Blog

  • hit and run case at toll plaza । टोल वाचवण्याच्या नादात कर्मचाऱ्याला चिरडलं; विसापूर टोल नाक्यावर वाहनचालकाचा थरार

    hit and run case at toll plaza

    hit and run case at toll plaza : बल्लारपूर (चंद्रपूर) – बल्लारपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या विसापूर टोलनाक्याजवळ ८ जूनच्या मध्यरात्री १ वाजता एका वाहनचालकाने टोल चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐनवेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ते वाहन त्या कर्मचाऱ्याला चिरडत पुढे गेले. या घटनेत कर्मचारी जखमी झाला असून त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    भद्रावतीमध्ये १७ गोवंशाची पोलिसांनी केली सुटका

    सीसीटीव्ही मध्ये थरार कैद

    बल्लारपूर तालुक्यातील विसापूर टोल नाक्यावर मध्यरात्री १ वाजता चारचाकी टाटा एस वाहनाने टोल चुकविण्याचा प्रयत्न केला, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला, यावेळी कम्प्युटर ऑपरेटर २७ वर्षीय संजय अरुण वांढरे याने वाहनासमोर जात त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन चालकाने संजय च्या अंगावर वाहन नेत त्याला चिरडत पुढे गेला. हि सर्व घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    या घटनेत संजय वांढरे जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून त्या वाहनचालकांचा पोलिसांनी शोध घेणे सुरु केले.

  • animal cruelty prevention act । १७ गोवंशांची सुटका; प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

    animal cruelty prevention act

    animal cruelty prevention act : भद्रावती (चंद्रपूर): भद्रावती पोलिसांनी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १७ गोवंशांची सुटका केली आहे. ही कारवाई ६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता भद्रावती तालुक्यातील नवरगाव शिवारात एका विटाभट्टीजवळच्या शेतात करण्यात आली. पोलिसांनी या गोवंशांना भद्रावती येथील जैन मंदिर गोशाळेत सुपूर्द केले आहे. police rescue cows from illegal slaughterhouse

    भद्रावती पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, तालुका मुख्यालयापासून १२ किमी दूर असलेल्या नवरगाव शिवारात, जिथे एक विटाभट्टी देखील आहे, तेथील कृषी साहित्य ठेवण्याच्या खोलीत गायी, बैल आणि वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आली आहेत.

    चंद्रपुरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

    १७ गोवंशाची सुटका

    सायंकाळी ६.३० वाजता पीएसआय संजय मिश्रा आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांना तिथे एका खोलीत सर्व गुरे बांधलेली दिसली. या गुरांसाठी चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. पोलिसांनी तपासणी केली असता, सुमारे ४.२५ लाख रुपये किमतीचे एकूण १७ गोवंश आढळून आले. पोलिसांनी या सर्व गोवंशांना सुखरूप बाहेर काढून भद्रावती येथील जैन मंदिर गोशाळेत पाठवले.

    पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता, त्यांना कळाले की ही खोली डोलारा गावातील शेख अबु नावाच्या व्यक्तीची आहे. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी फरार आरोपी शेख अबु शेख अहमद (वय ६०) याच्या विरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पीएसआय प्रियांका गेडाम करत आहेत

  • msedcl celebrated 20th anniversary । चंद्रपूर महावितरण मंडळात सामूहिक सहभागातून 20 वर्षांचा प्रवास साजरा

    msedcl celebrated 20th anniversary

    msedcl celebrated 20th anniversary – चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित 20 व्या वर्धापन दिनानिमित्त सांघिक कार्यालय मुंबई यांचेकडून दिलेल्या कार्यक्रमानुसार 1 जून ते 6 जून 2025 विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने दिनांक 6 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित चंद्रपूर मंडळ यांचे वतीने वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    चंद्रपुरात सामाजिक जबाबदारीचा अनोखा विवाह सोहळा

    कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10.10 वाजता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सुरक्षेची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. त्यानंतर शकुंतला सेलिब्रेशन हॉल चंद्रपूर येथे कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा माननीय अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे चंद्रपूर मंडळ यांचे अध्यक्षतेखाली व श्री रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.) चंद्रपूर परिमंडळ, श्री सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) सुशिल विखार, श्री. विशाल पिपरे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, चंद्रपुर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारव्हेकर, तसेच यावेळी चंद्रपूर परिमंडळातील सर्व सन्माननीय अभियंते,यंत्रचालक, वाहिनी कामगार व इतर तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. msedcl 20th foundation day celebration in chandrapur

    चंद्रपूर मंडल वर्धापन दिन आयोजन समितीतर्फे मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे करिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्व अभियंता, तांत्रिक अतांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे कुटुंबीय व पाल्य यांचे सह उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

    20th foundation day celebration in chandrapur

    बक्षीस वितरण सोहळा

    सायंकाळी बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. श्रीमती संध्या चिवंडे चंद्रपूर मंडळ यांनी इतर तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी यांचे सह केक कापून महावितरण कंपनीचा 20 वा वाढदिवस साजरा केला व सर्व अधिकारी कर्मचारी यांना विद्युत सुरक्षा सप्ताह व वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

    त्यानंतर चंद्रपूर मंडलातील सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचे कुटुंबीय व पाल्य यांच्याकरिता गीतांचा संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला व सोबतच सर्वांकरिता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. रात्री 10 वाजेपर्यंत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगीत रजनी व स्नेहभोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

  • socially responsible weddings |दिव्यांगांसाठी खास: सामाजिक जबाबदारीचा अनोखा विवाह सोहळा

    socially responsible weddings

    socially responsible weddings : चंद्रपूर: विवाह सोहळा म्हटले की प्रचंड खर्च, झगमगाठ, देखावा, जल्लोष परंतु जीवनातील महत्त्वपूर्ण अशा विवाह सोहळ्याला सुद्धा सामाजिक संवेदनशील तेची जोड देऊन एक अनुकरणीय असा मोलाचा संदेश काहीजण देतात. असाच एक आगळावेगळा विवाह सोहळा स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात पार पडला. unique wedding with community support

    इरई नदी खोलीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून

    ज्यामध्ये दिव्यांग कल्याण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणारे निलेश पाझारे यांचा विवाह पुष्पा सावसागडे यांचेशी नोंदणी पद्धतीने संपन्न झाल्यावर विवाहाच्या सर्वच पारंपारिक पद्धतीना फाटा देत दिव्यांगांना स्वयंचलित वाहन, अंध स्मार्ट काठी, श्रवण यंत्र आणि कुबडीचे वाटप करण्यात आले तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील दिव्यांग विभागाला व्हीलचेअर सुद्धा भेट देण्यात आले.

    unique wedding with community support

    शासकीय योजनांची माहिती

    सोबतच विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना दिव्यांग, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्याचा उल्लेखनीय उपक्रम सुद्धा घेण्यात आला ज्यामध्ये समाजसेवा अधीक्षक भास्कर झळके आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेची सविस्तर माहिती दिली.

    वर निलेश स्वतः दिव्यांग असून ते मागील अनेक वर्षांपासून दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच विविध सामाजिक चळवळीत सुद्धा ते सक्रिय आहेत. सदर विवाह सोहळ्याने एक सकारात्मक असा अनुकरणीय सामाजिक संदेश समाजाला दिला असून सर्वत्र पाझारे व सावसाकडे कुटुंबाचे कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्याला चंद्रपुरातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

  • district collector river review meeting updates । इरई नदी खोलीकरणाचा दुसरा टप्पा होणार सुरु

    district collector river review meeting updates

    district collector river review meeting updates : चंद्रपूर ७ जून (News३४) : चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 7) संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन सूचना दिल्या.

    जेष्ठ नागरिकाला अधिकाऱ्याने म्हटले गेट आउट

    व्हीसीद्वारे घेण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार,  तहसीलदार विजय पवार,  कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम) अक्षय पगारे, जलेश सिंग (जलसंपदा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते. 

    इरई नदीचे खोलीकरण तीन टप्प्यात करण्यात येणार असून यातील पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत काम पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा माना खदान (लालपेठ कॉलरी) ते नांदगाव पोडे,असा असून सदर कामाला सोमवारपासून सुरवात होईल. तर तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.

    यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त काम करून खोलीकरणातून निघालेला गाळ त्वरित वाटप करावा. माना खदान ते नांदगाव पोडे  टप्प्यासाठी गाळ संचयित करण्याचे ठिकाण उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी निश्चित करण्यासाठी रोज पाहणी करावी.  त्याचबरोबर भूमी अभिलेख आणि जलसंपदा विभागाने दुसऱ्या टप्प्यातील आखणी करून त्वरित कामाला सुरवात करावी. 

    असे झाले पहिल्या टप्प्यातील काम :

    रामसेतू ते चौराळा पूल दरम्यान 2400 मीटरचे काम पूर्ण झाले आहे.  यात 70 टीसीएम  गाळ उपसा करण्यात आला असून 118 शेतकर्‍यांना 17 हजार ब्रास गाळ वाटप करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 10 पोकलेन, 25 ट्रॅक्टर, 22 टिप्पर कार्यरत आहेत. दुसऱ्या टप्प्यात या यंत्र सामुग्रीसह अतिरिक्त यंत्र सामुग्री वाढविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. silt distribution to farmers

  • ganja smuggling caught by police । NDPS अंतर्गत कारवाई; चंद्रपूरात २ शेतकरी गांजासह अटकेत

    ganja smuggling caught by police

    ganja smuggling caught by police : चंद्रपूर शहरात गांजा विक्री करण्याकरिता थेट गडचिरोली जिल्ह्यातून आलेले शेतकरी रामनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले, आरोपीकडून १ लक्ष ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    गडचिरोली मधून निसटला आणि चंद्रपुरात अडकला

    ६ जून रोजी दोघेजण गांजा विक्री साठी चंद्रपुरात येणार अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी डॉ. वरगंटीवार हॉस्पिटल समोरील मोकळ्या मैदानात सापळा रचला. farmers caught selling cannabis

    सायंकाळी ७ वाजेदरम्यान दोघेजण गांजा विक्री साठी आले असता रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत विचारपूस केली. दोघांची अंगझडती घेतली असता एका प्लास्टिक पन्नी मध्ये गांजा झाडाचे पाने, फुले, बोन्डे व बिया वजन १ किलो ७८१ ग्राम किंमत ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल एमएच ३३ एएफ ९५८६ किंमत ९५ हजार रुपये असा एकूण १ लक्ष ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    गडचिरोली मध्ये शेती, चंद्रपुरात गांजा विक्री

    आरोपी ३८ वर्षीय अजित रतन रॉय, २९ वर्षीय सत्यजित गौरन्ग मंडल काम शेती, दोघे राहणार उदयनगर, मुलचेरा जिल्हा गडचिरोली यांच्यावर एनडीपीएस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. inter district ganja smuggling case

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, पोलीस कर्मचारी जितेंद्र आकरे, आनंद खरात, सचिन गुरनुले, पेतरस सिडाम, प्रशांत शेंद्रे, लालू यादव, शरद कुडे, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, शक्ती कोरेवार व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

  • criminal caught with stolen vehicle । गडचिरोली मध्ये चैन स्नॅचिंग पण दुचाकी चोरीत चंद्रपुरात अडकला

    criminal caught with stolen vehicle

    criminal caught with stolen vehicle : चंद्रपूर – जिल्ह्यात वाहनांच्या चोरी प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्ह्यांचा छडा लावावा असे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहीम राबवित खबरीद्वारे गोपनीय माहिती मिळवली असता रेकॉर्डवरील आरोपी एसटी वर्कशॉप जवळ दुचाकी वाहन विक्री करण्यासाठी येत असल्याचे कळताच पथकाने सापळा रचत एकाला अटक केली. vehicle theft cases solved by police

    तुकूम अपघात प्रकरणी युवती सेनेने केली लक्षवेधी मागणी

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपी ४५ वर्षीय जनरलसिंग उर्फ मन्नूसिंग टाक राहणार समतानगर नेरी चौक ऊर्जानगर याला अटक केली. जनरलसिंग ने महिनाभरापूर्वी नायडू हॉस्पिटल तुकूम जवळून स्प्लेंडर प्रो क्रमांक MH ३४ AX ३८४८ छोटी केली होती.

    गडचिरोली मध्ये चैन स्नॅचिंग

    आरोपीने जनरलसिंग ने गडचिरोली मध्ये महिलेकडून सोन्याची चैन हिसकावत जबरी चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत गडचिरोली पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकीसहित ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, नितीन साळवे, नितीन कुरेकार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, गोपाल आतकुलवार, किशोर वाकाटे, शशांक बदामवार व प्रसाद धुळगंडे यांनी केली.

  • eid celebration with politicians । ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त लष्करी ईदगाह कमेटीच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती

    eid celebration with politicians

    eid celebration with politicians : चंद्रपूर – आज चंद्रपूर जिल्ह्यात ईद-उल-अजहा (बकरी ईद) हा पवित्र सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या श्रद्धा, एकता आणि उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त लष्करी ईदगाह कमेटी तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

    तुकूम अपघात प्रकरणातील आरोपी चालक सहित मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

    यावेळी अनवर खान, साबिर सर, जहिर काजी, इजहार काजी, अफिसुर रहमान, राशिद हुसेन, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, पोलिस उपविभागीय अधिकारी सुधारकर यादव, शांतता समितीचे रमजान अली घायल, खत्री, इमरान शेख, सय्यद अबरार व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.

    political leaders on eid festival

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ईदगाहमध्ये येणाऱ्या मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान लष्करी ईदगाह कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत केले.

    ईद-उल-अजहा हा सण त्याग, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. विविध धर्मांचे, संस्कृतींचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना साकार होते, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

  • Amma Ki Chhaya । गावाला मायेची सावली – ‘अम्मा की छाया’चे भूमिपूजन थाटात

    Amma Ki Chhaya

    अम्मा की छाया सामाजिक सभागृह आईच्या मायेचा स्पर्श देणारी ग्रामविकासाची नवी वाट ठरेल – आ. किशोर जोरगेवार

    Amma Ki Chhaya : चंद्रपूर – आजचा हा दिवस फक्त एक भूमिपूजन नाही, तर आपल्या गावात आईच्या मायेचा स्पर्श घेऊन नव्या वाटेवर पडलेलं एक पाऊल आहे. अम्मा की छाया, सावली मायेची हे नाव उच्चारताच एक मायेची छाया मनात दरवळते. गावाचा खरा विकास रस्त्यांनी किंवा इमारतींनी होत नाही, तर तो संस्कारांमधून, समविचारातून आणि एकत्र येण्याच्या जागांमधून होत असतो. त्यामुळे येथे साकार होत असलेले अम्मा की छाया समाज भवन आईच्या मायेचा स्पर्श देणारी ग्रामविकासाची नवी वाट ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Community Hall

    जेष्ठ नागरिकाला अधिकारी म्हणतो ‘गेट आउट”

    ग्रामविकास निधीतून मायेची सावली उपक्रमांतर्गत वेंडली येथे मंजूर सामाजिक सभागृहाच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, सरपंच प्रतिमा अलवलवार, प्रकाश अलवलवार, माजी सरपंच कैलास चिवंडे, आशिष माशिरकर, आनंदराव पिंपळशेंडे, पोलिस पाटील संजय पाटील, विनोद खेवले, श्रीरंगपाटील वरारकर, मेश्राम आदींची उपस्थिती होती.

