Blog

  • democracy fighter pension scheme |आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश – सेनानींना दरमहा मानधन मंजूर!

    democracy fighter pension scheme

    democracy fighter pension scheme : चंद्रपूर – आणीबाणीच्या काळात कुटुंबाचा आणि स्वतःचा जराही विचार न करता केवळ “राष्ट्र सर्वोपरी” म्हणून देशासाठी कारावास भोगून संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींना दरमहा २० हजार रुपये सन्मान निधी मिळावा, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज बुलंद केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनाही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती. आज राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले, या शब्दांत लोकतंत्र सेनानींनी त्यांचे आभार मानले आहेत. emergency period political prisoners pension

    चंद्रपुरात होणार इको पार्क, आमदार जोरगेवार यांचा पुढाकार

    एका अत्यंत संवेदनशील विषयामध्ये स्वतः लक्ष घालून आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर ४ हजार १०३ लोकतंत्र सेनानींना न्याय मिळाला आहे. त्यामुळे आ. श्री. मुनगंटीवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

    कॅबिनेटने दिलेल्या मंजुरीनुसार, एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या आणीबाणीतील सेनानींना मासिक २० रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला किंवा पतीला १० हजार रुपये इतके मानधन देण्यात येईल. तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या आणीबाणीतील सेनानींना मासिक १० हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला किंवा पतीला ५ हजार रुपये इतके मानधन देण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. Democracy warrior pension scheme

    लोकतंत्र सेनानींना मानधन मिळण्यात व इतर प्रशासकीय बाबींमध्ये येत असलेल्या अडचणींचे निवेदन आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना दिले होते. विषयाची दखल घेऊन सरकारदरबारी पोहोचविल्यानंतर आ. श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. मंगळवार, दि. १७ जूनला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यामुळे या प्रयत्नांना यश आलं आहे. लोकतंत्र सेनानी संघाचे (जालना, परतूर) कार्याध्यक्ष रघुनाथ दीक्षित, महासचिव विश्वास कुलकर्णी (जळगाव), प्रदीप ओगले (सांगली),  अरुण भिसे (यवतमाळ), पांडुरंग जिंजुर्डे (यवतमाळ) आणि यादवराव गहूकार (यवतमाळ) , श्रीकांत शिंदे ( सांगली) यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत यासंदर्भातील निवेदन दिले होते. Maharashtra emergency pension latest update

    राजस्थान सरकारचा दिला होता दाखला

    लोकतंत्र सेनानींच्या सन्मान निधित भरीव वाढ करण्याची मागणी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली होती. आ. श्री. मुनगंटीवार यांनी निवेदनामध्ये राजस्थान सरकारच्या निर्णयाचा दाखला दिला होता. राजस्थान सरकारने लोकतंत्र सेनानी सन्मान म्हणून पेन्शन राशी २० हजार रुपये केली आहे. तसेच आरोग्य चिकित्सा सहाय्य म्हणून ४ हजार रुपयांची राशी दर महिन्याला तेथे दिली जाते. महाराष्ट्रात सध्यस्थितीत ४ हजार १०३ स्वातंत्र्य सेनानी सन्मान निधीस पात्र आहेत. राजस्थान सरकारची अधिसूचना लक्षात घेऊन महाराष्ट्रात देखील हा सन्मान निधी वाढवावा, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

    विधानसभेत लक्षवेधीवर मांडली चर्चा

    विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून आ. श्री. मुनगंटीवार यांनी चर्चा सुरू केली. त्यानंतर चर्चेत विविध मतदारसंघांच्या आमदारांनी सहभागी होणे तसेच हा मुद्दा सरकारच्या लक्षात आणून देणे, हे केवळ आ. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे शक्य झाले होते. तसेच आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते, हे विशेष.

  • eco park project in Chandrapur city । चंद्रपुरात जुन्या कोळसा खाणीचे रूपांतर होणार हरित स्वर्गात – पहा काय होणार बदल!

    eco park project in Chandrapur city

    सावनेरच्या धर्तीवर चंद्रपूरला मिळणार निसर्गसंपन्न ईको पार्क – आमदार जोरगेवार यांची संभावित जागेची पाहणी

    eco park project in Chandrapur city : चंद्रपूर (१७ जून २०२५) – शहरात पर्यावरणपूरक पर्यटन आणि नागरीकांसाठी निसर्गस्नेही जागा उपलब्ध व्हावी या हेतूने सावनेर येथील ईको पार्कच्या धर्तीवर चंद्रपूरमध्ये ईको पार्क उभारण्याच्या दृष्टीने आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेतला असून आज त्यांनी वेकोलीच्या अधिका-यांसह बैठक घेत संभावित ईको पार्क च्या जागेची पाहणी करत ईको पार्क साकारण्यासाठी शुक्ष्म नियोजन करत प्रक्रिया गतिशल करण्याचे निर्देश दिले आहे. restoration of coal mine areas for tourism

    चंद्रपुरातील रिसॉर्टमध्ये युवकांचा तांडव, व्यवस्थापकावर केला चाकू हल्ला

                   यावेळी वेकोलीचे योजना अधिकारी प्रिया शंकर विना, अमला खनन ऑफिसर उज्जल बोढे, लालपेठ उप क्षेत्रीय प्रबंधक मुस्ताक अहमद, पर्यवेक्षक अधिकारी शुक्ला, सुभाष ताजने, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश निमंत्रीत विशेष सदस्य तुषार सोम, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देतवळे, बलराम डोडाणी, रवी गुरनुले, मनोज पाल, माजी नगर सेवक प्रदिप किरमे, अजय जयस्वाल, नामदेव डाहूले, अमोल शेंडे, रंजन ठाकुर, सुमित बेले आदिंची उपस्थिती होती.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकतीच नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील ईको पार्कला भेट देऊन तेथील यशस्वी मॉडेलची पाहणी केली होती. यावेळी संबंधित अधिकार्यांसोबत त्यांनी पार्कच्या रचना, संकल्पना आणि व्यवस्थापन यांचा सविस्तर अभ्यास केला. सावनेर ईको पार्कमध्ये साकारण्यात आलेली कोळसा खाणी विषयक वेकोलीची माहितीपर प्रदर्शनी, हरित पट्टे, जलाशय आणि पर्यावरण संवर्धनाची आधुनिक तंत्रे यांचा अनुभव घेऊन आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूरमध्येही असेच आधुनिक आणि निसर्गाभिमुख ईको पार्क उभारण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

    दरम्यान, आज चंद्रपूर येथील वेकोलीच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी वेकोली आणि इतर संबंधित अधिकार्यांसोबत सविस्तर चर्चा करत प्रारंभिक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत जमिनीची निवड, सविस्तर विकास आराखडा, पर्यावरणीय मानके आणि सार्वजनिक सहभाग यासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. WCL land use for eco tourism in Chandrapur

    आमदार जोरगेवार यांनी केली पाहणी

     बैठकीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणीसाठी शहरातील जमनजट्टी परिसरातील वेकोलिच्या मालकीच्या जागेची पाहणी केली. या भागातील रिवलबेल्ट कॉरी याचीही त्यांनी पाहणी केली. येथे जुनी खुली कोळसा खाण असून त्यात पावसाचे आणि नदीचे पाणी साचले आहे. हे निळ्या रंगाचे सुदर पाणी असून येथे नैसर्गिक जलसाठा निर्माण झाला आहे. त्यातून एक सुंदर निसर्गरम्य जलाशय तयार झाला आहे. WCL and government partnership for green projects

    परिसरात घनदाट वृक्षराजी, जलचर आणि पक्ष्यांचे अस्तित्व लक्षात घेता ही जागा नैसर्गिक ईको पार्कसाठी अत्यंत अनुकूल स्थान असल्याचे आमदार किशोर जोगरेवार यांनी म्हटले आहे. यावेळी आमदार जोरगेवार यांनी सदर जागा ईको पार्कसाठी लक्षात घेण्याच्या सूचना दिल्या असून तातडीने सविस्तर सर्वेक्षण व विकास आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. चंद्रपूर शहरात पर्यावरण आणि पर्यटन अंगांनी नागरिकांना लाभ देणारा हा प्रकल्प असून सर्व विभागाने प्रामाणीकपणे यात काम करत हे ईको पार्क प्रत्येक्षात साकार करावे असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

