Tag: सुवर्णसंधी

  • Maharashtra OBC hostel admission 2025 bachelor । 📄 12वी नंतर थेट वसतीगृहात प्रवेश – 2025 Bachelor विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

    Maharashtra OBC hostel admission 2025 bachelor

    Maharashtra OBC hostel admission 2025 bachelor : चंद्रपूर : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुलामुलींना उच्च शिक्षण घेता यावे, तसेच वाढत्या स्पर्धेमध्ये टिकुन राहता यावे यासाठी वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी फक्त पदवी प्रथम वर्षात (Bachelor Degree) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

    १ लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळवा

    सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा. त्यासाठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

    प्रवेशाचे निकष व नियमावली खालीलप्रमाणे :

    1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 2.विद्यार्थी हा चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा. 3. विद्यार्थी हा फक्त पदवी प्रथम वर्षातच (Bacherlor Degree) शिक्षण घेणारा असावा. 4. वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांचे आत असावे. 5. विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 6. आलेल्या लिंकवरती क्लिक करुन 6 पानांचा फॉर्म डाऊनलोड व प्रिंट करावा. bachelor degree hostel eligibility OBC Maharashtra

    7. व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी Non Cremylayer तसेच Cast Validity जोडणे बंधनकारक आहे. 8. बिगर व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी Non Cremylayer तसेच Cast Validity जोडू नये. 9. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड व वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे. 10. वर नमुद तसेच पान क्रमांक 6 वर लिहीलेली संपूर्ण कागदपत्रे जोडून सदर अर्ज इतर मागासवर्गीय मुलां /मुलींचे शासकिय वसतीगृहात जमा करावा.

  • Mukhyamantri Yojana Doot : चंद्रपुर जिल्ह्यातील युवकांना काम करण्याची सुवर्णसंधी

    Mukhyamantri Yojana Doot : चंद्रपुर जिल्ह्यातील युवकांना काम करण्याची सुवर्णसंधी

    Mukhyamantri Yojana Doot मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    Mukhyamantri Yojana Doot चंद्रपूर : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    डॉक्टरसाठी जनता रस्त्यावर

    महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

    अवश्य वाचा : अयोध्येचे राम मंदिर आता चंद्रपूर जिल्ह्यात

    या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

    मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

  • Professional pilot training : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणींना व्यावसायिक पायलट होण्याची संधी

    Professional pilot training : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणींना व्यावसायिक पायलट होण्याची संधी

    Professional pilot training

    Professional pilot training (प्रकाश हांडे) नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट परवाना (कर्मशिअल  पायलट लायसन्स) प्रशिक्षणाकरीता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना राज्य शासनाकडुन 90 टक्के अनुदान (अंदाजे 37 लक्ष) रुपये प्राप्त होणार असून उर्वरित 10 टक्के रक्कम  (अंदाजे 4 लक्ष) रुपये  निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वत: भरावयाची आहे. य बाबतचा अधिक तपशील व अर्जाचा नमुना www.chanda.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    चंद्रपुरातील दिक्षाभूमीचा होणार कायापालट

    प्रक्रियेचा कालावधी : 

    अर्ज सादर करावयाचा कालावधी 29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत, परिक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे 23 ऑगस्ट 2024, लेखी परीक्षा 1 सप्टेंबर 2024 रोजी, लेखी परीक्षेचा निकाल परिक्षा संपल्यानंतर,  जिल्हा समितीद्वारे कागदपत्र पडताळणी 3 सप्टेंबर 2024 रोजी.

    परीक्षा शुल्क : प्रत्येक विद्यार्थ्यास ऑनलाईन पेमेंट पध्दतीने  1 हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल.

    लाभार्थी/ उमेदवार निकष : 1) उमेदवार महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा/असावी.

    2) उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते 28 वर्षे (1.1.2024रोजी) 3) 12 वी  विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,गणित  हे विषय घेऊन अनुसुचित जमाती करीता किमान 65 टक्के गुणासह व अमागास करीता  किमान 75 टक्के गुणासह  प्राप्त करून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला /झालेली उमेदवार अर्ज करण्यास पात्र  राहील.

    अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे : 

     महाराष्ट्र राज्याचे विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील डोमीसाईल (अधिवास) प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, 10 वी व 12 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट, मुख्याध्यापक / शाळेचे प्राचार्य/ राजपत्रित अधिकारी  यांनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र, चंद्रपूर जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असल्याबाबतचे तहसिलदार यांचे रहिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, अनुसुचित जमातीचे प्रवर्गाकरीता जातीचे प्रमाणपत्रव जात वैधता प्रमाणपत्र, अंतिम प्रवेशपात्र झालेल्या उमेदवारांनी DGCA Approved Medical Practitioner यांचे कडून  वैद्यकीय प्रमाणपत्र व पोलीस विभागाकडून चारित्र्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून सादर करणे आवश्यक राहील.

    ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत : 1) प्रस्तुत पदांकरिता फक्त http://chandaflying.govbharti.org या अधिकृत  संकेतस्थळावरून विहित पध्दतीने भरलेले ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील व इतर कोणत्याही  प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. 2) सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी स्वत: उमेदवाराची राहील. 3) ऑनलाईन अर्ज करतांना, शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. 4) ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना http://chandaflying.govbharti.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

    5) ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना स्वत:चा अद्यावत  विहीत नमुन्यातील पासपोर्ट फोटो व सही स्कॅन करून  http://chandaflying.govbharti.org मधील सुचनेनुसार ‍विहीत पध्दतीने अपलेाड करणे अनिवार्य आहे.  6) ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांक व वेळेनंतर अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.  7) निवड झालेल्या उमेदवाराने कागदपत्रे  पडताळणीस स्वत: उपस्थित राहावे. 8) अर्जदाराने भरतीप्रक्रियेदरम्यान राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.  

          Professional pilot training  जिल्हा उपसमिती, चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या  लेखी  परीक्षेमधून गुणानुक्रमे उमेदवारांची निवड करण्यात येईल. वरील निवड प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, चंद्रपूर तथा अध्यक्ष जिल्हा उपसमिती, चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन समिती यांना राहतील, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कळविले आहे.