    हि एकतेची वास्तू

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सामाजिक सभागृह म्हणजे केवळ भिंती नाहीत, ही आपल्या संस्कृतीची, आपुलकीची आणि एकतेची वास्तू आहे. या जागेवरून अनेक माऊल्यांचे आशीर्वाद पसरतील, इथे मुलांना शिकण्यासाठी आधार मिळेल, महिलांना आत्मनिर्भरतेची दिशा सापडेल, तर युवक-युवतींना आपली कला, क्रीडा आणि विचार व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. या जागेचा उपयोग समाज घडवण्यासाठी व्हावा, नात्यांना जोडण्यासाठी व्हावा आणि पुढच्या पिढ्यांना नवा विचार देण्यासाठी व्हावा. Amma Ki Chhaya

    kishor jorgewar update news

    या भवनामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करता येईल. स्थानिक युवक-युवतींना, कलाकारांना आणि नागरिकांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक भक्कम मंच मिळेल. संघटन, समता आणि संस्कृतीचे मूल्य जपणारे हे केंद्र भविष्यात गावाच्या सर्वांगीण विकासाचे प्रतीक ठरेल. हा उपक्रम समाजाला एकत्र बांधणारा, प्रेरणा देणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. यावेळी येथीलच सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या समाज भवनाचेही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

  • municipal officer misconduct । मनपा कार्यालयातच लोकशाहीची गळचेपी? ज्येष्ठ नागरिकाला म्हटले ‘गेट आउट”

    municipal officer misconduct

    पालकमंत्री उईके यांच्याकडे तक्रार, पालकमंत्र्यांनी दिले ‘हे आदेश”

    municipal officer misconduct : चंद्रपूर – महानगरपालिका चंद्रपूर येथील वाघोबा चौक तुकूम, नोकरकर ले आउट येथील 76 वर्षीय जेष्ठ नागरिकांस उप आयुक्तांनी मनपा कार्यालयातून गेट आउट केल्यामुळे अपमानित झालेल्या व्ही. वाय. लिचडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचेकडे तक्रार नोंदवून मनपा उपआयुक्त खवले यांचेवर कारवाईची मागणी केलेली आहे.

    तुकूम अपघात प्रकरणातील दोषी वाहन चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

    मनपा अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्याने अतिक्रमणाचे कारण पुढे करून नाहरकत ठिकाणी असलेली संरक्षण भिंत कां पाडली याची शहानिशा करण्यासाठी दिनांक 07/04/2025 रोजी मनपा कार्यालयात “लोकशाही” दिनी आपली तक्रार घेवून गेलेल्या जेष्ठ नागरिक व्ही. वाय. लिचडे यांना मनपा उपायुक्तानी कार्यालयातून गेट आउट केले.

    लोकशाही दिनी आपली कैफियत प्रभाविपणे मांडण्याचा संवैधानिक अधिकार असतांना तक्रारकर्ते लिचडे यांना गेट आउट करने म्हणजेच त्यांच्या अधिकारावर घाला घालणे होय. constitutional rights of senior citizens

    पालकमंत्र्यांचे आदेश काय?

    जेष्ठ नागरिक व्ही. वाय. लिचडे यांच्या म्हणण्यानुसार मनपा अतिक्रमन विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्यांची नाहरकत संरक्षण भिंत नकळत पाडली असेल तर त्याची नुकसान भरपाई त्यांना मिळणे स्वाभाविक आहे आणि ते लिचडे यांना अविलंब मिळाले पाहिजे. मनपा उपायुक्त खवले यांनी जेष्ठ नागरिकांस लोकशाही दिनी कार्यालयातून गेट आउट म्हणून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संबंधित बाबींची तपासणी करून कार्यवाही करावी.असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी मनपा आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर यांना दिले आहे.