  • resort violence in Chandrapur news । पूल पार्टीतून थेट पोलीस कोठडीत! चंद्रपुरात तरुणांचा चाकूकांड

    resort violence in Chandrapur news

    resort violence in Chandrapur news : जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य परिसरात शेकडो रिसॉर्ट पर्यटक व नागरिकांच्या मनोरंजनाकरिता बांधण्यात आले आहे, मात्र आता हे रिसॉर्ट दारू व नशेचा अड्डा बनत चालले आहे, निसर्गाच्या सानिध्यात मनोरंजन व पार्टी करण्यासाठी आलेल्या काही युवकांनी चंद्रपुरातील पद्मापूर पोद्दार रिसॉर्ट मध्ये गोंधळ घालत, रिसॉर्ट मॅनेजर वर चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले, याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी ५ आरोपी युवकांना अटक केली.

    तलवार हातात, दहशत निर्माण करण्यापूर्वी सिंदेवाही पोलिसांनी केली अटक

    १६ जून रोजी दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेल्या पद्मापूर गावाजवळील पोद्दार रिसॉर्टमध्ये हि घटना घडली. येथे पूल पार्टीसाठी आलेल्या तरुणांनी नशेत धुंद होऊन डीजे चा आवाज कमी करण्याबाबत वाद करत रिसॉर्ट मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. Poddar resort crime update June 2025

    डीजेच्या आवाजावरून वाद

    घुग्घूस येथील पाच तरुण सोमवारी सकाळी सुमारास ११ वाजता पोद्दार रिसॉर्टमध्ये आले. दारूच्या नशेत त्यांनी डीजे चा आवाज कमी करा म्हणत वाद घातला. वाद इतका टोकाला गेला की, त्यांनी थेट रिसॉर्ट मॅनेजर ३१ वर्षीय अमर द्विवेदी वर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आणि तेथून फरार झाले. जखमी मॅनेजरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.


    घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत पाचही आरोपींना भद्रावती येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ललित गाताडे, आकाश आसुटकर, विष्णू बोंगाले, करण तीर्थगिरिवार आणि कृष्णा तोगार यांचा समावेश असून हे सर्व आरोपी घुग्घूस येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवकांवर कलम १०९ (१), २९६, ३५१ (३), १८९ (४), १९१ (३) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

  • Sindewahi crime update June 17 2025 । दहशतीचा डाव उधळला! सिंदेवाहीत तलवार घेऊन फिरणारा तरुण अटकेत

    Sindewahi crime update June 17 2025

    Sindewahi crime update June 17 2025 : सिंदेवाही, दि. १७ जून २०२५: सिंदेवाही शहरात दि. १७ जून २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी एका तरुणाला धारदार तलवारीसह अटक केली. शिवराज सुनील उटलवार (वय २४, रा. विद्यानगर कॉलनी, सिंदेवाही) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने अंधाराचा फायदा घेऊन शहरातील पानटपरी जवळ घातपात करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात तलवार घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

    बल्लारपूर शहरात युवकाच्या घरून तलवार जप्त

    आरोपीला अटक

    सिंदेवाही पोलिसांना पहाटे ५:०० ते ५:४५ वाजण्याच्या दरम्यान पेट्रोलिंग करताना ही घटना निदर्शनास आली. आरोपी शिवराज उटलवार याच्याविरुद्ध भादंवि कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सह कलम १२२ मपोका अन्वये अप क्रमांक २१३/२०२५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, सिंदेवाही पोलीस पुढील तपास करत आहेत.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली स.फौ. चंद्रभान सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

  • Sahityaratna Annabhau Sathe scholarship । अण्णाभाऊ साठे महामंडळ देणार हक्काची शिष्यवृत्ती – फक्त ही 9 कागदपत्रं लागणार!

    Sahityaratna Annabhau Sathe scholarship

    Sahityaratna Annabhau Sathe scholarship : चंद्रपूर – सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमांमध्ये सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. Annabhau Sathe scholarship

    सरकारच्या योजना हवेत कि जमिनीवर?

    मांग, मातंग, मिनिमादीग, मादींग, दानखनीमांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांगगारूडी, मांगगारोडी. मादगी, मादीगा या जातीतील विद्यार्थी – विद्यार्थींना महामंडळाकडुन जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील पहिले तीन किंवा पाच विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधिन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातुन शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. संबंधितांनी 25 जून 2025 च्या आत सर्व कागदपत्रानिशी जिल्हा कार्यलयात संपर्क करून खालील प्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत.

    कागदपत्रे काय?

    जातीचा दाखला, 2. फोटो, 3. मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, 4. राशनकार्ड, 5. उत्पन्नाचा दाखला, 6. आधारकार्ड, 7. बैंक पासबुक, 8. पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट व 9. जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इ. कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे द्यावा तसेच याबाबत कार्यालयात संपर्क साधावा.

  • Implementation of the Disha Committee । सरकारच्या योजना हवेत की जमिनीवर? दिशा समितीचा खासदार धानोरकरांनी घेतला आढावा

    Implementation of the Disha Committee

    Implementation of the Disha Committee : चंद्रपूर : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेले विषय तसेच केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) कार्यरत आहे. या समितीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा खासदार धानोरकर यांनी आज (दि. 16) घेतला. Disha Committee

    नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीला दिशा समितीचे सहअध्यक्ष खा. डॉ. नामदेव किरसान, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायकुटे व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

    दालमिया सिमेंट कंपनीने ३० कामगारांना केले बेरोजगार, दोष काय तर…

    पीक विम्याची रक्कम तात्काळ द्या

    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अनेक लाभार्थी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना पीक विम्याची रक्कम (crop insurance payment) लवकर देण्यात यावी. तसेच वाढीव किमतीने बी- बियाणे, खतांची विक्री होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून परवाने रद्द करावे. जलजीवन मिशन मध्ये कंत्राटदारांनी सिमेंट काँक्रेटचे रस्ते फोडून टाकले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांनी रस्त्याची डागडुजी करावी, तसे आदेश संबंधित विभागाने कंत्राटदारांना द्यावे. कुपोषण मुक्त जिल्ह्यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने प्रभावी योजना राबवाव्यात. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम त्वरीत पूर्ण करावे.

    घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध होत असली तरी रेतीघाटापासून वाहतुकीचा खर्च खुप जास्त येत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. मोबाईलची रेंज राहण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने टॉवरचे काम गतीने करावे. वरोरा ते माजरी रेल्वे स्टेशन दरम्यान टाकण्यात येणा-या तिस-या रेल्वे लाईनचे काम भुसंपादनासाठी दिलेल्या जमिनीवरच करावे, अतिरिक्त जागेवर काम करू नये. राष्ट्रीय महामार्गाचे काम करतांना कंत्राटदारांकडून रस्त्यावरील प्रवासी निवा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सदर प्रवासी निवारा कंत्राटदारांनी बांधून द्यावे.

    वरोरा –चिमूर महामार्ग अतिशय उंच असल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. शिवाय महामार्गावरील सर्व पाणी लगतच्या शेतात जात असल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रीय महामार्ग आणि प्रशासनाने उपाययोजना करावी, अशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या.

    यावेळी त्यांनी इतरही विषयांचा आढावा घेतला. बैठकीत खा. डॉ. नामदेव किरसान यांनी आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीसुध्दा संबंधित विभागाला सुचना केल्या. संचालन आणि सादरीकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायकुडे यांनी केले.

    या विषयांचा आढावा

    दिशा समितीच्या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, खनीज विकास, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महानेट, विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनांचे अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शिक्षण व इतर विषयांचा आढावा घेण्यात आला.

  • PM Surya Ghar free solar scheme Chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यात सौरक्रांती! 5616 घरांवर बसले सोलर – तुम्ही अजूनही वाट पाहताय?

    PM Surya Ghar free solar scheme Chandrapur

    PM Surya Ghar free solar scheme Chandrapur : चंद्रपूर – प्रधानमंत्री ‘सूर्यघर’ – मोफत वीज योजना चंद्रपूर वेगाने आकार घेत आहे. या योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात अक्षरशः नेतृत्व स्वीकारले असून, सौर ऊर्जा निर्मितीत उत्कृष्ट कामगिरी नोंदवत जिल्हयात 5616 ग्राहकांनी लाभ घेतलेला आहे. 5616 households benefit from Surya Ghar Chandrapur

    दहशतीचा कट उधळला, बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई

    चंद्रपूरच्या या यशामागे नागरिकांचा वाढता सहभाग, स्थानिक प्रशासनाचे प्रभावी नियोजन आणि योजनेच्या लाभांची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कारणीभूत आहेत. यामुळे केवळ विजेच्या खर्चात बचतच होत नाही, तर पर्यावरणाची देखील काळजी घेतली जात आहे. प्रधानमंत्री ‘सूर्य घर’ योजनेमुळे चंद्रपूरकर आता खऱ्या अर्थाने ‘सूर्यशक्ती’ चा अनुभव घेत आहेत आणि हरित भविष्याच्या दिशेने एक नवा अध्याय लिहित आहेत.

    चला,आपणही ‘सूर्य घर’ योजनेत सहभागी होऊया!


    भविष्यातही चंद्रपूर जिल्हा याच वेगाने सौर ऊर्जा क्षेत्रात प्रगती करेल आणि देशाला ऊर्जा आत्मनिर्भर बनवण्यात सिंहाचा वाटा उचलेल अशी अपेक्षा आहे. आपणही या अभियानाचा भाग होऊन आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच स्थापित करून वीज बचतीसोबतच पर्यावरण संवर्धनात हातभार लावू शकता.

    अधिक माहितीसाठी आजच महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/index.php या संकेतस्थळाला किंवा नजिकच्या कार्यालयाशी अथवा केंद्र शासनाच्या https://pmsuryaghar.gov.in/#/ या संकेतस्थळाला भेट द्या आणि या पर्यावरण संवर्धनाच्या क्रांतीमध्ये सहभागी व्हा! असे आवाहन चंद्रपूर महावितरणने केले आहे.

  • Dalmia Cement company workers termination । एकाच झटक्यात ३० कामगार बेरोजगार!, मनसे आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव!

    Dalmia Cement company workers termination

    Dalmia Cement company workers termination : डालमिया सिमेंट कंपनीतून तब्बल 30 कामगारांना कुठलीही नोटीस व पूर्व सूचना न देता परस्पर कामावरून काढल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधवार यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व कामगारांना घेऊन निवेदन देण्यात आले.

    बल्लारपुरात १२ लक्ष रुपये किमतीचे चोर बीटी बियाणे जप्त

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्वरित उपविभागीय अधिकारी यांना डालमिया सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनासोबत बैठक लावून कामगारांच्या मागण्या सोडविण्याच्या सूचना केल्या आहें, मागील विस दिवसापासून कामगार आपल्या हक्कासाठी लढत आहें व मनसे कामगार सेनेकडून प्रशासनाकडे व डालमिया सिमेंट कंपनी व्यवस्थापनाकडे याबाबत पाठपुरावा करत होते परंतु कुठलाही निर्णय न झाल्याने अखेर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कामगारांना न्याय देण्याबाबत पुढाकार घेतला.

    MNS aman andhewar

    मनसे कामगार सेनेला मान्यता न देता उलट कारवाई

    गडचांदुर परिसरातील डालमिया सिमेंट कंपनीतील कामगारांना किमान वेतन व कामगार कायाद्यानुसार इतर सुविधा मिळत नसल्याने त्या कंपनीच्या कामगारांनी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या चंद्रपूर कार्यालयात येऊन मनसे कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारले व कंपनी व्यवस्थापनाला मनसे कामगार संघटना स्थापित करण्याचे पत्र दिले, परंतु कंपनी व्यवस्थापनाने मनसे कामगार सेनेला मान्यता न देता उलट ज्या कामगारांनी पुढाकार घेतला त्या कामगारांनाच कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकले. Aman Andhewar MNS

    दरम्यान या संदर्भात केंद्रीय कामगार उपायुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी यांना मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून निवेदन देऊन त्या कामगारांना त्यांच्या हक्काच्या मागण्याची पूर्तता पूर्ण करून कामावर घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती, त्यावर जिल्हाधिकारी यांनी संबंधित केंद्रीय कामगार उपायुक्त यांच्याकडे चौकशी करण्याचे आदेश दिले, मात्र तब्बल दहा दिवस उलटून सुद्धा कंपनी कडून कामगारांना केवळ नोटीस वर नोटीस देऊन कामगारावर आरोप करण्यात येत होते मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येत नव्हत्या.

    आज दिनांक 16 जुनला जिल्हाधिकारी यांच्या कडे सर्व कामगारांना उपस्थित करून आंदोलनाची भूमिका घेण्यात आली असता जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसात डालमिया सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनासोबत बैठक लावून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे जबाबदारी दिल्याने कामगारांना आता न्याय मिळेल असे संकेत मिळत आहें.

  • Ballarpur police seize sword from house । दहशतीचा कट उधळला! बल्लारपूरमध्ये घरातून तलवार जप्त, आरोपी अटकेत

    Ballarpur police seize sword from house

    Ballarpur police seize sword from house : बल्लारपूर – चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी आता अनियंत्रित होत असून पोलीस प्रशासनाचा यावर वचक कमी होत आहे असे चित्र दिसत आहे, खून, दरोडे, जबरी चोरीने नागरिक अक्षरक्षा त्रासले आहेत.

    पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केली पतीची हत्या

    या गुन्हेगारीच्या दहशतीला हातभार लावत बल्लारपूर शहरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एकाने धारदार तलवार घरी आणली, मात्र काही घडण्याच्या आत बल्लारपूर पोलिसांनी आधीच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. sword seizure police raid

    दहशत निर्माण करण्याकरिता आणली तलवार

    १६ जून रोजी बल्लारपूर पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना धारदार शस्त्र एकाने घरी आणले आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी संतोषी माता वॉर्ड मध्ये पोहचत त्याठिकाणी राहत असलेला ३५ वर्षीय नीरज उर्फ लालू धनराज शेंडे यांच्या घरी धाड मारत झडती घेतली असता त्याठिकाणी लोखंडी धारदार तलवार आढळली.

    बल्लारपूर पोलिसांनी सदर तलवार जप्त करीत नीरज वर भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करीत अटक केली. सदर तलवार नागरिकांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी आणली असल्याची माहिती आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र गायकवाड, सपोनि मदन दिवटे, पोलीस कर्मचारी आनंद परचाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, शरदचंद्र कारुष, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, खंडेराव माने, मिलिंद आत्राम, भास्कर चिंचवलकर, शेखर माथनकर, अनिता नायडू यांनी केली.

  • theft of dam structure plates । ४ चोर, ३० प्लेट्स, एक बोलेरो! ब्रह्मपुरीच्या बंधाऱ्यातील चोरी प्रकरण उघडकीस

    theft of dam structure plates

    theft of dam structure plates : ब्रह्मपुरी – तालुक्यातील बेलदाटी शेत शिवारात शेतीला पाणी देण्याकरिता पाणी अडवून ठेवण्यासाठी मृद संधारण विभागाने दीड वर्षांपूर्वी बंधारा बांधला होता, मात्र त्या बंधाऱ्याचे ३० लोखंडी प्लेट मे महिन्यात अज्ञात चोरांनी चोरून नेले होते. पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपीना अटक करीत चोरी केलेल्या लोखंडी प्लेट जप्त केले.

    बल्लारपुरात लाखोंचे चोर बीटी बियाणे जप्त

    २ मे रोजी प्रकाश रामचंद्र कुथे यांनी बंधाऱ्याचे ४९ मग लोखंडी प्लेट अज्ञाताने चोरून नेले अशी तक्रार दिली होती, ब्रह्मपुरी पोलिसांनी या प्रकरणी ३०३ (२) या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. सदर गुन्ह्यात गोपनीय माहिती व तांत्रिक कौशल्यपूर्ण तपास करीत आरोपी २५ वर्षीय राकेश विजय वैरकार, २१ वर्षीय छगन विजय गुरनुले, २३ वर्षीय सूरज उद्धव मेश्राम व २२ वर्षीय महेश रवींद्र सहारे यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी लोखंडी प्लेट चोरी प्रकरणात कबुली दिली. Bramhapuri iron theft

    ३० प्लेट जप्त

    आरोपीकडून ३० नग लोखंडी प्लेट किंमत ६० हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH 40 -BG 3866 असा एकूण २ लक्ष ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात सपोनि मनोज खडसे, पोलीस कर्मचारी योगेश शिवणकर, अजय कटाईत, मुकेश गजबे, स्वप्नील पळसपगार, चंदू कुरसंगे व निलेश तुमसरे यांनी केली.