Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

    Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

    Hema malini चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांचे गंगा नृत्य नाटिका सादरीकरणासाठी 3 मार्चला चंद्रपुरात आगमन झाले.

    Hema malini 1 मार्चपासून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित ताडोबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

    पालकांनो लक्ष द्या : 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळ ची डबी

    यावेळी हेमा मालिनी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करीत वनाचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे अशी बाब त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    सोबतच त्यांना लोकसभा निवडणुकीची मथुरा येथून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहे. 3 दिवस चालणाऱ्या ताडोबा महोत्सवात बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी या गंगा नृत्य करणार आहे, नदीचे रक्षण कसे करावे, त्यासाठी काय उपाययोजना असाव्या याबाबत गंगा नाटिका मध्ये नृत्याद्वारे संपूर्ण विश्लेषण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 3 दिवसीय ताडोबा महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानीचा आस्वाद चंद्रपूर वासीयांना मिळणार आहे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूरच्या वाघांची विशेषतः व त्यांची ओळख जगाला व्हावी हा या कार्यक्रमा मागचा उद्देश्य आहे, ताडोबा महोत्सवाचा प्रचार प्रसार सध्या जोमात सुरू असून यासाठी सौंदर्य स्पर्धा विजेत्यांनी आपल्या देशात ताडोबा अभयारण्याचा प्रचार सुरू केला असून त्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात ताडोबाचा वाघ काय आहे? किती संख्या वाघांची आहे याबाबत परदेशी पर्यटकांना सुद्धा संखोल माहिती मिळणार.

  • VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

    VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील चांदा क्लब मैदानावर 1 ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सवाचे भव्य आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. Vip culture

     

    1 मार्च ला सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा अनुभव नागरिकांना बघायला मिळाला. Poor planning

     

    उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची तुडुंब गर्दी झाली, मात्र वनविभागाच्या कोट्यवधीच्या कार्यक्रमात नियोजनाचा अभाव दिसला, नागरिकांना बसायला जागा नसल्याने त्यांनी जमिनीवर आपले बस्तान मांडत कार्यक्रम बघितला. Tadoba Festival

     

    ताडोबा महोत्सव कार्यक्रमात VVIP, VIP, GOLD व PREMIUM असे पासेस बनविण्यात आले होते मात्र ते पास सामान्य नागरिकांपर्यंत पोहचलेचं नाही. Tadoba mahotsav

     

    याबाबत माहिती काढली असता VVIP रांगेत राजकीय पक्षाचे पुढारी बसलेले होते, VIP रांगेत नागरिक सह पत्रकार हे उभे होते, खुर्ची न मिळाल्याने अनेकजण vip रांगेत खालीच बसले. Vip Member

     

    चंद्रपूर मनपाच्या महापौर पदाचे स्वप्न बघणाऱ्या नेत्याने VVIP पासेसचा गठ्ठा जवळ ठेवला होता, त्यांनी ते vvip पासेस आपले कार्यकर्ते व प्रभागातील श्रीमंत नागरिकांमध्ये वितरण केले. भावी महापौर यांच्या या कृत्याने सामान्य नागरिकांना पासेस मिळाले नाही त्यामुळे अनेकांना कार्यक्रम बघण्यापासून मुकावे लागले. Political vip

     

    नागरिकांच्या तोंडातून यावेळी एकच उदगार निघाले “हा कार्यक्रम प्रायव्हेट लिमिटेड आहे की शासकीय?” 3 दिवस चालणाऱ्या का कार्यक्रमाचे एकूण बजेट 9 कोटी रुपये म्हणजे दर दिवसाला 3 कोटींचा खर्च, इतके वर्ष ताडोब्यात असे कार्यक्रम झाले नाही तर मग यावर्षीचं हा इव्हेंट का आयोजित करण्यात आला, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

     

    जनतेच्या करातून केल्या जाणारी कोट्यवधी रुपयांची ही मोठी उधळण सध्या चंद्रपुरात सुरू आहे. विशेष म्हणजे जनविकास सेना व्यतिरिक्त या इव्हेंट ला कुणी ही विरोध दर्शविला नाही.

     

    जनतेच्या हक्कासाठी लढणारे पक्ष आज तोंडात मृग गिळून गप्प बसले आहे, निवडणुकीच्या वेळी याना जनता आठवते मात्र नागरिकांचा काहीएक फायदा नसलेल्या भव्य आयोजनाला यांचा विरोध दिसत नाही.

