Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • Maharashtra Inter University Sports Festival | “चंद्रपूर होणार क्रीडा हब! केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची मोठी घोषणा”

    Maharashtra Inter University Sports Festival

    Maharashtra Inter University Sports Festival : राज्याच्या टोकावर असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांबद्दल काहीतरी वेगळेच ऐकायला येते. मात्र येथे आल्यावर जाणवते की, विकासाच्या क्षेत्रात हा भाग राज्याच्या इतर भागापेक्षा कितीतरी पुढे आहे. क्रीडा क्षेत्राच्या सोयीसुविधा सुद्धा येथे अतिशय चांगल्या आहेत. त्यामुळे राज्यात चंद्रपूर हे खेळाचे उत्कृष्ट केंद्र करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

    चंद्रपुरात फ्लाईंग क्लबचे उदघाटन

    गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या वतीने विसापूर येथील क्रीडा संकुल येथे आयोजित 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू श्रीराम कावळै, कुलसचिव डॉ. अनिल विरेखण, डॉ. श्याम खंडारे, अनिता लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते. (Maharashtra University Games)

    Maharashtra University Games

    या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निमंत्रणावरून चंद्रपूर येथे पहिल्यांदाच येण्याचा योग आला, असे सांगून क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या युगात मैदानी खेळ, खेळणे आवश्यक आहे. मोबाईलच्या जगातून बाहेर निघून विद्यार्थी, तरुण-तरुणी आणि नागरिकांनी रोज किमान दोन तास रोज खेळावे. खेळामुळे आपले शारीरिक आणि मानसिक उत्कृष्ट राहण्यास मदत होते.

    2036 मध्ये होणा-या ऑलंपिक स्पर्धेत चंद्रपूर आणि गडचिरोली या भागातील खेळाडू ऑलिंपिक मध्ये खेळावे, असा प्रयत्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा आहे. त्यासाठी क्रीडा राज्यमंत्री म्हणून नक्कीच प्रयत्न केला जाईल. तरुणांनी क्रीडा हे क्षेत्र करियर साठी निवडावे. या महोत्सवात कबड्डी, खो खो,  व्हॉलीबॉल,  बास्केटबॉल,  बॅडमिंटन, टेबल टेनिस, अ‍ॅथलेटिक्स व बुद्धिबळ असे 8 क्रीडा प्रकार समाविष्ट आहेत. (Chandrapur Olympic Players)

    क्रीडा महोत्सवाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, हा उपक्रम सरकारच्या क्रीडा धोरणाला ग्रामीण आणि शहरी पातळीवर प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे. तसेच भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी केंद्र सरकार अशा क्रीडा उपक्रमांना भक्कम पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहे. हा महोत्सव केवळ खेळांसाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांना एकत्रित आणून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा एक अनोखा उपक्रम ठरणार आहे, असेही केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले. (University Level Sports in Maharashtra)

    प्रास्ताविकात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू श्रीराम कावळे म्हणाले, राज्यातील विविध विद्यापीठामधून जवळपास 3500 खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक असे एकूण 4 हजार नागरिक येथे आले आहेत. चंद्रपूर – गडचिरोली ही व्याघ्र भुमी आहे. या भुमीत सर्व खेळाडूंचे मी विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो.

    तत्पुर्वी खेळाडूंनी पथसंचलनातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडा ज्योत प्रज्वलन आणि खेल भावना शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे संचालन शिल्पा आठवले यांनी तर आभार कुलसचिव डॉ. अनिल विरेखण यांनी मानले.

  • District sports awards | क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलीय का?

    District sports awards

    District sports awards : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, दरवर्षी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू (महिला, पुरुष व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिले जातात.

    चंद्रपुरात भीषण अपघात, 3 जण ठार

    त्याअनुषंगाने, सन 2024-25 करिता जिल्हयातील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता (krida purskar) अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो. क्र. 9423673232) यांचेकडे उपलब्ध आहे. सदर अर्ज 15 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. उशीरा येणारे अर्ज स्विकारले जाणार नाही.

    चंद्रपुरात 804 नागरिकांनी मोडले वाहतुकीचे नियम

    अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रात 10 वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे. अर्जदाराने वयाची 35 वर्ष पुर्ण केलेले असावे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत खेळांमध्ये प्रतिनिधीत्व केलेले असावे.

    अर्ज करतांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय दि. 14 डिसेंबर 2022 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कार नियमातील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. सर्व पुरस्कारांमध्ये प्रत्येकी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु. 10 हजार या बाबींचा समावेश आहे. पुरस्काराकरिता निवड झालेल्या युवकांना दि. 26 जानेवारी रोजी होणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

  • Olympics 2036 : चंद्रपुरात विदर्भस्तरिय बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन

    Olympics 2036

    Olympics 2036 : चंद्रपूर – प्रयत्नांना सातत्याची जोड दिली तर असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते. माझ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात खेळणाऱ्या तरुण-तरुणींची मोठी फौज आहे. त्यांना मुबलक सुविधा, उच्च प्रतीचे स्टेडियम मी मिळवून देईन. २०३६ च्या ऑलम्पिक स्पर्धांमध्ये मला चंद्रपूर आणि गडचिरोलीचे वाघ बघायचे आहेत, अशी अपेक्षा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी (बुधवार) व्यक्त केली. चंद्रपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

    1 जानेवारी पासून बदलणार हे नियम

    चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन व जी.एच. रायसोनी मेमोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे चंद्रपूरचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपविभागीय अधिकारी संजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, मनोज सिंघवी, लक्ष्मीकांत आर्के, संस्थेचे सचिव ज्यो एलजी चांदेकर, विश्वास देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    Badminton tournament

    यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी तरुणांना प्रोत्साहित केले. आमदार मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूरचा सी चॅम्पियनचा व्हावा. जीवनात यश-अपयश, जय-पराजय येत असतो; परंतु खरा स्पर्धक तोच आहे जो पराजयानंतरही विजयासाठीचे प्रयत्न सोडत नाही. मला विश्वास आहे विदर्भातील संस्कारानुसार तुम्ही सर्व बॅडमिंटनचा उत्तम खेळ दाखवाल.’

    चंद्रपुरात वादळी पावसाचा अंदाज

    भारत देशासारख्या बलाढ्य देशाचा ऑलिम्पिकबाबत जेव्हा विचार केला जातो तेव्हा खंत वाटते. अमेरिकेने 1900 सालापासून 2020 पर्यंत म्हणजे 120 वर्षांत 2520 आणि रशियाने 1222 पदके पटकावली. तोपर्यंत आम्ही फक्त 28 पदके जिंकू शकलो. मागच्याही ऑलिम्पिकचा विचार केला तर त्यात सातच पदकांची भर पडली. म्हणजे आतापर्यंत फक्त 35 पदकांपर्यंत आपण पोहोचू शकलो. म्हणूनच हे निराशादायी चित्र बदलण्यासाठी मी अर्थमंत्री असताना शेवटच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्टेडियम व्हावे अशी घोषणा केली. प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक स्टेडियमचे बांधकाम झालेच पाहिजे, असा आग्रह होता, याचा आ. श्री. मुनगंटीवार यांनी उल्लेख केला.

    ऑल्पिम्पिकमध्ये भारताची ध्वजा उंचावणारा राजवर्धन राठोड याने केवळ पाच वर्षांच्या प्रयत्नात नेमबाजीत यश मिळवले. हेच यश तुम्हाला कमवायचे आहे. सर्वाधिक वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांनी वाघांसारखी कारकीर्द घडवली पाहिजे. शक्तिदायिनी माता महाकालीचा आशीर्वाद तुमच्यावर आहेत, असे सांगत आ. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

    sudhir mungantiwar

    इनडोअर स्टेडियम करणार
    आगामी काळात चंद्रपूर जिल्हा सुविधांनी सुसज्ज करणार असून, वर्षभरात 4500 लोकांना बसता येईल एवढ्या क्षमतेचे इनडोअर स्टेडियम साकारणार असल्याचे आ. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट पाहिल्यानंतर त्या चित्रपटाच्या नायकाला भेटलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, तुम्ही लक्ष्य निश्चय केले तर तुमचे यश कुणी रोखू शकणार नाही. त्यामुळे लक्ष्य निर्धारित करा. एअर कंडिशनरसाठी सोलर पॅनलची व्यवस्था करणार असून, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे आ. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

  • T20 Cricket : चंद्रपुरातील वरून ची अंडर19 क्रिकेट मध्ये निवड

    T20 cricket

    T20 cricket चंद्रपूर येथिल वरून सादमवार हा 17 वर्षीय मुलगा दशरथ फौंडेशन फिजिकल सेंटरमध्ये गेल्या काही वर्षांपासून फिजिकल फिटनेसचा सराव करीत होता त्याचच फळ त्याला मिळालं आणि आज अंडर 19 मध्ये सिलेक्शन झालं.

    बुद्धीरूपी मूर्तीची प्रतिष्ठापना


    चंद्रपूर येथील राहणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणाने मारली महाराष्ट्र t20 क्रिकेटमध्ये मजल मारली.


    नोव्हेंबरमध्ये झालेल्या आग्रा येथील टी20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित 14 वी ऑल इंडिया C.S.M ट्राफीमध्ये वरून सादमवार याची निवड महाराष्ट्र स्काड B मध्ये करण्यात आली होती. त्याच्या समोरील वाटचालीस टीम D दशरथ कडून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

    नझुल जमीन धारकांसाठी विशेष अभय योजना


    यावेळी त्याने आपल्या यशाचे श्रेय त्यांचे फिजिकल कोच दर्शन मासिरकर आणि आपल्या आई वडिलांना दिले.

  • IPL Final Match : KKR तिसऱ्यांदा विजेता

    IPL Final Match : KKR तिसऱ्यांदा विजेता

     

     

  • Chandrapur Lok Sabha BJP Candidate? : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार म्हणून कुणाचं नाव चर्चेत?

    Chandrapur Lok Sabha BJP Candidate? : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार म्हणून कुणाचं नाव चर्चेत?

    चंद्रपूर – Chandrapur Lok Sabha BJP Candidate? लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता कोणत्याही क्षणी देशात लागू शकते, त्याआधी राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे.

    नुकतेच भारतीय जनता पार्टी ने 195 लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली मात्र त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकाही जागेचा उल्लेख नाही, कारण राज्यातील महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही,  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्याच्या दौऱ्यावर असून आज याबाबत महत्वाची बैठक आहे, त्यानंतर पुढील 2 दिवसात राज्यातील लोकसभा उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार.

    सध्या भाजपची संभाव्य यादी समाजमाध्यमावर फिरत आहे त्यामध्ये चंद्रपूर लोकसभेतून पालकमंत्री मुनगंटीवार यांचे नाव आहे.

    चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी भाजप (Chandrapur Lok Sabha BJP Candidate?) कुणाला देणार यावर सध्या संभ्रमाची स्थिती आहे, सध्या राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, मात्र लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांनी आपली इच्छा नाही हे जाहीर केले पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढू असे वक्तव्य त्यांनी केले होते.
    दुसऱ्या बाजूला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले हंसराज अहिर यांच्याही नावावर भाजप पक्ष श्रेष्ठी विचार करीत आहे.

    सध्या अहिर हे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहे, त्यांचा खासदारकीचा अनुभव चांगला आहे, त्यांनी अनेक मोठे घोटाळे उघड करीत UPA सरकारला अडचणीत आणले होते, 2019 मध्ये झालेल्या पराभवात त्यांच्या मतांमध्ये वाढ झाली होती हे विशेष.

     

    त्यांनी अनेकदा जाहीर सभेत 2019 च्या निवडणुकीत माझा पराभव झाला नसून तो भाजप पक्षाचा झाला असे त्यांनी व्यक्त केले होते.

    सध्या हंसराज अहिर हे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात नित्याने जात आहे, त्यांचा लोकसभा क्षेत्रातील जनसंपर्क दांडगा आहे.
    सध्या चंद्रपूर कांग्रेस मधून लोकसभा जागेवर धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असे वातावरण आहे, दोघांनीही लोकसभा उमेदवारी पक्ष श्रेष्ठीला मागितली आहे, कांग्रेसच्या गटबाजीचा फायदा भाजपला नक्की होणार.

     

    भाजप पक्षातर्फे जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे, मात्र दोघांच्या भांडणात तिसऱ्याची एंट्री होणार ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
    कारण भाजप ला लोकसभा निवडणुकीत आता विजय हवा, पक्षांतर्गत कलह ते सहन करणार नाही.

    यासाठी बाहेरून एक उमेदवार चंद्रपूर भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढवु शकतो, त्याबाबत त्या नेत्याने तयारी सुद्धा दर्शविली आहे.

