Tag: चंद्रपूर पोलीस

  • illegal BT cotton seed trafficking Maharashtra । चोर BT बियाण्यांची चंद्रपूरमध्ये मोठी खेप पकडली

    illegal BT cotton seed trafficking Maharashtra

    illegal BT cotton seed trafficking Maharashtra : चंद्रपूर/बल्लारपूर – राज्यात चोर बीटी बियाण्यांवर बंदी असताना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात याचा सर्रासपणे वापर सुरु आहे, इतर राज्यातून चोर बीटी बियाण्यांची वाहतूक सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात चोर बीटी बियाण्यांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत १२ लक्ष रुपयांचे चोर बीटी बियाणे पकडले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पतीच्या सततच्या असह्य त्रासाने कंटाळून पत्नीने केली पतीची हत्या

    १२ लक्ष रुपयांचे बियाणे जप्त

    १४ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांना चोर बीटी बियाण्यांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी विसापूर-बल्लारपूर मार्गावर नाकेबंदी करीत वाहनांची तपासणी करीत होते इतक्यात वाहन क्रमांक mh ४० AB-२३५६ ला थांबविता पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये ८०० मग चोर बीटी पुष्पा संशोधित हायब्रीड कापूस बियाणे प्रति पॉकेट एक हजार पाचशे रुपये प्रमाणे १२ लक्ष रुपयांचा माल सहित वाहन असा एकूण १३ लक्ष ५० हजारांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला. BT cotton seed smuggling arrested in Chandrapur

    पोलिसांनी बियाण्यांची पडताळणी व कारवाई संबंधात कृषी विभागाला माहिती दिली, कृषी विभागाच्या अहवालावरून वाहन चालक ३७ वर्षीय इम्रान खान नासिर खान राहणार बगड खिडकी चंद्रपूर व माल मालक सुमित नगराळे राहणार आष्टी, जिल्हा गडचिरोली यांच्यावर पोलीस स्टेशन बल्लारपूर मध्ये भारतीय न्याय संहिता सहकलम १४, ७ (अ), ७ (क), ७ (ड), १९ बीज अधिनियम १९६६ व बियाणे नियंत्रक आदेश १९८३ चे कलम ३,८,१ तसेच बियाणे नियम १९६८ चे कलम ८,९,१०,११ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ८,१५, १५ (१),(२, १६ (१),(२) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ (२) (ड) ७ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे. Chandrapur smuggled BT cotton seed bust

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार व स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी केली.

  • safety tips against fake police fraud । चंद्रपुरात तोतया पोलिस? चंद्रपूर पोलिसांचे आवाहन

    safety tips against fake police fraud

    safety tips against fake police fraud : चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगार आता नवीन युक्त्या काढत गुन्हे करीत आहे, काही महिन्यापूर्वी तोतया पोलिसांनी मूल तालुक्यात वाळू तस्करांकडून पैसे घेतले होते, त्यांनतर वाळू तस्कराने याबाबत पोलिसांना सूचना देत त्या तोतया पोलिसांना जेलवारी करायला लावली, मात्र त्या वाळू तस्करावर काही कारवाई झाली नाही, हे विशेष.

    चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे कि सध्या जिल्ह्यात काहीजण पोलीस असल्याचे सांगत एकट्या दुकट्या नागरिकांना लक्ष करीत त्यांना लुटत आहे.

    परप्रांतीय कामगाराना आता पोलीस पडताळणी आवश्यक, आमदार अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश

    मोटार सायकलवर सध्या वेशातील तोतया पोलीस रस्त्यावर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पोलीस असल्याचे सांगत सध्या दागिन्यांसाठी हत्येसारखे गंभीर गुन्हे घडत आहे त्यामुळे आपण आपले दागिने काढून रुमालात किंवा कागदात गुंडाळून ठेवण्याचा सल्ला देत हात चलाखीने दागिने लुटून पळ काढत आहे. fake police officer scam

    संपर्क साधा, डायल ११२

    त्यामुळे असा प्रसंग ओढवू नये याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, जर कुणी असे सांगितले तर त्याला त्याचे ओळखपत्र मागावे व जवळील पोलीस स्टेशन किंवा नियंत्रण कक्ष येथील टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क करून माहिती द्यावी. fake police robbing people

    चंद्रपूर पोलीस हे गणवेशातच पेट्रोलिंग करतात, व नागरिकांना दागिने काढून रुमालात ठेवा असे कुणाला सांगत नाही, त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अश्या तोतया पोलिसांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देत सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.

  • police mock drill in temple । चंद्रपूरमध्ये दहशतवादी हल्ल्याची झलक! पोलिसांचं सशक्त प्रत्युत्तर

    police mock drill in temple

    police mock drill in temple : चंद्रपूर – भविष्यातील संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपूर पोलीस दलाकडून आज (२४ मे) श्री माता महाकाली मंदिर परिसरात “दहशतवादी हल्ला आणि ओलीस मुक्तता” यावर आधारित रंगीत तालीम घेण्यात आली. या तालिमीत हल्ला झाल्यास पोलीस यंत्रणा कशी प्रतिसाद देईल आणि ओलीस बनवलेल्या नागरिकांची सुटका कशी केली जाईल, याचे अत्यंत शिस्तबद्ध प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. how police handle terrorist attacks

    चंद्रपुरात आमदार-खासदार यांच्यात सुरु झाली श्रेयवादाची लढाई

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली तर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू यांच्या नेतृत्वात पार पडली.

    काय होता तालिमिचा घटनाक्रम?

    दुपारी २ वाजता मंदिर परिसरात चार दहशतवाद्यांनी शस्त्राचा धाक दाखवून भाविकांना ओलीस ठेवल्याची माहिती पोलीस कंट्रोलरूमला मिळाली. त्वरित प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक तथा प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री योगेश्वर पारधी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विविध पोलिस पथकांना रवाना केले. how police conduct rescue operation

    या वेळी ATB, QRT, RCP, BDDS, K9, C-60, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, पोलीस रुग्णालय वैद्यकीय पथक इत्यादी सर्व यंत्रणा काही क्षणांत घटनास्थळी दाखल झाल्या.

    अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी ताबा घेत तंतोतंत नियोजनानुसार सर्व पथकांना समन्वयात ठेवत कोणतीही जीवितहानी न होता प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पूर्ण केले. दहशतवाद्यांचा “खात्मा” करीत ओलीस बनवलेले सर्व नागरिक सुखरूपपणे वाचवले गेले.

    how to handle terrorist attack

    कोण होते सहभागी?

    ही तालीम यशस्वी करण्यासाठी पुढील अधिकाऱ्यांचे विशेष योगदान होते:

    • श्री प्रमोद चौगुले (परि. पोलीस उपअधीक्षक)
    • श्री प्रवीण कुमार पाटील (पो.नि. वाहतूक शाखा)
    • श्री अमोल काचोरे (पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा)
    • श्रीमती प्रभावती एकुरके (पो.नि. पो.स्टे. चंद्रपूर शहर)
    • श्री धर्मेंद्र मडावी (सहाय्यक पोलीस निरीक्षक, C-60)
    • श्री प्रवीण सोनोने (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक)
    • श्री शिरभाते (उपनिरीक्षक, सुरक्षा शाखा)
    • श्री खोंडे (उपनिरीक्षक, BDDS)
    • श्री भोयर (उपनिरीक्षक, ATB)
    • डॉ. कुरेशी (पोलीस वैद्यकीय अधिकारी)

    तसेच पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर व रामनगर, तसेच संबंधित सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट समन्वय ठेवून प्रात्यक्षिक यशस्वी केले.

    how police conduct rescue operation

    नागरिकांची घबराट टाळण्यासाठी काळजी

    या काळात मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली होती. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता आणि सार्वजनिक जागांवर जनजागृतीही करण्यात आली.

  • Ghugghus police rescued a minor girl । चंद्रपूरमधील लैंगिक शोषण प्रकरण: घुग्घुस पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या!

    Ghugghus police rescued a minor girl

    Ghugghus police rescued a minor girl : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला मुलीसह घुग्गुस पोलिसांनी शोधून काढले, पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक शोषण प्रकरणात फरार असलेल्या पीडित बालिका आणि आरोपीला घुग्घुस पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातून शोधून काढत ताब्यात घेतले आहे. पोस्टे घुग्घुस येथे दाखल असलेल्या अपराध क्रमांक 89/025, कलम 137(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत दाखल गुन्ह्यात ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. Ghugghus police rescue minor victim

    ४ महिन्यात होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, चंद्रपुरातील राजकीय परिस्थिती काय?

    दिनांक ५ मे रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पीडित बालिका ही आरोपीसोबत वर्धा जिल्ह्यातील कपाशी, राळेगाव भागात असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे SDPO श्री. सुधाकर यादव यांच्या आदेशावरून आणि पोलिस निरीक्षक श्री. प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

    सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन तायवाडे यांच्या समन्वयाने तयार करण्यात आलेल्या या पथकात API योगेश पाटील, पोलिस हवालदार अनिल बैठा, व पोलिस शिपाई अलकेश सावंत यांचा समावेश होता. या पथकाने तत्काळ वर्ध्याकडे रवाना होऊन वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पीडित बालिका आणि आरोपीला ताब्यात घेतले व चंद्रपूर येथे आणले. Chandrapur Crime News

    ६ मे रोजी पीडितेचे पोलिसांकडून विधीपूर्वक बयान नोंदवण्यात आले असून, तिच्या लैंगिक शोषणाची पुष्टी झाल्याने आरोपीवर भा.द.वि. कलम 64, 64(2)(M) व पोक्सो कायद्यान्वये (कलम 4 व 6) वाढीव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव मधुकर बापूराव समर्थ (वय ४८, रा. घुग्घुस, चंद्रपूर) असे आहे.

    आरोपी व पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून, पुढील तपास घुग्घुस पोलिस करीत आहेत.

  • new cyber frauds : चंद्रपूर पोलीस म्हणतात या पोलिसांपासून सावध रहा

    new cyber frauds : चंद्रपूर पोलीस म्हणतात या पोलिसांपासून सावध रहा

    new cyber frauds देशात आज नवनवीन फसवे प्रकरण समोर येत आहे, देश तंत्रज्ञानात पुढे जात आहे त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाचा वापर नवनवीन गुन्ह्यासाठी होत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत नामवंत व्यक्तींची फसवणूक झाली हे विशेष.

    महत्त्वाचे : वरोरा विधानसभा क्षेत्रात खासदार धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

    New cyber frauds हॅलो मी पोलीस बोलत आहो, आपल्या मुलाला गंभीर गुन्ह्यात आम्ही अटक केली असून त्याला सोडवायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील अश्या प्रकारचे व्हाट्सएप कॉल अनेक नागरिकांना येत आहे, काही या कॉल ला बळी पडतात तर काही सजग असतात.

    विशेष म्हणजे कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या डीपीवर पोलिसांचा फोटो असतो, चंद्रपुरातील काही सराफा व्यापाऱ्यांना त्यांच्या खाजगी मोबाईल क्रमांकावर पोलीस डीपी असणारे व्हाट्सएप कॉल येत असून पुढचा व्यक्ती धमकी देत अटकेती भीती दाखवीत आहे. New cyber frauds

    यावर आज चंद्रपूर पोलिसांनी सराफा व्यापारी व नागरिकांना आवाहन केले की इतर राज्यातील पोलीस हे स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय कुणालाही अटक करू शकत नाही, सीबीआय, पोलीस व ईडी अधिकारी म्हणून कुणी कॉल करीत असेल किंवा व्हिडीओ कॉल करण्यास आग्रह करीत असेल तर अश्या कॉल पासून सावध रहावे कारण हा एक नवीन सायबर फसवणुकीचा प्रकार असून त्याला बळी पडू नका.

    आपल्याला कुणी अश्याप्रकारे धमकी, पैश्याची मागणी किंवा ब्लॅकमेल करीत असेल तर तात्काळ HTTPS://cybercrime.gov.in या संकेत स्थळावर रिपोर्ट and check suspect करावी किंवा 1930 वर कॉल करून सायबर गुन्ह्यांची तक्रार करावी.

  • Special Inspector General of Police : गुन्हेगारांची यादी तयार करा – डॉ. दिलीप पाटील भुजबळ

    Special Inspector General of Police : गुन्हेगारांची यादी तयार करा – डॉ. दिलीप पाटील भुजबळ

    Inspector General of Police आगामी काळात महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांची सीमा तेलंगणा राज्याला लागून आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका मुक्त वातावरणात तसेच पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील अधिका-यांनी आंतरराज्यीय समन्वय उत्तम ठेवावा, अशा सुचना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिल्या.

    महत्त्वाचे : बाबूपेठ उड्डाणपुल वाहतुकीसाठी होणार खुला, आमदार जोरगेवार यांचं वक्तव्य

    Inspector General of Police वन अकादमी येथे आज (दि.9) चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली तसेच तेलंगणा राज्यातील आदिलाबाद आणि आसिफाबाद या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिका-यांची आंतरराज्यीय समन्वय बैठक पार पडली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, आसिफाबादचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक आर. प्रभाकर राव, आदिलाबादचे विशेष शाखेचे पोलिस अधिक्षक श्रीनिवास पोथारम, गडचिरोलीचे पोलिस उपअधिक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुभाष चौधरी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    सहा महिन्यांपूर्वीच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, असे सांगून विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले, निवडणुकीच्या काळात अवैध रक्कमेची ने-आण, अवैध दारू वाहतूक तसेच अंमली पदार्थ तस्करी आदी बाबी रोखण्यासाठी आंतरराज्यीय अधिका-यांमध्ये उत्तम समन्वय असणे गरजेचे आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मुक्त आणि पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तेलंगणाच्या सीमेवर 6 बॉर्डर चेक पोस्ट आहेत. या ठिकाणी तसेच इतरही सीमेवरील क्षेत्रात एस.एस.टी., व्ही.एस.टी. टीमचे तात्काळ गठण करावे. सोबतच महसूल विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वनविभाग आणि पोलिस विभागाने सुद्धा दक्ष असावे. (Inspector General of Police)

    आंतरराज्यीय वरिष्ठ अधिका-यांसोबत वैयक्तिक भेट घ्या : आंतरराज्यीय वरिष्ठ अधिका-यांनी एकमेकांचे नाव, संपर्क क्रमांक तसेच सीमेवर असलेल्या चेक पोस्टवरील अधिका-यांची नावे आणि मोबाईल क्रमांक एकमेकांस शेअर करावेत. सीमेवरील चेक पोस्ट वर अधिका-यांची योग्य ड्यूटी लावावी. आंतरराज्यीय अधिका-यांनी उत्तम समन्वय आणि संपर्क ठेवावा. आसिफाबाद आणि आदिलाबादच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी वैयक्तिक भेट घ्यावी. Chandrapur police

    गुन्हेगारांवर कडक कारवाई करा : निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी गुन्हेगारांची यादी करून त्यांच्यावर तसेच गो – तस्करी, धार्मिक भावना भडकविणारे असामाजिक तत्व आदी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी. निवडणुकीच्या काळात अवैधरित्या रक्कम, दारू आदींची देवाण-घेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अवैध वाहतुकीचे मार्ग, पुरवठादार व साठवणूदार यांच्यावर कारवाई करावी. बॉर्डर चेक पोस्टवर सीसीटीव्ही, वायरलेस इत्यादी साहित्य पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सुचना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिल्या. (Inspector General of Police)

    जिल्हाधिका-यांनी केले सादरीकरण : यावेळी सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ असून जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघाची सीमा तेलंगणातील आदिलाबाद आणि आसिफाबाद या जिल्ह्यांना लागून आहे. तेलंगणाच्या सीमेवर 6 चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. तर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले, दोन्ही जिल्ह्यात उत्तम समन्वय असून एकमेकांना माहितीचे आदान-प्रदान करण्यात येते. यावेळी यवतमाळ, गडचिरेाली, आसिफाबाद आणि आदिलाबाद येथील अधिका-यांनीसुध्दा सादरीकरण केले.

    बैठकीला चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी, वन अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  • chandrapur police : पुरुषोत्तम चा मृत्यू पोलिसांमुळे – कुटुंबाचा खळबळजनक आरोप

    chandrapur police : पुरुषोत्तम चा मृत्यू पोलिसांमुळे – कुटुंबाचा खळबळजनक आरोप

    chandrapur police माझ्या मुलांकडून पोलीस नेहमी पैसे घ्यायचे, त्याला मारहाण करायचे पोलिसांच्या त्रासामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केली असा खळबळजनक आरोप 32 वर्षीय पुरुषोत्तम सहारे यांच्या कुटुंबीयांनी 26 सप्टेंबर ला केला आहे.

    Chandrapur police 1 जुलै 2024 रोजी रोशन पाटील यांचा मृतदेह लोढीया हॉस्पिटल जवळ आढळला होता, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, आणि तपास सुरू केला, मृतक हा बागला चौक येथे राहणारे 32 वर्षीय पुरुषोत्तम सहारे यांचे मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी पुरुषोत्तम सहारे यांना याबाबत विचारपूस केली. पुरुषोत्तम सोबत या प्रकरणी पुन्हा 3 जणांचे नाव आहे, 3 पैकी एकाने आधीच आत्महत्या केली अशी माहिती आहे. तर 25 सप्टेंबर ला पुरुषोत्तम यांनी राहत्या घरी पाळण्याच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

    अवश्य वाचा : आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घ्या – जिल्हाधिकारी विनय गौडा

    मागील 2 महिन्यापासून पुरुषोत्तम ला शहर पोलीस तपासाच्या नावावर त्रास द्यायचे, तुझे प्रकरण मॅनेज करतो म्हणून आर्थिक देवाणघेवाण सुद्धा करायचे, अनेकदा पोलिसांनी पोलीस स्टेशनमधील कॅमेऱ्याच्या आड पैसे घेतले असा आरोप सहारे कुटुंबीयांनी लावला आहे. Chandrapur police

    25 सप्टेंबर ला पुरुषोत्तम सहारे यांना पोलिसांनी तपास कामी ठाण्यात बोलावले, त्यावेळी पुरुषोत्तम यांनी आई व पत्नीला 5-5 हजार मागितले, पुरुषोत्तम पोलीस स्टेशनमध्ये गेला, त्यानंतर तो जेवायला घरी आला, ज्यावेळी तो घरी आला तेव्हा तो मानसिकरित्या अस्वस्थ होता, मला पोलीस खूप त्रास देत आहे, मला आजही मारहाण केली व तुला जैलात टाकतो अशी धमकी दिली, असे त्याने आपल्या पत्नीजवळ सांगितले, दुपारी 1 वाजताच्या सुमारास लहान मुलींसाठी घरात लावलेल्या पाळण्याच्या दोरीने पुरुषोत्तम ने गळफास घेत आत्महत्या केली.

    चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप

    गळफास लावलेल्या स्थितीत पुरुषोत्तम आढळल्याने पत्नी ने हंबरडा फोडला, त्याला तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पुरुषोत्तम ला मृत घोषित केले, माझ्या मुलाचा मृत्यू हा पोलिसांच्या छळामुळे झाला असा आरोप पत्नी, आई-वडील यांनी केला. Chandrapur police

    मागील 2 महिन्यापासून तपासाच्या नावाखाली पुरुषोत्तम ला पोलिसांद्वारे मारहाण करीत पैसे उकळण्याचा प्रताप पोलिसांनी सुरू केला असा आरोपही यावेळी सहारे कुटुंबाने केला.

    26 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तम च्या कुटुंबाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेत न्यायाची मागणी केली, पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आश्वासन दिले अशी माहिती हौसलाल सहारे यांनी दिली.

    पोलीस काय म्हणतात?

    रोशन पाटील यांचा मृत्यू नेमका कश्याने झाला? त्याबाबत पुरुषोत्तम दोषी होता का? नेमका घटनाक्रम काय आहे? पुरुषोत्तम सोबत असलेले ते तिघेजण कोण? त्यामध्ये सुद्धा एकाने आत्महत्या केली त्याचे नाव काय? याबाबत माहिती घेण्यासाठी पोलिसांना सम्पर्क साधला मात्र पोलीस निरीक्षक एकुरके यांनी मोबाईल वर कॉल उचलण्याची तसदी सुद्धा घेतली नाही, तपास अधिकारी नंदूरकर यांना सुद्धा विचारणा केली असता सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक मॅडम यांना विचारा असे सांगितले.

    पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना सुद्धा सम्पर्क साधला असता त्यांचा मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज होता.

    पोलिसांच्या या माहिती न सांगण्याच्या प्रकाराची वर्तणूक खूप काही सांगत आहे असे यावरून स्पष्ट होत आहे.

    सहारे कुटुंबाने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना न्याय व पोलीस उपनिरीक्षक नंदूरकर व सहायक पोलिस निरीक्षक (नाव गुलदस्त्यात) यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे. Chandrapur police

    येणाऱ्या काळात पुरुषोत्तम ला न्याय मिळणार काय? यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. पोलिसांनी प्रामाणिक प्रयत्न व चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे, नाहीतर श्रीमंतांना एक आणि गरिबांना एक न्याय अशी व्याख्या खरी ठरू नये म्हणजे झालं.

  • Oyo Hotel : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो का आले चर्चेत?

    Oyo Hotel : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो का आले चर्चेत?

    oyo hotel चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेले oyo हॉटेल पुन्हा चर्चेत आले असून त्याचे कारणही तसेच आहे, मात्र यावर चौकशी होणार का? हा सध्यातरी संशोधनाचा विषय आहे.

    Oyo hotel वर्ष 2012 मध्ये Oyo चे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी कमी किमतीत व कमी वेळेत लोकांना हॉटेल बुक करण्यात यावे यासाठी oravel stays च्या नावाने स्टार्ट अप सुरू केला होता, 2013 मध्ये अग्रवाल यांनी स्टार्टअप चे नाव oyo ठेवले आणि या ओयो ने जगात एकच धुमाकूळ घातला. Oyo चा अर्थ म्हणजेच on your own असा आहे.

    सुरुवातीला बजेट हॉटेलचा यामध्ये समावेश होता, हळूहळू ओयो ने जगात पाय पसरवीत तब्बल 80 देशात व्यवसाय सुरू केला असून त्यांनी 10 लाख खोल्या भाडेतत्वावर घेतल्या आहे. आज प्रत्येक पर्यटन स्थळ देशात ओयो चे काम धडाक्यात सुरू आहे, मात्र याबाबत चंद्रपूर जिल्ह्यात चौकशी करण्याची मागणी का झाली आहे, यावर आपण माहिती जाणून घेऊ या.

    महत्त्वाचे : मुख्यमंत्री योजनादुत मध्ये काम करायचे आहे? तर असा करा अर्ज

    Oyo hotels in chandrapur बल्लारपूर शहरात अल्पवयीन मुलीसोबत मुलाने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्याबाबत पोलिसात तक्रार झाली, मुलाला अटक झाली मात्र मुलीने दुसऱ्या दिवशी आत्महत्या करीत आपले आयुष्य संपविले, आता आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की यामध्ये ओयो चा काय दोष? दोष आहे, कारण या हॉटेल मध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश नाही, कोणत्याही मुलांसोबत या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश नाकारण्यात येतो मग बल्लारपूर मधील त्या ओयो मध्ये परवानगी त्यांना कशी देण्यात आली?

    ओयो रूम बुक करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर होतो, आपल्याला आधारकार्ड व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यावर रूम बुक होते, मात्र काही ओयो हॉटेल धारक हे नियम पायदळी तुडवीत पैसे कमविण्याच्या नादात अल्पवयीन मुलींना प्रवेश देण्याचे काम करतात, चंद्रपुर शहरात तर झाडी-झुडपात ओयो हॉटेल सुरू आहे, शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या मागे जंगल भागात ओयो सुरू आहे? ती परवानगी त्यांना कशी मिळाली? त्यावर कारवाई का नाही? कारण त्याठिकाणी असे अनेक प्रकार झाल्याची चर्चा सुरू आहे? ओयो च्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सुद्धा अनेक अल्पवयीन मुलींना बघितलं असल्याची माहिती दिली आहे.

    Oyo hotel बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक, यासह मनसे ने सुद्धा ओयो हॉटेलची चौकशी करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने ओयो ची वाढ होत आहे, ओयो नी जर नियमानुसार कार्य केले तर कुणीही त्याच्यावर नाव बोटं ठेवणार नाही मात्र अल्पवयीन मुलींना प्रवेश दिल्यास ओयो धारक मोठ्या अडचणीमध्ये येऊ शकतो हे निश्चित.

    ओयो हॉटेल: ओयो चंद्रपूर जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करत आहे का? ऑनलाइन प्रणाली वापरून ओयो रूम्स ऑनलाइन बुक करता येतात, जिथे आधार कार्ड आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर रूम बुक केली जाते. मात्र, काही ओयो हॉटेल मालक योग्य पडताळणी न करता बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुलींना प्रवेश देऊन या यंत्रणेचा गैरफायदा घेत असून अशा घटना चंद्रपूर शहरात विशेषत: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया मागील जंगल परिसराजवळ घडत असल्याचा संशय आहेत. त्यांनी यासाठी परवानगी कशी मिळवली आणि कारवाई का झाली नाही? ओयो जवळील रहिवाशांच्या देखील अशा घटना लक्षात आल्या आहेत ज्यात अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

  • Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Section 36 जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून 19 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे.

    Section 36 या दहा दिवसांत विविध धार्मिक सण /उत्सव कार्यक्रम होत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला  बाधा पोहचु नये, यासाठी  4 ते 19 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू आहे.

    अवश्य वाचा : ताडोबा रिसॉर्ट च्या नावाने 41 लाखांची फसवणूक

    Section 36 या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणे बाबत, सभेचे आयोजन व मिरवणुक काढण्याबबात, मिरवणूकीचे मार्ग निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. यात अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,  आ) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ  लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे  इत्यादिचे निर्बंध घालण्याचे अधिकार, उ)   रस्ते व इतर सर्व  सार्वजनिक ठिकाणी    सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ऊ) सार्वजनिक  ठिकाणी/ रस्त्यावर लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार ऋ) कलम 33,  35,  37, ते 40, 42, 43, व 45 मुंबई  पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार.

    मशाल रॅली

    सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमूद आहे.  

  • chandrapur police : पळण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या 2 शिक्षकांना चंद्रपूर पोलिसांनी केली अटक

    chandrapur police : पळण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या 2 शिक्षकांना चंद्रपूर पोलिसांनी केली अटक

    chandrapur police राज्यात महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, एकीकडे जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहाव्या यासाठी मध्यरात्री जागृती मशाल मंच मशाल रॅली काढत आहे.

    Chandrapur police तर दुसरीकडे विविध कार्यक्षेत्रात कार्य करणारे महिला व मुलीच्या अब्रूवर उठण्याचा प्रयत्न करीत आहे, असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे घडला, शिक्षकांचा वाढदिवस होता, मुलींनी गुरू चा मान असलेल्या शिक्षकाला पार्टी मागितली तर शिक्षक व त्याच्या शिक्षक मित्राने त्यांना आपल्या रूम वर बोलाविले.

    अवश्य वाचा : मला मिठी दे, शिक्षकाची विद्यार्थिनीला मागणी

    शिक्षक म्हणजेच आपले गुरू अशी मनात भावना ठेवत विद्यार्थिनी त्यांच्या रूम वर गेल्या आज माझा वाढदिवस आहे तर मला रिटर्न गिफ्ट हवे असे शिक्षकाने त्या विद्यार्थिनीला म्हटले तर आपल्याला काय गिफ्ट हवे सर असे विचारताच शिक्षक म्हणाला की मला मिठी दे, विद्यार्थिनीने नकार दिल्यावर शिक्षकाने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या तावडीतून विद्यार्थिनी निसटल्या याबाबत त्यांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या घरी सांगितला असता कुटुंबीयांनी तात्काळ वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

    Chandrapur police तक्रार दाखल झाल्याची माहिती शिक्षकांना मिळताच ते दोघेही पसार झाले, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे जबाबदारी दिली. कोंडावार यांनी तात्काळ पथक पाचारण करीत पळण्याच्या तयारीत असणार्या त्या दोन्ही शिक्षकांना रेल्वे स्टेशन वरून अटक करण्यात आली.

    आई वडील नंतर महत्वाचे स्थान हे शिक्षकाला असते मात्र वरोरा येथील नामांकित शाळेतील शिक्षकाने केलेला हा प्रकार त्यांच्या शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचा आहे, यावर विद्यार्थिनींच्या पालकांनी संताप व्यक्त केला असून आरोपी शिक्षकांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.