Tag: चंद्रपूर पोलीस

  • Chandrapur Police : 27 ऑगस्ट पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Chandrapur Police : 27 ऑगस्ट पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    chandrapur police 26 ते २७ ऑगस्ट  दरम्यान  श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला (दहीहांडी) हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार असल्याने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 17 ऑगस्ट पासून 27 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणे बाबत, सभेचे आयोजन व मिरवणुक काढण्याबबात, मिरवणूकीचे मार्ग निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा

    Chandrapur police अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,  आ) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ  लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे  इत्यादिचे निर्बंध घालण्याचे अधिकार, उ)   रस्ते व इतर सर्व  सार्वजनिक ठिकाणी    सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ऊ) सार्वजनिक  ठिकाणी/ रस्त्यावर लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार ऋ) कलम 33,  35,  37, ते 40, 42, 43, व 45 मुंबई  पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार.

    राजकीय आखाडा : राज ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी

    सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमूद आहे.  

  • chandrapur firing case : हाजी हत्याकांड, पुन्हा 7 आरोपी अटकेत, राजकीय कनेक्शन?

    chandrapur firing case : हाजी हत्याकांड, पुन्हा 7 आरोपी अटकेत, राजकीय कनेक्शन?

    chandrapur firing case 12 ऑगस्टला चंद्रपुरातील हॉटेल शाही दरबार येथे कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांची गोळ्या झाडून हाती करण्यात आली होती, या प्रकरणी पुन्हा 7 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
    छोटे मोठे गुन्हे करीत राजकीय आश्रय घेत गुन्हेगारी विश्वात आपलं वट जमविणारे हाजी यांचा क्रूर अंत झाला. सदर हत्याकांडात अनेकांनी दबक्या आवाजात एकच प्रतिक्रिया दिली “बरं झालं’.


    Chandrapur firing case 18 ऑगस्टला पोलिसांनी नकोडा येथील अक्षय मारोती रत्ने, सय्यद अबरार इंतसार अहमद, मोहसीन नसीर शेख चंद्रपूर, अभिजित उर्फ पवन मोरेश्वर कटारे, शेख नसिफ शेख रशीद, अखिल जमील कुरेशी, नूर अहमद अब्दुल वहाब कुरेशी यांना एक दिवसांपूर्वी अटक करीत आज न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने 7 आरोपीना 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    योजना : 27 लाख लाडक्या बहिणी पहिल्या हफत्याच्या प्रतीक्षेत

    नेमकं प्रकरण काय?

    12 ऑगस्ट रोजी कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख हे आपल्या सहकाऱ्यासोबत चंद्रपुरातील हॉटेल शाही दरबार येथे बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी आले होते, काही वेळाने 5 युवकांच्या टोळक्याने हाजी सरवर यांच्यावर गोळ्या झाडत चाकू हल्ला केला, यामध्ये हाजी यांचा मृत्यू झाला, आरोपीनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा गाठत आत्मसमर्पण केले.

    गुन्ह्यानंतर पोलिसांवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, जिल्ह्यात गोळीबार आता काही नवा नाही, 40 दिवसात गोळीबार व बॉम्ब च्या घटनेने जिल्हा आधीच हादरून गेला आहे, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थे प्रश्न उपस्थित झाला आहे, पोलिसांची गुप्तचर यंत्रणा ढेपाळली की काय असा प्रश्न जनसामान्य उपस्थित करू लागले होते.

    7 आरोपीना पोलिसांनी अटक केली ज्यामध्ये 2 आरोपी घुग्गुस तर 5 जण चंद्रपुरातील आहे, यांनी हाजी च्या मारेकऱ्यांना शरण, हाजी चे लोकेशन व या कटात सामायिक असल्याचा संशय आहे.

    अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एक राजकीय पदाधिकारी असल्याची माहिती पुढे आली आहे, तो पुढारी राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे, अवैध वाळू तस्करी मध्ये त्याचा सहभाग असून त्याचे अनेक राजकीय पुढाऱ्यांशी जवळचे संबंध असून तसे फोटो सुद्धा पुढे आले आहे.

    जर पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास केला तर काही राजकीय क्षेत्रातील वाळू तस्करांचे नाव व त्यांचा सहभाग यामध्ये समोर येईल. सध्या तो आरोपी आमचा राजकीय पदाधिकारी नव्हे अशी बोंब वर्तमान पदाधिकारी करू लागले आहे, पोलिसांनी आरोपी तस्करांचे कुणाबरोबर संबंध आहे, त्यांचा तर या प्रकरणाशी संबंध तर नाही? याकडे तपास केल्यास खुनी तस्करांचे नाव पुढे येईल.

    मृतक हाजी चे अनेक राजकीय पदाधिकारी यांच्यासोबत चांगले संबंध होते, हे त्यांच्या अंतिम समयी जवळ आले होते, आता आरोपी या कटात राजकिय आरोपीची एंट्री झाल्याने अजून कुणाचे नाव समोर येणार ही तर येणारी वेळच सांगेल.

  • Chandrapur Police : गुन्हेगारीवर चंद्रपूर पोलिसांचा प्रहार, 6 तडीपार

    Chandrapur Police : गुन्हेगारीवर चंद्रपूर पोलिसांचा प्रहार, 6 तडीपार

    Chandrapur Police चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण मिळविणे हे पोलीस विभागासमोर एक आव्हानात्मक काम आहे, मात्र पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक यांचा आदेश आणि स्थानिक गुन्हे शाखा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी बाहेर काढत प्रतिबंधक कारवाई करीत आहे.

    अवश्य वाचा : शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकले गढूळ पाणी

    Chandrapur police चंद्रपूर जिल्ह्यातील 6 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई पोलिसांनी केली आहे, यामध्ये घुग्गुस येथील 2 व चंद्रपुरातील 4 गुन्हेगारांचा समावेश आहे.

    घुग्गुस येथील आमराई वार्डातील 33 वर्षीय वतन लक्ष्मण ताटपेल्ली (6 महिण्याकरिता हद्दपार) , 24 वर्षीय करन अर्जुन नाईक (1 वर्षाकरिता हद्दपार), 26 वर्षीय रोहन रणधीर कंजर (1 वर्षे) , 37 वर्षीय नरेश रामबाग कंजर (1वर्ष), 38 वर्षीय महेंद्र आनंदराव ढुमने (1 वर्ष), 43 वर्षीय मोहम्मद शोएब अब्दुल हासम (6 महिण्याकरिता हद्दपार) यांच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात भूस्खलन, 20 फूट खड्ड्यात पडली महिला

    आता पर्यंत चंद्रपूर पोलीस दलामार्फत 3 MPDA व 22 तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. आगामी सण उत्सव बघता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस कारवाई करीत आहे.

    नजरेत न पडणारी गुन्हेगारी

    विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांच्या नजरेत न पडणारी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अवैध वाळू तस्करी, तंबाखू तस्करी, कोळसा तस्करी यावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे, गोंडपीपरी येथे वाळू तस्करी च्या वादातून गावकऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता.

    पोलिसांनी ही धडक मोहीम कायम ठेवल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारी काही प्रमाणात संपुष्टात येईल, जिल्ह्यात खाकी वर्दीचा धाक यामाध्यमातून गुन्हेगारांच्या मनात घर करून बसायला हवा, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, घुग्गुस पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के, रामनगर पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी केली आहे.

    पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या गुन्हेगार दहशतीमध्ये आले आहे, मात्र येणाऱ्या काळात ही दहशत कायम ठेवण्यासाठी पोलिसांना अजून कठोर पावले उचलावी लागतील.

  • Bharosa Cell : चंद्रपूर भरोसा सेल ने पालक-शिक्षकात घडविले योग्य समनव्य

    Bharosa Cell : चंद्रपूर भरोसा सेल ने पालक-शिक्षकात घडविले योग्य समनव्य

    Bharosa cell चंद्रपूर – सध्या राज्यात अपंग, अंध, मूक-बधिर असे विविध शिक्षण संस्था सुरू करीत अनुदान लाटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. काही संस्थेत अनुचित घटना सुद्धा घडलेल्या आहे, त्यानंतर सुद्धा ना प्रशासन यावर लक्ष देत ना कुठली सामाजिक संस्था.

    चंद्रपुरात सुद्धा असे अनेक प्रकार सुरू आहे, खरंच अश्या शिक्षण संस्थेत विद्यार्थी सुरक्षित आहे काय? याचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी भरोसा सेल ला शिक्षण संस्थेत पाठविले.
    30 जुलै रोजी बाबूपेठ येथील मूकबधिर निवासी शाळेत भरोसा सेल च्या पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांनी आपल्या चमू सह भेट दिली.

    अवश्य वाचा : गडचांदूर शहरातील बॉम्ब ची निर्मिती सख्ख्या भावांनी youtube बघून केली, सविस्तर वाचा


    Bharosa cell यावेळी शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थी हजर होते. उपस्थित मुलांना गुड टच बॅड टच, पोक्सो कायदा, डायल 112, वाहतुकीचे नियम व धूम्रपानाचे दुष्परिणाम यावर मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.

    महत्वाचे : चंद्रपुरातील विद्यार्थ्यांना मिळणार पायलट प्रशिक्षण, करा अर्ज


    मूकबधिर शाळेतील शिक्षकांबद्दल पालकांमध्ये नाराजी दिसून आली, शिक्षक मुलांकडे व्यवस्थित लक्ष देत नाही, वैद्यकीय मदतीचा अभाव, मुलींना शाळेत प्रवेश देत नाही, मुलांकडून शाळेतील कामे करवून घेतात, शाळा अनेकदा बंद असते, शाळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अभाव आहे, विशेष बाब म्हणजे या शाळेत 60 विद्यार्थ्यांपैकी फक्त 2 मुली आहे, शाळेच्या हॉस्टल मध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आहे.
    अश्या अनेक समस्येने सदर मूकबधिर शाळा ग्रस्त आहे, सर्व त्रुट्या तात्काळ दुरुस्त कराव्या, विद्यार्थ्यांची सुरक्षा आधी सर्वात महत्वाची आहे, शिक्षकांनी पालकांसोबत प्रेमाने वागावे, भविष्यात शाळेत अनुचित घटना घडायला नको यावर लक्ष द्या असा भरोसा पोउपनी अपेक्षा मेश्राम यांनी पालक व शिक्षकांना दिला.

    महत्वाचे : पूर आला आणि तो मार्ग तिसऱ्यांदा बंद झाला

    चंद्रपूर शहर असो वा जिल्हा सर्व अनुदानित शाळेची हीच अवस्था आहे, फक्त अनुदान लाटण्यासाठी या शाळा अपंग, मूकबधिर, या विद्यार्थ्यांच्या भविष्यसोबत खेळण्याचा प्रकार करीत आहे.
    यावर आता प्रशासनाने सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे, सरकारच्या अनुदानाचा योग्य वापर होतोय का हे सुद्धा त्यांनी जाणून घ्यायला हवे.
    मूकबधिर शाळेतील शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन अपेक्षा मेश्राम यांनी योग्य रित्या घडवून आणले.

  • Law and order : 18 जुलै पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Law and order : 18 जुलै पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Law and order मोहरम हा उत्सव मुस्लीम धर्मीय व काही प्रमाणात हिंदु समाजातर्फे साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात 16 व 17 जुलै रोजी मोठया प्रमाणात मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार असल्याने जिल्हयात  कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच आषाढी एकादशी निमित्त 18 जुलै च्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात आले आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर पोलीस दलातील पोलीस शिपायाने उचलले टोकाचे पाऊल

    मुंबई पोलिस कायद्यान्वये खालील नमुद केल्याप्रमाणे जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणेबाबत, सभेचे आयोजन,  मिरवणुक काढण्याबाबत व मिरवणकीचे मार्ग निश्चित करणेबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान केले आहे.

    मिरवणुक  व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे  वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,  मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानांचे जवळ लोकांचे वागणुकीबर निर्बंध घालण्याचे अधिकार, लाऊडस्पिकर वाजविण्याबर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, कलम 33 ,35,37, ते 40,42,43, व 45 देण्यात आले आहेत.

