Amma Ki Chhaya
अम्मा की छाया सामाजिक सभागृह आईच्या मायेचा स्पर्श देणारी ग्रामविकासाची नवी वाट ठरेल – आ. किशोर जोरगेवार
Amma Ki Chhaya : चंद्रपूर – आजचा हा दिवस फक्त एक भूमिपूजन नाही, तर आपल्या गावात आईच्या मायेचा स्पर्श घेऊन नव्या वाटेवर पडलेलं एक पाऊल आहे. अम्मा की छाया, सावली मायेची हे नाव उच्चारताच एक मायेची छाया मनात दरवळते. गावाचा खरा विकास रस्त्यांनी किंवा इमारतींनी होत नाही, तर तो संस्कारांमधून, समविचारातून आणि एकत्र येण्याच्या जागांमधून होत असतो. त्यामुळे येथे साकार होत असलेले अम्मा की छाया समाज भवन आईच्या मायेचा स्पर्श देणारी ग्रामविकासाची नवी वाट ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Community Hall
जेष्ठ नागरिकाला अधिकारी म्हणतो ‘गेट आउट”
ग्रामविकास निधीतून मायेची सावली उपक्रमांतर्गत वेंडली येथे मंजूर सामाजिक सभागृहाच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, सरपंच प्रतिमा अलवलवार, प्रकाश अलवलवार, माजी सरपंच कैलास चिवंडे, आशिष माशिरकर, आनंदराव पिंपळशेंडे, पोलिस पाटील संजय पाटील, विनोद खेवले, श्रीरंगपाटील वरारकर, मेश्राम आदींची उपस्थिती होती.
हि एकतेची वास्तू
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सामाजिक सभागृह म्हणजे केवळ भिंती नाहीत, ही आपल्या संस्कृतीची, आपुलकीची आणि एकतेची वास्तू आहे. या जागेवरून अनेक माऊल्यांचे आशीर्वाद पसरतील, इथे मुलांना शिकण्यासाठी आधार मिळेल, महिलांना आत्मनिर्भरतेची दिशा सापडेल, तर युवक-युवतींना आपली कला, क्रीडा आणि विचार व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. या जागेचा उपयोग समाज घडवण्यासाठी व्हावा, नात्यांना जोडण्यासाठी व्हावा आणि पुढच्या पिढ्यांना नवा विचार देण्यासाठी व्हावा. Amma Ki Chhaya

या भवनामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करता येईल. स्थानिक युवक-युवतींना, कलाकारांना आणि नागरिकांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक भक्कम मंच मिळेल. संघटन, समता आणि संस्कृतीचे मूल्य जपणारे हे केंद्र भविष्यात गावाच्या सर्वांगीण विकासाचे प्रतीक ठरेल. हा उपक्रम समाजाला एकत्र बांधणारा, प्रेरणा देणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. यावेळी येथीलच सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या समाज भवनाचेही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Leave a Reply