पोफळी , गौरी चौधरी, श्रुतीका लोहकरे आणि तृप्ती घटे उपस्थित होते.

    फायदे

    १) चाऱ्याची गुणवत्ता वाढवते
    २)युरीया व गुळाची प्रक्रिया केल्यास चाऱ्याचा सकसपणा व पचनियता वाढवता येते
    ३) जनावरांच्या दुध उत्पादनात वाढ होते.
    4) जनावरांचे आरोग्य चांगले राहते.