Tag: चंद्रपूर पोलीस

  • स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांच्या छापेमारीत ७७ हजारांचा प्रतिबंधित मांजा जप्त

    Banned Nylon manja :चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – मानवी जीवितास धोकादायक असणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर चंद्रपूर पोलिसांचे कारवाई सत्र सुरु आहे. १२ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ७७ हजारांचा नायलॉन मांजा जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे वाचा – स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर नायलॉन मांजा, ५० हजारांचा मांजा जप्त)

    स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत वरोरा शहरातील आझाद वॉर्ड मध्ये नायलॉन मांजाची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने मानवी जीवितास व पर्यावरणास धोकादायक असलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा ४५ मग चक्री किंमत ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदर नायलॉन मांजा विक्री करीता साठवून ठेवला होता, पोलिसांनी ४० वर्षीय गीता तुळशीराम पानघाटे यांच्यावर कलम २२३, २९२, ४९ व पर्यावरण संरक्षण अधिनियम ५, १५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

    दुसऱ्या कारवाईत चंद्रपूर शहरातील रामनगर मध्ये गुन्हे शोध पथकाने छापेमारी करीत एका जनरल स्टोर्स मध्ये विक्री करिता साठवून ठेवलेला मोनोकाईट फायटर, मोनोफिल गोल्ड व हिरो प्लस प्रतिबंधित नायलॉन मांजा किंमत २३ हजार ४०० जप्त करण्यात आला. Banned Nylon manja

    या कारवाईत जनरल स्टोर्स चालक २५ वर्षीय गौरव हेमराज गोटेफोडे यांच्यावर विविध कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या दोन्ही कारवाईत एकूण ७७ हजारांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख, सपोनि नरोटे, वाघमारे, उगले, पोउपनि सर्वेश बेलसरे यांनी केली.

  • MCOCA charges filed against organized crime gang । चंद्रपूर पोलिसांनी या गुंडांच्या टोळीवर लावला MCOCA

    MCOCA charges filed against organized crime gang

    MCOCA charges filed against organized crime gang : चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीने धुमाकूळ घातला आहे, भाईगिरी, मर्डर, चोरी व दरोडा अश्या अनेक गुन्हेगारीने जिल्हा ढवळून निघाला असून यावर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करणाऱ्या बल्लारपुरातील संयुक्त गुन्हेगारीमध्ये लिप्त असणाऱ्या गुंडांच्या टोळीवर थेट मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

    सर्व सामान्य जनतेत दहशत निर्माण करणाऱ्या अनेक गुन्हयांची नोंद असलेल्या बल्लारपूर येथील कुख्यात गुंडाची टोळीतील टोळी प्रमुख नामे चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी, येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक व त्याचे इतर साथीदारांनी संयुक्तरित्या केलेल्या गुन्हयातील सदस्यांविरुध्द पोस्टे चंद्रपूर शहर येथील दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MCOCA) ची कलम लावण्यात आलेली आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा जंगलराज; वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    काही दिवसांपूर्वी हत्या सारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील काहींना अवैध शस्त्रसह पोलिसांनी अटक केली होती ज्यामध्ये ०२ माऊझर गन (पिस्टल), ०२ देशी कटट्टे, ३५ नग जिवंत काडतुस, तसेच ०४ लोखंडी धारदार खंजर असे घातक हत्यारासह दरोडा टाकण्याचे बेतात असल्याचे मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अप.क्र.७५८/२०२५ कलम ३, ४/२५ भारतीय हत्यार कायदा आणि कलम ३१० (४) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात, सदर टोळी ही दरोडा टाकुन प्राप्त पैशातून खुना सारखा गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत असल्याचे निष्पन्न झाले असुन पोलीसांच्या सतर्कतेने खुनाच्या गुन्हयास प्रतिबंध करण्यास यश आले आहे. MCOCA sections applied to gang leaders 2025

    अनेक वर्षांपासून या टोळीचा धुमाकूळ

    सदर गुन्हयातील कुख्यात टोळी ही चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी व येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक याचे नेतृत्वात स्वतःच्या टोळीचा वर्चस्व निर्माण करण्यासाठी मागील काही वर्षापासुन चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने बेकायदेशीर जमाव तयार करुन दहशत निर्माण करणे, जिवानिशी ठार करण्याचे उददेशाने खून करण्याचा प्रयत्न करणे, आपखुशीने गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, अश्लिल शिवीगाळ करणे, दंगा करणे,

    जिवे ठार मारण्याची धमकी देणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक रस्त्यामधील मार्गात अटकाव करणे, प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे, मनाई आदेशाने उल्लंघन करणे इत्यादी शिर्षकाखाली गंभीर गुन्हे केले असुन टोळीचे वर्चस्व व दहशत राहावी म्हणुन त्याद्वारे मिळणारे पैश्यावर ऐशआरामाचे, चैनीचे जीवन जगत आहेत. police foil robbery attempt by armed criminals

    हे गुन्हे या टोळीने स्वतः चे आर्थीक फायदा करण्याकरीता, वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरिता केलेले असून अद्यापही ते संघटीत पध्दतीने गुन्हेगारी कारवाया व कृत्ये सातत्याने करीत असल्याने सदर टोळीवर कायद्याची वचक व परिणामकारक प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्याविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ चे कलम समाविष्ट होणेबाबतचा आवश्यक प्रस्ताव पाठवून सदर टोळीतील

    (१) चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी वय २३ वर्ष, (२) येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक वय २७ वर्ष, (३) मुकेश राजु वर्मा वय २० वर्ष, (४) अमीत बालकृष्ण सोनकर वय २६ वर्ष, (५) गौरिश श्रीनिवास कुसमा वय १९ वर्ष, (६) अनवर अब्बास शेख वय २३ वर्ष च इतर साथीदार गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (MCOCA) ची कलम लावण्यात आली आहे. MCOCA charges filed against organized crime gang

    सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे चंद्रपूर शहर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, सफौ अरुण खारकर व पोअं गजानन नन्नावरे व मोक्का पथकाने केलेली आहे. chandrapur police

    याद्वारे सर्व जनतेला तसेच औद्योगिक क्षेत्रातील व्यवसायिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारच्या कोणत्याही गुंडांच्या टोळीच्या अवैध मागणी/खंडणीला प्रतिसाद देवु नये. किंवा त्यांच्या कृत्यांना घाबरु नये. त्यांच्या कृत्यांबाबत तात्काळ नजीकचे पोलीस स्टेशनला रिपोर्ट करुन माहिती दयावी जेणे करुन अशा स्वरुपाच्या गुन्हेगारीला वेळीच प्रतिबंध घालण्यास पोलीसांना मदत होईल.

  • Sunil Kalidas Gedam murder case । ६ लाख रुपयांच्या उसनवारीवरून घडलेली खळबळजनक घटना

    Sunil Kalidas Gedam murder case

    Sunil Kalidas Gedam murder case : नक्कीच, ही बातमी SEO-फ्रेंडली स्वरूपात येथे दिली आहे:

    उसनवार पैशाच्या वादातून सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाची हत्या; मृतदेह नाल्यात फेकला, आरोपीला अटक

    मूल, चंद्रपूर (महाराष्ट्र) | उसनवार (कर्ज) घेतलेले पैसे परत देण्यास नकार दिल्याने सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना मूल तालुक्यातील टेकाडी येथे उघडकीस आली आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात फेकून दिला होता.

    घरात शिरले अस्वल

    ६ लाख रुपयांच्या वादातून हत्याकांड

    • मृतक: सुनील कालिदास गेडाम (वय ६०, रा. भीमवाडी वॉर्ड क्र. १४, मूल), सेवानिवृत्त केंद्र प्रमुख.
    • आरोपी: किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद (वय २४, रा. टेकाडी).

    मिळालेल्या माहितीनुसार, मृतक सुनील गेडाम आणि आरोपी किस्मत सय्यद हे शुक्रवारी (२६ सप्टेंबर २०२५) रात्री ७ वाजताच्या सुमारास मूल-गडचिरोली महामार्गावरील रानसंपन्न हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते.

    हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला

    जेवणानंतर मूलकडे परत येत असताना आरोपीने महत्त्वाचे काम असल्याचे सांगून गेडाम यांना टेकाडी येथे नेले.

    • रात्री ८.३० वाजताच्या सुमारास टेकाडी वरून एमआयडीसी मार्गाने मूलकडे येत असताना, उसनवार घेतलेले सहा लाख रुपये परत देण्यास गेडाम यांनी नकार दिला.
    • याच कारणावरून आरोपी किस्मत सय्यद याने कथितरित्या आपल्या काही मित्रांच्या मदतीने सुनील गेडाम यांच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने वार केले आणि त्यांची हत्या केली.
    • हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह मरेगाव-टेकाडी मार्गावरील नाल्यात फेकून दिला.

    कुटुंबीयांची तक्रार आणि आरोपीची कबुली

    सुनील गेडाम हे घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्यांना सोबत घेऊन गेलेल्या किस्मत सय्यद याच्यावर शंका आल्याने मुलगा पंकज गेडाम यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार नोंदवली.

    दरम्यान, आकापूरजवळील वळण मार्गावर गेडाम यांची पल्सर दुचाकी (MH ३४ AX ८३२३), मोबाईल, चष्मा आणि चप्पल पोलिसांना आढळून आली.

    तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी संशयित आरोपी किस्मत मोहम्मद सय्यद अली याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने सहा लाख रुपये परत देण्यास नकार दिल्याने हत्या केल्याची आणि प्रेत लपविल्याची कबुली दिली. Kismat Ali Sayyed arrested Mul

    पुढील तपास सुरू

    पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपासणी केली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे पाठविला आहे.

    मूल पोलीस स्टेशनमध्ये आरोपी किस्मत अली विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी पुढील तपास करत आहेत.

  • crime news today । जुना वाद खेळ खल्लास, चंद्रपुरात युवकाची हत्या

    crime news today

    crime news today : चंद्रपूर – कोरपना तालुक्यातील तुकडोजी नगर येथे मंगळवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. तपासादरम्यान, ही हत्या जुन्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.

    वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    मृत व्यक्तीची ओळख विश्वास नरेंद्र मालेकर (वय २४, रा. तुळशी) अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादामुळे झालेल्या भांडणामध्ये आरोपीने विश्वास मालेकर यांना मारहाण केली आणि जोरदार धक्का दिला. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

    काही तासात आरोपी जाळ्यात

    या घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी काही तासांतच सुनील पवार (वय २३, रा. पारधीगुडा) या आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम १०३ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन, साईनाथ जायभाये, प्रभाकर जाधव आणि कोरपना पोलिस पथक करत आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे.

  • two-wheeler stolen Chandrapur arrest news । चंद्रपुरात आला रेकॉर्डवरील आरोपी आणि…

    two-wheeler stolen Chandrapur arrest news

    two-wheeler stolen Chandrapur arrest news : चंद्रपूर – २ ऑगस्ट रोजी भिवापूर वॉर्ड चंद्रपूर मध्ये राहणारे ४६ वर्षीय शैलेंद्र किसनसिंह चौहान यांनी आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत होंडा शाईन दुचाकी क्रमांक mh ४९ AC ५२९६ हि पार्क केली होती, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मोटार सायकल आपल्या जागेवर नव्हती. इतरत्र दुचाकींचा शोध घेतला मात्र ती कुठेही न आढळल्याने चौहान यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीची तक्रार दिली. motorcycle theft Bhiwapur ward

    प्रियकराने इंस्टाग्रामवर शेअर केले खाजगी व्हिडीओ, पोलिसांनी केली अटक

    पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला, तपासादरम्यान शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेतला असता यादरम्यान सदर दुचाकी वाहन हे कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर ज्योतिबा फुले चौकात राहणार रेकॉर्डवरील आरोपी २८ वर्षीय आरिफ कलंदर शेख ला पोलिसांनी अटक केली.

    दुचाकी जप्त

    आरोपी आरिफने भिवापूर वार्डातून चोरी गेलेली दुचाकी वाहन चोरी केले असल्याची कबुली दिली, पोलिसांनी आरोपी आरिफच्या ताब्यात असलेली दुचाकी वाहन जप्त केले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास पोलीस कर्मचारी जावेद सिद्दीकी करीत आहे.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, पोउपनि विलास निकोडे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर, जावेद सिद्दीकी, निकेश ढेंगे, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • boyfriend shares private video । प्रेमाचा सापळा! प्रियकराकडून खाजगी व्हिडिओ शेअर, चंद्रपूर पोलिसांची कारवाई

    boyfriend shares private video

    boyfriend shares private video : चंद्रपूर / भिसी – भिसी पोलिसांनी एका तरुणाला बलात्कार आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. राकेश कैलास चौधरी (वय २२) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने एका १९ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत तीन वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर, त्याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर व्हायरल केले.

    मनोरंजनाच्या नावावर जुगार क्लब, पोलिसांची धाड

    तरुणीची बदनामी

    पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, राकेश चौधरी आणि तिच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात राकेशने तिचे अनेक अश्लील व्हिडिओ गुप्तपणे काढले. नंतर याच व्हिडिओंचा धाक दाखवून त्याने तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ९ ऑगस्ट रोजी त्याने हे व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करून तरुणीची बदनामी केली.

    ही गोष्ट लक्षात येताच तरुणीने आपल्या कुटुंबियांसोबत भिसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार मंगेश भोंगाडे आणि त्यांच्या टीमने तात्काळ कारवाई करत आरोपी राकेशला अटक केली.

    त्याच्यावर बलात्कार आणि ॲट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करत आहेत.

  • repeat offender jailed under MPDA Chandrapur । चंद्रपूर पोलिसांचा मोठा दणका – दहशत माजवणाऱ्या गुंडावर MPDA अंतर्गत कारवाई

    repeat offender jailed under MPDA Chandrapur

    repeat offender jailed under MPDA Chandrapur : चंद्रपूर – ९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर चंद्रपूर पोलिसांनी MPDA कायदा अंतर्गत कारवाई करीत त्या गुन्हेगाराला वर्षभरासाठी मध्यवर्ती कारागृह चंद्रपूरमध्ये स्थानबद्ध करण्यात आल्याचा आदेश २४ जुलै रोजी पारित करण्यात आला.

    चंद्रपूर पोलिसांच्या रेकॉर्डवरील धोकादायक व्यक्ती कुख्यात गुंड, जबरी चोरी, अंमली पदार्थाची विक्री करणारा, विनयभंग असे तब्बल ९ गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार २९ वर्षीय शारुख शेरखान पठाण राहणार रवींद्र नगर वॉर्ड बल्लारपूर याची परिसरात सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली होती. Chandrapur criminal profile nine serious offences

    महाराष्ट्र औद्योगिक संस्थांमध्ये क्रांतिकारी बदल

    वर्षभरासाठी स्थानबद्ध

    गुन्हेगार शारुख पठाण याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधित कारवाई पोलिसांनी केली मात्र तो कायद्याला जुमानत नव्हते. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृक्श्राव्य कलाकृती, विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सण १९८१ सुधारणा २००९, २०१५ अनव्ये प्रस्ताव तयार करून जिल्हादंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्याकडे सादर केला असता त्यांनी प्रस्तावाची दखल घेत शारुख शेरखान पठाण ला १ वर्षाकरिता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश २४ जुलै रोजी पारित केला. शारुख पठाण ला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव ,, अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक विपीन इंगळे, सपोनि पठाण, पोलीस कर्मचारी मिलिंद आत्राम, स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सपोनि योगेश खरसाण, अरुण खारकर, सुधीर मत्ते, परिवरीश शेख, संजय वाढई, महिला पोलीस छाया निकोडे, उषा लेडांगे व अपर्णा मानकर यांनी केली.

  • police operations in chandrapur district । देशी कट्टा, तलवार सहित अवैध धारदार शस्त्रे जप्त, चंद्रपूर गुन्हेगारीचा नवा हॉटस्पॉट?

    police operations in chandrapur district

    police operations in chandrapur district : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा गुन्हेगारीचा हब बनू पाहत आहे, सध्या नवे भाई म्हणून अल्पवयीन मुले पुढे येत आहे, जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश वाढत असून हि पोलीस विभागासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी निर्माण होणार अशी शक्यता आहे. चंद्रपूर पोलीस विभागाने जिल्ह्यात देशी कट्टा, तलवार व धारदार शस्त्रे जप्त केले असून सदरची कारवाई घुग्गुस, मूल व राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली आहे.

    मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेमकं काय घडलं?

    २६ जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास गुन्हे शोध पथकाला चंद्रपूर – मुल रोडवर, VP बियर शॉपी समोर नामे शोहेब पठाण, वय – २३ वर्षे, व एक १७ वर्षीय विधी संघर्ष बालक हे त्यांचे ताब्यातील TVS jupiter मॉपेड वाहन डिक्की मध्ये धारधार शस्त्र ठेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने व गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या मिळून आले. त्यांचे विरुद्ध कलम ४,२५ Arms act, ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शोहेब पठाण यास अटक करण्यात आली आहे. youth gang violence trends

    घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशी कट्टा

    २६ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शास्त्रीनगर परिसरात गावठी बनावटीचा कट्टा सह एक जिवंत काडतूस जप्त केले. या धाडीत २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. घुग्गुस मधील वार्ड क्रमांक ५ शास्त्रीनगर मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहितीच्या आधारे कारवाई केली. या कारवाईत २८ वर्षीय सोनूलाल उर्फ नन्नू कैथल या युवकांकडून देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. Chandrapur Police Are Seizing Illegal Arms

    चंद्रपूर पोलिसांनी युवकाला केली अमानुष मारहाण, गंभीर आरोप

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे व हिरालाल गुप्ता यांनी केली.

    राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेल्वे वसाहत समोरील परिसरात सोनिया नगर मध्ये १९ वर्षीय युवकांकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपीवर राजुरा पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    Somayya institute of technology

    चुनाभट्टी वॉर्ड राजुरा मध्ये राहणारा १९ वर्षीय अकिब नासिर खान या युवकाने स्वतःजवळ ८१ सेंटीमीटर लांबी ची लोखंडी तळावर ठेवली होती, मात्र काही गुन्हा घडण्यापूर्वी राजुरा पोलिसांनी छापामार कारवाई करीत तलवार जप्त केली. illegal weapons seizure

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, शफिक शेख, महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे, बालाजी यामलवार, अविनाश बांबोळे व राजीव दुबे यांनी केली.

  • illegal police entry without warrant । युवकाला अमानुष मारहाण, चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप

    illegal police entry without warrant

    illegal police entry without warrant : चंद्रपूर – पिडीत युवक आनंद गेडाम ची आई अनिता गेडाम यांनी पत्रकार परिषदेत घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करणाया आणि तिच्या मुलाला जबरदस्तीने घेऊन जाणाया आणि अमानुष अत्याचार करणाया पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पथकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तिने सांगितले की, ती मित्रनगर येथील डॉ. आंबेडकर कॉलेजच्या मागे राहते.

    रस्ते अपघातात बिबट्याचा मृत्यू

    24 तारखेच्या रात्री १ वाजता पोलिस अधिकारी देवराव नरोटे आणि त्यांच्या पथक समेत चार महिला पोलिस होते. त्यांनी कोणतीही सूचना आणि वॉरंटशिवाय घराचे गेट तोडले आणि दगडफेक करून बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. यादरम्यान त्यांनी घरातील लोकांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली. आनंदचा फोटो घ्यायचा आहे असे सांगून मनमानी पध्दतीने वागण्यास सुरुवात केली. chandrapur police brutality case

    पोलिस कर्मचायांचे असे वर्तन पाहून तिचा मुलगा आनंद गेडाम घरातून पळून गेला. लवकरच पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पथकाने त्याला पकडले, रागंबर आणि ठाकूरच्या घरी नेले आणि तेथे अमानुष मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला गल्लीत फेकून देण्यात आले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला सरकारी रुग्णालयात पाठवले आणि पोलिस तेथून निघून गेले असा आरोप पिडीत युवकाची आई अनिता गेडाम यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांवर केला. victim rights in police brutality cases

    राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल

    तिने पुढे सांगितले की, दुस_या दिवशी फोन येताच कुटुंब त्याला सरकारी रुग्णालयात भेटण्यासाठी गेले. पिडीत आनंदची प्रकृती खूपच गंभीर होती. सीटी स्कॅन आणि इतर चाचण्यांनंतर डॉक्टरांनी त्याला तात्काळ नागपूर मेडिकलमध्ये रेफर केले. सध्या आनंद खाजगी पोद्दार रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. आनंद गेडाम यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती अनिता गेडाम यांनी दिली.

    Somayya institute of technology
    पीडित अनिता गेडाम यांनी पोलीस अधिकारी देवराव नरोटे आणि त्यांच्या टीमवर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर मानवाधिकार उल्लंघनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातुन केली आहे.

    याबाबत सहायक पोलीस निरीक्षक देवराव नरोटे यांच्याशी अधिक माहिती करीता व त्यांची बाजू जाणून घेण्याकरिता संपर्क साधला असता त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही.

    या उपरांत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद गेडाम यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर MPDA कायद्यांतर्गत कारवाई करायची असल्याने पोलीस पथक त्याला ताब्यात घेत जिल्हाधिकारी यांच्यासमोर हजर करणार होते, मात्र त्या कालावधीत आनंद च्या आईने पोलिसांचा रस्ता अडविला तब्बल २ तास पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि आनंद हा घरातील कवेलु काढत पळून गेला, पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो ३ मजली इमारतीवर लपला मात्र पोलीस येण्याची चाहूल लागताच त्याने दुसऱ्या मजल्यावर टिनाच्या शेड वर उडी मारली आणि पडला, यामध्ये तो जखमी झाला. पण पोलिसांनी आनंद ला सोबत घेत याआधी रुग्णालयात दाखल केले. युवकाच्या आईने केलेले सर्व आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहे.

  • illegal oyo hotels in chandrapur । 🚔 “OYO नावाखाली बनावट धंदा! चंद्रपूरच्या १५ लॉजेसवर गुन्हे दाखल!”

    illegal oyo hotels in chandrapur

    illegal oyo hotels in chandrapur : चंद्रपूर – जोडप्यांचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या OYO हॉटेल चा लोगो वापरणाऱ्या हॉटेल व लॉजेस मालकांवर चंद्रपुरात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यापूर्वी आमदार जोरगेवार यांनी oyo हॉटेल्स ची चौकशी करण्याची मागणी केली होती, पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो प्रकरण चांगलेच गाजवले. जगभरात ओयो हॉटेलचे लाखो रूम्स आहे मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अवैध पद्धतीने कंपनीच्या संमती शिवाय ओयो सुरु आहे. oyo trademark misuse cases

    अहमदाबाद मधील OYOचे नोडल अधिकारी यांनी १८ जुलै रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली कि ओयो रूम्स हि कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी असून ओयो रूम्स हे कंपनीचे ट्रेडमार्क आहे, इतर हॉटेलपेक्षा कमी बजेट मध्ये ओयो रूम्स उपलब्ध होतात मात्र चंद्रपुरात ओयो कंपनीचा ब्रँड लोगो बनावट पध्द्तीने बनवीत त्याचा हॉटेल व लॉज मालक व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी कंपनीकडे प्राप्त झाल्या होत्या. fake oyo hotel logo case chandrapur

    चंद्रपुरात गांजा विक्री महिलांच्या हाती

    याबाबत शहानिशा करण्यासाठी कंपनीचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांनी गोपनीयरित्या याबाबत माहिती घेतली असता चंद्रपूर शहरातील एकूण १५ हॉटेल व लॉजेस कंपनीच्या संमतीशिवाय बनावट ओयो लोगो वापरीत त्याचा व्यवसायात गैरवापर करीत असल्याचे आढळले. याबाबत नोडल अधिकारी यांनी संबंधित हॉटेल व लॉज मालकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली.

    हे हॉटेल व लॉज करीत होते ओयो चा व्यवसायात वापर

    • Hotel Royal Inn, ballarpur road, chandrapur
    • Hotel Dream Stay, ashtabhuja
    • Hotel Friends Stay, Ballarpur road
    • Leo Star Hotel, ashtabhuja ward
    • Hotel RR Inn, babupeth
    • Hotel Sky Line, Ashtabhuja ward
    • Hotel Ashoka Lodging and Boarding, babupeth
    • Hotel IK Residency, vikas nagar
    • hotel 3 star Babupeth
    • Hotel Celebrity, babupeth
    • Hotel Green Park, babupeth
    • Hotel 7 Day, Mahakali Mandir Road
    • Hotel Sunrise, Jatpura Gate
    • Rayan Hotel & Celebration, Vichoda
    • Hotel Flagship Inn, near janta college

    चंद्रपूर शहर पोलिसांना तक्रार प्राप्त होताच संबंधित हॉटेल व लॉज मालकांवर भारतीय न्यायसंहिता २०२३ सहकलम १०३, १०४ ट्रेडमार्क अधिनियम १९९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहर हद्दीतील ८ लॉजेस वर धाडी टाकत आवश्यक कारवाई करण्यात आली असून सदर प्रकरणाचा पुढील व सखोल तपास सुरु करण्यात आला आहे.