Maharashtra OBC hostel admission 2025 bachelor । 📄 12वी नंतर थेट वसतीगृहात प्रवेश – 2025 Bachelor विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

Maharashtra OBC hostel admission 2025 bachelor

Maharashtra OBC hostel admission 2025 bachelor : चंद्रपूर : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुलामुलींना उच्च शिक्षण घेता यावे, तसेच वाढत्या स्पर्धेमध्ये टिकुन राहता यावे यासाठी वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी फक्त पदवी प्रथम वर्षात (Bachelor Degree) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

१ लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळवा

सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा. त्यासाठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रवेशाचे निकष व नियमावली खालीलप्रमाणे :

1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 2.विद्यार्थी हा चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा. 3. विद्यार्थी हा फक्त पदवी प्रथम वर्षातच (Bacherlor Degree) शिक्षण घेणारा असावा. 4. वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांचे आत असावे. 5. विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 6. आलेल्या लिंकवरती क्लिक करुन 6 पानांचा फॉर्म डाऊनलोड व प्रिंट करावा. bachelor degree hostel eligibility OBC Maharashtra

7. व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी Non Cremylayer तसेच Cast Validity जोडणे बंधनकारक आहे. 8. बिगर व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी Non Cremylayer तसेच Cast Validity जोडू नये. 9. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड व वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे. 10. वर नमुद तसेच पान क्रमांक 6 वर लिहीलेली संपूर्ण कागदपत्रे जोडून सदर अर्ज इतर मागासवर्गीय मुलां /मुलींचे शासकिय वसतीगृहात जमा करावा.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *