Blog

  • Sankalp te Siddhi event BJP Chandrapur । मोदी सरकारच्या योजनेचा मेगा रोडमॅप, चंद्रपूरमध्ये ‘संकल्प ते सिद्धी’ कार्यक्रम

    Sankalp te Siddhi event BJP Chandrapur

    Sankalp te Siddhi event BJP Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अकरा वर्षांच्या यशस्वी कारभारानिमित्त ‘संकल्प ते सिद्धी’ या उपक्रमांतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचणे नुसार भारतीय  जनता पक्षाच्या वतीने चंद्रपूर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली.

    चंद्रपूर शहरात जबरी चोरी

    या कार्यशाळेमध्ये केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठीही या कार्यशाळेत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. BJP election planning meeting Chandrapur under Modi

    कार्यशाळेचे उद्घाटन भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम,माजी नगरसेवक संजय कचर्लावार, रवि आसवानी, अॅड. सुरेश तालेवार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, रवी लोणकर, संदीप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, सचिन कोतपल्लीवार, अरुण तिखे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, बंटी चौधरी, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, शीतल कुळमेथे, रवी गुरनूले, संगीता खांडेकर, 

    कल्पना बबूलकर, पुरुषोत्तम राऊत, विनोद शेरकी, प्रमोद शास्त्रकार, प्रलय सरकार, चंदन पाल, राकेश बोमनवार, शीतल ईटनकर, मंजुष्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, मधुकर राउत, शालू कंनोजवार, धनराज कोवे, अमीन शेख, युवा मोर्चाचे यश बांगळे, अ‍ॅड. हरीश मंचलावार, सुभाष अदमाने यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Sankalp te Siddhi social welfare scheme discussion event

    ११ वर्षातील यशस्वी योजना

    कार्यशाळेत मोदी सरकारच्या गेल्या अकरा वर्षांतील यशस्वी योजनांचा उल्लेख करण्यात आल्या. विशेषतः गरीब कल्याण अन्न योजना, पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री जनधन योजना आणि आयुष्मान भारत योजना या योजना प्रभावीपणे राबवून जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.या कार्यशाळेत चंद्रपूर शहरातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती पोहोचवण्याचा आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

  • Police Swift Action । पाणी बॉटल घ्यायला गेला अन् ५० हजार गमावले! पण चंद्रपूर पोलिसांनी केलं अचूक ऑपरेशन

    Police Swift Action

    Police Swift Action : चंद्रपूर – पाणी बॉटल घ्यायला गेला पण मागून कुणीतरी तोंड दाबून खिशातील ५० हजार रुपये जबरी हिसकावून नेले, हि घटना इतरत्र जिल्ह्यात नाही तर चंद्रपूर शहरात घडली आहे. पोलिसांच्या तत्पर तपासाने आरोपी पोलिसांच्या तावडीत २४ तासाच्या आत सापडला.

    १३ जून रोजी कांकेर जिल्हा राज्य छत्तीसगड येथे राहणार ३४ वर्षीय मधुराम तुलसींग कोल्हा हा तामिळनाडू राज्यातून मजुरीचे काम करीत ११ जून ला तिरपुर रेल्वे स्टेशन येथून १२ जूनला सकाळी १० वाजता चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे पोहचला. forced pocket robbery Chandrapur city

    शेतीच्या वादात शेतकऱ्याला मारहाण

    मधुराम च्या गावाकडे जाणारी बस हि १३ जून ला सकाळी ५ वाजता असल्याने मधुराम १२ जून रोजी रात्री ८ वाजता जलनगर वॉर्ड सपना टॉकीज येथे पाणी बॉटल घेण्यासाठी गेला असता एका अज्ञात इसमाने मधुराम च्या मागे येऊन त्याच्या तोंडाला दाबून खिशातील ५० हजार रुपये हिसकावून नेले.

    याबाबत मधुराम ने तात्काळ रामनगर पोलीस ठाणे गाठत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला, पोलिसांनी कलम ३०९ (६) अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. roadside robbery 50000 rupees Chandrapur

    २४ तासांच्या आत कारवाई

    घडलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाने सुरु केला, पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत तांत्रिकदृष्ट्या व गोपनीय माहितीच्या आधारे ३३ वर्षीय शेख जुबेर शेख कादर राहणार रहेमतनगर याला अटक केली. आरोपी जुबेर जवळून चोरीस गेलेली रोख रक्कम ५० हजार रुपये जप्त करण्यात आले.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि देवाजी नरोटे, सपोनि हनुमान उगले, सपोनि निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी पेत्रस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंद्रे, लालू यादव, जितेंद्र आकरे, मनीषा मोरे, हिरालाल गुप्ता, रवीकुमार ढेंगळे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, सुरेश कोरेवार व ब्युलटी साखरे यांनी केली.

  • Aditya Mahotsav in Chandrapur । विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान, आरोग्य शिबीर… आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचा चंद्रपूरमध्ये उत्सवी थाट!

    Aditya Mahotsav in Chandrapur

    Aditya Mahotsav in Chandrapur : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस १३ जून रोजी चंद्रपूर युवासेनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आदित्य महोत्सव साजरा केला. आरोग्य शिबीर, रक्तदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. aditya thackeray birthday

    जुनी पेन्शन योजना लागू करा, खासदार धानोरकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

    कार्यक्रमाच्या शृंखलेत सर्वप्रथम मूल रोड मार्गावरील संत जगनाडे महाराज सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमात करिअर मार्गदर्शक व प्रमुख वक्ता आकाश दादा कडुकर प्रमुख पाहून म्हणून सोमय्या पॉलिटेक्निकचे सहसंचालक पियुष आंबटकर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघात दुर्घटनेत मृत पावलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन युवासेना सहसचिव व युवतीसेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

    दहावी-बारावीनंतर काय?

    आकाश कडुकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपले अव्वल स्थान गाजवायचं असेल तर या धावत्या युगाला आधी समजून घेणे गरजेचे आहे. दहावी-बारावीनंतर काय हा प्रश्न अनेकांना पडतो, आपली आवड ज्या क्षेत्रात आहे ते क्षेत्र आपण निवडलं तर त्यामध्ये आपण आपलं स्थान क्रमांक १ वर नक्कीच गाजवू शकतो.

    youth sena career guidance camp in chandrapur

    आयोजित कार्यक्रमात दहावी व बारावी च्या ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा शिल्ड व प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला.

    गंजवार्ड प्रभाग क्रमांक ११ मध्ये युवासेनेतर्फे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५१ नागरिकांनी रक्तदान केले व १०० च्या वर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. youth sena career guidance camp in chandrapur

    aditya thackeray birthday

    आयोजित कार्यक्रमात अधिवक्ता अजित पांडे, युवतीसेना उपजिल्हाधिकारी धनश्री हेडाऊ, उपजिल्हाप्रमुख यशपाल कमटम, युवासेना तालुकाप्रमुख सुरज शेंडे, युवासेना शहरप्रमुख शाहबाज शेख, शहर समन्वयक प्रज्वल आडे, उपशहर प्रमुख संघदीप रामटेके, उपतालुकाप्रमुख विवान रामटेके, उपशहर प्रमुख स्वप्नील पाटील, श्रीकांत दडमल, शहबाज सैय्यद, पिंटुदादा बलवीर, पृथ्वी ठाकूर, सलमान शेख, सुनील राजकुमार, युवराज शेख, सागर गभणे, अभिजित वागडे, अंकित काटकर, रितिक रायपुरे, पराग, विशाल सहारे, शुभम आले, आर्यन, उमेश मस्के आदींची उपस्थिती होती.

  • Implement the old pension scheme |अनुकंपा कर्मचाऱ्यांवर अन्याय! जुनी पेन्शन योजना लागू होणार का?

    Implement the old pension scheme

    खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र 

    Implement the old pension scheme : चंद्रपूर: अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या (OPS) प्रलंबित मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज (शुक्रवार, १४ जून २०२५)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका महत्त्वाच्या पत्राद्वारे (पत्र क्र. ५४३/२०२५)  केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

    या पत्रात खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या, परंतु १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी आज वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन अनुकंपा पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर केले. यावेळी गुरुदास गुरनुले, नितीन साखरे, वीरेंद्र पिल्लेवान, हरीश मांढरे, नितीन उमरे, गजानन बोरकुटे यांची उपस्थिती होती. (Old Pension Scheme for Compassionate Appointment Cases)

    खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, ०२ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेसाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना देण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही. हे सर्व कर्मचारी केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन घेण्यासाठी पात्र आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाने अनुकंपा धारकांसाठीच्या धोरणाचा शासन निर्णय काढताना या महत्त्वाच्या बाबीचा विचार केलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. government decision on OPS for compassionate employees 2025

    चंद्रपूर जिल्ह्यात वयोवृद्ध शेतकऱ्याला मारहाण, शेतकऱ्याचा मृत्यू

    अनुकंपा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करा

    त्यामुळे, केंद्र शासनाने त्यांच्या अनुकंपा धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील निर्णय घेऊन १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सक्षम अधिकारी मार्फत सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर निवड झालेल्या अनुकंपा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, अशी शिफारस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

    खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, अनुकंपा कर्मचाऱ्यांनी केलेली मागणी रास्त असून, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

  • fatal pickup truck accident near Ganpur । चंद्रपूर जिल्हा हादरला – गणपूरजवळील अपघातात मृत्यूचा थरार!

    fatal pickup truck accident near Ganpur

    fatal pickup truck accident near Ganpur : चंद्रपूर- अहेरी मार्गावरील गणपूरजवळ पिकअप-ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (दि. १३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

    चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्याला बेदम मारहाण

    किराणा सामान घेऊन निघाले मात्र

    संदीप कुळमेथे, रमेश वाढई रा. कोठारी अशी मृतकांची नावे आहेत. गणेश मडावी हा जखमी आहे.
    किराणा सामान घेऊन पिकअप एमएच ३४ बीजी ८८९९ गोंडपिपरीकडे निघाले होते. कोठारी येथील संदीप कुळमेथे,रमेश वाढई, कवडजई येथील गणेश मडावी हे तिघे होते.

    गोंडपिपरी येथून बल्लारपूरकडे जाणाऱ्या ट्रकला पिकअपने धडक दिली. समोरासमोर झालेली हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये पिकअपमधील संदीप कुळमेथे, रमेश वाढई यांचा मृत्यू झाला. गणेश मडावी हा जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

  • land conflict murder case । कोरपना तालुक्यात खूनी संघर्ष!, या पक्षाच्या जिल्हाध्यक्षासह पाच जण तुरुंगात!

    land conflict murder case

    land conflict murder case : कोरपना – कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणात शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. violence due to land dispute in villages

    चंद्रपूर जिल्हा होणार हनी हब, मुनगंटीवार यांचा पुढाकार

    ही घटना बुधवार, ११ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास कन्हाळगाव येथे घडली. शेतकरी पुंडलिक कारेकर (रा. कोरपना) यांच्यावर स्थानिक वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवार १२ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात पुंडलिक कारेकर यांचा मुलगा जगदीश आणि किशोर हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

    शेतकऱ्याचा मृत्यू अनं गंभीर गुन्हा दाखल

    घटनेची तक्रार कोरपना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, भारतीय न्याय सहिता २०२३ अंतर्गत कलम ३५२, ३५१(२), ११८(२), १९१(२), १९०, १८९(२), १८९(१) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, कारेकर यांच्या मृत्यूनंतर सर्व आरोपींवर कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले, बबन गारघाटे, विजय मसे, अरविंद मसे व राजेश नवले यांना कोरपना पोलिसांनी अटक केली असून, शुक्रवारी १३ जून रोजी त्यांना कोरपना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींना चंद्रपूर तुरुंगात हलवण्यात आले आहे.

  • emergency preparedness training for rural areas । आपत्ती आली तर काय कराल? ग्रामीण भागात सुरू झालं ‘सुपर ट्रेनिंग’

    emergency preparedness training for rural areas

    emergency preparedness training for rural areas : चंद्रपूर : आपत्तीच्या काळात तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने तसेच मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने चिमूर व नागभीड तालुक्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने विशेष आपत्ती प्रतिसाद दल प्रशिक्षण घेण्यात आले. flood rescue and CPR training for volunteers

    1 लक्ष रुपये मिळणार तेही बिनव्याज, लवकर करा अर्ज

    जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यात प्राथमिक बचाव व शोध मोहीम, प्राथमिक उपचार व सीपीआर, पूर्वसूचना प्रणाली व समुदाय जनजागृती, आपत्ती काळातील समन्वय व बचाव कार्य, आपत्कालीन उपकरणांचा वापर व सुरक्षाविधी यांचा समावेश होता.

    या प्रशिक्षणामध्ये महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण, कृषी, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. चिमूर व नागभीड तालुक्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल ,नागपुरचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ भंडारे यांच्या नेतृत्वात 9 रेस्क्यूवर प्रशिक्षण देण्यात आले. चिमूर तहसील कार्यालयामध्ये इम्प्रोवाईज डिवाइस, स्टॅंडर्ड डिवाइस, एम. एफ. आर. मध्ये सीपीआर व विविध प्रकारचे बँडेज कशा प्रकारे बांधतात, अशा बाबींवर आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली. तसेच चिमूर आणि नागभीड तहसील मधील उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी करण्यात आली.

    flood rescue cpr training for volunteers

    पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणातील माहिती आपापल्या तालुक्यातील इतरांना देण्यासाठी अतिशय गांभीर्याने प्रशिक्षण शिकून घ्या. पूर परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करणे गरजेचे असल्याचे नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी सांगितले. taluka level disaster preparedness training

    चिमूर येथे पार पडलेल्या प्रशिक्षणावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्रीधर राजमाने, नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील, तसेच नागभीड येथे तहसीलदार प्रताप वाघमारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, तालुका कृषी अधिकारी श्री. पुजारी, नायब तहसीलदार उमेश कावळे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

    अधिक प्रशिक्षण सत्रे व मॉकड्रील घेण्याचे नियोजन

    या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील यंत्रणांना आपत्ती काळात योग्य ती तयारी ठेवता येणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल. आगामी काळात अधिक प्रशिक्षण सत्रे व प्रत्यक्ष मॉकड्रिल्स घेण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी दिली.

  • Ayushman Bharat private hospital panel । खासगी हॉस्पिटलमध्ये ‘गोल्डन कार्ड’वर उपचार? जाणून घ्या चंद्रपुरातील कोणकोणती रुग्णालयं आली पॅनलवर!

    Ayushman Bharat private hospital panel

    Ayushman Bharat private hospital panel : चंद्रपूर : नागरिकांच्या आरोग्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. केंद्र शासनातर्फे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यात एकत्रितपणे 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत आहे. या योजनांची आणखी प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीव गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय पॅनलवर खाजगी रुग्णालयांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सुचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिल्या. Maharashtra expand private hospitals Ayushman Bharat scheme

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

    जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मा.सां. कन्नमवार शास. वैद्य. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, महानगर पालिकेच्या वैद्य. अधिकारी डॉ. नयना उत्तरवार आदी उपस्थित होते.

    प्रधानमंत्री आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 1356 आजारांवर उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे, असे सांगून डॉ. शेटे म्हणाले, यात आणखी आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. रुग्णांना स्थानिक स्तरावरच तात्काळ चांगली आरोग्य सेवा मिळावी, असा शासनाचा मानस आहे. त्यासाठीच जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांना शासकीय पॅनलवर समाविष्ठ करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. पॅनलवर येणा-या खाजगी रुग्णालयांसाठी चांगले पॅकेज तयार करण्यात येत असून सदर निधी 30 दिवसांत संबंधित रुग्णालयाला वळता करण्यात येईल. आरोग्यासाठी शासन स्तरावरून निधीची कमतरता होणार नाही. Maharashtra Ayushman hospital expansion rural health initiative

    पुढे ते म्हणाले, चंद्रपूर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा पुरविणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय पॅनलवर खाजगी रुग्णालयांचा समावेश होण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णालयांकडून अर्ज मागवा. तसेच अर्ज आलेल्या रुग्णालयांना संवेदनशीपणे समाविष्ठ करून घ्या. पुरवठा विभागाच्या समन्वयाने जास्तीत जास्त नागरिकांच्या शिधापत्रिकांचे केवायसी केल्यास आयुष्मान कार्ड काढणे सोयीचे होईल. आरोग्याचा आपला डेटा संग्रहीत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. येत्या काही दिवसांत ‘मिशन संजीवनी’ हा प्रकल्प लाँच होणार असून यात विविध प्रकारचे ट्रॉन्सप्लाँट करणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

    पॅनलवर असलेल्या रुग्णालयांबाबत जनजागृती करावी : आमदार देवराव भोंगळे

    प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्याला मिळणे आवश्यक आहे. या योजना प्रभावीपणे राबवायच्या असेल तर खाजगी रुग्णालयांची संख्या वाढविण्या शिवाय पर्याय नाही. जे खाजगी रुग्णालय स्वत:हून पुढे येत असतील, त्यांना यंत्रणेने त्रास देऊ नये, योग्य तपासणी करून संदर्भसेवेसाठी त्यांना परवानगी द्यावी. तसेच जिल्ह्यातील कोणते रुग्णालय शासकीय पॅनलवर आहे, त्याबाबत जनजागृती करावी, असे आमदार देवराव भोंगळे म्हणाले. अनेक दुर्धर आजारांचाही एकत्रित आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करावा. जिल्ह्यात मिशन मोडवर आयुष्मान गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम राबवावी आणि रुग्णवाहिकेची संख्या वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. Chandrapur health panel private hospitals Ayushman benefit

    ही आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील पॅनलवरील रुग्णालये

    चंद्रपूर जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण 23 रुग्णालय अंगीकृत असून यात 15 शासकीय रुग्णालय तर 8 खाजगी रुग्णालय आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय, चिमूर, मूल, राजुरा आणि वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच बल्लारपूर, भद्रावती, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना, नागभीड, पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयांमध्ये चंद्रपूर येथील कोल सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रीस्ट हॉस्पीटल, गाडेगोणे आर्थोपेडीक हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पीटल, मुसळे हॉस्पीटल, वासाडे हॉस्पीटल, चिमूर येथील श्रीहरी नेत्रालय आणि ब्रम्हपुरी येथील यशलोक हास्पीटल यांचा समावेश आहे. Chandrapur health panel private hospitals Ayushman benefit

  • BJP condolence for Ahmedabad plane crash victims । “अहमदाबाद विमान दुर्घटनेने देश हादरला! चंद्रपूर BJP कडून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली”

    BJP condolence for Ahmedabad plane crash victims

    BJP condolence for Ahmedabad plane crash victims : अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विमान दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला असून चंद्रपूर जिल्ह्यातही शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    कार्यक्रमाला भाजपा चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, , प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम, माजी नगरसेवक संजय कचर्लावार, रवि आस्वाणी, अॅड. सुरेश तालेवार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, रवी लोणकर, संदीप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, सचिन कोतपल्लीवार, अरुण तिखे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, बंटी चौधरी,

    माजी नगरसेविका पुष्पा उराडे, शितल कुळमेथे, शितल गुरनूले, संगीता खांडेकर, कल्पना बबुलकर, पुरुषोत्तम राऊत, प्रलय सरकार, विनोद शेरकी, प्रमोद शास्त्रकार, राकेश बोमनवार, शितल ईटनकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, शालू कंनोजवार, धनराज कोवे, अमीन शेख, युवा मोर्चाचे यश बांगळे, अ‍ॅड. हरिष मंचलावार, सुभाष अदमाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    jorgewar office

    माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला खासदार धानोरकरांचा पाठिंबा

    वेदनादायक घटना

    कार्यक्रमाची सुरुवात दुर्घटनेतील मृतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मिनिट मौन पाळून करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भाजपा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार म्हणाले की, ही दुर्घटना केवळ संबंधित कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत वेदनादायक आहे. मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला.

  • Pratibha Dhanorkar support bachchu kadu protest । खासदार धानोरकरांचा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!

    Pratibha Dhanorkar support bachchu kadu protest

    Pratibha Dhanorkar support bachchu kadu protest : चंद्रपूर :  खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील जनआंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माजी आमदार बच्चू कडू यांना पाठवलेल्या पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.

    माजी आमदार बच्चू कडू हे शेतकरी, दिव्यांग आणि समाजातील वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. “आपण जनसामान्यांच्या हितासाठी नेहमीच संघर्ष करत आला आहात. आपल्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष सातत्याने विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे, ही बाब अभिनंदनीय आहे,” असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे. Bachchu Kadu farmers rights protest support 2025

    चंद्रपुरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात, आप ने केली कारवाईची मागणी

    सकारात्मक परिणाम घडणार

    माजी आमदार कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या मागण्या जनसामान्यांच्या हिताच्या असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांना आपला आणि आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे खासदार प्रतिभा  धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे. “जनप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न शासनासमोर मांडणे आणि ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण करत असलेले हे आंदोलन निश्चितच सकारात्मक परिणाम घडवेल अशी मला आशा आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी माजी  आमदार बच्चू कडू यांच्या या लढ्यात आपण खंबीरपणे त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.