    Law and order सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुक वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणेअंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांचेपेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे. सदरआदेश 18 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात नमुद आहे.

  • chandrapur police : चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आणि….

    chandrapur police : चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आणि….

    Chandrapur police बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. अजय पांडुरंग मोहूर्ले वय ४० असे पोलीस शिपाई चे नाव आहे.
    बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे वाहतूक विभागात कार्यरत पोलीस शिपाई अजय पांडुरंग मोहुर्ले हा वस्ती विभागातील पोलीस क्वार्टर मध्ये राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी सोबत वाद होत होता. मागील पाच-सहा दिवसांपासून त्याची पत्नी आपल्या नातेवाईकाकडे गेली असता त्यांनी आपल्या राहत्या क्वार्टर मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

    अवश्य वाचा : शेतकऱ्यांसाठी सरसावले शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे

    घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे, पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार, पोशी खंडेराव माने करत आहे.


    मृतक अजय मोहुर्ले याला एक सात वर्षाचा मुलगा आहे. पोलीस शिपाही अजय यांनी अगोदर सुद्धा आत्महत्या करण्याचे प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे.
    विशेष बाब म्हणजे 2 दिवसांपूर्वी वरोरा पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपायाने कामाच्या तनावपायी आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

  • Chandrapur police officers : कोरपना पोलीस स्टेशनमध्ये युवकाला अमानुष मारहाण

    Chandrapur police officers : कोरपना पोलीस स्टेशनमध्ये युवकाला अमानुष मारहाण

    Chandrapur police officers सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य, मात्र चंद्रपुरात याबाबत सर्व काही उलट चित्र आहे, चंद्रपूर पोलीस दलात अनेक पोलीस अधिकारी चांगले काम करीत असताना एक अधिकारी मात्र पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

    अवश्य वाचा | 32 लाखांची गाडी घेतली आणि झाली फसवणूक, चंद्रपुरातील प्रकार

    चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांनी असा प्रताप केला की ते फक्त आपण चित्रपटात बघितलं आहे, एकाडे यांच्यावर याआधी सुद्धा अनेकांनी आरोप केले आहे मात्र त्यांच्यावर कुणाचं अभय आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

     

    Chandrapur police officers एका युवकाला ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक संदीप एकाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना 8 जून रोजी कोरपना पोलीस ठाण्यात घडली आहे.

    महत्त्वाचे : बँकेत 9 हजार पदांची मेगाभरती

    7 जून रोजी कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस निरीक्षक एकाडे, एक वाहतूक पोलीस, शिपाई व महिला पोलीस कर्मचाऱ्याला सोबत घेत तांडा क्रमांक 1 मध्ये पोहचले. त्यावेळी 28 वर्षीय विपुल मुनावत ला त्याचे काका रमेश मुनावत यांचे घर कुठे आहे असे विचारले, त्यावेळी रमेश मुनावत यांच्या घरी त्यांची मुलगी होती, विपुल यांनी ठाणेदार एकाडे यांना सांगितले की घरी कुणी नाही आहे, मात्र त्यांनी विपुल ला तू शासकीय कामात अडथळा आणू नको म्हणत धमकावले, पोलिसांनी तपासणी केली मात्र त्यांना काही आढळले नाही.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात 5 हजार वृक्षांचे होणार वृक्षारोपण

    त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा विपुल यांच्या घराच्या दिशेला वळविला मात्र तिथेही पोलिसांना काही आढळले नाही, पोलिसांना संशय होता की रमेश व विपुल हे घरी अवैध दारू ची विक्री करतात, याआधी विपुल वर अवैध दारू विक्रीचा गुन्हा नोंद आहे.

     

    पोलीस निरीक्षक एकाडे यांनी विपुल ला म्हणाले की तुझ्यावर मागील प्रकरणी गुन्हा दाखल आहे उद्या ठाण्यात ये असे म्हणत पोलीस तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी 8 जून ला विपुल कोरपना पोलीस ठाण्यात गेला असता ठाणेदार एकाडे यांनी तू शासकीय कामात अडथळा का आणला असे विचारत त्याला बेदम मारहाण सुरू केली, एकाडे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी बाजीराव पट्ट्याने विपुल च्या पाठीवर मारणे सुरू केले.

    ही अमानुष मारहाण सुरू असतेवेळी संदीप एकाडे हे कांटा लगा हे गाणे गात होते, विपुल त्यांना हात जोडून विनवणी करीत होता मात्र एकाडे हे अमानुष पणे त्याला मारहाण करीत राहिले.

    विपुल ने ठाण्यात जाण्याअगोदर मोबाईल मध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग सुरू केली होती, ती रेकॉर्डिंग सध्या चंद्रपूर जिल्ह्यात चांगलीच व्हायरल झाली आहे.

     

    Chandrapur police officers अश्लील शिवीगाळी करीत विपुल च्या हाता-पायावर सूज येईपर्यंत त्याला एकाडे यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जर तू दवाखान्यात गेला तर तुला पुन्हा मारणार अशी धमकी विपुल ला दिली, विपुल घरी गेला मात्र गावकऱ्यांनी त्याला दवाखान्यात नेत त्याचे मेडिकल केले, त्याच्या हातावर, पाठ व पायावर मोठ्या प्रमाणात अमानुष मारहाणीची सूज होती.

     

    याबाबत ठाणेदार संदीप एकाडे यांच्याशी या मारहाणीबाबत संपर्क केला असता ते म्हणाले की असं काही घडलं नाही, मी फक्त सुचनापत्र देण्यासाठी विपुल ला ठाण्यात बोलाविले होते, त्याला कुणी मारहाण केली नाही.

     

    Chandrapur police officers पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना सदर घटनेबाबत माहिती मागितली असता ते म्हणाले की आज तक्रारदार मला भेटणार आहे, मी त्यांना भेटण्यासाठी बोलाविले आहे, घटनेत सत्यता असेल तर कारवाई नक्की होणार.

  • Police In Action : चंद्रपुरात मद्यपी पळू लागले सैरावैरा

    Police In Action : चंद्रपुरात मद्यपी पळू लागले सैरावैरा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेला गुन्हेगारी आलेख कमी व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आज 13 फेब्रुवारीला सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. Chandrapur police

     

    शहरातील अनेक दारू दुकानासमोर विविध ठिकाणी मद्यपी दारू पितात ज्यामुळे भांडणाचे प्रकार वाढतात, या भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात होते.

     

     

    दारू दुकानाबाहेर असलेल्या मद्यपीचा अनेक महिला व मुलींना नाहक त्रास होतो, यामुळे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आज स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे व पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांच्या नेतृत्वात शहरातील बंगाली कॅम्प, मूल रोड, रयतवारी कॉलरी, तुकुम भागात असणाऱ्या देशी दारू व वाईन शॉपी समोर मद्यपिंवर धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. Police live action

     

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

  • A gang of money grabbers : चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकली पैसे लुटणारी महिलांची टोळी

    A gang of money grabbers : चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकली पैसे लुटणारी महिलांची टोळी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नागरिक बँकेत पैसे काढण्याकरिता जातात मात्र पैसे काढल्यावर आपल्या आजू-बाजूच्या लोकांवर आपण लक्ष देत नाही ती संधी साधून आपल्या पैश्यावर डल्ला मारला जातो, असाच प्रकार चंद्रपुरात घडला, पोलिसांनी सदर प्रकरणी मोठी कारवाई करीत महिलांच्या टोळीला अटक केली आहे. chandrapur crime news

     

    6 फेब्रुवारीला विठ्ठल मंदिर वार्डात राहणारे 79 वर्षीय रमेश बाटवे हे पेन्शन चे पैसे काढण्याकरिता शहरातील कस्तुरबा रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये गेले, त्यांनी 20 हजाराची रक्कम बँकेतून काढत जवळ असलेल्या कापडी थैलीत ठेवली.
    मात्र थोड्या वेळानी पैसे चेक केले असता थैलीत पैसे आढळून आले नाही, थैली खालच्या बाजूने कापल्या अवस्थेत होती.

     

     

    तसेच पठाणपुरा निवासी सौ.मीराबाई गिरडकर यांनी सुद्धा सदर बँकेतून 10 हजार रुपये काढले होते तेसुद्धा त्याचप्रमाणे म्हणजेच थैली कापून चोरले होते.

    स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2 नागरिकांचे तब्बल 30 हजार रुपये कुणीतरी अज्ञाताने चोरले याबाबत फिर्याद चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. A gang of women who steal money

     

     

    पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चेक केला असता काही महिला फिर्यादी यांच्या सभोवताल आढळून आल्या, त्यामधील एक महिला ही थैली कापायची तर दुसरी महिला थैलीतील रक्कम काढायची, बँकेत नेहमी गर्दी असल्याने चोरीचा प्रकार लक्षात आलं नाही.

     

     

    मात्र त्याचदिवशी 6 फेब्रुवारीला भद्रावती येथे सुद्धा पिशवीतून 10 हजार रुपये चोरी करण्यात आले होते, एकाच दिवशी 2 शहरात हा प्रकार घडल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली.

     

    पोलिसांनी बँक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये 4 महिला आढळून आल्या, गोपनीय माहिती व सखोल तपास केल्यावर पोलिसांनी या प्रकरणात 4 महिलांना अटक केली.

     

     

    यामध्ये 30 वर्षीय बिजली सिद्दुलाल सिसोदिया, 40 वर्षीय भोलीबाई रघुवीरसिंह सिसोदिया,21 वर्षीय राधिका प्रल्हादसिंग सिसोदिया तिघे राहणार दुलखेडी, तालुका नसींगड जिल्हा राजगड मध्यप्रदेश, 40 वर्षीय कालिबाई दिलावर सिसोदिया राहणार कडीया ता. पाचोर जि. राजगड राज्य – मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, सदर चारही आरोपीवर इतर जिल्ह्यात सुद्धा गुन्हे दाखल आहे. आरोपिकडून पोलिसांनी चोरी केलेले 40 हजार रुपये जप्त केले आहे.
    आरोपी महिलांनी आधी चंद्रपूर व त्यानंतर भद्रावती येथे चोरी केली, विशेष म्हणजे बँक मध्ये गेल्यावर आरोपी महिला नागरिकांच्या हालचालीवर लक्ष द्यायचे, त्यांची फेस रीड करीत महिला गुन्हा करायच्या हे विशेष.

     

     

    चंद्रपूर शहर पोलिसांच्या सतर्कतेने मोठा गुन्हा उघडकीस आला आहे, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन , अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु , उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि. रमीज मुलानी, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि शरिफ शेख, विलास निकोडे,, महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, संतोष पंडीत, सचिन बोरकर, , निलेश मुडे, म पो हवा भावना रामटेके, चेतन गज्जलवार, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, मंगेश मालेकर, शाहाबाज सैयद यांनी केलेली आहे. पुढील तपास जयंता चुनारकर करीत आहे.

  • Sub Divisional Police Officer Transfer : साहील झरकर मूलचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी

    Sub Divisional Police Officer Transfer : साहील झरकर मूलचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर साहील उमाकांत झरकर यांची नियुक्ती करण्यांत आली आहे. पदोन्नतीने नियुक्त झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जून इंगळे येत्या काही महिण्यांत सेवानिवृत्त होणार असून त्यांची राज्य आर्थिक गुन्हे शाखेत स्थानांतरण करण्यांत आले आहे. Police officer transfer

     

    नक्षलप्रभावीत गडचिरोली जिल्हयातील कुरखेडा पोलीस उपविभागात साहिल झरकर दोन वर्षापासुन सेवारत आहेत.

     

     

    राज्य पोलीस सेवेत असलेेले उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचीत असून नक्षलप्रभावीत कुरखेडा उपविभागात त्यांची सेवा उल्लेखनिय राहीली आहे. त्यामूळे सध्यास्थितीत मूल उपविभागातंर्गत सुरू असलेल्या विविध गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी साहीत झरकर यांना कठीण जाईल. असे सध्यातरी वाटत नाही. लवकरच साहील झरकर येथील पदभार सांभाळणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. Maharashtra police