     

    पोलीस विभागाने चंद्रपूर-नागपूर मार्गावरील एक रस्ताचं महोत्सवासाठी बंद केला, एकंदरीत कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाने केलेला हा अयशस्वी प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाला, मात्र त्याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षीपासून सुरू झालेल्या या इव्हेंट्मुळे शासकीय कर्मचारी सुद्धा वैतागला आहे, कार्यालयातील कामे सोडून त्यांना इव्हेंट्स मध्ये आपली हजेरी लावावी लागत आहे.

  • Tragic Incident : राजुरा येथे दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

    Tragic Incident : राजुरा येथे दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

    news34 chandrapur

    चंद्रपूर/राजुरा – सास्ती गावात एका हृदयद्रावक घटनेत एका विहिरीजवळ पाणी आणि गाळ साचल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. वेकोलिच्या चड्डा या ठेकेदार कंपनीने विहिरीजवळील माती टाकल्याने अनावधानाने तलावासारखा पाण्याचा तलाव तयार झाल्याची घटना घडली. tragic incident

     

    दोन्ही विद्यार्थी, एक इयत्ता 11वी आणि दुसरा 9वीतला, या तलावासारख्या पाण्यात पोहायला गेले आणि त्यामुळे होणाऱ्या धोक्यांची कल्पना नव्हती. दुर्दैवाने, ते पाण्यात आणि गाळात अडकले, त्यामुळे मित्रांचा अकाली मृत्यू झाला. accident prevantion

     

    राजुरा तालुक्यातील सास्ती या गावी आज 2 मार्च ला सकाळी शाळा सुटल्यानंतर पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही मुलांचे प्रेत पाण्याबाहेर काढले आहे. या मृत मुलांची नावे पियुष राकेश सिडाम, वय17 व साहिल रमेश कुंदलवार, वय 15 अशी आहेत. chandrapur district

     

    घटनेची माहिती मिळताच तातडीने गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली. यानंतर प्रेत बाहेर काढण्यात आले. मात्र यानंतर कंपनीने नाला रोखून अनाठायी तलाव निर्माण केला, त्यामुळे कंपनीने तातडीने आर्थीक सहायता द्यावी अन्यथा तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. आता या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथुन जमावाने प्रेत उचलु दिले नाही. chadda contractor

  • Bharat Mata : चंद्रपुरात पुन्हा विश्वविक्रम, 65 हजार 724 वृक्षांनी साकारलं भारत माता

    Bharat Mata : चंद्रपुरात पुन्हा विश्वविक्रम, 65 हजार 724 वृक्षांनी साकारलं भारत माता

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 2 मार्च रोजी ताडोबा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वनविभागाने प्रतिष्ठेच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. वनविभागाने स्थानिक समुदायाच्या सहकार्याने रामबाग येथे 26 विविध प्रजातींची तब्बल 65,724 झाडे वापरून “भारत माता” हे नाव यशस्वीपणे तयार केले. Bharat Mata

     

    यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, या कार्यक्रमात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त करताना ताडोबा अभयारण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्यासाठी ताडोबा महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. Guinness book of world record

     

    झाडांचा वापर करून “भारत माता” नावाची निर्मिती केवळ राष्ट्रीय अभिमानाचेच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठी भारताच्या वचनबद्धतेचा दाखलाही आहे. मंत्री मुनगंटीवार यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देत भविष्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पार्कची स्थापना करण्याचा मनोदय व्यक्त केला. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या शब्दसंग्रहातून “ग्लोबल वॉर्मिंग” हा शब्द काढून टाकण्यासाठी भारताचे समर्पण प्रदर्शित करणे हे अंतिम ध्येय आहे. ताडोबा अभयारण्य आणि त्याच्या समृद्ध जैवविविधतेबद्दल जागरुकता वाढवणे हा ताडोबा महोत्सवाचा उद्देश आहे. Tadoba sanctuary

     

    हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून, वनविभाग आणि स्थानिक समुदायाने चंद्रपूरला पर्यावरण संवर्धनाचा चॅम्पियन म्हणून नकाशावर यशस्वीरित्या आणले आहे. भविष्यात, या प्रदेशातून उड्डाण करणारे कोणीही “भारत माता” या नावाच्या भव्य दर्शनाने स्वागत केले जाईल, जे भारताच्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेचे एक शक्तिशाली स्मरण म्हणून काम करेल. अशा उपक्रमांद्वारे, भारत हवामान बदलाशी मुकाबला करण्यासाठी आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांसह जगाला प्रेरणा देत आहे. ताडोबा महोत्सवाची विक्रमी कामगिरी ही पुढील पिढ्यांसाठी आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वनविभाग, स्थानिक समुदाय आणि संपूर्ण देशाच्या सामूहिक निर्धाराचा पुरावा आहे. Tadoba festival chandrapur

  • Tadoba Mahotsav : सिनेअभिनेत्री, वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते ताडोबा महोत्सवाचे भव्य उदघाटन

    Tadoba Mahotsav : सिनेअभिनेत्री, वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते ताडोबा महोत्सवाचे भव्य उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 1 मार्चपासून चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, 3 मार्च पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन सिनेअभिनेत्री व वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते करण्यात आले. Tadoba festival

     

    आयोजित कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आदींची उपस्थिती होती. Chandrapur

     

    प्रसार माध्यमांशी यावेळी रविना टंडन यांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की असे आयोजन भविष्यात सुद्धा व्हायला पाहिजे. Sustainable tourism

     

    चंद्रपुरात ताडोबा सारखे अभयारण्य संपूर्ण जगात प्रख्यात आहे, आज उदघाटन कार्यक्रमात मिस वर्ल्ड स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी सुद्धा भाग घेतला त्यांच्या माध्यमातून आपल्या देशातील प्रकृती व ताडोबा ची प्रसिद्धी होणार. Tadoba tiger

     

    महाराष्ट्र आपल्या वन संपदेसाठी किती जागरूक आहे हा या माध्यमातून जगात संदेश जाणार. उदघाटन कार्यक्रम नंतर sand artist सुदर्शन पटनायक यांनी मातीच्या साहाय्याने वाघाची कलाकृतीची तयार केली, त्यानंतर प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. Tadoba mahotsav

     

    उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची असंख्य संख्येत उपस्थिती होती.

  • Tadoba Tiger Reserve : ताडोबा महोत्सवात यांचा सन्मान करा – आमदार किशोर जोरगेवार

    Tadoba Tiger Reserve : ताडोबा महोत्सवात यांचा सन्मान करा – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जागतिक स्तरावर पोहचविण्यास वन्यप्राणी छायाचित्रकार,  पत्रकार, वन्यजीव संरक्षण संस्था, वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व जंगलांचे संरक्षण करणारे स्थानिक नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे चंद्रपूरात आयोजित ताडोबा महोत्सवात त्यांचा सत्कार करण्यात यावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांना केल्या आहे. सदर पत्रही त्यांनी पाठवले आहे.  Tadoba mahotsav

     

          वन विभागाच्या वतीने ताडोबा महोत्सव २०२४ चे आयोजन १ मार्च ते ३ मार्च २०२४ दरम्यान करण्यात आले आहे. ताडोबा महोत्सव 2024 चे उद्दिष्ट ताडोबाची यशोगाथा साजरी करणे आणि ती जागतिक मंचावर प्रकाशित करणे हि आहे. मात्र सदर महोत्सव साजरा करत असतांना ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील प्राण्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेर्यात टिपून येथील सौंदर्य जगात पोहोचविणार्या वन्यजीव छायाचित्रकरांचा विसर पडता कामा नये. त्यासोबतच अनेक पत्रकार वृतांकनच्या माध्यमातून ताडोब्याच्या प्रसिद्धीसाठी काम करीत आहे. Forest conservation

     

    तसेच वन्यजीव संस्था वन विभागातील कर्मचारी – अधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून वन्य प्राणी संरक्षणाचे ईश्वरीय कार्य करीत आहे. येथील स्थानिक नागरिकांनी या वनसंपत्तीचे संरक्षण केले आहे. यांच्या एकत्रित योगदानामुळेच आज ताडोबा व्याघ्रप्रकल्प जागतिक स्तरावर पोहचले आहे. Wildlife conservation

     

    या सर्वांच्या सामुहिक योगदानाशिवाय ताडोबा महोत्सवाची संकल्पनाच अपुरी राहील त्यामुळे अश्या आयोजनात ताडोबाच्या प्रसिद्धीत, संरक्षणात उल्लेखनीय योगदान असलेल्या या सर्व घटकांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या सेवाकार्याची पावती देण्यात यावी अशा सूचना त्यांनी क्षेत्र संचालक डाॅ जितेंद्र रामगावकर यांना पाठविलेल्या पत्रातुन केल्या आहे.

  • Tribal Woman : आदिवासी महिलांवरील झालेल्या अमानुष अत्याचाराबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

    Tribal Woman : आदिवासी महिलांवरील झालेल्या अमानुष अत्याचाराबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जनजाती सुरक्षा मंचच्या मार्फतिने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पश्चिम बंगाल येथील संदेशखाली गावातील महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचारा बद्दल आदिवासी महिलांना न्याय मिळावे यासाठी सुरक्षा मंच संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. Suraksha manch

     

    महिलांवरील झालेल्या अत्याचार आम्ही कदापि सहन‌ केले जाणार नाही असे जनजाती सुरक्षा मंचच्या जिल्हा सहमहिला प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षा परचाके यांनी सांगितले. तसेच जिल्हा संयोजक भारत आत्राम व जिल्हा सहसंयोजक धनराज कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. Justice

     

    सुरक्षा मंचचे महानगर संयोजक अरविंद मडावी सहयोगी संघटना म्हणून वनवासी कल्याण आश्रमचे विभाग प्रमुख भालेकर जिल्हा अध्यक्ष खममकर विभाग संघठन मंत्री प्रज्योत हेपट जिल्हा महिला प्रमुख विभावरी वखरे प्रांत सह महिला प्रमुख प्राजक्ता भालेकर जिल्हा कोषप्रमुख शेखर देशमुख सिमा मडावी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे चिन्मय भागवत राष्ट्र सेविका समिती चे अंजली हिरूरकर भारतीय स्रिशक्ती च्या भाग्यश्री फाटक.तसेच महिला समन्वय च्या भगिनी उपस्थित होत्या. शासन स्तरावरून आमचे निवेदन तात्काळ संबंधित शासनाकडे त्वरित सादर करून आमच्या मागणीला त्वरित न्याय मिळऊन द्यावे, अन्यथा आंदोलना सारखा मार्ग स्वीकारा लागेल असा इशाराही दिला आहे. Tribal woman

  • Threat To Constitution : लोकशाही धोक्यात असल्याने नागरिकांनी सजग रहावे – प्रा. श्याम मानव धोक्यात

    Threat To Constitution : लोकशाही धोक्यात असल्याने नागरिकांनी सजग रहावे – प्रा. श्याम मानव धोक्यात

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल : मनुस्मृतीला गाडून निर्माण करण्यांत आलेली राज्यघटना अलीकडील काळात धोक्यात आली असून मोदी सरकार लोकशाही संपुष्टात आणून पुन्हा मनुस्मृतीचे राज्य उदयास आणण्याचे कारस्थान रचत आहे. असे झाल्यास स्वतंत्र भारताच्या नागरीकांना पुन्हा गुलामगिरीचे जीवन जगावे लागेल. हे लक्षात घेवून प्रत्येक नागरीकांनी सजग राहणे काळाची गरज झाली आहे. असे मत अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.
    आम्ही भारताचे लोक तालुका मूल या संस्थेच्या वतीने स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजीत अमृतकाळात भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर आयोजीत व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. Indian democracy

     

    स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरीकाचा अभ्यास आणि विचार करून अथक प्रयत्नाने लिहीण्यांत आलेल्या सर्वसमावेश अश्या राज्यघटनेतील कलम आणि अधिनियमांद्वारे देशाचा कारभार सुरळीत सुरू असतांना मागील काही वर्षापासून काही मंडळी राज्यघटनेला डावलुन देशात सांप्रदायीक वातावरण निर्माण करून नागरीकांनामध्यें द्वेष, असुरक्षीतता, भावना चेतवुन दंगली घडविण्याचे काम करीत असल्याचा आरोप प्रा. श्याम मानव यांनी केला. Threat to Constitution

     

    डार्वीनचा उत्क्रांतीवादाचा सिध्दांत शालेय अभ्यासक्रमामधून वगळण्याचे कारस्थान करणारे विद्यमान शासनकर्ते अंधश्रध्दा पसरविण्याचे काम करीत असलेल्या धिरेंद्र महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणारा गोडसेचे गोडवे गाणा-या कालीचरण महाराज, गांधीना मुस्लीमांची औलाद म्हणणा-या संभाजी भिडे या दुस-यांच्या जीवनात चिवडा चिवड करणा-या मंडळीना प्रौत्साहन देण्याचे काम करीत असल्याचे सांगतांना प्रा.श्याम मानव यांनी न्याय हक्काकरीता आंदोलन करीत असलेल्या शेतक-यांवर वेगवेगळया आयुधांचा वापर करून शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करणारे मोदी असंवेदनशील असल्याचा आरोप केला. Modi government

     

    राज्य आणि देशात कंत्राटी नोकर भरतीची पध्दत अंमलात आणून सुशिक्षीत बेरोजगारांची मस्करी केल्या जात आहे. महागाईनेही डोके वर काढले आहे, जाती धर्माचे राजकारण करून लोकशाहीला धोक्यात आणण्याचे कारस्थान रचल्या जात असल्याचे सांगतांना प्रा. श्याम मानव यांनी कारवाईच्या भितीपोटी देशातील न्याय व्यवस्था प्रचंड दबावात असून निवडणुक आयोग, गृहविभाग व इतरही प्रशासकिय यंञणा शासनकर्त्यानी पट्टे बांधुन ठेवल्याचे सांगीतले. Manusmriti

     

    नोटबंदी आणि कोविड काळात मोदींनी घेतलेले निर्णय अत्यंत चुकीचे असून ईडी आणि सीआयडी च्या नांवाने दबाव तंत्राचा वापर करून करण्यांत येत असलेले पक्ष फोडीचे राजकारण लोकशाहीला घातक ठरणारे आहे. त्यामूळे स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरीकाला लोकशाही अस्तित्वात ठेवायची असेल तर मोदी हटाव-देश बचाव हा नारा जोपासला पाहिजे. असे आवाहन केले. सामाजीक कार्यकर्त्या तथा बालरोग तज्ञ डाॅ. अभिलाषा गावतुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ.अनिता वाळके यांचे हस्ते झाले. Equally and justice

     

    यावेळी अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमूरे, धनगर समाज संघर्ष समितीचे विदर्भ अध्यक्ष डाॅ. तुषार मर्लावार, साहित्यीक प्रब्रम्हानंद मडावी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, व्हाॅईस आँफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु गेडाम, प्राचार्य अशोक झाडे, गंगाधर कुनघाडकर, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. वासीम राजा, संपत कन्नाके, डेव्हीड खोब्रागडे, संजीवनी वाघरे, जयश्री चन्नुरवार, गुरू गुरनूले आदि मंचावर उपस्थित होते. यावेळी डाॅ. अनिता वाळके, डाॅ. अभिलाषा गावतुरे आणि सुरेश झुरमूरे यांनी मनोगत व्यक्त केले. हिरालाल भडके यांनी प्रास्ताविक, नंदकिशोर शेरकी यांनी संचलन तर साक्षी गुरनूले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नागरीकांची मोठया संख्येनी उपस्थित होती.

  • Mla Kishor Jorgewar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, पूर संरक्षण भिंत, आमदार जोरगेवार यांनी वेधले सभागृहात लक्ष

    Mla Kishor Jorgewar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, पूर संरक्षण भिंत, आमदार जोरगेवार यांनी वेधले सभागृहात लक्ष

    News34 chandrapur

    चंद्रपूर – छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा  राज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा केला जात आहे. मात्र हे होत असतांना छत्रपती महाराज यांचा अश्वारूढ पुताळा चंद्रपूर सह राज्यातील अनेक जिल्हात आजही नाही. त्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नाही त्या ठिकाणी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे. Chhatrapati Shivaji Maharaj

     

    गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी अर्थसंकल्पाचा समर्थनार्थ  आमदार किशोर जोरगेवार सभागृहात बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील विविध विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, सुमारे 17 किलोमीटर लांबीचा परकोट असलेले चंद्रपूर हे पुरातन शहर आहे. येथे 500 वर्ष जून मंदिर असुन 2 हजार वर्ष जुनी माता महाकालीची मुर्ती येथे स्थापित आहे. मात्र पूरातत्व विभागाच्या जाचक अटिंमुळे मंदिराचा अपेक्षित असा विकास झालेला नाही. येथे चैत्र अश्विनी महिन्यात यात्रा भरते. देशभरातील भाविक येथे येतात त्यामुळे सदर यात्रा परिसराचा विकास करण्यात यावा अशी मागणी यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.

     

    चंद्रपुरातील इरई नदीला वारंवार पूर येत असतो. त्यामुळे मोठे नुकसान या भागातील नागरिकांचे होत आहे. (flood protection wall)त्यामुळे येथे पुर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, विदर्भातील पंढरपूर असलेल्या वढा तिर्थ (vada tirtha funds) क्षेत्राला महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस 25 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र ते मिळालेले नाही. त्यामुळे सदर निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा, जगात सर्वाधिक वाघांचा संरक्षण करणारा आमचा जिल्हा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने येथे टायगर सफारीची घोषणा केली होती.

     

    171 हेक्टर जागेत 286 कोटी रुपये खर्च करत टायगर सफारी निर्माण होणार होती. चंद्रपूरच्या विकासाला चालणा मिळणार असलेल्या या घोषित टायगर सफारीचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.   tiger safari project

     

    काळा राम मंदिराचा पर्यटनदृष्ट्या विकास करा

    नाशिकला काळाराम मंदिर आहे. त्याच प्रमाणे चंद्रपूरलाही प्राचीन  असे काळाराम मंदिर आहे. येथे जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे या मंदिराच्या पर्यटनदृष्टा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. mla kishor jorgewar

  • Chandrapur News : चंद्रपुरात दुर्मिळ आजार हिमोफिलिया डे-केअर सेंटरचे उदघाटन

    Chandrapur News : चंद्रपुरात दुर्मिळ आजार हिमोफिलिया डे-केअर सेंटरचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील हिमोफिलिया डे केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात करण्यात आले. Hemophilia Day Care Center

     

    हिमोफिलिया सारख्या दुर्मिळ आजार असणाऱ्या रुग्णांसाठी अपर मुख्य सचिव दीपक मैसेकर, आयुक्त धीरजकुमार तसेच संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार हिमोफिलिया डे केअर सेंटरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे उद्घाटन करण्यात आले. government medical college

     

    यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय राठोड, माया आत्राम, अधिपरिचारिका सपना बावणे, विकास वाढई, दीपक डंबारे उपस्थित होते. healthcare services

     

    हिमोफिलिया रुग्णांस वर्षातून 10 ते 12 वेळा रक्तस्त्राव होण्याची संभावना असते व त्याकरीता फॅक्टर 7, फॅक्टर 8(अ) व फॅक्टर 9(ब) रुग्णास आवश्यकता असते. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 28 रुग्णांची नोंद झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हिमोफिलिया रुग्णास आवश्यकता असणाऱ्या घटकांचा तुटवडा पडू न देण्याचा मानस आहे, असे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यावेळी म्हणाले. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये रुग्णांना अत्यावश्यक वेळी इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नसावी, याकरीता हिमोफिलिया सेंटर प्रत्येक जिल्ह्यात स्थापित केले आहे. hemophilia treatment

     

    यामध्ये प्रत्येक फॅक्टरची उपलब्धता असेल. पूर्वी या सुविधेचा लाभ घेण्यास रुग्णांना नागपूर येथे जावे लागत होते. मात्र, आता ही सुविधा चंद्रपूरमध्येच उपलब्ध झाली आहे. याचा उद्देश म्हणजे समुदायातील हिमोफिलिया असलेल्या व्यक्तींसाठी विशेष काळजी आणि समर्थन प्रदान करणे आहे. हा उपक्रम दुर्मिळ रक्तस्त्राव विकार आणि प्रभावित झालेल्या लोकांसाठी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी समर्पित आहे. genetic disorder

     

    हिमोफिलिया रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा :

    वैद्यकीय सेवा : हिमोफिलिया व्यवस्थापनामध्ये अनुभवी आरोग्य सेवा व्यावसायिक निदान, उपचार आणि देखरेख यासह सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करणे.

     

    शिक्षण आणि समुपदेशन : रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हिमोफिलियाची समज वाढविण्यासाठी तसेच परिस्थिती प्रभावीपणे हातळून त्यांना सक्षम करण्यासाठी शिक्षण व समुपदेशन सेवा प्रदान करण्यात येते.

     

    पोषक वातावरण : हिमोफिलिया केंद्रामध्ये एक पोषक वातावरण असेल जिथे रुग्ण इतर हिमोफिलिया रुग्णांशी संपर्क साधून आपला अनुभव शेअर करू शकेल.

     

    आपत्कालीन प्रतिसाद : अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह सुसज्ज, केंद्र आपत्कालीन परिस्थिती त्वरित आणि कार्यक्षमतेने हाताळणे.

     

    हिमोफिलिया डे केअर सेंटर मधील सुविधेचा लाभ घेण्याकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय राठोड 8830875244 व अधिपरिचारिका सपना बावणे 7387714867 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच हिमोफिलिया सारख्या दुर्मिळ आजार असणाऱ्या रुग्णांसाठी हिमोफिलिया डे केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.