     

    येणाऱ्या काळात कांग्रेस व भाजप पक्षातील अंतर्गत कलह लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांना दिसणारचं.
    जर भाजपने चंद्रपुरातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्याला उमेदवारी घोषित केली तर पराभव अटळ आहे.

    विशेष म्हणजे दोघात तिसरा आता सर्व विसरा यासाठी सुद्धा चंद्रपुरातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी तयार रहावे. कारण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत दोघांच्या भांडणात नागपुरच्या नाना श्यामकुळे यांना भाजप पक्षाने चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी दिली होती, आता लोकसभा निवडणुकी पूर्वी काय उलथापालथ होणार हे येणारी वेळचं सांगेल.

  • Shortage of sand in Chandrapur : घरकुल बांधकामासाठी प्रशासनाने वाळू उपलब्ध करून द्यावी – संदीप गिर्हे

    Shortage of sand in Chandrapur : घरकुल बांधकामासाठी प्रशासनाने वाळू उपलब्ध करून द्यावी – संदीप गिर्हे

    Shortage of sand in Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्ष भरापासून रेती घाटाचे लिलाव न झाल्याने नागरिकांचे मंजूर घरकुलाचे बांधकाम रेती न मिळाल्यामुळे अडचणीत आले आहे, निदान शासनाने पुढाकार घेत घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

     

    विविध नियमात जिल्ह्यात वाळू घाट अडकले आहे, वाळू घाटाचे लिलाव झाले, त्याबाबत टेंडर सुद्धा झाले मात्र अजूनही सदर निविदा उघडण्यात आल्या नाही, त्यामुळे घरकुलाचे काम पूर्णतः बंद करण्यात आले, प्रशासनाने घरकुल मंजूर केले, आधी बांधकाम सुरू झाले मात्र वाळू बंद झाल्याने घराच्या कामात अडथळा आला. Shortage of sand in Chandrapur

     

    घरकुल मंजूर झालेले नागरिक गरीब कुटुंबातील असल्याने ते भाड्याच्या घरात राहू शकत नाही, शासनाने ताबडतोब नागरिकांना घराचे बांधकाम करण्यासाठी रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना संदीप गिर्हे यांनी केली आहे.

     

    सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर क्षेत्रात वाळूचे स्टॉक विकण्याची परवानगी प्रशासनाने त्यांना दिली आहे मात्र चंद्रपूर, राजुरा, मूल, वरोरा या ठिकाणी प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली, एकीकडे न्याय तर दुसरीकडे अन्याय अशी पॉलिसी जिल्हा प्रशासनाची दिसून येत आहे.

  • Labor Movement : चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात

    Labor Movement : चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात

    Labor Movement 30 टक्के वेतनवाढ, समान काम समान वेतन NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा प्रदान करा अश्या प्रमुख मागण्यांसाठी वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनि 5 मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचे दंड प्रशासनाविरोधात थोपटले आहे.

    महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार मागील 15 ते 20 वर्षांपासून काम करीत आहे, कामगारांनी विविध माध्यमातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कामगारांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे 28 कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 ची स्थापना केली.

    अवश्य वाचा : 10 वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम अपूर्ण

    Labor movement समितीतर्फे सर्व वीज कंत्राटी कामगारांना 30 टक्के वेतनवाढ, nmr च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा व समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसाठी 9 फेब्रुवारीपासून टप्प्यात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

    5 मार्च ला मध्यरात्री पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला होता, त्यानुसार आज सकाळी 10 वाजतापासून चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रासमोर राष्ट्रवादी नगर येथे वीज कामगारांनी बेमुदत कामबंद धरणे आंदोलनाला सुरुवात केली.
    जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. कामगारांनी आपल्या हिताच्या व हक्काच्या मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे, आपल्याला समान वेतन मिळावे अशी त्यांची रास्त मागणी प्रशासनाकडे आहे, मात्र त्यांच्या मागणीवर प्रशंसान कानाडोळा करीत आहे.

  • Modi government cheated women : मोदी सरकारने महिलांची फसवणूक केली – नम्रता आचार्य ठेमस्कर

    Modi government cheated women : मोदी सरकारने महिलांची फसवणूक केली – नम्रता आचार्य ठेमस्कर

    चंद्रपूर – Modi government cheated women अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या निर्देशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष संध्या ताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 3 मार्च ला येथिल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात ‘नारी न्याय संमेलन’ तथा चंद्रपूर महिला काँग्रेस (ग्रामिण) ची आढावा बैठक पार पडली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रे मध्ये नारी न्याय हा महत्वपूर्ण मुद्दा आहे, त्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये महिला काँग्रेस तर्फे नारी न्याय संमेलन आयोजित करण्यात येत आहे, त्याच पार्श्वभूमीवर आज चंद्रपूर महिला काँग्रेस तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     

    या कार्यक्रमात जेष्ठ अधिवक्ता वर्षा जामदार यांनी महिलांचे हित जोपासणाऱ्या कायद्याची माहिती उपस्थित महिलांना दिली. यावेळी महिला काँग्रेस मध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजवणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आले या मध्ये प्रामुख्याने अनुसूचित विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, शहर अध्यक्ष चंदा वैरागडे तसेच माजी नगरसेविका विना खनके, सकिना अन्सारी यांचा समावेश होता. महिला काँग्रेस ला नेहमी सहकार्य करणाऱ्या घुगूस शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

     

    कार्यक्रमाच्या अध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी नारी न्याय संमेलना बद्दल ची माहिती उपस्थित पदाधिकार्यांना दिली. तसेच केवळ काँग्रेस पक्षच महिलांचे हित जोपासू शकतो, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मुळेच महिलांना पंचायत राज मध्ये 33% आरक्षण मिळाले. भाजपने मात्र महिला आरक्षणाच्या नावाखाली महिलांची फसवणूक केली (Modi government cheated women) अशी सडेतोड टीका ठेमस्कर यांनी यावेळी केली.

    या कार्यक्रमाला महिला काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष,शहर अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा महासचिव, जिल्हा सचिव तसेच इतर सर्व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

     

    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर महिला काँग्रेस च्या तालुका अध्यक्ष शीतल कातकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष लता बारापात्रे, जिल्हा उपाध्यक्ष शोभा वाघमारे, लता निंदेकर, जिल्हा महासचिव मीनाक्षी गुजरकर,मेहेक सय्यद, संगीता मित्तल, नेहा मेश्राम, सचिव सीमा धुर्वे, श्रुती कांबळे, माला माणिकपुरी, निशा धोंगडे, चंद्रपूर जिल्हा सोशल मीडिया चे अध्यक्ष मुन्ना तावाडे,इन्जी नरेन्द्र डोंगरे,शिवाजी गोरघाटे,पवन जगताप,बिराज नारायणे
    महेश रंगारी,नितीन जुमडे यांनी परिश्रम घेतले.

  • Chandrapur Tadoba Festival concludes : नागरिकांचे सहकार्य आणि शुभेच्छांनी ताडोबा महोत्सव यशस्वी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur Tadoba Festival concludes : नागरिकांचे सहकार्य आणि शुभेच्छांनी ताडोबा महोत्सव यशस्वी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर – Chandrapur Tadoba Festival concludes महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे प्रगतीच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा नेहमी अग्रेसर असावा, असा आपला प्रयत्न आहे. जगप्रसिद्ध असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा, म्हणून येथे तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

     

    या महोत्सवाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्यामुळे हा महोत्सव यशस्वी झाला. ताडोबा महोत्सवामुळे चंद्रपूरची ख्याती संपूर्ण जगात गेली, असे मनोगत राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

     

    चांदा क्लब ग्राउंड येथे राज्य शासन व वन विभागाच्या वतीने पहिला वनभूषण पुरस्कार धुळे जिल्ह्यातील चैतराम पवार यांना देण्यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला उत्तराखंडचे वनमंत्री सुबोध उन्नीयाल, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उत्तराखंडचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुप मलिक, जिल्हाधिकारी विनय गौडा, सीआयडी फेम शिवाजी साटम आदी उपस्थित होते.

     

    वाघाची भूमी असलेल्या चंद्रपूर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जगाचे केंद्र व्हावे, या उद्देशाने ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा आपला प्रयत्न आहे. गत तीन दिवसांपासून ताडोबा महोत्सव हा सोशल माध्यमांमध्ये सर्वोच्च ट्रेंडवर पोहोचला आहे. तसेच या महोत्सवाकरिता उपस्थित असलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेतील स्पर्धकांनी त्यांच्या देशातसुद्धा समाज माध्यमातून ताडोबा महोत्सवाचा प्रचार आणि प्रसार केला, ही चंद्रपूरकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

     

    पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचा वाघ आता जगात पोहोचला आहे, हे आपले यश आहे. वनांचे संरक्षण करणाऱ्यांना आजपासून वनभूषण पुरस्कार देण्यात येत आहे. आदिवासी क्षेत्रात काम करणारे चैतराम पवार यांना २० लक्ष रुपयांचा पहिला वन भूषण पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे. या महोत्सवाच्या प्रेमापोटी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे जगप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. रमाकांत पांडा, सीआयडी फेम अभिनेते शिवाजी साटम, विश्वसुंदरी स्पर्धेतील स्पर्धक आदींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे येथील नागरिकांनी ताडोबा महोत्सवाला केलेले सहकार्य हे अभूतपूर्व आहे. त्यामुळेच हा उत्सव यशस्वी होऊ शकला, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    चैतराम पवार यांना पहिला वन भूषण पुरस्कार

    आदिवासी कल्याण वनवासी आश्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरच्या १०० गावांमध्ये वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावचे चैत्राम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार ताडोबा महोत्सवात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी त्यांना २० लक्ष रुपयांचा धनादेश व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    Maharashtra vanbhushan award

    पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना चैतराम पवार म्हणाले, राज्य सरकारने या पुरस्कारासाठी तळागाळातील माणसाला शोधले. या पुरस्कारामुळे काम करण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. वनवासी कल्याण आश्रम तसेच वनविभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कामासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. १५-१६ गावांचे क्लस्टर करून सामुदायिक वन विकसित करण्याचे आमचे प्रयत्न आहे. जल, जंगल, जमीन, पशुधन या माध्यमातून शाश्वत विकास शक्य असून हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नव्हे तर खानदेशाचा गौरव असल्याचे श्री. पवार म्हणाले.

     

    विविध क्षेत्रातील मान्यवरांना / संस्थांना पुरस्कार वितरण

    ताडोबा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात विविध संस्था तसेच मान्यवरांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट ग्राम पर्यावरण विकास समिती अंतर्गत चेकबोर्डा, मारूडा, देवाडा, सातारा या गावांना पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट प्राथमिक कृतीदल पुरस्कार वायगाव, मोकासा, करवल, खातेदा, कोंडेगाव, गोंडमोहळी या गावांना, आदर्श वणवा व्यवस्थापन पुरस्कार आडेगाव, डोनी, दुधाळा, वासेरा, रानतळोदी या गावांना, ग्रामपरिस्थितीय पर्यावरणाचा उत्कृष्ट पुरस्कार मामला, आगरझरी, निंबाळा, बोर्डा या गावांना, उत्कृष्ट निसर्ग मार्गदर्शक पुरस्कार विनोद उईके, कृष्णा पाटील, मनोज भलावी, विराज राऊत यांना शाश्वत पर्यटन आणि सेवा देणारे उत्कृष्ट पुरस्कार ससारा जंगल लॉज, ताडोबा होम स्टे कॉटेज, ताडोबा टायगर व्हॅली रिसॉर्ट यांना, वन्यजीव संवर्धनासाठी सामाजिक दायित्व पुरस्कार मिटकॉन कन्सल्टन्सी, आयसीआयसीआय फाउंडेशन, हेमेंद्र कोठारी फाउंडेशन, सनफ्लॅग फाउंडेशन यांना, वन्यजीव अधिवास विकास पुरस्कार डॉ. गजानन मुरदकर, डॉ. पी.डी. कडूकर, ट्री फाउंडेशन, तरुण पर्यावरणवादी मंडळ, आणि इको – प्रो यांना, शीघ्रबचाव दल पुरस्कार डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ. कुंदन पोल, अभय मराठे, अमोल कोरपे यांना तर उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार गोलू बाराहाते, देवानंद साखरकर आणि कमलेश ठाकूर यांना देण्यात आला. तसेच यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्रीय संचालक वीरेंद्र तिवारी, नितीन काकोडकर, एस.एच. पाटील यांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    प्रश्न – चंद्रपुरात पहिला ताडोबा महोत्सव कधी आयोजित करण्यात आला होता?

    उत्तर – 1 मार्च 2024 रोजी चंद्रपुरात पहिला ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

    प्रश्न 2 – महाराष्ट्रात पहिला वनभूषण पुरस्कार कुणाला मिळाला?

    उत्तर – महाराष्ट्र राज्यात पहिला वनभूषण पुरस्कार हा चैतराम पवार, धुळे यांना मिळाला.