बातमी का प्रकाशित केली म्हणून पत्रकाराला भर चौकात मारहाण

News34

जळगाव – जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती.

त्यांनतर सदर प्रकरण राज्यभर गाजले, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत व्हिडीओ कॉल द्वारे मुख्यमंत्री शिंदे सोबत कुटुंबांचा संवाद घडवून आणला, त्यावेळी सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली होती, मात्र त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी काही न म्हणता मी पोलिसांसोबत बोलतो असे म्हणत फोन ठेवला.

सदर बाब पत्रकार संदीप महाजन यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी या आशयाची बातमी चालविली.

त्या बातमीने शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील संतप्त झाले, त्यांनी संदीप महाजन यांना कॉल करीत कुठे राहतो, तुझे हात-पाय तोडतो असे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळ केली.

पत्रकाराला शिवीगाळ करणारी क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असता तो आवाज माझाच असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले, त्यानंतर पत्रकार संदीप महाजन यांना भर चौकात मारहाण करण्यात आली.

क्या चौकात संदीप महाजन यांना मारहाण करण्यात आली त्या चौकाचे नाव पत्रकार महाजन यांचे वडील स्वातंत्र्य सैनिकांच्या नावावर आहे.

बातमीमधील सत्यता प्रकाशित केली म्हणून गुंडांनी पत्रकाराला भर चौकात मारहाण केली, आमदार पाटील यांच्या गुंडांनी मला मारहाण केली असा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *