wife kills husband over domestic violence । आईनेच केली वडिलांची हत्या! पितृदिनी मुलं झाली पोरकी, सिंदेवाही तालुक्यातील घटना

wife kills husband over domestic violence

wife kills husband over domestic violence : सिंदेवाही – एकीकडे प्रेमाच्या लोभापायी लग्न झाल्यावर पतीचा खून केल्याची घटना सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे, तर राज्यात कौटुंबिक हिंसाचारातून काही महिला आत्महत्या करतानाचे प्रकरण उघडकीस येत आहे मात्र ग्रामीण भागात पतीचा व कौटुंबिक जाचाला कंटाळुन महिलेने थेट पतीला यमसदनी पाठविल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात घडली आहे. मात्र या घटनेमुळे दोन मुले पोरकी झाली.

राजुरा शहरात महिलेची हत्या

मौजा सिंदेवाही तालुक्यातील नवीन जामसाळा येथील पत्नी वैशाली चौधरी ने पती दुर्वास चौधरीचा रुमालाच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना १४ जूनला रात्री घडली, मृतकाची आई सुनंदा चौधरी ने सिंदेवाही पोलिस स्टेशन येथे सुनेविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी वैशाली चौधरी ला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.

नवीन जामसाळा येथे सदर घटना १५ जून ला रविवार सकाळी सहा वाजता उघडकीस आली. कौटुंबिक वादातून हि हत्या झाली अशी माहिती सिंदेवाही पोलिसांनी दिली आहे. domestic violence murder two kids orphaned

कौटुंबिक वाद विकोपाला

नवीन जामसाळा येथील चौधरी कुटुंबात नेहमी कौटुंबिक वाद होत होता, मृतक दुर्वास हा दारू पिऊन पत्नीला नेहमी त्रास देत होता, १४ जूनला मृतक दुर्वास व वैशाली या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, पतीचा होणार सततच्या त्रासाला वैशाली कंटाळून गेली होती, आता त्रास सहन करायचा नाही, असा राग वैशालीच्या मनात घर करून बसला. शनिवारी झालेलं भांडणाचा बदला घेण्यासाठी वैशालीने रात्री पती दुर्वास झोपल्यावर त्याचा रुमालाने गळा आवळत त्याचा खून केला. सकाळी दुर्वास ला आईने हाक मारली मात्र तो काही प्रतिसाद देत नव्हता, आईने बघितले असता दुर्वास हा निपचित पडला होता, याबाबत पोलिसांना माहिती दिली.

सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं दुर्वासच्या पत्नी व आईची चौकशी केली, यावर शनिवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले असल्याची माहिती आई सुनंदा चौधरी ने पोलिसांना दिली, पोलिसांनी पत्नी वैशालीची कसून चौकशी केली असता तिने गळा आवळून दुर्वासचा खून केल्याची कबुली दिली. सुनंदा चौधरी यांच्या तक्रारीवरून पोस्टे सिंदेवाही येथे अप.क. २१०/२०२५ कलम १०३(१), ११५ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विजय राठोड पो. स्टे सिन्देवाही करीत आहे.

पितृदिनी आईने केली दोन मुले पोरकी

सकाळी घटनेची माहिती उघडकीस होतास आईने आपल्या वडिलांचा गळा दाबून खून केला असल्याची पोलिसांना कबुली दिली. मृतक दुर्वास चौधरी याला दोन मुले आहेत. एकाचे वय 10 वर्ष, आणि दुसरा 12 वर्षाचा आहेत. या मुलांना वडिलांपासून पितृदीनी आईने पोरके केले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *