theft of dam structure plates । ४ चोर, ३० प्लेट्स, एक बोलेरो! ब्रह्मपुरीच्या बंधाऱ्यातील चोरी प्रकरण उघडकीस

theft of dam structure plates

theft of dam structure plates : ब्रह्मपुरी – तालुक्यातील बेलदाटी शेत शिवारात शेतीला पाणी देण्याकरिता पाणी अडवून ठेवण्यासाठी मृद संधारण विभागाने दीड वर्षांपूर्वी बंधारा बांधला होता, मात्र त्या बंधाऱ्याचे ३० लोखंडी प्लेट मे महिन्यात अज्ञात चोरांनी चोरून नेले होते. पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपीना अटक करीत चोरी केलेल्या लोखंडी प्लेट जप्त केले.

बल्लारपुरात लाखोंचे चोर बीटी बियाणे जप्त

२ मे रोजी प्रकाश रामचंद्र कुथे यांनी बंधाऱ्याचे ४९ मग लोखंडी प्लेट अज्ञाताने चोरून नेले अशी तक्रार दिली होती, ब्रह्मपुरी पोलिसांनी या प्रकरणी ३०३ (२) या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. सदर गुन्ह्यात गोपनीय माहिती व तांत्रिक कौशल्यपूर्ण तपास करीत आरोपी २५ वर्षीय राकेश विजय वैरकार, २१ वर्षीय छगन विजय गुरनुले, २३ वर्षीय सूरज उद्धव मेश्राम व २२ वर्षीय महेश रवींद्र सहारे यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी लोखंडी प्लेट चोरी प्रकरणात कबुली दिली. Bramhapuri iron theft

३० प्लेट जप्त

आरोपीकडून ३० नग लोखंडी प्लेट किंमत ६० हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH 40 -BG 3866 असा एकूण २ लक्ष ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात सपोनि मनोज खडसे, पोलीस कर्मचारी योगेश शिवणकर, अजय कटाईत, मुकेश गजबे, स्वप्नील पळसपगार, चंदू कुरसंगे व निलेश तुमसरे यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *