honey hub initiative by Sudhir Mungantiwar : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याला मध उत्पादनाच्या माध्यमातून ‘हनी हब’ बनविण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मधमक्षिका पालनासाठी मामला व पिरली या गावांची ३ जानेवारी २०२४ रोजी ‘मधाचे गाव’ म्हणून घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर सुरू झालेल्या उपक्रमांतून आता प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक टप्पा राबवण्यात येत आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांचे प्रयत्न या क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार आहेत. Chandrapur honey hub beekeeping training
जिल्ह्यातील ४० प्रशिक्षणार्थींनी नुकतीच देशातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मांघर (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक व्यवस्थापन व ग्रामस्थांकडून वर्षभरात ७ ते ८ हजार किलोपर्यंत होणाऱ्या मध उत्पादनाच्या यशस्वी कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली. मधसंचय, प्रक्रियेची शिस्तबद्ध पद्धत, बाजारपेठेचा अभ्यास आणि ग्रामसंघटनात्मक एकात्मतेची उदाहरणे यांचा थेट अनुभव घेत प्रशिक्षणार्थींनी आपल्या ज्ञानात मोलाची भर घातली.
यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना CBRTI पुणे आणि मधसंचनालय महाबळेश्वर येथे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. यामध्ये मधमक्षिका पालन, पेटी व्यवस्थापन, किटकनाशकांचा प्रभाव, वनीकरणाशी समन्वय इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी मध उत्पादनाच्या क्षेत्रात नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी सज्ज होत आहेत. आर्थिक उत्पन्नवाढीचा पूरक मार्ग तयार होत असल्याचे समाधान व्यक्त करत प्रशिक्षणार्थींनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. त्यांच्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक नवे स्थिर आणि शाश्वत पर्याय उपलब्ध होईल, अशी भावना व्यक्त केली.
Maharashtra OBC hostel admission 2025 bachelor : चंद्रपूर : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुलामुलींना उच्च शिक्षण घेता यावे, तसेच वाढत्या स्पर्धेमध्ये टिकुन राहता यावे यासाठी वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी फक्त पदवी प्रथम वर्षात (Bachelor Degree) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा. त्यासाठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेशाचे निकष व नियमावली खालीलप्रमाणे :
1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 2.विद्यार्थी हा चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा. 3. विद्यार्थी हा फक्त पदवी प्रथम वर्षातच (Bacherlor Degree) शिक्षण घेणारा असावा. 4. वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांचे आत असावे. 5. विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 6. आलेल्या लिंकवरती क्लिक करुन 6 पानांचा फॉर्म डाऊनलोड व प्रिंट करावा. bachelor degree hostel eligibility OBC Maharashtra
7. व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी Non Cremylayer तसेच Cast Validity जोडणे बंधनकारक आहे. 8. बिगर व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी Non Cremylayer तसेच Cast Validity जोडू नये. 9. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड व वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे. 10. वर नमुद तसेच पान क्रमांक 6 वर लिहीलेली संपूर्ण कागदपत्रे जोडून सदर अर्ज इतर मागासवर्गीय मुलां /मुलींचे शासकिय वसतीगृहात जमा करावा.
Maharashtra OBC loan scheme up to 1 lakh : चंद्रपूर : जनसामान्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजना राबविल्या जातात.
1 लक्ष रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना
इतर मागास प्रवर्गातील व्यक्तीना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करण्याकरीता 1 लक्ष रुपयाची निरंक व्याजदर असलेली थेट कर्ज योजना आहे. सदर योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. कर्ज परत फेडीचा कालावधी हा 4 वर्षापर्यतचा असून नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये 2085 रुपये मुद्दल परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याज आकारण्यात येईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष पर्यंत असावे. OBC eligible loan schemes Maharashtra 2025
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थ्यांना बैंकमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे.
योजनेचे स्वरुप : 1. राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कार्य मर्यादा 10 लक्ष रुपयांपर्यंत. 2. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 20 लक्ष रुपयांपर्यत.
पात्रतेच्या अटी व शर्ती : अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता 8 लक्ष रुपयांपर्यंत असावी. अर्जदार हा इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा, तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर 0.1 (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे किंवा 500 पेक्षा अधिक असावा, OBC educational loan reimbursement Maharashtra
कार्यपद्धती : सदर योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobefdc.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
महाराष्ट्र राज्य इतर मागासवगीय वित्त आणि विकास महामंडळ व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 15 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. interest subsidy OBC loan Maharashtra government
उद्देश : महाराष्ट्र राज्यातील समाजातील गरजू कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री सेवा क्षेत्र, इ. व्यवसायाकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे.
स्वरूप : बैंकमार्फत लाभार्थीना 15 लाखांपर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत), व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बैंक प्रामाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. तसेच कुटुंबातील वार्षिक मर्यादा 8 लक्ष रुपयांपर्यंत आहे. ही योजना संपूर्णपणे संगणीकृत असून महामंडळाचे वेब पोर्टल www.msobefde.org या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.
5 लक्ष रुपयांपर्यंतची 20 टक्के बीज भांडवल योजना : बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कमाल मर्यादा 5 लाखापर्यतच्या कृषी व संलन व्यवसाय वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघु व सेवा उद्योगासाठी महामंडळामार्फत कर्ज देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजूर कर्ज रकमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर 6 टक्के व्याज दर असून बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याजदर लागू राहील, सदर कर्जाची परतफेड 5 वर्षापर्यंत करता यईल. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे व कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लक्ष रुपयांपर्यंतची असावी. Maharashtra OBC loan scheme up to 1 lakh
या महामंडळामार्फत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवगीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर फोन क्रमांक 07172—262420 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
unopposed cooperative bank director election : बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तालुका अ गटातून बँकेचे विद्यमान सदस्य डॉ अनिल वाढई यांची अविरोध निवड झाली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक २१ संचालक पदासाठी येणाऱ्या १० जुलै ला होणार आहे. त्यात ११ जून रोजी फॉर्म भरण्याची शेवटची मुदत होती. बल्लारपूर तालुक्यातील सेवा सहकारी अ गट मध्ये एकूण ७ सदस्य होते. डॉ अनिल वाढई यांचे एकमेव फॉर्म असल्याने ते अविरोध निवडून आले. डॉ.अनिल वाढई हे दुसऱ्यांदा बँकेत निवडून आले. Chandrapur district cooperative bank director win
डॉ अनिल वाढई यांनी निवडणुकीत अविरोध निवडून आल्या बद्दल राजुरा चे माजी आमदार सुभाष धोटे, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी विरोधी पक्षनेता आमदार विजय वडेट्टीवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, माजी अध्यक्ष शेखर धोटे यांचे आभार मानले.
त्यांच्या अविरोध निवडून आल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती ची संचालिका अलका अनिल वाढई, रामभाऊ टोंगे, मुरलीधर पाटील गौरकर, घनश्याम मुलचंदानी, नरेश मुंदडा, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अब्दुल करीम, माजी गट नेते देवेंद्र आर्य, चंद्रकांत गुरु, डॉ सुनील कुलदीवार , डॉ अशोक घुंगुरुडकर, रमेश राजुरकर, घनश्याम उरकुडे, इस्माईल ढाकवाला, युवराज भासरकर यांनी अभिनंदन केले.
Air India 787 crash Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका विमानाला अपघात झाला आहे. लंडनला जाणारे हे विमान विमानतळ परिसरातच कोसळले, त्यामुळे मोठा स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट चहुबाजूने पसरले.
गुरुवारी (१२ जून) दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ड्रीमलायनर ७८७ कोसळले, ज्याचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादच्या मेघानीनगर भागात आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसल्या. त्याच वेळी दूरवरून काळ्या धुराचे लोट दिसत होते. या विमानात २४२ प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. Ahmedabad plane crash London flight
हे ड्रीमलायनर बोईंग ७८७ लंडनला जात होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना जवळच्या इमारतीला किंवा भिंतीला धडकल्याने विमान कोसळले.
सुरुवातीच्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ विमान कोसळल्याचे मानले जात आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. Air India plane crash residential area Ahmedabad
विमानाचा पंख तुटला
चित्रात दिसत आहे की विमानाचा एक पंख तुटून पडला आहे. अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते.
सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे, हा भीषण अपघात पाहून लोक घाबरले आहेत आणि इकडे तिकडे धावत आहेत. विमान पूर्णपणे खराब झाले आहे. विमानाचा बहुतांश भाग जळून राख झाला आहे. ज्या इमारतीवरून विमान पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे.
विमानतळाजवळ एक सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.
Illegal school in Chandrapur : चंद्रपूर – शासकीय सैनिक शाळेच्या जवळच “SSCN सैनिक स्कूल चंद्रपूर” नावाने बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खासगी शाळेविरोधात आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांच्यावतीने शिक्षण विभागाला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सदर शाळेस कोणतीही शासकीय मान्यता, परवाना अथवा UDISE क्रमांक नसतानाही ती निर्बंध न पाळता खुलेआम प्रवेश प्रक्रिया राबवते आहे. unauthorised school in Chandrapur SSCN
या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच राजू कुडे – युवा जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांनी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांना निवेदन सादर केले. त्यानंतर शिक्षण अधिकारी (प्राथमिक), शिक्षण अधिकारी (माध्यमिक) आणि SSCN शाळेचे प्रतिनिधी यांच्यासोबत आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीत, सदर शाळेला नव्या प्रवेशांना मनाई करण्यात आली असून, लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांनी दिले.
तर शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन
पालकांची फसवणूक आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बेकायदेशीर शाळांविरोधात तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. नियमबाह्य शिक्षण संस्था चालवणे हे कायद्याच्या चौकटीत गुन्हा असून अशा प्रकारांवर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. जर ८ दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.
यावेळेस आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला महानगर अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख, महानगर संघटनमंत्री संतोष बोपचे, प्रशांत सिदूरकर, स्नेहल नगराळे, इत्यादी उपस्थित होते.
police slow to act on missing person case : चंद्रपूर – चिमूर शहरातील नेहरू वॉर्ड येथील रहिवासी 64 वर्षीय अंजना केशवराव कामडी 8 मे 2025 पासून घरा बाहेरून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही आई कुठेही सापडली नाही तेव्हा चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु 1 महिना उलटूनही चिमूर पोलिस प्रशासनाला आईचा शोध घेण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. राजकीय किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या नातेवाईकांना शोधण्यात पोलिस प्रशासन तत्परता दाखवते, परंतु सामान्य जनतेला मदत करण्यात पुलिस प्रशासनाकडून निष्काळजीपणा किंवा उशीर केला जाता असा आरोप बेपत्ता महिलेची मुलगी वंदना गिरडकर ने पत्रकार परिषदेत केला आहे.
बेपत्ता अंजना केशवराव कामडी(64) ही चिमूरमधील नेहरू वॉर्ड येथील रहिवासी आहे. मोठी बहीण आणि मुलगा आईसोबत राहतात. बहीण आणि तिचा मुलगा नोकरी करतात. 8 मे रोजी दुपारी 2 वाजता बेपत्ता अंजना कामडी घराबाहेर पडली. मोठी बहीण संध्याकाळी कामावरून घरी परतली तेव्हा आई घरी नव्हती. तिने अन्य बहिणींशी संपर्क साधला आणि नातेवाईकां कडे ही विचारणा केली पण आईचा कुठेच पता लागला नाही. त्यावेळी तिचा मोबाईल आणि चष्मा घरी होता. police slow to act on missing person case
१ महिना उलटला, पोलिसांचा विलंब
आईला चष्म्याशिवाय दिसत नाही, मग ती घराबाहेर कशी जाऊ शकते असा प्रश्न यावेळी वंदना यांनी उपस्थित केला. दुपारची वेळ असल्याने सर्व लोग घरात होते त्यामुळे आसपास च्या लोकांनी आईची काहीच कल्पना नही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर 9 मे रोजी चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु 1 महिना उलटूनही पोलिसांना आई सापडत नाही. पोलिसांना वारंवार विचारणा केल्यानंतरही प्रयत्न सुरू असल्याचे सांगून ते शोध लावण्यास विलंब करत आहेत. daughter criticizes police handling missing mother
तक्रार दाखल केल्यानंतर घराजवळील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा चे फुटेज तपासले असते तर आई नक्कीच सापडली असती असा आरोप वंदना यांनी केला. परंतु पोलिसांनी 7 दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामुळे आई अंजना सापडत नाहीये. या संदर्भात जिल्हाधिकारी, एसपी, पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात उपस्थित असलेल्या तिन्ही बहिणींनी सांगितले की त्यांना आईच्या मालमत्ते साठी किंवा जादूटोण्यासाठी तिचे अपहरण केल्या जाऊ शकते असा संशय तीन्ही बहीनीं नी केला आहे. family accuses police of inaction missing mother
पोलिसांचे प्रयत्न कमी
पालिकेच्या दुर्लक्षे मुळे चिमूरमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, अन्यथा एक तरी कैमेरा मध्ये आईचे फुटेज टिपले असते. चिमूर पोलिसां चे प्रयत्न त्यांच्या आईला शोधण्यात कमी पडत असल्याचा आरोप वंदना यांनी केला. राजकीय किंवा प्रतिष्ठित व्यक्तीचा नातेवाईक बेपत्ता झाल्यावर पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते, मग सामान्य माणसाच्या नातेवाईकांना शोधण्यात विलंब का होतो? असा प्रश्न वंदना गिरडकर यांनी विचारला. आई अंजना कामडी यांच्या बेपत्ता होण्याचा तपास गुप्तचर विभाग किंवा गुन्हे अन्वेषण कडे सोपवून न्याय देण्याची मागणी वंदना गिरडकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. पत्रकार परिषदेत वंदना गिरडकर, ज्योत्स्ना इटनकर, अर्चना तडस उपस्थित होते.
dispute over money : मूल:-पैशाच्या हिशोबावरून झालेल्या क्षुल्लकशा कारणावरून कोंबडी कापण्याच्या सत्तूरणे सपासप वार करून एका युवकाची भर चौकात हत्या करण्यात आली. घटनेने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. ही घटना मूल तालुक्यातील मारोडा येथे बुधवारी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. man killed in broad daylight with cleaver
शंतनु मूर्लिधर येरणे वय २२ वर्ष रा.मारोडा असे मृत व्यक्तीचे नाव आहे.तर अमित अनिल निकेसर वय ३२ वर्ष रा.मारोडा असे आरोपीचे नाव आहे.अमित निकेसर यांचे मारोडा येथे अमित चिकन सेंटर नावाने चिकन विक्रीचे दुकान असून रेतीचा व्यवसाय आहे. शंतनु येरणे हा अमितकडे दिवांजीचे काम करीत होता.
महसूल विभागाकडून घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप सुरू असल्याने अमितने घरकुल लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा केला होता.शंतनु सकाळी रेतीची वसुली करून अमितकडे हिशोब देत असताना दोघांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली.वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने अमितने चिकन सेंटर मधील कोंबड्या कापण्याच्या सत्तूरने शंतनुच्या पोटावर,छातीवर सपासप वार जागीच ठार केले.
वाद सोडविण्यासाठी आलेल्या शंतनुचे वडील सुध्दा जखमी झाले.घटनेनंतर आरोपीने मूल पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घटनेची आपबिती सांगीतली.पोलिसांनी आरोपीला अटक करून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.
गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान
मूल तालुक्यातील ११ महिन्यात चार हत्येच्या घटना घडल्या.गुन्हेगारीच्या घटनांनी नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.सध्या मूल पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षकांचे पद रिक्त असून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कारभार हाकणे सुरू आहे.त्यामुळे प्रभारी अधिकारी वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पेलतील काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
sonam raghuwanshi : NEWS३४ वृत्तसेवा – मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चित राजा रघुवंशी हत्याकांडात सोनम ने गुन्हा कबूल करीत आपण हत्येत सहभागी असल्याचे मेघालय पोलिसांना सांगितले. तिने प्रियकर राज कुशवाहा समोर आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पुढे आली आहे. honeymoon murder case
इंदूरहून पत्नीसोबत हनिमून साजरा करण्यासाठी शिलाँगला गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. एसआयटी चौकशीदरम्यान आरोपी सोनम रघुवंशीने तिचा गुन्हा कबूल केला आहे. सर्व पुरावे सादर करून सोनमची चौकशी केली जात आहे आणि चौकशीदरम्यान सोनम म्हणाली की हो, तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात तिचा सहभाग होता. मेघालय पोलिसांनी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांना समोरासमोर आणले तेव्हा सोनम खचून पडली आणि तिने तिचा पती राजा कुशवाहाच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे कबूल केले. पोलिसांनी दोघांनाही ठोस पुराव्यांसह समोरासमोर बसवून चौकशी केली. shocking honeymoon crime in Shillong
लग्नानंतर पत्नी सोनम रघुवंशीसोबत हनिमून साजरा करण्यासाठी २३ मे रोजी शिलाँगमधील सोहरा येथे गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येच्या तपासात मेघालय पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी ४२ सीसीटीव्ही फुटेज, रक्ताने माखलेले जॅकेट, सोनमचा रेनकोट आणि सर्व प्रकारचे पुरावे सादर केले आणि राज कुशवाहालाही समोर बसवले. हे सर्व पुरावे पाहून सोनम पूर्णपणे खचली आणि तिने कबूल केले की तिने राज कुशवाहा आणि इतर तीन आरोपींसह राजाच्या हत्येचा कट रचला होता आणि त्याची हत्या करण्यात आली.
सात जन्माची साथ ?
पोलिस तपासात असे दिसून आले की सोनम राजाला हनिमूनच्या बहाण्याने शिलाँगला घेऊन गेली होती, तिने तिच्या सासूला खोटे सांगितले की ती अपरा एकादशीचे व्रत करत आहे, तर हॉटेलच्या रेकॉर्डवरून तिने जेवण केल्याचे दिसून आले. यासोबतच, हत्या केल्यानंतर, सोनमने राजाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘सात जन्मों का साथ है’ असे पोस्ट करून तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. गुवाहाटी रेल्वे स्थानकाजवळून पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र देखील जप्त केले.
कोण कोण या कटात सामील?
मेघालयातील सोहरा येथे राजाच्या हनिमून दरम्यान हत्या करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सोमवारी सोनमला अटक केली. सोनमने सुपारी दिलेल्या माणसांनी राजाची हत्या केल्याचा आरोप आहे. सोनमने उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील नंदगंज पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यापूर्वी आकाश राजपूत (१९), विशाल सिंग चौहान (२२) आणि राज सिंग कुशवाह (२१) या तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली होती.
tiger safari project in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूरमध्ये प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पास गती देण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या पर्यटनवाढीसाठी आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्टपणे मांडले. त्यांच्या सूचनांनुसार वनमंत्री गणेश नाईक यांनीही या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवत निधी वितरणाची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन बल प्रमुख शोमिता बिस्वास, अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हसेकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व समन्वय अधिकारी नरेश झुरमुरे, वनविकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर बोडे, महाव्यवस्थापक (मुख्यालय) बेऊला माथी, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक विवेक होसिंग तसेच महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डाचे सदस्य अरुण तिखे यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमीच्या मागील बाजूस १७१ हेक्टर क्षेत्रात टायगर सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी 580 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सदर प्रकल्पाचा आराखडा महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिनस्त एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेड यांच्याकडे तयार करण्यासाठी देण्यात आला आहे.
🎯 चंद्रपूरच्या टायगर सफारी प्रकल्पात कोणते प्राणी दिसणार? संपूर्ण यादी वाचाच!
या प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साउथ अमेरिकन, साउथ आफ्रिका आणि इंडियन ट्रेल अश्या वेगवेगळ्या थीमवर आधारित प्राणीदर्शन झोन असतील. यामध्ये कॅंगारू, जग्वार, माकडे, कॅपीबारा, विविध रंगीबेरंगी पक्षी अशा अनेक विदेशी व देशी प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. याशिवाय ४४ हेक्टर क्षेत्रात वाहन सफारी आणि २० एकर क्षेत्रात चिल्ड्रन पार्क व इतर पर्यटकांसाठी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. Chandrapur safari park development update
स्थानिकांना रोजगाराच्या संधी
या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबाच्या सफारीसाठी लाखो पर्यटक चंद्रपूरला येतात. मात्र अनेकदा वाघाचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही. नव्या टायगर सफारीमुळे पर्यटकांना हमखास वाघाचे दर्शन होईल, तसेच विदेशी प्राणीही पाहायला मिळतील. त्यामुळे चंद्रपूरच्या पर्यटनात लक्षणीय वाढ होऊन जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. wildlife tourism jobs for locals
या बैठकीत पुढील टप्प्याचे नियोजन आणि निधी वितरणाबाबत निर्णय घेण्यात आले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडने तयार केलेल्या आराखड्याची सखोल व तांत्रिक तपासणी करण्यात यावी, कोणतीही त्रुटी राहू नये, याची पूर्ण काळजी घ्यावी. प्रस्तावित ट्रेल्समध्ये स्थानिक जैवविविधतेचा विचार करून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे असे निर्देश दिले आहे. Chandrapur tourism new attractions
ना. नाईक यांनी पुढे म्हणाले की, प्रकल्पातील प्रत्येक टप्प्यात पर्यटक, प्राणी आणि कर्मचारी यांची सुरक्षा सर्वोच्च असावी, चिल्ड्रन पार्क, भोजनगृहे, विश्रांतीगृहे, स्मृतीचिन्ह विक्री केंद्रे यासारख्या सर्व सुविधा जागतिक दर्जाच्या असाव्यात. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजनबद्ध व ठरलेल्या वेळेत पार पडावी, यासाठी सक्षम कार्ययोजना राबवली जावी असे ते म्हणाले.