Blog

  • Van Shakti 2025 forest women’s conference details । चंद्रपूरमध्ये महिलांसाठी राष्ट्रीय वन परिषद, वाघांच्या वाढत्या हल्ल्यांवर अलार्मिंग सिस्टीमची धार वाढणार – वनमंत्र्यांची ग्वाही

    Van Shakti 2025 forest women’s conference details

    Van Shakti 2025 forest women’s conference details :  गत महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात अनेक जणांचे जीव गेले आहेत, ही अतिशय दु:खद घटना असून शासनस्तरावरून याची दखल घेण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करणार असल्याची ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. Women’s empowerment in forestry sector

    बकर ईद शांततेत पार पाडा – प्रशासनाचे आवाहन

    वन अकादमी येथे वनक्षेत्रातील महिलांची राष्ट्रीय परिषद ‘वनशक्ती – 2025’ चे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार, करण देवतळे, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास, तेलंगणाच्या वनबल प्रमुख श्रीमती सुवर्णा, भारतीय वनीकरण संशोधन संस्थेच्या महासंचालक कंचनदेवी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.

    मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करू, असे सांगून वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सोबतच वन्यजीवांपासून शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण व सोलर कुंपनाचा लाभ देण्यात येईल. वनविभाग हा एक महत्त्वाचा विभाग असून जंगलात मजबूत गाड्यांची आवश्यकता आहे. अशा गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच वनपाल, वनरक्षक, आरएफओ यांच्या स्तरावरील कर्मचा-यांना स्वरक्षणासाठी हत्यारे देण्यात येतील. वनविभाग हा एक परिवार आहे. या परिवारांमध्ये सर्वांची काळजी घेण्याची वनमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे. Van Shakti 2025 forest women’s conference details

    woman's empowerment in forestry sector

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात वनविभाग अग्रेसर राहील. तसेच पुढील वन विभागाच्या भरतीमध्ये 50 टक्के भरती महिलांची (Forest-based employment opportunities in Maharashtra) करण्यात येईल. सध्या जिल्हास्तरावर मानद वन्यजीव रक्षक कार्यरत आहे. हे पद प्रत्येक तालुक्यात नेमण्यात येईल. तसेच महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प वनविभागात राबविण्यात येणार आहे. वन विभागाने तीन-चार अधिकाऱ्यांची टीम तयार करावी व वनांशी संबंधित अभ्यास करण्यासाठी त्यांना विदेशात पाठवावे. चंद्रपूरच्या योगदानातून वनांचे चांगले संरक्षण होत आहे. भद्रावती तालुक्यातील खुटवंडा प्रवेश गेट अतिशय चांगले करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. Van Shakti 2025 forest women’s conference details

    कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास मिळेल

    वनविभागात कार्यरत असलेल्या महिलांची राष्ट्रीय परिषद चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यासाठी सुमिता विश्वास यांनी एक चांगला पुढाकार घेतला आहे. राज्यात पहिल्या प्रमुख तीन पदांवर महिला विराजमान आहेत. यात राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व वनबल प्रमुख यांचा समावेश असून मंत्रालयात मोठ्या प्रमाणात महिला सचिव आहेत. चंद्रपूर येथे होणाऱ्या दोन दिवसीय कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास जागृत होण्यास मदत होईल.

    वनांवर आधारीत उद्योग यावेत : आमदार किशोर जोरगेवार

    चंद्रपूर जिल्ह्यात महिलांची राष्ट्रीय परिषद होत आहे, ही अभिमानची गोष्ट आहे. या दोन दिवसात कार्यशाळेत चांगले मंथन होईल. ज्या कामात महिलांचा सहभाग असतो ते काम उत्कृष्टच असते. वनांचे संवर्धन व्हायला पाहिजे, मात्र मानव वन्यजीव संघर्ष हा मोठा प्रश्न आहे. पोलीस पाटील पदाच्या धर्तीवर वनपाटील आणि वनपाटलीन अशी नियुक्ती करावी. वनांवर आधारित उद्योग जिल्ह्यात यावे. त्यातून येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

    महिला हे शक्तीचे रूप : आमदार देवराव भोंगळे

    महिलांच्या या कार्यशाळेला वनशक्ती असे नाव देण्यात आले आहे. ख-या अर्थाने महिला म्हणजे शक्तीचे रुप आहे, असे आमदार देवराव भोंगळे म्हणाले. आज प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. पर्यावरणाला पुढे नेण्यासाठी महिलांनी काय करावे, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मानव वन्यजीव हा प्रश्न अतिशय गंभीर असून पर्यावरणाचा ऱ्हास ही सुद्धा समस्या आहे. तसेच वन्यजीवांकडून शेतमालाचे होणारे नुकसान याबाबत वनविभागाने चांगल्या उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.

    महिलांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा : आमदार करण देवतळे

    आपल्या विधानसभा क्षेत्रात येणारे खुटवंडा सफारी गेट अतिशय प्राचीन आहे. त्याचे सुशोभीकरण करून येथे सफारींची संख्या वाढविण्यात यावी. वनविभागात मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहे. महिलांना प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार करण देवतळे यांनी केले.

    अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती झाली आहे. वनविभागात काम करणे हे एक मोठे आव्हान आहे. कारण विस्तीर्ण भूप्रदेश, वन्यजीव यांचा मोठा धोका असतो. वनविभागाची नोकरी ही दुर्मिळ क्षेत्रातील नोकरी आहे. महिलांना एक संधी देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. Van Shakti 2025 forest women’s conference details

    कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वागतपर भाषण वनबल प्रमुख शोमिता विश्वास यांनी केले. तर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुवर्णा आणि कांचन देवी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्रेया खाडीलकर यांनी तर आभार चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी मानले.

  • Van Shakti 2025 national forest women conference । जंगलालगतच्या गावांचा विकास ‘वनपाटील-वनपाटलीन’ संकल्पनेतून शक्य – आ. किशोर जोरगेवार

    Van Shakti 2025 national forest women conference

    Van Shakti 2025 national forest women conference : चंद्रपूर – वन हे आपल्या जीवनाचे फुफ्फुस आहे, पर्यावरणाचे संतुलन राखणारे शक्तिस्थान आहे. मात्र आजच्या काळात जंगल केवळ पर्यावरणपूरक बाब नाही, तर ते स्थानीक अर्थव्यवस्थेचा आणि रोजगारनिर्मितीचा आधार ठरू शकते. त्यामुळे वनावर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने विशेष धोरण राबवावे. यामुळे जंगलालगतच्या भागातील युवक-युवतींना गावातच रोजगार मिळेल, स्थलांतर थांबेल आणि त्याच वेळी वनपर्यटनालाही नवे बळ मिळेल अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलतांना वनमंत्री गणेश नाईक यांना केली. women leadership in forest conservation India

    चंद्रपुरात वन नियंत्रण कक्षाची सुरुवात

       राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वनशक्ती 2025, वन क्षेत्रातील महिलांची राष्ट्रीय परिषद  या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, वरोरा भद्रावती विधानसेभेचे आमदार करण देवतळे यांच्यासह वन विभागातील सर्व अधिका-यांची उपस्थिती होती.
    woman leadership in forest conservation

      यावेळी पूढे बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले कि,  वनांचे ‘सर्वांगीण वनसंवर्धन’ करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. यासाठी “वनपाटील आणि वनपाटलीन” ही संकल्पना राबविण्यात यावी. ग्रामपंचायत स्तरावर वनपाटील आणि वनपाटलीन पदासाठी निवडणुका घेतल्या गेल्या तर त्या गावातील नागरिकांना वनसंवर्धनाच्या निर्णयप्रक्रियेत थेट सामावून घेता येईल.

    या पदांना महिलांचे प्रतिनिधित्व दिल्यास हुमन इज फॉरेस्ट लिडरशिप या महत्वाकांक्षी संकल्पनेला चालना मिळेल. या संकल्पनेतून  जंगलालगतची गावे फक्त वनसंवर्धक नव्हे, तर विकासाचे केंद्र बनतील. जंगल आणि गाव एकमेकांचे पूरक बनून या भागातील लोकांचा आत्मविश्वास वाढेल असा विश्वास यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार व्यक्त केला.

    1. What is Van Shakti 2025?

    Van Shakti 2025 is a national-level initiative focused on empowering women in the forest sector, promoting sustainable forest conservation, and boosting forest-based employment in India.

    2. How can forests support local village economies?

    Forests can support village economies by promoting eco-tourism, forest produce-based industries, and community-led conservation programs. These create jobs locally and reduce migration.

    4. What is the concept of Forest Patil and Patilin?

    This is a proposed model where villagers elect a Forest Patil (male) and Forest Patilin (female) to participate directly in local forest management and conservation decision-making at the Gram Panchayat level.
  • 10th and 12th topper SC student scholarship । 10वी-12वीमध्ये पहिला क्रमांक? मिळवा ₹5,000 ते ₹50,000 स्कॉलरशिप!

    10th and 12th topper SC student scholarship

    10th and 12th topper SC student scholarship : चंद्रपूर – इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शाळा / तालुका / जिल्हा / विभागातून प्रथम येणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांस राजश्री छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेद्वारे अनुक्रमे 5 हजार, 10 हजार, 25 हजार, 50 हजार रुपये गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. 

    शासकीय वसतिगृहात प्रवेश हवा? तर आजच करा अर्ज

    योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, बैंक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड व टी.सी. सादर करावे.

              प्रस्ताव सादर न केल्यामुळे पात्र विद्यार्थी जर पुरस्कारापासुन वंचित राहिल्यास त्याची संपूण जबाबदारी ही सबंधित संस्थेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची राहील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी व तात्काळ प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

    1. What is the 10th and 12th Topper SC Student Scholarship?

    It is a merit-based award scheme for Scheduled Caste (SC) students in Maharashtra who top in their school/taluka/district/division in class 10 or 12. Scholarships range from ₹5,000 to ₹50,000.

    2. Who is eligible for this scholarship?

    SC students who have ranked first in their respective school, taluka, district, or division in 10th or 12th standard are eligible.

    3. What is the amount of scholarship awarded?

    ₹5,000 – School-level
    ₹10,000 – Taluka-level
    ₹25,000 – District-level
    ₹50,000 – Division-level

    4. How to apply for the SC topper scholarship?

    The student cannot apply directly. The respective school or junior college must submit a proposal to the Assistant Commissioner, Social Welfare Office, Chandrapur.

    5. What documents are required with the proposal?

    Caste Certificate (SC)
    Marksheet
    Aadhaar Card
    Bank Passbook (Xerox)
    Transfer Certificate (TC)

    6. What happens if the proposal is not submitted?

    If the school/college fails to submit the proposal, the eligible student may miss the award. The responsibility will lie with the headmaster or principal.
  • swayam portal hostel admission last date । Swayam Portal वसतिगृह प्रवेश अंतिम टप्प्यात – मुदत संपण्यापूर्वी अर्ज करा

    swayam portal hostel admission last date

    swayam portal hostel admission last date : चंद्रपूर –  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याकरीता  मुलांचे 12 (चंद्रपुर – 2, राजुरा – 2, गडचांदूर,  कोरपना,  जिवती,  सिंदेवाही,  मुल,  सावली,  पोंभुर्णा व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एक) व मुलींचे 11 (चंद्रपुर – 2, राजुरा,  गडचांदूर,  कोरपना,  जिवती, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एक) असे एकूण 23 वसतिगृह कार्यरत आहेत. सन 2025-26 करीता रिक्त जागांवर प्रवेशाकरोता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीवर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. how to apply for government tribal hostel online

    बकर ईद शांततेत पार पाडा – चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    जिल्हास्तरावर चंद्रपुर येथे मुलांचे 2 व मुलींचे 2 असे एकूण 4 वसतिगृह कार्यरत असून या वसतिगृहांमध्ये इयत्ता 11 ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमांस प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणार आहे. तसेच उर्वरीत 19 वसतिगृहांमध्ये वर्ग 8 वी पासून पुढे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.

    वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यात दिलेल्या कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी. वसतिगृहातील ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपला अर्ज फक्त रिनीव्हल करायचा आहे, नविन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज भरलेल्या दिनांकापासुन आपण निवडलेल्या वसतिगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावे. how to apply for government tribal hostel online

    वसतिगृह प्रवेशाचे संकेतस्थळ पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 31 जुलै 2025  पर्यंत व व्यावसायीक अभ्यासक्रमांकरीता 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

    1. What is the last date for hostel admission on Swayam Portal?

    The last date for submitting hostel admission applications for degree and postgraduate courses is 31st July 2025. For professional courses, it is 31st August 2025.

    2. Who can apply for hostel admission through the Swayam Portal?

    Scheduled Tribe (ST) students from Maharashtra who are studying in class 8th and above, including degree, postgraduate, and professional courses, are eligible.

    3. Where should I apply for tribal hostel admission in Maharashtra?

    You must apply online through the official portal: www.swayam.mahaonline.gov.in

    4. What documents are required for hostel admission?

    Caste certificate (ST)
    Marksheet of the last passed exam
    Aadhaar card
    Income certificate
    Domicile certificate
    Passport size photo
  • armyworm attack in rice and cotton crops । लष्करी अळीने चंद्रपूरच्या शेतात उधळण – मदतीसाठी आ. मुनगंटीवारांचा पुढाकार

    armyworm attack in rice and cotton crops

    armyworm attack in rice and cotton crops : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये धान व कापूस पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्याकडे केली.

    चंद्रपुरात वनविभागाचे नियंत्रण कक्ष सुरु

    चंद्रपूर जिल्ह्यातील लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ४ जून रोजी मंत्रालयात राज्याचे कृषी राज्यमंत्री ना. श्री. आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार, संबधित अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार आदिंची उपस्थिती होती. government relief scheme for farmers

    government relief for farmers

    ३७,००० हेक्टर क्षेत्र बाधित

    चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सुमारे ३७,००० हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीमुळे पीक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. या आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आणि योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत केली. लष्करी अळीमुळे हजारो शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न संकटात आले. म्हणूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.

    या आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना न्याय मिळेल, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्र्यांनी दिली.

  • Forest Control Room Chandrapur । चंद्रपूरमध्ये वनसंवर्धनासाठी २४ तास कार्यरत ‘वन नियंत्रण कक्ष’!, माजी वनमंत्र्याची भेट

    Forest Control Room Chandrapur

    Forest Control Room Chandrapur : चंद्रपूर : चंद्रपूर वनवृत्त अंतर्गत वने व वन्यजीव संरक्षण अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी, तसेच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांवर तातडीने प्रतिसाद मिळावा यासाठी, रामबाग वसाहतीत अत्याधुनिक वन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या नियंत्रण कक्षाला भेट देऊन यंत्रणेची माहिती घेतली. real-time forest monitoring system

    सीडीसीसी बँक निवडणूक, संचालक मंडळ अडचणीत

    टोल फ्री क्रमांक उपलब्ध:

    नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 18003033 हा आहे. सदर कक्षातून चंद्रपूर वनवृत्तातील वनविभागाविषयी माहिती पाहिजे असल्यास ती तात्काळ प्राप्त होते. विभागाच्या कामकाजाविषयी माहिती मिळण्यास मदत होते. तसेच काही तक्रारी असल्यास त्याचे निराकरण देखील या कक्षाच्या माध्यमातून केल्या जाते. नियंत्रण कक्ष उभारणीसाठी 11 ऑक्टोबर 2024 रोजी शासन आदेश निर्गमित झाला होता. आता हा कक्ष स्थापन झाला आहे. forest department toll free number

    real time management system

    घटनांची माहिती एकाच ठिकाणी:

    ‘वन नियंत्रण कक्ष’ हा चंद्रपूर वनवृत्ताच्या मध्यवर्ती ठिकाणी असून चंद्रपूर वनवृत्तातील घटनांची माहिती एकत्रितरित्या एकाच ठिकाणी साठवून ठेवण्यास मदत होते.  या कक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर वनवृत्त व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व वनकर्मचाऱ्यांसह शासकीय वाहनांचे रियल टाईम लोकेशन मिळते. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्यास वनविभागात कार्यरत असलेल्या आर.आर.टी पथकाचा संबंधित विभागाशी समन्वय साधण्यास मदत होते.

    शासकीय वाहनात फॉरेस्ट कन्सोल स्क्रीन:

    वन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असते. या कक्षामार्फत वन कर्मचाऱ्यांकरिता फॉरेस्ट कंट्रोल नावाचे अँड्रॉइड ॲप तयार करण्यात आले आहे. हे  ॲप हाताळण्यासाठी वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यास सदर माहिती संबंधित वनरक्षक, वनपाल आणि  वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना ॲपच्या माध्यमातून लगेच प्राप्त होते. वन नियंत्रण कक्षाद्वारे शासकीय वाहनांमध्ये सुद्धा फाॅरेस्ट कन्सोल स्क्रीन बसविण्यात आले आहे. अधिकारी दौऱ्यात असल्यास त्यांच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांची माहिती शासकीय वाहनात मिळण्यास मदत होते.

    वनविभागाच्या या पुढाकारामुळे वने आणि वन्यजीव संरक्षण, तक्रारीचे निराकरण व प्रभावी समन्वय साधण्यास मदत होणार आहे.

  • Chandrapur Bakrid law and order update । चंद्रपूरमध्ये बकर ईद शांततेत पार पाडा, अफवांपासून सावध राहा!

    Chandrapur Bakrid law and order update

    Chandrapur Bakrid law and order update : चंद्रपूर – जिल्ह्यात 7 जून रोजी बकर ईद हा सण साजरा करण्यात येणार आहे. चंद्रपूर हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा हा नावलौकिक कायम राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्वांनी शांततेत सण उत्सव साजरे करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. District administration role during Bakrid

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जोरगेवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

    जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाच्या वतीने नियोजन सभागृह येथे जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी, पोलिस पाटील तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

    peace committee meeting

    कुर्बाणीचे फोटो सोशल मिडीयावर

    शांतता समितीमध्ये ज्येष्ठ सदस्यांचा समावेश आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आजची तरुण पिढी अनिर्बंधपणे सोशल मिडीयाचा वापर करतात. कृत्रीम बुध्दीमत्तेमुळे (एआय) त्यात भर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपापल्या परिसरातील तरुण पिढीला शांतता समितीच्या सदस्यांनी समजावून सांगावे. आपल्या पोस्टमुळे काही अघटीत घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. कुर्बाणीचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड करू नये. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवावे. सोशल मिडीयासंदर्भात काही शंका आल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे किंवा 112 वर कॉल करून माहिती द्यावी. Peace committee meeting before Bakrid festival

    सणांच्या कालावधीत नियमित पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य नियोजन करावे. वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची काळजी घ्यावी. बकर ईदच्या कालावधीत कुर्बाणी झाल्यानंतर अनावश्यक असलेले पदार्थ/ साहित्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, जेणेकरून कोणचाही आक्षेप येणार नाही. तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

    अशा आहेत सदस्यांच्या सुचना

    यावेळी जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांनी आपले म्हणणे मांडले. सद्या सणासुदीच्या दिवसांत नियमित पाणी पुरवठा व्हावा, वीज पुरवठा खंडीत होऊ नये, कुर्बाणीमुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अफवांवर वेळीच निर्बंध घालावे, उभारण्यात येणा-या तात्पुरत्या कत्तल खान्यात लाईट आणि पाण्याची व्यवस्था चांगली असावी. मांसची वाहतूक उघडपणे न करता ती झाकून करावी, आदी सुचना सदस्यांनी मांडल्या.

  • cdcc bank elections । निवडणुकीआधीच बँक व्यवस्थापन अडचणीत; जोरगेवारांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

    cdcc bank elections

    cdcc bank elections : चंद्रपूर – तब्बल १३ वर्षांनंतर होणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. याआधीही त्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री यांचे निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता व गैरप्रकारांकडे लक्ष वेधले होते.

    २०१२ नंतर आता २०२५ मध्ये होत असलेल्या बँकेच्या निवडणुकीबाबत न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतेही धोरणात्मक निर्णय न घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, बँकेच्या सध्याच्या व्यवस्थापनाने हे आदेश धाब्यावर बसवत काही निर्णय घेतले आहेत, असा आरोप होत आहे.

    6 शहरात चोरी करणाऱ्या महिलांना मूल पोलिसांनी केली अटक

    दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बँकेवर सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात ३ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यापैकी केवळ १ कोटी रुपये परत मिळाले असून उर्वरित २ कोटी ७५ लाख रुपये बँकेने ग्राहकांना परस्पर परत केले. हा निर्णय बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता घेतल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणातही अनेक वित्तीय गैरप्रकार झाल्याची शक्यता आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm Devendra fadnavis) यांच्याशी झालेल्या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी या सर्व प्रकारांबाबत माहिती दिली. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.

    अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीसाठी ५ लाख रुपयांची मदतीची मागणी.

    तुकूम येथे काही दिवसांपूर्वी हायवा वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या सानिका कुमरे या २२ वर्षीय विद्यार्थिनीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

    हायवा वाहन चालकाला फिट आल्याने त्याचे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर घसरले. या दुर्घटनेत सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण काजल गंभीर जखमी झाली. आमदार जोरगेवार यांनी अपघातानंतर घटनास्थळी भेट दिली होती. तसेच रुग्णालयात जात काजलची प्रकृतीची विचारपूस केली होती.

    सावनेर खान पर्यटन पाहणीचा दिला मुख्यमंत्र्यांना आढावा

    नुकतीच आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील सावनेर येथील भूमिगत खान पर्यटन प्रकल्पाची पाहणी अधिकाऱ्यांसह केली होती. या धर्तीवर चंद्रपूर येथील महाकाली कॉलरीच्या बंद भूमिगत खाणीत पर्यटन सुरू करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

  • gang stealing gold ornaments । ६ शहरांत गुन्हे करणाऱ्या महिला टोळक्याला मूल पोलिसांनी केली अटक

    gang stealing gold ornaments

    मूल बस स्थानकातून प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिला टोळीला अखेर गजाआड करण्यात आले आहे. या टोळीने नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह विविध शहरांमध्ये चोरीच्या घटना घडवल्या होत्या. पोलिसांच्या सततच्या पाळतीनंतर ३० मे रोजी दोघींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चला, या धक्कादायक कारवाईबाबत अधिक माहिती घेऊया.

    gang stealing gold ornaments : काही दिवसांपूर्वी मूल बस स्थानक परिसरातून पाकिटमारांच्या टोळक्याला अटक करण्यात आली होती, आता मूल पोलिसांनी बस स्थानक परिसरात प्रवाश्यांचे सोने चोरणाऱ्या २ महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलांकडून २ लक्ष ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    ६ मे रोजी सकाळच्या सुमारास मूल बस स्थानकात बस मध्ये चढून एका महिला प्रवाश्याच्या गळ्यातील १० ग्राम वजनाचा सोन्याचा गोप अज्ञातांनी चोरी केला, याबाबत मूल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    महावितरणची सेवा फक्त नावापुरतीच? आढावा बैठकीत काय ठरलं?

    गुन्हा दाखल होताच मूल पोलिसांनी बस स्थानक परिसरात सतत पाळत ठेवली, अखेर ३० मे रोजी पेट्रोलिंग दरम्यान ३५ वर्षीय जमुना हितेश उरः संदीप नाडे उर्फ वाघमारे व ४० वर्षीय लक्ष्मी जगणु मानकर राहणार रामेश्वरी टोली नागपूर या दोघांना अटक करण्यात आली. gold theft at bus station

    महिलांवर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल

    दोन्ही महिलांची चौकशी केली असता त्यांनी बस स्थानक परिसरातून सोन्याचे दागिने चोरी केली असल्याची कबुली दिली. विशेष बाब म्हणजे सदर आरोपी महिलांवर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती व हैद्राबाद येथील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. ६ मे व २० मे रोजी मूल बस स्थानकावर त्या महिलांनी प्रवाश्यांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबूल केले. female thieves caught on bus

    आरोपी महिलांकडून २५ ग्राम सोन सहित २ लक्ष ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची यश्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोउपनि भाऊराव बोरकर, पोलीस कर्मचारी भोजराज मुडरे, जमीरखान पठाण, चिमाजी देवकाते, नरेश कोडापे व सीमा निषाद यांनी केली.

    पोलिसांचं आवाहन

    यावेळी मूल पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि बस स्थानकात बस मध्ये चढत-उतरत असताना आपल्या दागिन्यांची व मोबाईलची काळजी घ्यावी किंवा शक्यतो प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने घालण्याचे टाळावे.

  • why do I feel tired after 8 hours of sleep । “८ तास झोपलात तरीही थकलेले का वाटते? शरीर काहीतरी सांगतंय!”

    why do I feel tired after 8 hours of sleep

    why do I feel tired after 8 hours of sleep : प्रौढांना दररोज रात्री किमान ७-९ तास चांगली झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. पण दररोज रात्री ८ तास झोपूनही, तुम्हाला सतत थकवा, आळस आणि जडपणा जाणवतो का?

    जेवणांनंतर पाणी पिताय? तर हि बातमी तुमच्यासाठी

    चांगल्या आरोग्यासाठी, योग्य आहार आणि दिनचर्या राखणे सर्वात महत्वाचे मानले जाते. तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही काय खाता आणि पिता, या सर्वांचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. पण हे पुरेसे नाही. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की योग्य आहार आणि जीवनशैली राखण्यासोबतच, दररोज रात्री चांगली आणि पुरेशी झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे.

    Why Do You Feel Tired Even After 8 Hours of Sleep?

    प्रौढांना दररोज रात्री किमान ७-९ तास चांगली झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. परंतु दररोज रात्री ८ तास झोपूनही, तुम्ही दिवसभर थकलेले, आळशी आणि जड वाटत राहता का?

    जर तुम्हालाही या प्रकारच्या समस्येचा त्रास होत असेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये, हे गंभीर आजारांचे आणि काही प्रकारच्या असंतुलनाचे लक्षण असू शकते, ज्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

    रात्रीची चांगली झोप देखील तुम्हाला विश्रांती का देत नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बरं, या समस्येने त्रस्त असलेले तुम्ही एकटे नाही आहात, जगभरातील लाखो लोक याचा सामना करत आहेत. चला यामागील कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

    Hormonal Imbalance: The Hidden Culprit

    हार्मोन्स शरीराच्या सर्व कार्यांचे व्यवस्थापन करतात. जर त्यांच्यात काही असंतुलन असेल तर तुम्ही थकलेले आणि आळशी बनताच, पण काही प्रकरणांमध्ये ते गंभीर समस्यांचे कारण देखील बनू शकते. सहसा ही समस्या तणाव संप्रेरकांमधील असंतुलनामुळे उद्भवते. कमी-अधिक प्रमाणात तणाव संप्रेरक शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करू शकतात. hormones that affect sleep and energy

    जर तुम्ही दिवसा थकलेले असाल, तर ते तुमच्या शरीरातील कोर्टिसोल पातळी (how cortisol affects sleep quality) बिघडल्याचे लक्षण आहे. कोर्टिसोल जास्त असल्याने, मेलाटोनिन (झोपेचे संप्रेरक) च्या पातळीवर परिणाम होतो. याचा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, ज्यामुळे शरीरासाठी समस्या वाढू लागतात.

    Electrolyte Deficiency and Sleep Disturbance

    मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स आपल्या शरीरात विशेष भूमिका बजावतात. हे सर्व खनिजे शरीराला गाढ झोप येण्यासाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी खूप महत्वाचे आहेत. त्यांच्या कमतरतेमुळे तुमची झोप विस्कळीत होते, तुम्ही वारंवार जागे व्हाल आणि पूर्ण झोप मिळत नाही. यामुळे, तुम्हाला दिवसभर थकवा आणि आळसाची समस्या उद्भवू शकते.

    Disrupted Circadian Rhythm

    स्क्रीन (मोबाइल/लॅपटॉप) मधून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिन हार्मोनच्या कार्यात व्यत्यय आणतो, ज्यामुळे झोपेची नैसर्गिक लय बिघडते. रात्रीच्या वेळी मोबाईल फोनचा जास्त वापर करणाऱ्या लोकांमध्ये या प्रकारची समस्या जास्त प्रमाणात आढळते. does screen time affect melatonin levels

    झोपेच्या १ तास आधी स्क्रीन बंद करणे, दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे, कॅफिनचे सेवन कमीत कमी करणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे यासारखे काही उपाय तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारतातच, शिवाय दिवसभर तुम्हाला ऊर्जावान ठेवतात.